स्वच्छ भारत अभियान की पब्लिसीटी स्टंट ??

Sanjay Kokare's picture
Sanjay Kokare in जनातलं, मनातलं
23 Jan 2015 - 3:57 pm

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्याकरता माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषना केली.सामान्य नागरीकापासुन मोठमोठ्या सेलीब्रेटी, नेत्यापर्यंत पर्यंत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याबाबत बोलल्या जात आहे, त्यांना मिडीया द्वारे बरीच प्रसिद्धपण मिळत आहे. पण ज्या महापुरूषांनी आपले पुर्ण जिवण स्वता झाडु घेउन, सतत रस्त्यावर उतरुन, रस्ता साफ करुन स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला आज त्या महान पुरुषांच नाव भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत डावलल्या जात आहे ही एक शोकांतीका आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी पण मोठमोठ्या उद्योजकांना, सिनेस्टर, क्रिकेटर व राजकीय नेत्यांना स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्ट होण्याकरीता निमंत्रण पाठवत आहे. ते पण कोणत्याही स्वार्थाशिवाय स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्ट होत आहे अशी चर्चा होत आहे. पण हेच सिनेस्टार, राजकीय नेते, क्रिकेटर, उद्योजक हे रस्त्यावर येतात झाडु हातात घेऊन मिडीया समोर तो झाडु मारतात. व काही वेळानंतर तेथुन निघुन जातात. व हीच काही वेळ केलेली सफाई दिवस भर ईलेक्ट्रानिक्स मिडीयावर झळकत असते. तसेच वृत्तपत्राच्या पहील्यापानावर ती बातमी छापुन येते व काही वेळ कचरा साफ करणार्या त्या व्यक्तींना कितीतरी पटीने मिडीया मोठ करते. पण याच मिडीया वाल्यांना शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्या, रोज कचरा साफ करणार्या कामगरांना, निस्वार्थीपणे स्वच्छता अभियान राबवणार्या व स्वच्छतेचा संदेश देणार्या व्यक्तींना दाखवयाला मिडीयाजवळ वेळ नाही.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कचरा नसलेल्या रस्त्यावरची साफसफाई करणार्या व्यक्तींचे कौतुक करतायत हे पण आश्चर्यच आहे,कारण हे सिनेस्टार, राजकीय नेते, क्रिकेटर, उद्योजक स्वच्छ भारत अभियानाला राबवायला काही वेळासाठी नगरामध्ये येतात व काही वेळानंतर तेथुन निघुन जातात. पण या सर्व सेलीब्रिटी येण्याच्या आधी फटाके फोडल्या जातात, गेल्यानंतर पण फटाके फोडल्या जातात त्यामुळे तिथ फटाक्यांचा कचरा, मिनरल वाटर च्या बॉटलचा कचरा असा अनेक प्रकारचा कचरा ती लोक गेल्यानंतर तसाच पडुन राहतो. फटाक्यांच्या आवाजामुळ ध्वनीप्रदुषण पण होते. तसेच त्या सेलिब्रेटींना पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्मान होत आहे.
भारत स्वच्छ अभियानामध्ये साध्या गावाच्या सरपंचापासुन मंत्र्यांपर्यंत तसेच अनेक क्षेत्रातील सेलाब्रिटी स्वताची प्रसिद्धी वाढवुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी विचारु ईच्छितो आपण नॉमिनेटेड केलेल्या सेलीब्रिटी स्वताच्या घरात झाडु मारण्या करीता मोलकरीण ठेवतात पण ते कधीही झाडु हातात घेत नाही. हे सेलीब्रिटीस्वताच्या स्वार्थासाठी, स्वताला आणखीन प्रसिद्धी मिळवुन देण्याकरता स्वच्छ भारत अभियानामध्ये सामिल होत आहे. जर ते निस्वार्थीपणे भारत स्वच्छ अभियानामध्ये सामिल होउ ईच्छित असते तर ते कोणताही गाजावाजा न करता , कोणत्याही मिडीयाला न सांगता त्यांनी रस्त्यावर झाडु मारला असता व हा स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम आपल्या व्यस्त जिवणातील थोडा वेळ काढुन नित्यक्रमाप्रमाने राबविला असता.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरच जर स्वच्छ भारत अभियान यशस्वी करायच असेल तर त्यांनी त्यालोकांच्या नावाचा सत्कार करायला हवा ज्यांना कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही व जे नेहमी नित्यक्रमाने रस्ते, गल्ली साफ करतात व कमीत कमी आपल घर व परिसर स्वच्छ ठेवतात कारण प्रत्येकाने आपल घर सुधारल तर आपला देशच नव्हे तर जग सुधारु लागते..............

