उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
21 Oct 2014 - 5:57 am

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.

कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.

उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे.

युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू.

(१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या.

(२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते.

(३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता.

(४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया.

(५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्‍या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्‍या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे.

(६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो.

जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?

(७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३.

(८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५.

(९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०.

(१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२.

(११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे.

(१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्‍या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.

पुन्हा घोडचुकीकडे

(१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही.

(१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही)

(१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ?

-जीएस

राजकारणविचार

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Oct 2014 - 8:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

झोपलेल्याला जागं करता येतं झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही.

अतिशय छान आणि उत्तम विश्लेषण !!

शिद's picture

21 Oct 2014 - 3:28 pm | शिद

+१

अवांतरः सगळेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यास उत्सुक आहेत. उप-मुख्यमंत्र्यांची खुर्ची अजूनपण ओली आहे की काय? ;)

चिगो's picture

29 Oct 2014 - 4:41 pm | चिगो

उप-मुख्यमंत्र्यांची खुर्ची अजूनपण ओली आहे की काय?

:D =))
लै म्हंजे लैच इंटेलिजन्ट टायपातला जोक आहे की हो.. मला कळायलाच दोन मिनटं लागली..

बॅटमॅन's picture

29 Oct 2014 - 4:52 pm | बॅटमॅन

=)) :D :D =)) =)) :D :D =)) =)) :D :D =)) =)) :D :D =))

शिद's picture

29 Oct 2014 - 5:26 pm | शिद

हा हा हा...धन्यवाद. :)

पिलीयन रायडर's picture

21 Oct 2014 - 9:17 am | पिलीयन रायडर

छान लेख..! विश्लेषण आवडलं...

मदनबाण's picture

21 Oct 2014 - 9:23 am | मदनबाण

विश्लेषण आवडलं...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

आनन्दा's picture

21 Oct 2014 - 9:41 am | आनन्दा

दिवाळीपर्यंत शिवसेनेने कोणताही निर्णय घेतला नाही आणि त्यानंतर जर शिवसेनेत मोठी फूट पडली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ६०/३ = २०, आणि १२३ + २० = १४३. तेव्हा शिवसेनेने सावध व्हावे हेच उत्तम.

दुश्यन्त यांनी येथे दिलेल्या खुलाश्यानुसार मी माझे शब्द मागे घेत आहे.

सुहास पाटील's picture

21 Oct 2014 - 10:09 am | सुहास पाटील

अतिशय उत्तम विश्लेषण. खर तर उद्धव ठाकरे ला अजुंनहि कळत नाही कि महाराष्ट्राच्या जनतेला काय हवय. पण त्याच्या अडमुढ्या भूमिकेमुळे उगाचच भाजप ला राष्ट्रवादीचा सपोर्ट घ्यावा लागेल.

अमित मुंबईचा's picture

21 Oct 2014 - 10:17 am | अमित मुंबईचा

एका बातमी अनुसार शरद पवार स्वतहाचेच आमदार फोडून भाजपा ला समर्थन देऊ शकतात

टवाळ कार्टा's picture

21 Oct 2014 - 10:25 am | टवाळ कार्टा

चायला हे झाले तर हैट्ट असेल...काही नेम नाही पवारांचा

अमित मुंबईचा's picture

21 Oct 2014 - 10:51 am | अमित मुंबईचा

शिवाय एका वर्षानंतर केंद्रात सपोर्ट देऊन एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मागण्याची चिन्ह आहेत

तरीही भाजप दूरान्वयेदेखील राकाँचा पाठिंबा घेईल असे वाटत नाही. याचे कारण म्हणजे भाजपाला महाराष्ट्रात किमात १० वर्षे तरी सत्तेत राहण्याची आशा आहे. अश्यावेळी ते राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची चूक करणार नाहीत. भाजपाच्या सामान्य मतदारांचा राष्ट्रवादीवर राग आहे. अश्यावेळेस जर त्यांचाच पाठिंबा घेतला तर हा परंपरागत मतदार भाजपापासून दूर जायची शक्यता आहे.

बहुधा १० दिवसात ते याचाच कानोसा घेणार असतील, म्हणूनच निर्णय दिवाळीच्या पुढी ढकलला आहे.

जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?

हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. मी अश्याच एका विश्लेषणाची वाट बघत होतो

शरद पवार आणि सत्ता असे समिकरण राष्ट्रवादीच्या जन्मापासुनच आहे ! मला वाटत नाही की हा पक्ष स्थापने पासुन सत्ते पासुन दुर राहिला असेल ! तसेही भाजपला बिनशर्त पाठिंबा आधी दर्शवुन त्यांनी पहिली खेळी खेळलीच आहे,यात दोन गोष्टी साध्य करता येतील. १} महाराष्ट्रातले यांचे अडकलेले मंत्री अडचणीत येउ नये याची दक्षता २} केंद्रात प्रफुल्ल पटेल एअर इंडियाच्या ७२०० कोटी तोट्याला कारणीभूत ठरले आहेत म्हणे ! त्यामुळे तिकडे त्यांचे विमान कोसळु न देणे.
आता शिवसेनेने आडमुठेपणा केला तर भाजपला { जरी लोक भाजपा+राष्ट्रवादी या युतीस अनुकुल नाहीत} शिवसेनेवर खापर फोडुन कोणत्याही अटीविना आणि न मागता दिलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी बरोबर नाइलाजाने जावे लागते आहे अशी घोषणा सुद्धा करतील. तिकडे मग शिवसेनेला हात चोळत बसुन "सामना" मधुन अफजल खान आणि त्यांचे सौन्य अशी आरडा-ओरडी करण्या पलिकडे काही करु शकणार नाहीत... शिवाय पक्षात मोठी फुट निर्माण होण्याची भिती निर्माण होइल ती वेगळी ! { हल्ली पक्षाची विचार सरणी वगरै सगळे फाट्यावर मारुन सत्ता / खुर्ची कशी मिळेल ? हेच पाहिले जाते} तेव्हा दिवाळीत पक्षाचे दिवाळे तर निघणार नाही याची काळजी पक्ष प्रमुख घेतील अशी आशा आहे.
आता भाजपासाठी :- २५ वर्ष युती असलेल्या सेने बरोबर परत युती केल्यास त्यांच्या विरुद्ध जनक्षोभ उसळणार नाही, शिवाय पवार कधी उडी मारतील त्याचा काही भरवसा नाही ! पण सध्या राष्ट्रवादीच्या नाड्या आवळण्याची शक्ती मात्र त्यांच्याच हातात आहे, हे शिवसेनेला कळु नये याचे मात्र नवल वाटते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

समीरसूर's picture

21 Oct 2014 - 12:32 pm | समीरसूर

शरद पवार नावाचे ग्रहण लागले आहे महाराष्ट्राला. ते सुटेल तो खरा महाराष्ट्रासाठी सुदिन म्हणावा लागेल. इतका अतिभयंकर स्वार्थी, सत्तापिपासू, कुठल्याही परिस्थितीत फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा, कुटिल, कारस्थानी, विश्वासघातकी, निर्लज्ज, जनतेची आणि राज्याची कवडीमात्र काळजी नसणारा पाताळयंत्री नेता महाराष्ट्रात दुसरा झाला नाही आणि होणारही नाही.

६२ वरून ४१ वर आले तरी राष्ट्रवादीचा माज जात नाही. आमचा जनाधार वाढला आहे म्हणे! किती हा निर्लज्जपणा! सगळीकडून राष्ट्रवादीची छीथू होत असते तरी यांची मुजोरी जात नाही. आपली जनता एक मूर्ख आहे; अजून या मतलबी आणि गुंडांच्या पक्षाला मते देते. हा पक्ष नेस्तनाबूत व्हायलाच हवा. त्याशिवाय महाराष्ट्राचे भले होणे नाही.याखेपेस भाजपने जर राष्ट्रवादीचा आधार घेतला तर भाजपची गत काँग्रेससारखीच होईल आणि पुढच्या खेपेस भाजप आऊट होणार हे नक्की. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, नारायण राणे...काय साले एक-एक फडतूस नेते मिळाले आहेत महाराष्ट्राला...दुर्दैव महाराष्ट्राचं...दुसरं काय?

उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, नारायण राणे...काय साले एक-एक फडतूस नेते मिळाले आहेत
हॅहॅहॅ... त्यातही राज ठाकरेंची गंमत वाटते मला ! उद्धव ठाकरेंशी फोनवरील चर्चेत भाजप असेच करणार होती हे मला बाहेर राहुन कळाले ते तुला कसे समजले नाही ? अशा आशयाचा प्रश्न त्यांनी विचारला होता. पण तुमच्या पक्षाचे राम कदम भाजपात का गेले ? तेव्हा हवा नक्की कुठल्या दिशेला वाहतेय हे यांना कळु नये ? ते सुद्धा लोक सभेचे निकाल समोर असताना ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

शरद पवारांना असली दुष्णे देऊ नये. जरी ती खरी असली तरी आणि तंतोतंत लागु पडत असली तरी !
आपल्या जीवाची काळजी घ्या जरा. एकटे बाहेर पडुनका सरकार स्थापन होई पर्यंत ! आणि तुमच्या गल्लीच्या तोंडाशी असलेल्या एन्सीपीच्या कार्यालयाच्या जवळ फिरकु नका. कोणाचा काय भरवसा ?

