लायनीतले अब्जाधीश

कोंबडी प्रेमी's picture
कोंबडी प्रेमी in काथ्याकूट
28 Jan 2015 - 7:59 am
गाभा: 

लायनीतले अब्जाधीश

ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ...

ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ?

एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ...

नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही ....

हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ?

असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 8:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

इट'स ऑल बिझनेस मेट. सगळ्याचं देशामधले उद्योगपती जगातल्या सर्वात जास्त शक्तीमान जागी असणार्‍या माणसाच्या भेटीसाठी ताटकळतील. त्यातली कितीतरी न.मो. आणि बराक ओबामांच्या आण्विक चर्चेमधुन आपल्या हाती काही चांगली प्रोजेक्ट्स पडतील का ह्याचा अंदाज घ्यायला आलेले असणारेत. त्यातुन रोजगारनिर्मिती होणारचे.

कोंबडी प्रेमी's picture

28 Jan 2015 - 8:36 am | कोंबडी प्रेमी

सगळ्याचं देशामधले उद्योगपती जगातल्या सर्वात जास्त शक्तीमान जागी असणार्‍या माणसाच्या भेटीसाठी ताटकळतील

बिल गेट्स - वारेन बफे - लरि एलिस्न -मार्कोबा झुकेर्ब्र्क्ग ...प्रभृती राहतील असे रांगेत उभे एका मागे एक ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 8:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यावसायिक संधींसाठी नक्कीचं. आधीही उभे राहिले असतील आणि पुढेही उभे राहतील. बाकी ते मल्ल्या दिसतं नाहीयेत कुठे फोटोत.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

28 Jan 2015 - 10:58 am | जेम्स बॉन्ड ००७

मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे..

अनुप ढेरे's picture

28 Jan 2015 - 11:03 am | अनुप ढेरे

अगदी अगदी!!

चिगो's picture

28 Jan 2015 - 3:44 pm | चिगो

मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे..

१००% सहमत.. ह्या फोटोत लोकांना इतकं नवल वाटण्यासारखं काय आहे, हेच कळत नाही. 'रांगेत उभं राहणं' म्हणजे जणू भीक मागत असल्यासारखं आहे, असं वाटतंय का काय लोकांना?

मी हॉस्टेलमध्ये असतांना (जवाहर नवोदय विद्यालय) पाच वर्षं रोज चारदा रांगेत उभं राहीलोय जेवणासाठी. त्यामुळे "रांग म्हणजे अपमान" हा प्रकार पटत नाही मला..
इथे शिलाँगमध्ये एक सरकारी शाळा आहे. अगदी सव्वाशे वर्षं जूनी वगैरे.. फक्त ८,०००/- वार्षिक फी मध्ये १२वीला ICSEचा कोर्स शिकवणार्‍या ह्या शाळेत पोरांना टेबलांवर जेवण वाढायला 'बैरा' ठेवले आहेत.. मायला ! मी तर उडालोच. अबे, जिथं शाळेचा दैनंदिन खर्च चालवायला सरकारकडे पैसा मागावा लागतो, तिथे ही 'गोरा साहीब' आणि 'नेटीव्ह' प्रकारातल्या भावना वाढीस लावणार्‍या फालतू 'लीगसीज' पाळत बसण्याला काय अर्थ आहे? पण नाही.. "प्रिमीयर"पणा जातो म्हणे अशानं. "बडा घर, पोकळ वासा" म्हणजे काय हे अनुभवतोय.. ;-)

यात अस्मितेचा संबंध कुठे आला? अर्थस्य पुरुषो दासः

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Jan 2015 - 9:47 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी लाचार चेहरे करून उभे होते.
लाईन पाहून ह्यांनाही धक्का बसला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही,महासत्तेपुढे तर नाहीच नाही.अंबानी काय मित्तल काय, परदेशी तंत्रज्ञान्,यंत्रे बाहेरून आणायची,स्वतःची दुकाने चालवून खिसे भरायचे.मग उरलेल्या पैशात 'मेक इन इंडिया'

काळा पहाड's picture

28 Jan 2015 - 11:02 am | काळा पहाड

माई, तुमच्या ह्यांना जरा मानसोपचार तज्ञाकडे घेवून जा. उगीच आजार वाढला तर व्हायोलंट व्हायचे.

सुबोध खरे's picture

28 Jan 2015 - 11:08 am | सुबोध खरे

+१००
The problem with leftist is nothing right is left in them

जेम्स बॉन्ड ००७'s picture

28 Jan 2015 - 11:39 am | जेम्स बॉन्ड ००७

*ROFL*

अनुप ढेरे's picture

28 Jan 2015 - 11:13 am | अनुप ढेरे

अंबानी काय मित्तल काय, परदेशी तंत्रज्ञान्,यंत्रे बाहेरून आणायची,स्वतःची दुकाने चालवून खिसे भरायचे.

याच्याशी सहमत आहे.

इरसाल's picture

28 Jan 2015 - 11:37 am | इरसाल

गेले बिले नाय ना ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 11:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

डु-आयडीरत्न नानासाहेबांचा अवतार समाप्त झाल्याची दु़ख्खद वार्ता काही हितचिंतंकांकडुन समजली होती. खरं खोटं माहित नाही. आत्मा अमर असतो तो "ग्रेटथिंकरां"च्या रुपात पुन:र्जन्माला आलाय असं दिसतयं..गुरुकृपा बाकी काय. =))

मृत्युन्जय's picture

28 Jan 2015 - 11:51 am | मृत्युन्जय

अभ्यास वाढवा. ग्रेटथुंकर आधीपासुनच होते. काही काळासाठी ते अज्ञातवासात होते. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की नाना, माई, अजातशत्रू, सचीन, हितेश आणि असे इतर बरेच हे एकाच आयडीचे डु आयडी आहेत?

असहमत. हितेश ऊर्फ पोटे ऊर्फ उद्दाम ऊर्फ जामोप्या आणि ग्रेटथुंकर ऊर्फ नाना ऊर्फ माई हे दोन वेगवेगळ्या आयडींचे अवतार आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

28 Jan 2015 - 2:39 pm | प्रसाद गोडबोले

जामोप्या

मायबोली वरील जामोप्या आणि हे जामोप्या एकच होत काय ?

मायबोलीवर काय च्छान छान लेख टाकायचे ते , त्यांचा तो दृष्ट न लागण्या साठीच्या आमुलेटचा लेख मला अजुनही आठवतोय =))

विशाल कुलकर्णी's picture

28 Jan 2015 - 2:51 pm | विशाल कुलकर्णी

*dash1* *DASH* *WALL*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 6:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

असहमत. आधीचा ग्रेटथिंकरचा अवतार समाप्त झालेला आहे. हा दुसरा अवतार आहे.

हे व्हर्जिनल ग्रेट्थिंकर आहेत का ते माहित नाही. आधीच्या पेक्षा बरीचं वेगळी मतं मांडताना दिसतात हल्ली. =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 9:54 am | कैलासवासी सोन्याबापु

लहान सहान गोष्टीची "अस्मिता रेसिपी" बनवणे हा आपल्या भारतीय लोक मानासिकतेचा एक नको असलेला अभिनिवेष आहे असे मनापासुन वाटते, संस्कृति जितकी जुनी तितके हे ओघाने येतेच हे ही खरेच!!!, ह्याचाच फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनी ने "it's just good business" म्हणत हा खंडप्राय देश देशोधडी ला लावला!!! , अर्थात काही प्रमाणात मी सुद्धा ह्याचाच पाईक!! हा विचार खोडला जातोय ह्याचा आनंद!, बिजनेसमैन ची प्रार्थमिकता अन त्याची अस्मिता "प्रॉफिट एंड लोस स्टेटमेंट" असते!!, प्रत्येकाचा एक फोर्टे असतो! वरती बिज़नसमैन ची मानसिकता सांगितली आहे तसेच वैज्ञानिक, सैनिक, अभियंता, वकील, सरकारी कर्मचारी प्रत्येक वर्गाची एक अस्मिता असते, असे वाटते, लाईनीत उभारणे ह्यात मला तरी गैर काही दिसले नाही! हे एप्रोच बिज़नस मधे " परी अंतरी नाना कळा" असते असेही वाटते! आज लाइन मधे उभे आहेत तेच उद्या रोजगार देणार, इतकेच काय तर ज्या सरकार पुढे उभे आहेत त्या पक्षाचं इलेक्शन स्पोंसर करणार! कालमहिमा! अजुन काय!!

विशाल कुलकर्णी's picture

28 Jan 2015 - 10:23 am | विशाल कुलकर्णी

प्रत्येकाचा एक फोर्टे असतो! वरती बिज़नसमैन ची मानसिकता सांगितली आहे तसेच वैज्ञानिक, सैनिक, अभियंता, वकील, सरकारी कर्मचारी प्रत्येक वर्गाची एक अस्मिता असते, असे वाटते, लाईनीत उभारणे ह्यात मला तरी गैर काही दिसले नाही! हे एप्रोच बिज़नस मधे " परी अंतरी नाना कळा" असते असेही वाटते! आज लाइन मधे उभे आहेत तेच उद्या रोजगार देणार, इतकेच काय तर ज्या सरकार पुढे उभे आहेत त्या पक्षाचं इलेक्शन स्पोंसर करणार!

