||ओम नमः शिवाय ||

नमन माझे तुला नटवरा..
हे शिवशंभो, भोळ्या शंकरा..

कृपासिंधो तू, हे गौरीहरा..
प्रसन्नवदन तू , कर्पूरगौरा..

तांडव करुनि, तु ब्रह्मांड पेलिसी..
प्राशुनि हलाहल, नीलकंठे मिरविसी..

फासुनि विभुती, तू हिमालये वससि..
उमापती शिव, हस्ती त्रिशूल घेसी..

मस्तकी तुझिया चंद्र विराजे..
हाती डम डम डमरू वाजे...

तुझ्या जटा-मुकुटातुनि वाहे मुक्त मंदाकिनी..
सर्प-भुजंग खेळति देहावरी, तू शूलपाणिनी..

मुंडक-माला धारिसी तू, चिता-भस्म विलेपुनि,
विश्वजननी महामाया , असता तुझी अर्धांगिनी..

महेश्वर तू, महादेव तू, धन्य धन्य देवी सती..
पुन्हा मिळविण्या तुज भूपती, जन्मली ती पार्वती..

अनाथांचा नाथ असुनि, निराकार तू, नि:संग तू..
काळपुरूषाचा काळ रेखिसी, त्राही त्राही भगवान तू..

नमन माझे तुला नटवरा..
हे शिव-शंभो भोळ्या शंकरा..

||ओम नम: शिवाय||

लेखनविषय:: 
Taxonomy upgrade extras: 

प्रतिक्रिया

छानच.....

(जय भोलेनाथ)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मदनबाण.....

YAKKA NIN MAGALU :- {Victory-:- kannada Movie }

वा! सुंदर काव्य...

जय भोलेनाथ!

आपला,
(भांगप्रेमी) तात्या.

-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!

वा! सुंदर काव्य...
असेच म्हणतो .. आणि खफ वरील काव्यप्रतिभेस इकडच्या जंगलात मायग्रेट केल्याबद्दल अभिनंदन .. अजुन येऊ देत ... वाचतोय ...

(भांगप्रेमी) तात्या.
Lol =))

मला पण आरशात पाहून भांग पाडायला फार आवडते ..
मी पण भांगप्रेमी
-- ( टारझन ऊर्फ खवीस )

>> वा! सुंदर काव्य...

जय भोलेनाथ!

सुरेख काव्य !

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

धन्यवाद!!!!!:)

कहत कबीरा सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!

ओम नम: शिवाय|

आजच्या महाशिवरात्रीच्या शुभदिनी, वाचण्यास यथायोग्य असेच तुझे काव्य वाटते, नयनी.

ही रचना तुझी स्वतःचीच आहे ,की अजून कोणाची?

(सहज म्हणुन विचारलं, कृपया राग मानु नकोस.)

(राधिका.)

राधिका स्वप्नील क्षेत्रमाडे.

ही रचना तुझी स्वतःचीच आहे ,की अजून कोणाची?

Smile राधिका जी, ही माझी स्वत:चीच "रचना" आहे.

श्रावणातल्या सोमवारी ही "शिवस्तुती" प्रकटित करण्यात आलेली होती.... अर्थात माझ्याकडूनच!

आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ती शोधुन काढून, वाचून त्यावर प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल खरोखर आभारी आहे मी!

Smile

|| ओम नम: शिवाय||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कहत कबीरा सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!

सुंदर !

नितांत सुंदर !!

जय हो बोले बाबा की !!!!

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन Biggrin

धन्यवाद राजे!

जय हो -----भोलेनाथ!!!

Smile

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कहत कबीरा सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!

||ओम नम: शिवाय||

आधी वाचली नव्हती. छानच वाटलं आजच्या महाशिवरात्री दिवशी सकाळी वाचल्यावर.

सुंदर रचनेबद्दल मृगनयनी यांचे आणि धागा शोधून काढल्यामुळे वाचनाची संधी मिळाल्याबद्दल राधिका यांचे आभार!

असेच म्हणतो

||ओम नमः शिवाय ||

सहजरावांशी सहमत ...

॥ ओम नमो: शिवाय ॥

अवांतर : दाक्षिणात्य भागात उपवासला "इडली" चालते हे ऐकुन तुम्हाला काय वाटले ???

------
( दिवसभर "उपास" घडणारच ह्या काळजीने भयभीत ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. Wink

मी पण सहमत.

शेखर

>> अवांतर : दाक्षिणात्य भागात उपवासला "इडली" चालते हे ऐकुन तुम्हाला काय वाटले ???
अवांतर उत्तरः गणपती दुध पीत असेल तर इडली पण चालु शकते Wink

पीठ वाटले आणि खाल्ली.
सुंदर रचना

आधी वाचली नव्हती. छानच वाटलं आजच्या महाशिवरात्री दिवशी सकाळी वाचल्यावर.

