नागोबा डुलाया लागला...

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
20 Oct 2014 - 12:51 pm

आमचा एक मित्र. घराणं पूर्वापार काँग्रेसी. घराच्या भिंतीवर नेहरु, इंदिरा गांधी याच्या तसबिरी. घरातल्या मोठ्या माणसांची नावे संजय राजीव अशी तर मुलांची नावे राहुल प्रियांका अशी.

मी एवढ्यात या मित्राला फोन केला. त्याचे घराणे पिढ्यानपिढ्या काँग्रेसनिष्ठ. आजोबा सरपंच. याचे वडिल काँग्रेसकडून आमदार. बंधू काँग्रेसकडून आमदार. पुढे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकता येत नाही असं ध्यानात आल्यावर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली पण मोदीलाटेत वाहून गेले. आता याने आपल्या पत्नीला भाजपाकडून उभे केले. ती आमदार बनली.

आता हे लोक आम्हाला जम्मू-काश्मीर, कलम ३७०, अखंड हिंदूस्थान याबद्दल सांगणार का ? दिनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मोठेपण यांच्या तोंडून आम्हाला ऐकावे लागणार का... असा प्रश्न पडू लागलाय.

मित्रांनो ज्या लोकांनी संघाच्या स्थापनेपासून हिंदूत्त्वाला साथ दिली. आणिबाणीच्या मुस्कटदाबीला ज्यांनी कडाडून विरोध केला. तुरुंगवासही भोगला. प्रसंगी सांप्रदायिक, गांधीजींचे मारेकरी असे आरोप झेलले. त्या लोकांनी एवढे कष्ट घेऊनही कधी सत्तेची हाव धरली नाही. बहुधा हीच चूक झाली. हिंदूत्त्वाच्या वारुळावर आज भलते सलते नागोबा येऊन डुलायला लागलेत. आमच्याच घरात आम्ही पाहुणे झालो आहोत. उद्या काय होणार हा मोठा प्रश्न आहे...

(यातली उदाहरणे, नावे काल्पनिक असली तरी वस्तुस्थितीचा अंदाज यावा यासाठी दिली आहेत)

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

फोटोफ्रेममेकरकडे कधी गेलात काय ?त्याचे प्रेम, कळवळा कोणत्या फोटोवर असेल असे तुम्हाला वाटते ?

आशु जोग's picture

20 Oct 2014 - 1:17 pm | आशु जोग

फोटो प्रेम आणि नावे यांना लटकून झोके खेळू नका

जमल्यास पुढील पॅरेग्राफपासून वाचायला सुरुवात करा

संग्राम's picture

20 Oct 2014 - 2:12 pm | संग्राम

पक्षांतर बंदी कायद्याबद्दल अधिक माहिती नाही ...

पण माझ्या मते निवडणूकीवेळी पक्ष बदलणार्‍या उमेदवारांना कमीत कमी १ निवडणूक लढण्याची बंदी असावी किंवा किमान ५ वर्षे पक्षाचा सभासद असलेले लोकच निवडणूक लढवण्यास पात्र ठरावेत :)

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2014 - 2:23 pm | प्रभाकर पेठकर

किमान ५ वर्षे पक्षाचा सभासद असलेले लोकच निवडणूक लढवण्यास पात्र ठरावेत
आणि एकाहून अधिक पक्षांचे सभासदत्व कायद्याने नाकारावं.

सुनील's picture

20 Oct 2014 - 2:29 pm | सुनील

किमान ५ वर्षे पक्षाचा सभासद असलेले लोकच निवडणूक लढवण्यास पात्र ठरावेत

तसे झाले तर कुठलाही नवा पक्ष पहिले पाच वर्षे निवडणूकाच लढवू शकणार नाही. मग पाच वर्षे पक्ष पोसायचा कसा? म्हणजे निवडणूका लढवायच्या आतच पक्षाचा मृत्यू ठरलेला!

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2014 - 2:43 pm | प्रभाकर पेठकर

NGOs कशा पोसल्या जातात तसाच पोसायचा पक्ष.
'शिवसेना राजकारणात पडणार नाही' असे वक्तव्य बाळासाहेबांनी शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात केले होते. नक्की आठवत नाही पण ५ पेक्षा जास्त वर्षे शिवसेना राजकारणात नव्हती. महाराष्ट्रातून 'लुंगी हटाव', उपहारगृह धंद्यातून 'उडप्यांना हटाव' आणि महाराष्ट्रात मराठी माणसांना ८० ट्क्के जागा राखीव असाव्यात ह्या कार्यक्रमात शिवसेना व्यस्त होती.

आशु जोग's picture

20 Oct 2014 - 11:15 pm | आशु जोग

5 वर्षाची सक्ती असायला हवी

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Oct 2014 - 2:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आशू, काय रे हे? तुझ्यासारख्या मुत्सद्द्याकडून ही अपेक्षा नव्हती.
'याला राजकारण ऐसे नाव' म्हणतात ना! असो. ७०च्या दशकात प्रकार होताच. ज्या संघाने बाबू जगजीवन राम ह्यांच्या विरोधात दंड थोपटले त्यांना नंतर पावन करून घेतले.

मुक्त विहारि's picture

21 Oct 2014 - 6:02 am | मुक्त विहारि

पुर्वी मराठे सरदार आदीलशाही-निजामशाही करत बसायचे आजकाल पक्षांतर करत बसतात.

स्वतःची मीठ-भाकरी स्वतःलाच कमवावी लागते, हेच सत्य.

बाकी दुनिया गेली तेल लावत.

सतिश गावडे's picture

21 Oct 2014 - 9:33 am | सतिश गावडे

कालातीत सत्य !!!

आशु जोग's picture

25 Oct 2014 - 12:41 am | आशु जोग

फरक पडतो ना