सहमत आहे सोन्याबापू. मुळात तो फोटो कुठल्या वेळी घेतलाय ते माहीत नाही. सुरक्षाघेर्‍यातून क्रॉस होण्यासाठी सुद्धा थांबलेले असू शकतात. आणि उभे राहीलेच रांगेत तर त्याने असा काय फरक पडतो. त्यांना पण कळू द्या जेव्हा सामान्य माणसाला प्रत्येक लहान-सहान बाबीसाठी इथे रांग लावावी लागते. तेव्हा त्याची मानसिकता काय असते ते. फरक इतकाच आहे की इथे खिडकी तोंडावर बंद होण्याची भीती नाहीये या उद्योगपतींना. ;)

सुबोध खरे's picture

28 Jan 2015 - 11:06 am | सुबोध खरे

उद्योगपतींना झोडणे हा आपल्याकडील डाव्या विचार सरणीच्या लोकांचा आवडता उद्योग आहे. ज्या नरेंद्र मोदींना १० वर्षे व्हिसा नाकारला त्याच अमेरिकेने त्यांच्यापुढे लोटांगण घातलेच ना? नुसताच त्यांना व्हिसा दिला असे नव्हे तर त्यांना खास आमंत्रण देऊन अमेरिकेत बोलावले. त्यांच्यावरील खटला सुद्धा रद्दबातल केला. याला तुम्ही अमेरिकेने नरेंद्र मोदिंच्या पुढे ( हे आवडत नसेल तर भारतापुढे म्हणतो) लोटांगण घातले असे म्हणणार का?
नसत्या गोष्टीत अस्मिता घेऊन कोणत्याही देशाचा फायदा झालेला नाही. चीन हा सरळ सरळ प्रतिस्पर्धी असताना अमेरिका त्यांच्या फायद्यासाठी चीन बरोबर पण व्यापारी संधी करतेच ना?
अस्मिता काय आहे हे आणि उपचार म्हणजे नक्की काय हे माहित नसताना बरेच लोक टीका करताना आढळतात सेनाधिकार्याना त्यांच्या पुढे रांगेत उभे केले तर त्यात गैर काय आहे. जसे आपल्या राष्ट्रपतींना भेटण्यास लष्करी अधिकारी रांगेत ( त्यांच्या वरिष्ठते प्रमाणे) उभे राहतात. तसेच त्या राष्ट्राच्या अध्यक्षांना( ते त्यांच्या लष्कराचे सर्वोच्च अधिकारी आहेत) भेटण्यासाठी रांगेत उभे राहिले तर गैर काय? ते आंतरराष्ट्रीय औचित्याला धरून आहे.
रांगेचा फायदा तुम्हा आम्हा सर्वांनाच.
राहिली गोष्ट पत्रकारांची. त्यांची लायकी एकंदर काय आहे ते अपना सर्वाना माहित आहेच. कोणती गोष्ट काय तर्हेने प्रसारित करावी त्याचे औचित्य काय याचा कोणताही विधिनिषेध त्यांना नाही आणि त्याबद्दल माहिती नसताना whats app वर forward करणारे आपण.
अधिक काय लिहिणे?

कोंबडी प्रेमी's picture

28 Jan 2015 - 12:08 pm | कोंबडी प्रेमी

उद्योगपतींना झोडणे हा उद्देश नाहीये...
एकसाथ हे सगळे एका लायनीत उभे आहेत त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची अगतिकता, नाईलाज,मरगळलेले दिसत आहे ...
रांगेत उभे राहण्या ऐवेजी हे सगळे २-३ च्या गटात उभे राहून आपली टर्न येण्याची वाट बघत आहेत हे शक्य होते ...
...दुसरे...समजा काही कारणाने ते उभे राहणे अपरिहार्य असले तरी तसे फोटो प्रसारित नं होऊ देणे जरुरीचे होते ...

याला तुम्ही अमेरिकेने नरेंद्र मोदिंच्या पुढे ( हे आवडत नसेल तर भारतापुढे म्हणतो) लोटांगण घातले असे म्हणणार का?

चार पैसे मिळवण्या साठी स्वत:च्या तत्वांना झक मारत घातलेली मुरड तरी नक्कीच म्हणता येईल ...
असो ... कसली अस्मिता / profit first वगैरे सुरु झाले कि मग काही बोलायलाच नको ...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Jan 2015 - 12:59 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

एकसाथ हे सगळे एका लायनीत उभे आहेत त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची अगतिकता, नाईलाज,मरगळलेले दिसत आहे .

हेच म्हणायचे होते. नरेण्द्रने दम देऊन उभे केल्यासारखे चेहरे दिसत होते.असो.
मोदी पुन्हा अमेरिकेला गेल्यावर बील गेट्स्,जी.ई.चे सी.ई.ओ.,वॉल स्ट्रीटवरचे शेठजी लोक लायनीत उभे राहिलेले बघायला आवडतील.

कोंबडी प्रेमी's picture

28 Jan 2015 - 1:32 pm | कोंबडी प्रेमी

असेच वाटते ...

क्लिंटन's picture

28 Jan 2015 - 2:10 pm | क्लिंटन

मोदी पुन्हा अमेरिकेला गेल्यावर बील गेट्स्,जी.ई.चे सी.ई.ओ.,वॉल स्ट्रीटवरचे शेठजी लोक लायनीत उभे राहिलेले बघायला आवडतील.

त्यासाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या दहापट मोठी भारतीय अर्थव्यवस्था व्हायला हवी.तसे झाल्यास सगळे सी.ई.ओ आणि शेठजी लोक भारतीय पंतप्रधानांपुढेही लाईनीत उभे राहतील.हे माझ्या (किंवा मिपावरील सगळ्यांच्या) तरी आयुष्यकाळात शक्य होणार नाही त्यामुळे तशी ही हायपोथेटीकल कल्पना आणि शक्यता आहे :)

बाकी काहीही असले तरी अमेरिकन लोकांना अगदी लहानपणापासून लाईनीत उभे राहायची सवय असते त्यामुळे असे उद्योगपतींना लाईनीत उभे राहायला लागले तरी त्याविषयी त्यांना कोणताही कमीपणा वाटणार नाही.तसेच अमेरिकन लोकांनाही त्याचे काही वावगे वाटणार नाही. त्यामुळे भारतातील मिसळपाव डॉट कॉमवर जरी अशी चर्चा चालू असली तरी अमेरिकेतील एखाद्या हॅमबर्गर डॉट कॉम यासारख्या वेबसाईटवर अशी चर्चा व्हायची शक्यता सुतराम नाही :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Jan 2015 - 4:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बाबा रे क्लिंटना, लाईनीत उभे रहायला कोणाचीच हरकत नाही.त्यात कमीपणाही नाही.मुकेशभाईनी ८३ नंबरची कुलाबा-सांताक्रूझ बस पकडली तरी त्यात वावगे नाही.
गेले काही वर्षे(म्हणजे नरेंद्र सत्तेवर याय्चय आधीपासून हो!) इंडिया सक्सेस स्टोरीज् येत आहेत. भारतिय उद्योजकतेचे मिडियात सर्वत्र नगारे,ढोल ताशे बडवले जात असताना ह्यांचे प्रतिनिधींचे चेहरे मात्र पडेल होते.

क्लिंटन's picture

28 Jan 2015 - 4:12 pm | क्लिंटन

इंडिया सक्सेस स्टोरीज् येत आहेत. भारतिय उद्योजकतेचे मिडियात सर्वत्र नगारे,ढोल ताशे बडवले जात असताना ह्यांचे प्रतिनिधींचे चेहरे मात्र पडेल होते.

अहो माईसाहेब, त्यांचे चेहरे पडेल होते असे मला तरी वाटले नाही.तरीही इंडिया सक्सेस स्टोरी येत आहे म्हणून सतत त्यांचे चेहरे हसतमुख आणि उत्साहाने सळसळतेच पाहिजेत आणि समजा कधी तितका उत्साह त्यांच्या चेहर्‍यावर दिसला नाही तर ते अपयशी आहेत असे थोडीच आहे?

मृत्युन्जय's picture

28 Jan 2015 - 6:07 pm | मृत्युन्जय

माई मला तरी सगळ्यांच्या चेहर्‍यांवर स्मित दिसते आहे. तिथे गाढ्वासारखे खिंकाळुन हसणे शोभले नसते. त्यामुळे शिष्टाचाराला अनुसरुन हास्य / स्मित विलासते आहे चेहर्‍यांवर. अर्थात ज्याला त्याला जे ते पाहयचे आहे तेच दिसणार.

तरीही हे फोटो बघा. राष्ट्रपतींच्या फेसबुक पेज वर अप्लोड केले आहेत (त्यांच्याच कार्यालयाने बहुधा):

https://www.facebook.com/presidentofindiarb/photos_stream

रेवती's picture

28 Jan 2015 - 7:28 pm | रेवती

हा हा हा. मस्त प्रतिसाद. तुमचे विनोदी प्रतिसाद साठवून ठेवायची सोय करायला हवी.

सर्वसाक्षी's picture

28 Jan 2015 - 11:14 am | सर्वसाक्षी

हे चित्र नक्की कधी व कुठे टिपले आहे याचा तपशिल न पाहताच तर्क लढवणे योग्य नाही.

ओबामांचे त्यांच्या विमानातले कुत्र्याशी खेळतानाचे वा विमानाच्या खिडकीतुन बाहेर पाहतानाचे फोटो गेले काही दिवस वॉसपवर फिरत आहेत. उद्या अमेरिकेत यावर चर्चा होऊ शकेल की देशापुढे अनेक समस्या असताना अध्यक्ष महाशय खुशाल कुत्र्याशी खेळत आहेत.

