(हि कथा "अती काल्पनिक" आहे याची कृपया नोंद घ्यावी")
डॉक्टर शेणोय हे मानव वंश शास्त्राचे गाढे अभ्यासक व तज्ञ. जगभरातील आणि भारतातील मानव वंशा बद्दल त्यांचा दांडगा व्यासंग होता. आपल्या सारख्या सामान्य लोकांना फक्त युरोपियन, आफ्रिकन, चीनी आणि आशियायी असे मूळ मानव वंश माहित आहेत कारण ते बघताचक्षणी आपल्याला लक्षात येतात. पण आपण जसे भारतीयांमध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांना ओळखू शकतो तसे युरोपियन लोक आपल्याला ओळखू शकत नाहीत त्यांना सारे भारतीय सारखेच. तसेच आपल्या दृष्टीने डच, फ्रेंच, ब्रिटीश, स्पेनिश हे सगळे युरोपियनच. डॉक्टर शेणोय मात्र नुसत्या बाह्य निरीक्षणावरून कोण डच कोण फ्रेंच हे ओळखत. आफ्रिकेत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वंश आहेत आणि डॉक्टरांचा या विषयात हातखंडा होता. सद्या महाराष्ट्रातही जो पश्चिम पठारावर राहणारे जे लोक आहे ते सायथो द्रविडीयन या प्रकारात मोडतात.
सांगायचा मुद्दा हा कि डॉक्टरांचे मानव वंश शास्त्रात खूप सूक्ष्म काम चालू होते. आफ्रिकेतील शेकडो मानव वंशांचे वर्गीकरण त्यांनी केले होते.
उदाहरणार्थ - पायांची विशिष्ट ठेवण असणारा हा डोमा वंश.

डोक्याचा विचित्र आकार असलेला हा वंश.

या प्रकारचे संशोधनाचे ढीगभर शोध निबंध डॉक्टरांकडून प्रसिद्धीस गेले होते. हे सर्व करत असताना डॉक्टरांना बरीच चमत्कारिक आणि गूढ माहिती मिळत असे आणि या माहितीने ते नेहमी आश्चर्यचकित होत असत. बऱ्याचवेळेला मिळालेली माहिती ते अख्याईका समजून सोडून देत असत तर काही प्रकरणांमध्ये त्यांना थोडा जरी पुरावा मिळाला तर ते त्याचा पाठपुरावा करीत असत.
आफ्रिकेतील मानव वंशांचा शोध घेत असताना त्यांचे लक्ष एका बातमीने वेधून घेतले. विश्वास ठेवावा कि ठेवू नये अशा मनस्थितीत ते होते. पण जसजसे ते आफ्रिकेत खोलवर जाऊ लागले तसे त्यांना या मानव जातीबद्दल जास्तच अख्याइका ऐकायला मिळू लागल्या. काही लोकांनी तर पैशाच्या मोबदल्यात या वंशातील लोकांची ओळख करून देण्याचे कबूल केले. बरेच पैसे खर्च केल्यावर डॉक्टरांच्या पदरी निराशाच पडली. पण या मानव वंशाने डॉक्टरांच्या मनाची पकड घेतली होती. असे काय होते या मानव वंशामध्ये ज्याची डॉक्टर शेणोय सारख्या शास्त्रज्ञालाही भुरळ पडावी.
