AN ODE TO मिसळपाव ! प्रथम पुष्प

मारवा's picture
मारवा in जे न देखे रवी...
29 Sep 2014 - 5:09 pm

मिसळप्रेमींनो !मनोगतींनो ! उपक्रमींनो ! वातानुकुलीत अक्षरींनो ! सर्वसंस्थळसंचारी आंतरजालीय फ़ुलपाखरांनो !
साक्षेपी सात्विक सेन्सॉरी कर्तरीकर्म कुशल संपादकांनो ! किंचीत पक्षपाती आयडीवलयांकीत-स्तिमीत संपादकांनो !
खरया खुरया खोट्या नाट्या भल्या बुरया आयडींनो त्यांच्या डुआयडींनो ! त्यामागील दुर्देवी देवराई निवासींनो !
माहीती जमवुन जमवुन घोळुन रंगवुन माहीतीच्या महामार्गावर माहीतीचा उच्छाद मांडणारया माहीतगारांनो !
स्व-रचित ललित मुग्ध “पुल”कीत गोड गोड लयीत “ललित” लिहत लिहत लेखणी लाल करणारया ललित लेखकांनो!
अध्यात्माची अखंड अविरत धारा प्रवाहीत करणारया धमनी तील धग विझलेल्या धार्मीक धागा लेखकांनो !
रंग माझा वेगळा विषय माझा वेगळा धागा माझा वेगळा ची वेगळी हाळी देणारया आगळ्या वेगळ्यांनो !
बारोमास चोवीसतास पडीकांनो , विकांती व्हीजीटरांनो , दिवसढवळ्या दिसणारय़ा ,रात्रीबेरात्री चमकणारया आयडींनो !
झोप उडालेल्या इनसोम्निकांनो, बाटली काही केल्या न सापडणारया, वर्कलोड वाढलेल्या वर्करांनो आणि यांनी पकवलेल्या पावमिसळीवरील पक्वानांनो !
बजेटमधील बारहा च ऑफ़लाइन प्याड परवडणा रया रया रया रयां नो , गमभन ची ऑनलाइन चैन करणारयांनो !
मिपावरील वठलेल्या वृद्धांनो त्यातील हिरव्या देठांनो ! तरतरीत तरुणींनो , तडफ़दार तरुणांनो , बावरलेल्या बालकांनो, उर्वरीत अधल्यामधल्यांनो !
संघींनो, सनातन्यांनो, समाजवाद्यांनो, साम्यवाद्यांनो, सर्वांतील सर्वोत्त्म सत्व सापडलेल्या सपक सज्जनांनो !
भुमिका मांडणारयांनो , भुमिका वठवणारयांनो , भुमिका घेणारयांनो ,भुमिका मोडणारयांनो , भुमिका फ़िरवणारयांनो !
पांचट प्रतिसादकांनो , पुचाट प्रतिसादकांनो , प्रखर प्रतिसादकांनो , प्रख्यात प्रतिसादकांनो , पुराव्यासहीत प्रतिसादकांनो , प्रेमपुर्वक प्रतिसादकांनो, उथळ प्रतिसादकांनो, चपळ प्रतिसादकांनो !
पाणावलेल्या प्रतिसादांनो ! नाणावलेल्या प्रतिसादांनो, ताणलेल्या प्रतिसादांनो, हाणलेल्या प्रतिसादांनो , संपादीत प्रतिसादांनो, मार्मिक प्रतिसादांनो, मुक प्रतिसादांनो !
शंभरी गाठलेल्या , डबल सेंच्युरी मारलेल्या धाग्यांनो , खाता ही न उघडलेल्या शुन्यपोकळी धाग्यांनो !
खरडींतुन खरडणारयांनो , प्रतिसादांतुन पाजळणारयांनो , व्यनितुन चिपकु पाहणारया फ़ेव्हीक्वीकांनो !
हपिसातुन मिपा वापरणारया कर्मयोग्यांनो, क्याफ़ेतुन पदरमोड करणारया त्यागमुर्तींनो, घरच्याघरी मिपाघरचं माप ओलांडणारया गृहीणींनो !

