कार्टून्स आणि कॉमिक्स

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
9 Jan 2015 - 10:55 am

… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला . कॉमिक्स शी असणारा संबंध पण संपला . नंतर काही वर्षांनी सुट्टी घेऊन घरी आलो होतो . मी घरी पेपर वाचत बसलो होतो . आई भाजी निवडत बसली होती . बोलता बोलता माझ्या मित्रांचा विषय निघाला . आईने नितीन बद्दल सांगितलं ,"अरे तो नितीन आहे ना कुलकर्णी बाईचा . त्याला काहीतरी रोग झाला रे . पायातली ताकत च गेली . व्हील चेयर वर खुरडत फिराव लागत बिचार्याला . किती हुशार मुलगा होता आणि काय झाल बिचार्याच ." मला एकदम कसतरीच झाल . न राहवून कपडे चढवले . बाजूच्या कॉलनी मधल्या त्याच्या घरी घरी त्याला भेटायला गेलो . त्याची आई बाहेर देवासमोर दिवा लावून बसली होती .

"काकू नितीन आहे ?"

"हो आहे कि . उदगीरकर न रे तू ? बर्याच वर्षांनी आलास . नितीन मधल्या खोलीत आहे . भेटून घे . चांगल वाटेल त्याला . आताशा फारस कोणी येत नाही . "

मी खोलीत गेलो . नित्या पलंगावर आडवा पडून वाचत होता . जवळ गेल्यावर कळल . त्याच्या हातात पण सुपर कमांडो ध्रुव च पुस्तक होत . आजुबाजू ला पण कॉमिक्स पडली होती .
"आता नीट वाचल्यावर आणि या वयात कळतंय . सुपर कमांडो ध्रुव च भारी होता ." नित्या हसत हसत बोलला . मला काही बोलवेच ना . गळ्यात काहीतरी अडकल्यासारख झाल होत .

……… मी आणि बाबा दोघेही Tom & Jerry चे चाहते . आम्ही दोघेही एकत्रच ते कार्टून बघायचो . आणि मग सगळ घर हसण्या ने भरून जायचं . बाबा Tom च्या बाजूने तर मी jerry च्या बाजूचा . नेहमी शेवटी jerry च जिंकायचा . मग बाबा माझ्या पाठीवर बुक्का मारून म्हणायचे , " अगली बार ." पण ती अगली बारी कधीच नाही आली . एकदा मी उसासून बाबाना म्हणालो , " का तुम्ही नेहमी हारणाऱ्या Tom ची बाजू घेता ?" एकदम हसणार्या बाबांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आल , "ते तुला अजून काही वर्षांनी कळेल ." आता मी तिशीत आहे . अजून पण वेळ मिळेल तस टोम &जेरी बघतो . बाबा त्यावेळेस काय म्हणाले होते ते आता कळत आहे . हा साला जेरीच खोड काढतो टोम ची . आणि आकाराने मोठा असून पण भाबडा Tom नेहमी जेरी कडून मार खातो . साला जेरी च दुष्ट आहे . गेल्या काही वर्षात मार खाणार्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट .

…… ज्यादिवशी नांदेड वरून काका आणि आजोबा येणार असत त्यादिवशी मी एकदम खुश असे . येताना ते माझ्यासाठी खूप कॉमिक्स घेऊन येत . एकदा असेच ते आले तेंव्हा त्यांच्या हातात कॉमिक्स नव्हते . माझा चेहरा उतरला . "अरे पुढच्या वर्षी दहावी न तुझी . आता तु मोठा झालास . आता कसले कॉमिक्स वाचतोस . " मामा ने बहुतेक माझ्या मनातले भाव वाचले असावेत .
मी मोठा झाल्याच माझ्या अगोदर इतराना कळल होत . मोठ झाल्यावर कॉमिक्स वाचता येत नसतील तर काय करायचं मोठ होऊन . मी कमवायला लागल्यावर घर भरून कॉमिक्स घेईल असा बेत मी आखला होता . मी बघितलेलं भविष्य काळासाठीच ते पाहिलं स्वप्न होत . स्वतःच अस काहीतरी . त्यादिवशी ते तुटल . आणि हि तर फ़क़्त सुरुवातच होती .

……… नौकरी ला लागल्यावर पहिले भाड्याने flat घेतला . आता कुणासोबत आपली स्पेस शेयर करायची गरज नव्हती . एक टीवी पण घेतला . डिश टीवी वाल्याच्या दुकानात गेलो . तो मला वेगवेगळे packages समजावून द्यायला लागला . पण कामाच तो काही बोलेना . शेवटी न राहवून मीच बोललो , "मुझे कार्टून चानाल्स भी चाहिये . मुझे कार्टून देखना अच्छा लगता है ." त्या माणसाच्या चेहऱ्यावर आलेले सहानुभूतीचे भाव अजून पण डोळ्यासमोरून जात नाहीत .

कार्टून्स आणि कॉमिक्स ने प्रचंड आनंदाचे क्षण दिले आहेत त्या सर्व क्षणांसाठी हा लेखन प्रपंच . आणि ह्या गोष्टी वाचणे आणि पाहणे हा 'पोरवडा ' आहे अश्या समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती . ते काय मिस करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये .

मुक्तकप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

9 Jan 2015 - 11:01 am | खटपट्या

खूप छान ! मी अजूनही टॉम अँड जेरी बघतो.

पण आत्ताची ती झुरळाची वगैरे कारटून्स आवडत नाहीत.

सतिश गावडे's picture

9 Jan 2015 - 11:11 am | सतिश गावडे

आम्हाला "मोटू और पतलू की जोडी" आवडते. तशीच एक जोडी आमच्या मित्रमंडळीतही आहे.

नाखु's picture

9 Jan 2015 - 12:18 pm | नाखु

भेट घालून द्या त्यांच्याशी एखादेवेळेस :"जोगायोग" घडायचा !!!

जो आम्हाला अभिप्रेत आहे तोच झालेला योग.

पिंपातला उंदीर's picture

9 Jan 2015 - 11:14 am | पिंपातला उंदीर

अगदि. लोट्पोट कोमिक्स :)

गवि's picture

9 Jan 2015 - 11:16 am | गवि

अप्रतिम.. संवेदनशील.

-("शेरदिल"प्रेमी नासमझ डॉगी) गवि ..

नगरीनिरंजन's picture

9 Jan 2015 - 11:19 am | नगरीनिरंजन

सुंदर आणि हळवा लेख!
फँटम, मँड्रेक, कर्बी, बहादूर इत्यादी इंद्रजाल कॉमिक्सच्या नायकांनी वेड लावलं होतं लहानपणी. माझा भाऊ तर त्याच दुनियेत वावरत असायचा बरीच वर्षे.

शिवाय.. डायना, नार्डा आणि कर्मा (चूभूदेघे आणि करेक्ट करणे) यांच्या माफक क्लीवेज असलेल्या चित्रांनी खर्‍या अर्थाने पहिल्या पहिल्या खूप "कोवळ्या" नसलेल्या भावना मनात जागल्याचं आठवतं.. ;)

नगरीनिरंजन's picture

9 Jan 2015 - 11:51 am | नगरीनिरंजन

हो हो अगदी मार्मिक :)

टवाळ कार्टा's picture

9 Jan 2015 - 12:49 pm | टवाळ कार्टा

जपानी कार्टून्स बघितले असते तर काय झाले असते =))

तत्काळ तिकेट टु ॲडल्टहूड..

बाकी आम्ही इतके पण हॅ नव्हतो हां..

जेम्स हॅडली चेसची कव्हर्स बघायचो..

-(पूर्वी चहा पीत होतो) गटणे

पिंपातला उंदीर's picture

9 Jan 2015 - 3:33 pm | पिंपातला उंदीर

@गवी - कसलं भारी निरीक्षण *lol* *LOL*

पैसा's picture

9 Jan 2015 - 11:21 am | पैसा

खूप सुरेख लिहिलंय! मी पण टॉम आणि जेरी फॅन! कसाही मूड असो, त्यांना पाहिले की चेहर्‍यावर हसू आलंच पाहिजे. माझी मुलं शिन चॅन वगैरे बघायची, आणि इतर पॉवरपफ गर्ल्स आणि तत्सम बरेच प्रकार! कॉमिक्स मात्र घरात फार कधी आली नाहीत. मी लहान असताना सहज मिळत नसत. ते वेताळाचे मॅगझिन कुठे मिळाले तर जाम भारी वाटायचं. मुलांना टीव्हीवर कार्टून नेटवर्क असल्याने कॉमिक्स घ्यावी असं कधी फार वाटलं नाही. मात्र दोघंही मुलं मोठी झाली तशी बाकी सगळी कार्टून्स हद्दपार झाली पण टॉम आणि जेरी मात्र अढळपदावर आहेत!

आणि अजिबात जरासुद्धा इतर काही तार्किक विचार करायचा नसेल आणि फक्त ठो ठो हसायचं असेल तर रोड रनर आणि कयोटे. त्या रोडरनरला पकडण्यासाठी बनवलेली उपकरणे म्हणजे लाजवाब.

तोचतोचपणा असतो, पण बर्‍याच काळाने एखाद्या वेळेस पाहिलं तर हुकमी हसू येतं दणदणीत.

मीक मीक.. ;)

AA

मोहनराव's picture

9 Jan 2015 - 1:11 pm | मोहनराव

मीक मीक ......... :)
तोचतोचपणा असला तरी पाहायला जाम मजा येते.

सविता००१'s picture

9 Jan 2015 - 2:51 pm | सविता००१

रोड रनर
मस्तच

पिंपातला उंदीर's picture

9 Jan 2015 - 3:34 pm | पिंपातला उंदीर

धन्यवाद पैसा ताई

पिलीयन रायडर's picture

9 Jan 2015 - 12:06 pm | पिलीयन रायडर

माझ्या दिराने मुलाच नाव ध्रुव ठेवलय आणि अजुनही माझा नवरा सकाळी उठुन दात न घासता "हॉ" असं करत "नागराज की विष की फुम्कार" असलं काहीतरी बडबडत हॉ हॉ हॉ करत दात घासतो...!! असे जगात अजुनही येडपट लोक आहेत हे बघुन आनंद वाटला!!!

छान लिहीलाय लेख.. कार्टुन्स पहाणं, ते ही टॉम आणि जेरी, ही माझ्यामते आनंदी माणासची लक्षणं आहेत !!

राघव's picture

15 Jan 2015 - 11:59 pm | राघव

कार्टुन्स पहाणं, ते ही टॉम आणि जेरी, ही माझ्यामते आनंदी माणासची लक्षणं आहेत !!
खरंय. त्यातही Fred Quimby चे खास. आत्ताचे टॉम आणि जेरी हे अतिशय रटाळ आणि यांत्रिक वाटतात.

चंपक बद्दल कुणी बोललं नाही ते! ;-)

कॉमिक्स हा नेहमीच वीक पॉईंट राहिलेला आहे. अर्थात् ध्रुव सगळ्यांत आवडता. त्याचे खलनायक सुद्धा एकाहून एक असायचेत. "बौना वामन हमेशा एक न एक ट्रिक बचाके रखता है..!" असे म्हणत पळून जाणारा बौना वामन आठवला म्हणजे हसू येतं आता..! ;-)

कार्टून्स मधे आणिक एक कॅरेक्टर आठवतं ते म्हणजे बांकेलालचं... अप्रतीम sarcastic कॉमेडी होती ती.

इतक्यात पोरीसाठी काही जुन्या वॉल्ट डिस्नेच्या मूव्हीज डाऊनलोड केल्या आहेत. Cinderella, Snow White, Thumbeleena, Dumbo... आत्ताच्या कार्टून्सपेक्षा कितीतरी सरस आहेत. त्यात पुन्हा साऊंडट्रॅक म्हणजे खिळवून ठेवणारं आहे.. कितीतरी बारीक-सारिक विचार करून एक-एक हालचाल तयार केलेली आहे. वॉल्ट डिस्नेच्या Snow White चा मेकींग चा १५-२० मिनिटांचा व्हिडीओ आहे.. निव्वळ अप्रतीम आहे. लिंक मिळाली की डकवतो.

