स्केच..

भाग्यश्री's picture
भाग्यश्री in जे न देखे रवी...
7 Aug 2008 - 5:41 am

आज दुपारी हे चित्र काढलं.. पहीलाच प्रयत्नात हे असं आलं.. अजुन एकदा दोनदा मी नक्कीच हे काढणार आहे.. कारण खूप सुधारणा लागतील अजुन..पण माझ्या मते, नऊवारी साडी,चेहर्‍यावरचे किंचीत दुख्खी एक्सप्रेशन्स बर्‍यापैकी जमलेत.. चारकोल वापरणं अजुन नीट जमत नाही. तुमची काय सजेशन्स?

IMG_1036-1

कलाविरंगुळा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

7 Aug 2008 - 5:50 am | धनंजय

निगेटिव्ह स्पेसचा प्रभावी वापर आवडला.

पुन्हा २-३दा काढणार आहात म्हणून आगाऊपणे सल्ला देतो - अगदी मोह झाला तरी ईशान्य भाग असाच मोकळा ठेवा.

अर्थात काही सुरेख मांडणी सुचली तरच तुम्ही तिथे काही काढाल म्हणा...

सर्किट's picture

7 Aug 2008 - 5:53 am | सर्किट (not verified)

त्या जागेत एक उघडी खिडकी हवी.

- सर्किट

चेहरा संदिग्धपणे तिकडे बघतो आहे, पण तरी शरिराच्या ठेवणीत - मांडीखाली एक पाय घेण्यात काही भावना आहेत.

चित्राच्या चौकटीच्या बाहेर, बाईचा चेहरा वळला आहे तिथे काय असेल त्याचे प्रेक्षकाला कुतूहल वाटेल. त्याची प्रेक्षकाला कल्पना करायला संधी दिली, तर प्रत्येक वेळी चित्र बघताना काही नवा अर्थ जाणवेल. समुद्र असेल. झाडी असेल. विषण्ण बाईपुढे कोरी भिंत असेल. वाट बघणारीपुढे खिडकी असेल.

जे आहे ते चित्रात दाखवले (खिडकी, समुद्र, झाड, देऊळ) तर एकदा बघून कुतूहल फिटेल. म्हणून निगेटिव्ह स्पेस प्रभावी वाटली.

(अशीच कंपोझिशन शार्दूल कदम यांच्या "वाट बघणार्‍या मुली"ची आहे. त्यांनीही चौकोनाला कर्ण दिला, आणि केवळ खालच्या त्रिकोणात बाई बसवली. कर्णाच्या वरचा त्रिकोण पूर्ण रिकामा. ते तसेच प्रभावी वाटते.)

भाग्यश्री's picture

7 Aug 2008 - 7:10 am | भाग्यश्री

धन्यवाद धनंजय.. खरं सांगायचं तर मी हे चित्र पाहून काढलंय.. मला तितपतंच चित्रकला जमते.. त्यामुळे जे काही निगेटीव्ह स्पेसचे वगैरे गुण आहेत ते त्या मूळ चित्रकाराला.. तो कोण माहीत नाही.. ते माझं श्रेय नाही..
बाकी, त्या बाईचा चेहरा, खरं खाली पाहतोय,ती कशावरतरी बसली आहे एक पाय दुमडून.. असं चित्रं आहे.. चेहरा तिरका असल्याने मागून केवळ पापणी दिसते, आणि फक्त त्यातून निदान मला तरी दुख्खी भाव दिसतो असं वाटलं.. ती बाहेर पाहात नाहीये.. थोडीशी आत्ममग्न, दुख्खी अशी बाई वाटली मला ती.. ते तसंच दिसतंय की नाही तेच बघायचंय..

तत्पर प्रतिक्रियेबद्दल आणि सल्ल्याबद्दल धन्यवाद! :)

मुक्तसुनीत's picture

7 Aug 2008 - 7:32 am | मुक्तसुनीत

चित्रकलेत नेहमी ३५ मार्क मिळायचे त्यामुळे विशेष काही कळत नाही. पण चित्र आवडले खूप.

इनोबा म्हणे's picture

7 Aug 2008 - 8:44 am | इनोबा म्हणे

प्रयत्न चांगला आहे. अजून हात साफ व्हायला हवा आणि ते सरावानेच होऊ शकते.

निगेटिव्ह स्पेसचा प्रभावी वापर आवडला.
हेच म्हणतो.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

7 Aug 2008 - 8:47 am | विसोबा खेचर

भाग्यश्री, चित्र छानच काढलं आहेस...

तात्या.