संस्थळावरील समजुतदारांनो, भांडकुदळांनो, काडी लावणारया अग्निपुजक आर्यांनो, ती विझवु पाहणारया विचारींनो ! आधुनिकांनो, बुरसटलेल्यांनो, धेडगुजरींनो, गंमत पाहणारया वाचनमात्रांनो ! फ़ेमिनीस्टांनो , मेलइगोइष्टीकांनो, त्यांच्या दुष्मनांनो !
निर्मीतीक्षमता संपुन आता राहीलो प्रतिसादा पुरता वाल्यांनो ! वैविध्य संपुन आता राहीलो एका विषया पुरता वाल्यांनो ! दंश संपुन आता राहीलो प्रशंसे पुरता वाल्यांनो ! जुन्याच भांडवलावर परत परत व्याजा चा हट्ट धरणारयांनो ! शिळ्याच कढीला उत आणु पाहणारयांनो ! जुने धागे नव्यांच्या तोंडी मारणारया जुने झालेल्यांनो !
संस्थळावरील एनारायांनो, मुंबई-पुणे करांनो, उर्वरीत महाराष्ट्रीयनांनो ! परप्रांतीय महाराष्ट्रीयनांनो !
चमत्कारीक आयडींनो, अलंकारीक आयडींनो, आध्यात्मिक आयडींनो, विक्षीप्त आयडींनो, विलायती आयडींनो मराठमोळ्या आयडींनो !
कंपुबाजांनो कंपुवाद्यांनो जातीवाद्यांनो धर्मवाद्यांनो !
प्रकाशकांनी अंधारात ढकललेल्या अप्रकशित कविंनो, अप्रकाशित कथालेखकांनो ! अशा कथा-कवितेचा उजेड पाडणारयांनो ! लिहीण्याची खाज भागवणारयांनो ! लिहीण्याचा माज दाखवणारयांनो ! लिहीण्याचा बाज शोधु पाहणारयांनो ! धंदा पसरवु पाहणारया कुडमुड्या ज्योतिषांनो !
धमाल मुलांनो, कन्फ़्युज्ड अकाउटंटांनो, गोड गोड गविंनो, मिसळलेल्या कविंनो, होमियोपथि डॉक्टरांनो, थकलेल्या कारकुनांनो आणि ताई माई अक्कांनो !
मिपावर मदत मागणारया लाचारांनो करणारया उदारांनो , कॉन्टॅक्ट्स (बिकम कॉन्ट्रॅक्ट्स) वाढवु पाहणारयांनो, सांत्वना शोधणारया, मैत्री शोधणारयांनो वास्तवाला पर्याय शोधणारया वास्तवपीडीतांनो !

एकाकी आत्म्यांनो, एकाकी वासनांनो, एकाकी पिडीतांनो गरळ ओकणारया सरळ बोलणारया एरवी कधीही व्यक्त झालेच नसते अशा सर्व व्यक्तात्म्यांनो !
या एकाकी आत्म्यांना व्यक्त होण्यासाठी फ़ुकटात ब्यान्डविड्थ पुरवणारया उदार संस्थळ मालकांनो !
उदंड उत्साहींनो कट्टे भरवणारयांनो कट्टे मिरवणारयांनो गड कील्ले चढणारयांनो पिकनिक जगणारयांनो ! जीवनासक्तांनो उन्मुक्त उत्तेजितांनो ! आयडी मागील माणसांस भिडु पाहणारया भावुकांनो !

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

एस's picture

29 Sep 2014 - 5:16 pm | एस

मारवांनो आणि भैरवांनो राहिलं का? मी पयल्यांनो अन् मी दुसर्‍यांनो... पुढच्या भागात घ्या.

सुहास..'s picture

29 Sep 2014 - 5:20 pm | सुहास..

लयच !

विकीपिडीत प्रतिसादकांनो राहिलयं रे मारवा

नक्कीच वापर करतो पुढील भागात खर म्हणजे अजुन बरच इनसर्ट करायच होत पण विचार करत बसलो असतो तर उत्स्फुर्तता गेली असती. म्हणुन शिल्लक साठी पुढील भागाची पाचर मारुन ठेवली.

बॅटमॅन's picture

29 Sep 2014 - 5:21 pm | बॅटमॅन

हाण तेजायला.

आता पुढची ओळ म्हणायला हरकत नाही !

गवि's picture

29 Sep 2014 - 5:22 pm | गवि

नो नो नो.... ओह नो...

कंजूस's picture

29 Sep 2014 - 5:22 pm | कंजूस

ऐकतो आहोत वाचतो आहोत, पुष्पगुच्छ लवकरच मारवा.

संजय क्षीरसागर's picture

29 Sep 2014 - 5:26 pm | संजय क्षीरसागर

अफाट जुळवाजुळव केलीये, मस्त, आवडलं!

जेपी's picture

29 Sep 2014 - 5:30 pm | जेपी

आवडल.