सर्व जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धागालेखकाचे मनःपूर्वक आभार!! :-)
धागा अतिशय आवडला हे वेगळे सांगणे न लगे!

पिंपातला उंदीर's picture

16 Jan 2015 - 9:32 am | पिंपातला उंदीर

Fred Quimby च्या निरीक्षणासाठी आभार . माझ पण एकदम हेच मत आहे .

किल्लेदार's picture

11 Nov 2015 - 1:45 am | किल्लेदार

ध्रुव हा ऑल टाइम फेवरीट होता. वेगळेच पण काहीतरी लॉजिकल कथानक असायचे. त्यावरून एखादा हॉलीवूडपट सुद्धा बनू शकेल.

ग्रांड मास्टर रोबो आणि उडनतश्तरी के बंधक चे कथानक तर निव्वळ अफलातून होते. त्यामानाने नागराज च्या कथानकात काहीच दम नसे.

पदम's picture

9 Jan 2015 - 12:12 pm | पदम

मला टोम न जेरी, मोन्गलि, रोबेर्ट वगैरेफार आवडायचे त्यावेळेला.

यावर कितीही लिहल तरी ते कमीच वाटेल...लहानपणातले सोनेरी क्षण ! :) माझ्या लहानपणी स्पायडर मॅन, फॅटम यांचे कागदी मुखवटे मी घेतल्याच आठवतय...
अधिक टंकन कष्ट घेण्या ऐवजी इडियो देतो... :)
१} माझ्या आणि इथल्या सगळ्यांच्याच मनात या व्हिडीयोने कायमचे स्थान निर्माण केले आहे. :)

२} जंगल बुक आणि मोगली... :)

३} डक टेल्स :- या कार्टुन सिरीजचा मी फुलस्पीड पंखा होतो आणि आजही आहे ! :)

४} सगळ्यातं गोंडस कार्टुन सिरीज... :) पाखरांच्या शब्दात क्यूट ! ;)

५} जॉनी क्वेस्ट... मला वाटतं... ही बहुधा कार्टून नेटवर्कवर आलेली पहिली ३डी कार्टून सिरीज असावी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya

पहिल्या व्हिडीओच्या आठवणीने डोळे पाणावले. झाडे तोडू नका असे सांगताना त्या त्रिकोणाच्या चेहर्‍यावरची अजिजी आणि हातवारे.. अन शेवटचा तो झांगडगुत्ता डान्स..

एक चिडिया अनेक चिडिया.. राहिले उल्लेखायचे वाटते.

मदनबाण's picture

9 Jan 2015 - 12:30 pm | मदनबाण

एक चिडिया अनेक चिडिया.. राहिले उल्लेखायचे वाटते.
नाही, ते माहित आहे... पण वरचा व्हिडीयो बरेच दिवस तू-नळीवर शोधला होता तेव्हा मिळाला नव्हता... काही दिवसांपूर्वी सापडला आणि लयं लयं आनंद झाला ! :) मारा-मारी झाल्यावर तो जसा ओरडतो तो आवाज माझ्या लक्षात होता. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya

मुक्त विहारि's picture

9 Jan 2015 - 2:57 pm | मुक्त विहारि

एक अजून विनंती...

असाच एक, "कचरा टाकू नका." हा संदेश देणारी एक कार्टून फिल्म होती.

ती पण मिळतेय का?

सोधुन पाहतो... मिळाल्यास इथे देतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya

मदनबाण's picture

9 Jan 2015 - 3:27 pm | मदनबाण

https://www.youtube.com/user/FilmsDivision/videos
इथे फिल्म डिव्हीजनचे बरेचसे व्हिडीयो आहेत... यात तुम्हाला हवा तो व्हिडीयो आहे का ते पहाल का ?
बाकी हा देखील अत्यंत बोधप्रद वाटला ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya

मुक्त विहारि's picture

10 Jan 2015 - 12:24 am | मुक्त विहारि
मदनबाण's picture

10 Jan 2015 - 10:15 pm | मदनबाण

धन्यवाद गवि... :)
बाकी तुम्ही गायब आया ची जी आठवण सांगितलं आहे त्यावरुन मला त्याचे गाणे आठवले होते ! तत थै तत थै असं काही तरी तो गोंडस गायब गुणगुणायचा ! :)
बाकी टिनएज म्युट्न्ट निंजा टरटल्स, कोब्रा, कॅप्टन प्लॅनेट, रिची रिच ही काही आठवलेली आवडती कार्टून्स, हिमॅन मधल्या मला स्केलेटॉरचा आवाज फार आवडायचा आणि त्यांच हसण सुद्ध लक्षात आहे.

जाता जाता :- माझ्या मागच्या प्रोजेक्टच्या मॅनेजरनी { मला लाभलेला एक उत्तम बॉस आणि उत्तम माणुस} एकदा गप्पा मारताना त्यांचा मुलगा डोरेमॉन पाहतो ते सांगत होते... त्यांनी डोरोमॉनची नक्कल करुन दाखवली... त्यानंतर आम्ही जवळपास १५ मिनीटे फक्त हसत होतो. :)

मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2015 - 12:24 pm | अत्रुप्त आत्मा

कार्टून नेटवर्क वरचं माझं आवडतं (शेवटचं! :-/ ) कार्टून.. जस्टीस लीग! टायटल साँग पण कित्ती भारी आहे त्याचं..बघताना खूप बरं वाटायचं. पण का.ने.वरहि सगळ्या चिनी/जपानी कार्टुनांनी अतिक्रमण केल्यापासून मी का.ने.बघणं सोडून दिलं.

