डॉक्टर आणि समीक्षक

विवेकपटाईत जे न देखे रवी...
एकाच्या हातात कात्री दुसऱ्याच्या हातात लेखणी डॉक्टर आणि समीक्षक करतात सदा चीरफाड. डॉक्टरची कात्री चालते शरीरावर बहुतेक रोग्यांचे वाचविते प्राण. समीक्षकाची लेखणी चालते कवितेवर बहुतांश कवींचे *हरते ती प्राण.
*टीप: समीक्षकांच्या, समीक्षेला घाबरून बहुतांश कवी कविता करणे सोडून देतात.
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

5 टिप्पण्या 1,819 दृश्ये

Comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

छान !

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

छान रे विवेक. टीप-डॉक्टरांच्या फसवेपणाला कंटाळून घाबरून बहुतांश ज्येष्ठ नागरिक सकाळी योगासने करतात.

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

`सिनीअर सिटिझन' ही नवी कॅटेगरी आल्यापासनं ज्येष्ठ नागरिक, तरुणाईपेक्षा जास्त धमाल करतात असं निरिक्षण आहे.

सुबोध खरे नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई साहेब, कुणाच्या कोंबड्या ने का होईना उजाडल्याशी कारण. जी गोष्ट तरुण वयातच करायला हवी होती ती उशिरा का होईन करतात ना मग झाले. नाही तरी वेळ घालवायला काही तरी साधन तर हवेच ना ?