शीत- उष्ण गुण- गुणधर्म व शरीरातील कार्य.

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in जनातलं, मनातलं
28 Aug 2014 - 9:08 pm

भारतीय तत्वज्ञानाने व आयुर्वेद शास्त्राने शरीराशी संबधित वीस सामान्य गुण मान्य केले आहेत.ते म्हणजेच गुरु,लघु इत्यादी होय. शरीराशी संबधित असल्याने त्यांना शारीरगुण असे देखिल म्हणतात.
गुर्वाद्यस्तु- गुरुलघुशीतउष्णस्निग्धरुक्षमंदतीक्ष्णस्थिरसरमृदुकठिनविशद्पिच्छिलश्लक्ष्णखरस्थूलसुक्ष्मसांद्रद्रवा:विंशती चरक सुत्रस्थान १/चक्रदत्त टीका.
गुरु,लघु,उष्ण,स्निग्ध,रुक्ष,मंद,तीक्ष्ण,स्थिर,रस,मृदु,कठिण,विशद,पिच्छिल,श्लक्ष्ण,खर,स्थूल,सुक्ष्म,सांद्र,द्रव. असे गुर्वादी वीस.

गुरुमंदहिमस्निग्दश्लक्ष्णसांद्रमृदुस्थिरा:!
गुणा:ससूक्ष्मविशदा: विंशति: सविपर्यया:!!
अष्टांग हृद्य सुत्रस्थान १/१८
गुरु,मंद्,हिम(शीत्),स्निग्ध,श्लष्ण,सांद्र, मृदू, स्थिर्,सूक्ष्म,व विशद हे दहा व त्यांच्या विरुद्ध असे अनुक्रमे लघु,तीक्ष्ण,रुक्ष,खर्,द्रव,कठिन्,सर्,स्थूल व पिच्छिल असे एकुण वीस गुर्वादी गुण आहेत.

आता आपण मागिल दोन दिवस ज्या शीत व उष्ण गुंणावरुन एव्हडा गोंधळ माजला होता त्यांचीच माहिती घेवुयात.
शीत-उष्ण

ल्हादनः;स्तंभनः शीतो मूर्च्छातृट्स्वेददाहजित !
उष्णस्तद्विपरीतः स्यात पाचनश्च विशेषतः! सुश्रुत सुत्रस्थान ४६
शीतस्तु ल्हादनः स्तंभी मूर्च्छातृट्स्वेददाहनुत !
उष्णो भवती शीतस्य विपरीतश्च पाचनः ! भावप्रकाश.

* शीत :-
१)व्याख्या- स्तंभने हिमः! हेमाद्रीटीका.
जो शरीरात स्तंभन करतो म्हणजे गतीरोध करतो तो हिम होय.
२)व्यावाहारिक नाव- थंड cold
३)पांचभौतिकत्व जल व वायु महाभुत.
शीतगुण दाहशमन करतो.
५)कार्यस्वरुप- शरीरातील उष्णता कमी करणे व स्तंभनकार्य करणे. स्पर्श ग्राह्य गुण.
कर्म-दोष - शैत्यामुळे पित्तशमन व वातकफवर्धन.
धातू धातूवृद्धी,रक्तस्तंभन
मल वायू व स्वेद स्तंभन.
स्त्रोतसे-बाह्य - दाहशमन. आभ्यंतर- पित्त व दाहशमन्,मुर्च्छा-तृष्णानाशन
सार्वदेहिक मनाला आल्हाददायक,हृद्यकार्य.
द्रव्ये चंदन,वाळा,निंब,द्राक्षा,लोध्र,अशोक इ.