image/jpeg;base64,/9j/4AAQSkZJRgABAQAAAQABAAD/2wCEAAkGBxQTEhUUExQVFhUXFx0YGBcXGBcYGhwcHBwYGhgcGBwYHCggGBwlHBgcITEhJSkrLi4uHB8zODMsNygtLisBCgoKDg0OGxAQGywkHyQsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLCwsLP/AABEIAKEBOQMBEQACEQEDEQH/xAAcAAACAwEBAQEAAAAAAAAAAAAEBQIDBgcBAAj/xABKEAACAQIDBQQGBgcGBAYDAAABAgMAEQQSIQUGMUFREyJhcQcygZGhsRQjQlJywTNigqKy4fAkNHOSs9E1dIOTFRZTw+LxY7TC/8QAGwEAAgMBAQEAAAAAAAAAAAAAAgMBBAUABgf/xAA7EQACAQIEAwUHAgUEAgMAAAAAAQIDEQQSITEFQVETImFx8DKBkaGxwdEz4QYUIzTxFUJSgnKyJENi/9oADAMBAAIRAxEAPwDS4hMw04ivGRdmepauK5aemKaKuNECTCUDYUS6A2NBINMOiNKYaZey3F6G5JBkuKlM5grR6UdwCPKuJZK1RcgmKFkliDWoOsMl4UDFXBMYlFEJMEiWiZwThl1pbCuMooqiKcnlW4ipUSV2ZDaHpCwkGJeGS/cOVmW7WOlxa3K+up4Vq/6PWcbpq/T9yl/PRvY1ODxcc8aSwurxsLhlOnj5EcwdQay6tKdKWWasy1SqqS0LAtCMbIutSEnqButSOTKZF0qUyUQK1KDJKK5k30JFa4i5XJRI65ELpUnAsg1piB5nlqkkqcUdxZ5Gtc2dYJtSwiy3KoGIIThQElGLlsLUcEQxczW401K4LYBNISbimpWFMoynqaIg1WGlqnOOoSZHGRcxUwlyIkgAprTriSaCoZyZMigDDIjzpUkGguKgZLPQNagnkQlj1okwQcxWNFc4+VKg4mY6i5J7EKhkDXDrdaWxE3qVYuPSpRMGARpqaJsMKgj1oGc3oLd7UZkMdnZOyZ2VXZA3eRFDFBmtdr24HgdK3ODwjlnN76GXX79RRMRg9lmKYTrhye0Ur2Fo8pUXW8hLNexGhUA9RrathyurXAdPW6Xu/JpvRxCUkx0eRYlzQyJEttMyFZCBYG11XkPjWLxeN4wl56h0e7UaNiUrCL1yMiaUSJi9QSVKkfFlMiaVKCuVhdakO5ILUnJ6HzLUHIqdaJaEnltKI4EcUaBR9lqOYbKJRTELZ7CtdJkoIioGSicQqGGkX0JIvxLXNNjoCB4k6U2IE2CFKO4F7ka65w4hNIkiUHwm4tSXowmCyw62p0ZXEyRExVNxZaEuKFsKLLcP0NDLXUJMLjpTDRc4vrUELoS7O4rgb2ZRLHpUpkniR11zrlhjobnJlYWxruRIxwdCxFUtni0qELhICXD60Y/MghYaBgOYBioQfpYPrFENrC4QLdcp45S8bXHC4PW9em4db+W09bmY3/XRl8IWDFsq8LZ7G4HQdNQOtWnsWmu9qHbjp2mKml5rAB/3HDW8wI1v1zLWdxR2oqPjf4f5Ft99G1WK96wEmxrlYl9G0o+zdrg9rqDz4QgXqHFpajoVk2ASpXIsxkVBNa4ZfQ8Ka1JKeh861xyZWyVJNyMg0qUSCFKZchHttK4Jg0o1piAJQrQyYaLBQkoviWhbuGz2VrCpQIsc05EAkjXpi0FSZ4RUHbEMtSSMcPQTAQXC1jSmg0FOuYX50Cdmc0VRryo7iZI+VbGpBRPs7a0IdwhBQE3CE6UBDJR1xEj1o64hSIRpxHSuuTdFiihBehXLDzqUEpBODGtDfUVVegyeG4p2S6KanZlS4b31yjePiG6pMYe1R2fMh1DJbz41lc9mQrMTEWte8YQCxF/vyOL8iPOvR4COTDpdbv7fYTCGebl0MymHnuSJVta5JjHAX4m44XqzoWHF73G27sgwsyNZ2QxlZLC7XbI4YqNdMpWw4BvCq+LpOtTyre4uUO6mgreffZY+7hmFvtSW5/dQMLacGJGh043tQw+AtrNe4uYbCdpHtKrtH5syMW+ONV87YghfusqNcfhyj5irzwlK1sv1HvA0nq+6vPU2W6m/aYt+wkUJKQcpHqvYXIsTdWsCba8ONZ2LwLhByjqvmZ86XZy0d11/JosVFrWS9GPpz0AwmtcWG9D11qSEzyRa4mLK8tSg7lU40oluSmDEaUQUSDDSpCBWXWjBsXKtA3cOxMLUBouUVBBTiuFHEgWTmnRQLZRGKNiiRFQEkeWqLhWC46iQtBC0skMwklLkib3JuljXJ6AtEpUokxLR9HwqGSmTTSoZJfHQMllyjXzoQG9AgpzrhNyXYVLVtCO0IGG1CF2lyRi0riM9me4JdRXR3IrPQo2xtbKrhGUFRzZc7EWBEankt9XsQDcWJvbcwuCUo9pPbkupUox7Wqqd7Lm+hzXFb+4pGZLEA8Bma/mGJLEeF/dwN6ODpzd1HX1yL1fC0qTu72W92tff+C3d7f8AKLKMQ0pNxlWFLsxGa4LMe5fS549CLU98NhdOStbk3b4rcz6soza7HXrZNlbbxSYhm7PBs2hAXMdASSScoZibm9ydSaOUKdP2pJeS/Nh0YVEstkv/ACaRRiMfi1UqywpzZSshNhrZgbaHy14V0Z0W+b+H7lh4WtKOZSi/K8voIsVvbiwzXMdzfVVPloc1wRWjh8HRrLRtW8vwZuIr1aMsrt58mJZdpSsb3UaWFhw8tdKeuFU1zZM+L1n08NNvIguEaS5JLdbm/wAKuU8JShskZ1bGVJvvybPsJO8MiSISrowdT4qbj2acKithqdSDhJaMiFS2x37djb647DLMAFcd2RQb5XFr28CCCPA1824ngpYWu4Pbk+q9bmzhquaIWF1qjyLzehY8fCuTIjIrkjrkTGRVkohmYomWpTDTBnFGGimQaVKCexUEqWyUXBaEI+C1DJLbVwNwLEGmIIXSnWnR2FSZ6lSRYkRQNhLqQvXE3LY3o5IQgtCKSw0WxGxoWcMBqKWQzyI30ogZIjlsaLcWXFKC4ROKhZz2DI108taWJb1DcPHemRjcrTlYuKKouxAA4k6D2k06ML2S3FObM/tnfHA4Y2klGb7oIvY6iwJFx4i9W6fDastbW8wHXtpc+3e30weMfs4ns9tFbQny11/q19aitgKlOOZrTwIjVuPIorNWfGNpFiU7xFOyoIBiBM4zyTllhXiBCSzlyL2s3ea/3cvMm/s8HRksPFy5L0jMq4l5uxW17/uYjfLeCAytBh0SOK/1jRoMz8bC44KbW6a1brKVCKUV3nz6eAzBU/5pupN3UXZRfXq/DojK4Z1VlLKrKDcqWKg+FxrYVnzUpJpOz6npuyl2agnbxNXgt75xZI+xiXoiDTyzEj4VReCprV3b8WDT4fSm7Sl8GkRxu+EoNpo4J1XUdqgBB4aFbD2W1plPCRfstp+AGJwEKWsJNJbtmU2thJcQ3aZES4AsoCAKoyqAg4C1hrroOgr0vDsFKj3m/dz955jHY/DtdnTu7P2vx+QHExQwDXvydOVakpKOhmxc6r00QHhZCrZtNTqOVq6N+Yc0mrHu0EFyRUyR1Nvmbr0K4k9riI+TRq9uhVrfHP8ACvJfxRSWSE+eqNTByeZo6fFFc14uOuhrSlZFGx8SJ4lccyynwKMyN8VNOq0XCeT1yf3Ewq3jc+2piFiy5vtOkY83YKPnQxpOTaXJN/BXD7SyueslAPUgOZKND4sHlFSNQO9SgzxY65nJltqgm54i1xzZ9IbVxyQvxBp0US9AG1NFc7kxUEoi70NiWyvNRA3JhbVLF2sFQvS5IJBAagsEHYNuVLaBZcya1FyNyxlvU3FtFka3FQyLnwTWoOvoH4ShTsyvUDoFtcdP6FNp6aFabvqc13732kgxUcMSRO7tlHagsEBcxArYjK+YM2boR0r02Bw8I0k2tXqUqkncQxbtwxTPHK4mEj/XSOGLMM1yUAu2g1BU3vxOlqKpUqZu6tti3Tp0+zberaMpvHs+LBTLJhZndC7ZQwIbKLfaFr8RyBBsasQlKd1NfuValPJazO2bA3hOI2Y84N5I4nueZITOhPiVKk+JNYGIwyp4hRWztb3sdGV43KYYWhx8sMljJJhGGGVLnKovmB0sLhFtboete0lKDhBr2U9TFjTks9/aZx3bWAmws31qlHudDa9vEX0Bq7VhCvDw6j8LXlRknHdb/gaYbahKRhCqhdAQFRgf13NuHAfnXmqmEjTqSzq797XuPTw7GpT7RaxfLp1uMNp76TPGEmZSoI0RFDPlIsSQTpcXuLVFDh6nP+mnfq3ogc2Hwtqk7+C5/AyeM2o8jZmNugGgH8/GvRYbA06C01fUxMbjquLd5vTotv3D9nyP67FiAOp9gq8lYx6mXZCvaWIzE2AHeubD5njzpU0lquv1LFKNty3AjMwB56e3lTUBPRXI4hSLg1zCg+Zu/QrCTicQ3IQgHzZgR/Aa8r/Ez/pQj4v6Ghg/abOsQDvV4mHtGpL2TlO7++v0D6bHKqlVxs3Zsz5Rq5zKqqrO2ovoLDNqRXpp4BV4wqXt3VyuUI1Mt0fbX3/jx74KKJWVhjsO0mt1KhtBqA3rEcuQ1pa4f2MZybT7sl47E9rdpeJ0+WO1683szSjK+oHKnzoizGQJKKIfFgxWpTGFqrpUXBufZKg655lqbk3KZjRINIXTHWnR0AkyrJU3I5EGFdclFDtRIh6kMpqbnWDgLihYG5JFtQtkF8QoWSmH4YWNLZz1GDrcXpYpOzseRjlRXJky6Nahimz14/hUHKXIvgPxqJC5jFBwPhTYbplRnD99tmAbbg7VmWN50BYGxAZ84Knlq5F/1a9Vgp5qEfh8CnUXeG64RO0eNpCO1LMFZxmF24a6k6fOicr6l2MMqtcRekTZMMWGFmkLqwy5mLHUi/HgoW/tIooSbkJrQtDmaP0Ud/ZWLUcSjr7cjqPgBWdxJ2rU363F0tmNsRtdI95EaVrKYViQngGdQV8gSbebCvTuD/k4+d39ChB99nN9/IZhjZzMGv2h1PCxJy29laMWuzjl8BNN6eIPggOyZh3WW5v/ACqMRh4Vod7dB0MbWw1W8Ho+QFglLuC3eudb86OlSjTWWKIxFWc25SepbteBVYZR5jlTJLoJpSk13itcaMtjc9F4D21ylc509QCRutLqzhCLc3oWKcXKSjEN2e2qnmDr5jjXUKmeCl1F14OMnF8hht2Gzk9RenNCKD0OiehXCWhxEtvWkVB5KuY/F/hXiv4lqXrxh0X1ZsYNd1s6Kqa15dRtIvN6HE95t1+1xONkVox9e8dnQkLdElzqysMrFpW5Hhzr1OEqWoQv0Kyo529SrdPdB458G0nY93Eq10Ehdrd8Bi1lsCBay1OKqf0pW6Hdg463R2zEDWvJVNy5T2A5E7pqEixF6gc0d6ksQkrlCxVNxrnYtePgKEXGXM+WOuOciuQVKDjsA4k0yI5bAWWmXA3Z8y11yWDSmpRDKAtzRnLqWZTXaE3Jq3hXNCi5aAhsMhS9CyLhMelLZNxhh2oGBNEstjUEXuguNa4rydi14q61gFMpRbG1RuMk7oYiUKmZiABzNWaMXJJJalKbSZxn044yKRoMps4BuNAxF+7db5ktdvWA4i1ei4fQqUoNT5tWRVqyTPt38WmLiXEyYdGlU9kWY2UuoVi9vIhrW4kjhVid1zLNGeaNuZjPSBPJ9KYO5YZVsOAtqTYfivxvR00somvdSsbH0EbXUST4V2/SLnUG1u5fMB4kMSfBaz+KU24RmuT+v7g0nrYF9I63xMT3Bz4aEllOlwpRrEeKmvWYB58Orr3fMo1NJuxpN49pwYzYscsrWxCmzWDFjIpyAtlBy5wAdbcarRqrD1ZQk9PTJ7GVSUZU1rzMrsTd2eaNQFRVmuqu7gDQMSSFDH7J0tfhU1OMUFeCvoTLAVcyYwwW5U0UoUvGbqSCM3IgEHp6wPv6a1f9fha6iMlw6ctGxNtzYU30kxAISAGvmIHe0A1Wn0+NQlDM42HU+E1cknFp21ZVtTcrGwevAT4xkSDzsDf4UdHjeEqc7eYh4ep0M/F193lVHF4iVWo+i2NbA0FTgpW1YVhFOY9ND+R+QrR4XNuLh0M7ikEpqS5oebeIKoR0rVexjUPaZ0L0UbZgGDMTMqPHIxfOyi+ckqwvysMv7NeD49Qq/wA05taPaxu4WacLGtxO8eET18Vh1/FLGPm1YyoVXtF/BllySOIyekt0kxmWJXjxM4lQsSpATurbTW6qt+hvXpqVHJSjB8irGrlnmPcP6T27SAmBVEcqsxVixK374AIGpUm2vGhq4fPCUb7obLEuXI7thMQkyLLGwdHUMrDgQda8tVouMmpLUfGWmhJotALUKjZWGKWtwTEx29lLlox9OQPBHc0I2crIsC6k1wN9NCLLUhJgUtSixEXYnpTYjGyMcVS2dsQnqTgGTWmEHuSwqFqc2V2ogS5U0oWwGEwx0LYIww0dLkyAkwfGhudcnBUM5vQLK3FAKvYKwdFB6iapXtbb2Fw/6eVU8NSdeGignWrsMNUqK8Y3KedI9wmIimUSQuHQ6XHyI4g8NDVatRlSdpIdCpdWA964JmiSOAjtWZsova3cYZieSrcXPK/M2B0+Epqpr0K9V3Ob4T0a4RmPbYuaeQHv9kEiW/S7h2PnYXHCtx1UtkDHDye7NFBgMJh4hBFliRXLd6S7FmChrs+jGyjQcOgpUpN6linSUNjzEbLwjgO8UUttAzKsnsvw9lRmaDcYy3QPg93MCuI+lmIImFjMsgj7ivmzJGhQWBzWe/C9gDcNVjDxlUeUp4rJTV0YbebbEuNkfEyWAByogAsqkkgeJ1JJ5kmvSUacaULIyXNuduo2MjrsFAxFpMUxXQ37uW9uAABU9b61hY/9bX1ojc4ZTzXl0+9zPR7WxCqqLNIqp6qqQLc9LDxqi4Rbu1uabpRLTtrEFgxnlzWy3ztwvewsdPzsOlQqcErWXwCVGL1YZsjFvJMS7sz5RZibnu6jjxoZxUY6Iu4OlTeam9nvqFT75Y1XOaUScrOi8PDIFPWlRwtG2isU6mGjB2joYyEd1fIfKrb3E0/YXkO3JTAxn/1J5G8bIsSAe/Ma2OGRtGUjC4lLNWUSMAJgZjrwArXMmT76SPd1pMKMXH9LjEkJJDKdeKmxHkQNPCqWK9nSye2pdpbhu/eDGGYSRYTDHDyEmKREDLbkDzvYi4P+1Ual46xS5ckWDLJj55AO7EqHQFlCp00zGxsTbS/Gq7nJnWCY8Gi27SWMNa+iRL7sy689ajVBWCosSY+9HikB6koD74ypoZWl7ST80dtsaDYO/ONhkjMjNNCGGfK5lup0J7930FyLHiBVStgqFSDyxSfJrr9PkHGpJPc7RiWBQMveBGZcv2gRcW868nUi1JRZoUp8zMbxbyLhY0ZTcOARZcxOYMQFzEBdFuSb8QLa3Gjg+Hqacqt97W/cK8qsrQfvKd1d6/pRlVxl7NO0uQASuoa4BINtNRb1rW0uQxuCVKzhzexNpU3aZpZuBrNHQ3F03SpRbj1