आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
25 Sep 2014 - 12:42 pm
गाभा: 

अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा विरुद्ध लढणे त्यांना उपयोगशून्य वाटत असावे. असे असेल तर त्यांनी त्यांचे संघटनेचे नाव बदलून हिंदूधर्मश्रद्धाविरोधी संघटना असे नाव द्यावे. धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा ह्या इतर क्षेत्रातल्या अंधश्रद्धा जास्त भयानक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी.

मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. मग अनिस नेमके करते काय? देवालयात रांगा लावणाऱ्या भक्तांची प्रचंड गर्दी, हजारोंच्या संख्येने बोलले जाणारे आणि फेडले जाणारे नवस, स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी, हे सगळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश असताना सुद्धा जर वाढतच असेल तर मला असे वाटते अंनिस सपशेल नापास झाली आहे. त्यांची मुल्ये आणि विचार कुठेतरी भलत्याच दिशेला आहेत असे सारखे राहून राहून वाटते.

धर्म, कर्मकांडे, पूजाविधी आणि आयुष्यात येणारे बरेवाईट प्रसंग याचा काही सुतराम संबंध नाही असे स्वत:शिवाय कुणालाही पटवून व सिद्ध करून दाखवण्यात कार्यकर्ते कमी पडले आहेत. जर मानसिक आधारासाठी श्रद्धेचा भक्कम चबुतरा आवश्यक आहे आणि तो अंनिस च्या मते चुकीचा आहे तर इतक्या वर्षात त्यास सक्षम व्यवस्था उभी करण्यात इतके प्रकांड पंडित गाठीशी असताना अपयश का यावे? खरच अंनिसचा मूळ उद्देश नक्की अंधश्रद्धा निर्मुलन हाच आहे कि समस्त हिंदुस्तानी जनतेला त्यांच्या श्रद्धा सोडून अधांतरी लोंबकळत ठेवण्याचा आणि नंतर अशा श्रद्धाहीन, हतवीर्य समाजाला आपल्या धर्माच्या जाळ्यात ओढण्याचा काही आंतरराष्ट्रीय कट आहे? सध्या तरी त्यांच्या कामावरून असे काही विधायक आणि भारतीय जनतेशी प्रामाणिक असे वर्तन होताना दिसत नाही. एक प्रकारची हटवादी आणि म्हणूनच एक प्रकारची अंधश्रद्धा म्हणून हिंदू अंनिस कडे बघतात.

आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.

तुम्हाला काय वाटते?

(याआधी हा विषय मिपावर चघळला गेला असेलच, आवश्यकता नसेल तर धागा उडवा. पण मग मला आधीच्या धाग्यांचे काही स्त्रोत जरूर द्या.)

प्रतिक्रिया

एस's picture

25 Sep 2014 - 12:52 pm | एस

तुम्ही असा फालतू आणि बेसलेस धागा काढण्यापेक्षा तुमच्या व्यवसायात डोके का घालत नाहीत?

प्रचेतस's picture

25 Sep 2014 - 12:58 pm | प्रचेतस

पूर्णपणे सहमत.

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 1:01 pm | प्यारे१

काहीसा सहमत काहीसा असहमत.

व्यवसायामध्ये २४*७ डोकं घालून बसता येणं शक्य नाही.
शक्य झालं तरी परिणाम दिसायला जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा द्यावा लागणारच.
आमच्याकडं '९ महिन्याचं' उदाहरण नेहमी दिलं जातं.

संदीप डांगे's picture

25 Sep 2014 - 1:11 pm | संदीप डांगे

धन्यवाद

धर्मराजमुटके's picture

25 Sep 2014 - 10:25 pm | धर्मराजमुटके

मी तर १८ वर्षांचे उदाहरण देतो.

धन्या's picture

25 Sep 2014 - 1:02 pm | धन्या

अगदी अगदी.

सल्ल्याकरिता धन्यवाद!

आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात.

मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 1:06 pm | टवाळ कार्टा

११११११११११११११११+११११११११११११११११

सल्ल्याकरिता धन्यवाद!

आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात.

मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

त्यामागील विचारास सहमती वा असहमती देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.

तिच गोष्ट संदीप ची. दाभोलकर टाळुन विचार मांडले असते तर त्याला नक्कीच यथोचित पातळी लाभली असती, असो एकुणच नॉन सेन्स थांबवायचा मला अधिकार नाही त्यामुले चालुद्या असे म्हणतो

काय राव!

दाभोळकर टाळूनच विचार आहेत. मी स्वत: कुणाचा व्यक्तिश: उपमर्द करणार नाही. "आता दाभोळकर नाहीत" याचा अर्थ तोच आहे.

पाहिजे ते हे दोन अर्थ घ्या.
१. "ते" नाहीत, त्यामुळे आता तुम्हीच जबाबदारीने पुढचे पाउल उचला
२. "ते" नाहीत. त्यामुळे त्यांच्या चुका टाळण्याची पूर्ण संधी आहे.

पण एकूणच नॉन सेन्स म्हणजे काय आणि यथोचित पातळी काय ते जर स्पष्ट करा दादा! असा चिमटा काढून भागो मत!

घटकांची घुसड़..! अशी घुसड़ that really doesn't make any sense.

यथोचित पातळि म्हणजे मांडलेला विचाराला न्याय मिळेल आशा उंचीवर न्हेउन त्याला चर्चापूरक बनवणे होय.

काउबॉय's picture

25 Sep 2014 - 11:13 pm | काउबॉय

आपण श्रध्दा अश्रध्दा व अंधश्रदहा सारखी विश्वव्यापक प्रकरणे व्यक्तिसापेक्ष
नजरेतुन मर्यादित करुण अनावश्यकरित्या आपल्याच विषयाचे गाम्भीर्य व ऊँची कमी करत आहात :(

कानडाऊ योगेशु's picture

25 Sep 2014 - 1:28 pm | कानडाऊ योगेशु

त्या धाग्यांवर मि.पा. ची एरव्ही न दिसणारी संवेदनशील बाजु दिसली होती. अश्या धाग्यांवर मात्र मि.पा करांचा नेहेमीचा धुमाकुळ चालणारच एवढेच फक्त लक्षात असु द्या! इथे विशेषतः अश्या धाग्यांवर कधी कोण कुणाला "चपला घालुन ताबडतोब चालु लागा" वा " तुम्हाला फाट्यावर मारण्यात आले आहे" असे म्हणेल हे काही सांगता येत नाही.त्यामुळे ट्यार्पी खेचणारे धागे काढताना सगळी तयारी ठेवा.
बाकी तुमच्याकडुन असा ट्यार्पी खेचणारा धागा आला ही तुमची मनस्थिती पुन्हा चांगली होत आहे ह्याची खूण आहे असे समजतो आणि असे बोलुन मी माझे चार शब्द संपवतो.

संदीप डांगे's picture

25 Sep 2014 - 1:35 pm | संदीप डांगे

मिपा आहे सगळ्यांसाठी. प्रत्येकाच्या धाग्यासाठी आणि धाग्यातल्या प्रत्येकासाठी!

त्या धाग्यात लिहिलेलं त्या धाग्याबरोबर वाचनमात्र झालं. आज आत्ता तुम्हाला काय वाटतंय ते बिनधास्त लिहा आणि चर्चा करा! आज आत्ता तुम्हाला छान वाटतंय ना? बस!

पगला गजोधर's picture

25 Sep 2014 - 2:38 pm | पगला गजोधर

भाऊ, तुमच्या या धाग्यातील विचारांशी मी काडीमात्र सहमत नसलो, तरी मोकळेपणाने तुम्ही तुमचे विचार मांडले, याबद्दल तुमचे अभिनंदन. मिपाचे ऐक यश आहे, कि अतिशय भिन्न विचारांची लोकं मोकळेपणाने विचार मांडू शकतात.

शैलेन्द्र's picture

27 Sep 2014 - 9:38 am | शैलेन्द्र

"पग" शी अत्यंत सहमत... बाकी चालुद्या...

किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा

बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा

या दोन वाक्यांवरुन तुम्हाला अंधश्रद्धांच वर्गीकरण कसं करायचय ते नक्की समजत नाही.

आता एखाद्या शाळेत लिंबू मिरची टांगली तर ती शैक्षणिक अंधश्रद्धा की धार्मिक??
उमेदवारी अर्ज पितृपक्षात न भरणे ही राजकीय की धार्मिक अंधश्रद्धा??

आधी धार्मिक सामाजिक राजकीय अंधश्रद्धा म्हणजे काय ते स्पष्ट करा.. मग फक्त हिंदू धर्मच वगैरे बघु..

