मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न - भाग १

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
25 Aug 2014 - 12:34 pm
गाभा: 

मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे (कृपया प्रामाणिक व खरीखुरी उत्तरे द्यावीत. कृपया प्रतिसाद गोडसे/गांधी/मोदी/सावरकर, धर्मनिरपेक्षता, काँग्रेस/भाजप, ब्राह्मण/अब्राह्मण इ. जहाल विषयांच्या वळचणीला नेऊ नये ही नम्र विनंती).

(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?

(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते?

(३) हिंदी चित्रपटाचे नाव सुरूवातीला हिंदीत, इंग्लिशमध्ये व नंतर उर्दु/अरेबिक मध्ये दाखविले जाते. हिंदी वगळता याच इतर २ भाषात नाव का दाखवितात? मल्याळम्, तेलगू, पंजाबी इ. सर्व भारतीय भाषांमध्ये नाव का दाखवित नाहीत?

(४) पूर्वीच्या गिअरच्या स्कूटर्सच्या गिअरची रचना जरा विचित्र असायची. पहिला गिअर टाकताना तो उलटा आपल्या दिशेने फिरवायला लागायचा. नंतर विरूद्ध दिशेने फिरविल्यानंतर न्यूट्रल गिअर व नंतर ओळीने दुसरा, तिसरा व चौथा गिअर असायचे. मोटारसायकलचे गिअर देखील असेच असतात. गिअर्सचा क्रम १-न्यूट्रल-२-३-४ असा असायचा. त्याऐवजी गिअर्सचा क्रम न्यूट्रल-१-२-३-४ असा व्यवस्थित क्रमाने का नव्हता?

(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत?

(६) एखादा मुलगा/मुलगी खूप खर्चिक मागणी करायला लागला/ली तर पूर्वीची माणसे "तुझे चोचले पुरवायला आम्ही काही लॉर्ड फॉकलंड नाही लागून गेलो" असे उपहासात्मक उद्गार काढून ती मागणी धुडकावून लावत असत. फॉकलंड नावाचे अर्जेंटिना देशाच्या जवळ एक छोटे बेट आहे. पण हा लॉर्ड फॉकलंड कोण होता? तो खूप श्रीमंत आणि उधळ्या होता का?

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

25 Aug 2014 - 1:03 pm | आदूबाळ

उत्तर ६:

मुम्बैतली वेश्यावस्ती फॉकलंड रोड आणि फोरास रोड अशा डॉन रस्त्त्यावर प्रामुख्याने होती. त्यात फोरास रोड हा सामान्य/स्वस्त/कमी प्रतीचा तर फॉकलंड रोड महाग/हुच्चभृ असा समजला जात असे. त्यामुळे "स्वत:ला लॉर्ड फॉकलंड (पक्षी: अती उच्चभ्रू) समजतोस का" असा वाक्प्रचार पडला.

अनुप ढेरे's picture

25 Aug 2014 - 1:35 pm | अनुप ढेरे

माझ्या एका आजोबांनुसार लॉर्ड फॉकलंडच्या काळात मुंबई मध्ये विजेची रोषणाई करण्यात आली त्यामुळे लॉर्ड फॉकलंड म्हणजे अतिशय श्रीमंत उधळपट्टी करणारा माणूस असे समीकरण पडले.

विक्रान्त कुलकर्णी's picture

25 Aug 2014 - 1:37 pm | विक्रान्त कुलकर्णी

लॉर्ड फॉकलन्ड हा मुम्बई प्रान्ताचा १९ व्या शतकातील गव्हर्नर होता. त्याच्यावरुन त्या रस्त्याला फॉकलन्ड रोड नाव दिले गेले.फॉकलन्ड चा आणि उधळपट्टीचा काहि सम्बन्ध असावा असे वाटत नाही.कदाचित फॉकलन्ड हा राजघराण्याशी सम्बन्धीत असल्यामूळे हा वाक्प्रचार रुढ झाला असावा.

३) हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक प्रामुख्याने ह्या तीन लिपी समजणारे असतात म्हणून.

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2014 - 1:52 pm | श्रीगुरुजी

हिंदी चित्रपटाच्या बहुसंख्य प्रेक्षकांना हिंदी समजणारच. परंतु इंग्लिश व अरेबिक लिपी समजणारे तुलनेने फारच थोडे प्रेक्षक असतात. अशा परिस्थितीत फक्त याच दोन जास्तीच्या भाषात शीर्षक का दाखविले जाते ते समजले नाही. असो.

प्रसाद१९७१'s picture

26 Aug 2014 - 2:18 pm | प्रसाद१९७१

अरेबिक लिपी समजणारे तुलनेने फारच थोडे >>>>> गुरुजी- उत्तर भारतातले उर्दु भाषिक मुसलमान ( ८-१० कोटी ) अरेबिक समजतात. तसेच एकेकाळी पंजाबी लोक उर्दू लीपी सहज वापरायची. पंजाबी वर्तमानपत्र सुद्धा उर्दू लिपीत असायची.

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2014 - 2:41 pm | श्रीगुरुजी

जवळपास तेवढीच लोकसंख्या मराठी/तामिळ्/मल्याळम्/तेलगू इ. भाषा समजतात. बहुसंख्य भारतीयांना दाक्षिणात्य लिपीप्रमाणे अरेबिक लिपी सुद्धा वाचता येत नाही. पण शीर्षक अरेबिकमध्ये दाखवितात आणि कोणत्याही दाक्षिणात्य भाषात दाखवित नाहीत.

प्रसाद१९७१'s picture

26 Aug 2014 - 2:48 pm | प्रसाद१९७१

कारण दाक्षीणात्य लोक त्या हिंदी सिनेमाचे प्रेक्षक नव्हते ( पूर्वीचे सांगतोय ). सौथंडीयन प्रोड्युसरच्या सिनेमांना पण उर्दु मधे नाव असायचे.

नाव देवनागरी मधे असते त्यामुळे मराठी लोकांना समजतेच.

माझ्या मते आता थोडे बदलते आहे. हल्ली उर्दु मधले नाव नसते बर्‍याच वेळेला.

सुनील's picture

26 Aug 2014 - 3:55 pm | सुनील

भाषा आणि लिपी यांत गल्लत होते आहे काय?

उदा. 'हाथी मेरे साथी' हे हिंदी चित्रपटाचे नाव, देवनागरी, रोमन आणि उर्दू (ही अरेबिक की पर्शियन हे ठाऊक नाही) लिपींत लिहिलेले दाखवतात. कारण हिंदी चित्रपट पाहणारा बहुसंख्य (साक्षर) प्रेक्षकवर्ग ह्या तिहींपैकी किमान एखादी लिपी वाचू शकतो. एवढच!

टवाळ कार्टा's picture

26 Aug 2014 - 11:36 pm | टवाळ कार्टा

उर्दु आणि अरेबिक लिपीमधे फरक नाही का??

काही फरक आहेत. मूळ अरबी लिपीत नसलेली कैक चिन्हे उर्दूत आहेत, उदा. प, ट, ड, ग़, इ. साठीची अक्षरचिन्हे. शिवाय अरबीतल्या सर्व अक्षरचिन्हांचा उच्चार मूळ अरबीप्रमाणे होतो असे नाही, त्यातही फरक आहे.