KOxub0dybnsi2FQibivENTYokqhj50UuhN7HkprkBuyvL41IQwWLvEUNwHsF4aG9BJgOwygw1BcVKSLsTMkSntCbWvorMRy4KD/O2lPo4apVbUV7+XzKlSvGDu2VRFXAdDmVtQRz9/DpY6ikzjKEnGW5YhVU43QWkZpTQLkkEYZdaKna4mo9Dm2+sSyYlJDAsn1OdcyRyGxkcd9WHcsLC1z87erppxhGKfIpRs27odejiZA2IjVOyBEcojsqgAghmsoCrfTh0rP4nByUXv6uHFpPawy2ttpUGpIaYrma+Ux4csOB+yzKS5PEAjoKv4Wj2VNRe71f4Byylea5bGOnxWFJdpyYpYXYRorGHKc3ey5RlYNwOgc6nvE1DdRNve/wLsqM4JZdnu+vrl8gfYW0MIJy0hEhe7WCpMQTc2PajKvHhbNYceVLm6ys0tuui+X+A40alRZKej87fhX+YNvPtKBJ1lgCqwNnRVaJOzHJhcgMeTIbDXS4p1KU5XzJe71f4hSo1Yd2o3pzb+/r3EcNt36RsvHEaf2qNFB9bsrMyZ9ePH3Vs8Ohap7mefxlTNbz/ACzL4kMERFF2Y6KOZNlUe0m1bMpKKu+RTprNNmw9IzrDHg8EhP8AZ4u/y75tmJ8zr7a8rVm5TbZ6rAQUaN+bfyRhr0BbJqtcEM9hRWlBuOfDyoKnslzBx/qJge2JlEr3IuCfH30ynTlKOiZWxeIpQqtSkviLIiLG3I1LTT1KdNprR3HDnNglH/pzSD/MsTfMmtrhjXZyXiYHElbErxRLEuFw6jr/ADrTMpK9S5ktpy6gdNaycdUvJRXI0qS0udA9Hm1ppIJI5JPqb5SuhLe8d3j6w1NJpzTXeGWNkWjCiyiyDSwGg6DpwqxmW5NjIb143CTND9JRgqlrlWAexGoHLiBVeVSMnqjmjI7Sx+BBIw2F8mmlka/7K5QfbpS3KHKJAdsXsVkEzzxE8TCqIsZ09Vhex87eNFHJu3r7rHHStgbbKYiLJEUhdlUgaKQ9lVso0BBK68bXFUeJYeNWk5ONnHVMdTk4vRgu9ex5EPYoplKzSMrs4GQS9m65lsbqMsi+evga+HlGdFO1vX+C5hKrp1G0/da6ZTubsuc4q0kZjURXkOhzgSBkGlsoYqNLHRHvxsK+PnGlS03vp9/h9x1etKvNN/TkdGlWvNjYsCK8TRIs30ICOuZN7EMXotFE5O4pERY0xuwdycqW0FcuoLYO60SCRHLU3RI0hjudeNJuA2g3DgA61zEyZdtjbUGERXmbVvVRdXY/qj8zYVaweAq4qajTV+vRebM+tiIwXe0MhitvSzsZOyRIwXZQ8tnzAIqI65NC32bX0LEWPH09PCPDR7N7r79DKnVVVZkz3Yu+HZqxlgIiZ8xaJs/ZkhbgrYE63JtzJtekYrgtXFR7Wk1fa3W3jf7DaOMhRl2bN/smdJUDoysjC6sNQRXmOylCTjNWaNGc1JZohM2VBmJCi/EkAa+JqI0nmtFa9AHPqc+30kRYwhZI5BIWUOveaF3kygl1JADKTYD1WQcK9NRTVKKlvzKiqQztXBdxcXEUxPq5ybtwBaJFWy5b6I0j6npccbWCVO9SLlslf3hKaqSyxfgMdj4NcVO5kkVwoWRwrZs5ctoxHADLqo43HLQ1sdiZUopR3d9S4mvZQi392NmkVYYlH1jL3RlGqRsMx4WGY28NAKZha39BTm+pZoVIqMovV3Vl4WEC7vzQfWSxMFscrDVSfBk4e21OVWE13WXMPVpZry3S2/cAn3XxeITtbBIDqGN2eTj6kaXZjpoNL+Wtd/NUYSyLWXyXmzNxlSdbRez9Rzs7deXB7PxJm9aUxPk5qEZ1GY3sWPa8Bwtz5anB8VCtXajslv68jGxlJwjHNzZZ6PdnjEbUjLDuQKZmuAR9XbL++yn2VqY2panlXPQrUFZX94v9IWPE2KLrq5J1/V5A/wBaa0NXBxnTUdmuZOBxVSlJz5MzsUt/PmKw6tOVOWWS1PVUK8K0c0SebrSx97bnuBxZz31C87GxP8q18Lw+L71Ve4wsbxSprGi7ePMc7ZgVlUqABa2gsOorXUUlZHnqU3d3M1GLMR1/r/asXiVPLJT6npOF1b3ix3hIScLb72INvYiXPl3qfwpd2TKfFpWrLyF21MRc2voNB7Kv1qqpxcnyKOHpOTst2e+kbYC4PERolyrQI2b7zahj7SL25XFeUwuKliYynLfM/X2NKpTUGoo82KMkSG5FxfMCdNTxH5/Kryi7XQCHf06a2XNmXqTY/DQ/CpzytYIXY7ZD4hlFiTzYchzCjqepvUZWyGFYjdYEaxHzFwRpYVLpy6HWQil2GFlRRds0qx5W0JLHqoOmoHC/Ggayq5FjpuB3beOSN554olVlfu9qxIRgctmjUC9rcefCqNTEuUHGMXtbWy395YhQnLZFe829qpi5GVElRrCxsLhQoXWx4WJsR9s0GHg4UlF7/uX44a0MzVpa79NPS9439HW11lOJd8sd2TKv2VUBrDNYAaselyTVLiVKc8uVaK4uXcept5V086w3G2gyErsx8O2+z2jLg5jbtAsuHY8CCqh0886sR5kdKuSw+fDRqw5XT/PwZ0a1qji/cahIdL1SS5jnPWwHjIr6UURsXoZ+PHj6Y2HU37KHPJz77suRfAhQT+1VqVJqh2kubsvJbgKtnqZVskGslJuPK3iqLjIldqi4ZfHMTrf+fnRWKjYfCc3nXW6CZSsJdsbqrL2mI+kMJipytJlMaAcABYFQBzvzJ1rc4dxSphkoKKy9OfxMvFYWNVttv7HNvpcqCSKTPcSKxFyLEK173INu8CPb4V6DE1FUnmjzSKVKGVWGG4eHjlmkinlEatxW9s5bXKrH1SLjxN9KTicZXw+FXYx56y6BQw9OrVvNmt2tvNhdklYkikaNwzIkczC7A5Szkm+XMCLKwvlYkG4tlUaUq67at3pPa/JePrQsVHk7lPYEwO/4mUsJ4oXOgAWR5lXopkJ4+BopU5U3aEdPCyX5M6tVrLcDGKXEOUeWeQvxJQOxtw4XIAvXOM495JfEqJSm9rniph8NJlZZ7kWbNZbodGFtCVPTgbWNNg6qd5Wt0HQcqcrvQf7YxbrNBPBL32S0lvVkQWKE3Fje5txYXOmhFNxdKlWglJGlQjNy7r8zN7f3umhaGaWE9jJ2tu+pZpBZWYeACqvADQnnqupgodlGEHt6563H0sQ4Tba3+xRh95cdiYVllWOPBdp2YIBsGuL5iO8eQ9ZBf3EYYGnFKyuzliJOTexo9mbbKo30d0YItsjt3R01HDLp7DbjYiviuHwk7zTi9729fEs06maPcexdtaIzYSZlZ2DGASPNaO2VpHbKpNgLhB/m51qcPlQwzvBaa7bt+JnVqdSvpz+Av9G0bRR7UZxZxBGBfoxmBI8DpqOlaVSrCtUpuLurlWpCVOnKLVtDAYqbNIzeNaRXjG0UhpLg4xBdxqBoRoQT0NDVoQqxtJC6NepCrem7FG62yhipmgZu92TtGAB3nUZsp/ZDHTmBWW8JChNTbur+vM2KuPrVaWTZiUJlYg1q7Mz82ZXRptlMHjyE/wBcqYijVTjK4FBuvi55CIMPJIA1syrZOhGdrJcdL8qzeIyhKGW+qNfh9TJNTexqdq7rSwQpEHjaVI2Z1BOjuSbBuDHLYcuFVMLjo0Vka947FYSpiJuqvh4HPsh7Q5gQVvoeN9L0OPxCqNRjsWuHUHG85Ly9xot+fr9lYLEfbhdsM/la6E+xB/mrEwv9PE1Icpd78nYqNn5MWYLuwKeiX+F63I6Ipm12XscojLnRsoj1ETuCWBGhuBpbrrr0NqM8aqd3lvq1r4FiFFt2b5XCcBiHyRZVjBky2HZuMtxc/as3DkRyNd/qbjmvFaeIX8vtruMdqO8JRX7Ji4P3kC2tbNo2hvXUeMKabybeP7HSwzTtc5htItmh17/bXLL94FrlT56irFWd4ZgcNBuvGPiGSQmTQliw6m9/Hxqhmtqer7LtFlu7rl4E9mbJVpUWTMIywDFbXA8L8KlTKOKoTpU3OK2NFvBsGKCMy4Z3jYMoAz3Pe46jXNwI9W4NwCLGl05t3vt69czOw9SpOap738BZg94cTAwftLkG1iAA3g1hqD/VjauqU4VVaSNSeDhCna1vHncN9LUy4iDDYuB1KjQqTldGILrlJsb6Ncc8gIvYkV+H0nScqcl4+DW3rzMGu235BW42/wC00awSyHt10W6gmRQNSHLWzAcipJsTfpNfAUU89vctgqNScu7ca7wb4HC4fNJbtDoqWsxNte9mIAzc8ug8SKVRwVGU+6n9h1Sc4rvMU+jWMrBNisQMpnkzKcrFnA1JAFyVzMbaeOt6HiKdSoqdPkvdr6+h2DmoRcpczdQqrqHUgqRcEc6x5pxbjLc0o1E1oBTmuLEQXtBUh2JRRcPn/vR7mdKVgLb22XhGVCAwUG/d5kgXLA8ADppxGtbvB+HU8TeVTZMyOIYx0Wox5iH/AMy93NMFOhCtG8rMGPEgNJx4Wy8NdK18Rw7sUnQSS53KtDFdrLLNNvlYUYLZ2HeLPK7pKCSVGrtfhYW7+gGvUHhXVK8ZycyxLB4mnNU8ru9jzCTQdniEkw5zFlKtZS6rZRxJFuBJyjW+tPw0MTOUJ0pJQvr68RWLhHDt0qqvPk+Wxld7cWJJky+pHCkaDwUH8yaTU9uXmyIeyr9BX3SOasOXEHy5qfOgCOs+jPFJLgmQHNiVxCswy5pGjtljZABcqrMSfJr+tqqtDNTaX+V0FSppJ5Ue+kvFLFhXRiVnfEBolIKuFy/WNqAchGVNQNV0qKCap2at4b2OUE13kQ3F2LMdl4iQG5sGVHAIs5u3Zki6uQiEcu8RxNxYo1IQqKVRaIOUJSjaD1MVu9jcL27jaQmeJVdY4wXujMbaAnuADXzVdNK6ck5NkpW0Kd29nT4yTsoSyQK+fKzMyR6kjT7T2JF9CfCl9r2bUugyFNz0R0zYeyUwmIjBu4ZwrFwDqbiNlFtCHIF+jGqPEq1TE03JvVa6fNfAt0aMaWxpv/MiJCsSqS0yCZ20veRe0yi+jZUsupGgAoqKUKSilbT58yIQvPPL4GZ2XigY8WIz3HwjkDXu2eIqCDqBZyR5+VX8D+vHzEcSt2V1t+5zNG7x869CjLaHW05boovyvTORVpKzYq2NjWhnSaP1omDr5g3sfAi4PgaxuIVrNQXmb2Aw/aKTfS3vHm++AVZu2i/QzjtYz0DalfNTdSOoq9h6naU0+ZlOLpzcH1FGx8XlcdCQG1ANr62J0BtwJFgSKdJyytR3BnCL9rY63gNruuFYrmigbIig93Io7RpSAdftIC543uTxrzFRzV825u0Y0m04LRL5g+LmTLnUgrxuDe9hqb0gt30uckSbO+Y8XJJ82ufnamFikrZfW/7kNpbQKYV8P9l5UkHgVDA+8Ee4VEaac1PnZr4lHHRyjLC27Fbmw7MX8ra1pL2TNGmE3qxZ2fPiGcLZ1RCFS1wNORJPebjYa1V/lKUoNtc2/joN7ad7+FjKRb44xSh7Yns/VBVLCwsNMuunWkyw9PXTfc7t6mmuwXJ6QMY0iyu0bMoIF0AGtgdFt0pawlJRypfMn+Zne4RhEfET4REtnlYvqbC5BY3NjYanrVjESjTpXeyQWFqOFdTW6dxvvLsOTCyB1ZnUgXYizI9u8jAcPA8GHAnWq0ZQnG8dUbdHEyqPNtJevgC4fGTEizgewXv1vaoaiuRey1cR3JT7vTr5lckklz9YTbXW3Mm/EVPdtsRGk4SeRpW8F+AOadmALG5vp5W1/IVKSWwqpUlNLM9eXlz+w/2BiYpI8RBOoZGS6qdPVIdsp5N61vNq6afckuV/p9/sY+JjnxDX/KwJsvd6NIZjHiWE0citoAUK5InjJXLmuHZ1JBHPQXtTc946orRotSfK2xHbez+3KZpC7yNnEaqLhAcioGK5uJ0v3ScxtwoU1COgc6bm7tm23uwohjigguqApEoBPdAW+W/W5DE/rClYC84ynLdv4iqujSRTuZtRg7wO1wSbH9bU+zMAfavjVPi2HTXar3+RawdS0srHuKbWwrCRtwB8tFcbcadlY0dtTGzXRgvSKBn9YX0JHhay6c9c3ur1n8PyyUpy5GPjo3qITYSaGBC0y55CpCKDwHh06lvdVzEYl1d9heHoTc12e/USDHTaNmOvA8rjjas9010PURxs5PKp95L1oMcTtFWdJI1A7gDLxuRcNfrcEa1ucNnFRlHpqeWx1Oo53qNtvmVYnd+Iys0zdnG5McJz6lg2VrLkYsubMoJyg5WNxoDQqTUpOSCgrRSYdtPdCJ9nxzwEM6RguU1bMdSHW5vqdGU8wLEa1nwxT7d0pq29vEsul3MyZgI3IIIJBHAg2I8iOFXRJ68pYkkkk8STcnzJqLnHetyMQf8Awp0vfKmHPsZbj5Cq17xfmWaaSmvIA3i3RgxcYc/VygaSLz6Bx9ofHxqI1HEfOjGXmMti7CjwmGwnZ27ykSt96UEhz79B4Cpq62YNDROPRn234iVuvrW7v4hqvxFKsmrMdvoGbYw7thjJFIAnZZ7Mt2yqoKhWB5AaXBrMo49qahUV9baaHZHGN4vQxpzQ4p8OwAuHhJUkiwQheIGl0X316LASTrREcSw0o4TtfCL+NjFCIhyDXo0tTDb0CtsyWAH6oqZuyF0Ve4JhI+74nWvL16naTcj1+Eo5KSiabdvFpLE2CnIVWYtBIeCSHipPJHtx5NrzJFjB4nspa7MzeJ4Nz/qQ3Rm9pYB4JWR1KspsQdOFbytujGjLMhtBvTMI1if6xE9UEkc7gN94Akm2lZuI4dnlmiy7QxfZxUWtCjE7ys6siArmBzEm/HQ2A0B8re2syvh3RaUjSw9VVr2FAJ0ty/oUkvW00CdpYYOvgwzA1EXYbiqKqw81dBmCiEkcacmAVh4Ad7y4Ee2tG/dPOuLUrM0bbqGTBNBC+UHvBWuVzXvx4jh40UYNwsiGjl+PwMkEjRyqVdeIPzHUeIqrKLTsyCzZmzZJ2yxKWI1J5KOrHkK5Qb0INTsDELhcdgzISViMisQL8mW9uPOkY2m6lBwXT7j8On2iOv7axGFkiBeSK0gIjYsoDHjYG/eHVa85hu3p1LRT03X5NKWmqeq5nNMbsaSPEOAhyestjmst9BfmdQLcfCt2cltcv4XF03JSvoxYFvmtrewHxt86IsyklGUutrePl7wXDYbO9r62PW2mljYG2ubW3KmysooyaUqlWu8iukvXzuaPdvZokkcowUCO12Vm9Y20FvWIzjXhr4UCvlabGYidPPCcY6rlfb1qaDB7F7NWsbuzA5gCtgoIWxve/ebppYa1y7qsVpPPLNJAOF2VPDiBiFKu19STc5STf1ha4VjY3PAaHhUSgqiyvYiTSjazv1/JTtHaLyyo7XVFDGNOg1OZr6lmaxJOulWoRUUkjPb1KN35S2KhUcAuZvbnk168RVLiMkqEkWMKr1YmwxM1q8wkeggwT6VU2GXNY0etEYpyrfeBmxBkynKuYZuIP1kguenDJ+xXqsE//jRj