सुंदर रचनेबद्दल मृगनयनी यांचे आणि धागा शोधून काढल्यामुळे वाचनाची संधी मिळाल्याबद्दल राधिका यांचे आभार!

सहमत !!

जय शिवशंकर ! जय भोलेनाथ !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

धन्यावाद मृगनयनी महाशिवरात्रीच्या दिवशी घरी काही वाचता नाही आले पण इथे वाचायला मिळाले महादेवावर.
||ओम नमः शिवाय ||

Prajakta P.Mhatre

छान! || ॐ नमः शिवाय ||

------------------------------------------------------------

नैनीबाई,
धन्यवाद!

छान रचना Smile

-(नंदी) ध मा ल.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

||ॐ नमः शिवाय ||
---वल्लरी

---वल्लरी

अप्रतिम आणि सुंदरच....

आज महाशिवरात्रीच्या दिवशी एवढी सुंदर शिवस्तुती वाचून मन प्रसन्न झाले
अशाच छान रचना करीत रहा मृगनयनी....

||ॐ नमः शिवाय ||
(शिवभक्त) सागर

मी पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

||ॐ नमः शिवाय ||

--अवलिया

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

खुपच छान मृगनयनी.....
वेताळ

वेताळ

महशिवरात्रीनिमित्त लालबागच्या राजाच्या वडिलांचा विजय असो.. Smile

आपला,
(गणेशभक्त) तात्या.

-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!

मला शिव बध्दल जास्त माहीत नाही पण तु लिहलेल्या ओळी सुंदर आहेत .. स्पेशली ...
अनाथांचा नाथ असुनि, निराकार तू, नि:संग तू..
काळपुरूषाचा काळ रेखिसी, त्राही त्राही भगवान

अप्रतीम ...
~ वाहीदा

~ वाहीदा
एक अप्रतिम सुंदर उर्दू नज्म (कविता) --
अब हम भी नहीं रोते, अब हम भी नहीं सोते... अजीब, मासूम लडकी थी ..
http://www.youtube.com/watch?v=5OjnsZY3Qg0&NR=1
http://www.youtube.com/watch?v=Vg9BHTIGWhY

मी ही वाचलीच नव्हती.
खूपच सुंदर आहे हे काव्य. Smile
नयनी.. अभिनंदन इतक्या सुंदर रचनेबद्दल. Smile
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

काय गं नयनी!... किती वर्षं या एकाच शिवस्तुती'वर महाशिवरात्र साजरी करायची! Smile
नवीन लिहि काही तरी

ओम नमः शिवाय |

राधिका स्वप्नील क्षेत्रमाडे.

सुंदर रचना

राधिका ताई, मुलुखावेगळी! धन्यु!

Smile

|| ओम नम: शिवाय ||

कहत कबीरा सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!

मृगनयनीजी,
आजच नाडीग्रंथांवरील प्रतिक्रियांच्या संदर्भात आपले नाव आठवले आणि पहातो तो महाशिवरात्रीला आपण काव्यरचना घेऊन अवतरित! असो.

ज्यांच्या प्रेरणेचा अदभूत चमत्कार - नाडीग्रंथ अशा शिवशक्तीला
शिव भक्ती लागी तनु ही झिजू दे| शिव चरणकमली मन हे निजू दे ।
शिव स्मरणी ठेवी ही वाचा रिझाया | नमस्कार माझा तुला शिवराया ||
|| ओम नम: शिवाय ||

शशिकांत
मो. क्र - 0९८८१९०१०४९

आहो णाडीचार्य , त्या ३ वर्षांपुर्वीच अवतारल्या होत्या ... णाडीवर णिट लिहील्या नाहीये का ? Mon, 04/08/2008 हे पहावं Smile

- शिस्पेंसिल टोक

- शिस्पेंसिल टोक

Lol काय विचित्र माणुस आहेस तु

चुचु

|| ओम नम: शिवाय ||

रुपाली पोयेकर

अप्रतिम काव्य ...

-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "

सुंदर कविता, आवडली.

||ॐ नमः शिवाय ||

पुष्करिणी

----------------------------

शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको

तीर्थासि जाऊ नको !

योगाभ्यास नको व्रते मख नको

तीव्र तपें तीं नको !

काळाचें भय मानसीं धरु नको

दुष्टांस शंकूं नको !

ज्याचीया स्मरणें पतीत तरती

तो शंभु सोडूं नको !!!
------------------------
अमोल

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा.

॥ओम नमः शिवाय॥

मी दर श्रावणी सोमवारी तुझी ही कविता वाचते. Wink

तूर्तास, तू काहीतरी नवे लिहावेस्, अशी अपेक्षा. Smile

राधिका स्वप्नील क्षेत्रमाडे.

बं....भोले


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही