जवाबदेही

रसिया बालम's picture
रसिया बालम in जे न देखे रवी...
19 Aug 2014 - 9:36 pm

शिवाशीव विस्मरणात गेली
वस्ती आता एक झाली
मनं तशीच राहीली
जातीभेदांनी विटाळलेली

उतरंड संपली, भिंती पडल्या
अजुन करतो जातीचा उपहास
हा 'भटक्‍या' तो 'मागास'
उच्चत्वाचा मिथ्या आभास

दोन अनोळखी भेटताना
नवीन ओळख होताना
आडनाव महत्वाचं वाटते
कारण त्याची जात सांगते

-- रसिया बालम

समाज

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

20 Aug 2014 - 12:43 pm | वेल्लाभट

क्या बात ! नेमक्या शब्दात ! सुरेख रचना...

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2014 - 10:14 am | कैलासवासी सोन्याबापु

ब्यांग ऑन टारगेट!!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2014 - 10:14 am | कैलासवासी सोन्याबापु

ब्यांग ऑन टारगेट!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Aug 2014 - 1:40 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

इनिगोय's picture

21 Aug 2014 - 11:53 am | इनिगोय

जवाबदेही म्हणजे काय?

रसिया बालम's picture

3 Sep 2014 - 12:01 pm | रसिया बालम

जवाबदेही = उत्तरदायित्व (responsibility, answerability)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2014 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता आवडली.

-दिलीप बिरुटे
(जातीपातीचा विचार न करणारा)

अजय जोशी's picture

25 Aug 2014 - 7:31 pm | अजय जोशी

आडनाव महत्वाचं वाटते
कारण त्याची जात सांगते

अहो, माझे आडनाव "जोशी". या आडनावाचा किती जातीत समावेश आहे कुणास ठाऊक.

मात्र,
मी जात मानतो. (कारण, मला सवलती मिळत नाहीत.) पण, त्यातील उच्च-नीच भाव नाही. कोणी जसे आपले नाव सांगते, तितक्याच सहजतेने आपण जात घेतली पाहिजे.

एस's picture

26 Aug 2014 - 7:48 pm | एस

आडनाव विचारतात कारण त्यावरून जात कळते. नाही कळाली तर मग पुढचा प्रश्न असतो तुमचे गाव कुठले. सध्याचे वास्तव्याचे गाव सांगितले की विचारतात मूळ गाव कोणते. आणि अगदी त्यावरूनही नाही कळलं तर मग अंदाजाने स्वतःच्या नातेवाईकांची आडनावे एकामागोमाग एक घेऊन विचारतात ह्या अमुक गावचे हे माहीत असतील ना? आणि अगदीच लोचट असतील तर सरळ विचारतात, 'तुम्ही कोण? नाही म्हणजे XXX की ZZZ?'

तुम्ही जात का मानता हे कळलं नाही. तुम्ही दिलेलं कारण त्यासाठी योग्य कसे हे समजलं नाही. असो. तुमच्या जात मानण्या-न मानण्याबद्दल काही म्हणणं नाही.

रसिया बालम's picture

3 Sep 2014 - 12:00 pm | रसिया बालम

धन्यवाद मित्रहो
मी जात मानत नाही. अवघे विश्वचि माझे घर...