संदीप डांगे's picture

25 Sep 2014 - 2:35 pm | संदीप डांगे

राजकीय अंधश्रद्धा: लोकशाहीतल्या आपल्या नेमक्या स्थानाबद्दल लोकांना अजूनही नीट अशी माहिती नाही. आपली कामे करणारा राजकीय नेता हा आपला मालक असल्यासारखा वागतो आणि आपण ते खपवून घेतो. त्यांच्या विरुद्ध आपण उभे राहू शकत नाही हि सामान्य जनतेची अंधश्रद्धा, राजकीय भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला अण्णा हजारे किंवा तत्सम लोकच लागतात हि अंधश्रद्धा. थोडक्यात लोकशाही म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव न ठेवता आपले सगळे चांगले झाले पाहिजे अशी भावना म्हणजे अंधश्रद्धा.

शैक्षणिक: शिक्षण घेतल्याने नोकरी लागते आणि पैसा कमावण्यासाठीच शिक्षण घ्यायचे हि एक मोठ्ठी अंधश्रद्धा. शिक्षण घेतल्याने नोकरी लागेलच अशी कुणीही खात्री देऊ शकत नाही. तरीही लोक बावळटपाने कागदाच्या भेंडोळ्या गोळा करण्यात आयुष्य घालवतात. पैसा ओतला कि हुशार होता येते हि एक आणखी अंधश्रद्धा

सामाजिक: जात-पात, धर्म, व्यवसाय यांच्यामुळे जी दरी निर्माण होते ती ओलांडून जाऊन आपण जाऊच शकत नाही अशी सर्वसामान्य अंधश्रद्धा. अपवाद आहेत पण म्हणून नियम मोडत नाहीत. लोक अजूनही जुन्या कालबाह्य सामाजिक गोष्टींचा बाऊ करून आपलाच विकास रोखून धरतात. कारण ह्या काही अंधश्रद्धाच.

एवढेच काय, वैज्ञानिक अंधश्रद्धा सुद्धा आहेतच की. जसे स्टेम सेल बँकिंग वैगेरे वैगेरे.

वेश्या, भिखारी आणि अस्वच्छता ह्यात समाजाच्या काही चुकीच्या समजुतीमुळे तयार झालेल्या समस्या आहेत. त्यांच्या मुळाशी असलेल्या अंधश्रद्धा निपटून काढल्यास बऱ्याच गोष्टी साध्य होतील. एखादी संघटना जेंव्हा त्यांच्या नावात अंधश्रद्धा निर्मुलन असे शब्द वापरते आणि कार्यक्षेत्र फक्त विशिष्ट धर्माशी निगडीत असते तेंव्हा हेतू बद्दल संशय निर्माण होतो.

बाळ सप्रे's picture

25 Sep 2014 - 4:21 pm | बाळ सप्रे

तुम्ही सगळ्याच समस्या अंधश्रद्धेच्या नावखाली गोळा केल्यायत.. तितकेसे पटत नाही..
उदा. शिक्षणाने नोकरी मिळते. इथे कार्यकारणभाव आहे. नोकरीच्या ठिकाणी पात्रता म्हणून शिक्षणाची अट असते. पण सगळ्यांनाच नोकरी मिळेल असं कोणीच म्हणत नाही. मग सगळ्यांनाच मिळत नाही म्हणून लोकांनी शिकूच नये का ?? इथे कार्यकारणभाव असल्याने इथे श्रद्धा अंधश्रद्धा शब्द वापरणे योग्य वाटत नाही.. तसेच इतर उदाहरणातही..
कार्यकारणभावाचा अभाव असतो तिथे श्रद्धा हा शब्द वापरता येतो.

अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल, पटलाच पाहिजे असा आग्रह नाही.

कार्यकारणभाव या शब्दाबद्दल माझे काही अज्ञान असू शकते. पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा आणि फणस येईल हि अंधश्रद्धा आहे असे माझे मत आहे.

नोकरीसाठी शिक्षण हि अट ठेवणे येथूनच हि अंधश्रद्धा सुरु होते. जर तसे नसते तर नोकरीसाठी मुलाखत, वेगवेगळ्या परीक्षा यांची गरज नसती. एखाद्या कंपनीने सरळ पहिल्या दहा विद्यार्थ्यांना अमुक एका नोकरीचे थेट नेमणूक पाठवले असते. असे होत नाही. इथे कार्यकारणभाव कसा? माझ्या मते शिक्षणक्षेत्रात भयंकर अंधश्रद्धा बोकाळली असून त्याचा गैरफायदा घेऊन सामन्यांची पिळवणूक चालली आहे.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:49 pm | प्रसाद१९७१

पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा

चांगले आंबे येतील ही ना श्रद्धा ना अंधश्रद्धा. ती फक्त "अपेक्षा" किंवा "आशा" ( ते सुद्धा झाड आपले असेल तर ).
झाड वैर्‍याचे असेल तर सगळा मोहर गळुन जावा ही "इच्छा".

बाळ सप्रे's picture

25 Sep 2014 - 5:20 pm | बाळ सप्रे

तुम्हाला सगळ्याच गोष्टीला श्रद्धा म्हणायचे असेल तर म्हणा बुवा .. माझादेखिल काही आग्रह नाही तुम्हाला पटलेच पाहिजे असा..

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2014 - 1:56 pm | प्रकाश घाटपांडे

अंनिस व धर्मश्रद्धा हा धागा वाचावा.

बाळ सप्रे's picture

25 Sep 2014 - 1:56 pm | बाळ सप्रे

आणखी एक..
भिकारी, वेश्या, अस्व्च्छता हे सामाजिक प्रश्न झाले पण यात अंधश्रद्धा ( किंवा श्रद्धा) काय ??

पैसा's picture

25 Sep 2014 - 2:00 pm | पैसा

आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.

हे सगळ्यांनीच सर्ववेळ करायला पाहिजे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Sep 2014 - 2:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अंनिसने अमेरिकेत शाखा उघडली पाहिजे असे शिरिष पूर्वी म्हणायचा. त्यांच्या त्या हिरव्या नोटेवर 'In God we trust' लिहिलेले असते म्हणून.
तुमच्या त्या व्हॅटिकन सिटीत्,मक्का-मदिना येथे तोबा गर्दी असते.एवढेच काय, केऱळातल्या काही चर्चेसमध्येही भल्यामोठ्या रांगा असतात.अंनिसवाल्यानी ईतर धर्मातील अंधश्रद्धांबद्दल कधी काही केले आहे का?

स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी

राहू,केतू,वेळ पाहून काम करणारी अनेक मंडळी पाहिली आहेत. ती तसे करतात म्हणजे तीमाणसे निष्क्रिय असतात हा एक मोठा गैरसमज आहे. नविन घरात राहायला जायचे तर होम-हवन हवेच.दक्षिण भारतात तर हे कसोशिने पाळले जाते.त्याला अंधश्र्द्धा म्हणनार असाल तर खुशाल म्हणा.

इतर धर्मांत अंधश्रद्धा आहेत म्हणुन आपल्याही तश्याच राहुद्या असं म्हणायचय का माई?

अहो त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं.

प्रदीप's picture

25 Sep 2014 - 9:07 pm | प्रदीप

त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं.

'आपले घर' म्हणजे काय? अंनिस जर 'भारतीय समाजासाठी' कार्यरत आहे असे म्हटले, तर मग त्यात हिंदूंव्यतिरीक्त इतर धर्मीयही आलेच ना? का अंनिसने स्वत: हिंदूधर्मिय आहोत असे जाहीर केले आहे?

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 2:24 pm | प्रसाद१९७१

दाभोलकरांना स्वताची मोठी अंधश्रद्धा कधी दिसली नाही त्यामुळे ती दुर करण्याचे तर विसराच. भारतीय समाजाला आणि त्याच्या वैचारिक कुवतीला पण दाभोळकर ओळखू शकले नाहीत.

अनिस वगैरे काढुन आणि व्याख्याने देवुन भारतातल्या अंधश्रद्धा कमी होतील असे वाटणे म्हणजेच मोठी अंधश्रद्धा आहे.

प्रत्येक महत्वाच्या गोष्टीवर गुळमुळीत भुमिका घेणे जसे की "आमचा श्रद्धेला विरोध नाही, अंधश्रद्धेला आहे" इत्यादी.
दाभोलकरांच्या ३० वर्षाच्या कारकीर्दीतच देवळांच्या रांगा, बुवा, बाबा, महाराज ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले.
त्यांचा खून झाला म्हणुन नाहीतर ९९ टक्के जनतेला त्यांचे नाव पण माहीती झाले नसते.