तुम्ही हा लेख
http://sanjaykokre.blogspot.in/2014/11/blog-post_16.html या ब्लागवर पण वाचु शकता

राजकारणलेख

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jan 2015 - 4:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

संजया,अरे सिनेस्टार काय वा क्रिकेटपटू काय्,माणसेच ती.आपली जनता ह्या लोकांना अगदी पूजनीय मानते. होय ना?म्हणूनच त्यांना हाताशी धरावे लागते नरेण्द्रला.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Jan 2015 - 6:46 pm | जेम्स बॉन्ड ००७

काहीकाही लोक णरेण्ड्रलापण पूजणीय माणतात..

इरसाल's picture

23 Jan 2015 - 4:16 pm | इरसाल

सचिन पगारे ?

कपिलमुनी's picture

23 Jan 2015 - 4:25 pm | कपिलमुनी

घोषना , जिवण

शुद्धलेखन सुधारा

अर्धवटराव's picture

23 Jan 2015 - 10:55 pm | अर्धवटराव

मेलो
=))
=))

आदूबाळ's picture

23 Jan 2015 - 5:25 pm | आदूबाळ

दोनसं होत्यात.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2015 - 6:45 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-scared005.gif

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Jan 2015 - 6:46 pm | जेम्स बॉन्ड ००७

च्यामारी हि स्मायली कुठुन काढली?

ग्रेटथिंकर's picture

23 Jan 2015 - 7:30 pm | ग्रेटथिंकर

देशात सफाई कामगारांची परिस्थीती ,आरोग्य याविषयी काहीच काम न करता, हातात ग्लोज घातलेल्या अंबाणीच्या बायकोचे मोदींना कौतूक! का तर तिने फकस्त धा मिनिटे रस्ता साफ केला. एकंदर कठीण आहे ,मोदींचं सरकार दिखावटी आहे त्यामुळे फक्त दिखावटी पुरतीच कामे होणार.

Sanjay Kokare's picture

24 Jan 2015 - 9:08 am | Sanjay Kokare

*smile* :-) :) +) =) :smile:

डँबिस००७'s picture

23 Jan 2015 - 8:12 pm | डँबिस००७

"चरखा घेऊन सुत कातण्याच" पब्लिसीटी स्टंट करणार्यांच काय झाल ?
त्या वेळेला वेळ मिळेल तिथे देशाचे पहीले पंतप्रधानही सुत कातायला बसत असत असे फोटो पाहील्याच आठवत.

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2015 - 10:42 pm | श्रीगुरुजी

>>> "चरखा घेऊन सुत कातण्याच" पब्लिसीटी स्टंट करणार्यांच काय झाल ?

दलित्/गरीबांच्या झोपडीत जाऊन भाकरी खाण्याचे स्टंट करणार्‍यांचं किंवा एकदा इकॉनॉमी क्लासने जायचं नाटक करून स्टंट करणार्‍यांचं जे झालं तेच "चरखा घेऊन सुत कातण्याच" पब्लिसीटी स्टंट करणार्यांच झालं.

hitesh's picture

24 Jan 2015 - 4:05 am | hitesh

मग गोळवलकरांच्या संघाने त्याना प्रातःस्मरणीय का केले ?