* उष्ण :-
१)व्याख्या-स्वेदने उष्णः हेमाद्रीटीका.
जो शरीरात स्वेदनिर्मिती(स्वेदन कार्य) करतो तो उष्ण गुण होय.
२)व्यावाहारिक नाव- गरम Hot
३)पांचभौतिकत्व- तैजसं औष्ण्यं तैक्ष्ण्यं च ! र.वै.सू.३/११३
४)भौतीक स्वरुप- उष्ण गुणाने दाह होतो.
५)कार्यस्वरुप- शरीरातील उष्णता वाढते,स्पर्शनेंद्रिय ग्राह्य गुण.
६)कर्म- दोष- उष्णत्वाने वातकफनाशन्,पित्तवर्धन.
धातू- धातूक्षयकर्, रक्तस्त्रावप्रवर्तक.
मल- उष्णत्वाने सृष्टमलमुत्रवातः स्वेदजनन.
स्त्रोतसे- बाह्य- दाहजनन आभ्यंतर- अग्निदिपन, आमपाचन्,शरीरात उष्णता निर्माण होते.मुर्च्छा,तृष्णा,स्वेद व दाहजनन.
७)द्रव्ये- चित्रक,बिब्बा,मिरे,सुंठ,वेखंड. इत्यादी.

बर्‍यापैकी सुटसुटीत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे समजले नाही तर व्यनी करावा,पण अभ्यासाची तयारी असेल तरच.

औषधोपचारप्रकटन

प्रतिक्रिया

रेवती's picture

28 Aug 2014 - 9:34 pm | रेवती

वाचतीये.
वेखंड उष्ण गुणधर्माचे आहे हे माहित नव्हते. मला थंड वाटायचे.

प्रभाकर पेठकर's picture

28 Aug 2014 - 9:39 pm | प्रभाकर पेठकर

तसे समजते आहे. पण अजून प्रत्येक मुद्द्याचा जरा विस्तार व्हावा असे वाटते.

जसे, जो शरीरात स्तंभन करतो म्हणजे गतीरोध करतो तो हिम होय. ह्या शीत गुणधर्माच्या मुद्द्याचे शरीरातील नक्की कार्य जरा उदाहरणांसहित विस्तारून सांगितल्यास, निदान ज्यांचा आयुर्वेदावर विश्वास आहे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडेल. व्यनि पेक्षा इथेच ह्या धाग्यावर स्पष्टीकरणे दिल्यास समजण्यास सोपे आणि सर्वांच्याच हिताचे होईल.

आयुर्हित's picture

29 Aug 2014 - 12:54 am | आयुर्हित

आणखी काही....
बाबा पाटील - Wed, 27/08/2014 - 20:49

दुध - गुणधर्म पचायला जड,अग्निमांद्यकर शरिरातला कफ वाढवणारे,पित्त कमी करणारे, बल वाढवणारे, त्यापासुन तयार होणारे दही - अत्यंत पित्तकर्,सगळेच दोष वर्धन करणारे परंतु वात किंचित कमी करणारे,त्वचाविकाराचे प्रबळ कारण ( माझ्या कडे येणार्‍या सोरियॅसिसच्या ८०% रुग्णांमध्ये अत्याधिक दधीसेवन आढळते. तसेच या दह्यापासुन जे ताक व लोणी तयार होते ते ताक पचायला हलके किंचित पित्तकर अग्नीदिपन करणारे,पोटाचे विकार तुमच्या भाषेत आय बी एस . बरा करणारे,मुळव्याधवरचे रामबाण औषध,व लोणी हे परत पित्त कमी करणारे ,बल वर्धन करणारे,शरिराला बृहणिय. या लोण्यापासुन जे तुप तयार होते ते अनुष्ण परंतु पित्त कमी करणारे,अग्नीदिपण करणारे,बृहणिय. तसेच संस्कारानुवर्तनिय म्हणजे ज्या पदार्थाबरोबर सिद्ध कराल त्याचे गुण वाढवणारे.

