टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
त्याला जरा रागवा ना बाई !
राजकारणातील घडामोडींकडे लक्ष ठेवणार्यांसाठी एक हलकाफुलका विरंगुळा !
----------------------------------------------------------
त्याला जरा रागवा ना बाई
तो काही माझे ऐकत नाही…
घर बदलले दार बदलले
मी सारे आधार बदलले
तो काही माझे पाहत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … १
आषाढ गेले श्रावण आले
महिने काय सालही गेले
तो काही पाऊस पाडत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … २
दबाव टाकले गार्हाणे नेले
विमानही ते ओळखीचं झाले
तो म्हणे की डाळ शिजत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … ३
लोक जमवले पार जागवले
पत्रकार तर नेहमीचे झाले
तो म्हणे की बार उडत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … ४
----------------------------------------------------------
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


मस्त
मस्त विषय! आणि विडंबनही!!
छान कवि
वा....!
छान कविता आहे. अजुन काहि नव पाहिजे
मस्तच आहे
मस्तच आहे कविता... चालू द्या.
बिपिन.
छान
वेगळ्या विषयावरची कविता आवडली.
हम्म..
संदीप,
सॉलिड हाणला आहेस...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मस्त रे संदीप!
चौकार, षटकार आतषबाजी!
चतुरंग