जीवन - सार

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
20 Sep 2014 - 7:23 pm

आमची प्रेरणा : काय सॉम्गॉयलॉच पायजे क्का?

रॉर्बट जोत्याच्या घराकडे जाताना दिसला. मॉरेयॉ भवतेक त्यालाच शोधत होती.
तसे पाह्यला गेले तर रॉर्बट आणि मॉरीयॉ दूरच्या नात्यातले. रॉर्बट मॉरीयॉ च्या मावशीच्या नणंदेच्या दिराच्या सासूचा नातू. प्ण एका लग्नात मॉरीयॉला रॉर्बट भेटला आणि ते जवळ आले. आख्खे आख्खे दिवस ते एकमेकाना आटवू लॉगले. एकमेकाम्शिवाय त्यान कर्मायचे नाही. राँर्बट जेव्वा जेव्वा मॉरीयॉला भेटॉयचा तेव्वा तेव्वा तो तिच्यासाटी पेपरमिटाच्या गोळ्या ऑणॉयचॉ. मॉरीयॉला त्या मदे भोक आस्लेल्या पांडर्या गोल्या खूप्प आवडॉयच्या. रॉर्बंट ज्जे काही करायचॉ ते अगदी श्टैल मधे करायचा. तो आग्दी गोर्रा नस्ला तरी बाकीच्या मुलात खूप्प उठून दिसायचॉ.
खूप्प वेळ गोळ्या देव्वून झाल्यावर रॉर्बटने एकदा मॉरीयॉला प्रपोज्ज मार्ले. आग्दी श्टाईलमद्धे. सागर पिक्चरमधलाअ तो जानी पिक्चरमधल्या मॉरीय्या ला प्रपोज्ज मार्तो तश्शे ष्टैल मधे आग्दी घुडघ्यावर बस्सून. हातात फुल नव्हते म्हणून काय झाली ती मधे भोक असलेल्ली पोल्लोची पेपरमिंट च्या गोळ्याची पाकिट्ट होतेच्च की. त्याने विचार्ले. गे मॉरीयॉ तुज्जी फ्रेन्डशिप्प देनार का?
मॉरीयॉ एकद्दम लाजली. तिच्या गाल्लावॉर खट्टाखट्ट लाल्ली आली. जमिनीकडे बगत ती म्हणाली. आवशीक विचारून सांगते. रॉर्बट म्हणाला. अगे तुज्जे आव्शीक नाय हां तुका विचारताहा.. नक्की काय आसेल ते साँग. म्हणजे तू दुस्रीकडे बगायला मोकळी आणि मी पण दुसरी कडे फ्रेन्ड्षिप्प मागायला मोकळा.
यावर मॉरीयॉ आण्खीनच लाज्ली. म्हणाली की माज्जा बा. नाखवा आहे. कसलीही षिप आस्ली की त्याचा निर्णय आवशीच घेते.
षिपवर जायचा आसला. की त्यावरून माल उतरवायचा आस्ला सगळे निर्णय आवशीच घेते.
यावर रॉर्बट खूप्प हास्ला. म्हणाला. फारच विनोदलीस तू. पन कॉयपण म्हणा. फ्रेन्डषिप्प हे एक प्रकारचे षिप्प च आहे. प्रेमाच्या सागरात प्रेमिक्काना किनारा दाखवणारे षिप्प. रोबर्ट थडाथडा हास्ला. मॉरीयॉ च्या डोळ्यात बगत तो हासून लाग्ला. हासून हासून गाल त्याच्चे दुकु लाग्ले.
मॉरीयॉ पण हासू लाग्ली. ती आशी हासायलॉ लॉगलीकी गाल आत्ता आण्खीनच लाल्ल व्हॉयच्चे.
मॉरीयॉ आता एकदम ठक्क गमभीर झाली. तुज्जे म्हणणे खरे आहे . पन मला भिती वाटते की तुज्जे प्रेम त्या पोलोच्या गोल्यांसार्खे मधे भोक पडलेले अस्ले तर?
रोर्बत म्हणला. खुळी की काय...आगं आपले आयूष्ञ आसेच आस्ते. भोक पडलेले. आपण चवीकडे लक्ष द्यायचे.गोळीला मधे भोक आहे म्हणुन नाकारले तर गोळीची गोडी कशी चाखायला मिळणार.
आयूष्ञात दुख्खे खूप आहेत. ती आपल्या आयुष्यात पडलेले भोके समज. पण चांगले क्षण ही गोडी समज.
नुस्ते दुख्खाम्कडे बगत राहीलो तर आयुष्याची गोडी कधी समजायचीच नाही.
मॉरीयॉला हे पटले. तीचे लाजणे आत्ता सम्पले होते. इतका समंजस जोड्डीदार अस्ला तर आयूष्ञ गोडगोडच होईल याची तिलॉ खॉत्री पटली होती.
तीने रॉर्बटच्या डोळ्यात पाहीले म्हणाली व्हय. राज्या रॉर्बटा ही शिप्प तुज्जीच आहे.