कवितानागेश's picture

25 Sep 2014 - 2:30 pm | कवितानागेश

या विषयावर कै राजीव दिक्षित यांचे एक लेक्चर युट्यूबवर ऐकले आहे

संदीप डांगे's picture

25 Sep 2014 - 2:39 pm | संदीप डांगे

गल्लत करू नका.

श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे. माझ्या कर्तृत्वावर माझी भक्कम श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास, आशा. अजून काय सांगायचे. त्याशिवाय का जगात काही करणे शक्य आहे का?

माझी जशी श्रद्धा माझ्या कर्तृत्वावर आहे तशी अंनिस ने इतरांची निर्माण करावी. नुसते हे चूक ते चूक करत फिरू नये.

आणि दाभोळकर यांच्यासारख्या माननीय व्यक्तींबद्दल भंकस करण्याचा विषय, तर मी संघटनेद्दल बोलत आहे. दाभोळकर काय होते हे निदान त्यांच्या संघटनेला जरी कळले तरी खूप आहे.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 2:43 pm | प्रसाद१९७१

श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे

एकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन भाग केले की मग "माझी ती श्रद्धा आणि तुझी अंधश्रद्धा" असले प्रकार चालू होतात.

हे सर्व फार वैयक्तीक आहे, दुसर्‍यांना त्यात पडुच नये ( जो पर्यंत त्यांना त्याचा त्रास होत नाही ). दाभोळकरांना तेव्हडे पण समजले नाही ह्याचे वाईट वाटते.

मुक्त विहारि's picture

25 Sep 2014 - 2:52 pm | मुक्त विहारि

ह्या धाग्याच्या निमीत्ताने निदान इतके तरी समजले कीए, तुम्ही परत जीवन जगायचा प्रयत्न करत आहात.

अजून लिहा.

आणि

बिंधास्त लिहा.

मृत्युन्जय's picture

25 Sep 2014 - 2:56 pm | मृत्युन्जय

अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे?

हे म्हणजे भारताने मार्स मिशन हाती घेण्याच्या ऐवजी भारताने दार्द्र्य निर्मुलन हाती का घेतले नाही असा प्रश्न विचारण्यासारखे झाले. या सगळ्या गोष्टी समांतरपणेच हाती घेतल्या पाहिजेत ना. सगळेच महत्वाचे आहे. दाभोळकरांचा अप्रोच कदाचित चुकीचा असु शकेल. पण त्यांनी हेच का केले आणि तेच का केले नाही हा प्रश्न विचारणे चुकीचे ठरेल.

संदीप डांगे's picture

25 Sep 2014 - 3:54 pm | संदीप डांगे

प्रश्न अंनिस च्या सर्वांगीण विचारपद्धतीचा आहे. पण एकंदर एखादी संघटना असाच विचार का ठेवते वैगेरे विचारणे चूक असू शकते. मला हेतू बद्दल शंका आहे. म्हणून हे प्रश्न.

सुबोध खरे's picture

25 Sep 2014 - 2:59 pm | सुबोध खरे

मी खरं तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सभेला चाललो होतो
पण मध्येच मांजर आडवं गेलं मग बेत रहित करावा लागला.
आपली अशी परिस्थिती आहे.

आतिवास's picture

25 Sep 2014 - 3:42 pm | आतिवास

?
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा
१. एखाद्या कामाबद्दल आपले मतभेद जरुर असू शकतात, पण त्याला थेट 'फालतू' म्हणावे?
२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते?
३. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी. आणि मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. !!
४. आत्मपरीक्षणाची गरज फक्त 'अंनिस'ला आहे आणि 'तुम्ही-आम्ही-आपण सगळे' यांना का नाही?
५.....
६. ...
...
...
१००. ....

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 3:47 pm | प्यारे१

'शत'प्रतिशत प्रतिसाद

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 3:53 pm | प्रसाद१९७१

२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते?

ना ते विधायक आहे ना ते विघातक आहे. निरर्थक आहे. ज्यांना अंधश्रद्धा सोडायच्या होत्या त्यांन्नी त्या त्यांच्या त्यांच्या सोडल्या.
उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या.
मनुष्य स्वभाव आहे, कोणाला दुसर्‍याने सांगितलेले आवडत नाही की तू मुर्ख आहेस. त्याचा मूर्खपणा अजुनच घट्ट होतो.

शिद's picture

25 Sep 2014 - 4:20 pm | शिद

सहमत.

बाळ सप्रे's picture

25 Sep 2014 - 4:30 pm | बाळ सप्रे

उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या

ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !! सगळे जग बदलेल अशी अपेक्षा अंनिसलाही नव्हती. पण जो थोडाफार बदल ते घडवू शकले तो नक्कीच स्वागतार्ह आहे .

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:34 pm | प्रसाद१९७१

ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !!

ज्यांनी सोडल्या त्या त्यांच्या त्यांनी, त्यांच्या विचाराने. अनिस चे काही कॉट्रीब्युशन नाही.

माझी बहीण एकाच वेळी दाभोलकरांचे खूप कौतुक करते, त्यांची पुस्तके वाचते आणि शक्य असतील त्या सर्व अंधश्रद्धा पाळते.

गवि's picture

25 Sep 2014 - 4:58 pm | गवि

अगदी.. अगदी.

लोकांना चमत्कारामागची हातचलाखी समजावून सांगणे, प्रात्यक्षिक करुन दाखवणे, भंडाफोड करणे इत्यादि मार्गांनी लोकजागृती करण्याचा काही संस्थांचा हेतू कितीही प्रामाणिक असला तरी लोकांवर त्याचा काही परिणाम होत नाही. मनोरंजन म्हणून लोक पाहतात आणि स्वतःचे बाबा बुवा कोणी असतील त्यांच्याबाबतीत मात्र ही हातचलाखी वगैरे मानायला ते तयार नसतात. श्रद्धा हे एक अत्यंत ताकदवान डिनायल आहे. आमचे बापू, बाबा, महाराज इ इ हे असे जादूगर नाहीच आहेत मुळी.. या घट्ट समजुतीनेच लोक भक्त झालेले असतात.

"अ‍ॅक्सिडेंट्स ऑकर टु अदर्स", या तत्वानुसार "भोंदूगिरी इज प्रॅक्टिस्ड बाय अदर बाबाज" अशीच समजूत असल्याने कोणत्याही कार्यक्रमाने त्यांचे मन वळवणे शक्य नाही.

कोणाच्यातरी आहारी जाणे ही एक तीव्र ताकदीची गरज आहे (व्यसनाप्रमाणे). अनेक पॅथीज, ज्योतिष आणि कायकाय प्रथा हजारो वर्षे टिकल्या तश्याच अंधश्रद्धाही टिकण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची समाजाला गरज आहे. जी गोष्ट तीव्र गरजेची आहे तीच टिकते.

निर्मूलन वगैरे हे वरकरणी आवश्यक दिसतं खरं पण ते अशक्य वाटतं.. मग याला निगेटिव्ह थिंकिंग म्हणा किंवा रियल थिंकिंग.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2014 - 5:05 pm | प्रकाश घाटपांडे

बर्‍याच अंशी सहमत आहे. परिणाम होत नाही याबद्दल असहमती. कारण हजारो वर्षे असलेल्या अंधश्रद्धा या काही दशकात दूर होतील ही अपेक्षा योग्य नाही. त्यामुळे परिणामाच वेग अत्यंत सूक्ष्म आहे.पण आहे. अंमलबजावणी नसु द्यात पण विचार करायला लोक प्रवृत्त होतात हे ही नसे थोडके!

बाळ सप्रे's picture

25 Sep 2014 - 5:22 pm | बाळ सप्रे

श्रेय द्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..
माझ्या वैयक्तिक विचारधारा बदलाचं श्रेय मी दाभोलकरांना/ अंनिसला देतो..

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:25 pm | प्रसाद१९७१

हे जर खरे असेल तर मी माझे मत मागे घेतो. एका माणसाचे विचार बदलण्याचे काम जरी अनिसने केले असेल तर Its worth

ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे होते का आणि नेमका काय बदल झाला आणि किती प्रमाणात यावर हे अवलंबून आहे.

त्यांचे आजवरचे प्रतिसाद वाचून ते पूर्वी कधीही अंधश्रद्ध असतील असे वाटत नाही. अर्थात हे वरवरचे मत झाले हेही मान्यच.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:31 pm | प्रसाद१९७१

सप्रे साहेब म्हणतायत तर त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे.
त्यांनीच नीट विचार करुन सांगावे.

