गुंफता कवन हे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
25 Aug 2014 - 3:04 pm

नमस्कार मंडळी,

एका उर्दू संकेतस्थळावरील काव्यदालनात विहरताना मला एक रोचक धागा दृष्टीस पडला होता. त्या धाग्यातील कल्पना मला आवडली, आणि ती मिपावरही आपण उतरवावी असा मनात विचार आला. त्यासंदर्भात संपादक मंडळाशी संवाद साधून त्यांच्या सहमतीने, वतीने मी ही कल्पना, हा उपक्रम आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे.

गुंफता कवन हे
उपक्रमाचं साधारण स्वरूप असं आहे, की एक काफ़िया घेण्यात यावा, आणि त्याला आपापल्या प्रतिभासाच्यात घालून सभासदांनी त्यांना सुचतील तसे शेर जोडत जावे आणि आकारास यावी एक सुंदर कविता; एक सुंदर ग़ज़ल.

याकरिता, दोन काफ़िये दिले जात आहेत. कुठल्याही एका, किंवा दोनही काफ़ियांना धरून शेर जोडले जाऊ शकतात. शेरांच्या संख्येवर बंधन नाही. शेर सदर धाग्यातच प्रतिसाद रुपाने जोडले जावेत. संकलित शेरांपैकी निवडक उत्तम शेरांची ग़ज़ल दिवाळी अंकात प्रकाशित केली जाईल. यात प्रत्येक शेर लिहीणा-याचं श्रेय त्याला/तिला दिलं जाईल. अर्थातच, आपल्या सगळ्यांचा उत्तम प्रतिसाद अपेक्षित आहे.

काफ़िया आणि त्याचा मत्ला या स्वरूपात काफ़ियाचे दोन पर्याय खालीलप्रमाणे:
काफ़िया १: कधी अचानक जाता जाता
मत्ला १: तोच चेहरा आठवतो मज, कधी अचानक जाता जाता
पाय असा हा अडखळतो मग, कधी अचानक जाता जाता

काफ़िया २: त्याचे कुणास काय
मत्ला २: रडतो कुणी भुकेला, त्याचे कुणास काय
अपुला असो की परका, त्याचे कुणास काय

मिपावरच्या कवीरत्नांच्या भरपूर सहभागाची आशा करत या पतंगाचा दोरा तुमच्या हातात देत आहे. भरपूर बदवा !!!

आभार!

अभय-गझलमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Aug 2014 - 3:38 pm | पैसा

मस्त प्रयोग! सर्व कवींना मनापासून शुभेच्छा!

सहज सुचलेल्या माझ्या २ ओळी.

मनात अधुरे स्वप्न जागते कधी अचानक जाता जाता
क्षणी पापणी भिजून जाते कधी अचानक जाता जाता

(मी फक्त सुरुवात करून दिलीय. बाकीच्यांकडून अजून येऊ द्या!)

अजय जोशी's picture

25 Aug 2014 - 7:21 pm | अजय जोशी

आपणांस गझलेतील रदीफ-काफियाबद्दल फारशी माहिती नाही असे दिसते.

आपण ज्याला काफिया म्हटलेले आहे तो उपरोक्त मतल्यामध्ये रदीफ म्हणून वापरला गेला आहे.
उदाहरणादाखल माझी गझल पहा...
वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही
यामध्ये, 'काही' हा रदीफ असून, जातील, गातील, आणि पुढे.. हातील वगैरे... हे काफिये आहेत. त्यामध्ये, आतील हे यमक आहे आणि आ ही अलामत किंवा स्वरचिन्ह आहे.

आपण दिलेल्या...
तोच चेहरा आठवतो मज, कधी अचानक जाता जाता
पाय असा हा अडखळतो मग, कधी अचानक जाता जाता
या ओळींत, ''कधी अचानक जाता जाता'' हा रदीफ आहे. कारण, त्यातील कोणतेही अक्षर न बदलता तो जसाच्या तसा दोनही ओळींत शेवटी आला आहे. आता राहिला काफिया. तुम्ही सादर केलेल्या मतल्यात काफिया शब्दरूपी नसून त्याला स्वरकाफिया म्हणतात. ''मज'', ''मग'' हे काफियाचे शब्द आहेत. मात्र, प्रत्येक शब्दाच्या शेवटी ''अ'' हा स्वरकाफिया म्हणून घेतला आहे. म्हणजे, मतल्यातील ''मज'' आणि ''मग'' हे काफियाचे शब्द म्हणून मान्य केल्यास... पुढे "बघ", "तर", "फट" असा कोणताही शब्द वापरता येईल, जे गझलच्या तंत्रात तंतोतंत बसत नाही. म्हणून, "अ" हा स्वरकाफिया बहुतेक लोकांना अमान्य आहे.

तुमच्या दुसर्‍या मतल्यात,
रडतो कुणी भुकेला, त्याचे कुणास काय
अपुला असो की परका, त्याचे कुणास काय
''त्याचे कुणास काय" हासुद्धा काफिया नसून रदीफ आहे. तसेच याही मतल्यात काफियासाठी...
भुकेला, परका असे शब्द वापरल्याने "आ" हा स्वरकाफिया आहे. मात्र, तो सर्वमान्य आहे. त्यामुळे तो घेता येईल.
आणखी एक,
अपुला असो की परका
यातील "की" हा ह्रस्व "कि" हवा. तरच ते व्रुत्तात बसेल.
पैसा यांनी दिलेली द्विपदी तंत्रशुद्ध नाही. कारण काफिया चुकला आहे.
असो.
तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा..!

मी नुसत्या शुभेच्छा देणार नाही. तर पुढील प्रतिसादात आपल्या दुसर्‍या मतल्यावर शेरही देत आहे...

वेल्लाभट's picture

25 Aug 2014 - 9:05 pm | वेल्लाभट

माझी माहिती तुटपुंजी/चुकीची असण्याच्या शक्यतेला पूर्णपणे मान्य करून आपल्या सूचनांचा आदरपूर्वक स्वीकार करीत आहे. तुमच्यासारख्या जाणकार, विद्वान लोकांशी होणा-या संवादातूनच ज्ञानवृद्धी होते यात तिळमात्र शंका नाही.

आभार.

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2014 - 7:46 pm | प्रभाकर पेठकर

विचार करीतो प्रदेश माझा नाही, कधी अचानक जाता जाता
प्रतिसादीतो थांबून तरीही, कधी अचानक जाता जाता

अजय जोशी's picture

25 Aug 2014 - 7:47 pm | अजय जोशी

मी,
ललगा लगा लगागा गागा लगाल गाल
असे वृत्त घेतले आहे...

बरसून पावसाचा आला निरोप काल
अन आज तो रुसावा, त्याचे कुणास काय

सूड's picture

25 Aug 2014 - 8:48 pm | सूड

क्या बात क्या बात !!