आयुर्हित's picture

29 Aug 2014 - 12:59 am | आयुर्हित

व्याख्या नक्की माहिती नाही.श्रीगुरुजी - Thu, 28/08/2014 - 12:25

गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये असे सांगितले जाते कारण पपई उष्णता निर्माण करते व त्यामुळे गर्भाला धोका होऊ शकतो अशी समजूत आहे. माझा एक लांबचा विक्षिप्त नातेवाईक सलग २ महिने रोज १ पपई खात होता. काही काळाने सुरवातीला त्याचा मोतीबिंदू एकदम वाढला व इतर काहीतरी इन्फेक्शन होऊन एक डोळा काढावा लागला. अति पपई सेवनाने उष्णता निर्माण होऊन डोळ्यावर परीणाम झाला असे डॉक्टरांचे मत होते.

आयुर्हित's picture

29 Aug 2014 - 1:01 am | आयुर्हित

गवी काका...
बाबा पाटील - Wed, 27/08/2014 - 20:59
आजच्या दिवस २०-२५ काळ्या मिर्‍या व लवंगा चावुन खा आणी त्यांतर एक दहा दिवसांनी घट्ट साय असलेल्या दुधाचे शिकरण एक दोन तिन दिवस सलग सकाळ संध्याकाळ घ्या शित आणी उष्ण गुणधर्माचा फरक लक्षात येइल,बी प्रॅक्टीकल.

आयुर्हित's picture

29 Aug 2014 - 1:07 am | आयुर्हित

प्रश्न क्र. १, २, ५
आयुर्हित - Mon, 25/08/2014 - 13:58

आयुर्वेदात काही विरुद्ध विपाक(पदार्थांचा एक गुणधर्म) असलेल्या पदार्थांना एकत्र खावू नये असे सांगितले आहे.
त्याप्रमाणे दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे.

ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये हे प्रथमच ऐकतो आहे. कारण हे तीनही पदार्थ एकच(ऊष्ण) विपाक असलेले आहेत.आम्ही स्वतः ताकात गूळ घालून खातो.

मठ्ठा हा मात्र थंड विपाकाचा असल्याने त्याबरोबर (खिरीसारखे) गूळ घातलेले पदार्थ खावू नयेत.

समाधान....
आयुर्हित - Wed, 27/08/2014 - 04:59
दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे एकत्र खाल्ल्याने ह्या पदार्थातील गुणधर्म विसंगति मुळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे अतोनात नुकसान होते व ती भ्रमित होते(programme gets corrupted).
त्यामुळेच सोरायसिस, ऑस्टीओ आर्थरायटिस/वात विकार व ल्युपस सारखे गंभिर व प्राणघातक आजार होतात.
ह्या गोष्टी सुद्धा पाककलाविषारदांना व अन्नशास्त्रज्ञांना शिकवल्याच गेल्या पाहीजेत.

थंड व गरम पदार्थ एकत्र खाल्ले तर असमान प्रसरणामूळे दातांची क्षती होते व दात तुटू शकतात.

काही अनुभव, कांही ऐकीव.
प्रभाकर पेठकर - Mon, 25/08/2014 - 15:24
नाही. असे असते हे स्वानुभवावरून सांगू शकेन. चिकू, आंबा ही फळे उष्ण आणि केळी, द्राक्ष, कलिंगड इ.इ. फळे थंड आहेत. कवचयुक्त मासे (कोलंबी, खेकडे इ.इ.) गरम पडतात, अंडीही उष्ण प्रकृतीची आहेत. बेडूक (माझ्या ऐकीव ज्ञानानुसार) सर्वात जास्त उष्ण आहे. बेडकाच्या तंगड्या प्रमाणाबाहेर खाल्ल्यास शौचास रक्त पडू शकते. मसाल्यात धणे, जीरे, दालचीनी थंड आहेत तर काळेमिरे, लवंग उष्ण आहेत. दात दुखीवर लवंग दाताखाली धरून आराम मिळतो. पण जास्त लवंगा खाल्ल्या गेल्या तर तोंडात फोड येतात. आपली प्रकृतीही थंड - उष्ण असते. उष्ण प्रकृतीच्या माणसांनी जास्त उष्ण पदार्थ खाल्ले तर तोंडात फोड, डोळ्यांची जळजळ आणि शौचास/लघवीस जळजळ होऊ शकते तर थंड प्रकृतीच्या माणसांना थंड पदार्थांच्या सेवनाने सर्दी सारखे विकार होतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Aug 2014 - 2:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