भाउ, तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो आलाच असेल. आपले उपराष्ट्रपती राष्ट्रगीताला उभे आहेत मात्र त्यांनी ध्वजाला सलाम केलेला नाही. बरोबर उभे असलेले नमो, पर्रिकर, राष्ट्रपती वगैरे वंदन मुद्रेत आहेत. आपल्याला ते नाही का खटकलं? ते तर उद्योगपतींनी रांग लावण्यापेक्षा गंभीर आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 11:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपती उपस्थित असताना उपराष्ट्रपतींनी ध्वजाला वंदन करणे अभिप्रेत नाही. राष्ट्रपती काही कारणांनी अनुपस्थितीत असतील तर मात्र ही त्यांची जबाबदारी असते अश्या आशयाचा खुलासा देण्यात आलेला आहे.,

कोंबडी प्रेमी's picture

28 Jan 2015 - 12:11 pm | कोंबडी प्रेमी

शीर झाकलेले असतांना सलाम करावा अन्यथा फक्त अटेन्शन मध्ये उभे राहावे ..टाचा क्षणभर उंचावून सलामी द्यावी असे शिकल्याचे आठवते ...

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो नियम फक्त गणवेशी सेवांमधल्यांसाठी (युनिफॉर्म्ड सर्विसेसना, उदा लष्कर, पोलीस, इ) आहे; मुलकी अधिकारी आणि नागरिकांसाठी नाही.

तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो आलाच असेल. आपले उपराष्ट्रपती राष्ट्रगीताला उभे आहेत मात्र त्यांनी ध्वजाला सलाम केलेला नाही.

आपले उपराष्ट्रपती निदान 'सावधान' स्थितीत तरी उभे होते पण ज्याने हा फोटो काढला तो फोटोग्राफर काय करत होता? 'सावधान' स्थितीत उभं राहून नक्कीच हा फोटो काढला गेला नसेल.
ह्या अश्या क्षुल्लक गोष्टींवरून बातम्या बनवायचा हा आजकाल मिडियाचा आवडता खेळ झाला आहे.

विशाल कुलकर्णी's picture

2 Feb 2015 - 12:18 pm | विशाल कुलकर्णी

आपले उपराष्ट्रपती निदान 'सावधान' स्थितीत तरी उभे होते पण ज्याने हा फोटो काढला तो फोटोग्राफर काय करत होता?

प्रचंड सहमत ! त्या फोटोग्राफरला शोधून त्याच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करु नये ?

इतरत्र म्हटल्याप्रमाणे (किमान माझ्या पाहण्यात आलेला) हा सद्यचर्चेतला फोटो टीव्हीवरच्या फूटेजमधून स्क्रीनशॉट स्वरुपात सिलेक्टिव्हली चारच लोक फ्रेममधे असणारा क्षण साधून प्रत्यक्ष प्रसंगाच्या पश्चात निर्माण केला गेलेला आहे. कोणा फोटोग्राफरने काढलेला फोटो नसावा.

सर्वसाक्षी's picture

28 Jan 2015 - 11:28 am | सर्वसाक्षी

या विषयी माहिती नाही. पण समजा मिळालेली माहिती खरी आहे असे समजलो तरी त्याच प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत वंदन करण्यास मनाई नक्कीच नसावी.

राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्याला ती जबाबदारी वाटत असेल त्याने देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवू नये. सर्वच जबाबदार्यांमधून सुटका.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

28 Jan 2015 - 11:33 am | जेम्स बॉन्ड ००७

कायच्या काय लॉजिक.. करायची म्हणुन केलेली टिका.. मायक्रोस्कोप मधुन शोधुन काढलेले खुस्पट.. ईत्यादी ईत्यादी..

मृत्युन्जय's picture

28 Jan 2015 - 11:49 am | मृत्युन्जय

मला वाटते प्रॉटॉकोल प्रमाणे त्यांचे वागणे बरोबर होते.

कोंबडी प्रेमी's picture

28 Jan 2015 - 12:12 pm | कोंबडी प्रेमी

शीर झाकलेले असतांना सलाम करावा अन्यथा फक्त अटेन्शन मध्ये उभे राहावे ..टाचा क्षणभर उंचावून सलामी द्यावी असे शिकल्याचे आठवते ...

इरसाल's picture

28 Jan 2015 - 11:40 am | इरसाल

सच्चिन .......सच्चिन ढॅण ढॅण ढॅण
सच्चिन .......सच्चिन ढॅण ढॅण ढॅण
सच्चिन .......सच्चिन ढॅण ढॅण ढॅण

उन्मेष दिक्षीत's picture

28 Jan 2015 - 11:50 am | उन्मेष दिक्षीत

ओबामा तीथं येउन एका लाईनीत सगळ्यांना भेटे पर्यंत तिकडे वळुन उभे असतील फक्त ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 11:55 am | डॉ सुहास म्हात्रे

मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे. : जेम्स बॉन्ड ००७

+१००

प्रथम गोर्‍यांची आणि नंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या दादा-भाऊ-मामा-नाना-साहेबांना डोक्यावर घेऊन नाचत त्यांच्या अस्मितेची गळवे कुरवाळण्याची गुलामगिरी करणार्‍या मानसिकतेला हे समजणे कठीण आहे.

ज्या देशात लोकशाही नीट रुजली-बहरली आहे तेथे पंतप्रधानापासून सर्वसामान्य माणसाला रांगेत उभे राहायला कमीपणा वाटत नाही तर ते शिस्तीचे, समतेचे आणि सभ्यपणाचे लक्षण समजले जाते.

पिंपातला उंदीर's picture

28 Jan 2015 - 11:55 am | पिंपातला उंदीर

बर झाल बुवा आपण अब्जाधिश नाहि. *lol*

सुबोध खरे's picture

28 Jan 2015 - 12:04 pm | सुबोध खरे

हे म्हणजे याचकाचे लक्षण आहे .
बरे झाले जास्त पैसे मिळत नाहीत नाहीतर आय कर भरावा लागला असता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्याला ती जबाबदारी वाटत असेल त्याने देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवू नये. सर्वच जबाबदार्यांमधून सुटका. : सर्वसाक्षी

राष्ट्रगीत चालू असताना राष्ट्रध्वजाला वंदन करावे की नाही हे "तशी माझी जबाबदारी आहे की नाही ?" याचा विचार करून ठरवावे लागते, अश्या माणसाला "राष्ट्राबाबत किती आपुलकी आहे ?" असा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य नाही !

सुबोध खरे's picture

28 Jan 2015 - 12:13 pm | सुबोध खरे

लष्करात नोकरी करीत असताना मी एक प्रश्न विचारला होता कि मान देण्यासाठी सलाम करणे आवश्यक आहे का? यावर उत्तर असे कि आपण गुड मॉर्निंग, जय हिंद किंवा प्रत्यक्ष सलाम करणे यातील कोणतीही एक गोष्ट करू शकता. मान देणे महत्त्वाचे आहे कसे करता ते नाही. राष्ट्रगीत चालू असताना आपण एकतर सलाम करू शकता किंवा नुसते सावधान मध्ये उभे राहू शकता. अनावश्यक हालचाल करणे, गप्पा मारणे किंवा तत्सम दुसर्या गोष्टी करणे( सिगारेट पिणे) हा ध्वजाचा अपमान होऊ शकतो
आपण जर नीट पाहिले असेल कि लष्कराची तुकडी जेंव्हा ध्वजाच्या समोरून जाते तेंव्हा तुकडीचा मुख्य बंदुकीने किंवा तलवारीने किंवा हाताने सलाम करतो आणि तुकडीतील सर्व जण नुसतीच परेड करीत पुढे जातात.ध्वजारोहणाचे वेळी परेड मध्ये फक्त परेड कमांडर हा सलाम करतो इतर सर्व जण सावधान मध्ये निश्चल उभे राहतात
तेंव्हा छिद्रान्वेश करण्यात काहीही हशील नाही असे मला वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरे साहेब,

तुम्ही सांगितलेली गोष्ट हा सैनिकी परेडमध्ये सैनिकांनी कसे वागावे याबद्दलचा नियम आहे.

इथला प्रश्न "राष्ट्रगीत चालू असताना राष्ट्रध्वजासमोर उभे असलेल्या देशाच्या उपराष्ट्रपतींना काय करावे असे वाटले होते?" हा आहे.

माझ्या मते जर मनात राष्ट्रध्वजाबद्दल जर आस्था असेल तर "जेव्हा कायद्याने / शिष्टाचारने तसे करणे निषिद्ध नसेल त्या प्रत्येक वेळेस" हात वंदनास वर जातील. तसे न करणे अगदी राष्ट्रद्रोह वगैरे आहे असे मी म्हणणार नाही पण मानसिकतेचे दर्शन मात्र जरूर आहे.

विशेषतः जेव्हा इतकी उच्चपदस्थ व्यक्ती असे वागते; जिने देशाबद्दल आणि देशांच्या मानकांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आदर आणि प्रेम असावे असा संदेश देणे अपेक्षित असते; तेव्हा नक्कीच विरोधाभास होतो.

सुबोध खरे's picture

28 Jan 2015 - 12:50 pm | सुबोध खरे

एक्का साहेब
हा नियम सर्व सरकारी अधिकार्यांसाठी/ नोकरांसाठी आहे.उलट सिव्हीलीयंसनि सलाम केला पाहिजे हा नियम कोणत्याही शासकीय नियमावलीत नाही. ती केवळ गणवेश धारक नोकरांची केलेली नक्कल आहे. केवळ आपण एकतर सलाम करा किंवा "सावधान" मध्ये उभे राहा. गणवेश असो कि नसो.आपण खिशात हात घालून उभे राहिलात तर चालणार नाही. आणी हे आम्हाला स्पष्टपणे नौदल अकादमीत परेडच्या सरावाच्या वेळेस सांगितले होते. कि तुम्ही एखाद्या उच्च पदस्थाला सलाम करता किंवा ध्वजारोहण करता तेंव्हा त्यांनी सलाम केला किंवा नाही केला तरी चालेल."सन्माननीय" व्यक्ती तुमच्या पुढे संरक्षण मंत्री किंवा तत्सम म्हणून येतील.
( खर तर सिव्हीलीयंस साठी कोणताच नियम नाही) तो केवळ शिष्टाचाराचा भाग आहे.
बाकी उपराष्ट्र्पतिनी नक्की काय केले आहे हे मला मीहिती नाही आणी ते पाहीलेलेहि नाही

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 1:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरेसाहेब, मी माझे म्हणणे वरच्या प्रतिसादाच्या शेवटच्या परिच्छेदात दिले आहे. इतर गोष्टी केवळ चर्चेत मुद्दे आला म्हणून लिहिलेल्या आहेत.

