दैव ,नशीब कि शाप ?

स्वीत स्वाति's picture
स्वीत स्वाति in जनातलं, मनातलं
17 Nov 2014 - 4:02 pm

दैव ,नशीब कि शाप ?

हि एक सत्य गोष्ट आहे.. माझ्या आयुष्यातील कटू घटना ज्या पाहून वाटते कि का असे झाले ?
एका कुटुंब प्रमुखाचा मृत्यू होतो आणि त्या घरावर एका मागे एक संकट यायला लागतात. हे कुटुंब ग्रामीण भागातील आहे . थोडक्यात कुटुंबाचा परिचय कुटुंब प्रमुख ,पत्नी ,एक मोठी मुलगी विवाहित ,दोन मुले विवाहित ,मोठ्या मुलास एक मुलगा एक मुलगी ,छोट्या मुलास एक मुलगी .कुटुंब प्रमुख पोस्टातून निवृत्त …पोस्टमन या जागेवर त्यांचा मोठा मुलगा महिना साडे तीन हजार पगारावर वडिलांच्या जागेवर लागतो.(आधी पुण्याला पी म टी मध्ये असतो पण ब्रेंक दिल्यावर पोस्टात कामाला लागतो )…आणि दुसरा मुलगा एम कॉम आणि पुण्यात जॉब मिळवण्यासाठी धडपडत असतो …..पण चांगला जॉब न मिळाल्याने पुन्हा गावाला जातो .
धरणामुळे पूर्ण गावाचे पुनर्वसन झाले असते त्या मुळे पूर्वी चालत असणारे दुकान पूर्ण बंद पडते .(कारण धरणामुळे इतर गावांशी असलेला संपर्क तुटतो ) आता गाव दुसर्या ठिकाणी (पुर्वीच्या गावपासुन थोडे दूर )वसवले आहे. पुनर्वसनचे काही रक्कम मिळालेली असते त्यातून नवीन ठिकाणी घर बांधले होते सध्या चे राहते घर. तिथे छोटा मुलगा त्याचे नाव प्रवीण एस टी डि बूथ सुरु करतो आणि स्टेशनरी चे दुकान थाटतो. खरे तर प्रवीण ला पण संधी होती पोस्टात लागायची पण मोठा भाऊ किरण याचे शिक्षण अपुरे म्हणजे १२ वी असल्या मुळे किरण पोस्टात कामाला लागतो .(प्रवीण विचार करतो कि मी एम कॉम आहे तर मला कुठे हि जॉब मिळेन कारण किरण याने पी एम टी मध्ये कंडक्टर म्हणून जॉईन होऊन ट्रेनिंग पूर्ण केले असते पण ब्रेंक देऊन खूप महिने वाट पाहत असतो पण जोइनिङ्ग येत नाही तर पूर्ण आशा सोडली असते ). नवीन नवीन एस टि डि बूथ चांगला चालतो पण जसे भ्रमण ध्वनी चे (mobile) टोवर गावात येतात तसे एस टी डी बूथ पूर्ण बंद पडतो ..स्टेशनरी चे दुकान असे हि भांडवला अभावी बंद च असते . जुन्नर मधे असलेले वडिलोपार्जित घर विकून त्या रक्कम मध्ये थोडी शिल्लक असलेली जमा करून एक बी एच के सदनिका घेतलेली आहे खूप पूर्वी च धनकवडी मध्ये त्याचे भाडे तीन हजार (१९९० -२००० साल ची गोष्ट ) येत असते .कुटुंब प्रमुख पोस्टात कायम स्वरूपी नोकरीवर नव्हते त्यामुळे निवृत्ती वेतन नव्हते. अशा प्रकारे मोठी सहा माणसे आणि लहान तीन मुले एवढ्या लोकांचा खर्च तुट पुंज्या आवक मध्ये चालू असतो.
आर्थिक संकटे तर होती च पण परिस्थिती पुढे जास्त च बिकट होत गेलि. कुटुंब प्रमुख ज्यांना आम्ही दादा म्हणत असू त्यांच्या शस्त्रक्रिया इत्यादीमुळे अधिक आर्थिक भार होत गेले . २००८ साली एप्रिल मध्ये दादांचे आजारात निधन झाले .तत्पुर्वि २००७ ला प्रवीण पुण्या च्या सदनिकेत स्थायिक झाला होता आणि छोट्या कंपनी मध्ये महिना चार हजार वर रुजू झाला होता. प्रवीण ची पत्नी गावाकडे पार्लर चालवत होती ते पुण्यात पण सुरु केले पण अत्यनुधिक साधने आणि जागा नसल्यामुळे चालले नाही पण ती हि खटपट करत होती संसार चालवण्यासाठी(घरगुती अगरबत्ती तयार करणे इत्यदि.) . फेब्रुवारी २०१० साली प्रवीण ची तब्येत अचानक बिघडली त्याला सह्याद्री मध्ये दाखल केले होते. मार्च २०१० मध्ये शस्त्रक्रिया झाली आणि ६ एप्रिल २०१० ला तो वारला.२७ मार्च २०१० ला त्याचा मुलगा एक वर्षाचा झाला आणि ६ एप्रिल ला प्रवीण वारला तेव्हा त्याचे वय होते ३३.
हा एक मोठा आघात होता त्या मधून सर्व जन सावरत असतानाच किरण जो प्रवीण पेक्षा दोन वर्षांनी मोठा होता त्याचा अपघात झाला एप्रिल २०१२ मधे. (एप्रिल २००८ ला दादा वारले त्यानंतर एप्रिल २०१० ला प्रवीण वारला आणि एप्रिल २०१२ ला किरण वारला काय पण योगायोग ?)
योगायोग च म्हणावा कारण तीच तिथी ज्या तिथी ला प्रवीण वारला त्याच तिथी ला किरण वारला आणि प्रवीण वारला होता रात्री दहा वाजता तर किरण रात्री ९.३० वाजता. पण अजून तर संकटे यायची बाकी होति…