उन्हाळ्यात उष्ण पदार्थ खाणं हितकर समजावं का? (त्यामुळे घाम जास्त येईल आणि मग पंख्यासमोर/पंख्याखाली किंवा वाऱ्यात शरीराला थंडावा मिळेल.)

याचे उत्तर प्रत्येकाच्या शरिरप्रव्रुत्तीवर अवलंबून असेल.

माझी शरिर थंड प्रव्रुत्तीचे आहे त्यामूळे मी राजस्थानाही भर उन्हाळ्यातही आरामात राहू शकतो व घाम जास्त यावा म्ह्णुन गरम चहा सुद्धा प्यायचो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2014 - 4:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

समजलं नाही. कारण का ते ही सांगते.

थंड रक्ताचे प्राणी असतात, उदा. साप, त्यांच्या रक्ताचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत नाही. त्यामुळे त्यांना तापमानबदलापासून बचाव करण्यासाठी बिळं खोदावी लागतात, चिखल, पाणी शोधावं लागतं, इ. माणूस मुळात उष्ण रक्ताचा प्राणी आहे. म्हणजे माणसाच्या शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार, काही प्रमाणात, बदलतं. त्यामुळे माणसाची अवस्था सापासारखी बिकट होत नाही. अर्थात शून्य से किंवा ५० से तापमानाला माणसालाही त्रासच होईल. पण समजा १८ अंश से ते ३५ अंश से तापमानाचा विचार करू, ज्यात सर्वसाधारण माणूस फार जास्त कपडे न घालता किंवा पाण्यात डुंबल्य‌ाशिवायही टिकून राहू शकतो.

तर बाहेरचं तापमान उष्ण असताना, ३५ अंश से, माणसाच्या रक्ताचं तापमान (थंडीत असेल त्यापेक्षा) जास्त असेल तर माणसाला त्रास कमी होईल. तर मग उन्हाळ्यात उष्ण गुणधर्माचे पदार्थ खाणं आणि हिवाळ्यात थंड गुणधर्माचे पदार्थ खाणं सोयीस्कर ठरेल.

तुलना करायची तर उष्ण कटिबंधाच्या भारतात लोक आवडीने चहा पितात. हा चहा गरमागरम असतो. जेवणाचे पदार्थ गरमागरम खातात. आणि या निवडी पारंपरिक, वर्षानुवर्षं चालत आलेल्या आहेत. युरोपीय देशांमध्ये, समशीतोष्ण कटिबंधात लोक चहा, कॉफीत गार दूध घालून पेयांचं तापमान कमी करतात. थंडगार पेयं पितात. कृत्रिमरित्या बर्फ बनवता यायला लागल्यापासून जास्तच. त्यांचं जेवण गरमागरम नसतं, थंड सँडविच, थंड सॅलड अशा प्रकारचं असतं. पास्ता, पिझ्यासारखे गरम खाण्याचे पदार्थ एखाद्या इटलीतच आणि ते ही प्रत्येक जेवणात असतीलच असं नाही. तर मग हा सवयींमधला फरक कसा सांगणार?

उन्हाळ्यात कलिंगड, नारळपाणी प्यावंसं वाटतं कारण घामावाटे क्षार आणि पाणी बरेच निघून जातात. शरीराला त्याची आवश्यकता असते. थंडीत घाम फार येत नाही म्हणून हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. घामावाटे शरीराचं तापमान राखलं जातं.

