गीताई , गीतेचे अनुवाद आणि जादुचीकांडी

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
18 Apr 2014 - 6:51 pm

मराठी विकिप्रकल्पात मराठी विकिबुक्स नामे एक प्रकल्प आहे. या प्रकल्पात कुणा गीताईप्रेमीने विनोबा भावेंच्या गीताईचे काही वर्षांपुर्वी युनिकोडात टंकन केले. युनिकोडात टंकन करताना गीताई हा ग्रंथ कॉपीराईटेड आहे आणि आपली ही मेहनत वगळली जाऊ शकते हे सदगृहस्थांनी लक्षात घेतले नसावे. त्यांनी टंकन केले त्या काळात मूळस्वरूपातील ग्रंथ जतन करावयाचा विकिस्रोत प्रकल्प नव्हता. युनिकोडात टंकनाच्या मेहनतीचा आदर म्हणून मी तो मराठी विकिबुक्स मध्ये वगळण्या एवजी मराठी विकिस्रोतात (प्रताधिकार मुक्त असतात तर मजकुर विकिस्रोत प्रकल्पात राहीला असता) तात्पुरता निर्यात करून लगेच वगळणार आहे.

गीताईवरील प्रेमापेक्षाही कुणाची मेहनत वगळावी लागणे जीवावर येते. त्या शिवाय मराठी विकिस्रोत प्रकल्पात मूळ गीतेचा प्रत्येक श्लोक आणि त्या खाली मराठीतील प्रत्येक अनुवाद असे काही प्रकल्प राबवण्याचा मानस आहे त्यात नाईलाजाने गीताईच्या श्लोकांचा आंतर्भाव उपलब्ध असूनही टाळावा लागणार हे जवळपास निश्चित दिसते आहे.

गीताईचे कॉपीराईट ज्या कुणा कडे आहेत आजच्या काळात त्यांनाही गीताईतून प्रचंड उत्पन्न मिळत असण्याची शक्यता विरळ आहे. मिपा सदस्यांपैकी कुणी गीताईच्या कॉपीराईट धारकांना ओळखत असेल आणि त्यांना ग्रंथ कॉपीराईट मुक्त करण्याची विनंती करेल आणि ते तसे करतील अशी आशा विरळ आहे. किमान पक्षी कॉपीराईट धारकाने सदर युनिकोडातील मजकुर स्वतःकडे स्वतःच्या वेबसाईटवर अथवा इतर माध्यमातून जतन केल्यास अनवधानाने टंकणार्‍या व्यक्तीची प्रेमाची मेहनत वाया जाणार नाही. अर्थात हा मिपा धागा ते कॉपीराईट धारक आणि त्यांनी आपली विनंती ऐकणे हा प्रवास एका फॅण्टसीच्या पलिकडे नाही याची कल्पना आहे. तरीपण जादूची कांडी फिरलीच तर एक नसता आशावाद मनात ठेऊन मजकुर वगळण्याची कृती परस्पर करण्या एवजी या मिपा धाग्यावर शेअर केली.

आपण हा धागा काही नवे वेगळे काही वाचण्याच्या आशेने उघडला असेल आणि काही विशेष मिळाले नाही तर क्षमस्व. धाग्यावर आलोच आहोत तर गीता, गीताई, कॉपीराईट कायदे आणि कॉपीराईटपासून मुक्तता मिळवण्या या विषयांबद्दल कुणाला अधिक चर्चा या धाग्यावर करावयाची झाल्यास माझी ना नाही.

धाग्याला भेट देण्या बद्दल धन्यवाद

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

18 Apr 2014 - 8:25 pm | आशु जोग

आयडीया चांगली आहे... अखिल मानवजातीच्या कल्याणची आहे.

आपल्या श्रद्धे बद्दल आदर आहे. प्रतिसादा साठी धन्यवाद.

(अर्थात माझ्या पुरतं मानवी जातीच कल्याण वगैरे विचारापेक्षा, ते निव्वळ एक ज्ञानकोशीय उद्दीष्ट आहे; हि माझी भूमिका अंशतः ऋक्ष आणि नमुद केली नसती तरी चालणारी होती. का कोणजाणे मी माझ्या मर्यादांच ओझ सगळी कडे वागवल पाहीजे जाहीर केल पाहीजेच असं नाही पण तो माझ्यासवयीचा भाग झाला आहे.)

आपणास शुभेच्छा

आशु जोग's picture

18 Apr 2014 - 10:07 pm | आशु जोग

स्वारी...
>>अखिल मानवजातीच्या कल्याणाची... हा आरोप मी मागे घेतो
तुमच्यावर कुठलंतरी ओझंही आहे म्हणालात... फार सहानुभूती वाटते...
तुमची आज्ञा असेल तर उद्या सहानुभूती सुद्धा मागे घेइन... आपण म्हणाल तसं

माहितगार's picture

19 Apr 2014 - 8:02 am | माहितगार

:)

माहितगार's picture

23 Jul 2014 - 3:56 pm | माहितगार

लोकमान्य टिळकांच्या जन्म दिवसाच्या निमीत्ताने 'गीता' विषयक धागे जरा वर काढतो आहे.