बेशिक लिपी अरबी. पुढे फारसीने ती अंगीकारली तेव्हा आपल्या सोयीसाठी काही बदल केले. काही नवीन चिन्हे अ‍ॅड केली, तर जुनी चिन्हे तशीच ठेवली- जुना उच्चार कायम न ठेवता. हे सगळे भरताड भारतात आले तेव्हा वरील प्रक्रियेची पुनरावृत्ती झाली. सबब मूळ अरबी लिपीशी तुलना केली तर उर्दू लिपीत कैक चिन्हे जास्त आहेत.

टवाळ कार्टा's picture

27 Aug 2014 - 11:39 am | टवाळ कार्टा

_/|\_

आयुर्हित's picture

25 Aug 2014 - 1:58 pm | आयुर्हित

(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?

उत्तरः नाही, नाही.
नख, केस प्रमाणेच खुरात मेलेल्या पेशी असल्याने वेदना/जखम होत नाही
नालेमूळे घोड्याला चांगली पकड मिळते त्यामूळे तो वेगात जावू शकतो.

(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते?

उत्तरः राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात, त्यामुळेच!

(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत?

उत्तरः आयुर्वेदात काही विरुद्ध विपाक(पदार्थांचा एक गुणधर्म) असलेल्या पदार्थांना एकत्र खावू नये असे सांगितले आहे.
त्याप्रमाणे दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे.

ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये हे प्रथमच ऐकतो आहे. कारण हे तीनही पदार्थ एकच(ऊष्ण) विपाक असलेले आहेत.आम्ही स्वतः ताकात गूळ घालून खातो.

मठ्ठा हा मात्र थंड विपाकाचा असल्याने त्याबरोबर (खिरीसारखे) गूळ घातलेले पदार्थ खावू नयेत.

आदूबाळ's picture

25 Aug 2014 - 2:37 pm | आदूबाळ

हो, बरोबर.

दह्यामध्ये गूळ घालून केलेलं बोंगाली मिष्टी दोय असतंच की.

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2014 - 3:01 pm | प्रभाकर पेठकर

तसं तर शिकरण आणि फ्रुट सॅलड सुद्धा असते फळे आणि दूधमिश्रीत पदार्थ म्हणून शिवाय त्यात साखरही असते.
दही उष्ण आणि ताक थंड (त्यात पाणी मिसळल्याने) असे लहानपणापासून ऐकत आलो आहे. मठ्ठ्यामध्ये आलं, मिरची असे उष्ण प्रकृतीचे पदार्थ मिसळयावर मठ्ठा थंड कसा होईल? असो. माझे ज्ञान अपुरे आहे.

उष्ण आणि थंड पदार्थ असे काही असतात (त्यांच्या प्रत्यक्ष तापमानाखेरीज) हीच मुळात भरपूर प्रचलित पण कोणताही तार्किक आणि रॅशनल बेस नसलेली समजूत आहे.

बाळ सप्रे's picture

25 Aug 2014 - 3:11 pm | बाळ सप्रे

+ प्रचंड सहमत

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2014 - 3:24 pm | प्रभाकर पेठकर

नाही. असे असते हे स्वानुभवावरून सांगू शकेन. चिकू, आंबा ही फळे उष्ण आणि केळी, द्राक्ष, कलिंगड इ.इ. फळे थंड आहेत. कवचयुक्त मासे (कोलंबी, खेकडे इ.इ.) गरम पडतात, अंडीही उष्ण प्रकृतीची आहेत. बेडूक (माझ्या ऐकीव ज्ञानानुसार) सर्वात जास्त उष्ण आहे. बेडकाच्या तंगड्या प्रमाणाबाहेर खाल्ल्यास शौचास रक्त पडू शकते. मसाल्यात धणे, जीरे, दालचीनी थंड आहेत तर काळेमिरे, लवंग उष्ण आहेत. दात दुखीवर लवंग दाताखाली धरून आराम मिळतो. पण जास्त लवंगा खाल्ल्या गेल्या तर तोंडात फोड येतात. आपली प्रकृतीही थंड - उष्ण असते. उष्ण प्रकृतीच्या माणसांनी जास्त उष्ण पदार्थ खाल्ले तर तोंडात फोड, डोळ्यांची जळजळ आणि शौचास/लघवीस जळजळ होऊ शकते तर थंड प्रकृतीच्या माणसांना थंड पदार्थांच्या सेवनाने सर्दी सारखे विकार होतात.

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Aug 2014 - 10:16 pm | पुण्याचे वटवाघूळ

उष्ण आणि थंड पदार्थ असे काही असतात (त्यांच्या प्रत्यक्ष तापमानाखेरीज) हीच मुळात भरपूर प्रचलित पण कोणताही तार्किक आणि रॅशनल बेस नसलेली समजूत आहे.

का हो तुम्हाला केळं किंवा पेरू खाऊन एकदाही सर्दी झाली नाही? किंवा संक्रांतीला तीळगूळ भरपूर खाल्याने उष्णता होऊन घसा दुखला नाही? मग थंड किंवा उष्ण पदार्थ नसतातच असे कसे म्हणता?

प्रसाद१९७१'s picture

26 Aug 2014 - 2:21 pm | प्रसाद१९७१

सर्दी होण्याचा संबंध उष्ण्/थंडाशी कुठे आहे? एकतर इन्फेक्श्न किंवा अ‍ॅलर्जी हे कारण आहे.
तसेच घसादुखी वगैरे.

उष्ण्/थंड हा आयुर्वेदाचा मुर्ख पणा आहे.

कदाचित हाय कॅलरी पदार्थ म्हणजे उष्ण ( उष्मांक या अर्थाने) आणि लो कॅलरी पदार्थ म्हणजे थंड असे मानले जात असावे अशी समजूत करुन पाहिली.. पण तसेही काही दिसत नाही.

रोगाचे मूळ कारण ॲलर्जी , बॅक्टेरिया किंवा तत्सम हे सर्व स्पष्ट होण्यापूर्वी एक थियरी म्हणून उष्ण थंड वात कफ इत्यादि संकल्पना मांडल्या असणार.

औषधे लागू पडतात त्यातली काही आजही.. त्यातल्या जंतुनाशक किंवा वेदनाशामक किंवा तत्सम थेट गुणांमुळे.

पण कारणमीमांसा कालबाह्य झाली तरी ती सोडली जात नाही.. अजूनही उष्ण पडणे वगैरे म्हटले जातेच.

आनन्दा's picture

26 Aug 2014 - 10:20 pm | आनन्दा

का हो तुम्हाला केळं किंवा पेरू खाऊन एकदाही सर्दी झाली नाही? किंवा संक्रांतीला तीळगूळ भरपूर खाल्याने उष्णता होऊन घसा दुखला नाही? मग थंड किंवा उष्ण पदार्थ नसतातच असे कसे म्हणता?