7zMq27Rmd2ds4yMM9zc5Qo1ZrcAANbACm21ux3b5aahTWvNjnamEfDxZ3i0zrlWRCFJ0NrHjoCbdAfGm0VGc0io80btXTLMPNHIwxEkKy2PfUErY9Sq2zL4ezUcNb+XjBuUdPL1/goutUtkb8Vf1p9xLiI2kYSRyMGgUskgIFlBJ4X9a54j+QzquAlG7jZp67jFWafe58vE6JubulJg48QZ5VbOvdy3ypYElrNz0TyyCvK4nHqrODgvZfpG9Sw+RO73OPbxbObD4maFlyFJCMvGw4rrz7pFehjtqZwuUVJx0/wBEe1WYYrDMb/2cMmgvaKTMRfiQO0JHTWlzirMbSl30bZJfqh+K351WNDkF7Dl7fC4iK3ehl7SPxBCs4HkzEn8Qpmko25orXy1fMqxBzR3pRZQRsSPtMEI+WR4R5KWjHwWsDFLJiW/G/wBw17FhRtrZZfGQ4i1o5I1nL8gojDN+9YW6svWvUYNNVY28AcTXpz4W4Seq7vzvf4HNpI7yuRwLH4mvVpHlc3dQHttryW5cKpcQq5KTtz0LnD6Wea+J7DXnT1sCWITS9cgprS40w2MXEqsM5tIAFilPPkEkPwDew8q1sDi8r7Oez2PNcRwLg+2pLzX3Qux+z3iNmBB8fD51stdDKjNSFcwswPs99ZnEaeanmXI0+H1FGrZ8ywVhm8Moe/D4of3T/O/uoXoy3T79JrnH6MM3ajBxGU/aU5fMakeZA+B61coPN3THx1K0lNczo+FXKgFaFNd0z2ZfePZ8WOmVWFhFxZbBiD9i9uHPw060mpaciLDvDbNiw0DJCgVbXPMk9WJ4mmNKMdDkc7wWGE+Pw0bXAdn1Bt62bLYkHnbkazsTNU6bk1eyGUJuNRNbmyO4j9tECxKGRQbqL5Swz2Kk30B1YLwqjQxdGrK0Xr08jUrYhuLzRs2rXXiZDeHaEkmIldmY5nJ4nkdPdyp25bqQjF5LaLT4AALOe8Set/zPM1PgdTpXeu3yLTIe8FsvEs3M8wB7CKOMM2rEYnGKg3TpJJvd/NfI6OkMaYWJ41WJZMNE5uTYM4AkZm4mzXufCumu9YowqOUHKTuw3eDZwjdUsZXy3ZyQF11GQX7otzGvjVCtUala7VhlLvRzMV41MqEtmfSwub25ADx148aCNSc5JXGuKSM5j277C+oDL7Wk/wBxWxHYzKi7zHG5mHGeebkPq1/rlZQPfWPxeorRguepcwMLybGeJYn/AGrHRtpAfZP0o9Aro6OYrUoyWjH7UhRYGLi9gVbxMbkD391/269Tg5KVJWMTEJqrYwmM2a2HbDTrq0idrY2tqzqLjQgZQp41q0sDDEUndtPYn+dqUu5yCdsTSzQKXEYEciv3RqbaanMeTGmYbhNPDTzqTb21t1E1eIyq9y24nw2IeEkLbprztWnHYqyip7jFJknR0sscjCzWHr8hr5nhScQlCjOS6M6nCSqRW6ujruJy2AbRCe/ppkUF5b+BjRh7a+bYCnnrx8Nfh+56rESy038D847x7VbFYmbENxlkZvIH1R7FAFesMgASMnXgBxP9cfKuONB6O9p/R9oYd29Rn7J/wSAo1/AZr+yoepKdnc6tMCmeM8VY/C4qmat9Lh26sxjj7YDVZnLAfaTRJB46IGA6qtZ8sT2WM12aSf59wNSlnpu26C9pYURu6KQUYZ0I4FTqLfKtGSs7A0554pkt1H7ki/dlNvaqN8yaweIxtVv1S/H2G09hVvnLKuBVI+CK0Rt9lY3Uj/OjRN+wK9ZwOaqRTe9tPPmYePWV25X/AMHMtjT+sp48fyr0cXrYz60XoxdijeRvDT/f8qxOJ1L1MvQ3uFU7Qc+pZhXrMNymwiYaVw2ewB58K4qmh2jtJpcNh3a7tAWikOl8tw8RbnqpZQx45DqTW7w6reDi97nmsfh1Cs7aJiPGFZCcotfgOn9GrlSKnFxfMq026dn0B43B0Oh6V5qpSlTdpI9TRrQqxvFhuzZgsgv6rd1vI8/fb40qSui3QnkqJvZ6P3hc8bQyArxRgy+w6eyppTt3kFi8N7UGbba23U7BGTUyKCo568vy8LHpWtKp3Vl5nmbNbirYL5sp5kXJHU8T7/hakxWpIy3pxxSLIPWfuj28T7tafUfIgwmGm7PaWDPSSP3F7fnWdjVmpyXgyabtJM7ht/Gdijy84opJB+LL2cY/zS/CsDhcLzlLovqaU1mlGHV/Q4h2YCFm1J0Hn1rY8DVyrI2+YPhyXZRfS9qlqwqnJ1GrvT6k5lGZh0U3+P5LTqWxm8Sjat7vo2jou08M0ezEiY3dIQzEcu0k7YJ45VfLeubvURWhFqk31HGLCxxQK0sUdoVYGV8gFlF0Bsb5jqo01V7dBmQTxGZPk9/sNpuUPZV7rYUbQ1CqXjJZkOUGzEd9tFJNwMg1vzFWVhFTndO5MK0qmjRjtpXSV78c17/5nHxIq7HWJWqq02bvYWzeywka/aYZ2821APiFsPZXl8dW7Su2tloauDjkgrlssQjGY8aqptl1NyFn0t+lNyIZZHRpWpCMwxW/DBVk00ISQ+OuRv3Y0rf4VK9NroZmLj/UTM5v1DLh5okJ7qYeJFyktYKgGosLEm50uNeNeoweJhCGWWhn1aTk7rUowkDTQDLEW7QFO1c5VLc8uhLWuNQOPSn18XBKyd7laNCWa97ISyLfK1uK6+a2B+GX41aW9+uvr5HLoe7PS88APOeIe+RBVXiLthKtv+LLGH/Uj5o6J6UNq9jg5rGzSKIFt/8AkOaTyKxxW/6leL4RS0lP3fDV/X5Gxi5apHBbXNhW1cpGn3n3cOGwuEkN7uGDeBIWRfEXVuB5hqCFWM75eTt8CWmtxHsaPNPGvVrfA0V7a9CEd02zhmBRiblkKserx9xz7cub21SUlNKa2epo0n3bPloE7pD+zC/N5P8AUevPY53ry930LdL2fXUNcdwpzh78fjExAdf+m5HgFdRyrYwdftaOu8dPdyKsodnVtyl9Qfd02llXkVVh5qWDfApVTicdIz819xkHqfbzEJFiibZGgLeIkusQ94Zf+3Wl/Ds25ZOj+T/x8zO4nBWucX2eSLmvZw3uZVRcge9yT1JP5flXm8VJyqyb6npMDHLSSLIjrVcvRYbyri0loA4iO1cVqkbBuwAWnVAbCQMjC1wbqxUEcxmC+6rOEnlqp3M3iMM1BvoLCSrXr0NrMwFZoJxsSEBwQD58+opdeFOcbTJoVKlOV1yKU1FiD0JANuF+PlrWBVoTpyaPRUsVTnBZnZmhKmaBH+0vdbxI5+0a+2qi7smjfX9fDxnzWj8bAGG4kG+nq+FySfj860cO7o8vj6eWr4PU0e7ZsFvyv8zTYaSKi2ANv4oyTnomntP8re+ivd3IZlNuTZJ43+6A3ua/5VWrK+hCdjsXpHxt4cqnSVox7FHaH2HtIz7KxsBDJSbfN/Q28HDtKjl0Vvj+yMHs3ZjYqdYE4AEseQUcSfgo8TVmpVjSjnkWsXUtHLHcXYyERzuqiyrIco/Vvdf3bU3dA0p3yyKQLuT4/MSCnUtjP4jJOqvXM2uD2ks+z2V3CyJCIWY66Io7OQjiR2YFz1R66StK6K0Jrs3FlW+u2oy4wwYmRbGQGws5UdwXAuFWw0PXmTSY0lThlRf4fVhbWWr5CQyiwPq5dQSVFrcDe/K1Crp6G3Vy1Kdp2S66fkZxYQYvFQjk6o7D9UZmcfu29tFXq9lQlLn+TzEo56kfI6VPDppXk2aULCvEYIuda5SsWoySIf8Ag4613ak9ojUT1JnGB9IOIAkWM/bge443tIgUeGjPW/wiL7OT8V9yhi9ZIT73bR7doZubwIT0zKMkg9jqa1kVFux3sV7phByWPN7WZ2PxNRzFVHuZjaWH7OeeMa5XLoOoOth+yxHmBW7h55qKl0KlRd6/X18hbCwSaM/ZEsb3/VDq1/cK7HRzYaov/wAv6DaDtOPmWel7a3aYoQj1YrsfxvYA+P1SRfGvLYGGShFetfVvcaVeWabAvRvuycXiMzj6mKxc8ieS+3n0HsoMdilh6entPb8+4KhSdSXgja+muL+zxn9Zf3My/ES/uiqfB53Uoe/18BuLhZpnP/R7hO02hAttAxY+AUE/lb21oY2eTDzfhb46CKEc1RI7XvI1kbxZZF89IpNeWmQ++s7h1XNTydPo9i+4ZZvxRTuq4MJXmjuD7WLj4MKz+IQcazfWzLFJ92w0mU+uASU71hxZbFXX2qSB45TypeDq9lVTez0YNeGaGm61EC43scSGv3FJRzb7J0v5XCsfBa3MTRdWm4rcQtLSWwP6S8eBh5FVrl3ijIB5Kryk+0Sx/Crv8N0csJ1Jetl+TOx8s04xRzTAKAjX9bgAdDrzr01CrCorwexQxFGpTklNNcyvDwhjlc5bOLka2Vj3j7LE1icQg4VG0t1f3m9w6XaYfL/xfyepo96NzzhFEsZLxEd46d08jp9g9eR86xcLjVWbjJWf1/cvXUX0X0EkXCrhdhseyR3Fdc6UMyCt2NmzNiEljQskEiyu3AWRg5W/NiBYKNdRwGtBPEU6LTk7evWpm4lXi4LUp3uwAjxc6RkFFc5T156Hlrpw5Vsy4lqrLSyuZOG4ZOdLM3Z8vFE9hLYOtu84so05a/7ms7H11WmpLZHo+DYXsKcsyTlL1+5Vs5gkuW1ibgX4Xtcc7ciNOtHSqtqzehmY+hGm7xVnf14Gmmmh7YRx2769+3DONRw+0Vvf8I60OMgrKceW5c4HiMs3Rls9V5rf4r6CTaWG7OVTya4+F/y+NdhJ3ZPHKGRRl4/ZjTYLdwWP2M3jY3I+Xwq3HV6GAthDE5Izfe7x9utGAI95h9Yv4PzNInudY3m3Nq9tDhbakQKbD77gaeJChB5i3KqFknlXrmz0mBg6OGdWX+7b6fubjdHYIwsNm/TSWaQ9Pup5D5k1gY3E9tOy9lbfkRHvPMznG9+HC4qw5ql/NR2bfGOt2jLNTT8F+RmHj3UvF/ViuaAoiX+2Qw8s2W/7pq5SacdDIxbbqu4+3FWN2ZXaPKYNVJF2fNGLai91Utb389Cm+6Lo6zSF2+W6ksuLeSKRJDJ32zMkdibrpdu96p6UMHmQNSn2bshfjd0ceRfIGjUAm0sOgA1JGe54GiyW1JlXq1EoyZu93J0w8is5FxD2ZIDMFI7xa4HevbXhYDnWfjaM60LR63LMGqaV+SsN48fM4ixLFBlW3YjN3s2l2OoS5y2BvaxFzc0H+kx7Nxvq/AD+ceZO2g82VizNHnKZA2qak5lIFm1UEX6W+dYNelGnPInf8mjTm5K9rBXY+FJshly2VqNCWcs9KCZsQrHgqqo8znavZ/w9CLw7ut5P6IxcfNqqorp9zPYVi0JW9zEc4vxyNZGA8AQh/aNX8XQVNpx2E0puW5sN32PZYdjyVh7ncVRIqczL7Tx+bEZhx6/tEj4GtTh7dn0F1oLKiGIhDBgvDiPwtxH7JPut1q7OWSEr8voJp6yXr3mXIkxmK7oJkmk7oPK50BsOCrz5AV5qco04uUtEjTUXJ2R+gN29jJhIEhj5DvHmzH1mPiT8LDlXkcRXlWqOcv8ACNqlTVONkJfSvhO0wBa2qNf2WP52q7wqWWvbqivi49wxnoYwmbEzSfciCj9tv/hV3jE2qUY9X9BOCj32+h07eHCNIvctdYy1jz+siFgb6edJ4RDNn933HYipkaYm3emy4jLwEiEEHTvpqBbrlL+4VPE6d4KXNP5P9xlOSbuufr8mtQWNqwx71RmMHskTyG8jpoEvYZe0VAJCQfWXtAw4j1ePOvZ0IKpTU3zMp1pweVcjFb7tkEGHIGeMyEkMWVgZHWMi9rKqoABy91c5SgnBPTn4lvC0oS/qNd67t4AEWHDYezaNclG9n/3ccx8FUq8qNRTh8DbqYKGKw3Z1dHvF+vp01JbsbuzYpnMOTuWVi7MoubmwsrXtb94VZ4txGjFU2+abMDh0ZYeU1JeB1jYGCljgSKfIzKMpykspUaLcsBfu2B0rx2IqRnUc6ez1Ll7oX4vcvBsxIjyH9R3UexQco9gp0eIV0t7+dg4Nrb6nsG5mEXjGW/G7ke69j7qiXEK7528kiZSlLdu3mx3FCkahUVVUaBVAAHkBwqrKTk7t6kJHNd99hWAZVt2SqjWNswN+zksOFwMp/XDaC4v6TCV1Vpp89mRRvK9KT228v2Mrstyrgk3t/RvT5rSxoYJuM05O4ZtdQrhxwuG+N67Dys0FxiinBvqvoeNLaQsPsup052AJt5gn31oyhnptHlqFbsq0anR/Ln8i+eUzyrcWXkP1eJv+KwB8LUNCj2cNd2WeIY54urppFbL7jTGR5SwUkXUIT4a38j3jTm8rdiiZ3DrZR4ae7SiWoAh3m9dD+r+dIq7nI2fosiE+IhDC6xIz+F1IVb+1gfZWPxCThSlbnp+TZhWlOhCL5afA7Cy6156w5bHKN+sPbFn7vD2kmQ2/7leiwUs1CLYygr6eP11Pd78J9TgXAsWw63Pk5b5v8adgptyqRfKX2/YyMX+o34v6ijd5AcRhlYBh20akMAQR2irqDpwNWcS7UZNck/oV4LvIR7+4Yx4t0PAKpAvcLmUFgvQZs3xrqMrwTF31a6Nguz8HnxWUDQEk6dND8aciI6pHbt2d3Imw8ckyl2a7WZmIynRQQTY92xudbmvO43G1FVlCm7JafnU1KVPNDvFc+6b5SUkjDDRQVZiPwuW7pt+qQDbQ63fT4xbSUb+PP4C3g+jNJgEIiRWUKQigheAIABA8BWLNpybReirJBGWhCuVtxpglnMfSV+kPmn8Mley/h79D/t9jDx39x/1+5mNl8W/w3+VbGP8A015lejubXYH91h/6v+o9ZDDq7mDxf6Q/iHyrVwP6fvf0RFXf3Dpf0E3/AC8/8CV3EvZQGG3Yj9GX/E8P/wBT/SkrznEv7efu/wDZGrhv1Ud7HE15M1xJ6QP+G4jyX+Nav8O/uI+/6Mq4r2GYT0K/pZ/wj51o8X/Tj5v6FbB+1I6piPWb/C/92Ko4JvL3fcLG8veZuT/iMPmv/wCs1WOLfpS931R2F9n10ZqedeZXI0P9pldv+o/+DjP42r1vDv7ePkjKn+o/NfU57t7jB/y0P+mKKp7TNrD+yv8At/7MuxP91XzH8Qqt/wDYbFb+1Xu+ptfRd/d5f8b/APhKy+K+3Hy+5hz9p+uRtH41mEI8kqEctyL13MlEHriUIt5vUl/5WX/Uw1a3Cv8Ad7vuLf60Pf8ARnJIOJrXZo0vaDdseoPwmgo7lziH6K8mULxb8VbEdjwofs39Ov4T80qWFzGeN9dqCW7JRnYOB8z8zRxAe4j3k4x/hPzFKq7nI3voP/SS/wCGf4lrD4r7EfP7Gjh/04+b+x1luNYD2LiOa+kX9JH/AIrf6cVegwH6HrqOw+7819Dzeb+57N/wh/7dNwH61bzX0kZGK9r3v6iHdz++Yf8Axh/qrVvGf28/J/QRDdCb0m/35vI/xyUOF/Rj5L6AP9SXmyrdr9PP5N/EatQIXL1yO/7M/QQ/4afwivGVvbfmbNP2EENS+YfI9apORGoJP//Z