जेव्हा असे वागणारी व्यक्ती देशप्रेमाबद्दल बोलते तेव्हा तेव्हा ती प्रेरणा न राहता केवळ गप्पा राहतात.

कोणत्याही संघटना/समुहात (यात देशही आला) चिन्हे, प्रतिके आणि त्याबाबतची "दृश्य" आस्था या किती महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तश्याच प्रेरक ठेवण्यासाठीची अधिकार्‍यांची जबाबदारी किती महत्वाची असते हे सांगायला नकोच. इतकेच माझे म्हणणे आहे.

अनुप ढेरे's picture

28 Jan 2015 - 12:14 pm | अनुप ढेरे

झेंड्याला वंदन करणं किंवा राष्ट्रगीताला विशिष्ट पोझिशनमध्ये उभं रहाणं यावरून त्या व्यक्तिची देशाबद्दलची आपुलकी मोजणं हे पटलं नाही. उगाच खुस्पट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा वा ! भले, भले. मग कोणीच देशासंबधीच्या मानकांची पत्रास कश्याला करायची...??? किती तो लोकशाही विचार !!!

हो ना.. किमान मायावतींसारखे टाईमपास करत तर राहिले नाहीत.

नाखु's picture

28 Jan 2015 - 1:02 pm | नाखु

धाग्याची एक प्रिंट काढून "शेणसार" बोर्डास देणे म्हणजे उगा राष्ट्रगीत वाजवून वेळ वाया घालवतात पिक्चर आधी तो तरी वाचवतील आणि चार जाहीराती तरी मिळतील.
===
धन्य ते राश्ट्र ज्यांस ऐसे राष्त्र्पती आहेत.

आजानुकर्ण's picture

28 Jan 2015 - 10:11 pm | आजानुकर्ण

झेंड्याला वंदन करणं किंवा राष्ट्रगीताला विशिष्ट पोझिशनमध्ये उभं रहाणं यावरून त्या व्यक्तिची देशाबद्दलची आपुलकी मोजणं हे पटलं नाही. उगाच खुस्पट.

अगदी पटलं. पण देशभक्तीचे प्रदर्शन हेच देशभक्तीपेक्षाही महत्त्वाचे आहे असे मानणाऱ्यांना ही गोष्ट कोण समजावणार? चित्रपटाच्या आधी/नंतर राष्ट्रगीत लावल्यावर पब्लिक चालू पडतंच. सरकारी आदेशाने हा रोजच अपमान होतो की!
ते एक असो. मुळात ज्या लोकांनी ध्वजसंहिता लिहीली ते या अशा मान-अपमानाबाबत पुरेसे सजग होते. कोणत्या गोष्टीमुळे ध्वजाचा सन्मान होतो आणि कोणत्या गोष्टीमुळे अपमान होतो याचा विचार करुन, त्यावर पुरेशी चर्चा करुन, ध्वजसंहिता व वंदनाचे संकेत आले आहेत. कदाचित - अगदी कदाचित - हमीद अन्सारी यांनी ही ध्वजसंहिता अभ्यासली असावी. आणि न जाणो उद्या आपण वंदन केलेच तर काही लोक ध्वजसंहितेत गणवेशात नसलेल्यांनी वंदन करु नये असा संकेत दिला असतानाही वंदन केल्याने ध्वजाचा अपमान झाल्याची बोंब ठोकतील असा विचार करुन ध्वजसंहितेत दिल्याबरहुकूम संकेत पाळायचे ठरवले असू शकते. 'सावधान' स्थितीत असल्याने ध्वजाचा पुरेसा सन्मान होतो हा संकेत आपल्या जाणकार पूर्वसुरींनी आधीच लिहून ठेवला आहे. हा संकेत उपराष्ट्रपतींनी पुरेपुर पाळला आहे. ध्वजाला वंदन केलेच पाहिजे असा ज्यांचा आग्रह असेल त्यांनी संहितेत बदल करवून घ्यावा. आधी केवळ सरकारी इमारती व कार्यक्रमांमध्ये ध्वज लावता येत असे. नंतर कोर्टाच्या निर्णयानुसार तसा बदल करवून सामान्य नागरिकांनाही तो वापरता येऊ लागला. तसे काही प्रयत्न करता येतील.

बाकी देशाच्या उपराष्ट्रपतींच्या देशभक्तीबाबत शंका यावी ही एक राष्ट्र म्हणून आपली किती अवनती झाली आहे हेच अधोरेखित करते.

चिगो's picture

29 Jan 2015 - 1:51 pm | चिगो

'सावधान' स्थितीत असल्याने ध्वजाचा पुरेसा सन्मान होतो हा संकेत आपल्या जाणकार पूर्वसुरींनी आधीच लिहून ठेवला आहे. हा संकेत उपराष्ट्रपतींनी पुरेपुर पाळला आहे.

पुरेपूर सहमत.. अगदी जिल्ह्याच्या ठीकाणीपण मुख्य अतिथी, जे सलामी घेतात आणि गणवेशातील अधिकारी/लोकच राष्ट्रगीताच्या वेळी झेंड्याला 'सॅल्यूट' करतात. बाकी फक्त 'सावधान'च्या पावित्र्यात उभे असतात. झेंड्याला 'सॅल्यूट' करणे हे ऑप्शनल आहे. न केल्याने अपमान होत नाही. बाकी माहीती खरे साहेबांनी वर दिलीच आहे..

बाकी देशाच्या उपराष्ट्रपतींच्या देशभक्तीबाबत शंका यावी ही एक राष्ट्र म्हणून आपली किती अवनती झाली आहे हेच अधोरेखित करते.

आजकाल कुणाच्याही देशभक्ती/चारीत्र्याबद्दल शंका घेणे, हे सोशल मिडीयमुळे अत्यंत सोपं झालं आहे. राजनैतिक मतभिन्नता आणि वैयक्तिक टीका ह्यातल्या सिमारेषापण अत्यंत धुसर झाल्याहेत..

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 1:55 pm | जेम्स बॉन्ड ००७

आजकाल कुणाच्याही देशभक्ती/चारीत्र्याबद्दल शंका घेणे, हे सोशल मिडीयमुळे अत्यंत सोपं झालं आहे. राजनैतिक मतभिन्नता आणि वैयक्तिक टीका ह्यातल्या सिमारेषापण अत्यंत धुसर झाल्याहेत..

तरी कुमारकाका सांगत होते फॅसिझ्म बोकाळत चाल्लाय म्हणुन. पण कोण ऐकेल तर ना..

चिगो's picture

29 Jan 2015 - 3:00 pm | चिगो

कोण कुमारकाका? 'दिव्य' का?

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 4:34 pm | जेम्स बॉन्ड ००७

हो. तेच ते. आम्ही फार्फार मानतो त्यांना..

सर्वसाक्षी's picture

28 Jan 2015 - 1:23 pm | सर्वसाक्षी

सक्ती नाही मान्य आहे. पण आपले राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री वंदन करत असता उप राष्ट्रपतींनी वंदन न करणे खटकले हे निश्चित. ते सहेतूक की सहज, नकळत हा भाग आणखी वेगळा.

इतक्या उच्चपदस्थ आणि राष्ट्राचे बहुमानाचे पद भूषविणार्‍या व्यक्तिस राष्ट्रध्वजास वंदन करण्यासाठी कायदेशीर बंधनच असावे लागते, अन्यथा त्याला वंदन करावे असे वाटु नये हे दुर्दैव.

एखाद्या थाटामाटाच्या लग्नात शुभमंगल सावधान होऊन पंगत पदरी पडली की स्टेजवर सिंहासने टाकून बसलेल्या अथवा उभे असलेल्या वधुवरांना ग्रीट करण्यासाठी, त्यांच्यातल्या अनोळखी हाफची ओळख करुन घेण्यासाठी, अहेर (घेत असल्यास) देण्यासाठी आणि ग्रुप फोटोसाठी आपण रांग लावून थांबत नाही का? याचा अर्थ आपण त्या दांपत्याचे चाकर अथवा मिंधे झालो असं होतं का?

( बर्‍याचदा अशा वेळी आपल्या चेहर्‍यावरही थकवा, मरगळ वगैरे असते.. भरपेट जेवणाची पेंगही चेहर्‍यावर अशी दिसते ;) )

अविनाश पांढरकर's picture

28 Jan 2015 - 4:45 pm | अविनाश पांढरकर

+१०००

विशाल कुलकर्णी's picture

28 Jan 2015 - 1:46 pm | विशाल कुलकर्णी

या सुद्धा धाग्याचे कश्मीर होणार बहुतेक ?

(ए पोर्‍या, पॉपकॉर्न लाव रे ;) )

क्लिंटन's picture

28 Jan 2015 - 1:54 pm | क्लिंटन

या सुद्धा धाग्याचे कश्मीर होणार बहुतेक ?