तुम्ही अजून या प्रश्नाचे उत्तर दिलेलेच नाही. माझी याबाबतची थिअरी अशी -
प्रत्येक पदार्थ पचताना काही रसायने निर्माण करतो. त्या रसायनांचे जोपर्यंत सन्तुलन आहे, तोपर्यंत माणूस आजारी पडत नाही. नाहीतर मी रोज भरपूर रोगजंतू असलेल्या रस्त्यावरून जातो, पण एकदाही आजारी पडत नाही, पण कधी जर असे भरपूर तिळगूळ खाऊन गेलो, तर मग आपण सर्दी सारख्या रोगान्ना व्हल्नरेबल होतो.
तुम्हाल रोगजंतू आजारी पाडत नाहीत, तुमची रोगप्रतिकारशक्ती तुम्हाला आजारी पाडते, असे आपले माझे मत.

गवी काकांचे खूपच कौतुक वाटते
छान मुद्देसूद प्रतिवाद करतात :)

आयुर्हित's picture

27 Aug 2014 - 4:33 am | आयुर्हित

@प्रसाद१९७१ काहि प्रश्नः
१)आपला असा एखादा प्रबंध नेचर्/सायंस वा तत्सम नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे काय?
२)आपण आयुर्वेदाची एखादि मोठ्ठी पदवि,पदविका निदान प्रमाणपत्र मिळवले आहे काय?
३)एखाद्या आयुर्वेदातील मान्यवरांनी लिहिलेले आयुर्वेदावरील पुस्तक वगैरे वाचले आहे काय?
नाहि, असेल तर कळु द्या सर्वांना!

नसेल तर
१)आपण आपल्या सुबुद्यअ डोक्यात आलेल्या शंकांचे निरसन केले आहे काय?
२)आयुर्वेदावरचे सोडा, साधे लिहिलेले (एकही शब्द न गाळता)वाचता तरी येते काय?
३)दहावी पास कोणी केले आपणास, हे कळेल काय?

प्रसाद१९७१'s picture

27 Aug 2014 - 10:26 am | प्रसाद१९७१

@आयुर्हीत -
तुमचे काळ्या जादू/चुटुक्/प्लँचेट ह्या बद्दल काय मत आहे? हे मत देताना ह्या तिन प्रश्नांची उत्तरे आधी स्वताला विचारा
१)आपला असा एखादा प्रबंध नेचर्/सायंस वा तत्सम नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे काय?
२)आपण काळ्याजादू ची एखादि मोठ्ठी पदवि,पदविका निदान प्रमाणपत्र मिळवले आहे काय?
३)एखाद्या काळ्या जादु बद्दल मान्यवरांनी लिहिलेले एखादे पुस्तक वगैरे वाचले आहे काय?

विज्ञान प्रगत होयच्या आधी जमेल तसे औषध उपचार करण्याच्या अनेक पद्धती जन्माला आल्या. आयुर्वेद, युनानी, चिनी अश्या अनेक. त्या त्या काळानुसार त्या ठिक होत्या.
पण आयुर्वेदा ची गृहीतके ( जसे कफ, वात, पिक्त, उष्ण, थंड ) ही चुकीची आहेत, आणि त्यांना काही शास्त्रीय बेसिस नाहीये.

टवाळ कार्टा's picture

27 Aug 2014 - 11:39 am | टवाळ कार्टा

आयुर्वेदा ची गृहीतके ( जसे कफ, वात, पिक्त, उष्ण, थंड ) ही चुकीची आहेत, आणि त्यांना काही शास्त्रीय बेसिस नाहीये

नक्की का?? मलातरी वरचे वाक्य चुकीचे वाटतेय

बाबा पाटील's picture

27 Aug 2014 - 6:41 pm | बाबा पाटील

मिपावरिल सर्व स्वयंघोषित गुगलिया डॉक्टरांना माझा साष्टांग दंडवत....मला अस वाटतय की झक मारली आणी साडेपाच वर्ष वैद्यकिय अभ्यासक्रमात घालवले.साला फक्त गुगल सर्च केल असत तर....आज............ प्रसाद राव कुठे असता हो तुम्ही मला तुमचे चरण स्पर्श करायचे आहेत.

प्रसादरावांचे उत्तर ते देतील न देतील पण इथे गूगलचा संबंध कुठून आला असावा? कफ वात पित्त या संकल्पना चुकीच्या आहेत असे गूगल सांगतेय का? शोधून पाहिले पाहिजे.

बाकी आयुर्वेदाविषयी कोणतीही यासम शंका घेतली गेली की प्रतिवाद कफ पित्त उष्ण थंड या संकल्पनांचे तार्किक सत्य मांडणारा कधीच न होता जनरली किती वर्षे शिक्षणक्रम आहे किंवा किती वर्षांचा अनुभव आहे आणि तो उगाच.. अश्या प्रकारचा येतो.

विचारणा-याला डिसक्वालिफाय करणे ही सुरुवात ठीक पण एकूण प्रतिवादच तितकाच ?

शिवाय खूप वर्षे एखाद्या गोष्टीचे व्यावसायिक शिक्षण घेतले म्हणून आपोआप त्या शास्त्राच्या संकल्पना कालसुसंगत होत नाहीत.

त्या तश्या असतीलही. पण उगीच शिक्षण घेतले असे म्हणून त्या सामान्य व्यक्तीला पटत नाहीत.

शास्त्र व्यावसायिक पातळीवर शिकायला कदाचित जन्म पुरणार नाही पण सामान्य आक्षेप कोणीही घेऊ शकतो.

आयुर्हित's picture

27 Aug 2014 - 8:25 pm | आयुर्हित

आक्षेप घेणे, शंका घेणे, विचारणे हे सुज्ञ माणसाचेच एक उत्तम लक्षण आहे. याला कोणाचीच ना नाही/नसावे.
माझ्या मते मिपावर/तत्सम इतर संस्थळावर ज्ञानवर्धन होणे जितके जरुरिचे आहे तितकेच "जनसामान्यांत चुकिचा संदेश न जावू देणे" महत्त्वाचे आहे.

प्रसाद१९७१ यांनी "अभ्यास न करता आयुर्वेदाला मुर्ख ठरविणे" हे किति योग्य आहे?
त्यांचा अभ्यास असेलही तर ते त्यांनी जाहिर करावे!

मूर्खपणा वगैरे शब्दरचना निखालस चुकीची आहे. अर्थात इतर कोणाच्या शब्दरचनेबद्दल मी अधिक तपशिलात बोलू शकत नाही. म्हणणे त्याबद्दल नसून वेगळेच आहे.

समजा ॲंटिबायोटिक्स वाईट असतात किंवा अलोपथी रोगाचा वरवर इलाज करते किंवा तत्सम काही आक्षेप मोडर्न मेडिसिनवर कोणी घेतला तर त्या पथीचे डोक्टर जेव्हा प्रतिवाद करतात तेव्हा ते ॲंटिबायोटिकवर बोलतात.. ट्रीटमेंट प्रोटोकोलबद्दल बोलतात ( सर्व फक्त उदाहरणार्थ). आणि शंका खोडून काढतात. त्याउपर पटवणे शक्य किंवा वर्थ नसेल तर पुढे उत्तर देत नाहीत. पण ते कधीही स्वत:चे शिक्षण,विचारणा-याचे क्वालिफिकेशन, माझे कोणत्या जर्नलमधे आले आणि प्रश्नकर्त्याचे कोणत्या जर्नलमधे.. आपण उगाच इतकी वर्षे शिकलो अश्या जनरल व्यक्तीसापेक्ष मार्गाने खंडन करत नाहीत.