बालकथासद्भावना

प्रतिक्रिया

काउबॉय's picture

20 Sep 2014 - 7:28 pm | काउबॉय

मी पयला ?

एस's picture

20 Sep 2014 - 7:37 pm | एस

आवडण्यात आले आहे.

भोक आहे म्हणुन नाकारले तर गोळीची गोडी कशी चाखायला मिळणार.

छान संदेश दिलात.

पैसा's picture

20 Sep 2014 - 8:23 pm | पैसा

क़ाय हे विजूभाँ! कसाँ काँय जमलाँ तुम्हालाँ इतकं या श्टैलीत लिहायलाँ!

सस्नेह's picture

30 Sep 2014 - 8:18 pm | सस्नेह

इजुभौ रऑक्स !

आदूबाळ's picture

20 Sep 2014 - 8:52 pm | आदूबाळ

राँर्बर्ट

रॉर्बट नव्हे.

परत लिहा...

मुक्त विहारि's picture

20 Sep 2014 - 10:00 pm | मुक्त विहारि

राँर्बर्ट

ह्या राँर्बर्टचे सगळे भाग कुठे मिळतील?

स्पार्टाकसांच्या गूढ कथे पेक्षा, "अपहरण की खूण" लई जोरदार होती.

इथे - स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माऊथ

http://agakke.blogspot.co.uk/2013/09/1.html

जिवनभाऊंना डू आयडी समजणार्‍या अभागी लोकांसाठी इथे सरांचा फोटो पण आहे.

मुक्त विहारि's picture

21 Sep 2014 - 2:57 pm | मुक्त विहारि

मंडळ आभारी आहे....

कवितानागेश's picture

20 Sep 2014 - 10:18 pm | कवितानागेश

ही कथा तोंडात कडक बुंदीचा आख्खा लाडू धरुन वाँचली तरच जमेल. ;)

कडक बुंदीचा लाडू दात न पाडता तोंडात धरून वाचता यॉयलॉ हॉवॉ. ;)

काळा पहाड's picture

20 Sep 2014 - 10:27 pm | काळा पहाड

एकमेकाना आटवू लॉगले

खिक!

एकमेकांना आटवण्याचा प्रकार फार आवडला.

प्रभाकर पेठकर's picture

21 Sep 2014 - 12:34 am | प्रभाकर पेठकर

विजूभाऊ तुमच्याकडून अपेक्षा नव्हती.

कांही सकस लेखनाची क्षमता असताना, फक्त प्रतिसादांसाठी, हाती कटोरा घेऊन असे उथळ लेखन करण्याची दुर्बुद्धी का सुचावी कळत नाही.

मर्जी तुमची.

विटेकर's picture

21 Sep 2014 - 7:56 am | विटेकर

सहमत

कानडाऊ योगेशु's picture

21 Sep 2014 - 2:44 pm | कानडाऊ योगेशु

+१ -१ दोन्हीही.
लिहिते राहणे महत्वाचे आहे.!
विजुभाऊंनी असले लेखन करण्यासाठी कदाचित दुसरा कुठला डु.आय.डी घ्यावा असे नमूद करुन मी माझ्या जागेवर मांडी घालुन बसतो!

प्रभाकर पेठकर's picture

21 Sep 2014 - 2:47 pm | प्रभाकर पेठकर

>>>>असले लेखन करण्यासाठी.....

त्यांनी 'असले' लेखन करू नये हा मुळ मुद्दा आहे.
ज्यांच्या कडे कांही चांगले करण्याची क्षमता नसते तेच प्रसिद्धीसाठी उथळ मार्ग निवडतात.
अर्थात, त्यांनी कुठला मार्ग निवडायचे ह्याचे स्वातंत्र्य त्यांना आहेच.

नेत्रेश's picture

21 Sep 2014 - 12:17 pm | नेत्रेश

"चवीकडे लक्ष द्यायचे.गोळीला मधे भोक आहे म्हणुन नाकारले तर गोळीची गोडी कशी चाखायला मिळणार"

हे लय भारी.

दिपक.कुवेत's picture

21 Sep 2014 - 2:55 pm | दिपक.कुवेत

विजुभाउंनी हे अस्लं लिहुन आमच्या काळजालाच भोके पाडली आहेत....

तिमा's picture

21 Sep 2014 - 4:50 pm | तिमा

विजुभाऊंनी फारच जालीम संदेश दिले आहेत! बाकी विजुभौ आणि जीवनभौ ! यमक जुळतंय!
तो गोळीचा संदेश अंमळ अश्लील वाटला.