"या मानव वंशाचे नाव होते "डोब्रा" आणि वैशिष्ट हे की या वंशातील लोकांची मान ३६० अंशामध्ये फिरायची"
थोडक्यात घुबडाची फिरते तशी. खूप कमी लोकांना या वंशाबद्दल माहिती होती. वरकरणी हि माणसे कोणत्याही सामान्य आफ्रिकन माणसांसारखीच दिसायची. पण डॉक्टर शेणोय सारख्या निष्णात संशोधकाने हे शोधून काढले होते कि अशा प्रकारच्या लोकांचे कपाळ टेंगुळ आल्यासारखे पुढे आलेले असते. व चालताना हे लोक पोक काढून चालतात. आणि एवढ्या माहितीवर अशा माणसांचा शोध घेणे निव्वळ अशक्य होते. पण डॉक्टरांनी प्रयत्न करणे सोडले नव्हते. गेली सहा महिने ते नायजेरियाच्या एका विशिष्ठ भागात ठाण मांडून बसले होते. ही जमात सद्या नामशेष होण्याचा मार्गावर होती. फक्त २५ ते ३० लोक या जगात उरले होते. जे आहेत ते सुद्धा भूमिगत अवस्थेत होते. नामशेष होण्याची मूळ कारणे म्हणजे या वंशातील लोकांनी अन्य वंशातील लोकांशी केलेले विवाह. स्त्री आणि पुरुष हे दोघेही याच जमातीतील असतील तरच होणारे मुल हे डोब्रा वैशिष्ठ्यानुसार निपजत असे. दुसरे कारण असे कि बऱ्याच सर्कसवाल्यांना या जमातीचा सुगावा लागला होता व ते हात धुवून या डोब्रांच्या मागे लागले होते.
बराच शोध घेऊन पदरी निराशा पडल्यावर डॉक्टर साहेब भारतात परत येण्याच्या बेतात होते. एक दिवस असेच विचार करत ते हॉटेलच्या कैफेटेरीयात कॉफी पीत बसले होते. कॉफी पिउन झाल्यावर ते आपले आजपर्यंत किती बील झाले याची विचारपूस करण्यासाठी काउण्टर वर आले. काउण्टर वर त्यांना नवीन माणूस दिसला व त्याचे नाव जॉन आहे असे कळले. जॉनशी हाय हेल्लो झाल्यावर डॉक्टरांनी त्यास रूम नंबर २०१ चे आजपर्यंत किती बील झाले हे पहाण्यास सांगितले. जॉन शांतपणे संगणकावर टकटक करू लागला.
डॉक्टरांनी जॉनला विचारले, "जॉन, तुम्ही इथे नवीन आहात का?"
"नाही सर, मी खाली स्टोअररूम मध्ये असतो. आजच माझी इथे नेमणूक झाली."
"ओके"
डॉक्टर जॉनचे बारकाईने निरीक्षण करीत होते. कपाळ बऱ्यापैकी पुढे आले होते. डॉक्टर आपलं निरीक्षण करतायत हे बघून जॉन धोडा अस्वस्थ झाला. व म्हणाला, "सर, थोडा वेळ लागेल."
"नो प्रोब्लेम, टेक युअर ओन टाईम"
डॉक्टरांची थोडी थोडी खात्री पटत चालली होती कि जॉन हा डोब्राच असावा. अजून थोडी परीक्षा घेण्यासाठी डॉक्टर म्हणाले,
"जॉन, मला पाणी मिळेल का?"
"शुअर सर" असे म्हणून जॉन पाणी आणण्यास आत गेला. पाणी आणण्यास आत जातानाचे जॉनचे चालणे बघून डॉक्टरांची खात्री पटली कि "हो डोब्राच"
डॉक्टरांच्या अंगात एकदम उत्साह संचारला. डोळे चमकू लागले. इतक्या दिवसांच्या मेहनतीला आज फळ येणार होतं. जॉन पाणी घेऊन आल्यावर डॉक्टर म्हणाले, "जॉन, मला वाटतं संपूर्ण हिशोब करण्यास वेळ लागेल, तू असं कर, जो काही हिशोब झाला असेल तो घेऊन माझ्या रूमवर ये. रूम नंबर २०१. ठीक आहे?"
"ठीक आहे सर"
डॉक्टर एकदम उत्साहाच्या भरात रूमवर आले. आज त्यांना डोब्रा जमातीच्या माणसाशी एकांतात बोलण्याची संधी मिळणार होती. व या लोकांची मान खरच ३६० अंशामध्ये फिरते का हे पाहण्याची संधी मिळणार होती. पण घाई करून फायदा नव्हता. जॉनला थोडी जरी शंका आली असती तर तो गायब होण्याची शक्यता होती. विषय कसा काढायचा याचा विचार डॉक्टर करू लागले. डॉक्टरांनी दोन खुर्च्या समोरासमोर मांडल्या. एका खुर्चीवर ते स्वत: बसले आणि समोरच्या खुर्चीच्या बरोबर मागे त्यांनी आपली सुटकेस ठेवली. दहा मिनिटात दारावर टकटक झाली. जागेवरून न उठताच डॉक्टर जोरात म्हणाले.