मी गेली तीन वर्षं वाळवंटातच राहते आहे. इथेही लोक आवडीने वारूणी तयार करतात आणि पितात. मी व्यक्तिशः आणि लोकांच्याही पाहिलेल्या सवयींनुसार थंडीत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणारी दारू प्यायली जाते आणि उन्हाळ्यात कमी अल्कोहोलवाली. पण कट्टर (किंवा अस्सल म्हणा हवंतर) वारूणीप्रेमी आणि चहाप्रेमी हवामानाची पर्वा न करता आपापलं आवडतं पेयं पितात. मिसळ खाताना बाहेरच्या हवेचा विचार न करता लोक गरम, झणझणीत तर्री चापतात. इथे वाळवंटात, बाहेर शून्य से. तापमान असताना लोक बर्फाळ पेयंही पिताना दिसतात. उन्हाळ्यात अर्थात बर्फाचा खप वाढलेला दिसतो.

हे प्रश्न शालेय जीवशास्त्रावर आधारित आहेत. या आकलनात काही चूक आहे का आणि असेल तर ती काय, असा/असे प्रश्न आहे(त).

उन्हाळ्यात कलिंगड, नारळपाणी प्यावंसं वाटतं कारण घामावाटे क्षार आणि पाणी बरेच निघून जातात. शरीराला त्याची आवश्यकता असते. थंडीत घाम फार येत नाही म्हणून हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. घामावाटे शरीराचं तापमान राखलं जातं.

मी गेली तीन वर्षं वाळवंटातच राहते आहे. इथेही लोक आवडीने वारूणी तयार करतात आणि पितात. मी व्यक्तिशः आणि लोकांच्याही पाहिलेल्या सवयींनुसार थंडीत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणारी दारू प्यायली जाते आणि उन्हाळ्यात कमी अल्कोहोलवाली
हे नियम सामान्य लोकांसाठीच आहेत्,जे अट्टल आहेत्,ते सरळ सरळ स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतात,त्यांचे दुष्परिणाम लगेच नाही तर काही काळाने नक्की उमटतात. कारण शरीराच्या वातादी दोषांच्या चय्, प्रकोप आणी प्रशम या सामान्य अवस्था असतात. चय म्हणजे साठत जाणे,म्हणजेच जर दुध तापत ठेवले तर प्रथम ते लगेच उतु जात नाही , तर ते काठापर्यंत येते, पातेल्याची धारण क्षमता संपली म्हणजे ते प्रकोप होवुन बाहेर पडते नंतर एका स्थीर पातळीवर उकळत राहते,अथवा आटते प्रशम पावते, याच संकल्पना शरीरस्थ दोषांबाबत वापरता येतात्,वर्षानुवर्ष अहितकर आहार विहार चालु असतो,एका ठराविक क्षणी शरीराची धारण क्षमता संपते व व्याधी आपला प्रभाव दाखवतो.
तुम्ही सांगताय त्याप्रमाणे त्या त्या स्थानानुसार आजारंचे प्रकार व स्वरुपही बदलत जातात कारण तीथली हवा,पाणी माती, आहार विहार्,सवयी खाद्यामधील महाभुतांचे प्राबल्य या सर्वांनुसार गोष्टी घडत असतात. केरळी दररोज आंबवलेली इडली डोसे खातो, पण तेच जर पुणेकराने केले तर ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2014 - 12:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

केरळी दररोज आंबवलेली इडली डोसे खातो, पण तेच जर पुणेकराने केले तर ?

हे माझ्या ओळखीचा आयुर्वेदवालाही म्हणतो.

