बोटावर न मोजता येतील इतके दिवस असतात ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
4 Oct 2014 - 4:43 am

बोटावर मोजतां येतील इतकेच दिवस उरलेले
दहावे बोट करंगळी
ती मोडली की त्या रात्री त्याची पोर जाणार असते
तिची चालू असते लगबग
आणि वेगाने सुरु होते आवराआवरी .
सगळ्याच ब्यागा भरून ठेवते
नि उरते शेवटची छोटी ब्याग
मोजके सामान
ध्यानाची माळ
काही पुस्तके ..
ती डॉलरचा हिशेब करीत असते रुपयात
नि घेत रहाते महाग महाग वस्तू नको तितक्या
उदा. खिडकीवरचे पडदे .बाळाचे मोजे ,स्वेटर ,शर्ट ,टी शर्ट ,
एखादी जीन्सची प्यांट
नव-यासाठी त्याला आवडतात तसे कपडे

ती रमून जाते भविष्यकाळात
तिचे जात नसतात हे शेवटचे दिवस
ती आतुर, व्याकुळ
तिला ओढ लागलेली असते तिच्या जाण्याची
तिचे बाबा मात्र खुंटीला बांधून टाकावे का दिवस
असा विचार करीत गरगरत राहातात
दिवस कोणीतरी ओढून नेत असतो
नको तितक्या वेगाने...

ती म्हणत राहते आम्ही येऊ दिवाळीत
नाहीतर नक्कीच ख्रिसमसला
तो दिवस मोजू लागतो
मार्चचे ३१,एप्रिलचे ३० ,मे चे ३१
नि मन गोंधळून जाते
बोटावर न मोजता येतील इतके दिवस असतात
न संपणारे.....!!

प्रकाश

मुक्तक

प्रतिक्रिया

आतिवास's picture

4 Oct 2014 - 2:20 pm | आतिवास

बापाचे मनोगत व्यक्त करणारी कविता आवडली.

चित्रगुप्त's picture

4 Oct 2014 - 3:38 pm | चित्रगुप्त

कवितेतली भावना थेट भिडली.

रमेश आठवले's picture

5 Oct 2014 - 3:25 am | रमेश आठवले

१+

आदूबाळ's picture

4 Oct 2014 - 4:12 pm | आदूबाळ

छान लिहिलं आहे.

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2014 - 9:08 am | प्रभाकर पेठकर

दम आहे मुक्तकात.

एक वेगळ्याच प्रकारची विराणी म्हणावी का?

श्रीरंग_जोशी's picture

5 Oct 2014 - 9:12 am | श्रीरंग_जोशी

मुक्तक आवडले

पिवळा डांबिस's picture

5 Oct 2014 - 9:56 am | पिवळा डांबिस

मुलगी सासरी निघाली की कोणत्याही बापाच्या मनी ही भावना येणं सहाजिक आहे...
पण त्या भावनेला डॉलर वैग्रे अमेरिकन (परदेशी) झालर लावून टाळ्या मिळवण्याच्या प्रयत्नांचं हसू आलं!!!!
महाराष्ट्रातली मुलगी जर अरुणाचल प्रदेशात सोयरीक लावून निघाली असेल तर हेच सगळं लागू पडेल, फक्त ते डॉलर वैग्रे उल्लेख वगळून!!!!

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2014 - 2:06 pm | प्रभाकर पेठकर

पण खरोखर मुलगी अमेरिकेला निघाली असेल तर उगीचच त्या भावनेला डॉलर वैग्रे अमेरिकन (परदेशी) झालर लावून टाळ्या मिळवण्याच्या प्रयत्नांचं हसू येईल म्हणून डॉलरचा उल्लेख टाळण्याइतकं अमेरिकेला जाणं म्हणजे पाप आहे का?

पैसा's picture

5 Oct 2014 - 4:07 pm | पैसा

कविता आवडली!

प्रकाश१११'s picture

5 Oct 2014 - 10:49 pm | प्रकाश१११

मनापासून आभार सर्व मित्रांचे .