समीरसूर's picture

22 Oct 2014 - 9:06 am | समीरसूर

ही भीती पण आहेच. :-( आजकाल त्यांना कुणीही दूषणे देतं. आधीचा रुबाब राहिला नाही त्यांचा. ;-) 'जाणत्या राजा'ने एकदा आपल्याविषयी लोकं काय काय बोलतात हे पाहिलं/ऐकलं तरी 'अजूनही जनता माझाच विचार करते म्हणजे माझा जनाधार किती असामान्य आहे हे लक्षात येतं' असं म्हणून ते पुन्हा एकदा खुशीत एखादी चाल खेळण्यासाठी कामाला लागतील. नुसताच शुद्ध धूर्तपणा, दुसरं काहीच नाही! :-)

जयंत कुलकर्णी's picture

23 Oct 2014 - 4:42 pm | जयंत कुलकर्णी

मधे कोकणात गेलो होतो तेव्हा कोल्हापूरात चहासाठी एका टपरीत थांबलो होतो. चहावाल्याबरोबर गप्प मारताना नेहमीप्रमाणे गप्पा राजकारणाकडे वळला. शरद पवारांबद्द्ल त्याने जे उदगार काढले ते असे,
"अरे बाबा सुईणीला पोटात सापडणार नाही असा माणूस आहे तो '' एक नवी म्हण कळाली आणि त्याचा अर्थही अचूक समजला.... :-)

"अरे बाबा सुईणीला पोटात सापडणार नाही असा माणूस आहे तो"

=)) जबरदस्त.

"अरे बाबा सुईणीला पोटात सापडणार नाही असा माणूस आहे तो ''

अशा म्हणी कोकणातऽऽऽच सापडू शकतात !!

बॅटमॅन's picture

24 Oct 2014 - 2:13 pm | बॅटमॅन

जयंतराव थांबले होते कोल्लापुरात. तस्मात म्हण आहे ती कोल्लापुरातली.

हां आता कोल्लापूर कोकणात आहे असं म्हणायचं असेल तर मग हर्कत नाही. ;)

हे कोल्लापूर आमच्या कोकनाला लागून हाये. आणि आमी बर्याच येळंला कोल्लापूर मार्गे कोकनात उतर्तो.
सांप्रत हि म्हण मलकापूर मार्गे कोकणात उतरली असावी. असा अंदाज हाये.
अधिक सन्शोधण चालू हाये.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Oct 2014 - 1:18 pm | llपुण्याचे पेशवेll

आमचे गाव अस्सल कोकणात देवगड तालुक्यात असून आमचे गाव एकेकाळी कोल्हापूर झिल्ल्यात होते असे लिखित पुरावे आहेत. गावातले इनामदार आणि मिरासकीवर कोल्लापूरकर शाहूंची (होय तेच फुले, शाहू वाले) मोहोर मी पाहीली आहे. जुने कागद पत्र कोल्हापूरसंस्थानचे आहे. नंतर कधीतरी या कोकणी लोकांनी गेम करून आमचा गाव कोकणात ओढला. :-)
पूर्वी इतर कोकणवाले जसे हुंबईला पळतात तसे आमचे गाववाले आणि आजूबाजूचे लोक कोल्लापुरास पळायचे.

खटपट्या's picture

26 Oct 2014 - 6:52 am | खटपट्या

भौगोलिक दृष्ट्या जो भाग घाटाच्या खाली आहे तो कोकण असे विभाजन केले गेले बहुदा.

ओह अच्छा. माहितीकरिता धन्यवाद! काही भाग असेल म्हणा कोकणात. एकदम खाली अन एकदम पश्चिमेला आहे कोल्लापूर जिल्हा.

बॅटमॅन's picture

26 Oct 2014 - 12:41 pm | बॅटमॅन

अवश्य. कोल्लापूर कोकणाला लागूनच आहे, पण कोकणचा भाग नाही. :)

बॅटमॅन's picture

26 Oct 2014 - 12:44 pm | बॅटमॅन

आय मीन कोल्लापुर शहर.

मनिमौ's picture

21 Oct 2014 - 12:04 pm | मनिमौ

र्‍आ र्का चा स्पोर्त घेऊ नये

टवाळ कार्टा's picture

21 Oct 2014 - 1:03 pm | टवाळ कार्टा

तुमि मौतैच्य दुअयदि क?

मनिमौ's picture

21 Oct 2014 - 12:10 pm | मनिमौ

ंअला नादेद आनि औरन्गाबाद च्या लोका चि कीव वातते. ़या रझाकारा विर्द्धा मराथ्वादा लधला त्याचा आदर्श थेवलेल्या पक्शाला मतदान करु नये. आसे मला वातते

समीरसूर's picture

21 Oct 2014 - 12:22 pm | समीरसूर

आकड्यांच्या आणि गणिताच्या आधारे ठोस विश्लेषण!! आवडले आणि पटलेदेखील...

क्लिंटन's picture

21 Oct 2014 - 12:36 pm | क्लिंटन

जबरदस्त विश्लेषण जी.एस. अशा प्रकारचे विश्लेषण मला करायचे होते पण गेल्या दोन दिवसात ते करायला वेळ मिळाला नाही. या विश्लेषणासाठी लागणारा माझा वेळ वाचवल्याबद्दल आभारी आहे :)

प्रतिसादांमधून टेबल टाकून नक्की कोणत्या मतदारसंघांमध्ये असे निकाल फिरले हे दाखविता येईल का?

माझ्या जिव्हाळ्याच्या या चर्चेत मी अजून भाग घेईनच. पण सध्यापुरते एवढेच लिहितो.

श्रीगुरुजी's picture

21 Oct 2014 - 12:39 pm | श्रीगुरुजी

आकड्यांच्या आधारे केलेले मुद्देसूद विश्लेषण पटले. उद्धव ठाकरे किंवा शिवसेना कधी सुधारतील असे वाटत नाही, कारण ते त्यांच्या डीएनए मध्येच नाही. शिवसेना कायम भावनिक प्रश्न, पोकळ वल्गना, असभ्य टीका इ. गुंतुन राहिली. अजूनही ते भ्रमातच आहेत आणि भ्रमातच राहतील.

मोहन's picture

21 Oct 2014 - 1:03 pm | मोहन

धन्यवाद जी.एस. बहुतेकांच्या मनात असलेला कयास आपल्या विश्लेषणाने कन्फर्म झाला असेल.
बाकी ऊद्धवजीं बद्द्ल काय बोलावे ? विनाश काले विपरीत बुद्धी होउ नये म्हणजे मिळवली.

दुश्यन्त's picture

21 Oct 2014 - 2:09 pm | दुश्यन्त

उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे समजणाऱ्या लोकांसाठी - आता पक्ष फोडायला १ /३ नाही तर २/३ सदस्य लागतात नाहीतर आमदारकी रद्द होवू शकते. तेव्हा सेना ६३* २/३= ४२ इतके आमदार फुटतील असे स्वप्न पाहणार्यांनी जागे व्हावे.
हा एनसीपी फुटू शकते किंवा पवार साहेब स्वतः फुटली असे दाखवू शकतात. असेही एन्सिपिने भाजपला बाहेरून पाठींबा जाहीर केला आहेच (बाहेरून पाठींबा म्हणजे आतून फुल सेटिंग असते हे सगळे जाणतात). माझ्या मते सेनेने सरळ विरोधात बसावे. लोकांना भाजपा आणि राष्ट्रवादी (मोदींच्या भाषेत नॅचरली करप्ट पार्टी‘, महाभ्रष्टाचार वादी वगैरे) यांचे साटे लोटे उघड होवू द्यावे. विरोधी पक्षनेते पद (कॅबिनेट दर्जा) शिवसेनेलाच मिळेल.

उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे समजणाऱ्या लोकांसाठी
भाजपचा गेमप्लॅन, सेनेला सत्तेपासून दूर ठेवणार!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

अश्या उलट सुलट बातम्या येतातच हो.
मी सेना फुटेल असे समजणार्यांसाठी लिहितोय. सेना फोडायची तर ४२ आमदार फोडावे लागतील हे शक्य नाही. त्यापेक्षा एनसीपी फोडा. किंवा पवार स्वताच एनसीपी फोडून देतील.पवार साहेबांच कुणी काही सांगू शकत नाही. मात्र एन्सिपिने बाहेरून पाठींबा दिला तरी किंवा एक गट फुटून पाठींबा दिला तरी त्याची किंमत वसूल करणारच ना.