नाखु's picture

29 Sep 2014 - 5:42 pm | नाखु

मारलेले* (अचूक)
ट्टे** (किमान शब्दात कमाल आशय)
वाचतोय का(कोणी) या जंत्रावळीमधून

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2014 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी ! पण, "(असं काही लिहून) वाचकांच्या तोंडी फेस आणण्यार्‍यांनो..." हे राह्यलंच :)

नाव आडनाव's picture

29 Sep 2014 - 5:58 pm | नाव आडनाव

लयंच भारी! मरणाचं आवडलंय!
माझ्या कडं शब्दांचा दुष्काळ असतो कायम. इथं शब्दांचा महापूर आलाय :)

सूड's picture

29 Sep 2014 - 6:04 pm | सूड

बरं बरं, पुढे काय?

इनिगोय's picture

29 Sep 2014 - 6:16 pm | इनिगोय

जब-याच! आवडलं..

पुढच्या भागासाठी कच्चा माल.>> धन्स, बाडिस, रच्याकने अशा शब्द जन्माला घालणा-यांनो!

प्यारे१'s picture

29 Sep 2014 - 6:18 pm | प्यारे१

आयला! कल्लाच केलाय की.

भा री.

अध्यात्माची अखंड अविरत धारा प्रवाहीत करणारया धमनी तील धग विझलेल्या धार्मीक धागा लेखकांनो !

काय दणकट वाक्य आहे!

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Sep 2014 - 11:19 pm | माम्लेदारचा पन्खा

माझी थोडी भर : आयडीपरत्वे प्रतिसाद कुंथणार्यांनो...नवीन सभासदत्व मिळवलेल्या इनोसंटांनो... येता जाता दुसर्यांना इनो पाजणार्यांनो...रोज संगतीत राहून वाण नाही पण गुण लागलेल्या ढवळ्यापवळ्यांनो..अर्ध्या हळकुंडाने रंगलेल्या पिवळ्यांनो...पाकृ टाकणार्या पाप्यांनो... ती पाहून तोंडाला पाणी सोडणार्या पाणक्यांनो... रोज रतीब घालणार्यांनो...उत्साहाने विरजण लावणार्यानो...सर्वात शेवटी ......मिपाच्या क्षितिजावर नित्यनेमाने आपले सप्तरंग उधळणार्या कलंदरांनो... !!

नाखु's picture

30 Sep 2014 - 11:36 am | नाखु

कुंपणावर बसणर्यानो...कुंपणा अलिकडच्यांनो..कुंपणा पलिकडच्यांनो..जिकडं गुळ-खोबर तिकड धावण्यार्यांनो..गुळ-खोबरं उधळायच्या आधिच खिशात घालाणार्यांनो..जी भाऊच्या कथा पंख्यानो..संख्यानो..अस्वादकांनो..चिरफाड्करांनो..डोक्याची मंडई करणार्यांनो..मंडईतच डोके ठेवणार्यांनो..सतत कावीळ ग्रस्तांनो ...(कधी मोदी-कावीळ कधी धर्माची)समस्त रतीब्करांनो..!!

मारवा's picture

29 Sep 2014 - 11:30 pm | मारवा

पुढील पुष्प आपण गुंफावे अशी विनंती कारण माझा स्टॉक संपलाय व जो राह्यलाय त्यात दम वाटत नाही.
सो सर तुम्ही सर्व मिळुन दुसरे पुष्प गुंफावे ही विनंती !

काउबॉय's picture

29 Sep 2014 - 11:32 pm | काउबॉय

राहिलं की ;)

"मी पयला वाल्यांनो" हे राहिलं

पहाटवारा's picture

30 Sep 2014 - 4:55 am | पहाटवारा

वी डिड्ण्ट स्टार्ट द फायर ..
ईट वॉज औल्वेज बर्निन्ग .....

मस्त!

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Sep 2014 - 10:27 am | ज्ञानोबाचे पैजार

मनोभावे विष्णुसहस्त्रनाम म्हणुन झाले.

आता सत्यनारायण पुजा सुरु होउन द्या.

आचमन करा म्हणा मम

पैजारबुवा,

गम्पत पाटील's picture

30 Sep 2014 - 2:06 pm | गम्पत पाटील

लिहीलेलं वाचताना श्वास घ्यायला विसरलो.
लssयच भारी.

पैसा's picture

3 Oct 2014 - 11:11 am | पैसा

मस्त लिहिलंय!

मुक्त विहारि's picture

3 Oct 2014 - 11:29 am | मुक्त विहारि

झक्कास..