बाळ सप्रे's picture

25 Sep 2014 - 10:28 pm | बाळ सप्रे

रॅशनल थिंकिंग करण्याची पात्रता होती, पण सगळे करतात म्हणून आपणही असं होत गेलं. सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार केला गेला नाही. पण दाभोलकरांची पुस्तके वाचल्यावर हे तर आपल्याला माहीत आहे मग आपण इतके वर्ष असे का वागत राहीलो. सगळे करतात म्हणून करायची गरज नसते याची जाणीव झाली. आणि छोट्या छोट्या गोष्टींची चिकित्सा करुन खरच एखाद्या गोष्टीत तथ्य असेल तरच स्वीकारणे आणि बाकी गोष्टी त्यागणे अशी सवय लागली. अर्थात आई वडीलांमुळेच हे प्रथम वाचनात आले. घरातून मुक्त विचारसरणीला तेवढाच पाठींबा मिळाल्याने विचार आणि आचारात सुसंगती आणू शकतो. घरातील वातावरण पूर्वी खूप धार्मिक होते. बरीच सूक्ते, रुद्र वगैरे पाठ होता. प्रसंगी पूजा वगैरे सांगितल्याही होत्या. लग्न देखिल पत्रिका पाहून वेदोक्त वगैरे झालय!! ९२-९३ ला रामजन्मभूमी मुद्द्यावर भारून जाउन फक्त कारसेवेला जायचे बाकी होते.
पण आता कोणताही धार्मिक कार्यक्रम करत नाही. अर्थात दुसर्‍या कोणी बोलवल्यास नातेसंबंध जपण्याच्या हेतुने उपस्थिती धडते. मुलाची मुंज करण्याचा मानस नाही. कुठे शिक्षणाच्या हेतुने दूर ठेवण्याची वेळ आल्यास स्नेहसंमेलनाच्या रुपात धार्मिक विधीशिवाय मुंज होईल. मुलाची पत्रिका अस्तित्वातच नाही. या विचारांची पत्नीवर सक्ती नाही. पण तिलाही बर्‍याच गोष्टी पटतात.
इतका बदल घडलाय..

एस's picture

25 Sep 2014 - 10:52 pm | एस

तुमचे अभिनंदन आणि कौतुक.

विलासराव's picture

26 Sep 2014 - 9:17 am | विलासराव

+१.
मलाही दाभोळकरांचे काम मोलाचे वाटते. ज्या गोष्टी पटल्या त्या घेतल्या.न पटलेल्या सोडुन दिल्या.

त्याचे असे आहे कि,

अंनिस हि एक मोठी प्रतिष्ठित संघटना आहे. १५ वर्षांपूर्वी जो आदर आणि मान अंनिस ला होता, ज्या प्रकारची लोकभावना होती ती आज काहीशी धुसर झाली आहे. इतक्या वर्षांच्या अविरत कष्टांनंतर जर लोक आपल्याकडे संशयाने बघत असतील तर ती दाभोलकरांची संघटना बांधणीची सारी मेहनत फुकट जायची.

अंनिस एक लोकशाहीवादी संघटना असेल तर त्यांना ह्या टीका आणि प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. सतत लोकांना आव्हान देऊन, चिथावून पदरात अपमान आणि संशय पडण्यापेक्षा अंधश्रद्धेत अडकलेल्या, अडकू शकणाऱ्या जनतेला हळुवारपणे सामंजस्याने योग्य मार्गावर आणणे आवश्यक आहे.

कुठलेही आंदोलन उभे राहायला वाढायला प्रचंड कष्ट करावे लागतात. अंनिस रसातळाला जाऊ नये हि अंतिम इच्छा. सुधारणेची अपेक्षा आहे आणि मदतीची तयारीपण आहे. पण अशी सुधारणा खरेच अंनिस मान्य करेल का हा मूळ प्रश्न.

अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित आणि श्रीमंतांमध्ये वाढणारी दैववादी मानसिकता भारताला परत मागे धाडू शकते.

इथे असलेल्या प्रत्येकाच्या मताचा आदर आहेच. पण खरेच अंनिस वाचवण्यासाठी, तिची परिणामकता वाढवण्यासाठी, तिचे जाहीर उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचाराने आवश्यक आहे. मी असा प्रश्न स्वत:ला विचारला आणि त्यातून अंनिस च्या मूळ किंवा छुपा हेतू काय असेल असाही प्रश्न उभा राहिला.

शंका दूर केल्याशिवाय सहभाग शक्य नाही.

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 8:28 pm | टवाळ कार्टा

एखाद्या माणसाला साप चावल्यावर त्याला डॉक्टरकडे नेण्याऐवजी भगत्/बाबा कडे नेणे हे थांबवण्यासाठी अनिसंने काय केले पाहिजे होते असे तुम्हाला वाटते? तुमचे विचार अनिसंकडे पोहोचविण्याची जबाबदारी माझी...तुमच्या प्रतिसादात एका अक्षराचाही बदल न करता

देणार उत्तर???

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2014 - 4:19 pm | प्रकाश घाटपांडे

आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:30 pm | प्रसाद१९७१

अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे. दुसर्‍यांनी काय करावे हे सांगायला मी काही अनिसचा कार्यकर्ता नाही.

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 8:30 pm | टवाळ कार्टा

अनिसंने काय करावे हे मात्र "तुम्ही" सांगणार...टाळ्या

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 11:46 am | प्रसाद१९७१

अरे टवाळा - घाटपांडे साहेबांनी विचारले की "अनिस चे काय करावे" असे, म्हणुन सांगितले.
नाहीतर कोणी काय करावे हे सांगायला जायला मी काय अनिस चा कार्यकर्ता आहे? :-)

टवाळ कार्टा's picture

26 Sep 2014 - 11:53 am | टवाळ कार्टा

अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे.

हे तुम्हीच लिहिले ना???

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 12:04 pm | प्रसाद१९७१

अहो पण ते का लिहीले ते बघा ना. पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले. विचारलेच नसते तर कशाला सांगायला आलो असतो.

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2014 - 12:50 pm | प्रभाकर पेठकर

पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते

हायला! मी विचारले होते? काहीही काय फेकताय?

टवाळ कार्टा's picture

26 Sep 2014 - 1:20 pm | टवाळ कार्टा

पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले

मग तुम्ही पण पेठकरकाकांच्या प्रतिसादाखालिच लिहायला हवे होते...इथे का लिहिले??...आणि ते तर म्हणत आहेत की

हायला! मी विचारले होते? काहीही काय फेकताय?

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 1:36 pm | प्रसाद१९७१

आता अस करा की अंनिसने काय
प्रकाश घाटपांडे - Thu, 25/09/2014 - 16:19
आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा

उत्तर द्या

पेठकर नाही धाटपांडे काका !!!

टवाळ कार्टा's picture

26 Sep 2014 - 2:23 pm | टवाळ कार्टा

वोक्के...आता मी विचारलेल्या प्रश्नाचे काय?

थॉर माणूस's picture

26 Sep 2014 - 2:41 pm | थॉर माणूस

अहो कुणाशी वाद घालताय... राणीचे पाईक ते. इंग्लंडात बसून भारत कसा फालतू आणि भारतातल्या माणसांनी काय करावं त्याविषयी गफ्फा मारणे हा त्यांचा इगो कुरवाळण्यासाठीचा उद्योग आहे.

टवाळ कार्टा's picture

26 Sep 2014 - 3:32 pm | टवाळ कार्टा

वा...बरे झाले या आयडीवरची धूळ झटकली...

अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे?

या वाक्याला एक अहंकाराचा दर्प येतो आहे .
इतरांना शुद्धीकरणाचे, आत्मनिरिक्षण / परीक्षण करण्याचे सल्ले देणारे स्वतःच्या योग्यतेबद्दल केव्हढा आत्मविश्वास बाळगून असतात याचे कौतुक वाटते.
कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. आणि तुम्हाला जे जास्तं योग्यं वाट्ते , म्हणजे भिकारी/ वेश्या निर्मुलन , ते कार्यं (शक्यं असल्यास) हाती घ्यावेत .
पण कृपया दुसरा करीत असलेल्या कार्याला असे हीन लेखु नका .
समर्थांनी सांगीतले आहे : क्रियेवीण वाचाळता व्यर्थं आहे.

माझ्या अहंकाराबद्दलचे आपले गैरसमज दूर होतील अशी आशा करतो,

माझ्या प्रश्नातच माझे उत्तर उपरोधिकपणे उच्चारले आहे.