हो खरे आहे. विजुभौ ना लिमलेट्ची गोळि दाखवून हे जीवन कसं आंबट्-गोड अनुभवांनी भरलं आहे असं दाखवता आलं आसटं.

विजुभाऊ's picture

22 Sep 2014 - 10:54 am | विजुभाऊ

@ दिपक : गोळी चुकली. कदाचित माझ्या डेस्कवर ती पोलोची गोळी समोरच पडली होती. त्यामुळे असेल.

दिपक.कुवेत's picture

22 Sep 2014 - 12:58 pm | दिपक.कुवेत

गोळ्या चुकल्या कि सगळीच गणितं चुकतात असं एकिवात आहे...

योगी९००'s picture

29 Oct 2015 - 10:39 am | योगी९००

गोळ्या चुकल्या कि सगळीच गणितं चुकतात असं एकिवात आहे...

_/\_

गणितच नाही तर इतिहास्,भुगोल सगळंच चुकतं

बॅटमॅन's picture

21 Sep 2014 - 9:39 pm | बॅटमॅन

अगायायायायाया =)) =)) =))

विजुभाऊ's picture

21 Sep 2014 - 9:56 pm | विजुभाऊ

@ पेठकर काका. आपका हुकुम सर आँखोपर.
केवळ एक वात्रटपणा म्हणूण लिहीलय. जिवनभौ च्या लेखनशैलीची थोडी थट्टा कराविसे वाटले म्हणुन लिहीलय.

चित्रगुप्त's picture

8 Oct 2014 - 7:34 pm | चित्रगुप्त

वात्रटप्णा हाच महत्वाचा असतो राव, बाकी काय, सर्व ठीकच.

प्रदीप's picture

22 Sep 2014 - 12:41 pm | प्रदीप

विजॉभॉ,क्कॉय कमॉलच केलीत. षिप अगदी जॉर्दॉर चालणॉर की व्हो!!

पोटे's picture

22 Sep 2014 - 2:20 pm | पोटे

लेखन विषय बालकथा !

विटेकर's picture

22 Sep 2014 - 3:04 pm | विटेकर

स्व-संपादन शक्य असेल तर धागा उडवा !

योगी९००'s picture

23 Sep 2014 - 11:31 am | योगी९००

मस्त...

आजच "अपहरण की खून?" याचे काही भाग वाचले. संपूर्ण गोष्ट काही कारणामुळे वाचू शकलो नाही कारण आता "अपहरण की खून" यापैकी काय? हेच मला कळत नाही. मिपाकरांकडून मदतीची अपेक्षा आहे.

स्वलेकर's picture

30 Sep 2014 - 6:27 pm | स्वलेकर

विजुभाऊ यांनि अजिबात निराश केलेले नाहि.

चित्रगुप्त's picture

8 Oct 2014 - 7:31 pm | चित्रगुप्त

व्वा महाराज व्वा. हे वाचायचे राहूनच गेले होते.
राँर्बर्ट लईच भाग्यवान हो तुम्चा. शिप्प काय, गोळी काय, झकास.

चित्रगुप्त's picture

29 Oct 2015 - 8:42 am | चित्रगुप्त

आज पुन्हा एकदा हा धागा वाचून मजाच आली . ज्यांना सुचते आणि जमते त्यांनी असले लिखाण अवश्य करावे. वात्रटपणा ही 'जीवन'संजिवनी असते.

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2015 - 9:06 am | बोका-ए-आझम

हा तर आपला जिवन बिमा आहे! रच्याकने सध्या जीवन बिमार दिसतोय. ब-याच दिवसांत काळी मावशी सारखं काही वाचायला मिळालं नाही!:)

चित्रगुप्त's picture

29 Oct 2015 - 10:22 am | चित्रगुप्त

काळी मावशी वाचल्याचे आठवत नाही , दुवा देता का ?

पद्मावति's picture

29 Oct 2015 - 2:48 pm | पद्मावति

ही ही ही...आई गं...हसून हसून मरतेय. मस्तं आहे कथा. कशाचं विडंबन आहे का?

जव्हेरगंज's picture

29 Oct 2015 - 6:47 pm | जव्हेरगंज

खतराटचकी!

चित्रगुप्त's picture

11 Apr 2019 - 2:17 am | चित्रगुप्त

'राँर्बट' चा शोध्ह घेतनां संर्वात आँधी हे साडपंले.
क्माल कित्ता तुसी मुवी.

विजुभाऊ's picture

21 Jun 2023 - 2:41 pm | विजुभाऊ

या लिखाणाची प्रेरणॉ देणॉरे जीवनभॉ हल्ली दिसत नाहीत.