चारोळ्या

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जे न देखे रवी...
10 Dec 2014 - 3:55 pm

मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता.

बाटली रिकामी
ग्लास घरंगळलेला,
टेबलावरचा थेंब
केव्हाचाच सुकलेला.

ढग विखुरलेले
पाऊस थांबलेला,
कुंदाळ हवेत
मी गारठलेला.

काडी काडी करुन
तिनं घरटं बांधलं,
वाराही वहायचा थांबला
त्यानेही ते जाणलं.

कविताचारोळ्या

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

10 Dec 2014 - 4:31 pm | प्रचेतस

चारोळ्या छान.
पण ह्याला हायकू म्हणता येणार नाही. ते तीनच ओळींचं असतं म्हणे.

यसवायजी's picture

10 Dec 2014 - 7:14 pm | यसवायजी

काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं,
वाराही वहायचा थांबला
त्यानेही ते जाणलं.

असं चालेल का? :D

प्रचेतस's picture

10 Dec 2014 - 7:17 pm | प्रचेतस

चालायला पाहीजे.

पिवळा डांबिस's picture

10 Dec 2014 - 11:29 pm | पिवळा डांबिस

टेक्निकली बरोबर आहे. पण शेवटची ओळ ही अगदी लहान आणि पंचलाईन असावी.
उदा.
"काडी काडी करून घरटं बांधलं,
मेहनत तिची जाणून थांबला
वाहता वारा."
अस काहीसं, पटतं का बघा...
:)

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 4:34 pm | टवाळ कार्टा

एक एक करून
त्याने जिल्ब्या पाडल्या
आलेच नाही कोणी
प्रतिसाद घेऊन

जमलंय का? :)

सूड's picture

10 Dec 2014 - 7:05 pm | सूड

एकेक करुन त्याने
जिल्ब्या पाडल्या दणकून
गेलेच नाही कोणी
प्रतिसाद तिथे लिहून!! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2014 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादाच्या जिल्ब्या
टाकल्याच पाहिजेत
प्रत्येक धाग्यावर.
म्हणुन मौन माझं.

छ्या. जमलं नै वाटतं. ;)

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 8:40 pm | टवाळ कार्टा

आवडेश :)

प्रमोद देर्देकर's picture

10 Dec 2014 - 4:39 pm | प्रमोद देर्देकर

होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे या चारोळ्याच जर जमलं तर या धाग्यातुन हायकु हा शब्दच काढुन टाका ना अगदी शिर्षकासकट आणि चारोळ्या ठेवा.

@ ट. का. तु आलास की माझ्यासाठी प्रतिसादाला खीक :))

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 4:40 pm | टवाळ कार्टा

ते मी अभिप्राय घ्यायला आलोय :P

अत्रुप्त आत्मा's picture

10 Dec 2014 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा

धरला मी तांब्या
टाकलं त्यात पीठ
खाली वाकून पाहिलं
जिलबी पडली नीट!

सूड's picture

10 Dec 2014 - 8:15 pm | सूड

खाली वाकून पाहिलं
जिलबी पडली नीट!

yukk!! *bad*

प्यारे१'s picture

10 Dec 2014 - 8:29 pm | प्यारे१

=))
बुवांच्याकडे किती तांबे (तांब्याचं अनेकवचन) आहेत?

बाकी ते सुनिल शेट्टीचं गाणं हाय्हुकू हायहुक्कू हाय हाय चा नि हायकूचा काही संबंध आहे का?

खटपट्या's picture

10 Dec 2014 - 10:59 pm | खटपट्या

हान्गाशी !!
याला म्हणतात दणकट चारोळी. यासाठीच आम्ही बुवांचा फॅन आहोत.

सतिश गावडे's picture

10 Dec 2014 - 11:31 pm | सतिश गावडे

आमचे एक दणकट मित्रसुद्धा बुवांच्या "अशा" चारोळ्यांचे फॅन आहेत.

खटपट्या's picture

10 Dec 2014 - 11:40 pm | खटपट्या

अंदाज आला "दणकट मीत्राचा". चारोळी वाचली की हसुनहसून पोट "साफ" झालं पाहीजे.

प्रचेतस's picture

11 Dec 2014 - 9:03 am | प्रचेतस

+१
ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या.
आम्ही बुवांचे फ्यान काही उगाच नाही.
येऊ द्यात बुवा अजून.

खटपट्या's picture

11 Dec 2014 - 9:28 am | खटपट्या

ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या.

मला तर त्यांच्या चारोळ्यांचा खूप गुण आलाय.