येस्स.. मी माझे शब्द मागे घेत आहे.

दुश्यन्त's picture

21 Oct 2014 - 2:16 pm | दुश्यन्त

पक्ष फोडणे एवढे सोप्पे असते तर भाजपवाल्यांनी दिल्लीत केव्हाच सरकार बनवले असते. तिथे सुरुवातीला ३ आणि आता ५-६ आमदार कमी पडत आहेत तरी सरकार बनवायला किंवा सरळ निवडणुका घ्यायला घाबरत आहेत आणि इथे कुठला पक्ष फोडणार? आणि समजा एनसीपी फोडला किंवा त्यांचे बाहेरून समर्थन घेतले तरी त्याची किंमत द्यावी लागणारच ना. एनसीपी काय खैरात म्हणून पाठींबा देणार काय? त्यांची मोठी किंमत भाजपा आणि जनतेला चुकवावी लागणार आहे. सेना आडमुठेपणा करत आहे पण भाजपही तेच करत आहे. मुळात केंद्रात १८ खासदार असताना त्यांनी सेनेला १ मंत्रिपद तेही अवजड खाते देवून खिजवले आणि आता एनसीपीशी सेटिंग करून दबाव आणत आहेत.

दुश्यन्त's picture

21 Oct 2014 - 2:52 pm | दुश्यन्त

खरेतर दोन्ही शिवसेना भाजप आडमुठे आहेत. भाजपने कर्नाटकात आणि बिहारमध्ये अनुक्रमे कुमारस्वामी आणि मायावतीला त्यांच्या जागा कमी असताना पण मुख्यमंत्री केले होते. कुमारस्वामी बरोबर २०-२० महिन्याचा करार झाला होता त्याने २० महिने मुख्यमंत्री पद भोगले आणि नंतर भाजपला टांग दिली होती. असेही प्रसंग आहेत.सत्ता भाजपला बनवायची आहे आता त्यांनी पुढाकार घेवून सेनेकडे जायला हवे. सोनिया गांधी २००४ ला सगळ विसरून पवारांच्या घरी बोलणी करायला गेल्या होत्या.
भाजपला अनुकूल असच बोलायचं झाल तर माझ्या मते खालील पर्याय असू शकतात. :
१) सेनेने विरोधी पक्ष नेते पद घ्यावे. विश्वास दर्शक ठरवला गैरहजर/ तटस्थ राहावे. सरकार तरेल. विधानसभेत सभापती भाजपचा आणि उपसभापती सेनेचा करावा. म्हणजे कॉंग्रेस- एनसीपीला सुरुवातीला तरी पदेच मिळू देवू नयेत. नंतर ६ महिने- एक वर्षाने सेनेने सत्तेत येवून बसावे. या बदल्यात भाजपने सेनेला केंद्रात १ कॅबिनेट, १-२ राज्यमंत्रीपदे, एखाद राज्यपाल पद द्यावे. भाजपला यात जास्त फायदा आहे कारण राज्यात त्यांची पूर्ण सत्ता राहील.
२) सेनेने भाजपला बाहेरून पाठींबा द्यावा. वरील पैकी विरोधी पक्षनेतेपद पण सेनेकडून जाइल.(इथे पण भाजपचाच जास्त फायदा होईल मात्र सरकारवर सेनेचे नियंत्रण राहील)
३) भाजपने सरळ आधी सरकार बनवावे.अपक्ष, बविआ धरून १३५ आमदार तरी बरोबर येतीलच. भाजपने सांगावे ज्यांना सरकार पडायचे त्यांनी पाडावे आम्ही कुणाला पाठींबा मागत नाही. यात एनसीपी तटस्थ राहून/पाठींबा देवून सरकार वाचवेलच. एकदा सरकार बनवल तर नंतर सेनेशी वाटाघाटी करायला सोपे जाइल कारण सेनेला सत्तेत बसायचाच असल्यास ते मिळेल तेवढी मंत्रिपदे घेतील नाहीतर विरोधात बसतील. मात्र यात भाजपचा तोटा म्हणजे विश्वासार्हता पणाला (भाजप आणि मोदींची पण) लागेल.हा धोका आहे.

टवाळ कार्टा's picture

21 Oct 2014 - 4:17 pm | टवाळ कार्टा

१) सेनेने विरोधी पक्ष नेते पद घ्यावे. विश्वास दर्शक ठरवला गैरहजर/ तटस्थ राहावे. सरकार तरेल. विधानसभेत सभापती भाजपचा आणि उपसभापती सेनेचा करावा. म्हणजे कॉंग्रेस- एनसीपीला सुरुवातीला तरी पदेच मिळू देवू नयेत. नंतर ६ महिने- एक वर्षाने सेनेने सत्तेत येवून बसावे. या बदल्यात भाजपने सेनेला केंद्रात १ कॅबिनेट, १-२ राज्यमंत्रीपदे, एखाद राज्यपाल पद द्यावे. भाजपला यात जास्त फायदा आहे कारण राज्यात त्यांची पूर्ण सत्ता राहील.

+१

अन्नू's picture

21 Oct 2014 - 3:00 pm | अन्नू

काय बोलनार??
एक कटु सत्य-
भाजप कधीही- शिवसेनेलाच काय पण युतीतल्या कुठल्याच पक्षाला 'मुख्यमंत्री' वा 'उपमुख्य मंत्री' पद देणार नाहीत!
वास्तविक बघायला गेलं तर, लोकांनी समोरच्या पुढार्‍याला बघून वोट केलेलं आहे. उरली सुरली कसर पैशाने भरुन काढली आहे!
पण हे, भाजप लोक कधीच मान्य करत नाहीत. सगळं यश फक्त आणि फक्त मोदीमुळेच आलंय असं त्यांचं मत आहे. अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचायला लागलेत मोदींना!
अहो ज्यावेळी कर्नाटकच्या सिमावादात मराठी भाषिकांना बेकायदेशीरपणे- बेदम मारहाण करण्यात आली तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी?
रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी?
रेल्वे विकली- व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला- आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले- महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली. या सर्वांवरुन महाराष्ट्रीयनांनी मोदीकडेच बघून मतदान केले असेल का?
अच्छे दिन आले- नक्की कोणाचे? सामान्य जनतेचे कि बड्या उद्योगपत्तींचे?

सत्तेवर आल्यापासून किती मंत्र्यांचे ब्लॅक मनी भारतात आणले?
महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं!

नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले-
"ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?"

छे! राहु द्या. जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे! शेवटी काय? कॉन्गेस तिथे बिजेपी! आणि पुढे..
येरे माझ्या मागल्या!

आनन्दा's picture

21 Oct 2014 - 4:39 pm | आनन्दा

महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं!

नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले-
"ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?"

जरा लिन्का पण द्या.

बाकी कांदा आज ४०-५० रू किलो आहे. गेल्यावर्षी दिवाळीत ८०-९०च्या पुढे गेला होता.

प्रदीप's picture

21 Oct 2014 - 6:12 pm | प्रदीप

तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी?

रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी?

रेल्वे विकली

व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला-

आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले-

महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली

उगी, उगी! आपण ना त्या मोदीच घर उन्हातच बांधूया. आणि त्याचबरोबर त्याला व त्याच्या पार्टीच्या लोकांना निवडून देणार्‍या तमाम जन्तेचंही. काही कळतच नाही मेल्यांना.

अजून तुमचे येऊ दे असेच काही. आम्हाला अशी अगाध माहिती देऊन उपकृत करत रहावे.

धर्मराजमुटके's picture

21 Oct 2014 - 6:29 pm | धर्मराजमुटके

आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले-

मला वाटत मोदी अमेरीकेला गेले तेव्हा आरबीआयवाल्यांनी चुपचाप आपले कार्यालय गुजरातमधे हलवले असेल.
महाराष्ट्रातल्या नागरीकांना दु:खी व्ह्यायचे काम नाही.
सगळ्या भाजपवाल्यांच बाप ( स्वारी पितृसंघटना) इथे महाराष्ट्रातच बसलाय. म्हणजे महाराष्ट्रच सर्वात मोठा आहे. कल्लावं कायं ?

श्रीगुरुजी's picture

21 Oct 2014 - 9:11 pm | श्रीगुरुजी

>>> अहो ज्यावेळी कर्नाटकच्या सिमावादात मराठी भाषिकांना बेकायदेशीरपणे- बेदम मारहाण करण्यात आली तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी?

कर्नाटकातील मराठी भाषिकांना बेदम मारहाण करणारे सरकार काँग्रेसचे होते. तेव्हा कोठे गेले होते सोनिया, राहुल आणि मंडळी? हा प्रश्न सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. दोन राज्यांच्या सीमावादात केंद्राने तटस्थ भूमिका घेऊन वादात न पडणे हेच उत्तम!