================================
(चिनी/जपानी कार्टूनं दू दू आहेत! :-/ )

मला जपानी कार्टून मधले फक्त Beyblade आवडले सर्व सिरीज ।
यू गी ओ आणि dragonball च्या सुरवातीच्या सिरीज जरा interesting होत्या पण नंतर बारगळले …
पण का ने च्या ९० च्या दशकातील ओरिगिनल dexter, johny Bravo, KND , Centurian, मास्क , Tweety वगैरे ला तोड नाही …

Pain6's picture

15 Jan 2015 - 2:36 pm | Pain6

आणि जुना लोगो बदलण्याचा अक्षम्य अपराध विसरलात?

पिंपातला उंदीर's picture

15 Jan 2015 - 3:28 pm | पिंपातला उंदीर

सहमत

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2015 - 12:47 pm | अत्रुप्त आत्मा

आणि FTII चं मोलू ....... आणि गायब

गायब आया गायब आया किसीको हसाने आया किसीको सताने आया.. गाय्बाय्गाय्बायगाय्बाय्गाय्बाय गायबाय गायबाय..

झालस्तर.. शर्ली मॅक और जोनेथन.. चमत्कारी टेलेफोन.. हे आठवणं कठीण आहे.

पिंगू क्ले थ्रीडी तोही आठवला.

अत्रन्गि पाउस's picture

9 Jan 2015 - 12:57 pm | अत्रन्गि पाउस

अचानक थांबला ...थांबला तो थांबलाच...

थॉर माणूस's picture

9 Jan 2015 - 2:13 pm | थॉर माणूस

सकाळ मधे थांबला पण मला वाटतं त्यांनी फेसबूक वर परत चालू केले आहे चिंटू.

साबु's picture

9 Jan 2015 - 1:40 pm | साबु

हा कसा काय विसरलात? काय एक एक व्हिलन असाय्चे....

तुमचं सदस्यनाम पाहून "चाचा चौधरी" कॉमिक्स आठवलं. :)

काळा पहाड's picture

9 Jan 2015 - 2:14 pm | काळा पहाड

हीमॅन विसरले का लोक? शिवाय फ्लॅश गॉर्डनही.

नीलकांत's picture

9 Jan 2015 - 2:41 pm | नीलकांत

लहानपणी कॉमिक्स वाचायची फार आवड होती. फार पुर्वी लोकमत कॉमिक्स यायचे त्यावेळी त्याचा दर्जा खुपच छान होता.विशेष म्हणजे रामायण, महाभारत, शिवाजी महाराज, येशू, रविन्द्रनाथ टागोर आणि अश्याच अनेक मोठ्या लोकांबाबत त्याच कॉमिक्स मध्ये वाचलेलं आठवतं सोबत, हेन्री , फॅन्टम आदी होतेच तसेच लोकमत कॉमिक्सचा रोबो अमिताब आणि पिंकी सुध्दा प्रसिध्द होते.