काश्मीर नाही. हल्ली टर्मिनॉलॉजी बदलली आहे. या धाग्याचेही वधुवर होणार बहुतेक असे म्हणायला हवे आता :)

विशाल कुलकर्णी's picture

28 Jan 2015 - 2:15 pm | विशाल कुलकर्णी

;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 2:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओ पोर्या नाय! सेल्फ सर्विस हाय! मी बिन बसलोय! पॉपकॉर्न घेऊन! या शेयर करू! ;)

विशाल कुलकर्णी's picture

28 Jan 2015 - 2:14 pm | विशाल कुलकर्णी

आलोच बापु, एखादा पिचर बीयरचा असेल सोबत तर अजून बहार येइल ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 2:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुमच्या तोंडी बियर पड़ो!!! :D

बॅटमॅन's picture

28 Jan 2015 - 2:52 pm | बॅटमॅन

"कॅन" यू "बीअर" इट ;)

विशाल कुलकर्णी's picture

28 Jan 2015 - 2:59 pm | विशाल कुलकर्णी

*drinks*

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 3:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

"Yes we can"!!! या रांगे रांगेत !! :P

भाते's picture

28 Jan 2015 - 1:52 pm | भाते

अब्जाधीशांवरून चर्चा झेंडयावर का आली?

रांगेचा ऊद्देश जाणुन घेतल्याशिवाय केवळ फोटो बघुन प्रतिक्रिया दिल्या कि असे होते.

विशाल कुलकर्णी's picture

28 Jan 2015 - 2:18 pm | विशाल कुलकर्णी

ओहोहो, म्हणजे लाईन 'ताटा'साठी आहे तर. मग ठिक आहे ;)

विशाखा पाटील's picture

28 Jan 2015 - 2:37 pm | विशाखा पाटील

टीका नक्की कशावर आहे?
रांगेत उभे राहण्यावर?- तसे असेल तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि ते सर्वानीच शिकायला हवं.
अब्जाधीश ओबामांना भेटायला गेले म्हणून? - मुक्त अर्थव्यवस्थेत यात वावगं काहीही नाही. पाश्चात्य देशांचे सरकार व्यापार वाढवणाऱ्या स्वदेशी कंपन्यांचे हित बघत असतात. East India Company, तेलाच्या क्षेत्रातल्या Seven Sisters यांची उदाहरणे आहेतच. आपल्यालाही या गोष्टीचं महत्व काळाबरोबर कळत असेल, तर ते देशाच्या विकासाच्या दृष्टीने चांगलंच आहे.

हाफ शेंच्युरी निमीत्त धागाकर्ते श्री.कोंबडा प्रेमी आणी मिपाकरांचा सत्कार पॉपकार्न आणी सलामी देऊन करण्यात येत आहे.
क्रुपया रांगेय या.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

कोंबडी प्रेमी's picture

28 Jan 2015 - 3:17 pm | कोंबडी प्रेमी

;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 7:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या दुव्यातली गोष्ट खरी आहे असे गृहीत धरूनही...

मोठ्या अधिकारावरचा माणूसही फक्त माणूसच असतो. तो पण कधी कधी चूक करतो... आणि तीही चूकच असते. चूक झाकण्याचे प्रयत्न न करता ती प्रामाणिकपणे मान्य करून ती भविष्यात परत होणार नाही अशी काळजी घेण्याची सवय लागली की त्याचे खर्‍या मोठेपणाकडे मार्गक्रमण होऊ लागते.

अत्रन्गि पाउस's picture

28 Jan 2015 - 9:20 pm | अत्रन्गि पाउस

हे गेल्या कित्येक वर्षात आपल्या कडे झालेले चटकन आठवत नाही ...

आजानुकर्ण's picture

28 Jan 2015 - 9:50 pm | आजानुकर्ण

अन्सारी आडनाव असल्याने अनेकांना देशभक्तीबाबत शंका आलेली दिसतेय. असो. खालील खुलासा समाधानकारक वाटला.

Breaking his silence on criticism against him in the social media for not saluting the Tricolour during the Republic Day Parade at Rajpath on Monday, Vice President Hamid Ansari has stated that as per protocol only those in uniform salute the national flag while the National Anthem is being played.

Those in plainclothes are just supposed to stand in attention, he added.

According to the Flag Code of India, Section VI, only those in uniform may ‘render the appropriate salute’.

“During the ceremony of hoisting or lowering the flag or when the flag is passing in a parade or in a review, all persons present should face the flag and stand at attention. Those present in uniform should render the appropriate salute… A dignitary may take the salute without a head dress,” the section states.
- See more at: http://indianexpress.com/article/india/india-others/saluting-national-fl...

आजानुकर्ण's picture

28 Jan 2015 - 9:51 pm | आजानुकर्ण

फ्लॅग

पिंपातला उंदीर's picture

29 Jan 2015 - 8:49 am | पिंपातला उंदीर

@आजानुकर्ण -Wednesday चित्रपटाच्या शेवटी निवेदक अनुपम खेर च एक वाक्य आहे . मराठीत ढोबळ भाषांतर अस , " मी तुम्हाला त्याच (नसीर च्या पात्राच ) नाव सांगणार नाही कारण नावात धर्म शोधतो ." त्यामुळे माणसाच्या नाव /आडनाव वरून त्याचा धर्म / जात शोधणारे लोक तुम्ही कितीही पोट तीडीकेने स्पष्टीकरण दिले तर ते मान्य करतील असे वाटत नाही .

आजानुकर्ण's picture

29 Jan 2015 - 7:28 pm | आजानुकर्ण

जोपर्यंत आडनावावरुन देशभक्तीवर - अगदी उपराष्ट्रपतींच्याही - शंका घेणारे महाभाग आहेत तोवर इंडियन मुजाहिदीन, आयएसआय, लष्कर ए तोयबा वगैरेंना काहीही काळजी करायची गरजच नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2015 - 7:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे आडनावाचा प्रश्न आहे हा शोध लावण्याइतका विदा या धाग्यातल्या प्रतिसादांत (ओढूनताणूनही) दिसत नाही !

अर्थात स्वतःची बाजू काहीही करून सिद्ध करण्यासाठी लॉजिक बाजूला ठेऊन असा धर्म्/जात्/आडनावाचा सद्य राजकारणमान्य कांगावा काही नविन नाही ! तेव्हा असो.

आजानुकर्ण's picture

29 Jan 2015 - 7:51 pm | आजानुकर्ण

बरं जाऊ द्या. आडनावाचा संबंध नसावा. उपराष्ट्रपतींवर विनाकारणच शिंतोडे उडवण्याचा हा एक व्यर्थ प्रयत्न मानून सोडून द्या. बाकी राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी सच्चिदानंद' वगैरे असते तर हा प्रश्न आला असता का हे प्रामाणिकपणे सांगा.

आम्ही म्हणतो तीच आणि तशीच देशभक्ती आणि तशी लेबले वाटत सुटणे ही नवी लाट इथे आलेली दिसते. काही दिवसांपूर्वी क्रिकेट ही एक देशभक्ती ही एक व्याख्या झाली. आता झेंड्याला सॅल्युट करणे हीच देशभक्ती ही नवी व्याख्या आली. उद्या छातीला आडवा हात लावून ध्वजप्रणाम एक- दोन- तीन! हीच देशभक्ती अशी ही नवी व्याख्या येईलच. नाहीतरी गीता हा राष्ट्रीय ग्रंथ होऊ घातलाच आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2015 - 7:55 pm | श्रीगुरुजी

>>> बाकी राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी सच्चिदानंद' वगैरे असते तर हा प्रश्न आला असता का हे प्रामाणिकपणे सांगा.

दिग्विजय, मनिष तिवारी, निखिल वागळे, केजरीवाल, कुमार केतकर इ. निधर्मी विचारवंतांकडून नक्कीच हा प्रश्न आला असता.

आजानुकर्ण's picture

29 Jan 2015 - 7:59 pm | आजानुकर्ण

उपरोल्लिखित विद्वानांचा या चर्चेत काय संबंध? उपराष्ट्रपती देशभक्त आहेत की नाही याची सिद्धता कुठपर्यंत आली तेवढे बघा.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2015 - 8:04 pm | श्रीगुरुजी

तुम्हीच विचारलं होतं की त्यांचं नाव स्वामी सच्चिदानंद असतं तर त्यांच्या देशभक्तीविषयी प्रश्न निर्माण झाला असता का. त्याच प्रश्नाचं मी उत्तर दिलंय. त्यांचं नाव काहीही असतं तरी प्रश्न निर्माण झालाच असता. त्यामुळे नावाचा आणि प्रश्न निर्माण किंवा न निर्माण होण्याचा संबंध नाही.

आजानुकर्ण's picture

29 Jan 2015 - 8:33 pm | आजानुकर्ण

मग उपराष्ट्रपती देशभक्त आहेत की नाहीत? काय निर्णय झाला शेवटी?

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2015 - 8:46 pm | श्रीगुरुजी

ते नंतर बोलू. आधी उपराष्ट्रपतींच्या नावाचा आणि देशभक्तीचा प्रश्न निर्माण किंवा न निर्माण होण्याचा संबंध नाही हे पटलं का तुम्हाला ते सांगा.

आजानुकर्ण's picture

29 Jan 2015 - 8:55 pm | आजानुकर्ण

आधी उपराष्ट्रपतींच्या नावाचा आणि देशभक्तीचा प्रश्न निर्माण किंवा न निर्माण होण्याचा संबंध नाही हे पटलं का तुम्हाला ते सांगा.

नाही पटलं. हे माझं उत्तर. आता सांगा उपराष्ट्रपती देशभक्त आहेत की नाहीत ते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2015 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत माझे म्हणणे पुरेसे स्पष्ट केले आहे. पण तरीही व्यवस्थापनाचा वर लिहीलेला एक नियम परत एकदा इथे लिहीतो...

कोणत्याही संघटना/समुहात (यात देशही आला) चिन्हे, प्रतिके आणि त्याबाबतची "दृश्य" आस्था या किती महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तश्याच प्रेरक ठेवण्यासाठीची अधिकार्‍यांची जबाबदारी किती महत्वाची असते हे सांगायला नकोच. इतकेच माझे म्हणणे आहे.

उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे. आणि आपले सर्व वरिष्ठ नेते/अधिकारी उत्तम असावेत असा आग्रह धरण्याचा हक्क लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आहे. त्याचप्रमाणे खर्‍या लोकशाहीत नागरिकांनी नेत्यांवर, अगदी सर्वोच्च नेत्यावरही, केलेली टीका निषिद्ध समजली जात नाही... किंबहुना हा मुख्य फरक आहे लोकशाही आणि इतर राज्यव्यवस्थांत. मात्र या गोष्टीचा भारतात सहज विसर पडतो हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे.

लोकशाही तत्वांप्रमाणे, मला इतर मते मान्य नसली तरी त्यांचा आदर आहे... पण असे असले तरी इथे निष्कारण धर्म/जात इत्यादी आणणे निषेधार्ह तर आहेच पण ते ओढूनताणून केल्यामुळे खोडसाळपणाचेही आहे.

अत्रन्गि पाउस's picture

29 Jan 2015 - 8:39 pm | अत्रन्गि पाउस

वर म्हटल्याप्रमाणे वधुवर होण्याच्या मार्गावर आहे हा धागा ...

आजानुकर्ण's picture

29 Jan 2015 - 8:58 pm | आजानुकर्ण

उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे.

हो पण सॅल्युट करणे हे सावधान राहण्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे असे कुणी सांगितले आहे? सॅल्युट न केल्यास 'देशभक्तीचा अभाव' ही एकच शक्यता उरते काय? ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय? ध्वजसंहितेचा नियम पुरेपूर पाळणे ही दुसरी शक्यता असू शकत नाही काय?

अनुप ढेरे's picture

29 Jan 2015 - 9:35 pm | अनुप ढेरे

पूर्ण सहमत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2015 - 9:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय?

अश्या स्थितितील व्यक्तीला इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते माझे नक्कीच नाही... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! :)

हा प्रतिवाद करताना तुम्ही महामहीन उपराष्ट्रपतिंच्या नेमणूकीच्या योग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहात हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ?

आता प्रतिवाद हास्यास्पद होऊ लागले आहेत... त्यामुळे फुकाच्या ओढूनताणून केलेल्या वितंडवादात रस नसल्याने... बाय बाय !!!

काळा पहाड's picture

29 Jan 2015 - 9:55 pm | काळा पहाड

माझ्या मते हे खरं असावं. उपराष्ट्रपती मुद्दाम करतील असं वाटत नाही. त्यांच्याच बाजूला ओबामा उभे होते. त्यांनी सलाम करण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळं आणि बाकीचे सलाम करतायत हे न जाणवण्यामुळं असं झालं असू शकेल. बाकी बरेच लोक सलाम करत नाहीत हे मी पाहिलंय कारण ताठ उभं रहाणं हे पुरेसं असतं.

आजानुकर्ण's picture

29 Jan 2015 - 9:58 pm | आजानुकर्ण

अश्या स्थितितील व्यक्त इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! Smile

माफ करा थोडं कठोर बोलतो. प्रतिसादाचा विपर्यास कसा करावा याचे तुमचा प्रतिवाद हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. मूळ मुद्दा काय आहे? सॅल्युट न केल्यास 'देशभक्तीचा अभाव' ही एकच शक्यता उरते का? माझ्या मते नाही. हे दाखवून देण्यासाठी मी आणखी दोन शक्यता बोलून दाखवल्या इतकेच. त्याच शक्यता आहेत असे म्हटलेले नाही. माझ्या आधीच्या प्रतिसादातही 'कदाचित' असे होऊ शकते असे म्हटले होते. वृद्ध व्यक्तीला विस्मरण होऊ नये असा नियम आहे काय? आणि अशा स्थितीतील म्हणजे नक्की कशा? भारताचे माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा पदावर असतानाही त्यांचा वृद्धापकाळाने अनेकदा तोल जात असे. त्यामुळे भारताची नक्की काय वाईट स्थिती झाली बरे? आपल्या लोकशाहीत राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही नामधारी पदे आहेत. तिथल्या पदावरील व्यक्तींना निर्णय घेण्याचे स्वतंत्र हक्क नसल्याइतपत आहेत. तिथल्या व्यक्तींच्या वयाचा भारताच्या परिस्थितीवर काहीही फरक पडणार नाही हा माझा आशावादी दृष्टीकोण आहे. निर्णयक्षम पदांवर पुरेसे सुदृढ लोक आहेत की. उगीच कुठलातरी - नसलेला - तांत्रिक मुद्दा काढून एखाद्याची देशभक्ती चघळत बसल्याने आपले देशप्रेम सिद्ध होते की काय?

हमीद अन्सारी यांची करियरची ओळख विकीवर पाहू शकता. भारतासाठी आयएफएसमार्फत त्यांनी पुरेसे योगदान दिलेले आहे असे दिसते. मग देशप्रेमाबाबतची शंका येण्याची कारण काय असावे बरे?

He started his career as Officer in the Indian Foreign Service in 1961. He was Permanent Representative of India to the United Nations, Indian High Commissioner to Australia and Ambassador to the United Arab Emirates, Afghanistan, Iran and Saudi Arabia.

आजानुकर्ण's picture

29 Jan 2015 - 10:34 pm | आजानुकर्ण

आधीचा प्रतिसाद संपादित करता येत नसल्याने आणखी थोडी भर.

किंबहुना आयएफएस सर्विसेसमध्ये सगळी करियर गेल्याने उपराष्ट्रपती महोदयांना हे सर्व संकेत, प्रोटोकॉल्स यांची चांगली ओळख असावी. आंतरजालीय जनतेपेक्षा या सर्व संकेतांचे ज्ञान - विशेषतः कोणत्या गोष्टीने राष्ट्राच्या प्रतीकांचा सन्मान होतो व अपमान होतो हे ज्ञान - त्यांना निश्चितच जास्त असावे यात काहीच शंका नाही. अर्थात भारताचे राष्ट्रपती कोण हेही माहीत नसलेली पब्लिक 'हमीद मोहम्मद अन्सारी यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्युट केला नाही' अशा आशयाचे संदेश - फोटोसकट- व्हॉट्सॅपवर कोणत्या उद्देशाने पाठवत असणार हे सांगायलाच नको. तरी बरं, मोदींनी फेटा घातला तसा अन्सारीसाहेबांनी अंडा क्याप वगैरे घालून हा सोहळा अटेंड केला नाही ते.

असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 12:44 am | डॉ सुहास म्हात्रे

:)

आजानुकर्ण's picture

30 Jan 2015 - 1:05 am | आजानुकर्ण

गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज हेदेखील अटेंशन पोझमध्येच होते. (सॅल्युट न करता) असे दिसते. हमीद अन्सारी यांना जे कोणी सिंगल आऊट करत आहे त्यांचा हेतू काय असावा हे चटकन समजते. (दिल्लीच्या निवडणुका जवळ आल्याच आहेत).
http://www.firstpost.com/living/trolling-hamid-ansari-over-republic-day-...

प्रतिसाद तुम्हाला म्हणून उद्देशून दिलेला नाही. जस्ट एक माहिती म्हणून वर एक दुवा दिला आहे.

आजानुकर्ण's picture

30 Jan 2015 - 1:07 am | आजानुकर्ण

It didn't matter that Kiran Bedi was standing at attention while a security personnel held a umbrella over her head.

=)) ह्या महोदया दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आहेत म्हणे. वर दिलेला दुवा वाचाच.

अर्धवटराव's picture

30 Jan 2015 - 3:56 am | अर्धवटराव

सर्व मुद्दे आवडले.

अहो.. मुळात तो जो फोटो फिरतोय तो व्हिडीओतली (बहुधा दूरदर्शन टीव्ही) फ्रेम screen shot स्वरुपात आहे असे वाटते. सिलेक्टिव्ह ॲंगल आणि नेमके ठराविक लोकच फ्रेममधे दिसतील अश्या बेतानेच तो घेतलेला दिसतो. जरा झूम्ड आउट सीन घेतला असता तर सॅल्यूट न केलेले इतर अनेक दिसले असते अन हा प्रश्न उभा करता आला नसता. लोकांना काय ? सनसनीखेज वाटते अन पुढे ढकलतात.

अर्धवटराव's picture

30 Jan 2015 - 5:48 am | अर्धवटराव

एका व्यक्ती विशेषाला मुद्दाम टार्गेट करण्यासाठी फोटो फॉर्वर्ड करण्याच्या कुरापती केल्या आहेत कुणितरी.

मृत्युन्जय's picture

30 Jan 2015 - 3:52 pm | मृत्युन्जय

राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी सच्चिदानंद' वगैरे असते तर हा प्रश्न आला असता का हे प्रामाणिकपणे सांगा.

हा प्रश्न फारच अस्थायी वाटला. अन्सारी मुसलमान असल्याने त्यांनी असे केले असे कोणीही म्हटलेले नाही.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचेच झाले तर मी म्हणेन की हो सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया कदाचित स्वामी सच्चिदानंदांसाठीही तिच असली असती. काही काळापुर्वी लालू प्रसाद यादव राष्ट्रगीत वाजवले असताना बसुन राहिले होए (उभे देखील नव्हते) तेव्हा त्यांच्यावरही बरीच टीका झाली होती. त्यांनीही बहुधा असेच काहितरी स्पष्टीकरन दिले होते. पण टीका झाली होती हे अमान्य करता येणार नाही. लालू प्रसाद यादव देखील हिंदुच आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jan 2015 - 2:37 am | निनाद मुक्काम प...

