....... इथले संपत नाही

मित्रहो's picture
मित्रहो in जे न देखे रवी...
5 Dec 2014 - 8:44 pm

(कवी ग्रेस आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.)
थोडासा वेगळा प्रयत्न आहे, मूळ कवितेतील कमीत कमी शब्द बदलून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. मूळ कवितेत ५४ शब्द होते. एकूण शब्दसंख्या तशीच ५४ ठेवीत त्यातले फक्त १२ शब्द बदलून उर्वरीत ४२ शब्द तसेच ठेवून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. कितपत जमलेय ते सांगा.

चणे इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

ते झरे मधुशालेचे, तो टेबल फसवी माया
नाल्याशी निजलो आपण, नाल्यात पुन्हा उगवाया

तो कोक थंड हळवासा, आयुष्य स्पर्शूनी गेला
होस्टेलच्या वनवासातील, जणू अंगी पदर ओला

स्तोत्रात इंद्रीये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही, चादणे तुझ्या स्मरणाचे

Enjoy Friday Evening!!
मित्रहो
http://mitraho.wordpress.com

काहीच्या काही कविताविडंबनविनोद

प्रतिक्रिया

नाल्याशी निजलो आपण, नाल्यात पुन्हा उगवाया

क्या बात है.

हे सरता संपत नाही, चकणे तुझ्या स्मरणा

बहुगुणी's picture

6 Dec 2014 - 3:48 am | बहुगुणी

किमान शब्द-बदलात कमाल विडंबन! कठीण काम होतं पण चांगलं केलं आहे :-)

मित्रहो's picture

7 Dec 2014 - 1:13 am | मित्रहो

धन्यवाद खटपट्या, hitesh, बहुगुणी

दिपक.कुवेत's picture

7 Dec 2014 - 2:19 pm | दिपक.कुवेत

नक्कि कोण बोलतयं??? बाई कि पुरुष?

मित्रहो's picture

7 Dec 2014 - 8:08 pm | मित्रहो

अगदी प्रकाशित करा ह्यावर क्लीक करेपर्यंत विचार करीत होतो काय योग्य. जणू अंगी पदर ओला कि जणू तिचा पदर ओला. शेवटी अंग ठेवले कारण कवितेच्या लयीत तेच बसत होते.

पिंपातला उंदीर's picture

7 Dec 2014 - 8:36 pm | पिंपातला उंदीर

आवडल

पैसा's picture

7 Dec 2014 - 8:47 pm | पैसा

इतके कमी शब्द बदलून विडंबन!

बोका-ए-आझम's picture

8 Dec 2014 - 9:52 am | बोका-ए-आझम

ग्रेसफुल विडंबन!

मित्रहो's picture

8 Dec 2014 - 3:09 pm | मित्रहो

धन्यवाद पिंपातला उंदीर, पैसा, बोका-ए-आझम

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2014 - 3:11 pm | टवाळ कार्टा

उंदीर आणि बोक्याचे एकमत आहे इथे :)