मोठ्ठे आरसे

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
3 Dec 2014 - 6:26 pm

मुलींच्या वस्तीग्रुहात मी त्याला पकडले
कॉलर पकडुन ओढत बाहेर काढले

बहिणिस आपल्या खांद्यावर होते घेतलेले
घाबरलेले पोर ते ,बोलण्यास न धजावले

दटावताच पोर ते रडु लागले
बहिणीस सावरत हातापाया पडु लागले

"बहिणीला माज्या चेहरा बघायचा व्हता
आयला मारताना बान आरसा फॉड्ला

आरश्यातबी हि लय ग्वाड दिस्सल
बघुन स्वताकडं 'एकडाव ' तरी हसलं

ह्या बारीस जौद्या, परत येत नाय
मोठया आरशात बघायची औकात नाही

आरसे आपले खरेच मोठे आहेत..
पण आपलाच चेहरा का लपवतायत??

करुणकथा

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

3 Dec 2014 - 6:39 pm | प्रसाद गोडबोले

अरे भाई तुम कहना क्या चाहते हो ?

शब्दानुज's picture

3 Dec 2014 - 7:14 pm | शब्दानुज

आरसा हे आर्थिक प्रतिक आहे
बाकी भावाबहिणेचे नाते आहेच

शब्दानुज's picture

3 Dec 2014 - 7:20 pm | शब्दानुज

अर्थ शोधण्याएवजी तो अनुभवा
खर तर मलाही नाही कळाला अर्थ

मोठ्या भावाने लहान बहिणीचा हट्ट पुरवला काय ?
आवडल.

कविता१९७८'s picture

4 Dec 2014 - 2:16 pm | कविता१९७८

आवडली कविता.

शब्दानुज's picture

4 Dec 2014 - 4:31 pm | शब्दानुज

धन्यवाद