"कम इन"
"सर मी जॉन"
"ओह जॉन, ये, मी तुझीच वाट पहात होतो. ये बस" असे म्हणून डॉक्टरांनी त्यास समोरच्या खुर्चीत बसण्यास सांगितले.
जॉन थोडा अनिच्छेनेच समोरच्या खुर्चीत बसला. डॉक्टर म्हणाले,
"हा तर जॉन, किती झाले माझे बील?"
"सर, सर्व मिळून ५८०० डॉलर झालेत."
"ठीक आहे, तू असं कर, मला बिलाची फायनल कॉपी इथेच बनवून दे. बिलावर माझं नाव लिही"
"ओके सर, काय नाव आपलं"
"शेणोय, डॉक्टर शेणोय"
"सर, स्पेल करता का प्लीज?"
"तुझ्या मागे सुटकेस आहे बघ. त्यावर लिहिलेय माझे नाव"
डॉक्टरांनी असे म्हणताच जॉन मागे बघण्यास आढेवेढे घेऊ लागला. व थोडा सावध झाला.
डॉक्टर म्हणाले, "अरे काय झालं? मागे बघना, सुटकेसवर नाव लिहिलंय"
डॉक्टर आता उतावीळ झाले होते. कधी एकदा जॉन मागे वळून बघतोय असे त्यांना झाले. जॉन खुर्चीतून उठू लागताच डॉक्टर म्हणाले,
"अरे उठतोस कशाला? बसूनच बघना"
असं म्हणताच जॉनने हातातील पेनाचे एक विशिष्ठ बटण दाबले ज्यामुळे पेनातून एक मोठं जाळं बंदुकीच्या गोळीसारखं डॉक्टरांच्या अंगावर आलं. त्या जाळ्यात डॉक्टर पूर्णपणे अडकले. क्षणाचाही विलंब न लावता जॉनने ते जाळे आवळण्यास सुरवात केली. जसं जसं जाळ आवळलं जाऊ लागलं तसतसे डॉक्टर त्यात जखडले जाऊ लागले. डॉक्टर जाळ्यात पुर्ण जखडले गेलेत आणि आजीबात हलू शकत नाहीत याची खात्री पटताच. जॉन ने जाळं आवळणं थांबवले. डॉक्टर या अनपेक्षित हल्ल्याने गर्भगळीत झाले. थोडा धीर करून म्हणाले, "जॉन, तू हे का करतोयस?"
"का करतोय?" मला तुमचा संशय जेव्हा तुम्ही माझे काउण्टरवर निरीक्षण करू लागलात तेव्हाच आला होता. आणि तुम्ही जेव्हा मला रूमवर बोलावलत तेव्हा माझी खात्रीच पटली कि तुम्ही डोब्राच्या मागावर आहात"
"अरे पण जॉन, मी तुला काय केलंय?"
"काही केलं नाहीये. पण तुमच्यासारख्या लोकांमुळेच आमचा वंश नामशेष होऊ लागला आहे. तुम्ही लोक काही आम्हाला जगू देणार नाहीत. जी काही थोडी थोडकी माणसं बाकी आहेत ती तुमच्यासारख्या लोकांमुळे घाबरून जीवन कंठत आहेत. काय घोडं मारलंय आम्ही तुमचं?"
"अरे जॉन माझे ऐक, मी तुला काहीही इजा करणार नाहीये. मला सोड, आपण बोलू."