प्रमोद देर्देकर's picture

11 Dec 2014 - 10:00 am | प्रमोद देर्देकर

हो हो वल्लीशेट आताशा मला समजयल लागलंय तुम्हे जे वास्तववादी आणि प्रत्ययकारी वगैरे कायसं म्हणताय ते.
काय तो निरागसपणा खाली वाकुन पहाण्यातला आणि काय तो वास्तववादीपणा/ प्रत्ययीपणा जिलबी नीट पडेल याचा
आमचं गुर्जी लईच भारी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Dec 2014 - 11:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

धरला मी तांब्या
टाकलं त्यात पीठ
खाली वाकून पाहिलं
जिलबी पडली नीट !

हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? ;)

मुक्त विहारि's picture

10 Dec 2014 - 11:55 pm | मुक्त विहारि

एक नंबर

खटपट्या's picture

11 Dec 2014 - 12:18 am | खटपट्या

एकदम सुपडा साफ :)

सतिश गावडे's picture

11 Dec 2014 - 12:33 am | सतिश गावडे

खतरनाक कन्व्हर्शन. *lol*

प्रचेतस's picture

11 Dec 2014 - 9:03 am | प्रचेतस

अगागागागा =))
खल्लास की ओ एकदम.

आरं कुट नेउन ठिवलाय ह्यो धागा? ऑ?

धागा परसदारी सापडेल अपर्णा ^_~
चारोळी ते हायकु-तांब्याचा एक प्रवास यावर डाॅक्टरेट का देऊ नये,मिपा विद्यापिठाची?
=))

किंवा साहित्यांगण ते परसदारही चालेल *lol*

सस्नेह's picture

11 Dec 2014 - 7:24 am | सस्नेह

राॅकेल प्यालो डिझेल प्यालो
तेव्हा नाही मेलो
अर्धी बाटली दारू प्यालो चंद्रावर गेलो...

मुक्त विहारि's picture

11 Dec 2014 - 11:01 am | मुक्त विहारि

खतरनाक....

प्रमोद देर्देकर's picture

11 Dec 2014 - 8:53 am | प्रमोद देर्देकर

अगागा अया अया धाग्याचं पार भरीत करुन टाकलंय की! हसुन हसुन वाट लागली.
आणि काय वो गुर्जी काय हे असं शिष्याच्या धाग्याचं भरीत करतांव, मग बघा हं ते दक्षिणा म्हणुन.......हॅ.. हॅ.. .हॅ..

आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय!

बरं आता ट.का ची चारोळी अशी होवु शकेल.
"त्याने जिल्ब्या पाडल्या
एकेक करुन
कोणीच नाही आलं
प्रतिसाद घेऊन"

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2014 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा

@वल्ली
ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या.
आम्ही बुवांचे फ्यान काही उगाच नाही.>>> :-/ कळ्ळं..कळ्ळं..! :-/

दबा धरुन बसतो हत्ती
दिसली तोफ की देतो बत्ती!

अता मी या कविता लिवणार नै
बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif
================================
इस्पीकचा एक्का
@हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif
================================
अजया
@चारोळी ते हायकु-तांब्याचा एक प्रवास यावर डाॅक्टरेट का देऊ नये,मिपा विद्यापिठाची? >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing019.gif
=================================
@आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय!>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing018.gif ह्या ह्या ह्या http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing018.gif
=====================================
एक तांब्या वरती आला
नि दर्दुकाकांचा धागा
हाय ज्याक झाला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

सतिश गावडे's picture

11 Dec 2014 - 11:15 pm | सतिश गावडे

बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!!
बुवांच्या घरची उलटीच खुण बत्तीला तोफ ते नै देणार !!!!

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2014 - 11:22 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

प्रचेतस's picture

12 Dec 2014 - 6:07 am | प्रचेतस

असं नका करू ओ बुवा. आम्हा रसिकांवर हां घोर अन्याय आहे.
मला तुमच्या ह्या कविता आणि चारोळ्य़ा खूप खूप आवडतात. तेव्हा न लिहिण्याचा निर्णय मागे घ्यावा ही विनंती.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2014 - 7:20 am | अत्रुप्त आत्मा

असोच्च असो! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt016.gif

खटपट्या's picture

12 Dec 2014 - 8:36 am | खटपट्या

+१११
मी ही सॉरी,

सतिश गावडे's picture

12 Dec 2014 - 8:37 am | सतिश गावडे

हेच आणि असेच म्हणतो.

भाते's picture

11 Dec 2014 - 8:08 pm | भाते

धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे
धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे.
.….

अन लेख टंकाळलाया नवी लेखनिक पाहिजे आहे.

