वारे जरासे गातील काही...

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
23 Aug 2014 - 8:07 pm

वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही

हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यांत दिसले आतील काही

झाकून डोळे हसलीस ओठी
कळले तुझ्या मौनातील काही

म्हण तू स्वतःला पाषाणहृदयी
ढळलेत बघ डोळ्यातील काही

घायाळ करती हृदयें हजारों
नजरा तुझ्याही कातील काही

संसार सागर जातील तरण्या
बुडतील काही, न्हातील काही

दुःखे जगाची का रंगवू मी?
जगतो सुखाने त्यातील काही

सोडू नये सुख, कुठल्या क्षणाचे
मिळते जरी अंशातील काही

किंवा / आणि

वेसण कशाला घालू सुखाला?
मिळते किती? अंशातील काही

अंधार जितका, तितकीच आशा...
उजळेल कोनाड्यातील काही

घ्यावे 'अजय' सारे जे हवे ते
सोडू नये पण... हातील काही

- अ. अ. जोशी (२०१४)

मराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

23 Aug 2014 - 9:23 pm | सस्नेह

गझल आवडली.

विवेकपटाईत's picture

24 Aug 2014 - 6:58 pm | विवेकपटाईत

आवडली

वेल्लाभट's picture

24 Aug 2014 - 9:37 pm | वेल्लाभट

सुरेख जमलीय कविता. आवडली.

'हातील काही' हा शब्दप्रयोग रुचला नाही. बाकी झकास.

अजय जोशी's picture

25 Aug 2014 - 7:25 pm | अजय जोशी

धन्यवाद.

"हातील काही" पटले नाही. ठीक आहे. पुढची रचना नक्कीच तुम्हाला आवडेल.

पैसा's picture

25 Aug 2014 - 8:05 pm | पैसा

रचना आवडली.