अंनिस काय करते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे का?
कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न राहातच नाही जेंव्हा मुसलमान किंवा ख्रिश्चन जबरदस्ती किंवा आमिषाने एखाद्यास धर्मांतर करण्यास भाग पडतो. दुसऱ्याच्या घरात घुसून त्याच्या श्रद्धांची चिरफाड करताना चार बोट आपल्याकडेही असतीलच याचे भान असावेच.

कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही

हे कसे ठरवणार?

तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका
.

हेच अंनिस ला सांगितले तर आम्ही ढोंगी का?

साधे उदाहरण आहे. ज्योतिष हे शास्त्र नाही, त्याचा काही उपयोग नाही, लोकांना फक्त लुबाडतात. चला मान्य आहे तुमचे. पण ज्योतिष धुडकावून लावण्याआधी स्वत: खपून काही अभ्यास केला आहे का? नुसते आव्हान देत फिरल्याने काही होत नाही. असो माझ्या ज्योतिषावर विश्वास आहे कि नाही याबद्दल नंतर कधी.

वैद्यकशास्त्रात एका डॉक्टरचे निदान दुसरा डॉक्टर मान्य करत नाही, एकाची उपचारपद्धती दुसरा चालू ठेवत नाही. तिथे सुरु असलेला सगळा भोंगळ कारभार चालतो, तो काय लोकांच्या जीवाशी आणि पैश्याशी खेळ नाही का? तिथल्या अंधश्रद्धांचा अंनिस ने काय भांडाफोड केला? अंनिस ने सर्व प्रकारच्या अंधश्रद्धाविषयी समान भूमिका घ्यावी अन्यथा नाव बदलावे असे माझे एक मत.

यात मीच काही कार्य हाती घेतले तरच मला बोलण्याचा अधिकार असे काही आहे का?

लोकांना "काहीतरी केल्याचे" समाधान हवे असते. त्याने काय फरक पडतो, नाही पडत याचा त्यांना विचार करण्यास भाग पडले कि ते चिडतात असे आजवरच्या अनुभवांवरून माहित आहे.

तुम्ही सामाजिक काय वैयक्तीक काय तसेच श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सामाजिक समस्या यात गल्लत करीत आहात असे वाटते .

जबरदस्तीने धर्मांतर करायला लावणे हा गुन्हाच आहे कारण त्यात सामाजिक/ वैयक्तीक आणि धार्मिक स्वतंत्र्याची पायमल्ली होते आहे.
मला वाटते अशा कृत्याचे समर्थन माझ्या उत्तरात कुठेच नाहीये .

तुम्हाला अंनीस चे कार्यं पटत नाही हे तुमचे मत आहे आणि तुमच्या मतस्वातंत्र्याचा मी आदर करते . तसेच तुम्हीही इतरांच्या मत स्वातंत्र्याचा आदर करावा इतकेच.

मतस्वातंत्र्याचा अधिकाराबद्दल शतप्रतिशत सहमत

बाल सप्रे ह्यांनी हि मला हाच प्रतिसाद दिला कि आपण समस्या आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात. मग इतर सामाजिक समस्येप्रमाणे अंधश्रद्धा हि सामाजिक समस्या असली पाहिजे की ती वैयक्तिक समस्या आहे? मग वैयक्तिक समस्या हि सामाजिक केंव्हा होते आणि त्यात लुडबुड करण्याचा इतरांना केंव्हा अधिकार प्राप्त होतो?

माझा खरच आता गोंधळ व्हायला लागला आहे

खरच अंधश्रद्धा म्हणजे फक्त धार्मिक अंधश्रद्धा का? ह्या शब्दाला असा संकुचित अर्थ कसा प्राप्त झाला? त्यामुळे अंनिस हे धर्मविरोधी आहे असा नकारात्मक प्रचार झाला आणि त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

मनीषा's picture

26 Sep 2014 - 11:40 am | मनीषा

उदाहरणार्थ

अंनीस ही एक समाजिक चळवळ आणि अंनीस ला विरोध करायचा ? पाठिंबा द्यायचा? की त्या पासून अलिप्त रहायचे? हा तुमचा वैयक्तिक प्रश्नं त्यात कुणी ढवळा ढवळ करणे योग्यं होणार नाही .
हे तत्वं वापरून तुम्ही सामाजिक आणि वैयक्तिक बाबींचे वर्गीकरण करा .
आणि त्तुमच्या वैयक्तिक समस्यांमधे लुडबुड करायचा अधिकार कुणालाच नाही जो पर्यंत तुमच्या वर्तनाने कुणाला उपद्रव होत नाही.
हाच नियम तुम्हालाही लागू होईल . इतरांच्या खाजगी गोष्टींमधे तुम्ही नाक खुपसले तर तो गुन्हा समजला जाईल.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2014 - 4:38 pm | प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.
वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो.
जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.
वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो....

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:40 pm | प्रसाद१९७१

साधा प्रश्न आहे, अनिस नसती तर आज काही जाणवण्या इतका थोडा तरी फरक पडला असता का?

माझ्या मते नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2014 - 4:47 pm | प्रकाश घाटपांडे

ओपिनियन पोल घ्या. माझ्या मते अंनिस मुळे लोक विचार तर करायला लागले.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:53 pm | प्रसाद१९७१

७०-८० च्या दशकात नास्तिकतेच प्रमाण जास्त होते. कोणी देव देव करायला लागले तर त्याची थोडी का होइना चेष्टाच होयची.

१९९०-२००० नंतर, देव, बाबा, बुवा, सण, परंपरा ह्यांना मोठीच प्रतिष्ठा मिळाली आहे.

कदाचित हेच अनिसचे कॉट्रीब्युशन असावे. ( हे हलके घ्या ). माझ्या मते अनिसला महाराष्ट्राच्या इतिहासात २ ओळी इतकी पण जागा नाही. त्या दोन ओळी पण कदाचित खुना बद्दल असतील ( आणि त्यामागच्या राजकारणा बद्दल )

स्वप्नांची राणी's picture

25 Sep 2014 - 4:56 pm | स्वप्नांची राणी

नक्कीच काका. मुद्देसुद प्रतिसाद खूप आवडला.

पैसा's picture

25 Sep 2014 - 4:47 pm | पैसा

उत्तम प्रतिसाद काका! अतिशयच आवडला!

विचारांना विचारांनीच संपवता येते ह्या आमच्या अंधश्रद्धेला दाभोलकरांना लागलेल्या बुलेट ने संपवले.

स्वप्नांची राणी's picture

25 Sep 2014 - 4:54 pm | स्वप्नांची राणी

हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार घेऊन संपवावे लागले त्यांना... त्यापेक्षा सरळ सोप्पी मुठ का मारली नाही..?

मारली असेल. प्रॉपर बसली नसेल.

बॅटमॅन's picture

25 Sep 2014 - 5:39 pm | बॅटमॅन

काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही.
आत ठसठसतंय चैतन्य, वाट त्याला देणार नाही.
मुठीत सामावली दुनिया, प्रकट तिला करणार नाही.
जगन्नाथाचा रथ हा, हस्ते परहस्ते चालवणार नाही.

;)

सूड's picture

25 Sep 2014 - 5:52 pm | सूड

=))))

सौंदाळा's picture

25 Sep 2014 - 5:57 pm | सौंदाळा

जब्राट, अजुन लिवा की जरा

नको, आहेत ते प्रतिसाद पण उडायचे. ;)

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 6:12 pm | प्यारे१

___/\___

जौ दे रे! जुन्या पेशवेकाळाच्या पलिकडं जावं लागेल. :) नकोच बोलूस त्यापेक्षा. ;)

स्वप्नांची राणी's picture

25 Sep 2014 - 9:03 pm | स्वप्नांची राणी

मुठीकडून मिठीकडे वळा आता बॅटमन ..!!

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 9:37 pm | प्यारे१

हा हा हा!

गुडवन!

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 9:48 pm | टवाळ कार्टा

हायला...माझ्या प्रतिसादाला पंख लागले :(

नाही तर अश्लील अश्लील ओरडलो असतो.

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 10:01 pm | टवाळ कार्टा

;)

बॅटमॅन's picture

26 Sep 2014 - 1:02 pm | बॅटमॅन

मूठ असो वा मिठी
पडता ती दिठी
अन मग पाठोपाठी
काय जाहले ||

जाहले ते ते पाहिले
ऐकिले तैसेचि ठेविले
समजले तर समजले
नाही का हो ||

स्वप्नांची राणी's picture

26 Sep 2014 - 1:56 pm | स्वप्नांची राणी

हो हो, हो... ;)

अनुप ढेरे यांचा प्रतिसाद काय चपखल बसतोय ना सगळिकडे '...कळला नाही'वाला...

