सगळीकडे नुसती चर्चा ब्रँड आणि फक्त....... ब्रँडची
लेखनविषय:
कपडे काय अन् पायताण काय, अवस्था तीच खाण्या पिण्याची
सगळीकडे नुसती चर्चा, ब्रँड आणि फक्त....... ब्रँडची
एकदा कोल्हापुरी घेतली कि जनता, पाच वर्षे दुकानात चक्कर नाही मारायची
दर वर्ष्याला आजकालची जनता, नवीन ट्रेंडस् बघते आदिदास अन् रिबॉकची
गाड्यावरची भेळ, पाणीपुरी, आज काल चर्चा असते "हायजॅनिकची"
नुसती भुकेची जाणीव होता, धाव होते मॅकडी आणि डॉमिनोझची
पेनासारखे पेन ते; डोक्यात आहे तेच लिहिणार, तिथे किमया कसली ब्रँडची?
पण लिहायचे असो वा नसो, खिश्यात जागा रिजर्व एकट्या पारकरची
साबण अंग स्वच्छ करतो, काय बदली होणार आहे अंगाची?
साध्या साध्या वस्तुत अश्या, चलती आहे डव आणि फा ची
कपडे जरा असावेत बरे, पण आहे का; शक्यता माणूस बदलण्याची?
तिथेही लेवीच वाटते लेवावीशी, आणि जोडी अॅलन सोलीची
सवय लागली; दाढ़ी चार वेळा, आठवड्यातून खरडायची
बिन पाण्याने होते आमची, किंमत बघता शेव्हर ब्रँडची
सिगरेट; दारू वाईट आहे, कश्याला वाट असल्या व्यसनाची
एकदा घेतल्यावर काय कळतंय, तिथेहि चलती बकार्डीची
सकाळी उठल्यावर "लोटा पाणी-कोठा साफ", हि शिकवण आहे आयुर्वेदाची
हेच सगळे पाळतात जेंव्हा, जाहिरात होते "चायनीज वॉटर थेरपीची"
नाती-मैत्री आणि संस्कृती, आहे वर्षानुवर्षे ओळखीची
का काय कळत नाही, पण जनता मागणी करते प्रत्येक "डे" ची
काही दिवसांनी नवीन पिढी, चॉईस करतील आई-बापाची
न जाणो तेही मागणी करतील, “युएसची” आई” आणि “युकेच्या” बापाची”
सोड सारे हे जरा; स्मृती सार्थ जागवा, आपल्या गतवैभव आणि संस्कृतीची
गंध बोध, दरवळेल मातीचा अस्सल आणि, चर्चा होईल भारतीय नावाची
- सार्थबोध
http://www.saarthbodh.com/2011/05/blog-post_04.html
वाचन
2542
प्रतिक्रिया
0