देव भूमी......भाग-०१

मॅक's picture
मॅक in भटकंती
5 Dec 2014 - 5:50 pm

तस पाहिले तर केरळ बाबत ख़ुप लोकानी आज पर्यत लिहल आसेल पण ..... तरीही मी एक प्रयत्न करतोय...पहा अआवडला तर जरूर सागा......
पदवीच्या शेवच्या वर्षाला असताना खोली घेऊन रहात होतो. वर्ष होत 2006..... तीन रूम पार्टनर आणि एक मी. कुणीतरी बातमी आणली कराडला पुस्तक प्रदर्शन भरलय... झालं.... ;लगेच रविवारी कराड... माझी तशी काही इच्छा नव्हती जायची पण रूमवर बसून तरी काय करणार म्हणून मी पण गेलो..... प्रदर्शन खुपच छान आणि मोठं होत.... बाकी तिघांनी बरीच पुस्तक खरेदी केली मी काही घेतलं नव्हतं.... पण अगदी शेवच्या दालनात आल्यावर एक पुस्तक नजरेस पडलं.... उचलून पुस्तकाच्या पाठीमागच्या बाजूवरील मजकूर वाचला.... ते निसर्ग वर्णनपर पुस्तक होतं... काहीतरी घ्यायचं तसेच पक्षी, प्राणी यांचं आकर्षण असल्यामुळे व पुस्तकाच्या पहिल्या पानावरच चित्र बघून पुस्तक खरेदी केल.......
.........पण ज्यावेळी हे पुस्तक वाचायला सुरवात केली त्यावेळी ते पुस्तक वाचतच रहाव अस वाटत होत.... ते संपूर्ण वाचून पुर्ण झाल्याशिवाय खाली ठेवूच नये अस वाटत होतं........... देवाने निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण करून तयार केलेल्या पृथ्वीच्या पाठीवरील देवभूमी म्हणून ओळखल्या जाणा-या केरळ मधील एका संपुर्ण ऋतूचक्राचं त्यात वर्णन आहे.....
प्रचि-०१

हे पुस्तक वाचल्यापासून एकदा 'केरळला 'जायचं असं मनात पक्क ठरवलं होतं.........
त्यानंतर बराचं कालावधी गेला …. कालावधी कसला वर्ष...... शिक्षण झाल, नोकरी लागली...लग्न झालं....तोपर्यंत बराच काळ उलटून निघून गेला....पण केरळला जायचा काय योग येत नव्हता.... योग येत नव्हता म्हणण्यापेक्षा या संसाराच्या गाड्यातून आर्थिक गणित जुळत नव्हतं.... पण मनातून केरळ काही केल्या जात नव्हतं..... बाहेर फिरायला जायच तर पहील्यांदा केरळलाचं जायच अस पक्क ठरवूनच
टाकल होतं........
आणि एक दिवस उगवला आत्तापर्यंत मनाच्या एका कप्प्यात दाबून ठेवलेली ईच्छा पुर्ण होण्याच्या मार्गावर होती....... टूर एजन्सीचा शोध चालू झाला...... त्यात अनेक पर्याय होते...... अर्थात पहीलं नाव होत.....केसरी...त्यानंतर वीणा …. सचिन...अशी बरीच नाव होती..... इंटरनेटवर तासंतास घालवले....... त्यातून मग शेवटी काहीही होऊ.....पैसे फुकट गेले तरी चालतील... इतकच नव्हे तर शेवटी अक्कल विकत घेतली असं समजू असा विचार करून 'वीणा वर्ड' मध्ये बुकींग केली.........
तीन महीने आगोदर बुकींग केली...... पण आपल्या आयुष्यात पाच-दहा मिनिटांनी काय? घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं तर पुढल्या तीन महिन्यांचं काय घेऊन बसला आहात..... ब-याच अडचणी निर्माण झाल्या..... त्यातली एक म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या... आणि त्यात मला पी.आर.ओ. म्हणून डयुटी लागली...... सर्व स्वप्नांवर पाणी फिरण्याची वेळ आली ….. पण इच्छा शक्तीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही.... ते खरं आहे.. एक मित्र बदली काम करायला तयार झाला आणि माझी सुटका झाली......
आयुष्यातल्या अत्यंत आनंदाच्या दिवसापैकी एक दिवस आखेर उजाडला दि.11.10.2014(शनिवार).... पनवेल रेल्वे स्टेशनवरून दु.1:00 वाजता नेत्रावती एक्सप्रेस.....मध्ये बसलो.....मी,पत्नी-अमृता,मुलगा-मानस,लहान भाऊ-अतुल व त्याची पत्नी-मोनिका (हा माझ्याच काय पण माझ्या कुटूंबाच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला पहिला-वहीला रेल्वे प्रवास...)