बॅटमॅन's picture

26 Sep 2014 - 2:43 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी..त्याचे कारणही मूठच असेल, नै ;)

वाडीचे सावंत's picture

25 Sep 2014 - 11:14 pm | वाडीचे सावंत

:)

अनुप ढेरे's picture

25 Sep 2014 - 5:04 pm | अनुप ढेरे

:O
प्रतिसाद कळला नाही.

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Sep 2014 - 5:00 pm | पुण्याचे वटवाघूळ

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही.

समितीने अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कशी व्याख्या केली आहे? अंधश्रध्दाविरोधी लढा म्हणजे नक्की कशाच्या विरोधात लढा अपेक्षित आहे?

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2014 - 5:12 pm | प्रकाश घाटपांडे

दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप."
"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"
आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे.
[आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे')
आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे.असा त्याचा अर्थ घेतला जातो.
तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:15 pm | प्रसाद१९७१

दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि

तुम्ही सुद्धा आता "बाबा वाक्यम प्रमाणम" च्या दिशेने चालला आहात. इथे बाबा दाभोलकर झाले आहेत.
बाकी बुवा पण असेच म्हणतात ना की ह्य/त्या धर्मग्रंथात असे लिहीले आहे/तसे लिहीले आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2014 - 5:19 pm | प्रकाश घाटपांडे

आपल्या प्रतिसादावरुन असे वाटते की आपण माझा प्रतिसाद पुर्वग्रह न बाळगता वाचला नाही. मी फक्त संदर्भ दिला आहे. माझे आनुषंगिक मत पुढे आले आहेच.

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Sep 2014 - 6:56 pm | पुण्याचे वटवाघूळ

"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"

याविषयी मागच्या वर्षी आमच्या मित्रमंडळींमध्ये बरीच ई-मेला ई-मेली झाली होती. त्यातील इतरांनी मांडलेली मते (अ‍ॅसॉर्टेड) इथे लिहित आहे.तसेच मिसळपाववरच आणि इतर संकेतस्थळांवर आणि फेसबुकवर मी जे काही वाचले आहे त्यावरून पुढील गोष्टी लिहित आहे. यापैकी एकही गोष्ट मी मुळात लिहिलेली नाही तरीही सगळ्या मूळ लेखकांची नावे इथे लिहित नाही आणि त्याची गरजही नसावी.

घाटपांडे साहेब म्हणतात (की दाभोळकर म्हणतात ते उधृत करतात): "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात".आता ज्ञान किंवा अनुभव म्हणजे नक्की काय हा प्रश्न नक्कीच उभा राहतो.

एका ई-मेलमध्ये मला खालील मजकूर आला तो इथे जसाच्या तसा चिकटवत आहे:
"शास्त्रामध्ये अगदी मूलभूत आणि (अजून तरी) inviolable असे फार नियम नाहीत. असे नियम बहुदा दहा-बाराच असतील (न्यूटनचे नियम, वस्तुमान/उर्जेचा अक्षय्यतेचा नियम,ओहमचा नियम इत्यादी).पण इतर सगळे नियम हे या मूलभूत नियमांवरून derived असतात.अनेकदा असे derived नियम हे universal नसतात तर काही मर्यादांमध्ये लागू होतात.उदाहरणार्थ ऍल्युमिनिअम हे room temperature ला elastic असते पण ते वरच्या तपमानाला आणि एका ठराविक pressure मध्ये तोच धातू पूर्णपणे plastic असतो.या प्रकाराला superplasticity म्हणतात. म्हणजे हा धातू elastic आहे असे आपण म्हणतो त्याचवेळा त्याला एक caveat असते ते म्हणजे room temperature आणि atmospheric pressure.अनेकदा अशी बंधने या नियमांना असतात हे पहिल्यांदा लक्षातच येत नाही तर असे काही प्रयोग झाल्यानंतरच ते कळते.जर का मी असा काही प्रयोग करायला गेलो तर कदाचित सध्याच्या शास्त्रीय बैठकीप्रमाणे ते अशक्य असेल किंवा काऊंटर-इंट्युऊटिव्हही असेल.पण सद्यकालीन शास्त्रीय माहितीच्या चौकटीच्या पलीकडे गेल्याशिवाय असे नवीन प्रयोग होऊच शकणार नाहीत.आणि पूर्णपणे rational व्यक्तिला शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर विचार करणे शक्य कसे होणार?"

तेव्हा ज्याने पहिल्यांदा अ‍ॅल्युमिनिअमच्या सुपरप्लॅस्टिसिटीवर प्रयोग केला तो माणूस अंधश्रध्द का?

कारण त्यावेळी माहित असलेल्या ज्ञानाच्या आधारे सुपरप्लॅस्टिसिटी असे काही असते आणि अ‍ॅल्युमिनिअम हा धातू इलॅस्टिक सोडून दुसरे काही असू शकेल हे माहितच नव्हते.घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे.

ई-मेल कंटिन्यूज---
"यावरूनच मी म्हणतो की Circle of rationality is often enlarged by irrational people. जे rational असतात ते एखादी गोष्ट समोर दिसली नाही किंवा अन्य पध्दतीने तिचे अस्तित्व सिध्द करता आले नाही तर ती मान्य करत नाहीत आणि त्यातूनच नकळत आपल्यावरच बंधने घालून घेतात."

याविषयी तुमचे काय म्हणणे आहे घाटपांडेसाहेब?

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2014 - 8:02 pm | प्रकाश घाटपांडे

घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे.

मला जे काही म्हणायचे आहे ते मी वरील प्रतिक्रियेत म्हटले आहे. शेवटचे दोन परिच्छेद वाचा.
आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे
तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

पुण्याचे वटवाघूळ's picture

27 Sep 2014 - 10:34 am | पुण्याचे वटवाघूळ

तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा.वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

असे असेल तर अंधश्रध्दा निर्मूलन कशाला करायला पाहिजे? समजा आज मला एखादी अंधश्रध्दा वाटत असली तरी काही वर्षांनी अनुभवात आणि ज्ञानात भर पडल्यानंतर तीच गोष्ट अंधश्रध्दा वाटणार नाही याची शक्यता आहेच ना. मग अंधश्रध्देला विरोध म्हणजे नक्की कशाला विरोध हा प्रश्न परत उभा राहतोच की. कारण अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कालनिरपेक्ष व्याख्या करता येत नसेल तर मग विरोध नक्की कशाला?

प्रकाश घाटपांडे's picture

1 Oct 2014 - 3:17 pm | प्रकाश घाटपांडे

आज एखादी गोष्ट ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत बसत नसेल तर ती अवैज्ञानिक आहे हे म्हणणे भाग आहे. उद्या ती विज्ञानाच्या कक्षेत बसली तर तिला वैज्ञानिक म्हणु. पण म्हणुन आजच ती वै़ज्ञानिक आहे असे कशाला म्हणायचे? वर भल्या मोठ्या प्रतिसादात मी खरा वैज्ञानिक नकारज्ञ नसतो याचा उहापोह केला आहेच. अंधश्रद्धांना विरोधा हा खरतर त्यामुळे होणार्‍या शोषणाला विरोध आहे जशी विज्ञानाची प्रगती होत जाईल तशी अंधश्रद्धा कमी होतील. पुर्वी देवीचा रोग हा देवीचा कोप मानत होते. आज भारतात देवीचा रोगी शोधुन सापडत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2014 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

बराचसा सहमत.

बदल घडवून आणणारा बर्‍याचदा आपल्या बदलाच्या तत्वज्ञानाच्या इतका प्रेमात पडतो की, आपण बदल कशासाठी घडवून आणत आहे ते विसरतो... आणि त्या तत्वज्ञानात जर कोणी बदल सुचवला तर त्याचा कडवा विरोधक बनतो... म्हणजे एका अर्थाने बदलाचाच विरोधक बनतो !

अतिशय आवडला हा प्रतिसाद. अंगात येणार्‍या बायका मुळात मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात. घरातल्या व्यक्तिंकडुन अवहेलना, अपमान, हेळसांड सहन करणार्‍या असतात. त्यामुळे त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या असणारे कृत्य करत असल्या तरी मुळात अंधश्रद्धेच्या बळीच असतात. तसेच सार्‍याच अंधश्रद्धेचे. याचा अर्थ अंधश्रद्धा फोफावणार्‍या व्यक्तिला शिक्षा होऊ नये असे नव्हे पण अंधश्रद्धेला समजून घेणे आवश्यक आहे. अंनिसवाल्या सार्‍यांनीच अशे संञत भुमिका घेतली तर मोठे बदल निश्वित घडतील असे वाटते.