पण आयुर्वेद / होमिओ इत्यादि डोक्टर त्यांच्या शास्त्रावर टीका झाली की जनरली खालीलपैकी एक अप्रोच घेतात:

- विचारणा-याचे क्वालिफिकेशन
-एकमेकांचा पथीविषयक अनुभवकाल
-विचारणा-याचा किमान अभ्यास आहे का?
- हजारो वा शेकडो वर्षे उगीचच हे टिकून राहिले का?
-या पथीला किती सरकारी मान्यता आहे
किंवा यासम.

पण जंतुसंसर्ग / अलर्जी या तार्किक वस्तुनिष्ठ एंटिटीजशी वात कफ पित्ताचे कोरीलेशन किंवा समांतर कालसुसंगत बदल या मार्गावर कोणीच बाजू मांडत नाही.

हे निरीक्षण फार पूर्वीपासून सर्वच संस्थळांवर आहे.

प्रसाद१९७१'s picture

28 Aug 2014 - 11:30 am | प्रसाद१९७१

द१९७१ यांनी "अभ्यास न करता आयुर्वेदाला मुर्ख ठरविणे" हे किति योग्य आहे?>>>>>>> त्याच न्यायानी तुम्ही चेटुक, मुठ मारणे हे पण असु शकते असे मान्य कराल का त्याला मूर्ख म्हणायला पण अभ्यास असायला पाहीजे असे म्हणाल.

एक साधी गोष्ट आहे. कोणी जर काही सिद्धांत मांडत असेल तर त्याची सिद्धता करणे हे त्याचेच काम आहे. तुम्ही सिद्धांत मांडायचे आणि दुसर्‍यांनी ते सिद्ध करायचे, हा कसला न्याय.
नल हायपोथिसीस ने सिद्ध करुन दाखवा उष्ण्/थंड पदार्थ ही कल्पना.

उचलली जिभ लावली टाळ्याला असे होवु नके,ही कुठली टाइमपास राजकिय चर्चा नसते. एक बेसिक प्रिन्सिपल आहे ' द्रव गुणेन कुरुते कर्म' कुठलेही द्रव्य हे त्याच्या गुणाने कार्य करते,जर हायड्रोजन हा ज्वलनशिल आहे हा त्याचा गुण जर त्याचा तुम्ही मान्य करत असाल तर् , शितोष्णादी गुण कसे मान्य होत नाहीत का ते भारतीय शास्त्र आहे म्हणुन टाकावु आहे ?

बाबा पाटील's picture

27 Aug 2014 - 8:49 pm | बाबा पाटील

दुध - गुणधर्म पचायला जड,अग्निमांद्यकर शरिरातला कफ वाढवणारे,पित्त कमी करणारे, बल वाढवणारे, त्यापासुन तयार होणारे दही - अत्यंत पित्तकर्,सगळेच दोष वर्धन करणारे परंतु वात किंचित कमी करणारे,त्वचाविकाराचे प्रबळ कारण ( माझ्या कडे येणार्‍या सोरियॅसिसच्या ८०% रुग्णांमध्ये अत्याधिक दधीसेवन आढळते. तसेच या दह्यापासुन जे ताक व लोणी तयार होते ते ताक पचायला हलके किंचित पित्तकर अग्नीदिपन करणारे,पोटाचे विकार तुमच्या भाषेत आय बी एस . बरा करणारे,मुळव्याधवरचे रामबाण औषध,व लोणी हे परत पित्त कमी करणारे ,बल वर्धन करणारे,शरिराला बृहणिय. या लोण्यापासुन जे तुप तयार होते ते अनुष्ण परंतु पित्त कमी करणारे,अग्नीदिपण करणारे,बृहणिय. तसेच संस्कारानुवर्तनिय म्हणजे ज्या पदार्थाबरोबर सिद्ध कराल त्याचे गुण वाढवणारे.
आता दुधापासुन तुपापर्यंतचा गुणांचा प्रवास सांगितला आहे,ज्याला समजाला त्याने समजवुन घ्यावा बाकीच्यांना साष्टांग दंडवत

गवि's picture

27 Aug 2014 - 8:54 pm | गवि

धन्यवाद.

ही उदाहरणे झाली. उष्ण किंवा थंड पडणे म्हणजे काय आणि उदा. सोरायसिसशी त्याची लिंक कशी आहे हे महत्वाचे.

काय थंड आणि काय उष्ण ही उपयुक्त माहिती असेल पण ते तत्व नव्हे.

सफरचंद पडते.. दगड पडतो.. चेंडूही पडतो.. ही उदाहरणे झाली.

पण गुरुत्वाकर्षण या बलाचे अस्तित्व मोजून दाखवणे हे तत्व असते..

ही उदाहरणे झाली. उष्ण किंवा थंड पडणे म्हणजे काय आणि उदा. सोरायसिसशी त्याची लिंक कशी आहे हे महत्वाचे.
.

सहमत. यावर शास्त्रीय संशोधन होणे आवश्यकच आहे. पण याचा अर्थ ते टाकाऊ आहे असा नव्हे. आणि अशास्त्रीय आहे असा तर मुळीच नव्हे. जर कार्यकारणभाव दिसत असेल तर त्याचे अस्तित्वच नाकारण्यात अर्थ नाही. फारतर अजून सिद्ध झालेले नाहे असे म्हणू. नाही का?

बाकी तुम्ही दिलेले उदाहरण एकदम चपखल बसते -

सफरचंद पडते.. दगड पडतो.. चेंडूही पडतो.. ही उदाहरणे झाली.
पण गुरुत्वाकर्षण या बलाचे अस्तित्व मोजून दाखवणे हे तत्व असते..

गुरुत्वाकर्षण तत्वाचा शोध लावण्यापूर्वी देखील ते तत्व अस्तित्वात होतेच. सफरचंद, चेंडू आणि दगड तेव्हाही पडत होते, न्यूटन ने मोजल्यावर त्यांनी पडायला सुरुवात केले असे नव्हे. फक्त न्यूटन ने गुरुत्वाकर्षण या तत्वाला शास्त्रीय परिभाषेत बसवले. आयुर्वेदावरदेखील असेच कोणीतरी संशोधन करावे, त्याशिवाय त्या शास्त्राचे सत्यत्व अधोरेखीत होणार नाही. आणि विरोधकांना आरोप करायची संधी मिळणारच.

गवि's picture

28 Aug 2014 - 11:09 am | गवि

चोक्कस..

यालाच मी तार्किक को-रिलेशन एस्टॅब्लिश करणे म्हणतोय. म्हणजे उदा.. इकडचा वात = तिकडचा इम्युनिटी loss..