अमेरिकन प्रेसिडेंट जगातील सर्वात शक्तिमान माणूस
हेच फार मोठे थोतांड आहे.
लोकशाही ही व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी चालविलेला एक मोठा व्यापार आहे त्यात निवडणुका एक फार्स आहे .
दर निवडणुकीला एक बाहुला तेथे प्रेसिडेंट पदी आणून बसवतात प्रत्यक्षात सर्व धोरणे ही व्यापाऱ्यांची प्रेशर लॉबी घडवून आणते.शेवटच्या दोन वर्षात ह्या बाहुल्याची चिरफाड करण्याचा अमेरिकन जनतेचा , प्रसार माध्यमांचा एककलमी कार्यक्रम असतो.तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ओबामा भारतात सौदी आणि मिळेल तिथे जाईल , त्याला शेवटच्या दोन वर्षी मिळणारे शिव्या शाप त्यांच्या सुरवातीच्या दोन वर्षात मिळाले आहे ,
भारतात निदान राजकारणी उद्योग आणि नाना धंदे करतात पैसे कमावतात . राजकारण हाच वंश परंपरागत उद्योग असतो.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या निवृत्ती वर बंधने
नाहीत. अमेरिकेत दहा वर्षाने नवीन बाहुला येतो तेव्हा जुना मोडीत काढतात ,आता बिल क्लिंटन भारतात आला काय केला काय , हिलरी एवढे महत्व सुद्धा त्यास मिळणार नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Jan 2015 - 8:13 am | माईसाहेब कुरसूंदीकर

सत्ता गेली की संपले रे निनाद्या.
अटलबिहारी उद्या सिंंगापूरला वा मनमोहन कौलालंपूरला गेले तर बातमी होईल का? पण नरेण्द्र शनी शिंगणापूरला आला तर मात्र बातमी होईल.

भाते's picture

29 Jan 2015 - 10:50 am | भाते

हि माई सगळ्याच मिपाकरांचा एकेरी ऊल्लेख करते जणूकाही हिने सगळ्यांना अंगाखांद्यावर खेळवले आहे. कोणीही मिपाकर याची दखल न घेता माईची खिल्ली उडवतात तो भाग वेगळा.

पण देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी ऊल्लेख नक्कीच खटकणारा आहे. तेव्हा सं.मं. ने माईच्या वरच्या प्रतिसादातले शेवटचे वाक्य ऊडवावे आणि माईला जाहिररित्या योग्य समज द्यावी.

अनुप ढेरे's picture

29 Jan 2015 - 11:25 am | अनुप ढेरे

अरे यार... कशाचाही इशू करतात लोक. आता माई हा आयडी आपण ७०-८० ची म्हातारी आहोत असं भासवतो आणि म्हणून जनरल प्रत्येकाला अरे तुरे करतो. प्रत्यक्षात त्या आयडीचा/ची धनी अशी म्हातारी नाही हे कोणीही सांगेल. बर हा आय्डी काही वाह्यात अश्लील, आगलाऊ असलं काही लिहित नाही. मला या आयडीचे प्रतिसाद गंमतशीर वाटतात. वाचून मजा येते कधी कधी. उगाच समज देणं वगैरे म्हणजे फार ओव्हर रिअ‍ॅक्षन आहे.

अत्रन्गि पाउस's picture

29 Jan 2015 - 1:24 pm | अत्रन्गि पाउस

पावसा / क्लिंटना/ गजोधरा ...मजा येते हो ....

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 1:58 pm | जेम्स बॉन्ड ००७

"श्रीगुरुज्या.." आणि त्यावर श्रीगुर्ज्याचे "अरे माईसाहेब" हे नेहमी भन्नाट वाटतं.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2015 - 2:30 pm | श्रीगुरुजी

>>> आता माई हा आयडी आपण ७०-८० ची म्हातारी आहोत असं भासवतो आणि म्हणून जनरल प्रत्येकाला अरे तुरे करतो. प्रत्यक्षात त्या आयडीचा/ची धनी अशी म्हातारी नाही हे कोणीही सांगेल.

माईसाहेब फक्त स्वतःच्या "ह्यांचा" आदरार्थी उल्लेख करतो आणि इतरांचा एकेरी उल्लेख. आपण १९ व्या शतकातली थेरडी आहोत असे तो भासवत असला तरी प्रत्यक्षात तो ४० च्या आतला तरूण आहे. आपण व ग्रेटथिंकर (आणि पूर्वाश्रमीचे नानासाहेब नेफळे, ग्रेटथिन्कर, सचीन, टॉपगिअर्ड फिलॉसॉफर इ. आयडी) हे आयडी एकच आहोत हे इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून पूर्णपणे वेगळ्या बेअरिंगमधून माईसाहेबच्या आयडीने तो प्रतिसाद लिहितो.

काळा पहाड's picture

29 Jan 2015 - 2:37 pm | काळा पहाड

पण ते बेअरींग माईसाहेबांनी इतका दीर्घ काळ सांभाळलेलं आहे आणि त्यांचे प्रतिसाद देताना त्यांचा तोल जात नाही हे तर मान्य करावंच लागेल.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2015 - 2:40 pm | श्रीगुरुजी

एकदम मान्य.

अनुप ढेरे's picture

29 Jan 2015 - 2:45 pm | अनुप ढेरे

मला तरी माई = ग्रेट थिंकर/नेफळे असं अजिबात वाटत नाही. तुम्हीच ते इतकं ठामपणे कसं सांगत ते समजत नाही.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 4:33 pm | जेम्स बॉन्ड ००७

हे सर्व श्रीगुर्जी यांचेच अवतार आहेत.. *smile*

अत्रन्गि पाउस's picture

29 Jan 2015 - 4:40 pm | अत्रन्गि पाउस

माई मोड मध्ये बाकीच्यांनी लिहावे ह्यात त्या बेअरिंगचे यश आहे

हाडक्या's picture

29 Jan 2015 - 3:12 pm | हाडक्या

माईसाहेब फक्त स्वतःच्या "ह्यांचा" आदरार्थी उल्लेख करतो आणि इतरांचा एकेरी उल्लेख. आपण १९ व्या शतकातली थेरडी आहोत असे तो भासवत असला तरी प्रत्यक्षात तो ४० च्या आतला तरूण आहे.

तो तरुण आहे हे तुम्हाला कसे माहीत ?? ती तरुणी (स्त्री) पण असू शकते (आहेच असे आमचे व्यक्तिशः मत आहे).. :)

काळा पहाड's picture

29 Jan 2015 - 4:31 pm | काळा पहाड

तुम्ही टका चा चष्मा लावायला लागला का?

हाडक्या's picture

29 Jan 2015 - 9:29 pm | हाडक्या

आता इथे टकाचा काय संबंध ? जल्ला त्याचा काय कॉपीराइट आहे काय?

काळा पहाड's picture

29 Jan 2015 - 9:58 pm | काळा पहाड

नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो म्हणून म्ह्ण्लं.

हाडक्या's picture

29 Jan 2015 - 10:55 pm | हाडक्या

ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा लावत असेल.. ;)
बादवे .. आमाला खात्री आहे की नाना आणि माई या आयडीमागे स्त्री आहे.. *yes3*

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 12:43 am | टवाळ कार्टा

ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा लावत असेल.. Wink

खिक्क...बहुतेक आपल्या चश्म्याचा नंबर सारखा असावा :)

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 12:42 am | टवाळ कार्टा

नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो म्हणून म्ह्ण्लं.

हा "अंदाज" तुम्ही कोणत्या लॉजिकने लावलाय हे जरा इस्कटून सांगता का?...का उग्गीच इकडे तिकडे काड्या

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 12:41 am | टवाळ कार्टा

तुम्ही टका चा चष्मा लावायला लागला का?

इथे माझा संबंधच काय?...च्यायला उग्गीच स्वताला जे वाटते तेच खरे असे असेल तर तुमचे विचार ...जौदे

पिंपातला उंदीर's picture

29 Jan 2015 - 2:33 pm | पिंपातला उंदीर

@ अनुप ढेरे यान्च्याशि सहमत *lol* *LOL*

बॅटमॅन's picture

29 Jan 2015 - 3:04 pm | बॅटमॅन

अगदी सहमत. मजा येते माईचे प्रतिसाद वाचताना. लोकांची गळवे आजकाल फारच तरारलेली आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jan 2015 - 5:17 pm | निनाद मुक्काम प...

अस नाही माई
भारतात जर येगळ आहे.सत्तेत नसून केजू युवराज कुठेही जाऊ बातमी होते.
दक्षिणेत अम्म्मा व करुणानिधी सत्तेचा खोखो खेळतात म्हणूनच सत्तेत नसतांना सुद्धा त्यांना सरकारी यंत्रणा मान देत .आपली घटना तिरडीवर जाई स्तोवर एखाद्यास राजकारण करू देते , अमेरिकन नियम आपल्याकडे असता तर नेहरू व इंदिरा पर्वच निर्माण झाले नसते.

काळा पहाड's picture

30 Jan 2015 - 12:57 am | काळा पहाड

अमेरिकन प्रेसिडेंट जगातील सर्वात शक्तिमान माणूस हेच फार मोठे थोतांड आहे.

हे तुम्ही गंमती गंमती मध्ये म्ह्णताय असं म्हणून सोडून देतो. कारण ओसामाला ओबामाची पहुंच फार उशीरा कळाली. पाक्यांना घंटा धूप न घालता ओसामाला त्याच्या घरात घुसून मारायची आज्ञा द्यायला तो अमेरिकेचाच प्रेसिडेंट असावा लागतो. आपण अजून दावूदचे आणि कसाबच्या हँडलर्स चे पुरावेच देतोय.