मुळात अंधश्रद्धा म्हणून काही नसते. हा शब्द अंनिसने (किंवा त्यांच्याही आधी शाम मानवांनी ?) वापरायला सुरुवात केली असावी असे वाटते. मला हा शब्दच चुकीचा वाटतो.

श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते.

अंनिसने देव आणि धर्माविषयीच्या निरुपद्रवी श्रद्धांना (उदा. देवाची पुजाअर्चा) डोळस श्रद्धा म्हटले तर समाजास हानीकारक असणार्‍या श्रद्धांना (उदा. बळी देणे, बुवाबाजी) अंधश्रद्धा म्हटले. आणि त्यांनी त्यांचं लक्ष फक्त "अंधश्रद्धां"वर केंद्रीत केले. ही त्यांची अर्थातच "स्कोप रीडक्शन"ची स्ट्रॅटेजी होती.

लोकांच्या "श्रद्धांना" कुणाचाही विरोध नसावा या मताचा मीसुद्धा आहे. प्रत्येकाला आपापली श्रद्धा जोपासण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य असायलाच हवे. मात्र लोकांनी आपल्या श्रद्धा आपल्या घरात जपाव्यात. रस्त्यावर आणू नये. श्रद्धा रस्त्यावर आल्या की त्याचा किती त्रास होतो हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.

राजेश घासकडवी's picture

25 Sep 2014 - 5:53 pm | राजेश घासकडवी

श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते.

परफेक्ट.

अवांतर - एका आठवड्याच्या आत आत्महत्येच्या विचारांपासून ते ट्यार्पीखेचक धाग्याकडे प्रवास केलेला पाहून लेखकाच्या मनोधैर्याचं कौतुक वाटतं. मध्ये एका टप्प्यावर 'धन्यवाद मिपाकरांनो, माझं आता ठीक चाललंय' असा धागा आला असता तर जास्त बरं वाटलं असतं.

राजेश घासकडवी's picture

25 Sep 2014 - 5:56 pm | राजेश घासकडवी

आत्मपरीक्षणाचा धागाही आला होता, ही माझी नजरचूक. क्षमस्व.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:59 pm | प्रसाद१९७१

त्या धाग्याचा दुसरा भाग पण येणार होता पण अजुन आला नाहीये. त्याच्या ऐवजी हे आले.

येणार येणार येणार

दुसरा बी भाग येणार … ह्याच्यापेक्षा ज्यास्त ट्यार्पि खेचक आसनार.

सगळेच जरा वळणावर येत आहे. पूर्ण कथा टाकण्यात मजा आहे, उगाच च्यानलांसारखे काय रोज रोज कुटत बसायचे. मनोधर्य शाबूत राहण्यात मिपाची हिमालायेवढी मदत झाली आहे.

दुसरा भाग येणार आहे, फुल्ल यांड फायनल.

पण काही म्हणा , आत्महत्येचे विचार मनात येणे ते अंनीस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देणे - हा मनस्थितीतील बदलाचा प्रवास तुम्ही अगदी कमी कालावधीत ( काही दिवसातच) पार केला या बद्दल तुमचे अभिनंदन !!

अंनिस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्याचा विचार आत्महत्येच्या विचारांपासून निघालेल्या शंभर धाग्यामाधला एक आहे. मला काही लोकांनी पत्रिका, होम हवन, ग्रहशांती वैगेरे पुळचट उपाय करायला सांगितले. त्यानंतर झालेल्या मेंदूवादळानंतर हा सल्ला निपजला. एकूण माझा लेख आणि त्याचा अन्वयार्थ ज्याने त्याने आपल्या परीने लावला. सर्व प्रतिसाद वाचून असे वाटते कि साधारणपणे सगळ्यांना समोरच्याला "च्या बाजूने/च्या विरुध्द" असे वर्गीकरण केल्याशिवाय जमतच नाही. तुम्ही वादग्रस्त विषय काढले कि एकतर च्या बाजूने समजले जाता किंवा च्या विरुद्ध. ह्या लेखाचा काहीतरी भलताच अर्थ लावला गेला आहे.

कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी संबंध नसावा अशी माझी भाबडी अपेक्षा होती.

अंनिस चुकीचे काम करत आहे हे कुठेही म्हटले नाही. अंनिस फालतू आणि बेसलेस आहे असेही म्हटले नाही. त्यांच्या कडे लोकांचा बघण्याचा बदलत चालेला दृष्टीकोन आणि सद्य सामाजिक परिस्थिती ह्याच्यावर काही समाधान शोधता आले तर बरे असे मला वाटत होते

असो. मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे.

पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.

सखी's picture

26 Sep 2014 - 9:48 pm | सखी

तुमच्या लेखाची पहीलीच ओळ आहे.

अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा....

राजेश घासकडवी's picture

29 Sep 2014 - 5:40 am | राजेश घासकडवी

मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे.

सखी यांनी तुमच्या लेखनातला आणि प्रतिसादातला विरोधाभास दाखवलेला आहेच. तेव्हा मिपाकरांना बिटवीन द लाईन समजत नाही वगैरे गैरसमजात राहू नये.

पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.

एवढं करण्याची गरज नाही. संयत भाषेत प्रामाणिकपणे लेखन केलं की पुरतं. हा प्रामाणिकपणा मिपाकरांना बिटवीन द लाइन स्वच्छ दिसतो. उगाच मिपाकरांना कळलंच नाही असं म्हणणं, आणि वर तिरकस बोलणं टाळलं तर आणखीनच चांगलं.

भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन ह्या सुध्दा अंधश्रद्धा निर्मुलनाशी निगडित आहेत. कस ते सांगतो ज्यामुलीना देवाशी लग्न लावुन देवदासी बनवण्यात आल त्यांच्या संमती शिवाय त्या मुली कालांतराने पुरुष वासनेला बळी पडतात व मग वेश्या व्यवसायात ओढ्यल्या जातात. अनिसमुळे येणार्‍या कायद्यामुळे ह्या वाईट प्रथेला नक्कीच लगाम लागेल. भिखारी का वाढतात हे जर बघितल तर जरा आपल्या मंदिराजवळ असणार्‍या त्यांच्या उपस्थितिवरुन कळेल आणि एक जर अनिसच काम एव्ह्ढ महत्वाच नव्हत तर मग दाभोलकरांनसारख्या विद्वान माणसाला जीव का गमवावा लागला. अनिसच काम हे फार महत्वाच होत व ते राहील. दाभोलकर व त्यांच्या अनिसला माझा लाख लाख वेळा सलाम.

जेपी's picture

25 Sep 2014 - 6:00 pm | जेपी

खंग्री चर्चा.
धागाकर्ता स्वत: वाद प्रतिवाद करतोय हे पाहुन बरे वाटले.
येत राहीन वाचायला.

शशिकांत ओक's picture

25 Sep 2014 - 6:42 pm | शशिकांत ओक

अशा विषयावरील धाग्यावर ठरलेले बॅटमन खेळायला आलेले पाहून वरील नाव नाही आले तर कसे चालेल म्हणून माहिती साठी ही प्रतिक्रिया.
सरांच्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ अंनिसचा खरा चेहरा पुस्तकातील विचारांची आठवण झाली.
अनेक नव्या सदस्यांच्या माहितीसाठी सरांच्या पुस्तकातील काही प्रकरणे कोणी विचारणा केली तर डकवीन.

तिमा's picture

25 Sep 2014 - 6:48 pm | तिमा

कुठल्याही व्यक्तीला तू मूर्खपणा करत आहेस, असे सांगितलेले आवडत नाही. अंधश्रद्ध लोकांचेही तसेच आहे. त्यामुळे त्यांना शहाणपणा शिकवायला जाऊ नये.आत्मोन्नतीच्या प्रवासात ते आपल्या कैक जन्म मागे आहेत असे समजावे.(याठेकाणी जन्म हा शब्द काल व्यक्त करण्यासाठी वापरला आहे. नाहीतर पुनर्जन्मावर तुमचे अंधश्रद्धा आहे असे कुणी म्हणेल.)

चित्रगुप्त's picture

25 Sep 2014 - 6:54 pm | चित्रगुप्त

अंधश्रद्धाच काय, तथाकथित श्रद्धा सुद्धा मला अनावश्यक वाटते, तरीसुद्धा फक्त एवढेच नमूद करतो, की दाभोलकरांच्या व्याख्यानाचा मी बघितलेला एकमेव व्हिडियो मला कैच्या कैच वाटला होता.