क्रमश...
टिपणी :
मी प्रथम च लिहित आहे त्यामुळे चूक झाल्यास क्षमा …वरील लेख हा मनोरंजनासाठी नसून एका कुटुंबाची होत असलेली फरफट दाखवायचा प्रयत्न आहे. जर कोणी नशिबावर विश्वास ठेवत असेन तर या कुटुंबियांच्या नशिबाला दोष द्याल कि शाप आहे या घराला असे म्हणाल ???

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

17 Nov 2014 - 4:11 pm | टवाळ कार्टा

:(
जे झाले त्याला योगायोग म्हणता येईल...पण "नशीब" असे नाव ठेउन हातावर हात ठेउन काहीही होणरे नाही

hitesh's picture

17 Nov 2014 - 4:29 pm | hitesh

परवडत नसताना लोक घरे का बांधतात ? पैसे एफ डीला टाकुन व्याजात घर नसते का चालले ? शिवाय इतके लोक असल्याने तसेही घर सर्वाना पुरले नसतेच.. काही लोकाना वेगळे रहावे लागले असतेच ना ?

hitesh's picture

17 Nov 2014 - 4:29 pm | hitesh

ही किती सालची घटना आहे ?

स्वीत स्वाति's picture

17 Nov 2014 - 4:44 pm | स्वीत स्वाति

हितेश तुमचा गैर समज होत आहे ...
जे घर बांधले आहे ते नवीन गाव वसवले तिथे बांधले आणि छोटे च बांधले होते कारण पहिले घर धरणाखाली गेले… आणि पुनर्वसनाचे पैसे पूर्ण मिळाले नाही अजून केस चालू आहे .
मी सर्व घटनांचे साल दिले आहे तरी आपण कोणत्या घटने बद्दल विचारात आहात हे कळले तर मला सांगता येईन .

प्रदीप's picture

17 Nov 2014 - 8:00 pm | प्रदीप

जे काही दु:खद झाले आहे, ते प्रथम संपूर्ण लिहा, मन मोकळे करा. इतरांना-- आणि विशेषतः मागे वळून पाहिल्यावर-- चुका काढणे सोपे आहे. त्यांना उत्तरे द्यायचा प्रयत्न करायचाच असेल, तर तो सर्व हकिकत कथन केल्यावर करा, असे सुचवतो.

जेपी's picture

17 Nov 2014 - 5:11 pm | जेपी

देव,नशिब शाप....
अहं यापैकी काही नाही आपले कर्मच आपल्याला दिवस दाखवत आसे.