टारझन's picture

7 Aug 2008 - 10:43 am | टारझन

का कुणास ठाऊक अपेक्षा जास्त आहेत. चित्र बरं आहे.
पण एक्प्रेशन साठी चे भाव फक्त "बाई डोळे मिटून बसली आहे", या वरूनच समजून घ्यवे लागले. एक तर ऑब्जेक्ट ची शारिरीक पोझिशन, बाजू चा परिसर(त्या मुळे सर्किटचा एक पॉईंट बरोबर आहे.) किंवा चेहरा काढला असेल तर त्या चेहर्‍या वरचे भाव... हे अशा चित्रात महत्वाचे असतात. डिक्टू चित्र येणे अपेक्षित नाही पण भाव एवढे खास ऊतरले नाहीत असं वाटतं .. तुम्ही सांगितलं ती दुख्खी आहे म्हणून कळालं

असो .. पहिला प्रयत्न आहे. त्या मानाने ऊत्तम !!

अवांतर : धनंजय सर, काही चित्रे असतात, ज्यात नुसत्या रेशा, अर्धवट अस्पष्ट आकृत्या ई.ई. त्या प्रकारच्या चित्रांमधे तुम्ही म्हणता तसे असते. ही चित्रे नुसती जास्त प्रभावी नाही वाटत. आजु-बाजुला जर काही दाखवलं असतं तर हे अजुन प्रभावी वाटलं असतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.

हौशी चित्रकार
-- ( टारझन ऊर्फ खवीस )

भाग्यश्री's picture

7 Aug 2008 - 11:03 am | भाग्यश्री

ह्म्म.. प्रतिसादासाठी धन्यवाद..
बाकी, मला धनंजय यांच म्हणणं पटलं.. अजुन काही नसलं आजुबाजुला तरी तीचे एक्सप्रेशन्स दाखवता येतील.. तिच्या नुस्त्या खाली बघण्याने .. ते बघणं तिचं विचारात (किंवा दुख्खात, जे काही असेल ते) गढलेलं असणं दाखवू शकेल.. मला तितकं जमलं नसेल..नाहीच रादर..कारण ती तुला डोळे मिटलेली वाटली.. :) पण खिडकी,समुद्र इत्यादी गोष्टी नको वाटतील मला इथे..

असो.. प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद! :)

मनस्वी's picture

7 Aug 2008 - 11:13 am | मनस्वी

छान आलंय चित्र!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

सूर्य's picture

7 Aug 2008 - 11:56 am | सूर्य

चित्र छान जमले आहे.

आपला
(प्रेक्षक व आस्वादक) सूर्य.

बाई ज्या प्रकारे पाठमोरी आहे त्या कंपोझिशन मधे निगेटिव स्पेस जास्त परिणामकारक वाटते.
रेखाटन अधिक नेमके आणि शार्प होण्यासाठी ऍनाटॉमीचा जास्त अभ्यास करावा असे वाटते.
पु.रे.शु.

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

8 Aug 2008 - 6:00 am | भडकमकर मास्तर

एका उत्तम पुस्तकाची लिंक देत आहे..
...
ऍनाटोमी साठी त्यात भरपूर सूचना आणि गृहपाठ आहे.... स्नायूंचा अभ्यास, पाठमोर्‍या आणि वळलेल्या हालचाली ज्या सामान्यतः अवघड असतात , त्यासाठी टिप्स आहेत....
http://www.torrentreactor.net/torrents/642342/Andrew-Loomis-Figure-Drawi...'s-Worth

मुखपृष्ठ.

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भाग्यश्री's picture

8 Aug 2008 - 6:03 am | भाग्यश्री

खूप धन्यवाद मास्तर!! नक्कीच करते आता अभ्यास! :)

भाग्यश्री's picture

8 Aug 2008 - 12:06 am | भाग्यश्री

धन्यवाद...!

हो मला ऍनोटॉमीचा अभ्यास केला पाहीजे. मी अंदाजाने काढते,त्यामुळे ते पर्फेक्ट नाही दिसत.. नक्कीच प्रयत्न करीन..

संदीप चित्रे's picture

8 Aug 2008 - 2:23 am | संदीप चित्रे

आहे भाग्यश्री ... पण एकूण चित्र आवडलं
------
(आत्ता कळल माझी चित्रं पॉवरफुल असतील खरंतर कारण त्यात निगेटिव्ह स्पेसच जास्त असते ;) )

स्वप्निल..'s picture

9 Aug 2008 - 2:13 am | स्वप्निल..

मी कधी चारकोल चा प्रयत्न केलेला नाही..पण तुमचे चित्र आवडले..मला एवढे नाही जमणार..
माझ्याकडे पण काही पुस्तके आहेत्..पाहीजे असल्यास पाठवेन..

स्वप्निल..