पुढे राज कॉमिक्सच्या दुनियेत मी ठार वेडा झालो होतो. त्यातही सुपर कमांडो ध्रुव माझा आवडता. त्याचे कुठल्याही समस्येवर बुध्दीचातुर्याने मात करने आवडायचे.... एखादे संकट समोर आल्यावर त्याच्या बाबत विचार करत असतानाच नेहमीची.... एक मिनीट.... असे म्हणून मग त्यावर उत्तर त्याला सुचायचे. अनुपम सिन्हाचे हे पात्र होते. तसेच विठ्ठ्ल कांबळे नावाचा मराठी मानुस त्याचे इकींग करायचा.
राज कॉमिक्सचे अन्य हिरो सुध्दा मस्तच होते. नागराज, डोगा, परमाणु, तिरंगा, शक्ती, भोकाल, तुरीन, अतिक्रुर, भेडीया, आदी तसेच उल्लेख करावाच लागेल असे पात्र म्हणजे बांकेलाल...
याशिवाय डायमंड कॉमिक्सचे चाचा चौधरी, साबु, पिंकी आदी होते. एक खुप आधी डिटेक्टीव्ह राम रहीम होते. लोट पोट होते तसेच तुलसी कॉमिक्सचे तौसी आठवते. हवालदार बहादुर सुध्दा आठवते.
ह्या कॉमिक्सच्या जगात काहीही होऊ शकतं. आणि नावं तर इतकी भन्नाट असतात की काय सांगावं? नागराज और थोडांगा की जंग, ध्रुव और बौना वामन, डोगाचे चाचा असेच, अदरक चाचा, हल्दी चाचा, कालीमिर्च चाचा.... आदी.

वर लिहीलेला लेख खुप आवडला हे वेगळे सांगायला नको.... अप्रतिम आणि मनाला स्पर्श करून गेलेला लेख.

- नीलकांत

पिंपातला उंदीर's picture

9 Jan 2015 - 3:29 pm | पिंपातला उंदीर

नीलकांत आपले कॉमिक्स गोत्र एकाच आहे . लोकमत कॉमिक्स ची आठवण ताजी करून दिल्याबद्दल धन्यवाद .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jan 2015 - 2:54 am | निनाद मुक्काम प...

नागराज चे काबुकी का खजाना , जादुगार शकुरा.
अशी अनेक नावे होती. तौसी माझे विशेष लाडके होते त्याचा जी ९ नावाचा खलनायक जो मेल्यावर परत जन्म घेतो व अधिक शक्तिमान होतो. असाच उल्लेख करावा लागेल तावूजी चा
ठकठक मधील बन्या पण झकास असायचा.
ध्रुव ची बहिण चंडिका ध्रुव चे एक कॉमिक्स मस्त होते
मैने मारा ध्रुव को
ह्यात ध्रुव चे सर्व खलनायक आळीपाळीने येउन त्यांनीच ध्रुव ला कसे मारले हे सांगत असतात कारण ध्रुव ला ज्याने मारले त्यास मोठे बक्षिसच ठेवले असायचे

विठ्ठ्ल कांबळे नावाचा मराठी मानुस त्याचे इकींग करायचा.

मालकांचे नॉलेज लैच जब्रा. ईंकींग बिंकिंग सारखे आमचे शब्द अन ते करणारा माणूस पण लक्षातेय म्हणजे पक्का कॉमिक्सवेडा. लोकमत टाइम्सातला फ्लॅश गार्डन पण भारी असायचा.
बाकी वेताळ, मँड्रेक, स्पायडरम्यान, रिप किर्बी ह्या कॉमिक्साने तर चित्रांची गोडी लागली. निम्मी अ‍ॅनॉटॉमी ली फाक अन सी बेरीची चित्रे पाहुन पक्की झाली होती. त्यांचे मसल्स वगैरे काढायची अन ती फ्लॅट रंगात दाखवायची स्टाईल मी जशीच्या तशी उचलली होती. ड्रॉईंग कॉलेजाचा मास्तर पण म्हणायचा तुझे स्केचेस इथले दिसत नैत. ;)
दिसणार कशी म्हणा. स्केचेस महाद्वारात बसून केलेली. माणसे दिसायची युरोपातली.
लै उपकार आहेत पण या कॉमिक्सचे. बालपण श्रीमंत तर केलेच. अजून त्यावर खातोय. :)

पिंपातला उंदीर's picture

15 Jan 2015 - 8:44 pm | पिंपातला उंदीर

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

सविता००१'s picture

9 Jan 2015 - 3:02 pm | सविता००१

या वरच्या कार्टून्सशिवाय मला पिंगू, थॉमस द इंजिन, ऑसवल्ड, हे पण आवडतात

टॉम & जेरी, डक टेल्स, विन्नी द पूह, अजून काही तर आठवत पण नाहीत. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी साडेपाच ते सात रिमोट आमच्या ताब्यात. झी टिव्हीवर तेव्हा डक टेल्स, विन्नी द पूह,अल्लादिन वैगरे टेलिकास्ट व्हायचं. पुढे कार्टून नेटवर्क वरचा मास्क, स्कूबी डु.....काय काय आठवायला लावलं ह्या लेखाने. आता यातले एक तरी डाऊनलोड करुन बघणे आले.

मास्क आणि इतर काही कार्टून्सचे वैशिष्ट्य म्हणजे ती निव्वळ डब न करता त्याचे एकदम भारतीयीकरण करून टाकले होते. Stanley Ipkiss चे सचिन सबनीस, somebody stop me चे रोक सको तो रोक लो तर खलनायकांची नावे पाणीपुरी, मिसेस पनीरवाली वगैरे औरच!

पिंपातला उंदीर's picture

15 Jan 2015 - 3:29 pm | पिंपातला उंदीर

ही एक नवीन माहिती मिळालि

अनुप ढेरे's picture

15 Jan 2015 - 4:19 pm | अनुप ढेरे

'डॉयल'च गोयल, केलवे'च केळकर
मस्तं होतं ते डबींग

पिंपातला उंदीर's picture

9 Jan 2015 - 3:25 pm | पिंपातला उंदीर

अजून एक म्हणजे चाचा चौधरी कॉमिक्स मध्ये वापरले जाणारे तकिया कलाम . उदा . चाचा चौधरी का दिमाग कम्प्युटर से भी तेज चलता है . जब साबु को गुस्सा आता है तब ज्युपिटर ग्रह पे कोई ज्वालामुखी फ़टत है . तो ज्युपिटर ग्रहावरून आलेला साबु पण भारी होता . पीके आणि कोई मिल गया च्या अगोदर एलिएन इथे अवतरला होता

पदम's picture

9 Jan 2015 - 3:43 pm | पदम

फास्टर फेणे राहिलच कि

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jan 2015 - 5:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मलासुद्धा अजुनही कार्टुन्स आणि अ‍ॅनिम्स पहायला आवडतं. झॅक असतात.

(टॉम अँड जेरी, स्कुबी, नारुटो आणि ब्लीचचा पंखा) अनिरुद्ध :)

मी शाळेत असताना भरपूर कॉमिक्स वाचायचो व जमवायचो देखील. ४०-५० तर सहज असतील माझ्याकडे पण १०वी ला अभ्यासाच्या पुस्तकात कॉमिक्स ठेवून(लपवून) वाचताना आईने पकडलं व रागाच्या भरात घरातील होती नव्हती तेव्हढी सगळी कॉमिक्स आईने जाळून टाकली. :(

आम्ही मित्र स्वत:ची कॉमिक्स शाळेत आणायचो व एकमेकांबरोबर अदलाबदली करायचो. त्यातपण शाळेत तास चालू असताना दुसर्‍याचं बदलून घेतलेलं कॉमिक्स भरभर वाचून तिसर्‍याबरोबर बदलून ते घरी घेऊन जायचो. मस्त दिवस होते ते.

कार्टुन नेटवर्क तसं आमच्याकडे फार उशीरा आलं पण डीडी२ वर रविवारी सकाळी लागणारी कार्टून्स न चुकता नियमितपणे पाहीली जात असत. माझ्या दोन्ही बहिणींना "जाईंट रॉबर्ट" तर मला "हि-मॅन" खुप आवडायचा.

एवढंच काय, मला छोट्या गाड्या जमवायचा देखील जाम शौक आहे. बर्‍याच जमवल्या होत्या पण भाच्यांनी खेळायला घेतल्यानंतर बर्‍याच तुटल्या देखील. आता मुलाच्या हातात उरलेल्या गाड्या आल्यातर त्यांचीपण तीच अवस्था होईल असं वाटतंय.

धन्यवाद, तुमच्या धाग्याच्या निमित्तानं बर्‍याच जुन्या आठवणी जागा झाल्या.

हाडक्या's picture

9 Jan 2015 - 5:33 pm | हाडक्या

आधी वाटले charlie hebdo च्या बद्दल काही आहे की काय.. पण मग वाचून जीव भांड्यात पडला.. सुंदर लिहिलंय.
आमच्या गावी असली मासिके मिळायचीच नाहीत तेव्हा शहरातल्या भावंडांचा मत्सर वाटायचा खूप .. कार्टून्स मात्र पाहिली खूप. टॉम न जेरी, डक टेल्स तर अजूनही पाहतो.

(नंतर कॉलेजला शहरात आल्यावर मचाक आणि कॉमिक्स एकाच वेळी हातात आले तेव्हा ही कॉमिक्स आधी का भेटली नाहीत म्हणून भरपूर वाईट वाटल्याचं आठवतंय. )

टवाळ कार्टा's picture

9 Jan 2015 - 8:13 pm | टवाळ कार्टा

नंतर कॉलेजला शहरात आल्यावर मचाक आणि कॉमिक्स एकाच वेळी हातात आले =>> =))

ब़जरबट्टू's picture

15 Jan 2015 - 4:37 pm | ब़जरबट्टू

:)) :) :))

डकटेल्स..चा अंकल स्क्रुज..टेलस्पीन..चा बल्लु.मोगली.आवडते..कॅरेक्टर..
कॉमीक्स फारसे मिळायचे नाय.
चांदोबा,चंपक,चाचा चौधरी या पलीकडे गेलो नाही.

नित्य नुतन's picture

9 Jan 2015 - 5:53 pm | नित्य नुतन

ठकठक !!!... इथूनच वाचनाची सुरुवात झाली ..

प्रत्येक महिन्याचे ठकठक आणि चांदोबा वाचल्याशिवाय महिना चालू झालाय असे वाटायचेच नाही

नित्य नुतन's picture

9 Jan 2015 - 5:53 pm | नित्य नुतन

ठकठक !!!... इथूनच वाचनाची सुरुवात झाली ..

प्रत्येक महिन्याचे ठकठक आणि चांदोबा वाचल्याशिवाय महिना चालू झालाय असे वाटायचेच नाही

माध्यमिक शाळेत असताना कॉमिक्स वाचून खुळावलो होतो. तेव्ह वाटायचं की जेव्हा नोकरी लागेल, तेव्हा महिन्याला भरपूर कॉमिक्स विकत घेईन. आणि आता तर वाचायला पण वेळ मिळाला तरी पुष्कळ वाटते. चुपके चुपके कंपनीतच ४-५ जीबी कॉमिक्स डाऊनलोड करुन ठेवलेत. निवांत वेळ मिळाला की वाचतो आणि बालपण आठवतो..

