सगळीकडे नुसती चर्चा ब्रँड आणि फक्त....... ब्रँडची

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
18 Nov 2014 - 10:26 am

कपडे काय अन् पायताण काय, अवस्था तीच खाण्या पिण्याची
सगळीकडे नुसती चर्चा, ब्रँड आणि फक्त....... ब्रँडची

एकदा कोल्हापुरी घेतली कि जनता, पाच वर्षे दुकानात चक्कर नाही मारायची
दर वर्ष्याला आजकालची जनता, नवीन ट्रेंडस् बघते आदिदास अन् रिबॉकची

गाड्यावरची भेळ, पाणीपुरी, आज काल चर्चा असते "हायजॅनिकची"
नुसती भुकेची जाणीव होता, धाव होते मॅकडी आणि डॉमिनोझची

पेनासारखे पेन ते; डोक्यात आहे तेच लिहिणार, तिथे किमया कसली ब्रँडची?
पण लिहायचे असो वा नसो, खिश्यात जागा रिजर्व एकट्या पारकरची

साबण अंग स्वच्छ करतो, काय बदली होणार आहे अंगाची?
साध्या साध्या वस्तुत अश्या, चलती आहे डव आणि फा ची

कपडे जरा असावेत बरे, पण आहे का; शक्यता माणूस बदलण्याची?
तिथेही लेवीच वाटते लेवावीशी, आणि जोडी अॅलन सोलीची

सवय लागली; दाढ़ी चार वेळा, आठवड्यातून खरडायची
बिन पाण्याने होते आमची, किंमत बघता शेव्हर ब्रँडची

सिगरेट; दारू वाईट आहे, कश्याला वाट असल्या व्यसनाची
एकदा घेतल्यावर काय कळतंय, तिथेहि चलती बकार्डीची

सकाळी उठल्यावर "लोटा पाणी-कोठा साफ", हि शिकवण आहे आयुर्वेदाची
हेच सगळे पाळतात जेंव्हा, जाहिरात होते "चायनीज वॉटर थेरपीची"

नाती-मैत्री आणि संस्कृती, आहे वर्षानुवर्षे ओळखीची
का काय कळत नाही, पण जनता मागणी करते प्रत्येक "डे" ची

काही दिवसांनी नवीन पिढी, चॉईस करतील आई-बापाची
न जाणो तेही मागणी करतील, “युएसची” आई” आणि “युकेच्या” बापाची”

सोड सारे हे जरा; स्मृती सार्थ जागवा, आपल्या गतवैभव आणि संस्कृतीची
गंध बोध, दरवळेल मातीचा अस्सल आणि, चर्चा होईल भारतीय नावाची

- सार्थबोध
http://www.saarthbodh.com/2011/05/blog-post_04.html

कविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 Nov 2014 - 10:31 am | मदनबाण

रचना आवडली ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }

पिंपातला उंदीर's picture

18 Nov 2014 - 10:43 am | पिंपातला उंदीर

पुण्यात परकरापासून ते मटार पर्यंत सर्व गोष्टींचे brand आहेत

कंजूस's picture

18 Nov 2014 - 10:50 am | कंजूस

अमृततुल्य !

सार्थबोध's picture

18 Nov 2014 - 11:14 am | सार्थबोध

सर्वान्चे आभार ... खरय बाकि पुण्यात काहिहि शक्य आहे

मदनबाण's picture

18 Nov 2014 - 11:17 am | मदनबाण

ब्रांड वरुन एक गोष्ट इथे प्रामुख्याने नमुद कराविशी वाटते आहे ती करतो...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मेक इन इंडिया" चा नारा दिला आहे खरा... पण जो पर्यंत चीनी माल भारतात डंप होत राहील तो पर्यंत "मेक इन इंडिया" चा नारा हा फक्त नाराच राहिल !
अगदी छोटे उदा. द्यायचे झाले तर स्मार्ट फोनचेच उदाहरण घ्या... बाजारात सध्या उपलब्ध असणारे अनेक स्मार्टफोनचे ब्रांड हे चीनमुळेच आहेत. तसेच शाओमी { XIAOMI } ही चीनी कंपनी ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातुन या बाजारात मुसंडी मारण्यासाठी सज्ज होत असुन त्यांचा फक्त ४ हजारात बजेट स्मार्टफोन आणण्याची तयारी सुरु आहे. अशा वेळी { XIAOMI } सारखा हिंदूस्थानी ब्रांड बाजारात का नाही याचा विचार केला पाहिजे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }

सार्थबोध's picture

18 Nov 2014 - 2:21 pm | सार्थबोध

अगदी बरोबर बोललात ... खुप महत्वचे आहे

वेल्लाभट's picture

18 Nov 2014 - 11:42 am | वेल्लाभट

कवितेतले भाव आवडले. पटले. सहमत.
काव्यरचना मात्र रुचली नाही.

सार्थबोध's picture

18 Nov 2014 - 2:20 pm | सार्थबोध

मुक्तछंद या प्रकारात लिहिले आहे, मी तसे काव्यरस नाव नमूद करावयास हवे होते ...धन्यवाद

वेल्लाभट's picture

18 Nov 2014 - 2:43 pm | वेल्लाभट

ओके मग समजू शकतो :)

प्रतिज्ञा's picture

21 Nov 2014 - 3:30 pm | प्रतिज्ञा

आवडली :)