मृत्युन्जय's picture

24 Jan 2015 - 11:05 am | मृत्युन्जय

संघाने भाकरी खाणार्‍या आणी लोकलने जाणार्‍या लोकांना प्रातःस्मरणीय केले ? *shok* =-O =O =-o =0 O_O O_o o_O O_0 o_0 0_O 0_o

hitesh's picture

24 Jan 2015 - 3:00 pm | hitesh

च्चरखा चालवणार्‍या बापुजी उर्फ मो क गांधी याना संघाने प्रातस्मरणीय केले

ग्रेटथिंकर's picture

24 Jan 2015 - 11:42 am | ग्रेटथिंकर

गांधीहत्येनंतर आरेसेसवर बंदी आणुन काँग्रेसने त्यांची गळचेपी केली होती, इतकी कि संघाचे नाव ऐकले तरी कट्टर स्वयंसेवकच चळाचळा कापत. गोळवळकर गुरुजीने मग थेट गांधीना प्रातःस्मरणीय करुन काँग्रेसचा संघाला असणारा विरोध बोथट करण्यात यश मिळवले.

मृत्युन्जय's picture

24 Jan 2015 - 12:49 pm | मृत्युन्जय

कट्टर स्वयंसेवकच चळाचळा कापत

फक्त गळचेपी केली म्हणून चळाचळा कापायचे. अर्रे बापरे. काँग्रेसने काय हिटलर सारखे हत्याकांड वगैरे घडवुन आणले की काय?

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2015 - 2:42 pm | श्रीगुरुजी

>>> इतकी कि संघाचे नाव ऐकले तरी कट्टर स्वयंसेवकच चळाचळा कापत.

नानासाहेब भलतेच विनोदी आहेत. बर्‍याच दिवसांनी पोट धरधरून हसविणारा विनोद वाचला. :YAHOO:

>>> गोळवळकर गुरुजीने मग थेट गांधीना प्रातःस्मरणीय करुन काँग्रेसचा संघाला असणारा विरोध बोथट करण्यात यश मिळवले.

अरेतुरे करायला गोळवलकर गुरूजी म्हणजे काय तुझ्या नातवाच्या वयाचे आहेत काय रे नान्या?

मुक्त विहारि's picture

25 Jan 2015 - 6:17 am | मुक्त विहारि

गहनविचारी माई-नाना आपल्याला हिताच्याच गोष्टी सांगत असतात, त्यांच्याकडे कानाडोळा करणेच इष्ट.लोचट व्यक्तींच्या नादी लागल्याने, आपलाच वेळ खर्च होतो.शिवाय आजकाल एकाच व्यक्तीचे ३-४ डू-आय-डी, असण्याची शक्यता पण जास्त. म्हणजे एखादा आय-डी उडाला तरी दुसरा शिल्लक राहतोच.

असो,

डू-आय-डी येतील बहू, पण त्यांच्याकडे लक्ष न दिलेलेच उत्तम.

बघा पटतंय का?

(बाकी नेहमीप्रमाणे, वरील प्रतिसाद गुरुजींनाच आहे..इ.इ....डु-आय-डींच्या लक्षांत आलेच असेल.)

hitesh's picture

25 Jan 2015 - 11:09 am | hitesh

नाना माई व हितगुरु हे तीन स्वतंत्र देव आहेत.

तुम्ही प्रत्येकवेळी त्याना एकत्र दत्तगुरु असल्याच्या रुपात का पहाताय?

:) :) :)

श्रीगुरुजी's picture

25 Jan 2015 - 2:47 pm | श्रीगुरुजी

>>> म्हणजे एखादा आय-डी उडाला तरी दुसरा शिल्लक राहतोच.

नानाचा आयडी उडाल्याचे कोणालाच दु:ख नाही, पण माई सोकावतो. म्हणून खरमरीत प्रतिसाद द्यावा लागतो.

>>> बघा पटतंय का?

तसं पटतंय. परंतु कधीकधी इतके असभ्य आणि अतार्किक प्रतिसाद असतात की तिथल्या तिथे यांना गप्प करावं लागतं. तरी तुलनेने नाना सौम्य आहे. इथे काही डूआयडी अत्यंत खालच्या पातळीला जातात. त्यांच्याकडे मात्र मी दुर्लक्ष करतो.

ग्रेटथिंकर's picture

25 Jan 2015 - 6:38 pm | ग्रेटथिंकर

हा नाना नक्की कोण आहे???
मिपाच्या प्रत्येक धाग्यात याचा एखादा तरी उल्लेख येतोच. हा आयडी नेफळे असणार, मिपाचे सदस्यत्व घेण्यापुर्वी श्री.नानासाहेब नेफळे व श्री.पोटे यांचे अभ्यासपुर्ण प्रतिसाद वाचनात यायचे ,समस्त मिपावर गारुड टाकणार्या या विभुती खरच थोर असाव्यात.अशा आयडींमुळेच वादविवादाला दर्जा प्राप्त होतो व त्या अनुषंगाने संकेत स्थळालाही.

