बोटावर न मोजता येतील इतके दिवस असतात ..!!
लेखनविषय:
बोटावर मोजतां येतील इतकेच दिवस उरलेले
दहावे बोट करंगळी
ती मोडली की त्या रात्री त्याची पोर जाणार असते
तिची चालू असते लगबग
आणि वेगाने सुरु होते आवराआवरी .
सगळ्याच ब्यागा भरून ठेवते
नि उरते शेवटची छोटी ब्याग
मोजके सामान
ध्यानाची माळ
काही पुस्तके ..
ती डॉलरचा हिशेब करीत असते रुपयात
नि घेत रहाते महाग महाग वस्तू नको तितक्या
उदा. खिडकीवरचे पडदे .बाळाचे मोजे ,स्वेटर ,शर्ट ,टी शर्ट ,
एखादी जीन्सची प्यांट
नव-यासाठी त्याला आवडतात तसे कपडे
ती रमून जाते भविष्यकाळात
तिचे जात नसतात हे शेवटचे दिवस
ती आतुर, व्याकुळ
तिला ओढ लागलेली असते तिच्या जाण्याची
तिचे बाबा मात्र खुंटीला बांधून टाकावे का दिवस
असा विचार करीत गरगरत राहातात
दिवस कोणीतरी ओढून नेत असतो
नको तितक्या वेगाने...
ती म्हणत राहते आम्ही येऊ दिवाळीत
नाहीतर नक्कीच ख्रिसमसला
तो दिवस मोजू लागतो
मार्चचे ३१,एप्रिलचे ३० ,मे चे ३१
नि मन गोंधळून जाते
बोटावर न मोजता येतील इतके दिवस असतात
न संपणारे.....!!
प्रकाश
वाचने
1718
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
आवडली.
थेट भिडली.
In reply to थेट भिडली. by चित्रगुप्त
१ +
छान लिहिलं आहे.
अस्वस्थ पिता...
मुक्तक आवडले
सहाजिक आहे
In reply to सहाजिक आहे by पिवळा डांबिस
सत्याला सामोरे जा....
कविता आवडली!
मनापासून आभार सर्व मित्रांचे