माझ्या ओळखीतले बरेच मल्लू, तामिळ लोक पुण्या-मुंबईत राहतात. आणि आठवड्यातले ५-६ दिवस इडली, डोसे नेमाने खातात.हे लोक माझ्यापेक्षा (किंवा अन्य मराठी जेवण जेवणाऱ्यांपेक्षा) जास्त आजारी पडलेले, रोगट किंवा दुर्बल दिसत नाहीत. पुण्या-मुंबईत राहून नेमाने (आंबवलेले) पाव खाणारे आणि आरोग्यवंत मराठी, भारतीय, अभारतीय लोकही माझ्या परिचयाचे आहेत.

किंवा पाश्चात्य देशात राहणारे भारतीय युरोप-अमेरिकेत राहतात म्हणून कमी तिखट, कमी मसाले खातानाही दिसत नाहीत. तरीही टुणटुणीतच दिसतात, असतात.

त्यामुळे ही झीनोफोबियाप्रणित अंधश्रद्धा असावी असा माझा समज आहे. ही अंधश्रद्धा/परदेशी गोष्टी/लोकांबद्दल असणारी भीती का नाही किंवा असं केल्यामुळे माणूस आजारी का पडेल याची कारणं तुमच्या आणि माझ्याही प्रतिसादातून मला समजली नाहीत. ते समजलं तर समज बदलण्याचीही माझी तयारी आहे.

आनन्दा's picture

11 Sep 2014 - 7:19 am | आनन्दा

मेडम थोडा घोळ होत आहे. इथे आपण पदर्थाच्या तापमानावर चर्चा करत नसून त्यांच्या गुणावर चर्चा करत आहोत.
शीत प्रदेशात खाल्ले जाणारे बहुतांश पदार्थ हे उष्ण गुणांचे आहेत. उदा - वाईन, मांस जे ते दररोज खातात.
कोणताही शीत(जसे की कोल्ड-ड्रिंक, आईसक्रीम्)पदार्थ शरीरात गेल की काही प्रमाणात उष्णता निर्माण करतोच.
बाकी त्यांचे गार खाणे हे मला वाटते गरजेतून कमी आणि नाईलाजातून जास्त आलेले असावे.

थोडक्यात स्पष्टीकरण देतो.- शीत गुणाने रोध वाढतो,अवयव घटकसंकोच होतो.(cold contracts) व त्यामुळे स्तभंन कार्य होते,गतीरोध होतो.याचे सोप्पे उदाहरण म्हणजे शरीरावर कुठलाही आघात झाला असता,अंर्तगत अथवा बाह्य रक्तस्त्राव होत असताना,आपण बर्फाचा खडा लावतो, रक्तस्त्राव लगेचच थांबतो तसेच सुजही कमी होते. आणखी एक भर उन्हात फिरल्यावर थंड सरबत पिण्याची इच्छा होते की तिखट रस्याची हाच शित आणी उष्ण गुणांचा बेसिक फरक आहे. बर्फाळ प्रदेशात गेल्यावर तुम्ही तुम्ही गरम गरम चहा / कॉफी अथवा उष्ण गुणधर्माचे मद्य घ्याल का साखर घालुन थंड केलेले दुध घ्याल.तेच वाळवंटात फिरताना शाहळ,कलिंगड खाण्याची इच्छा कराला की गरम गरम चहाची ?

माझा सोपा नियम :जे अन्नपदार्थ चिकट ते ऊष्ण. मैदा, बाजरी, काजू, पिस्ते, हापूसचा आंबा, खीर, खवा. जे अन्नपदार्थ भरड ते थंड. ज्वारी, तांदूळ, अंजिर, रायवळ आंबा, खारीक, खजूर, पनीर, पेरू, चिकू, केळी, फळे.
हिंग, मिरे, जिरे, धणे, आलं, सुंठ, हळद, गूळ, मसाल्याचे जिन्नस हे पदार्थ इतर अन्नपदार्थाँस चव आणण्यासाठी वापरतात आणि थोड्या प्रमाणात लागतात. हे कोणी वाटीत घेऊन खायला बसत नाही. यांना सरसकट ऊष्ण गटात धरायचे.