>>> रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी?

कोणतीही सेवा सतत तोट्यात चालविली जाऊ शकत नाही.

>>> रेल्वे विकली-

कधी ? कोणी ? कोणाला ? केवढ्याला ? जरा आम्हालाही कळू दे हा व्यवहार?

>>> व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला-

कधी ? कोणी ? एल बी टी लावणे किंवा काढून टाकणे हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. भाजपचे सरकार या क्षणापर्यंत सत्तेत आलेले नाही. त्यामुळे त्यांनी हे काढून टाकणे संभवतच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने काढला असल्यास मोदींना शिव्या का?

>>> आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले-

कधी ? कोणी ? जरा सविस्तर व विश्वसनीय माहिती देता का? मोदींनी बहुतेक माध्यमांवर सेन्सॉरशिप लादली असावी. अशा महत्त्वाच्या बातम्या कोणत्याच माध्यमातून कशा आल्या नाहीत?

एकंदरीत शिवसेनेने सोशल मिडियावर पसरवलेल्या अफवांवर काही गलीबल मंडळी अजूनही डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत असं दिसतंय.

>>> महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली. या सर्वांवरुन महाराष्ट्रीयनांनी मोदीकडेच बघून मतदान केले असेल का?

महागाई निर्देशांकाचा गेल्या ३ वर्षातील नीचांक झाला आहे. १६ मे २०१४ च्या तुलनेत पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ७ पेक्षा जास्त रूपयांनी कमी झाले आहेत. डिझेलचे भाव २-३ साडेतीन रूपयांनी कमी झाले आहेत.

>>> अच्छे दिन आले- नक्की कोणाचे? सामान्य जनतेचे कि बड्या उद्योगपत्तींचे?

सर्वांचेच

>>> सत्तेवर आल्यापासून किती मंत्र्यांचे ब्लॅक मनी भारतात आणले?

परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे म्हणजे नाक्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी आणण्याइतके सोपे वाटले का?

>>> महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं!

असे कोणताही नेता म्हटलेला नाही. याबाबतीत जरा पुरावे देता का?

>>> नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले-
"ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?"

असे कोणताही नेता म्हटलेला नाही. याबाबतीत जरा पुरावे देता का?

दुश्यन्त's picture

21 Oct 2014 - 3:05 pm | दुश्यन्त

मात्र सरकार ज्याला बनवायचं असत त्याने पुढाकार घ्यायचा असतो हे विसरून लोक सेनेलाच धोपटत आहेत. एनडीए / युपीए किंवा राज्यातही सरकार बनवताना मोठमोठे पक्ष अपक्षांच्या पण नाकदुर्या काढतात. इथे तर सेनेकडे ६३ आमदार आहेत. राजकारणात ६३ आकडा छोटा नसतो. आणि हे बवीआ किंवा अपक्ष भाजपला साथ देतील ते काही असंच येणार नाहीत. त्याची किंमत वसूल करणारच. आणि एनसीपीबरोबर जायचं म्हटल (बाहेरून / आतून कसाही ) तर त्याची किंमत मोठीच असणार. भाजपला ते परवडत असेल तर तसं कराव. आणखी एक साध बहुमत हव तर भाजपला १४५ आमदार लागतील मात्र मोठे निर्णय घ्यायचे, सरकार चालवायचे तर नुस्त १४५ असून भागणार नाही. एकतर विधान परिषदेत सेना भाजप अत्यंत कमजोर आहेत. त्यांना मजबूत बहुमत हव आहे . शिवसेना सोबत आल्यास १२३+६३ = १८६ अस मजबूत बहुमत विधानसभेत असणार आहे यामुळे सरकार चालवायला अडचण येणार नाही. तेव्हा भाजपने फक्त कमी पडणार्या २२ जागांचा नव्हे तर सोबत येणाऱ्या ६३ जागांचा विचार करायला हवा.

सुहास..'s picture

21 Oct 2014 - 3:46 pm | सुहास..

मी राजकारणी आहे, आणि मला जितक राजकारण समजतं त्यावरुन , भाजपाचा इतिहास पाहिला की , त्यांना मित्रपक्ष संपवायची सवय का आहे तेच कळत नाही ( आठवा जॉर्ज फर्नांडिस, आहेत कुठे सध्या ? ) , मित्रपक्ष तर मित्रपक्ष, ते तर अंतर्गत भाजपा चे इनिशियेटर पण संपवतात, उदा. उमा भारती, अटल जीं तर, काल-परवा पोस्टरवरून पण गायब झालेत :)

असो उध्दव ला व्हिलन ठरविले जातेय आज महाराष्ट्रात, पण जो काही तो खेळतोय, मला आवडतय , त्याला हे चांगल माहीतीये की पत्ते त्याच्या हातात आहेत, ते ही हुकुमाचे, आणि जर त्यात अदित्य शामील असेल मग सोने पे सुहागा !! मी वर लिहिलेला इतिहास हा प्रत्येकालाच माहीत आहे , राजकारण असे करतात, आधी राज ला गोंजारले गेले, अंदाज घेतला गेला , गडकरी घरी जावुन भेटले, मग युती सेने बरोबर, लोकसभेच्या लाटेत राज ओव्हर-ऑन्फिडेन्स मध्ये वाहुन गेला ! पुढे आल्या विधान सभेच्या , सर्वांसमोर असे चित्र निर्माण करण्यात आले की सेने मुळे युती तुटली , संभ्रम मिडिया च्या जोडीने, तो ही हळु-हळु, जेणे करुन वाटावे सेनाच जबाबदार आहे ! सेनेचा मुळ मुद्दा होता, भाजपाकडे मुख्यमंत्री म्हणुन चेहरा नसणे, आणि म्हणुन ते १५१+ मागत होते. फडफडणविसांच नाव पुढे येत होते, वेगळ्या विदर्भाच गाजर दाखवणं एकीकडे, तर दुसरीकडे मी सेनेविषयी बोलणार नाही हे वक्तव्य मोदींचे, तिकीटे वाटपाला लागलेला उशीर , उमेदवार न सापडणे , सगळ्या च पक्षात आयात-निर्यात झाली , त्यात सेनेलाही त्रास झालाच ..कमी झाला तो भाजपा ला , कारण लाट !! जे येतय ते भाजपात घुसतय ... असो ..फडणविसांची मध्यंतरी, मला वाटते या वर्षी, जानेवारी मध्ये , आमदार निधी वापर केल्याची यादी बघत होतो , ३९ % टक्के होती, शिवाय त्यांना प्रशासकीय कामकाजाची कितपत माहीती आहे, त्याची आकलन-शक्ती, मिडीयासमोर बोलण्याची कला आणि त्यांच्या वागळ्यांबरोबरच्या कार्यक्रमात असलेली आक्रमकता इ. पाहता मला स्वतः ला हा माणुस अयोग्य वाटत होता, दिल्लीतील भाजपाला मात्र असाचा रिमोट-कन्ट्रोल्ड माणुस पाहिजे असतो, पंकजा च ही नाव पुढे करण्यात येत होतं , ते सेना त्याला आक्षेप घेणार नाही म्हणुन ..असो , मुद्दा काय की मंत्री पद !! आता संपल्यात निवडणूका , प्रतिक्षा आहे सरकात बनविण्याची.

भाजपाकडे जितक्या जागा आहे , त्यात त्यांना ते सहज शक्य आहे, राज्यपाल सर्वात मोठ्ठा पक्ष म्हणुन त्यांना निमंत्रित करणारच ! राज्यपाला कडुन सहा महिने मुदत घ्यायची बहुमत सिध्द करण्याची ( आता राज्यपाल त्यांनीच आणुन बसविलाय म्हणजे , तो दर दोन महिन्यांनी वाढवुन ही देऊ शकतो, आहे एक नियम !! १५ - २० जण कुठ्नतरी फोडायचे पोट निवडणुकांमधुन निवडुन आणायचे , आणि बहुमत सिध्द करायचे !! दुसरे म्हणजे गैर सेना पक्षाचा पाठिंबा घ्यायचा, मग त्यात कॉग्रेस नाही म्हणालीय आधीच, राहिली राष्ट्रवादी , ते ही बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहेतच !!

या दोन्ही बाबी केल्या तरी मजा अशी येणार आहे की , भाजपाची पब्लीकमधली प्रतिमा थोडी का असेना डागाळेलच ....उध्दव ने च काय अश्या वेळी मी जरी असतो तरी , पत्ते दाबुन धरले असते !! शेवटी राजकारण आहे , स्वार्थ असतोच !! गम्मत आहे ..

( ते शरद पवार, सिंचन च्या घोटाळ्यापासुन वाचण्यासाठी बाहेरून पाठिंबा देत आहेत असे एकले, त्याविषयी, आणि पुण्यात आठच्या आठ भाजपा आमदार आणि महापालिका याविषयी एक ब्रेक के बाद... )
टीप : ही सेनेची जाहिरात नव्हे ..

क्लिंटन's picture

21 Oct 2014 - 5:37 pm | क्लिंटन

आठवा जॉर्ज फर्नांडिस, आहेत कुठे सध्या

जॉर्ज फर्नांडिस वाढत्या वयामुळे आणि त्याबरोबर आलेल्या अल्झायमरमुळे राजकारणात सक्रीय नाहीत.ते २००५-०६ पासूनच राजकारणात थोडे कमीच दिसू लागले. त्यांना २००९ मध्ये नितीश कुमारांनी लोकसभेसाठी उमेदवारी दिली नव्हती.त्यामुळे त्यांनी मुझप्फरपूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि त्यात त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यानंतर नितीश कुमारांनी त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवून त्यांना राज्यसभेवर पाठवले. राज्यसभेसाठीचा अर्ज भरायला जाताना त्यांना धड चालताही येत नव्हते.मला वाटते आता त्यांची राज्यसभा टर्म संपली आहे. अल्झायमरमुळे त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालू आहे याचे कितपत आकलन होत असेल याची कल्पना नाही.पण या सगळ्यात भाजपा कुठे आला?

राज्यपाला कडुन सहा महिने मुदत घ्यायची बहुमत सिध्द करण्याची ( आता राज्यपाल त्यांनीच आणुन बसविलाय म्हणजे , तो दर दोन महिन्यांनी वाढवुन ही देऊ शकतो, आहे एक नियम

हा नक्की कोणता नियम आहे याविषयी लिहिता येईल का? समजा भाजपाचे सरकार स्थापन झाले असे समजू. त्यानंतर विधानसभेचे अधिवेशन होईलच.निवडणुकांनंतर विधानसभेचे पहिले अधिवेशन असल्यामुळे त्यात राज्यपालांचे अभिभाषण होईल.आणि त्यावर धन्यवाद प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून घ्यावा लागेल.त्या मतदानात सरकारचा पराभव झाला तर सरकार कोसळेल. अन्यथा तगेल.आणि हा प्रस्ताव विधानसभेचे अधिवेशन संपायच्या आतच मंजूर करून घ्यावा लागेल.तेव्हा राज्यपाल बहुमत सिध्द करायला पहिल्यांदा सहा महिने मग दोन महिने देणार यासगळ्याची तर्कसंगती लागली नाही.

सुहास..'s picture

21 Oct 2014 - 5:52 pm | सुहास..

जॉर्ज फर्नांडिस वाढत्या वयामुळे आणि त्याबरोबर आलेल्या अल्झायमरमुळे राजकारणात सक्रीय नाहीत.ते २००५-०६ पासूनच राजकारणात थोडे कमीच दिसू लागले. त्यांना २००९ मध्ये नितीश कुमारांनी लोकसभेसाठी उमेदवारी दिली नव्हती.त्यामुळे त्यांनी मुझप्फरपूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि त्यात त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यानंतर नितीश कुमारांनी त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवून त्यांना राज्यसभेवर पाठवले. राज्यसभेसाठीचा अर्ज भरायला जाताना त्यांना धड चालताही येत नव्हते.मला वाटते आता त्यांची राज्यसभा टर्म संपली आहे. अल्झायमरमुळे त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालू आहे याचे कितपत आकलन होत असेल याची कल्पना नाही.पण या सगळ्यात भाजपा कुठे आला? >>>

पोस्ट वाचल्या गेली नाही नीट !! भाजपाची साथ मग नितीश ने का सोडली ब्वा ! त्यांनी आधीच ओळखले की मित्रपक्ष संपवण्याची सवय ..बाकी अडवाणी आणि अटलजींना पण अल्झायमेर झाला असल्यास नक्की कळवावे ....अरे हो , मी इतकेच सांगतोय ..तो छान खेळवतोय , भाजपचे प्रयोग त्यांचा अंगाशी येवु शकतात यामुळे ( तुझ भाजप प्रेम कधीच आहे ते माहीत आहेच मला )

राज्यपाल बहुमत सिध्द करायला पहिल्यांदा सहा महिने मग दोन महिने देणार यासगळ्याची तर्कसंगती लागली नाही. >>> सरकार स्थापन करताना " यादी देवुन झाली की मुदत देता येत नाही, हा नियम तुला माहीत नसावा याच आश्चर्य वाटले ...२० एक मतदार संघामध्ये पोटनिवडणुका ही करवता येतील !! एकदम सहा महिने नाही, टर्म वाढवणे !! या आधारावर देता येतात. राज्यपाला ला आहे तो अधिकार

क्लिंटन's picture

21 Oct 2014 - 6:26 pm | क्लिंटन

बाकी अडवाणी आणि अटलजींना पण अल्झायमेर झाला असल्यास नक्की कळवावे

अडवाणींना नक्कीच नाही पण अटलजींना वाढत्या वयाशी संबंधित असाच आजार आहे (बहुदा अल्झायमरच).

सरकार स्थापन करताना " यादी देवुन झाली की मुदत देता येत नाही, हा नियम तुला माहीत नसावा याच आश्चर्य वाटले

नाही खरोखरच माहित नाही. जरा स्पष्टीकरण दिल्यास बरे होईल. कसली यादी?कसली मुदत?

सुहास..'s picture

24 Oct 2014 - 5:25 pm | सुहास..

आपल्या कडे येणार्‍या इतर उमेदवारांना गैरहजर रहाण्यास सांगणे आणि हजर आमदारांच्या २/३ बहुमत सिध्द करून घेणे !!

टवाळ कार्टा's picture

24 Oct 2014 - 10:52 pm | टवाळ कार्टा

आयला असे पण असते???

क्लिंटन's picture

24 Oct 2014 - 10:58 pm | क्लिंटन

आमदार फोडायचे असतील तर हा पण एक मार्ग आहेच की. तरीही प्रस्तुत महाशय नक्की कोणती यादी आणि कसली मुदत म्हणत आहेत याचा उलगडा काही शेवटपर्यंत झालेला नाही. असो. मनसेच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर असे होणे स्वाभाविकच आहे म्हणा.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Oct 2014 - 1:26 pm | llपुण्याचे पेशवेll

सोडून द्या हो. मोदीद्वेशाचि कावीळ राजकारणी म्हणवणार्‍याना न जाणो काय काय करायला लावेल अजून.
१. नितीश कुमार आणि तु.आ.उद्धव यांची बोलाचाली आठवते का? उद्धव म्हटला होता की तुला मुख्यमंत्री म्हणून पाठींबा देणार नाही. त्यावर नितीशने त्याची उघड टर उडवलेली दिसली "अरे मांगा किसने है?". म्हणजे कदाचित एनडीए आले असते तर नितीशला पंतप्रधान होण्याचे डोहाळे होते. परंतु जसा भाजपने मोदिला पुढे आणला तसे याला कळाले केएलपीडी झाले आहे आपले. आणि हो ह्या मनसेने जो आत्यंतिक सेनाद्वेषकरून समस्त पब्लिकचे मनोरंजन केले त्याना कसे ऐनवेळेला सेनेला कवटाळावेसे वाटले.

श्रीगुरुजी's picture

21 Oct 2014 - 9:24 pm | श्रीगुरुजी

>>> भाजपाची साथ मग नितीश ने का सोडली ब्वा ! त्यांनी आधीच ओळखले की मित्रपक्ष संपवण्याची सवय

२०१२-१३ मध्ये असे वातावरण होते की २०१४ च्या निवडणुकीत १९९६ प्रमाणे त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल. १९९६ प्रमाणेच काँग्रेसच्या पाठिंब्याने अनेक प्रादेशिक पक्षांचे कडबोळे सरकार अस्तित्वात येईल असा अंदाज येत होता. त्यावेळी नवीन पटनाईक, नितीशकुमार, जयललिता, मुलायमसिंग हे ३-४ तगडे प्रादेशिक नेते भावी पंतप्रधान असतील अशी चर्चा सुरू होती. अशावेळी आपण भाजपबरोबर असू तर पंतप्रधानपदासाठी आपला विचार होणार नाही हे नितीशकुमारांच्या लक्षात आले. तसेच बिहार विधानसभेत स्वतःला पुरेसे बहुमत असल्याने भाजपची साथ सोडली तरी आपले सरकार कोसळणार नाही हेही त्यांचे गणित होते. त्यावर विसंबून नितीशकुमारांनी भाजपला लाथ घातली. भाजपने प्रादेशिक संपविण्याच्या आरोपांचा व नितीशकुमारांनी वेगळे होण्याचा काहीही संबंध नाही.

>>> ..बाकी अडवाणी आणि अटलजींना पण अल्झायमेर झाला असल्यास नक्की कळवावे

अटलबिहारी वाजपेयी वार्धक्य व विस्मरणाच्या आजारामुळे गलितगात्र आहेत. याच कारणांमुळे त्यांनी २००९ ची निवडणुक लढविली नव्हती. मोदींचा राष्ट्रीय पातळीवर उदय २०१३ मध्ये झाला. वाजपेयी राजकारणातून बाहेर पडले याचा मोदींशी दुरूनही संबंध नाही.

अडवाणी जरी सक्रीय होते तरी त्यांच्या नावावर आता पुरेशी मते मिळत नाहीत हे २००९ मध्येच सिद्ध झाले होते. त्यांचे वयही खूप जास्त आहे (नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांना ८७ वर्षे पूर्ण होतील). त्यांच्याप्रमाणे मुरली मनोहर जोशी देखील थकलेले आहेत. त्यांनी स्वतःहूनच सक्रीय राजकारणातून बाहेर पडून मेंटॉरची भूमिका घ्यायला हवी होती. त्यांना मंत्रीपद न देऊन मोदींनी योग्य निर्णय घेतलेला आहे.

>>> ....अरे हो , मी इतकेच सांगतोय ..तो छान खेळवतोय , भाजपचे प्रयोग त्यांचा अंगाशी येवु शकतात यामुळे

काही काळानंतर कळेल त्यांचे प्रयोग भाजपच्या अंगाशी येतात का ते?

सुहास..'s picture

22 Oct 2014 - 2:33 pm | सुहास..

लवकर बरे व्हा !!

( ही प्रार्थना अर्थातच सर्वच नमोरुग्णांसाठी आहे )

सतिश गावडे's picture

22 Oct 2014 - 2:44 pm | सतिश गावडे

सुहास, ते बाकीच्या पक्षांचे जाऊ दे. त्यांच्याबद्दल लिहिणारे खुप आहेत.

तू तुझ्या पक्षाचे या निवडणूकीत पानिपत का झाले त्यावर लिही ना. तू आतल्या गोटातला असल्यामुळे अगदी "राईट फ्रॉम हॉर्सेस माऊथ" असं तुझं प्रांजळ विश्लेषण वाचायला आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2014 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तू तुझ्या पक्षाचे या निवडणूकीत पानिपत का झाले त्यावर लिही ना. तू आतल्या गोटातला असल्यामुळे अगदी "राईट फ्रॉम हॉर्सेस माऊथ" असं तुझं प्रांजळ विश्लेषण वाचायला आवडेल.

सहमत !!!

-दिलीप बिरुटे

सुहास, ते बाकीच्या पक्षांचे जाऊ दे. त्यांच्याबद्दल लिहिणारे खुप आहेत. >>>

तू तुझ्या पक्षाचे या निवडणूकीत पानिपत का झाले त्यावर लिही ना. तू आतल्या गोटातला असल्यामुळे अगदी "राईट फ्रॉम हॉर्सेस माऊथ" असं तुझं प्रांजळ विश्लेषण वाचायला आवडेल. >>>

फिरकी घेतोयस की खरच !
"आंजावर आभासी दुनियेत राहणार्‍या, राजकारण म्हणजे थट्टा वाटणार्‍या, इलेक्ट्रॉनिक मिडियाने प्रभावित आणि गोंधळलेल्या पब्लीकपुढे लिहायच्या आधीच मी जरा कचरतो, कचरत का असेना लिहिणार तर आहेच , लिहिन सावकाश ..भरारी पासुन ते पानिपत पर्यंत !!

सध्यापुरते हे एक ..

सुनील, जगदीश आणि मी , एकाच कॉलेजात, चांगले मित्र ! जगदीश अभाविप चा अध्यक्ष, मी विद्यार्थी सेनेचा , सुनील माझ्याबरोबर उपाध्यक्ष, पहिल्याच वर्षी आम्ही ' बापु ' नावाच्या सिनीयर ची ' अ‍ॅन्टी- रॅगींग ' कॅम्पेन चालवुन 'गुंडगिरी' संपविली, आमची त्याला इतकी दहशत लागली की त्याची कॉलेज च्या कॅन्टीन पर्यंत देखील यायची त्याची हिम्मत होईना ....मागच्या वेळेस आम्ही तिघे ही सोबत होतो ..तेव्हा वेगळे नव्हते , पण उमेदवार ही चांगला नव्हता " बापु " आमच्या वार्डात आमदार म्हणुन निवडुन आला , त्या दिवसापासुन आम्ही तिघांनी त्याला पछाडला होता , सुनील आणि जगदीश पुर्ण वेळ 'राजकारणात' असल्याने त्यांना पक्ष लाभला , सुनील सेनेत, जगदीश पहिल्यापासुन थोडासा मितभाषी, संयमी असल्याने , भाजपात ( आसाही आधी अभाविपलाच होता ) ...मी मनसे ची कास धरलेली ....तिघांचे कार्पोरेशन चे वार्ड वेगवेगळे ..अधुन मधुन आम्हा तिघांच्या भेटी-गाठी व्हायच्या ...आम्ही तिघांनी 'बापु' ला चागंलाच पिडला आप-आपल्या वार्डमध्ये , सुनील, त्याची नगरसेवक वहिनी आमदारच्या पक्षाची असली तरी तो त्याच्या वार्डात आरती उतरावयचा , जगदीशचा भाउ तिकडे भाजपाचा नगरसेवक, ति तिकडे त्याला कुटून काढायचा , आणि शिफारस पत्रासाठी मला बघुन एकदा 'बापु' ने पेनच फेकुन दिला होता. ( एका दलीत वस्तीतल्या बुध्द विहाराचे बजेट मला , हापशा-पंपा साठी वळवुन घ्यायचे होते, दुष्काळामुळे पाणी नाही प्यायला !! अर्थात नंतर तिथल्या ब्राम्हणानेच विहार बाधुन दिला हे विषेश ..ती पुर्ण कथा परत कधीतरी ) ...दोन वर्षापुर्वी सुनील च संजय शी वाजल ..दोन खासदारांची शिफारस पत्रे पाहिजे होती, मनरेगा साठी , लय दिवस टाळा-टाळ झाली. शेवटी कृष्णकुंज वर गेला , तिथुन डायरेक्ट फोनच गेला, पत्र-निवेदन काही नाही ...रस्ता झालाच शेवटी ..हा इकडे येवुन मिळाला, मी गेली दोन वर्षे त्याचा प्रचार करत होतो , ऐन वेळी म्हणजे आदल्या दिवशी पर्यंत मनसेत असलेला सुनील .दुसर्‍या दिवशी दुपारी सेनेतुन फॉर्म भरायला गेला ....मला पार दुसर्‍या दिवशी खबर !! तु माझ्या जागी असते तर काय केले असते , ज्या उमेदवाराला मी ओळखत ही नाही, त्याचा प्रचार कसा करु ...माझ्या तोंडुन एका ठिकाणी भरगच्च गर्दीत सुनील लाच व्होट करा हे निघुन गेले .....शेवटी पार पडल एकदाचे कसमसं ...सुनील १७०० व्होट ने पडला फक्त ..मनसेच व्होटिंग होतं ४००० , बापु १००% निधी वापरुन ही तरी ही तीन नंबर ला ठासला गेला .....आणि जगदीश च काम आमच्या तिघांपेक्षा थोडं कमीच असुन , वय कमी असुन ( माझ्यापेक्षा एका वर्षांने तरुण आहे तो , बहुधा सर्वात कमी वयाचा आमदार म्हणुन त्यालाच ओळख असेल विधानभवनात ) आमदारकी गळ्यात पडली !!
या ला म्हणतात राजकारण !!

असो ..२० ला वाढदिवसच्या दिवशी दोघांचे ही फोन आले , चांगले १०-२० मिनीटे बोलत होतो , कॉलेजला एकदा बापु ची ठासली होती, निवडणुकीत पण ठासली, हा त्या चर्चेचा मुद्दा होता .....आणि त्याच निमीत्ताने , आमच्या इथला आमदार हा कुठल्याही पक्षाचा असो, कॉलेजच्या मात्र आमच्याच असावा ..ही परंपरा देखील राखली गेली :)

वाह! काय बोललात!! पण नक्की काय बोललात? ;)

सुहास..'s picture

22 Oct 2014 - 4:10 pm | सुहास..

म्हणुनच लिहित नाही ;)

तुषार काळभोर's picture

23 Oct 2014 - 3:34 pm | तुषार काळभोर

आधी काहीच नव्हतं कळलं. शेवटी मतांच्या फरकावरून अंदाज आला, अन् परत मित्रांची नावे वाचली. मग उजेड पडला.
तुमच्या मतदारसंघात एव्ह्ढं काही घडलंय याचा काहीच अंदाज नव्हता. असो, बर्‍याच ठिकाणी, बर्‍याच वेळा असं घडत असेल.