खटपट्या's picture

25 Jan 2015 - 11:34 pm | खटपट्या

अरेरे, कीती दो लाल रंगाचा वापर. डबा संपला असेल...:)

टवाळ कार्टा's picture

25 Jan 2015 - 11:39 pm | टवाळ कार्टा

खिक्क...आत्ता मला "लाल रंगाचा डबा" याचा अर्थ समजला =))

अजया's picture

26 Jan 2015 - 8:38 am | अजया

_/\_ धन्य ते नाना माई!

आजची स्वाक्षरी:-उंदराला मांजर साक्षी!!

मुक्त विहारि's picture

26 Jan 2015 - 12:19 pm | मुक्त विहारि

अशा व्यक्ती मांजर+बोका ह्यांचे रूप पण घेवून येतात.

म्हणजे ना धड स्त्रीलिंगी ना धड पुरुषलिंगी.....

म्हणजे आय.डी. स्त्रीलिंगी आणि टंकणारा पुरुष...किंवा उलट.....

(बाकी नेहमीप्रमाणे...व प्र अ ता ह्यां आ......)

आजची स्वाक्षरी ====> अवतारी लोचट डू.आय.डीं. बरोबर वाद न घातल्यामुळे आणि त्यांच्या लेखावर प्रतिसाद न दिल्याने वेळेची बचत होते.

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2015 - 12:28 pm | श्रीगुरुजी

>>> हा नाना नक्की कोण आहे???

'प. पू. श्री. श्री. नानासाहेब महाराज १००८' हे अवतारी महापुरूष स्वतःचीच ओळख विसरल्याचा आव आणताहेत. त्यांना "कोSहम्" असा पारमार्थिक प्रश्न पडलेला दिसतोय.

अहो,

काही लोकांना मिपा करांची एकजूट बघवत नाही आणि त्यांना आपले म्हणण्यातच शहाणपण असते.

दुसरी गोष्ट अशी की, कुठल्या आय.डी.च्या मताला कितपत किंमत द्यायची हे खर्‍या मिपाकरांना उत्तम माहीत आहे.

स्वाभिमानी माणसाला लोचट माणसांपेक्षा जास्त किंमत असते.

बर्‍याचशा कंपन्या एकदा हाकलून दिलेल्या माणसाला परत कामावर घेत नाहीत.पण राजीनामा दिलेल्या एखाद्या उत्तम माणसाला परत कामावर घेतात.

(नेहमीप्रमाणे.......व प्र श्री ह्यां आ.......)

नाखु's picture

27 Jan 2015 - 2:17 pm | नाखु

बाबांना पुन्हा एकदा "दरबार" भरवायला सांगाना !!
मी अशोक्स्तंभावर चार सिंह आहेत तसेच (हो अग्दी तस्सेच) काही आय्डी एकाच (मुर्ख) स्तंभावर आहेत असे बाबांच्या प्रवचनात लिहिले आहेच)
(बाबांच्या "सूचक मौनाची भोचक भाषांतरे" या पुस्तकातून प्रकरण "कुत्र्याचे शेपूट" पान १६ साभार)

सौन्दर्य's picture

23 Jan 2015 - 8:22 pm | सौन्दर्य

स्वच्छता अभियान ही एक चांगली कल्पना आहे, ती राबवायला देखील हरकत नाही. पण, ज्याप्रमाणे गळक्या सिलिंगमुळे घरात पाणी गळत असेल तर ते पाणी पुसून घेण्याइतकेच ते गळके सिलिंग रिपेअर करणे महत्त्वाचे असते. नुसत्या पाणी पुसून घेण्याने किंवा गोळा करण्याने प्रश्न सुटत नाहीत, तर ते पाणी गळणे थांबवणे देखील गरजेचे आहे. त्याच प्रमाणे पूर्ण देशभरातले नेते, मंत्री, पुढारी, लायक, नायक, कलाकार, खेळाडू, उद्योगपती जरी रस्त्यावर उतरून, रस्ते स्वच्छ करू लागले तरी देश स्वच्छ राहणार नाही, कारण दुसर्या दिवसापासून पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' हेच सुरु होईल. जोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणाऱ्या विरुध्द कायदेशीर पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत 'स्वच्छता अभियान' हा उपक्रम, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचा फक्त एक कार्यक्रम ठरेल.