किंवा यासम.. नुसते वात आहे कफ आहे किंवा कांदेपाक थंड आहे म्हणजे कालसुसंगत तार्किक कोरिलेशन नव्हे.

normalization , rationalization होत राहिले पाहिजे.

पण पुर्वी हलका पदार्थ खाली यायला जास्त वेळ लागतो असा समज होता, तो पिसाच्या मनोर्‍यावरुन प्रयोग केल्यावर च खोटा होता हे कळले.

फार खोलात नको, उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ ह्यांची कोणी व्याख्या तरी देवु शकेल का? तसेच हा पॅरॅमिटर मोजायचे युनिट काय? ताक थंड आणि कांदा पण थंड, ह्यांची तुलना कशी करायची?

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2014 - 12:25 pm | श्रीगुरुजी

व्याख्या नक्की माहिती नाही. परंतु उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ अशी वर्गवारी नक्कीच असावी. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये असे सांगितले जाते कारण पपई उष्णता निर्माण करते व त्यामुळे गर्भाला धोका होऊ शकतो अशी समजूत आहे. माझा एक लांबचा विक्षिप्त नातेवाईक सलग २ महिने रोज १ पपई खात होता. काही काळाने सुरवातीला त्याचा मोतीबिंदू एकदम वाढला व इतर काहीतरी इन्फेक्शन होऊन एक डोळा काढावा लागला. अति पपई सेवनाने उष्णता निर्माण होऊन डोळ्यावर परीणाम झाला असे डॉक्टरांचे मत होते.

हायड्रोजन ज्वलनशील आहे हे मान्य करणे म्हणजे खाद्यपदार्थाचे शीतोष्ण गुणही मान्य करणे?

भारतीय म्हणून टाकाऊ असे दूरान्वयानेही म्हटले नसताना ते मनाततरी का यावे ?

गूळ उष्ण असतो असे असेल तर तो शरीरात गेल्यावर शरीराचे / आतड्याचे किन्वा कोणत्याही पेशीचे तापमान वाढवतो का?

क्यालरीज म्हणाव्या तर त्या अनेक थन्ड मानलेल्या पदार्थातही तेवढ्याच किन्वा जास्तही असतात.

पुन्हा नम्रपणे विनवतो. कफ वात पित्त यान्चे तार्किक को रिलेशन सान्गा.

बाबा पाटील's picture

27 Aug 2014 - 8:59 pm | बाबा पाटील

आजच्या दिवस २०-२५ काळ्या मिर्‍या व लवंगा चावुन खा आणी त्यांतर एक दहा दिवसांनी घट्ट साय असलेल्या दुधाचे शिकरण एक दोन तिन दिवस सलग सकाळ संध्याकाळ घ्या शित आणी उष्ण गुणधर्माचा फरक लक्षात येइल,बी प्रॅक्टीकल.

बाबा पाटील's picture

27 Aug 2014 - 9:03 pm | बाबा पाटील

मला दिड वर्ष लागले हो, ते इथे थोडक्यात कसे सांगु,शक्य असेल तर सार्थ वाग्भट गर्दे लिखित अप्पा बळवंतात मिळेल,संस्कृतचे उत्तम मराठी भाषांतर केलेले आहे,आयुर्वेदातला समजायला सगळ्यात सोप्पा ग्रंथ आहे,वाचा काही अडल तर व्यनी करा,निवांत चर्चा करु अथवा वेळ असेल तर भेटा.

मिळवून वाचतो. मूलतत्व अश्या अर्थाने सिद्ध झालेली रोगाची कारणे आणि त्याना समांतर कारणमीमांसा असे तार्किक काही सापडल्यास आनंदच होईल नक्की.

बाबा पाटील's picture

28 Aug 2014 - 12:18 pm | बाबा पाटील

तेही सोडुन द्या,तुमच्या साठी सोप्पा,झणझणीत मिसळचा रस्सा दोन दिवस सकाळ संध्याकाळ फक्त २-२ वाट्या प्यायचा उष्ण गुणधर्म काय असतो ते दुसर्‍यादिवशी सकाळी कळेल्,पात्तळ जुलाब होताना जे काही खाली जळत ना तो पदार्थाचा उष्ण गुणधर्म, तसाच प्रकार शित गुणाचे शिकरण सारखा पदार्थ दररोज खा त्यानंतर फुफ्फुसात जो काही चिकट स्रावी पदार्थ साठतो तो कफ. वर्षानुवर्ष धावपळीत आयुष्य गेल्यावर सांधे आवाज करायला लागतात्,वेदना सुरु होतात्,तो वाताचा चल आणी रुक्ष गुण.
हे सर्व ठिक आहे,पण कृपया आयुर्वेदाला अ‍ॅलोपॅथीच्या चड्डीत घालायाचा प्रयत्न करु नका,दोन्ही शास्त्रातला तो बेसिक फरक आहे,त्यामुळे त्यातुन निष्पन्न काहीच होणार नाही फक्त गोंधळ वाढेल.

मराठी_माणूस's picture

28 Aug 2014 - 12:24 pm | मराठी_माणूस

समर्पक प्रतिसाद

बाळ सप्रे's picture

28 Aug 2014 - 12:27 pm | बाळ सप्रे

झणझणीत रस्सा आणि शिकरण.. यांच तिखट आणि गोड असं सरळ वर्गीकरण होतं.. उष्ण, थंड वर्गीकरणाचे या उदाहरणाने समाधान होत नाही.

पण कृपया आयुर्वेदाला अ‍ॅलोपॅथीच्या चड्डीत घालायाचा प्रयत्न करु नका

या वाक्याला हशा, टाळ्या मिळतील.
एखादी गोष्ट पटवण्याच्या दृष्टीने ते वाक्य निरुपयोगी आहे..

बॅटमॅन's picture

28 Aug 2014 - 1:04 pm | बॅटमॅन

यग्जाक्टलि अस्सेच म्हणतो.

प्रभाकर पेठकर's picture

28 Aug 2014 - 1:46 pm | प्रभाकर पेठकर

सहमत आहे.
हिरवी मिरची, हिरव्या मिरचीचे लोणचे जरी खाल्ले तरी शौचास, मुत्रविसर्जनास जळजळ होते. डोळ्यांची, तळपायांची जळजळ होते. शरीराचे तापमान नुसत्या पाण्यानेही समतोल राखले जाते. दोन-चार दिवस पाणी बंद करून पाहिले तरी शरीरातील उष्णता वाढल्याचे दृष्टोत्पत्तीस येईल. शरीरातील उष्णता वाढली असेल कांही त्रास होत असेल तर शहाळ्याच्या पाण्यानेही आराम मिळतो असा अनुभव आहे.
थंडीत येणार्‍या सणांमध्ये तिळगुळ, गुळाच्या पोळ्या, पुरणपोळ्या आदीपक्वान्ने केली जातात तर उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या खीरी आणि दुध वगैरे तत्सम पदार्थांपासून पक्वान्न बनविली जातात.