भाते's picture

29 Jan 2015 - 2:44 pm | भाते

माईने कोणाही मिपाकराला अरेतुरे करावे यावर माझा अजिबात आक्षेप नाही आहे. माझा आक्षेप केवळ शेवटच्या वाक्यावर आहे.
"पण --- शनी शिंगणापूरला 'आला' तर मात्र बातमी होईल."
त्यांच्या वयाचा नाही पण किमान त्या पदाचा मान राखणे तरी अपेक्षित आहे. (माझे वैयक्तिक मत)
माझा प्रतिसाद अयोग्य वाटत असल्यास सं.मं. ने तो अवश्य ऊडवावा.

पिंपातला उंदीर's picture

29 Jan 2015 - 2:53 pm | पिंपातला उंदीर

इथे अनेक माजी पंत प्रधानांवर इतक्या खालच्या भाषेत टीका झालेली आहे कि सांगावीशी पण वाटत
नाही . जे पेरल ते उगवलं . अवांतर - सध्या मोदी यांच्यावर वर पण सोशल नेट्वर्किंग वर अतिशय वैयक्तिक आणि खालच्या पातळीची टीका चालू आहे . अर्थातच ते चुकीचे आहे . पंतप्रधान या पदाची एक गरिमा आहे . तिचा सन्मान व्हायलाच हवा . पण पुन्हा तेच . पेरल ते उगवलं .

कपिलमुनी's picture

29 Jan 2015 - 3:49 pm | कपिलमुनी

+१००

इरसाल's picture

29 Jan 2015 - 2:48 pm | इरसाल

ह्या गुर्जींना नाय काय काम.
काय गरज होती का तो कंस टाकायची...छ्या !!! ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2015 - 3:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

त्यात काय! चाळी बाहेर बी रोज डबे हाती घेतलेले "कब्जाधीश" उभे असतातच की !! ;)

आपला टर्न येईपर्यंत शिस्तीत रांगेत उभं राहणं चांगल की बेस्टची बस अथवा लोकलमध्ये चढताना जशी रेटारेटी करतात तसं करण अपेक्षीत आहे?

अब्जाधीश असले म्हणून काय झालं? रांगेचा फायदा सर्वांना.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2015 - 8:59 pm | श्रीगुरुजी

नक्की काय व का पटलं नाही?

आजानुकर्ण's picture

29 Jan 2015 - 9:00 pm | आजानुकर्ण

अहो गुरुजी तुम्हीच विचारलंय पटलं की नाही ते. तुम्ही 'काय पटलं की नाही' हे विचारलं. तेच पटलं नाही. तुमचाच प्रश्न एकदा पुन्हा एकदा वाचा की राव.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2015 - 9:07 pm | श्रीगुरुजी

काय व का पटलं नाही ते जरा स्पष्ट करा ना, म्हणजे तुमच्या मूळ प्रश्नाचे उत्तर देता येईल.

पिंपातला उंदीर's picture

29 Jan 2015 - 9:19 pm | पिंपातला उंदीर

गुर्जी दुसर्या भागाच उत्तर न देता पहिल्या भागातच चर्चा घोळवणार अस वाटलं होतच. पण मी काय म्हणतो गुर्जी बाकी चर्चा आपण करूच पण हमीद अन्सारी यांच्या देशभक्ती बद्दल तुमच मत काय आहे हे लगेहात सांगून टाकाच

संदीप डांगे's picture

30 Jan 2015 - 6:45 am | संदीप डांगे

अन्सारींवर शंका घेणाऱ्या तमाम देशभक्तांना एक छोटासा प्रश्न.
अन्सारींना सभागृहाचे कामकाज हाताळताना यातल्या एकाने तरी पाहिले आहे का?

तसे जर असते तर हा माणूस राजनीतिक प्रथा, सांसदीय नियम आणि प्रोटोकॉल चा किती पक्का आहे हे निश्चित माहित असते. सरकारचे व संसदेचे कामकाज कसे चालते ह्याचे अन्सारींना जेवढे ज्ञान आहे त्याच्या ०.०००१ टक्का तरी ह्या तथाकथित देशभक्तांना असेल काय?

तुनळी वर संसदेचे कामकाज मिळत असेल तर पाहून घ्या. मग करा त्यांच्या आणि आपल्या देशभक्तीच्या तुलना.

त्या अन्सारींबद्दल एक किस्सा वाचलेला फेबुवर. मध्ये एकदा तुर्की देशात भारताचे एक प्यानेल गेले होते त्यात हे अन्सारी साहेबही होते. 'अन्सारी' आडनावाचा अर्थ इस्लाम संस्थापक मुहम्मद यांना अडचणीच्या वेळी आश्रय देणारे असा होतो. तुर्कीमध्ये त्या खानदानाचे जुने घर आहे. भारतीय शिष्टमंडळ तुर्कीत पोचल्यावर नमस्कारचमत्कार झाले आणि तुर्कीतले काही लोक आले की तुमच्या खानदानाचे मूळ घर बघायला चला म्हणून. अन्सारी लगेच हो म्हणाले नाहीत, उद्या सांगतो म्हणाले. भारतीय शिष्टमंडळातले लोक म्हणाले अहो इतकी जुनी परंपरा आहे तर जाऊन तरी या, काय फरक पडतो. अन्सारी म्हणाले की मी इथे भारताचा पोलिटिकल प्रतिनिधी म्हणून आलोय, अन्सारी खानदानाचा वंशज म्हणून नाही. परत दुसर्‍या दिवशी तुर्कीचे लोक आले. त्यांनी व इंड्यन शिष्टमंडळाने अन्सारींना परत गळ घातली तेव्हा कुठे ते जायला तयार झाले.

असा हा कर्तव्यतत्पर माणूस असूनही त्याच्या देशभक्तीबद्दल शंका घेतली जातेय हे केवळ दुर्दैव.

शिद's picture

30 Jan 2015 - 3:32 pm | शिद

वॉव...भारीच किस्सा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Jan 2015 - 4:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो तो असाच असतो! हामीद अन्सारीं चा किस्सा सुपर्ब!! आवडला!! ज्ञानेश्वर मुळे जेव्हा मालदीव्स मधे भारतीय उच्चायुक्त होते तेव्हा त्यांचे अधिकारीक निवासस्थान अन मालदीव्स च्या अध्यक्षा चं हापिस/घर २०० मीटर च्या अंतरा वर होते! तरीही जेव्हा कधी वैयक्तिक किंवा सरकारी कामानिमित्त मुळे ह्याना अध्यक्षा ला भेटायचे असले किंवा त्यांचे आवतन आले असले तरीही ते कधीच प्यांटी च्या खिशात हात घालून गेले नाही! बाकायदा प्रोटोकॉल नुसार गेराज मधुन काळी मर्क काढून त्याच्या पुढे फ्लैग मास्ट वर भारताचे निशाण लावुन सोबत मायन्युट्स घ्यायला सेक्रेटरी , दुभाषा इत्यादी सोबत घेऊन जात असत!

आता हयात दोन मते येऊ शकतात
१. त्यांच्या प्रोफेशनलिझम चं कौतिक
२. त्यांच्या प्रोटोकॉल कड़क पाळण्य़ा वर टिका (जनतेच्या कराचा अपव्यय करतात, इतके काही करायची गरज नाही वगैरे)

व्यक्तिशः मला ते पटते! कारण मर्क मधे फ़िरणारे तिथे मुळे हे व्यक्ति नंतर पण जगातल्या एक महाप्रचंड देश, अर्थव्यवस्था, सरकार अन त्या उप्पर १२१ कोटी भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतात! अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले! इतरांच्या मताचा पण आदर!! _/\_

(व्होलटेरीश) बाप्या! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 4:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे व्यक्ति नंतर पण जगातल्या एक महाप्रचंड देश, अर्थव्यवस्था, सरकार अन त्या उप्पर १२१ कोटी भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतात!

नेते आणि प्रतिनिधी यांची देशातली आणि परदेशातली दृश्य वागणूक देशाची प्रतिमा नागरिकांच्या मनात बिंबविते आणि परदेशात देशाची लायकी ठरवते.

अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले! इतरांच्या मताचा पण आदर!! _/\_

एकच नंबर बघा. काहीवेळेस मात्र आम्ही इतरांच्या मत असण्याच्या अधिकाराचा तेवढा आदर करतो. ;)

(सेमीव्होल्टेरिश ;) ) बट्टमण्ण.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 4:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझ्यापुरता तरी हा प्रश्न देशभक्तीचा नाही तर देशातल्या दोन क्रमांकाइतक्या उच्च पदावरच्या व्यक्तीने दाखवलेल्या नेतृत्वगुणाचा आहे. देशभक्ती आणि धर्म हे इथे (दोन्ही बाजूंकडून) एनकेनप्रकारेन आपली बाजू पक्की करायला ओढूनताणून मधे आणलेले मुद्दे आहेत.

अनुप ढेरे's picture

30 Jan 2015 - 5:04 pm | अनुप ढेरे

मस्तं किस्सा...

१. फोटोतील सर्व उद्योगपती हे जंटलमन आहेत. ते स्वतःहूनच रांगेत उभे राहीले असतील. त्यांनी काय एकमेकाला ढकला ढकली करत जायचे होते की काय? आजकाल कुणी कसलाही फोटो काढतो आणि त्याच्याशी कसलाही बादरायण संबंध जोडायची फॅशनच आली आहे. आजच्या मेडीयाला चघळायला असेच काही तरी लागते.
२. उपराष्ट्रपतींबद्दलही निष्कारण धुरळा उडवला जात आहे. झैलसिंग राष्ट्रपती असताना ते एकदा अनवधानाने राष्ट्रगीत चालू झाल्यावर बसून राहीले होते. इंदिरा गांधींनी खुणावल्यानंतर ते उभे राहीले. दुस-या दिवशी पेपरमधे बातमी होती. पण त्यानंतर कुणी एव्ह्ढी राळ उडवली नव्ह्ती.