"मला तुमचं काहिएक ऐकायचं नाहीये. तुम्हाला हेच पहायचे होते ना कि माझी मान ३६० अंशात फिरते कि नाही? हो फिरते." असे बोलून जॉन ने आपली मान ३६० अंशात गरकन फिरवून दाखवली. ते दृश्य बघून डॉक्टरांच्या अंगावर काटा आला. ते प्रचंड घाबरले. जॉन ने डॉक्टरांच्या ढुंगणावर एक सणसणीत लाथ हाणली आणि तो दरवाजा बाहेरून बंद करून निघून गेला.
तो बाहेर गेलाय हे बघितल्यावर डॉक्टर सरपटत रूम सर्विसच्या बटणापर्यंत कसेतरी पोहोचले आणि त्यांनी रूम सर्विसचे बटण दाबले.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
25 Oct 2014 - 6:36 am | स्वप्नज
वाचतोय. येऊ दे येऊ दे. पुढचा भाग लवकर येऊ दे....
25 Oct 2014 - 6:42 am | बहुगुणी
येउ द्या पुढचा भाग लवकर...
25 Oct 2014 - 7:48 am | मुक्त विहारि
पुभाप्र....
25 Oct 2014 - 9:27 am | जेपी
आवडल.
पुभाप्र
25 Oct 2014 - 9:30 am | जेपी
आणखिन एक
.
हि चित्र टाकुन लिवायची तुमची ष्टैल आमका आवडली आसां.
25 Oct 2014 - 9:48 am | खटपट्या
तुमका माजी ष्टैल आवडली, माका लय आनंद झाला. :)
25 Oct 2014 - 9:55 am | टवाळ कार्टा
झकास :)
रच्याकने ते डोब्रा मला...कोब्रा...देब्रा असे काहितरी वाटलेले..."डो" डोम्बोलीचा...मग कदाचित एका नविन क्यॅटेगरीचा जन्म याचिदेही बघायला मिळणार असे वाटुन गेले :)
25 Oct 2014 - 10:21 am | एस
आम्हांला पण असंच काहीतरी वाटलेलं. अति खतरनाक लेख!
25 Oct 2014 - 10:39 am | माम्लेदारचा पन्खा
मला पण वाटलं की डोंबोलीच्या ब्राह्मणांच्या वंशावळीची कूळ कथा आहे की काय? फटू बघून कळलं "हे" "ते" न्हायती.....
25 Oct 2014 - 2:26 pm | कवितानागेश
असंच वाटून घाबरत धागा उघडला. हुश्श...
मस्तय कथा. लवकर टाका पुढचा भाग.
25 Oct 2014 - 3:30 pm | टवाळ कार्टा
मौतैघाबरल्या...जोक ऑफ द डे =))
25 Oct 2014 - 4:21 pm | कवितानागेश
च्यायला! लोक्स इथे उगाचच जात-जात खेळायला लागल्यावर घाबरणार नाई तर काय?
25 Oct 2014 - 1:54 pm | अत्रन्गि पाउस
फारच झक्कास ...
हे पहा पुढचे भाग त्वरित येउद्यात ...
26 Oct 2014 - 10:44 pm | निनाद मुक्काम प...
झकास
27 Oct 2014 - 1:50 am | खटपट्या
स्वप्नज, बहुगुणी, मूवी, जेपी, टका, स्वैप्स, माप, लिमाउजेट, अत्रंगी पाउस आणि निनाद मुकादम आपणा सर्वांचे आभार. आपण दिलेल्या प्रतिसादांनी हुरूप वाढतो.
27 Oct 2014 - 5:10 pm | आनन्दा
च्या %$%$%& नावातल्या डोब्रावरून काहीतरी वेगळेच वाटले.. म्हणून आधी प्रतिक्रिया वाचल्या. पण ती तर साधी कथा निघाली. आम्हाला वाटले की दिवाळीनिमित्त्त फटाक्यांची आतिषबाजी केलेली असेल.
असो, कदाचित इतर साम्यस्थळे नंतर येतील.
28 Oct 2014 - 11:58 am | Maharani
मस्त कथा..पुभाप्र
2 Nov 2014 - 9:37 am | पैसा
जबरदस्त लिहिलंय!
2 Nov 2014 - 10:01 am | खटपट्या
पैसाताई, भाग दोन पण टाकलाय...