आनन्दा's picture

28 Aug 2014 - 11:02 am | आनन्दा

उष्ण / थंड यांचा संबंध क्यालरीशी नाही. तर एखादा पदार्थ पोटात गेल्यावर तो पचताना जी रसायने तयार होतात, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम म्हणजे उष्ण/ थंड.
त्यातील काही रसायने प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या शरीराचे तापमान वाढवतात, किंवा तापमान वाढल्याचा अनुभव देतात. उदा - अति खोबरे खाल्यामुळे शरीराच्या काही अवयवा>मध्ये विषाणूवाढीसाठी पोषक स्थिती उत्पन्न होते, त्याचा परिणाम म्हणून तेथे विषाणू>चा संसर्ग होतो. परिणाम - तेथील शरीराची उष्णता वाढते. म्हणून ते उष्ण. किंवा खोबरे/ गूळ पचताना अधिक प्रमाणात आम्ल तयार होते. या आम्लाचा निचरा शरीरांतर्गत न झाल्यामुळे शौच्यावाटे बाहेर पडते, परिणाम मलमार्गाची जळजळ, पुन्हा उष्णता.
असेच थंड पदार्थांबद्दल देखील होते. आता यामध्ये कोणत्या अभिक्रिया होतात ते केवळ संशोधनांतीच कळू शकेल. पण या सार्‍यांमध्ये काहीतरी समान धागा असण्याची शक्यता पण नाकरता येत नाही. याबद्द्ल काहीच अभ्यास नसताना या थिअरींना पूर्ण नाकारणे दीर्घकालीन परिणामांच्या दॄष्टीने फार घातक असेल असे माझे मत आहे. आणि हे माझे मत केवल आयुर्वेदच नव्हे, तर सार्‍याच प्राचीन विद्याबद्दल आहे.

तुम्ही असे म्हणा, की अजून पुरावा मिळालेला नाही, किंवा सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून असे सिद्ध होत नाही, मला मान्य आहे. पण त्यांचे अस्तित्व नाकारू नका, न जाणो, काही वर्षांनी त्याचा पुरावा मिळेल देखील.

जाता जाता,
तुम्ही कधी नाडीपरीक्षेचा अनुभव घेतला आहे का हो? त्यातील जाणकार वैद्यांकडून, जसे की पुण्याचे भट वैद्य, (ते आता आहेत का ते मला माहीत नाही).

तुम्ही माझे मत / म्हणणे अधिक चांगल्या रितीने आणि सकारात्मक मांडलेत. धन्यवाद.

बाळ सप्रे's picture

28 Aug 2014 - 11:42 am | बाळ सप्रे

+१
उष्ण थंड, कफ वात पित्त या संकल्पना अमूर्त आहेत (Abstract concepts). त्यांना संशोधन करुन मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.

हजारो वर्ष सफल झालेले संशोधन वाचुन समजावून घेतले जाण्याचे कष्ट करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही असे म्हणा!

बाळ सप्रे's picture

28 Aug 2014 - 1:47 pm | बाळ सप्रे

चव हा गुणधर्म (वर्णन करण्यास abstract असला तरी) जीभ हा त्याचा सेंसर आहे या दृष्टीने concrete संकल्पना आहे.
तापमान हा गुणधर्म त्वचा हा सेंसर अथवा एखाद्या पदार्थाचे त्यामुळे होणारे प्रसरण या दृष्टीने concrete संकल्पना आहे.
रंग हा गुणधर्म डोळे हा सेंसर या दृष्टीने concrete संकल्पना आहे.
अशा प्रकारे पदार्थाची प्रकृती या आयुर्वेदीय गुणधर्माविषयी मूलभूत सेंसर किंवा मापनाची प्रक्रिया उद्धृत करणारे स्पष्टीकरण कुठे आहे ते जरुर सांगावे. समजून घेण्याचे कष्ट घेण्यासाठी बरेच जण आतुर आहेत.

उदाहरणांवरुन उलट स्पष्टीकरण नकोय. उदा. बर्फ म्हणजे थंड, वाफ म्हणजे गरम किंवा आंबा म्हणजे गोड, मिरची म्हणजे तिखट

आयुर्हित's picture

29 Aug 2014 - 1:21 am | आयुर्हित
डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2014 - 5:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे.
दुध व मांसाहार : कित्येक मांसाहारी पदार्थांत क्रिम टाकतात आणि ते कोणत्याही समस्येशिवाय लोक चवीने वारंवार खातात.

दही व मांसाहार : अनेक प्रकारचे मांस दह्यात मरिनेट करतात असे ऐकून आहे.

दुध व फळे : हे टाळायचे तर फ्रूट सलादच नव्हे तर केळ्याचे शिक्रणही टाळावे लागेल.

थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये : असं कसं, असं कसं ? फ्राईड आइस्क्रिम आमचा अत्यंत आवडता पदार्थ आहे.

पाककलाविषारद आणि अन्नशास्त्रज्ञांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत.

सूड's picture

25 Aug 2014 - 9:09 pm | सूड

>>असं कसं, असं कसं ?

बर्‍याच दिवसांनी हे वाचून सविताताई प्रभूणे आठवल्या. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2014 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

तोच हेतू होता ! :)

प्यारे१'s picture

25 Aug 2014 - 10:02 pm | प्यारे१

सूड - द चूकशोधक

प्रभूणे नाही, प्रभुणे. ;)

आयुर्हित's picture

27 Aug 2014 - 4:59 am | आयुर्हित

दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे एकत्र खाल्ल्याने ह्या पदार्थातील गुणधर्म विसंगति मुळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे अतोनात नुकसान होते व ती भ्रमित होते(programme gets corrupted).
त्यामुळेच सोरायसिस, ऑस्टीओ आर्थरायटिस/वात विकार व ल्युपस सारखे गंभिर व प्राणघातक आजार होतात.
ह्या गोष्टी सुद्धा पाककलाविषारदांना व अन्नशास्त्रज्ञांना शिकवल्याच गेल्या पाहीजेत.

थंड व गरम पदार्थ एकत्र खाल्ले तर असमान प्रसरणामूळे दातांची क्षती होते व दात तुटू शकतात.

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2014 - 2:03 pm | श्रीगुरुजी

>>> नख, केस प्रमाणेच खुरात मेलेल्या पेशी असल्याने वेदना/जखम होत नाही

बैलांना पूर्ण आडवे पाडून व त्यांचे चारही पाय बांधून तळपायात नाल ठोकताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असताना मी पाहिले आहे. त्यामुळे नाल ठोकताना त्यांना वेदना नक्कीच होत असणार. म्हणजेच तळपायात जिवंत पेशी असणार.

>>> ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये हे प्रथमच ऐकतो आहे. कारण हे तीनही पदार्थ एकच(ऊष्ण) विपाक असलेले आहेत.आम्ही स्वतः ताकात गूळ घालून खातो.

लहानपणी एखाद्या मुलाने दह्यात/ताकात गूळ घालू का असे विचारल्यावर मोठी माणसे, "काय आज नशा करायचीय का?" असे विचारायचे. एका मोठ्या व्यक्तीने दही/ताकात गूळ घातल्यावर आंबल्यामुळे अल्कोहोलसारखा परीणाम होतो असे सांगितले होते. हातभट्टीवाले आंबवलेल्या मिश्रणात गूळ, नवसागर इ. घालतात असे वाचले होते. त्यामुळे दही/ताक + गूळ हे मिश्रण काहीतरी विचित्र पदार्थ तयार करत असावे.