बाकी लढतींचं चित्र जेव्हा स्प्ष्ट झालं, तेव्हा "सुनील"च्या नावापुढे रेल्वेइंजिन ऐवजी तिकडचं चिन्ह असलेले फ्लेक्स बघून थोडा कन्फ्युज झालो होतो. पेपरात वाचून तर प्रिंटिंग मिस्टेक वाटली होती.

*तुम्ही म्हणालात म्हणून मी सुनील म्हणालो. नाहीतर कुणाचाही एकेरी उल्लेख करण्याएवढा माझा आवाका नाही.

सतिश गावडे's picture

22 Oct 2014 - 4:42 pm | सतिश गावडे

>> फिरकी घेतोयस की खरच !
फिरकी नाही रे. मनापासून लिहिलं आहे. मी ही कधी काळी त्या विचारांनी भारावलो होतो. पाच वर्षांपुर्वी तिकडे अमेरिकेत होतो तेव्हा उत्तर भारतीय रुम-मेट होते. त्यांच्याशी वाद घालायचो. जे काही चालू आहे ते इथल्या भूमीपुत्रांसाठी कसं आवश्यक आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचो. नक्की काहीतरी चांगलं घडेल याबाबत आशावादी होतो.

असो. तो आता भूतकाळ झाला. :)

सुहास..'s picture

22 Oct 2014 - 5:05 pm | सुहास..

जे काही चालू आहे ते इथल्या भूमीपुत्रांसाठी कसं आवश्यक आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचो. नक्की काहीतरी चांगलं घडेल याबाबत आशावादी होतो. >>>

भुमीपुत्रांसाठी आजही आवश्यक आहे ते !! नेमका मुद्दा काय होता ते सांगतो , नंतर त्या भोवती मिडिया ने कसा पांगविला/बिघडवला ते सांगतो ...( आठ वर्षाचा कच्चा-चिठ्ठा एका वाक्यात, एका पॅरा मध्ये नाही सांगता येणार , म्हणुन म्हणतो आहे सावकाश लिहिण ते ! नाशीक मनपा मध्ये जे घडल तेच आता पुणे महापालेकत होणार आहे हे माझ तोकड्या ज्ञानाने काढलेले भाकीत, येत्या दोन दिवसात सांगेन आधी !! )

माझ्याकडे, कॉर्पोरेशन, असो वा नगर पालिका असो , एक बजेट येते दरवर्षी , जर बजेट २०११ च असेल, तर त्यात लोकसंख्या गृहीत धरली जाते २०१० ची ( ५ % अधिक धरली जायला लागली मनसेच्या, त्या वेळच्या आंदोलनामुळे ) ...आता विचार कर माझ्याकडे बजेट आहे , १०००० लोकांचे , जर त्यात अजुन १२००० घुसविले तर कुठुन देणार सुविधा ? बर , हे जे १२००० येतात, ते १०००० लोक जे काही मिळवुन देणार आहेत, त्यातल्या ५००० चा धंदा बशविणार, वर दादागिरी ही करणार ...हा मुद्दा होता ...हे आलेच नाही लोकांसमोर ...एका तासाच्या भाषणातलं फक्त " इथे आमच्या मराठी महिलांना उत्तर भारतीयांमुळे त्रास होतो " हे वाक्यच उचलले गेले भाषणातले !! अश्या आणि अश्या बर्‍याच गोष्टी आहेत ..मिडियाने वागळंलेल्या गोष्टीपैंकी एक !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2014 - 4:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजकारण तसा आता चेष्टेचा विषय झाला आहे आणि अशी चेष्टा झाली ती काही राजकीय लोकांमुळेच. तो विषय सोडा बाकी माध्यमांनी पब्लिकवर काय प्रभाव पाडला आहे, पब्लिक कसं गोंधळलेलं असतं ते सर्व सोडा. मनसे या पक्षाचं पनीपत का झालं त्यावर आपलं काय मत आहे , ते वाचायला आवडेल.

-दिलीप बिरुटे

सुहास..'s picture

22 Oct 2014 - 5:21 pm | सुहास..

ही ही ही !
आजकाल सगळ्यांना सगळ काही इनस्टंट पाहिजे हा ही एक मुद्दा असणार आहे लेखात ...मला आता मेसेज आलाय " स्वाईप युवर क्रेडीट कार्ड अ‍ॅन्ड टेक होम द न्यु कार " ज्या स्पीड ने मी कार विकत घेवु शकतो , त्या स्पीड ने ' कोणाचही सरकार आलं तरी , प्रशासनाकडुन त्या स्पीड मध्ये " रस्ता " बनवु शकत नाही !!

पानिपताच विश्लेषण एका वाक्यात किंवा पॅराग्राफ मध्ये करायला पत्रकारितेचे, परुळेकर वा वागळेंचे गुण अंगात असावे लागतात ! लिहेन म्हटल ना सावकाश ...लाबंलचक लेख आहे , नंतर वाचायला कंटाळताल !! काही हायलाईट्स लिहिल्यात ऑलरेडी ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2014 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनसेच्या पनिपताचं कारण आम्हाला आता जवळ जवळ माहिती आहे. अखिल महाराष्ट्रानं 2014 च्या प्रगती पुस्तकात कोणाला किती गुण मिळाले ते पाहिलं आहे. BLO (बूथ लेवल ओफ़िसरला) ला जसं कोणाचं घर कुठे असतं हे जसं तपशीलवार माहिती असतं तसं पक्षाचं काम करणा-याला अशाच कार्यकर्त्याला पनिपताची कोणती कारणं वाटतात की त्यांनाही दैनिकात आलेल्या चिंतन बैठकीतुन येणा-या प्रेस नोट सारखी 'धोरणं' हीच कारणं वाटतात म्हणुन हा प्रपंच.

बाकी इन्स्टंट हवं हे जालाचं वैशिष्ट्य तुम्ही पाच वर्षानंतर लिहाल आम्ही वाचकांनी तेव्हा वाचायची का ती सुधारीत आवृत्ती. असो जेव्हा लिहायचं तेव्हा लिहा आमच्या प्रतिसादापुरता हा विषय संपला. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

तुम्हीपण !! ओक्के ओक्के !! चालु द्यात ...

दुश्यन्त's picture

22 Oct 2014 - 5:53 pm | दुश्यन्त

वडगाव शेरी का?

Dhananjay Borgaonkar's picture

22 Oct 2014 - 3:51 pm | Dhananjay Borgaonkar

मलाही खरच आवडेल हे वाचायला.
मनसे गाळात जाणार होतीच पण एवढी वानवा होइल असं वाटलं नव्हतं.
अर्थात एका निवडुणीकीच्या निकालावरुन कुठला पक्ष संपत नाही हा भाग निराळा.

अवांतर - एकच राहुन राहुन वाटतं वाघाची झुल अंगावर चढवली तरी वाघ होता येत नाही, बाळासाहेबांसारख्या स्टाईली मारुन बाळासाहेब होता येत नाही.

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2014 - 5:28 pm | श्रीगुरुजी

>>> लवकर बरे व्हा !!

विश यू द सेम!

अर्थात मी मुद्देसूद उत्तर दिल्यावर तुमच्याकडे काहीच मुद्दा उरला नसल्याने दुसर्‍यांना बरे होण्याचे सल्ले तुमच्यासारख्यांकडून येणारच.

मच्याकडे काहीच मुद्दा उरला नसल्याने दुसर्‍यांना बरे होण्याचे सल्ले तुमच्यासारख्यांकडून येणारच. >>>

खुप आधी पासुन बघतोय .अर्धवट वाक्ये उचलुन मुद्दा धरताय आणि प्रत्येक गोष्ट मोदींशी कनेक्ट करताय, म्हणुन मी तुम्हाला टाळतोय ..आणि यापुढे ही टाळणार ....आपली नाय बाबा लायकी तुमच्याशी संवाद ई. साधायाची !! { तुम्ही तेच ना मी कांदा-आयात-धोरणाविषयी, विचारल्यावर मागणी पुरविठा चे सुविचार एकवणारे ! ( बी.कॉम च्या पेपरमध्ये मार्क मिळतात त्याने ) विषयच संपला }

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2014 - 6:02 pm | श्रीगुरुजी

प्रतिसादाबद्दल आभार!

मनसेची का वाट लागली हे तुमच्यासारख्यांच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय.

सुहास..'s picture

22 Oct 2014 - 6:07 pm | सुहास..

धन्यवाद !

दिवस सगळे सारखे नसतात गुर्जी , याच मिपावर सोनिया ने भाजपा ( अटल सरकार , इंडिया शायनिंग म्हणे ) ला मारलेली पाचर ही पाहिली आहे, त्यामुळे जितका उन्माद करायचा तो करुन घ्या .....अर्थात , शेवटी कांद्याचा प्रश्न राहिलाच हे आठवण करण्यासाठी ...मुद्दे अजुन आहेतच ..८०० पैंकी फकत १३० नावे , कत्रांटी कामगारांना परमनंट करताना मी माझ्या खिशातले पैसै का द्यायचे ? दररोजचा एक देतातहेत मोदी ...