Sanjay Kokare's picture

24 Jan 2015 - 9:10 am | Sanjay Kokare

*smile* :-) :) +) =) :smile:

धर्मराजमुटके's picture

23 Jan 2015 - 11:04 pm | धर्मराजमुटके

हा शब्द ऐकून आमच्या एका एमबीए झालेल्या युपीवाल्या मित्राची आठवण झाली. तो पब्लीसीटी न म्हणता पब्लीकसिटी म्हणतो. ते ही बरोबरच म्हणा.

चांगला धागा आहे सको. सद्याचा मिपाचा फॉर्म पाहता गेलाबाजार शतक नक्की. :)

चौकटराजा's picture

24 Jan 2015 - 5:18 am | चौकटराजा

नरेंद्र मोदीनी ही शक्कल लढविण्यामागे कारण समजून घेतले पाहिजे. पंतप्र्धान ही भारतातील एक मान्यता पावलेली अ‍ॅथोरिटी आहे. अशा व्यक्तीने काही थोडेसे लक्षणात्मक केले तरी त्याचा फार मोठा परिणाम जनतेवर होत असतो. असे काहीच मनमोहन सिंग याना सुचले नाही. राजघाटावर म. गांधीच्या समाधीला बुके वाहणे यात जनतेचा जिव्हाळ्याचा विषय दडलेला नसतो. त्यासाठी सामान्य लोकांचा सल लक्षांत घ्यावा लागतो. भारतातील लोक हे स्वतः सार्वजनिक ठिकाणी घाण करण्यात तरबेज आहेतच पण ती घाण न उचलण्यात स्थानिक संस्था अधिक तरबेज आहेत. नरेंद्र मोदीनी सार्वजनिक स्वछतेकडे दुर्लक्ष करणार्‍या नागरिकांविरूद्ध तसेच आरोग्य अधिकार्‍यां विरूद्ध कडक मोहीम हाती घेतली पाहिजे. तसेच हा लाक्षणिक कार्यक्रम त्यानी वारंवार केला पाहिजे म्हणजे हा स्टंट आहे हा आरोप कमी होत जाईल.सर्वात महत्वाचे म्हणजे १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या सुट्या रद्द करून त्या दिवशी रावा पासून रंकापर्यंत सर्वाना या कामाला लावले पाहिजे. अर्थात दारू चा खप या दिवशी कमी होऊन सरकारचे कर बुडतील तो भाग वेगळा.

म. गांधींचे नांव घेतलेत...

आता तुम्हाला एक ४-५ हिताच्या गोष्टी ऐकवायला कुणी तरी येईलच...

परंतु जी लोक आपल पुर्ण जीवण रस्त्यावरची घाण उचलण्यातच गमावत आहे.. त्यांचा या अभियानात विसर कसा काय पडला?? हा एक मोठा प्रश्न पडला

मृत्युन्जय's picture

24 Jan 2015 - 11:07 am | मृत्युन्जय

त्याच काय आहे की जे ऑफिशियली हे काम करताहेत ते हाताखाली ४ लोक ठेवतात पगारी आणी स्वतः बसुन खातात. हे परवडते म्हणजे त्यांचा पगार व्यवस्थितच आहे. थोडक्यात सरकार काळजी घेते आहे. लोक त्यातुनही पळवाटा काढुन असले धंदे करणार असतील तर सरकार कुठपर्यंत पुरणार. एकटे मोदी काय काय करणार आधी स्वतः सुधारले पाहिजे

मुक्त विहारि's picture

24 Jan 2015 - 12:16 pm | मुक्त विहारि

हे बर्‍याच अवतारी लोकांना समजत नाही.

त्यामुळे त्यांना सुधारण्यापेक्षा अशा अवतारी लोकांपासून दुर असलेलेच बरे.