आयुर्हित's picture

27 Aug 2014 - 5:13 am | आयुर्हित

पाय बांधल्यामुळे ते त्यातून सूटायची धडपड करतात व त्यातुन त्यांना इजाही होते व त्यामुळेच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात हे खरे आहे.

ताजे दही/ताक + गूळ हे योग्यच आहे.
अनारसे सोडले तर गुळ घालून आंबवलेली एकही पाक्रू मलातरी सध्याला माहित नाही.
लहान मुलांना घोळणा फुटुन नाकातून रक्त येण्याचे प्रमाण जास्त असेल तर त्याला गुळ खावु देवू नका.

(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?

हे खिळे तिरपे ठोकले जातात. गुरांच्या तळपायांना टापा असे म्हणतात. त्या आतून थोड्या पोकळ असतात. खिळा ह्या पोकळीत असेपर्यंत जनावराला तो लागत नाही. नाल ठोकणे हे फार कौशल्याचे काम आहे. टापा ह्या डांबरी किंवा खडकाळ रस्त्यावर चालून झिजू नयेत म्हणून मारल्या जातात.

(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते?

शासन असलेली राज्यव्यवस्था ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे ज्यात राज्याचा प्रमुख हा मोनार्क म्हणजेच लोकांनी न निवडलेला/वंशपरंपरागत असा असतो आणि दुसरा म्हणजे राज्यप्रमुख हा लोकनिर्वाचित असतो. (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष निवडणूक.) यालाच 'रिपब्लिक' असे म्हणतात. भारत हा स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी रिपब्लिक बनला. या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली. त्याआधी १५ ऑगस्ट १९४७ पासून देशाचे राज्य हे १९३५ च्या 'गवर्न्मेंट अ‍ॅक्ट ऑफ इंडिया' नुसार चालत होते. नव्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात. राष्ट्रपतींची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या लोकांकडून होते. हे पद वंशपरंपरागत नसते. त्याचबरोबर राष्ट्रपतींना पदावरून लोकांनी निवडून दिलेली संसद महाभियोगाद्वारे दूर करू शकते. देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपतींच्या नावे चालतो. प्रत्येक पदाची नेमणूक राष्ट्रपतींच्या नावे केली जाते. अगदी पंतप्रधानसुद्धा राष्ट्रपतींनी नेमलेला असतो. असेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संबंधांचेही आहे. म्हणून संसदेच्या किंवा विधानमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला राष्ट्रपती आणि राज्यपाल हे अनुक्रमे संबोधित करतात. त्याला अभिभाषण असे म्हणतात.

राष्ट्रपती हे त्यांचे सर्व निर्णय हे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार घेतील अशी घटनादुरुस्ती (मला आठवत नाही केव्हा) करण्यात आली. त्यानुसार त्यांचे अभिभाषणही हे सरकारने तयार करून दिलेले असते. ह्या अभिभाषणात राष्ट्रपती त्यांच्या सरकारची भावी ध्येय्यधोरणे इत्यादी जनप्रतिनिधींपुढे मांडत असतात. माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन ह्यांनी अभिभाषणाचा पायंडा मोडून त्याऐवजी मुलाखत द्यायची सुरुवात केली होती. ह्यात सरकारचे फारसे नियंत्रण नसल्याने तेव्हाच्या सरकारने ही नवी पद्धत बंद करायला लावली.

बाकी प्रश्नांना पास.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2014 - 6:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुतेक सर्व लोकशाही देशांत अभिभाषण लिहीणे हा देशाच्या सर्वोच्च शासकिय अधिकार्‍याचा (हेड ऑफ गव्हर्नमेंट) हक्क असतो. कारण तो/ती त्याच्या/तिच्या कार्यकालात काय करू इच्छितो/ते याचा आराखडा अभिभाषणात अपेक्षित असतो.

जर सर्वोच्च शासकिय अधिकारीच (हेड ऑफ गव्हर्नमेंट) देशाचा सर्वोच्च अधिकारी (हेड ऑफ स्टेट) असला/असली तर तोच/तीच अभिभाषण लिहीतो/ते आणि वाचतो/ते; उदा. अमेरिकन प्रेसिडेंट.

संविधानिक राजेशाही असलेल्या यु के मध्ये इंग्लंडच्या राणीचे पार्लमेंटमधले "State Opening of Parliament" अभिभाषणही सत्तेत असलेले सरकार लिहून देते आणि राणी ते वाचते.

काळा पहाड's picture

25 Aug 2014 - 11:44 pm | काळा पहाड

(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत?

याचं उत्तर जरा अधिकारी लोक देतील का? स्पेक्युलेशन नको.

घोडा/ बैल यांची खुरे मॄदु असल्या कारणाने खडकाळ /डांबरी रस्त्यावर चालल्यामुळे झिजतात. काही वेळा खडे टापांच्या आतील नाजुक भागात घुसल्याने जनावराला इजा होउन चालणे अवघड होते. जनावराला नाल मारताना त्याची जुनी नाल काढली जाते ,झिजलेली वाढलेली खुरे साफ केली जातात, खडे असतील तर काढुन नवीन नाल मारली जाते.

नवीन नाल ही खुराच्या आकारा प्रमाणे बनवलेली असते, घोड्यासाठी एकच नाल तर बैलासाठी त्याच नालेचे दोन भाग केलेले असतात. नाल मारण्यासाठी वापरले जाणारे खिळे खास त्याच कामासाठी बनवलेले असतात. हे खिळे सरळ ना मारता तिरके मारले जातात त्यामुळे खिळे नाले पासुन पाऊण ते एक ईंच अंतरावर येतात. हे खिळे तोडुन तिथे वाकवुन कानशीने खिळे ,खुर घासुन समतल केले जातात.

घोड्याला नाल मारताना खाली पाडले जात नाही, ज्या पायावर नाल मारायची आहे तो पाय दुमडुन नाल मारली जाते.काही घोडी खुप मस्तवाल असतात त्यांना मात्र खाली पाडुन नाल मारण्याशिवाय पर्याय नसतो.
बैलाला मात्र नेहमी खाली पाडुन नाल मारल्या जातात, खाली पाडताना सर्व सावधगिरी घेतली जाते. बैलाने त्याचे पाय झाडु नयेत म्हणुन करकच्चुन बांधले जातात इतकेच.

नाल मारल्यामुळे जनावराला चालणे सुकर होते, खुराची झिज होत नाही.

~आसिफ.

खटपट्या's picture

27 Aug 2014 - 9:29 am | खटपट्या

खूप छान माहीती आसिफ !!