प्रचि-०२

प्रचि-०३

दुस-या दिवशी 12 तारखेला रात्री 8:30ला त्रिवेंद्रमला पोहचलो.....स्टेशनवर पोहचलो तोपर्यंत पावसानेच आमचे स्वागत केल....आमच्या या भ्रमंतीवर आणखी एक चिंतेचं सावट होत ते म्हणजे हुद..हुद.. आमच्या स्वप्नांवर पाणी फिरवनार असं वाटत होतं.... पण आमची इच्छाशक्ती इतकी कि निसर्गाला सुध्दा नमतं घ्याव लागलं...... दहा....पंधरा मिनिटात पाऊस थांबला तो पुढच्या सात दिवसात कधीच परत आला नाही.......
पहीला मुक्काम होता तिरूअनंतपुरम....... तिथून दुस-या दिवशी सकाळी सात वाजता कन्याकुमारीसाठी जायचं होत..... हॉटेलवर गेलो... तो आमच्यासाठी एक सुखद धक्काच होता.... हॉटेल इतक मस्त होतं कि, आम्ही कधी कल्पना पण केली नव्हती....(थॅक्स टू वीणा...)

प्रचि-०४

प्रचि-०५

पहिल्या दिवशी.... कन्याकुमारीत दिवसभरात कन्याकुमारीमाता मंदीर...त्रि-समुद्र मिलन ...गांधी मंडप...आणि फेरी राईड टू स्वामी विवेकानंद स्मारक व ध्यान मंडप याचा आनंद लुटून संध्याकाळी पुन्हा त्रिवेंद्रम असा भरगच्च कार्यक्रम होता.....

प्रचि-०६

प्रचि-०७

प्रचि-०८(.गांधी मंडप...)

दस-या दिवशी.... त्रिवेंद्रम शहरामधील पद्मनाभ स्वामी मंदीराला सकाळी लवकर भेट दिली. तिथल्या रितीप्रमाणे संपूर्ण उघड्या अंगाने फक्त पारंपारिक लूंगी परिधान करून दर्शन घेतले.... विष्णूची आठरा फूट लांबीची मुर्ती तीन दरवाजातून पहावी लागते.. (आत्ता हे मंदीर जगात कुणासाठी अपरिचित राहीले नाही....असो......)

प्रचि-०९

त्यानंतर दुपार नंतर राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी... नेपिअर म्यझियम... व संध्याकाळी कोलम बिच असा कार्यक्रम झाला........

प्रचि-१०

प्रचि-११

प्रचि-१२ (कोल्म बिच....)

प्रचि-१३

क्रमश:

प्रतिक्रिया

विलासराव's picture

5 Dec 2014 - 9:19 pm | विलासराव

मस्त आहेत फोटोज.

छान फोटो आहेत.पुढच्या भागात थोडं कुठे काय पाहिलं तेही लिहाल का?
अवांतर:पळस्प्याचं कोणी मिपाकर असेल वाटलं नव्हतं!! श्री दत्तची मिसळ आठवली.

पिवळा डांबिस's picture

5 Dec 2014 - 10:39 pm | पिवळा डांबिस

चांगलं लिहिताय. केरळचे फोटोही चांगले आलेत.
बाकी माझ्यासाठी केरळ म्हणजे जिथे जावसं वाटतं पण कधी जाणं होणार नाही हे माहिती आहे अशी जागा आहे...

अवांतरः तुम्ही पनवेलीचे आणि हा तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा पहिलाच रेल्वे प्रवास म्हणजे काय ते कळलं नाही, पण असो.

विनोद१८'s picture

5 Dec 2014 - 11:09 pm | विनोद१८

फोटोही चांगले आहेत.

एस's picture

5 Dec 2014 - 11:15 pm | एस

छान फोटो.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 3:55 am | मुक्त विहारि

पुभाप्र (पुढील भागाच्या प्रतिक्षेत)

कंजूस's picture

6 Dec 2014 - 5:04 am | कंजूस

झकास आणि चटपटीत.
हुद हुद म्हणजे पाऊस का ?केरळमध्ये फिरायला आणि लोकांशी बोलायला फार मजा वाटते. प्रत्येकाला केरळ वेगळाच दिसतो त्यामुळे झाले बहू होतील बहू तरीही तुमचे आवडीने वाचणारच.विशेष पाहायला आणि खायला काय आवडले ?मी भरपूर राजेळी केळी खाल्ली होती आणि कोचिचे केळावेफरर्स.

इरसाल's picture

6 Dec 2014 - 12:05 pm | इरसाल

ते हुद हुद म्हणजे हुड हुड हे चक्रीवादळ की कायसे आले होते ते असेल.

प्रचेतस's picture

6 Dec 2014 - 9:21 am | प्रचेतस

छान लिहिलंय.

सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल व मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे.......
मला पण जरा हुरूप आला आहे...

हुद हुद म्हणजे पाऊस का---हो