मित्रहो's picture

26 Sep 2014 - 12:30 am | मित्रहो

मी लहान असताना मला दाभोळकर माहीती नव्हते पण शाम मानव यायचे. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेपण यायचे. ते बरेच प्रयोग करुन दाखवयाचे आणि त्यामागचे शास्त्र सांगायचे. तेंव्हा मी श्रद्धा अंधश्रद्धा हे समजण्यापलीकडला होतो. मनात तेंव्हापासून एक पक्के ठसले हे सारे थोतांड आहे नंतरही या साऱ्यांचा विचार करताना मनात कुठेतरी तेच होते आणि असते.
समाज बदलत नाही असे नाही तो बदलला आणि बदलतोय. तो अंनिसमुळेच बदलतोय असे म्हणणे कठीण आहे, पण त्याचा काहीतरी परीणाम होत असनार हे नक्की. लहाणपणी जसा समाज होता आणि आता जसा आहे यात बराच बदल झालाय. आता कुणी मांजर आडवे गेेे म्हणून पाच पावलेे मागे जात नाही. लहान असताना हा आमचा खेळ होता, कुणी जात असेल तर मुद्दाम मांजर सोडायचे. तसेच हीचा पायगुण वाइट हाही प्रकार आता बराच कमी झालाय. पूर्ण कमी झालाय असे म्हणता येणार नाही पण कमी झालाय. कुष्ठरोग्याला दिली जाणारी वागणूक. काही बुरसट कल्पनांनी स्त्रीयांना होणारा त्रास आज बराच कमी झालाय. समाज बदलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमटे आणि बंग यांचे कार्य. ते जेंव्हा आदिवासी भागात गेले तेंव्हा कुणीही त्यांच्याकडे यायला तयार नव्हते पण लोक हळूहळू यायला लागले.काही गोष्टी या बदलायलाच हव्या कुण्या नदीत आंघोळ केल्याने पापक्षालन होते ही समजूत. त्या नदीचे काय होते? गंगेविषयी बरेच बोलले जाते पण गोदावरीची परिस्थिती पण काही चांगली नाही मग ती नाशिकला असो की बासरला.तीच गोष्ट पशूबळींची. खरेच या गोष्टी आपल्याला हव्या आहेत का? इथे मला अनिस काय म्हणते यापेक्षा मला काय वाटते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे?
हेही खरे आहे की काही गोष्टींचे प्रस्थ वाढलेय ज्योतीष्य, देवळातल्या रांगा, विशिष्ट ठिकाणी जायचा असलेला अट्टहास, कर्मकांड. याला अनिस जबाबदार आहे असे नाही म्हणणार मी. अनिस असते किंवा नसते तरीही असेच घडले असते. आर्थिक सुबत्ता आणि वाढती स्पर्धा हा जो समाजातील विरोधाभास आहे हे कदाचित त्यामागचे कारण असावे. दुसरे म्हणजे या गोष्टींमुळे फार नुकसान होत नाही त्यामुळे कुणी खूप जीव तोडून विरोध करीत नाही. या साऱ्या गोष्टी फार सोय़ीने स्वीकारायची सवय समाजाला जडलीय. ठरवलेल्या दिवशी जर बाळ हवे असेल तर दिवस पाहून सारे ठरविले जाते पण हेच जर का परीस्थिती वाइट झाली तर मग दिवस बघितला जात नाही.आधी अशी टोकाचीभिूमिका घेणारे लोक होते.
अनिसचे काम आहे त्यांच्या परीने आणि समजुतीने समाजाचे प्रबोधन करायचे ते त्यांना करु द्यावे ते होते की नाही हे त्यांचे त्यांनाच ठरवू द्या.

धागा वाचून एकदम शॉक बसला आहे!
यांच्याकडून अश्या धाग्याची अपेक्षा नव्हती.

संदीप डांगे's picture

26 Sep 2014 - 11:01 pm | संदीप डांगे

असे काय आहे बुआ ह्यात?

पिलीयन रायडर's picture

29 Sep 2014 - 10:00 am | पिलीयन रायडर

साधारण हीच प्रतिक्रिया माझीही आहे...

लेखक त्यांच्या मनस्थितीतुन बाहेर पडुन दुसरं काही लिहीत आहेत.. हे छानच आहे..
पण... आत्महत्या की कर्जबाजारी होणे असे पर्याय आयुष्यात उभे ठाकले असताना असे लेख लिहू शकणे व्यक्तिशः मला आश्चर्याचे वाटते.. वर कुठेतरी तुम्ही म्हणत आहात की काम करुन जो वेळ उरतोय त्यातुन हे लेख तिहीतोय.. पण इथे ज्या हिरीरीने प्रतिवाद करत आहात ते पाहुन तसंही वाटत नाहीये..

आणि लेखाबद्दल म्हणायचं झालं तर पहिलीच ओळ इतकी टीआरपी खेचक आहे की त्यावर काही मत देण्याची इच्छाच नाही..

बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करावं आणि काय करु नये ह्याच्याशी माझा काही संबंध नाही.. मला फक्त आश्चर्य वाटलं.. दशानन ह्यांना "शॉक" का लागला असावा हे समजतय...

बाबा पाटील's picture

27 Sep 2014 - 11:39 am | बाबा पाटील

फुल्ल करमणुक असते. माझ्या गावात दर गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते,देवाची ३०-३५ फुटाची ध्वजाची काठी नाचवत नाचवत मिरवणुकीने देवाकडे नेली जाते , आजपर्यंत गावातल कोनीही अगदीच अपरिहार्य कारण असेल तरच अन्यथा या दिवशी दर्शन चुकवत नाही. यात दंडवत आणी देव अंगात येणे हे दोन प्रकार मजबुत चालायचे.साधारण मी १० वर्षाचा असताना आमच्या शाळामास्तर बापुसने मला या देव अंगात येण्याच्या कार्यक्रमापुर्वी सराटे दिले,व जेथे देव अंगात येतो त्या ठिकाणी टाकण्यास सांगितले,सराट्याची ( संस्कृत नाव गोक्षुर कंटक) ते कसेही फेका त्याच्यावर पाय पडला की की ते पायात घुसणारच. त्यामुळे ज्याच्या अंगात येइ व देवापुढे घुमायला जाई त्याच्या पायात मातीत पडलेला काटा घुसत असे, त्यावर्षी तर फुल्ल कल्ला, हाच प्रकार सलग तीन-चार वर्ष घडला,आपोआप दरवर्षी या घुमणार्‍यांची संख्या कमी कमी होत गेली व हळु हळु थांबली,विषेश म्हणजे देवाचे सगळ्यात मोठे भक्त गावचे कारभारी आमचे आजोबा.पण मात्रा अचुक लागु पडली आणी मागच्या विस वर्षात तरी परत देवापुढे कोनी नाचत-घुमत बसले नाही. आता दहा एक वर्ष झाली,वडिलच विश्वस्त आहेत विविध सुधारणा चालु आहे,पण श्रद्धा ठेवुन अंद्धश्रद्धेला पुर्ण फाटा देण्यात आला आहे.खरच असा एकतरी मास्तर प्रत्येक गावात असावा,इतक्या वर्षांचे आमचे बापलेकांचे गुपित आज मि.पा.मुळे बाहेर आले.असो.

संदीप डांगे's picture

27 Sep 2014 - 1:32 pm | संदीप डांगे

हिच ती पद्धत !

श्रध्देची व्याख्या

श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी,
सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम
विश्वास

उदा. तेंडुलकर आज शतक ठोकणार... पुरावा काय या आधी ठोकल्याचा अनुभव. असे सगळेच म्हणतात म्हणून... ज्या पिलानेने आयुष्यात प्रथमच सचु खेळताना बघितला आहे तो ही श्रध्देने टाळ्या पिटतोय बरे नाही झाले शतक म्हणून हिरमोड झालाय म्हणुन पुढील म्याचला सुधा तिच तर्हा अन तोच हिरमोड हो शतक काय भोपळा फुटला नाय.... मायला अनीस क्रिकेटवर बंदी का घालत नाही ?

काउबॉय's picture

27 Sep 2014 - 2:00 pm | काउबॉय

कारण अनीसची श्रध्दा आहे सच्या शतक न्हवे शतकांचे शतक ठोकणार.

तर आपल्या भौतिक जीवनाच्या ही अविभाज्य भाग आहेत पण शिरोमणी जेंव्हा त्याला निव्वळ विशिष्ट मुद्या पुरते मान्य करून विधाने करतात तेंव्हा निराकार गाढवाची हे वागन बरं न्हवे हीच कविता पुन्हा पुन्हा आठवू लागते