ऋतुराज चित्रे's picture

28 Aug 2014 - 1:03 pm | ऋतुराज चित्रे

आंबा हे उष्ण फळ उन्हाळ्यात कोकणात मोठ्या प्रमाणावर का येते? द्राक्ष हे थंड फळ हिवाळ्यात नाशिकला का येत असेल? ही फळे खावून लोक आजारी पडावीत व तेथील वैदूंची पोटे भरावीत असा निसर्गाचा हेतू आहे. अहो पपई खाउन गर्भपात करण्याच्या(पहिल्या महिन्यात) प्रयोग माझ्या मित्राने त्याच्या बायकोवर केला होता. प्रयोग फसला, छानपैकी गुटगुटीत मुलगी जन्माला आली. मित्र अजुनही म्हणतो मी चूकून पिकलेले डांगर खायला दिले असेल, पपईच्या गुणाची मला खात्री आहे.

पपई खाण्यामागे असे करण्याचा हेतू हा अप्रिय वाटला. पण तो विषय वेगळा.

मुद्दा असाय की मुळात पपई उष्ण असल्याने गर्भपात होतो आणि थंडमुळे होत नाही हे कसे? उष्ण = गर्भपात?

उष्ण = दाह, उष्ण = तापमान, उष्ण = वेदना , उष्ण = आगआग .. आले उष्ण.. कारण ते खाल्यावर आग होते. ते अंगाला चोळले की आग होते. असे लॉजिक आहे काय ?

आईसक्रीम खायला थंड असते पण ते वास्तविक आयुर्वेदिक संकल्पनेत उष्ण असावे..(चुभूदेघे)

उष्ण असणे आणि गर्भपात किंवा तत्सम परिणामांचा एकमेकांशी संबंध कसा येतो? सर्दी ही व्हायरसमुळे होते हे ऑब्जेक्टिव्हली दाखवले गेले आहे. पण थंड गुणधर्माचे पदार्थ खाल्ल्याने हे व्हायरस जागृत होतात का? थंड गुणधर्माच्या पदार्थात असे काय असते की ज्याने हे व्हायरस सक्रिय होतात.

व्हायरसबियरस वगैरे काही नसतातच.. तसे मानणे हेच खोटे आहे असे म्हणणे म्हणजे मूलभूत सत्यपरिस्थितीच नाकारणे. ते जमणे कठीण आहे. शेवटी तर्कनिष्ठ जे जे सर्व पथींमधे आहे ते अलाईन होणे ही खरी होलिस्टिक चिकित्सा.

थंड गुणधर्माचा पदार्थ खाल्ल्याने सर्दी / खोकला / म्युकस कसे / का होते याची कॉजल रिलेशनशिप शोधली जाताना दिसली नाही.

पपईने अमुक एक अपाय होतही असेल, पण त्यात पपईतले कखग या नावाचे काहीतरी संयुग कारणीभूत असेल (टॉक्सिक इफेक्ट) असा विचार न होता केवळ उष्ण थंड यातच ते बसवले जाते.

मॉडर्न मेडिसिनमधे अगदी सरळसरळ विषाचीही प्रक्रिया पेशींवर कोणत्या मेकॅनिझमने होऊन त्यायोगे मनुष्य कसा मरतो याचे थेट कारण शोधून सांगितलेले असते. (नागाचे विष मज्जासंस्थेतल्या पेशींना नेमके काय डॅमेज होते, आणि कोणा सापाचे विष रक्तातले घटक कसे विघटित करते)

पण केवळ शीत किंवा उष्ण किंवा उग्र किंवा अमुकजन्य या गुणांमुळे मृत्यू ओढवतो असे म्हटलेले नसते.

आतड्यांचा दाह, जुलाब हा अनेक केमिकल्समुळे होऊ शकतो. त्यातली काही केमिकल तिथे सूज उत्पन्न करत असतील किंवा काही आतड्याच्या हालचालीवर परिणाम करत असतील.. किंवा आणखी काही. तस्मात ते उष्ण पडले इतकेच न म्हणता नेमके काय झाले त्याचे तपशीलवार रासायनिक कारण कळले तर अधिक नेमके टारगेटेड उपाय करता येतील.

अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण "अमुक खाऊन पहा की तमुक जाणवेल" म्हणून तो पदार्थ उष्ण या प्रकारच्या मांडणीमधे मूळ संकल्पनेचे कारण मिळत नाहीच.

बाबा पाटील's picture

28 Aug 2014 - 9:14 pm | बाबा पाटील

दोन शास्त्रांमधला फरक लक्षात घ्या,प्रत्येक गोष्टीत तुलना करत गेले तर पदरात काहीच पडणार नाही, दोन्ही शास्त्रे आपपाल्या ठिकाणी आहेत्,त्यांना त्यांच्याच जागी ठेवा एकत्र घुसळायला गेलात तर काहीही उपयोग होणार नाही,त्यापेक्षा बेसिक समाजावुन घ्या.

दादा कोंडके's picture

29 Aug 2014 - 12:05 am | दादा कोंडके

सहमत. आयुर्वेद समजून घेण्यासाठी आधी त्यावर श्रद्धा असावी लागते.
श्री डॉ. बालाजी तांबे यांचे लेख वाचून सुरवात करावी असा सल्ला देतो.

दोन शास्त्रांमधला फरक लक्षात घ्या,प्रत्येक गोष्टीत तुलना करत गेले तर पदरात काहीच पडणार नाही, दोन्ही शास्त्रे आपपाल्या ठिकाणी आहेत्,त्यांना त्यांच्याच जागी ठेवा एकत्र घुसळायला गेलात तर काहीही उपयोग होणार नाही,त्यापेक्षा बेसिक समाजावुन घ्या.

एक्झॅक्टली, तिथेच तर प्रोब्लेम अहे. दोन्ही शास्त्रांचे जाणकार ही दोन शास्त्रे एकत्र आणायलाच तयार नसतात.

बापरे! काय हो तुमचा मित्र!

धर्मराजमुटके's picture

28 Aug 2014 - 1:57 pm | धर्मराजमुटके

पाश्चिमात्य देश किंवा भारतातील शहरांत राहणारे लोक तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले असतात असे वाटते. मग बर्‍याच हॉलीवूड किंवा बॉलीवूड पटात जेव्हा व्हिलन हिरोला किंवा त्यांच्या कुटुंबाला मारायला येतो तेव्हा ते घराचा दरवाजा उघडतात आणि व्हिलन किंवा त्याचे कामगार आत घुसतात. हे हुशार घरमालक आपल्या दरवाज्याला पीपहोल का ठेवत॑ नाही ?

अहो ब-याच वेळी दाराला कडी अथवा लॅचच नसते. हिंदी चित्रपटात व्हिलन अणि त्याची गँग डायरेक्ट दरवाजा ढकलून मोठ्या घरात घुसते. ते पण रात्रीचे. कधी कधी हीरो देखील व्हिलन किंवा हिरोइनच्या (बापाच्या) मोठ्या बंगल्यात असाच घुसतो.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2014 - 12:11 pm | श्रीगुरुजी

हिंदी चित्रपट आणि तर्कशास्त्र यांचा ३६ चा आकडा आहे. हिंदी चित्रपटांचा आनंद घ्या. कृपया असे का आणि तसे का नाही याचा विचार करू नका.