ताप येणे, लघवीची जळजळ ही लक्षणं असताना धणे-जि-याचा चहा करून देणे अतिशय लाभदायी असतं. जिरकाद्यारिष्ट हे बाजारात उपलब्ध असलेले औषध उत्तम गुणकारी आहे. दोन चमचे औषध, दोन चमचे पाण्यात घालून दिवसांतून दोन वेळा घ्यावं.

धणे रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवावेत आणि सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने अंगातील उष्णता, दाह कमी होतो. मूत्रमार्गाची शुद्धी होते.

धणे किंवा कोथिंबीर शीतल असून रक्ती मूळव्याधीवर त्याचा काढा दिला जातो.

खूप तहान लागली असल्यास धणे चावून खावेत किंवा धणे भिजवून ठेवलेलं पाणी प्यावं. तहान कमी लागते.

बाबा पाटील's picture

29 Aug 2014 - 1:58 pm | बाबा पाटील

काही द्रव्य रसाने,काही वीर्याने काही विपाकाने तर काही प्रभावाने कार्य करतात्, त्यामुळे प्रत्येक द्रव्य वेगळे आहे.

मदनबाण's picture

30 Aug 2014 - 7:50 am | मदनबाण

वाचतोय...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

पैसा's picture

1 Sep 2014 - 12:21 am | पैसा

चांगल्या प्रकारे विवेचन करता आहात. धन्यवाद!

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2014 - 2:28 am | प्रभाकर पेठकर

बाबापाटील साहेब,
सर्वसामान्यांना (अगदी आयुर्वेदावर विश्वास असलेल्या माझ्या सारख्यालाही) कांही मुलभूत शंका असतात. अशाच प्रकारच्या, की आयुर्वेदात आंबविलेले पदार्थ खाऊ नयेत त्याने अनारोग्य ओढवते असे म्हंटलेले आहे (म्हणे) पण दक्षिण भारतिय तर इडली-डोसे भरपूर खात असतात. त्यांना कांही अपाय होताना दिसत नाही. की डोसे-इडली बरोबर सेवन करण्यात येणार्‍या विविध चटण्या (कांदा, टोमॅटो, तिखट, लसूण घालून 'लाल टोमॅटो चटणी' किंवा हिरव्या मिरच्या कोथिंबीर घातलेली हिरवी चटणी किंवा खोबरे, डाळं घातलेली साधी खोबर्‍याची पांढरी चटणी) किंवा भरपूर कांदा, टोमॅटो, तुरडाळ आणि हिंग घातलेले सांबार ह्या आंबविलेल्या पिठाच्या दुष्परिणामांचा प्रभाव कमी करतात? खोबरे, खोबर्‍याचे तेल खाऊ नये त्याने कोलेस्टेरॉल वाढते असे म्हणतात. पण दक्षिण भारतात तर ह्या पदार्थांचा सर्रास वापर होतो. की दक्षिण भारतियांच्या आणखिन कुठल्या आहार सवयी मुळे (जसे मासे) यकृताला ताकद मिळते आणि यकृत कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो? पंजाब प्रांतातील सर्वांचीच चयापचय क्रिया तेल-तुप पचविण्यासाठी सक्षम असते? अगदी एकाच मातापित्याच्या जोडीच्या पोटी जन्मलेल्या दोन भावंडांचीही चयापचय क्रिया वेगळी असलेली दिसते. सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रदेशाचे वेगवेगळे गुणदोष असतातच तर कांही ठराविक रोगांचे प्राबल्य त्या त्या प्रदेशात दिसून येते का? आपल्या आशियायी प्रदेशात दिसून न येणारी पण कांही युरोपियन देशांमध्ये त्वचेवर दिसणार्‍या डागांमध्ये आहारातील कांही दोष असतात का? एखाद्या अशा त्वचा 'डागाळलेल्या' प्रदेशातील एखाद्या कुटुंबातील सर्वांनीच आयुर्वेदात सांगितल्याबरहुकुम आहार घेतला तर ते डागाळलेपण दूर होऊ शकेल का?
कफ, वात, पित्त प्रकृतीत ह्या तिनही दोषांचा समतोल राखायचा असेल तर काय करावे? जसे माझी कफ प्रकृती आहे. तसेच उष्णही आहे. तर मी कफाचा प्रभाव नियंत्रणात राखण्यासाठी नियमित पणे काय आहार घ्यावा, काय टाळावा? माझ्या वाचनातून आलेल्या ज्ञानाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, दुपारची झोप टाळावी वगैरे वगैरे सल्ले मला दिलेले आहेतच त्यात कितपत तथ्य आहे? अजून काय केले पाहीजे? हे मी फुकटात वैद्यकिय सल्ला मागतो आहे असे नाही. पण मला उत्सुकता आहे. भारतात आल्यावर व्यावसायिक तत्वावर भेट घेईनच.

