. . हत्या आणि राजकारण !

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
23 Aug 2014 - 2:33 pm

आमच्याकडे पहा. हत्येचेही कसे राजकारण केले जाते.

नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. त्यानंतर ६ महिने झाले तरी त्यांच्या हत्येचा तपास लागू शकला नाही. त्यावेळी काही लोकांनी फेसबुकवर तपास न लागण्याचा निषेध केला. फेबुवर आपला प्रोफाईल काळा ठेवला. आता हे लोक कोण होते ? यातले अनेक जण असे होते ज्यांनी दाभोळकर, त्यांची अनिस, त्यांची विचारधारा याला कायम विरोध केला. मग अचानक या लोकांचे दाभोळकर प्रेम कसे उफाळून आले ?

ज्या काळात हत्या झाली आणि तपास सुरु होता त्या काळात राज्यात आणि देशात काँग्रेस आणि रा काँ यांचे सरकार होते. त्यामुळे निषेधामागे दाभोळकर प्रेम नसून कॉ आणि रा कॉ यांना झोडपण्याची मिळालेली एक निवडणूकपूर्व संधी होती.

काही लोक असेही आहेत, जे पूर्वीपासून दाभोळकरांबरोबर होते. हे लोक ठराविक दिवसांनी एकत्र येतात. निषेधाच्या सभा घेतात. पेपरला निवेदने देतात. "व्यक्तीचा खून करता येतो. विचारांचा नाही" हे ऐकवत असतात. म्हणजे यानिमित्ताने हे लोकही कुणाला तरी झोडपत असतात. तपास लागलेलाच नसेल तर कोणत्या काल्पनिक गोष्टीला ते झोडपत असतात...
बरं यानिमित्ताने त्यांनी अनेकांना झोडपलेलं आहे. म्हणजे जोवर खुन्याचे नाव जाहीर होत नाही तोवर हा खेळ रंगणार आहे...

गांधीजींनाही त्यांच्या हयातीत अनेकांनी विरोध केला. पुढे गांधीजींची हत्या झाली. कल्पना करा... हत्या करणारा कुणी पाकिस्तानवादी असता तर... काय झालं असतं ?

तर हे गांधीविरोधक पाकिस्तानवाद्यांना झोडपण्याची संधी मिळत्ये म्हणून तात्पुरते का होइना गांधीभक्त झाले असते...आणि त्यांनी रान पेटवलं असतं.
(पाकिस्तानवादी याचा अर्थ विचारु नये)

पण तसे झाले नाही. जे नाव पुढे आले ते विरोधकांसाठी अत्यंत गैरसोयीचे होते ! या नावामुळे गांधीविरोधक ऐतिहासिक रित्या बॅकफूटवर गेले, ऐतिहासिक रित्या कोंडीत सापडले. पुढची अनेक दशके सफाई देत बसले...

खरंच या देशातले हत्येनंतरचे राजकारण पाहून उबग येतो...

ashu jog

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

जावू द्या हो...

आशु जोग's picture

23 Aug 2014 - 11:12 pm | आशु जोग

कुठे जाऊ द्या

नितिन पाठे's picture

23 Aug 2014 - 3:18 pm | नितिन पाठे

थांबा..... लगेच जाऊ देवू नका

कोणाला व/वा कशाला जाऊ द्यायचे वा नाही द्यायचे?

एसमाळी's picture

23 Aug 2014 - 4:46 pm | एसमाळी

जाऊ द्या हेच खर.

नेत्रेश's picture

24 Aug 2014 - 1:13 am | नेत्रेश

दाभोळकरांच्या विचारांचा विरोध करणे आणी त्यांच्या हत्येचा निषेध करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
त्यांच्या हत्येचा निषेध केल्यांमुळे किंवा पोलीस/सरकारवर टीका केल्या मुळे, त्यांच्या विचारांचे विरोधक हे समर्थक बनत नाहीत.

त्यांनी निषेध न करता आनंद साजरा करायला हवा असे तर म्हणायचे नाही ना?

एकुलता एक डॉन's picture

24 Aug 2014 - 2:19 am | एकुलता एक डॉन
नाव आडनाव's picture

24 Aug 2014 - 4:26 pm | नाव आडनाव

जोग साहेब माफ करा, प्रतिकिया तुम्हाला नाही. थोडं अवांतर होतंय.

मित्रानो, हि चर्चा जातीवादा कडे चालली आहे. दोन्ही बाजूकडून हे थांबवू. मिसळपाव वर जी नावं / आडनावं आहेत ती खरी आहेत / खोटी आहेत हे कुणालाहि माहित नाही. माझ्या ओळखीचे असे लोक आहेत जे मिसळपाव वर नाही दुसऱ्या ब्लोग वर मुद्दाम त्यांच्या ग्रुप पेक्षा वेगळं नावं घेतात आणि असं लिहितात कि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो - अर्थात निगेटिव. मला माहित नाही यात त्यांचं साध्य काय आहे, बहुतेक दोन ग्रुप मध्ये कायम वैर राहावं अशी त्यांची इच्छा असेल. हे ग्रुप कधी धर्माचे असतात तर कधी जातीचे, कधी भाषेचे तर अजून कधी अजून कशाचे.आणि असे लोकही कायमच दोन्ही बाजूला असतात. अश्या चर्चा मिसळपाव वर तिथेच कृपया थांबवा.

आशु जोग's picture

24 Aug 2014 - 5:15 pm | आशु जोग

आपण शांतीदूत का !

नाव आडनाव's picture

24 Aug 2014 - 7:54 pm | नाव आडनाव

नाही. माफ करा. चुकलंय माझं.

मंदार दिलीप जोशी's picture

5 Sep 2014 - 12:40 pm | मंदार दिलीप जोशी

तुम्हाला अनुमोदन. नो चर्चा फ्रॉम माय साईड.

अर्धवटराव's picture

24 Aug 2014 - 7:20 pm | अर्धवटराव

राजकारणात जर कुठलाच विषय वर्ज्य नसेल तर हत्या देखील का म्हणुन चर्चीली जाणार नाहि? थोर लोकांचे विचार, त्यांचं आयुष्य जर जागृत समाजाने समजुन घेतलं नाहि आणि त्यावर आपला आवाज बुलंद केला नाहि तर राजकारण्यांची कोल्हेकुई ऐकु येणारच. हे असं जगात सर्वत्र होतं.

हुप्प्या's picture

24 Aug 2014 - 8:46 pm | हुप्प्या

हौशे, नवशे आणि गवशे असे प्रसंग शोधतच असतात. अगदी कुणाचा मृत्यू वा हत्याही ह्यापासून सुटलेली नाही.
चालायचंच. आगीवर पोळी शेकून घ्या. मग ती आग सरणावरील असली तरी चालेल असे काहीचे धोरण असते. त्याला आवर घालणे अशक्य आहे.

आशु जोग's picture

3 Sep 2014 - 11:51 am | आशु जोग

खरे आहे तुमचे

राजकारण करा अथवा करू नका, हा वेगळा विषय आहे.
पण हत्ये सारखा जघन्य अपराध करणार्‍यांचा शोध घेतला गेला पाहीजेच!
यावर कोणाचे ही दुमत नसावे.

हे सरकारने वेळिच करावे, यासाठी आपण सार्‍यांनी काय केले पाहीजे यावरच चर्चा घडावी, हि नम्र विनंती.

सत्य बाहेर येईपर्यंतच राज कारण होवू शकते, त्यानंतर नाही, हे लक्षात घेतले तर बरे होइल.