पामर's picture

9 Jan 2015 - 6:18 pm | पामर

चांदोबा! त्यातल्या गोष्टी,त्यातली चित्र केवळ अप्रतीम! रामायण्,महाभारत्,देवीभागवत्,अनेक भारतीय रोमन,ग्रीक ऐतिहासीक पौराणीक कथा आणि सर्वात आवडणारे म्हणजे विक्रम्-वेताळ! केवळ त्यातील चित्रांसाठी मी अनेक वेळा ते मासिक घेतलेले आहे..कार्टून म्ह्णाल तर सगळी बघायची हा नेमच होता सगळीच अवडायची..त्यापैकी डिस्ने,वार्नेर ब्रदर्स ची जास्त आवडायची.सध्या मात्र छोटा भीम्/क्रिश्ना/ओग्गी झुरळ्/हागेमारु/शिन्चान्/डोरेमॉन वगैरे कल्पनादारिद्री दळीद्री आणि कमीदर्जाची उत्पादन्मुल्य असलेली कार्टूनस बघितली की ह्य पिढीची कीव येते...बिच्चारे हिमेश रेश्मिया ला रफी समजतात...

सध्या मात्र छोटा भीम्/क्रिश्ना/ओग्गी झुरळ्/हागेमारु/शिन्चान्/डोरेमॉन वगैरे कल्पनादारिद्री दळीद्री आणि कमीदर्जाची उत्पादन्मुल्य असलेली कार्टूनस बघितली की ह्य पिढीची कीव येते..

माझ्या दोन्ही भाच्यांना हि असली फालतू कार्टून्स भरपूर आवडतात; तेच नाही त्यांच्या समवयस्क सगळ्याच मुलांना. खायचं-प्यायचं सोडून फक्त कार्टून्स बघतात. रागानं टिवी बंद केलात तर मग हातात मोबाईल घेवून गेम खेळत बसतात. कठीण आहे.

आदूबाळ's picture

9 Jan 2015 - 8:02 pm | आदूबाळ

ओग्गी झुरळ्

त्या ओग्गीला शाहरूख खानचा आवाज दिलेला आहे हे इतकं महाप्रचंड डोक्यात जातं ना...

काळा पहाड's picture

9 Jan 2015 - 6:35 pm | काळा पहाड

+१.

जेपी's picture

9 Jan 2015 - 6:42 pm | जेपी

+2
(अश्याच भाच्याने पिडीत)जेपी

पिंपातला उंदीर's picture

10 Jan 2015 - 9:15 am | पिंपातला उंदीर

+३

जेपी's picture

9 Jan 2015 - 7:10 pm | जेपी

हाफ शेंच्युरी निमीत्त श्री.धागाकर्ते आणी श्री.गवी यांचा सत्कार एक-एक मिकी माऊस देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

हाडक्या's picture

9 Jan 2015 - 7:53 pm | हाडक्या

आमच्या शेजारची २-३ वर्षाची पोरगी तर टॅबवर युट्युब वापरायला शिकलीये. मग, मलेशियन, रशियन आणि इतर पण कार्टून्स युट्युबच्या "recommended" यादीत येतात ते पण बघत बसतेय. आता गम्मत अशी झालीये की तिला तेच कार्टून्स हवे असतात आणि ती त्याच भाषांमधले त्यांचे डायलॉग बडबडत असते.
एकाच वेळेस कौतुक आणि काळजी वाटते या नव्या पिढीची..

इंग्रजी कळत नसूनसुद्धा 'फ्रॅजाईल रॉक' हा माझा आवडता प्रोग्रॅम होता. त्यातली गाणी ऐकायला मस्त वाटायची तेव्हा. आजच्या एवढा चॉईस नव्हता तेव्हा. स्पायडर-मॅन, ही-मॅन हे सगळ्यात आवडते... बसल्या बसल्या उगाच स्पायडर-मॅन सारखं जाळं टाकण्याची अ‍ॅक्शन करायचो.

हाडक्या's picture

9 Jan 2015 - 10:59 pm | हाडक्या

बसल्या बसल्या उगाच स्पायडर-मॅन सारखं जाळं टाकण्याची अ‍ॅक्शन करायचो.

ह्या ह्या ह्या..
आमी अजून पण करतो हे.
बायकोने काही मागितले की त्या वस्तूच्या दिशेने ही अ‍ॅक्शन करायची(तोंडाने वेबचा आवाज करायचा) आणि "आत्ता वेब चालत नाहीये, चालू झाल्यावर देतो" म्हणून जागेवरून हलायचं नाही (अर्थात "अंतिम चेतावनी" पर्यंतच हा ) ..
हा आमचा फेवरिट उद्योग .. ;)

डेक्सटर आणि स्वॅाट कॅटचे कोणी पंखे नाहीत का येथे?

टवाळ कार्टा's picture

9 Jan 2015 - 11:33 pm | टवाळ कार्टा

बडे मियां - छोटे मियां आणि त्यांच्या महाबिल्ला शहरातल्या करामातींचा मी पंखा आहे :)

काळा पहाड's picture

9 Jan 2015 - 11:41 pm | काळा पहाड

खरं सांगू का? स्वॉट कॅट विसरलोच होतो. सध्या कुठल्या चॅनेल्वर चालू आहेत का? नाही तर डाऊन्लोड करावे म्हण्तो.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2015 - 12:02 am | अत्रुप्त आत्मा

मेगा कॅट सिटी.... वाय..पर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!

छोटे म्यांऊ...वो तुम्हारे पिछे आ रहा है...

देख रहा हूं....बूम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.... दे मारा.......

बोका-ए-आझम's picture

10 Jan 2015 - 12:04 am | बोका-ए-आझम

टिंकल नावाच्या मुलांसाठीच्या मासिकात ' शिकारी शम्भू ' आणि सुप्पन्दी नावाची दोन कार्टून्स असायची. शम्भूची टोपी त्याच्या डोक्यावर इतकी दाबलेली असायची की त्याचे डोळे दिसायचेच नाहीत आणि सुप्पन्दी म्हणजे पेप्सीचा फिडो डिडो!

स्पंदना's picture

10 Jan 2015 - 9:25 am | स्पंदना

हा घ्या सुपन्डी !!

पिंपातला उंदीर's picture

10 Jan 2015 - 9:19 am | पिंपातला उंदीर

ट्विंकल पण भारी होत . शिकारी शंभू लई कॉमेडी होता . त्याच्यावर चित्रपट येणार अस वाचल होत . त्याबरोबर बहादूर नावच ऐक डितेक्तिव पात्र पण होत .

स्पंदना's picture

10 Jan 2015 - 9:26 am | स्पंदना

अगदी सुपर्ब लिहीलयं!!
कार्टुन्स नी हे जग अतिशय सुंन्दर बनवलं अस आजही माझं मत आहे.

इरसाल's picture

10 Jan 2015 - 10:07 am | इरसाल

आवरा होवुन्शिनी कोनालाच कुमार नाय आठोलं <

पिंपातला उंदीर's picture

10 Jan 2015 - 6:51 pm | पिंपातला उंदीर

प्रतिसादा साठि सर्वाना धन्य्वाद

डोनाल्ड डक च्या पंख्यान्नी हे जरूर वाचा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Jan 2015 - 11:11 pm | निनाद मुक्काम प...

लेख मनाला भावला.
लेखक फक्त राज कॉमिक्स वाचायचा असे वाटते . आमच्यात कधीही हिरो वरून भांडण झाली नाही पण ध्रुव मला नागराज पेक्ष्या जरा कमीच शक्तिशाली वाटायचा , कॉमिक्स म्हटले कि राज प्रकाशन सोबत डायमंड च्या उल्लेख अपरिहार्य आहे
चाचा चौधरी , बिल्लू पिंकी अशी त्यांची गाजलेली अनेक नायक
आता आठवते ५ वी पासून हि कॉमिक्स हिंदीत वाचून माझे हिंदी बोलणे इतर मुलांच्या पेक्ष्या जास्त सफाईदार झाले होते
उदा चाचा चौधरी का मस्तिष्क कम्प्युटर से तेज चलता हे अशी वाक्ये वाचून अनेक दुर्बोध हिंदी शब्द सहजरीत्या आत्मसात होत गेले.
ह्या कॉमिक्स ची हॉरर सिरीज सुद्धा यायची.
रेल्वे च्या बुक स्टोल व स्टेशन बाहेरील पेपर च्या स्टोल वर आम्ही कॉमिक्स प्रिय मंडळी लक्ष ठेवून असायचो ,आपल्या नायकाचे नवे पुस्तक कधी येणार ह्याची आतुरतेने वाट पाहायचो
आमच्या ह्या आवडीला निकृष्ट दर्जा तत्कालीन वडीलधार्या व शिक्षक मंडळींनी दिला होता.
आताचे पालक मुलांना दुकाना बाहेर रांगा लावून हेरी पोटर घेऊन देतात तेव्हा त्यांचे कौतुकवजा हेवा वाटतो ,
मराठीत ठक ठक चा दिपू दि ग्रेट व चंपक मधील चंपू ससा
चांदोबा मधील विक्रम वेताळ दर महिन्याला आवडीने वाचायचो
कितीतरी वेळा मित्रांच्या कडून पुस्तकांची आदला बदली व्हायची.
रद्दीच्या दुकानात तासंतास पडीक राहून एखादे दुर्मीळ बालसाहित्य शोधून स्वस्तात विकत घ्यायचे व त्यासाठी सुट्टीच्या काळात शहरातील रद्दीची दुकाने सायकल वरून पालथी घालण्यात भारी मौज वाटायची ,
ह्या लेखाने सर्व आठवणी ताज्या झाल्या.

सिन्दबाद जहाजी मधले "डोले रे डोले डोले डोले रे , बोले रे बोले बोले बोले रे , अगर मगर डोले नैया , इधर उधर जाये रे पानी , निला समुन्दर है , आकाश प्यासी , डुबे ना डुबे ना मेरा जहाजी " हे गाणे मस्तच आवडले .
दानू दानासुर मधले "दानु है दानु इतनासा जानु , छिपकली के नाना है , छिपकली के है हुजुर ,दानासुर , दानासुर दानासुर " हेही गाणे मस्तच आवडले . गुलजार यांनी सिन्दबाद , दानू दानासुर , जंगलबूक मधली शिर्षक गीते लहान मुलांकडून गाउन घेतली . त्यामुळे ती मजेदार वाटतात .
अलादीनचे डबिंग सुमित राघवनने केले होते त्यामुळेही व एकुणच अलादीन मालिका आवडायची .
"एक , दोन , तीन , चार " , सिग्मा , फेअरी टेल्स थिएटर , इन्द्रधनुष याही मालिका आवडल्या .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jan 2015 - 4:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपल्याकडे चाचा चौधरींवर चित्रपट बनला तर चाचा चौधरींची भुमिका ओम पुरी ह्यांनी तर साबुची भुमिका खलीनी करावी असं मनात वाटुन जातं.

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2015 - 4:25 pm | पिंपातला उंदीर

कल्पना भारी आहे . मला एकूण अंगकाठी आणि विनोदाचा सेन्स पाहता राजपाल यादव जास्त योग्य वाटतो

स्वच्छंदी_मनोज's picture

12 Jan 2015 - 8:30 pm | स्वच्छंदी_मनोज

लेखाने आणी प्रतीसादात उल्लेखलेल्या सर्वांमुळे हळवा झालो.. ह्या कार्टुन्सनी बालपण समृद्ध केल होतं.. त्यावेळी ह्यांच जग खरं वाटायचं आणी आता ह्यांच्या सारखं जग असाव असं वाटत.

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2015 - 8:35 pm | पिंपातला उंदीर

@मनोज - शेम हिअर

चौकटराजा's picture

12 Jan 2015 - 9:00 pm | चौकटराजा

१९६० ते १९६६ हा साधारण काळ हे सगळं हाताळण्याचा. त्याकाळी चांदोबा लोकप्रिय होता. पण त्याला चित्रकथा म्हणता
येईल. पण मला इंद्रजाल कॉमिक्सच्या पुस्तकानी वेड लावले. मॅड्रेक,लोथार, वेताळ डायना, डेंकाली ई नावे अजूनही स्मरणात आहेत. पुढे या प्रकाराचा प्रसार खूप म्हंणजे खूप झाला. पण अर्नाळकर मग काकोडकर ( राजाराज राजे कथा) ..जेम्स हॅडले चेस असा प्रवास सुरू झाल्याने चित्ररूप नायक मागे पडले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jan 2015 - 4:46 pm | निनाद मुक्काम प...

एक दोन तीन चार
चे शीर्षक गीत
आणि हा एक पूर्ण भाग
सुमीत चा फास्टर फेणे पण खासच