(शिर्षकातील तिन ही जणांना न मानणारा)जेपी

प्यारे१'s picture

17 Nov 2014 - 6:11 pm | प्यारे१

ह्याला माझ्या मते 'दैव अथवा प्रारब्ध अथवा नशीब' असंच म्हणावं लागतंय. अर्थात त्याबाबत अधिक शोक न करता पुढे वाट काही मिळते का ते पाहून प्रयत्न करावेत.

अशी काही कुटुंबे मी पण पाहिली आहेत. याचे कारण मात्र नाही सांगता येत. याला पूर्वी नष्टचर्य म्हणत असत.
आता याचे समर्थन न करता फक्त वदंता असते ती अशी :नष्टचर्य धन /संपत्ती /वारसा /जमीन जुमला /एखादे रत्न घेतल्यावर/मिळाल्यावर वाताहात लागते. कोहिनूर हीरा फक्त इंग्लडच्या राणीला लाभला. अगोदरच्या पुरूष मालक राजांची वाट लागली. युअरोपात काही कासल (=किल्लेछाप वाडे) मालकाची वाताहत लावण्यात {कु}प्रसिध्द आहेत.

स्वीत स्वाति's picture

18 Nov 2014 - 8:59 am | स्वीत स्वाति

तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत …माझे तरी वैयीक्तिक मत आहे कि जुन्नर चे जुने घर विकल्या पासून हे कालचक्र सुरु झाले असावे .
बाकी प्रारब्ध च म्हणावे लागेन.

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2014 - 9:03 am | टवाळ कार्टा

माझे तरी वैयीक्तिक मत आहे कि जुन्नर चे जुने घर विकल्या पासून हे कालचक्र सुरु झाले असावे .

मग जर ते घर मिळाले तर हे सगळे थांबेल?

स्वीत स्वाति's picture

18 Nov 2014 - 11:05 am | स्वीत स्वाति

त्या घरात पूर्वी पासून एक मुस्लिम कुटुंब महिना ६० रुपये भाडे देऊन राहत होते (हो फक्त ६० च १९९० साली ) आणि नंतर तर दमदाटी करून ते घर हस्तगत करू पाहत होते …. खूप वादा नंतर शेवटी त्यानिंच ते घर खूप कमी किमती मध्ये विकत घेतले. (त्या मुस्लिम कुटुंबा सोबत जुने संबंध होते वाड वडिलांचे(दादांच्या आजोबा ,पणजोबा ) आणि दादा हे खूप सरळ मार्गी होते याचा गैरफायदा घेतला त्या लोकांनी )

तुम्ही मनातल्या भावना मांडायला लिहीत आहात हे ठीक आहे. पण याला दैव, नशीब किंवा शाप काहीही म्हणालात तरी त्याने होऊन गेलेल्या परिस्थितीत फरक पडेल असं वाटत नाही.

स्पंदना's picture

18 Nov 2014 - 7:38 am | स्पंदना

तू लिही ग स्वाती.
या सगळ्या प्रकाराला काय म्हणाय्च ते आपण नंतर ठरवू.
वास्तव कधी कधी कल्पनेपेक्षा भयानक असत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2014 - 8:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती तुम्ही लिहा. संकटं एकटी येत नाहीत ती झुंडीनं
येतात. तुम्ही त्याला सामोरे कसे जातात ते महत्वाचं
असो,लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

स्वीत स्वाति's picture

18 Nov 2014 - 8:54 am | स्वीत स्वाति

मला नक्की काय सांगायचे आहे हे समजून घेतल्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. .
पुढील भागात मी या कुटुंबाचे झालेले हाल मांडणार आहे .
हा लेख सहानभूती मिळवण्यासाठी नसून एखाद्याचे आयुष्य किती दुख:द असू शकते ज्याची आपण कल्पना हि करू नाही शकत हे च दाखवण्याचा प्रयत्न.

खटपट्या's picture

18 Nov 2014 - 9:21 am | खटपट्या

पु.भा.प्र.

कविता१९७८'s picture

18 Nov 2014 - 11:17 am | कविता१९७८

जे झाले ते अतिशय दुखद आहे. पण त्या कुटुंबाची आजची परिस्थीती कशी आहे हे तुम्ही मांडल्यावर मिपाकर नक्कीच काहीतरी मार्ग सुचवतील.

स्वीत स्वाति's picture

18 Nov 2014 - 12:20 pm | स्वीत स्वाति

धन्यवाद