(वरील प्रतिसाद हा म्रुत्युंजय ह्यांनाच आहे, हे सांगायला नकोच.अर्थात अवतार घेतला तरी मुळ स्वभाव जाणार नसल्याने, असे लिहावे लागते.)

Sanjay Kokare's picture

25 Jan 2015 - 11:25 am | Sanjay Kokare

*yes3* *YES*

कंजूस's picture

24 Jan 2015 - 6:48 am | कंजूस

काही गावांमध्ये पंधरावर्षाँपूर्वीपासूनच स्वच्छता राबवत आहेत वालावल (कुडाळ),वज्रेश्वरीजवळही एक असे गाव आहे.नगरजवळचे पोपटराव पवारांचे गाव पाहायला वर्षाला पन्नास हजार लोक येत असतात.

मुंबई उपनगरातल्या रेल्वे स्टे परिसरांत पुलांवर वगैरे भाजीवाल्यांना हप्ते आणि रोजची भाजी घेऊन मामालोक बसू देतात. रात्री साडेबाराची शेवटची लोकल गेली की ते भाजीवाले तिथेच टोपली उलटी करून उरलेली भाजी टाकून निघून जातात. फळविक्रेते सकाळी खोक्यातली फळे आकर्षकपणे गाडीवर मांडतात आणि पैकिंगचे कागद मागच्या गटारात टाकतात. हप्ता दिला की कालच जौनपूर , बाराबंकीहून आलेला कुठेही काहीही करायला तो मोकळा असतो .हप्ते वरपर्यँत जात असतीलच. याचा पहिला बंदोबस्त करा.सरकारच्याच मप्रतले एसटी डेपो(इंदोर, उजैन, ग्वालिअर) उर्फ कचरा डेपो स्वच्छ केलेत तरी खूप झाले. पुणे मार्केटयार्डच्या रस्त्यांवर सकाळचे विधि करण्याचा प्रश्न वर गेल्यावर उलट "मग त्यांनी बसायचे कुठे ?"असे झापण्यात आलं .
पेपरवाले फोटो छापून आणतात त्यांना सांगणारे आम्ही कोण ?पेपरचे मालक आपला फोटो नाही छापणार तर कोणाचा ?

आत्ताच दोन ड्रेनेज लाइनच काम संपवल्याच पोरानीं फोनवर कॉलवल.
म्हणाले शेल्फी काढुन टाकु का फेबुवर ?
जवाब दिला शान्यांनो आधी पोटाच बघा.
बाकीच नंतर पाहु. *wink*

डँबिस००७'s picture

26 Jan 2015 - 10:38 pm | डँबिस००७

चरखा घेऊन सुत कातायच नाटक करुन ६० वर्षे तरी देशाचे काहीही चांगल झाल नाही ना त्या सुत कातणार्या विणकरांच !! मग आता हाती झाडु घेउन सफाई करणार्याच का मनाला लाऊन घेताय ?

ग्रेटथिंकर's picture

27 Jan 2015 - 11:04 am | ग्रेटथिंकर

सुत कातणारा ते मनापासुन करत होता .व त्यानेच देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले.
अंबानीच्या /अडाणीच्या बायकोला बोलावुन फुकटची नौटंकी होत नव्हती. मोदींच्या स्वच्छता अभियानात काम कमी आणि नौटंकी जास्त आहे, म्हणुन विरोध करावा लागतो.

ह्या 'स्वच्छ भारत अभियान' मुळे भारत अगदी तसाच स्वच्छ होणार ज्या प्रमाणे 'माझा भारत महान' झाला (ट्रक/टँकर्स च्या मागे लिहून)......

(अवांतर : काँग्रेस आणि भाजप यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू उगाचच म्हणण्यात येत नाही)

नाखु's picture

28 Jan 2015 - 11:57 am | नाखु

सुत कातणारा ते मनापासुन करत होता .व त्यानेच देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले.

या अतिशय बहुमूल्य शोधाबद्दल कळेशीला आप्ला महावस्त्र्/श्रीफळ देवून सत्कार केला जाईल.
येताना माई आणि त्यांच्या(ही)नानांना आणायला विसरू नये.

"ह.मुक्त मिपा प्रतीसाद" स्वच्छता मोहिम समीती अंतर्गत वेगळे पारितोषीक नाना-माईना आहेच.