कपिलमुनी's picture

22 Oct 2014 - 6:09 pm | कपिलमुनी

असल्यांना हा नमोरुग्ण लै भारी शब्द आहे .

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2014 - 6:23 pm | श्रीगुरुजी

उन्माद म्हणा किंवा अजून काहीही नावे ठेवा, जनतेने मोदींना २०१९ पर्यंत मँडेट दिलेला आहे. हा मँडेट तो कसा वापरतात यावर त्यांची २०१९ मधील कामगिरी अवलंबून राहील. २०१९ मध्ये २००४ प्रमाणे काँग्रेस अनेक प्रादेशिक पक्षांबरोबर युती करून निवडणुक लढवेल असं वाटतंय.

बादवे, कांदा आयात/निर्यात हा दरवर्षीचाच मुद्दा आहे. त्यात नवीन काहीच नाही. कांदा आयात/निर्यात या प्रश्नावर फारसे मतदान होत नाही. मात्र कांदा भाववाढ हा मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळे कोणतेही सरकार कांदा उत्पादकांपेक्षा कांदा ग्राहकांच्याच हिताचे निर्णय घेणार. हे पूर्वीही झाले आहे आणि भविष्यातही होत राहील.

सुहास..'s picture

22 Oct 2014 - 6:29 pm | सुहास..

कांदा आयात/निर्यात हा दरवर्षीचाच मुद्दा आहे. त्यात नवीन काहीच नाही. कांदा आयात/निर्यात या प्रश्नावर फारसे मतदान होत नाही. मात्र कांदा भाववाढ हा मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळे कोणतेही सरकार कांदा उत्पादकांपेक्षा कांदा ग्राहकांच्याच हिताचे निर्णय घेणार. हे पूर्वीही झाले आहे आणि भविष्यातही होत राहील. >>

सेनेचे निफाड चे उमेदवार ( हो तेच ज्याची महिलेला मारहाण करताना क्लिप मिडीयामध्ये गाजली ) ते याच आंदोलनावर गेली कित्येक वेळा निवडुन आलेत .......कांदा ग्राहकाच्या , मतासांठी, शेतकर्‍याच्या पोटावर उठलेत हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद ( कॉग्रेस ने हे का करत नव्हता हे त्यामुळे कळले मला )

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2014 - 6:34 pm | श्रीगुरुजी

>>> कांदा ग्राहकाच्या , मतासांठी, शेतकर्‍याच्या पोटावर उठलेत हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद

कांदा आयात करणे म्हणजे शेतकर्‍यांच्या पोटावर उठणे ही अतिशयोक्ती आहे.

>>> ( कॉग्रेस ने हे का करत नव्हता हे त्यामुळे कळले मला )

हे वाक्य समजले नाही. काँग्रेस कांद्याचे भाव वाढल्यावरसुद्धा कांदा आयात करत नव्हता असे म्हणायचे आहे का?

कांदा आयात करणे म्हणजे शेतकर्‍यांच्या पोटावर उठणे ही अतिशयोक्ती आहे. >>

नाही गुर्जी , अतिशयोक्ती नाही , वार्षिक ४५,००० रू. जगतात ती लोक ! एक पीक वाया गेले की सरकार ला पॅकेज द्यावे लागते, अर्थात ( कोणाला तरी ३७ रू चेक ची उदाहरणे आहेत ) , याचा भार पडतो ट्रेझरी वर हे एक ..आणि त्याला ४५००० रू . वार्षिक आहे ना, त्याला वेळेवर न पॅकेज न मिळाल्यास तो गळा आवळुन घेतो मालक !! आपण( इथे आपण म्हणजे आपण दोघे ) एसी केबीन मध्ये आंजावर टाईप करण्याइतपत सोप्प नाहीये .

( चर्चा मुळ पातळीवर येते आहे त्याबद्दल आनंद आणि आधीच्या शब्दाबद्दल दिलगिरी, बस्स ते मोदीचं आधंळ पालुपद बंद करा हि विनंती )

काळा पहाड's picture

23 Oct 2014 - 12:25 am | काळा पहाड

पण त्याचा उपाय म्हणजे कांद्याचे भाव मुद्दाम वाढवणे असा होत नै. सरकारनं कांदा उत्पादकांसाठी आत्तापर्यंत धोरण ठरवलेलंच नाही. भाव पडले, करा निर्यात. भाव वाढले करा आयात. याला भाव कृत्रिमरित्या नियंत्रित ठेवणं असं म्हणतात आणि ते धोरण काही प्रमाणातच चालू शकतं. ज्याला दूरदृष्टीचे निर्णय म्हणतात, ते शेतकर्‍यांच्या बाबतीत घेतले गेलेले नाहीत कारण ते घेण्यासाठी जी अक्कल लागते आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे नियोजन लागतं ते भारतीय जनतेकडे (आणि म्हणूनच सरकारकडे) नाहीये.

परफेक्ट. यासाठी तुम्ही चांगली गोदामे तयार करा. शेतकर्‍यांमध्ये जाग्रुती करून वेगवेगळी पिके घ्यायला लावा. आणखीन काही वेगळे उपाय करा.
कृत्रिमरीत्या भाव नियंत्रण करणे म्हणजे मूळ रोग दाबून ठेवणे आहे. तो कधी ना कधी वर येणारच.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2014 - 12:49 pm | श्रीगुरुजी

हे पूर्वीही असेच सुरू होते व भविष्यातही असेच सुरू राहणार. कोणतेही सरकार आले तरी भाव वाढल्यामुळे संपूर्ण १२५ कोटी जनतेचा रोष पत्करण्यापेक्षा तुलनेने कमी संख्येने असलेल्या पीक उत्पादकांची नाराजी पत्करणे कोणत्याही सरकारचे धोरण असते. कोणतेही सरकार एकाच वेळी ग्राहक व उत्पादकांना खूष ठेवू शकत नाही. याबाबतीत सरकारची धोरणे बदलणे शक्य नाही.

चौकटराजा's picture

23 Oct 2014 - 8:59 am | चौकटराजा

आतापर्यंत उसाला भाव वाढवून द्या कांद्याला भाव वाढवून द्या , पे कमिशने नेमा, सर्वीस सेकटरला प्राधान्य द्या असे करून
महागाई वाढत चालली आहे. एक तर सर्वाची खरेदी सरकारनेच करून घेतली पाहिजे किंवा बाजार पूर्णपणे मुक्त केला पाहिजे.
किंवा किमान तेले कांदे बटाटे तांदूळ गहू अशा वस्तूंच्या जुगारी खरेदी विक्री वर शेअर बाजारासारखे लोअर अपर सर्किट असे काहीतरी केले पाहिजे. कांदा भाव कोसळले म्हणजे शरद पवार अश्रू ढाळतात यात जंणू देशात १०० कोटी कांदा उत्पादकच आहेत असे त्यांचे गणित असावे.

प्रसाद१९७१'s picture

24 Oct 2014 - 1:59 pm | प्रसाद१९७१

@सुहास, तुम्हाला कळकळीची विनंती, तुम्ही तुमच्या पक्षाची अवस्था अशी का झाली आहे त्याच्या काळजी करावी. काही उपाय योजना करायच्या असल्या तर त्याबद्दल कराव्या.
भाजप कसा मित्रांना दगा देतो, देवेंद्र कसे अयोग्य आहेत हे सारखे सारखे बोलुन तुमच्या पक्षाला काहीच उपयोग होणार नाहीये.

भाजप ( आणि जनसंघ ) गेल्या ५० पेक्षा जास्त वर्ष सात्यत्याने प्रयत्न करत आहेत, कार्यकर्त्यांच्या आणी नेत्यांच्या २ पिढ्या सत्तेचे तोंड सुद्धा न बघता गेल्या. असे काम करत रहाणे तुमच्या पक्षाला जमले तर तो सुद्धा १०-१५ वर्षात सत्तेवर येइल.

काळा पहाड's picture

24 Oct 2014 - 2:58 pm | काळा पहाड

फारच आशावादी ब्वा तुम्ही. राज साहेबांना आमचा कितीही मनापासून पाठिंबा असला तरी ते स्वतः काम करायला झटताहेत हे दिसत नाही तोपर्यंत मते मिळणार नाहीत. आणि त्यांची मधे मधे चमको असण्याची सवय मोडेल असं वाटंत नाही. उद्धवनाही तोच प्रॉब्लेम आहे पण निदान त्यांच्याकडे बापजाद्यांची कमावलेली पार्टी कम इस्टेट तरी आहे.