अरे, बोलवा नवी…
(जाऊदे, मिपाकर पुढचे समजुन घेतील!) :)

सतिश गावडे's picture

12 Dec 2014 - 8:42 am | सतिश गावडे

तुझ्यापासून दूर होऊन
अमाप काळ लोटला
पोट हलकं नाही झालयं
पण सहन करण्याची ताकद वाढलीये..
बस्स इतकेच..
----
आता दारावरचं टमरेल रिकामंच दिसतंय
तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं
फक्त एक हलकिशी कळ आली काल पोटात
जेव्हा ह्ळूच आतल्या आत पीठ पडले
बस्स इतकेच..
----
परवा संडासाच्या भिंती चाचपडताना
भिंतीवरच्या रेघोट्या हाताला जाणवल्या
छन्न झालं एकदम
पूर्वी कसे छान कुंथत होतो
अता कुंथूनही न होईलसे वाटले
बस्स इतकेच..
----
तिथेच बाजूला भिंतीवरचे चित्र सापडले
उघडेनागडे काढलेले
लवकर करा
नाहीतर चड्डीतच होईल असे त्याखाली लिहिलेले.
बघता बघता कां कोण जाणे
पोटच डचमळले पटकन
बस्स इतकेच..
----
तुझी आठवण आजही येते
अगदी नित्यनेमाने
पोटात गुरगुर होते
ग्यासेस वाढतात
बस्स इतकेच..

मग मी हापिसच्या कमोडमध्ये जातो
पण चाळीतल्या संडासाची सर आजही येत नाही
बस्स इतकेच..
----
हम्म.. पोट हलकं नाही झालयं
पण सहन करण्याची ताकद वाढलीये..
बस्स इतकेच.. इतकेच...

खटपट्या's picture

12 Dec 2014 - 8:50 am | खटपट्या

कहर !!Facebook smileys
गुरुपेक्षा शिष्य सवाई !!

नाखु's picture

12 Dec 2014 - 9:21 am | नाखु

प्रवास "ज्ञान" मिळेपर्यंत असाच चालू राहू दे.
हा.मु.ओसाडवाडी खु:
ता:मुरमाड
जि:फलाणा

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Dec 2014 - 10:21 am | ज्ञानोबाचे पैजार

विडंबन आवडले,

पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2014 - 10:24 am | टवाळ कार्टा

अय्यय्यो..... लैच हुच्च \m/

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2014 - 11:16 am | अत्रुप्त आत्मा

अ चांगला नीट ज्ञात असताना...
असे आपणच म्हणू शकता, हे आज उलगडले! :P

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2014 - 11:18 am | अत्रुप्त आत्मा

नाव घ्यायला लाजू नका.. स. गा. :-D
घ्या ना नाव!!!! =))

विटेकर's picture

12 Dec 2014 - 11:23 am | विटेकर

आचरट आणि शिवराळ
प्रतिसादांची लांब माळ
तांब्या आणि रिकामा माळ
साफ करी पोटातला खळाळ ...
.
.
.
.
छ्या ... वाण नाही पण गुण लागलाच !

सतिश गावडे's picture

12 Dec 2014 - 11:58 am | सतिश गावडे

तांब्या आणि रिकामा माळ
साफ करी पोटातला खळाळ ...

हा अनुभव मी वर्ष घेतला आहे. मात्र तांब्याच्या ऐवजी टमरेल असायचं.

पुढे कामानिमित्त गाव सोडले तरी विकांताला गावी जात असल्याने आठवडयातून दोन दिवस मोकळ्या माळरानावर मोकळे व्हायचा अनुभव घेत असे.

पुढे दीड वर्ष हिरव्या नोटांच्या देशात काढून परत आल्यावर मात्र उघडयावर बसताना अवघडल्यासारखे वाटू लागले आणि लागलीच गावी शौचालय बांधले.

मदनबाण's picture

12 Dec 2014 - 2:26 pm | मदनबाण
दिपक विठ्ठल ठुबे's picture

19 Dec 2014 - 11:13 am | दिपक विठ्ठल ठुबे

चारोळी ची पार आरोळी करून टाकली...

पैसा's picture

19 Dec 2014 - 12:09 pm | पैसा

अरे नसलेल्या देवा! पीत वाङ्मय ते हेच का?

इतिहासात अगोदर अश्मयुग, मग ताम्रपाषाणयुग, मग लोहयुग इ.इ. टप्पे सांगतात. पण मिपावरील 'तांब्या'युग काही संपायला तयार नाही. =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Dec 2014 - 12:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

मानवाची वाटचाल कृषिप्रधान ग्रामिण संस्कृतीकडून उद्योगप्रधान नागरीसंस्कृतीकडे झाली तेव्हाच 'तांब्या'युग संपून '(डालडा-)टमरेल'युग सुरू झाले. पण 'तांब्या'युगातल्या विशाल आकाशाखालच्या हिरव्या झाडीतील मोकळ्या वातावरणात बहरलेल्या जिल्बीसंस्कृतीमुळे त्याचे गुणगान अजूनही पोटतिडिकेने केले जाते ;)

गुणगान अजूनही पोटतिडिकेने केले जाते

=))

गौरी लेले's picture

19 Dec 2014 - 1:42 pm | गौरी लेले

सुरेख कविता प्रमोद :)

पुलेशु