मेरा नाम करेगा रोशन .....

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
16 Aug 2014 - 12:20 am

शाळेतील दिवस म्हणजे गोल्डन मेमरीज असतात.शाळेतील प्रत्येक दिवस म्हणजे एक मजाच असायची.शाळेत मस्ती आणि खोड्या काढणे यासाठीच जवळ जवळ सर्व मुल येत असतात कारण शिकण्यासाठी क्लास लावलेला असतोच.पण खोड्या काढण्याची मजा काही वेगळीच असते.
आमच्या शाळेत मजा म्हणून प्रत्येक मुलाला त्याच्या वडिलांच्या म्हणजेच बापाच्या नावाने हाका मारायचे.जर कोणाचे वडील रिक्षा चालवणारे असतील तर त्याला रिक्षा म्हणून हाका मारायचे आणि जोर जोरात हसायचे.जे मुल हसायचे अशा मुलांमध्येच एका मुलाच्या वडिलांचे नाव तानाजी होते.त्या मुलाचे नाव काय होते हे आठवत नाही कारण त्याला सर्व जन “ताना” म्हणायचे.ताना हा मस्ती करण्यात एक नंबर होता.जेंव्हा केंव्हा काही झोल झाला कि पोरं लगेच म्हणायची “ताना” ला बोलव.ताना हा शाळेतला भाई म्हणून ओळखला जाऊ लागला.
एके दिवशी शाळेत मुलांची मारामारी झाली होती आणि नेमका त्या दिवशी ताना शाळेत आलाच नव्हता.पोरांना पाठबळ हवे होते म्हणून ते तानाला बोलवायला घरी गेले.बेल वाजवली... त्याच्या वडिलांनी दरवाजा उघडला .... आणि विचारले कोण हवे...??? यावर शाळेतील पोर म्हणाली... काका “ताना” आहे का ??
तसे त्याचे वडील भडकले आणि पोरांना मारू लागले.पोरांना कळत नव्हते कि काका का मारत आहेत.काकांनी चिडून दरवाजा बंद केला. पोरं बिल्डिंगच्या खाली आली आणि एकमेकांशी बोलू लागली ...च्यायला का मारले असेल आपल्याला ??? तेंव्हा त्यातला एक म्हणाला अरे आपण त्याच्या वडीलांसमोर त्यांना विचारले कि ताना आहे का??? सगळे एकमेकांकडे बघू लागले ... नंतर त्यातला एकजण म्हणाला अरे मग त्याचे नाव काय आहे ?? कोणालाच माहिती नव्हते आणि सगळेजण जोर जोरात हसू लागले.
शाळा संपली आणि कॉलेजला तीच मुले आली पण ह्यावेळी त्या मुलांमध्ये एक मुलगा नवीन होता त्याचे नाव होते सुनील छोटू पवार.वडलांचे नाव छोटू म्हणून त्याला सगळे छोटू म्हणून हाका मारयला लागले.प्रोफेसर मॅडम समोर त्याला आम्ही छोटू छोटू म्हणून हाका मारायचो. एके दिवशी आमच्या कॉलेज मध्ये कुणी पुढारी आला होता.त्याला सर्वांनी त्या पुढाऱ्याने केलेल्या कामाबद्दल प्रश्न विचारायचे आणि जो कुणी सर्वात चांगला प्रश्न विचारेल त्याला आमच्या मॅडमकडून १०० रुपयाचे बक्षीस मिळणार होते.१०० रुपये मिळवण्यासाठी वर्गातल्या सर्व मुलांनी खूप प्रश्न विचारले. प्रोफेसर बाईंनी कार्यक्रमाच्या शेवटी आजच्या १०० रुपयाच्या प्रश्नाचा मानकरी आहे छोटू पवार अशी घोषणा केली आणि आम्ही टाळ्या वाजवायचे सोडून जोर जोरात हसू लागलो. ह्यात हसण्यासारखे काय आहे बाई म्हणाल्या. अहो बाई छोटू त्याच्या वडिलांचे नाव आहे त्याचे नाव सुनील आहे आमच्यातील एकाने खुलासा केला. आमच्या बाईं खवळल्या व म्हणाल्या कार्ट्यांनो तुमची तरी नावे स्वतःची आहेत की बापाचीच नावे मिरवता? शालेय जिवनातला बालिशपणा कॉलेजच्या अखेरच्या वर्षापर्यंत आम्ही टिकवून ठेवला होता.आता तो फक्त आठवणीतूनच व्यक्त होतो.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2014 - 1:47 am | प्रभाकर पेठकर

>>>>शाळेत मस्ती आणि खोड्या काढणे यासाठीच जवळ जवळ सर्व मुल येत असतात कारण शिकण्यासाठी क्लास लावलेला असतोच.

जग येव्हढं पुढे गेलंय ह्याचा पत्ताच लागला नाही.

चिगो's picture

16 Aug 2014 - 11:49 am | चिगो

जग लैच पुढे गेलंय, काका.. मागे एका मुलीच्या, जी आता अकरावीत आहे, तिच्या अ‍ॅडमिशनबद्दल विचारत होतो. तेव्हा कळलं, की आजकाल शाळांचे क्लासेसशी "कोलॅबरेशन"पण झालेय. म्हणजे विद्यार्थ्यानी शाळेत यायची गरजच नाही शिकायला. फक्त प्रॅक्टीकलसाठी यायचं आणि अटेन्डन्ससाठी.. बाकी सगळा अभ्यास क्लासेसमध्येच. आता पोरं-पोरी "शालेय" राहीलीच नाहीयेत, ती "क्लासेय" आहेत..

भिंगरी's picture

29 Sep 2014 - 10:18 am | भिंगरी

मग त्यात पण प्रकार असतील
क्लास वन
क्लास टू ...........

खटपट्या's picture

16 Aug 2014 - 3:11 am | खटपट्या

मस्तय !!!

अनुप ढेरे's picture

16 Aug 2014 - 10:35 am | अनुप ढेरे

छान लिहिलय! पुढे पुढे वडलांच्या नावाचीही वेगवेगळी रुपे होतात हे पाहिलय!

कविता१९७८'s picture

16 Aug 2014 - 11:04 am | कविता१९७८

मस्त , गमतीशीर आठवण.

भिंगरी's picture

28 Sep 2014 - 6:27 pm | भिंगरी

कंपनी किती पिढ्यांचे नाव रोशन करणार आहेत?

भिंगरी's picture

29 Sep 2014 - 9:58 am | भिंगरी

कार्टी लईच ट्वाळ असतात.

काउबॉय's picture

29 Sep 2014 - 4:14 pm | काउबॉय

आमच्या शाळेत मजा म्हणून प्रत्येक
मुलाला त्याच्या वडिलांच्या म्हणजेच बापाच्या नावाने
हाका मारायच

नाही निरागसतेचे कौतुक आहेच पण ही मजा अश्लिलतेची कास धरणारी होती याची जाणिव आपणास नंतर कधी घडली का ? उघड शिवी द्यायला लागू नये म्हणून म्हणुन पोरांनी काढलेला तो पर्याय होता. आमच्या वेळी सभ्य मुले तर बापाच्या नावाने हाक मारल्याबद्दल शालेत बापालाच घेउन येत असत :) आणि त्यांची टवाळकी करायला आम्ही मुद्दाम पुन्हा तसेच हाक मारायचो :) पुन्हा शिक्षा व्हायची मग शिक्षक जो आवडता असे त्याच्या मर्जीखातर पोरं त्रास काही काळ थान्बवायाची