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2014 - 10:14 am | प्रभाकर पेठकर

सत्य बाहेर आल्यानंतर राजकारणाची दिशा बदलू शकते. राजकारण करणे थांबत नाही. राजकारण करणार्‍यांना कुठलाही मुद्दा असलेला/नसलेला चालतो. ते राजकारण करीतच राहतात कारण त्यांच्या 'व्यवसायाचे' तेच मुद्दल असते.

आशु जोग's picture

25 Aug 2014 - 6:07 pm | आशु जोग

++१

आशु जोग's picture

5 Jun 2015 - 6:56 pm | आशु जोग

गम्मत पहा
गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर यातल्या एकानेही निषेध केला नाही. फेबुवरचा प्रोफाईल काळा ठेवला नाही. का तर म्हणे पानसरेंची हत्या भाजपा सरकारच्या काळात झाली. त्या भाजपाला कसं झोडपायचं ?

नितिन थत्ते's picture

5 Jun 2015 - 7:47 pm | नितिन थत्ते

त्यात पानसरे कार्डहोल्डर.......

आशु जोग's picture

6 Jun 2015 - 4:35 pm | आशु जोग

बोले तो

नांदेडीअन's picture

16 Sep 2015 - 3:52 pm | नांदेडीअन

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली येथून अटक करण्यात आलेला आरोपी समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याचे, पोलिस महानिरीक्षक संजय कुमार यांनी आज (बुधवार) सांगितले.

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समीर गायकवाड असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला 23 सप्टेंबरपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी सकाळचा फेरफटका मारल्यानंतर घरी परतत असताना दोघा जणांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पानसरे दांपत्य गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारांदरम्यान पानसरे यांचे निधन झाले होते.

याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना संजय कुमार म्हणाले, की समीरचा मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. समीरच्या सांगली व मुंबईतील घराची झाडाझडती सुरु आहे. समीर व त्याचे संपूर्ण कुटुंब सनातन संघटनेशी संबंधित असून समीर १९९८ सालापासून संघटनेचा कार्यकर्ता आहे. फोन कॉल्सच्या आधारे समीरला अटक करण्यात आली आहे. समीरच्या अटकेने हत्येशी संबंधित काही धागेदोरे मिळाले आहेत. समीरला अटक केली म्हणजे पूर्ण प्रकरण उलगडले असे होत नाही. समीरला पुढील कारवाईसाठी आज पहाटे अटक करण्यात आली आहे. तांत्रिक सर्वेक्षणातून संशयाची सुई समीरकडे वळली आणि त्यामुळे काल रात्री ८ वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले व आज पहाटे पाच वाजता त्याला अटक करण्यात आली.

- Esakal.com

यामुळे जे संबंधीत असतील त्यातले काही फरार होतील, पुरावे नष्ट करतील. सर्व तपास पुर्ण झाल्यानंतर का हे जाहीर करत नाहीत?

द-बाहुबली's picture

17 Sep 2015 - 2:03 pm | द-बाहुबली

संशयितांच्या नातेवाइकाना वा खुद्द संशयिताला का ताब्यात घेतले आहे हे सांगणे जर पोलीसांना बंधनकारक आहे तर अटक कशी गोपनीय ठेवणार ?

तसेही त्याला आधी रात्री ८ वाजता चौकशीस बोलावल्याचे व काही कालावधीने सोडुन दिल्याचे समजते. व लगेच त्याच रात्री (पहाटे साडेचारच्या दरम्यान) अटक केली. ही पध्दत निश्चितच पध्दतशिर वाटते. त्याचे दोन मेहुणेही कर्नाटक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे मटाचे वृत्त आहे.

थिटे मास्तर's picture

6 Sep 2017 - 12:28 am | थिटे मास्तर

सुप्रसिद्ध जेष्ठ पुरोगामि पत्रकार गौरी लंकेश ह्यांची बंगलोर मध्ये निर्घुण हत्या. RIP.

आशु जोग's picture

6 Sep 2017 - 9:33 am | आशु जोग

दु:खद