बाळ सप्रे's picture

1 Sep 2014 - 10:18 am | बाळ सप्रे

स्तंभन शब्दाचा अर्थ समजला नाही पण गतिरोध शब्दाचा अर्थ सांगताना रक्तप्रवाहावर बर्फाचे उदाहरण दिले आहे. येथे थंड/ शीत हा शब्द थंड तापमान या अर्थानेच दिसतो. थंड या पदार्थाच्या प्रकृतीसंदर्भात स्पष्टीकरण नाही. कार्यस्वरूपातदेखिल थंड पदार्थ उष्णता कमी करतो, उष्ण पदार्थ उष्णता वाढवतो हे उल्लेख उष्ण व थंड तापमानासंदर्भातच येतात.

उष्ण पदार्थाच्या व्याख्येत ज्यामुळे स्वेदन होते ते उष्ण, म्हणजे ज्याने घाम येतो ते उष्ण असा अर्थ होतो. ते पहाता पपई, दही खाउन घाम यायला हवा, पण असे कधिही अनुभवलेले नाही, ऐकलेलेही नाही. चव तिखट नसल्याने पपई दही यांनी जळजळदेखिल होत नाही.
जास्त तिखट व गरम (तापमानाने) पदार्थ खाउन घाम येतो किंवा जळजळ होउ शकते.

त्यामुळे पदार्थाची चव (तिखट, गोड) किंवा तापमान (उष्ण, थंड) याबाहेर जाउन उष्ण थंड या पदार्थाच्या प्रकृतीविषयी व्याख्या/ स्पष्टीकरण अपेक्षित आहे. पण परत परत उदाहरणावरुन उष्ण/ थंड सांगण्यावरच भर आहे.

पण उद्या आज शेड्युल जरा जास्त व्यस्त आहे.वेळ मिळेल तसे क्रमाने टंकतो.

ऋतुराज चित्रे's picture

1 Sep 2014 - 11:23 am | ऋतुराज चित्रे

गोड, खारट, आंबट व कडु प्रमाणे तिखट ही चव आहे का? असल्यास जिभेच्या कोणत्या भागाने आपल्याला तिखट चवीचे ज्ञान होते?

आयुर्हित's picture

1 Sep 2014 - 12:17 pm | आयुर्हित

जीवशास्त्रातील प्रश्न आहे. इयत्ता ७ वी च्या जीवशास्त्राचे पुस्तक पहावे.
नाही म्ह्ट्ले तरी आमचीच परीक्षा पहाताय, असे वाटते!

कवितानागेश's picture

1 Sep 2014 - 12:02 pm | कवितानागेश

मला स्वतःलापण पण पथ्याच्या बाबतीत वरच्याप्रमाणेच प्रश्न पडायचे. पण सहाएक महिने दटून पथ्य केल्यावर प्रकृतीत जो काही उत्तम फरक पडला, त्यावरुन या गोष्टी लक्षात आल्या..