" ये देश युवाओका है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देशम्हटल तर तेउचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ?या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी. आणिजर या प्रश्नाचा विचार आपण केला नसेलतर आपण आपल्या देशाच्या विचारांबाबत एवढे षंढ कसेकाय असुशकतो..
" देशाकरीता युवकांनी आपल काहीतरी योगदान दिल पाहीजे जेणेकरुन हा देश यशाची सर्वांत मोठी उंची गाठु शकेल"हे ही वाक्य बर्याच नेत्याच्या मुखातुन ऐकायला मिळत. युवकांनी आपल्या देशासाठी, देशाच्या विकासासाठी काहीतरी करणहे त्यांच परम कर्तव्यच आहे आणियुवकहे आपल्यापरिने आपल कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडण्याचा प्रयत्न करतील यात मात्र कवडीमात्र शंका नाही. पण युवांना या देशासाठी काहीतरी करण्यासाठी शासनाची साथ लाभते तरी काय? हा एक मोठा प्रश्न जनसामान्यांकडुन विचारला जात आहे. युवकांना रोजगाराच्या, देशसेवेच्या वेगवेगळ्या संध्या उपलब्ध करुनदेणे आवश्यक आहे.परंतु सध्यातरी शासन यात यशस्वी होताना दिसत नाही आहे.
आज भारतात एकवेगळच चित्र पाहावयास मिळत आहे.युवकहे बरोजगारीच्या अंधारात ओढले जात आहे.ज्यामुळे युवकांना आपल्या कुटुंबासाठी , देश्यासाठी काहीही करता येत नाही या चिंतेतुन युवकांना अनेकमानसिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. आणियामुळेच की काय आजचातरुनवाईट मार्गांनी भरकटतआहे.कोणी मध्यपान, वेगवेगळ्या प्रकारची नशा करुनमानसिक त्रास दुर करुपाहत आहे तर कोणी मटका वरली, जुगार खेळुन आपल्या कुटुंबासाठी पैसा कमविण्याचा प्रयत्न करीत आहे.पणया भरकटलेल्या तरुनांना कळत नाही आहे की तेहे सारे उद्योग करुनआपल व आपल्या कुटुंबाच जिवण उद्धस्त करत आहे. आणिआमच्या भारत देशाच भवितव्य अंधारात ढकलतआहे कारण आजचे युवकहा उद्याच भारताच भविष्य आहे.
दारु, घुटका, सिगारेट, तंबाखु हे जिवणासाठी विष आहे सर्वांनाच माहीत आहे. या सर्वांमुळे खुपसारे मोठे आजारहोतात याची जाणीव सरकारलासुद्धा आहे म्हणुनच की काय सरकारने "तंबाखु सेहतकेलिए हानीकारक है" ही सुचना गुटका, सिगारेट, तबाखु च्या पॅकेटवर देण्यास सुरुकेली. पण या वस्तुंवर बंदी आणण सरकारला योग्य वाटल नाही किंवा ती तसदी शासनाने घेतली नाही आहे.ज्या वस्तुमुळे आपल्या समाजाच आरोग्य धोक्यात येत आहे, देशाच भवितव्य असणार्या तरुणांच आयुष्य पोखरुन निघत आहे.थोडासा आर्थिक तोटा सहनकरुनदेशाच्या उज्वल भविष्यासाठी अश्या वस्तुंवर बंदी आणण्यासाठी सरकारला काय हरकत हे सामान्य मानसाच्या समजण्या पलीकड आहे.
स्वामी विवेकानंदजी ने म्हटले आहे की "मला ध्येयाने झपाटलेले काही युवकहवे आहेत आणिते युवकमाझ्यासोबत येत असतील तर मी हा पुर्ण देशबदलवुन टाकेल." आमच्या देशात ध्येयाने झपाटलेली असंख्य तरुन आहेत फक्त त्यांना त्यांची ध्येय साकार करण्यासाठी एकव्यासपिठ हव आहे.भारत या देशाला सर्वात शक्तीशाली, विकसीत, सुंदर देशबनवायच असेल तर शासनाने फक्त या ध्येयाने झपाटलेल्या युवकांना योग्य मार्गापासुन भरकटु न देता त्यांच्यासाठी एकचांगल व्यासपिठ, रोजगाराच्या संध्या, उत्कृष्ट शिक्षन या प्रकारच्या इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध करुनदिल्या तर भारताला सर्वात शक्तीशाली, विकसीत होण्यापासुन कोणीही रोखु शकतनाही....
-------------------------------------------------------
संजयरा. कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
Facebook: Www.Facebook.com/sanjaykokare
---------——--------------------------------------
प्रतिक्रिया
15 Jan 2015 - 5:29 pm | विजुभाऊ
कोण म्हणतं हा देश युवकांचा आहे म्हणून. ज्या देशात संसदेत ७०% पेक्षा जास्त लोकप्रतिनीधी ५० च्या वरचे असतात त्या देशाला युवकांचा देश म्हणणे हे चुकीचेच आहे.
असे हे वयोवृद्ध युवक! काय विचार करणार देशाच्या समस्यांचा?
15 Jan 2015 - 5:58 pm | Sanjay Kokare
विजुभाउ बरोबर आहे तुमच
15 Jan 2015 - 9:38 pm | Sanjay Kokare
आता आपल्याला युवकांच राष्ट्र तयार करायच
15 Jan 2015 - 11:47 pm | भृशुंडी
काय काय करावं लागेल? आणि मुख्य म्हणजे खर्च किती येईल?
17 Jan 2015 - 4:57 pm | सोत्रि
चेसुगु यांचा डु आयडी आहे का?
- (चेसुगु पंखा) सोकाजी
17 Jan 2015 - 5:06 pm | स्पा
काय सुखसारक लेख पडतायेत हो
17 Jan 2015 - 5:16 pm | नगरीनिरंजन
सुखसारक =)) =))
18 Jan 2015 - 8:59 am | अत्रुप्त आत्मा
@काय सुखसारक =))))) लेख पडतायेत हो@
ह्या पांडू ला हाणा रे कुणीतरी! =))
18 Jan 2015 - 7:20 pm | अजया
=))
17 Jan 2015 - 5:46 pm | तुषार काळभोर
लागा तयारीला....
१९-२० वर्षात रिजल्ट्स दिसले पाहिजेत..
18 Jan 2015 - 9:50 am | पिंपातला उंदीर
आज आपला देश एवढ्या वेगाने प्रगती करत आहे की काही दिवसांनी तो अमेरिका आणि चीन ला मागे टाकणार आहे
18 Jan 2015 - 2:44 pm | Sanjay Kokare
नक्कीस सर
18 Jan 2015 - 8:13 pm | जेपी
युवकांच्या समस्या या विषयी स्पा ,टवाळ कार्टा ,सूड हे योग्य मार्गदर्शक आहेत.
18 Jan 2015 - 9:17 pm | पैसा
गई भैंस पानी में. त्या सगळ्यांना सध्या एकच समस्या छळत आहे. लग्नासाठी मुलगी कुठे मिळेल!
19 Jan 2015 - 12:27 am | डॉ सुहास म्हात्रे
आणि त्या समस्येच्या निराकरणासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नात आलेले अनुभव ते उमेदवार मिपाकरांबरोबर वाटून घेत आहेत. ही एक प्रकारची मार्गदर्शनपर समाजसेवाच नाही काय ? *unknw*
19 Jan 2015 - 3:45 am | स्पंदना
अच्छा !!
म्हणजे समस्या युवतींची आहे तर?
बर!!