मृगगड - उंबरखिंड - भाग २

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
11 Mar 2014 - 9:53 pm

भाग एक इथे वाचा.

त्या घराच्या बाजुलाच एक हातपंप होता. तिथे चार पाच जणींची कपडे, भांडी धुण्याची लगबग चालू होती. गावात लग्न असल्यामुळे सणाचं वातावरण होतं. मी बसलो होतो त्या घराच्या समोरच डीजेची गाडी सजवून ठेवलेली होती. जेवणं नुकतीच आटपल्याने बाजूला असलेल्या मांडवात पुरुष मंडळी सुस्तावलेली होती, गप्पा चालू होत्या. ‘मावशी बसू ना इथे?’, कपड्यांची बादली घेऊन मी बसलेलो त्या घरात जाणा-या मावशींना मी विचारलं. ‘बस की रे बाबा! बस बस’ प्रेमाचं उत्तर आलं. काही मिनिटं माझा डोळा लागला. अतिशय शांत वाटत होतं. अनेक आवाज आजूबाजूला चालू होते, तरीही. इतक्यात काही मुलं मी बसलो होतो तिथे आली. मागोमाग एक छोटा मुलगा रडत आपल्या बाबांना घेऊन आला, आणि माझ्या पुढ्यात खेळ सुरु झाला.
aa
a
‘हा....हा सारका चिडवितोय मला...’ मुलगा रडत रडत म्हणाला. ‘ए कोन रे? का चिडवितंय, पुना चिडवाल तर एक कानाखाली देन मी’, रडणा-या मुलाचे बाबा. आणि ते त्याला घेऊन गेले. आता बाकीचा मुलांचा कंपू माझ्या आजूबाजूला त्या ओसरीवर विसावला. ‘आयला हे येडं हाय, जरा काय बोल्लं की लागतंय रडाला’, एक जण म्हणाला. ‘नायतं काय, परवा एक गुद्दा टाकला मी तर क्येवडं नाटक केलंन’ ‘तिजायला अजून एक हानायचा मग’ ‘पुन्हा भेटूदे रे चांगला भो**या त्याला’ त्या मुलांची चर्चा रंगत होती. ‘आर तु पन येडाय राव, तू हातभर, तो वीतभर, तु त्याच्या काय नादी लागतोय’ मी पण एक डायलॉग टाकला. ‘आरं.... तुला म्हाय्त नाय, तो लई कांगावखोर हाये, मुदाम करतोय तो असं नाटक’, चिडवणा-या मुलाने मला उत्तर दिलं. समोर डीजे च्या ट्रक मधे लहान लहान मुलं गलका करत होती. ‘मग काय आज रात्री फुल्ल डीजे ना?’ मी प्रश्न केला. ‘हा मग! दनका करनार फुल’, जोशात उत्तर मिळालं. मी त्या गप्पांचा कधी, कसा भाग झालो मलाच कळलं नाही.
a
मग थोड्या वेळाने एक मामा आले आणि ‘चला ए, इथे गडबड नकोय, तिकडे जावा’ असं म्हणून त्यांनी सगळ्यांना पांगवलं. मला म्हणाले, ’तुम्हाला जेवायला वगैरे हवंय काय?’ ‘हो, देईल का गावात कुणी करून? काय काय मिळतं’ ‘अवं तसं न्हाई, माझ्या मुलीचं लगीन हाय, तुम्ही मांडवात जेवा आता, जेवण तयार हाये, भाजी, पोळी, डाळ, भात.....’, मामांनी निमंत्रण दिलं. ‘आवडेल मामा, पण आमची जी मंडळी पुढे गेलीयत त्यांना विचारतो, मग जेवनार असू तर येतो परत.’, मी म्हटलं. ’आसं आसं. आमी आहोत इथंच. या.’, असं म्हणून मामा घरात गेले. ही आपुलकी , ही माणुसकी, ही अशी गावाकडेच मिळते. माझा माझ्याशीच विचार चालू होता. थोडा वेळ असं माझं घर असेल, असं गाव असेल, अशी शेती असेल, असा मी पडवीत निवांत बसेन रोज संध्याकाळी.... अशा विचारसागरात मनसोक्त विहरून मी भानावर आलो. ‘बरंय मामा, येतो’ घरात हाक दिली आणि बूट घालून गाडीकडे निघालो. परेश, स्वानंद, दिलीप रस्त्यावरच गाडीला टेकून बसले होते, घाम पुसत होते, रुमालाने वारा घेत होते. मला स्वत:ला मात्र त्यांच्यापेक्षा दुप्पट ताजंतवानं वाटत होतं.
a
मग आम्ही निघालो समरभूमी उंबरखिंडीकडे. गाडीचा मायक्रोवेव्ह झाला होता, त्यामुळे आम्ही अवघडल्यागतच सीटवर बसलो होतो. जरा वेळाने उजवीकडे आमलेटपाव, बुर्जीपाव, पोहे, भजी, वडे, चहा असे शब्द खडूने लिहीलेली एक गाडी दिसली. मग काय! नो नीड टू आस्क. स्वानंद आणि परेश वगळता आम्ही दोघांनी पोटाची खळगी जराशी भरून घेतली. आणि मग सगळे चहा पिऊन पुढे पंधराच मिनिटात उंबरखिंडीत पोचलो. उंबरखिंड स्मारक हे गावकरी आणि एक दुर्गप्रेमी/शिवप्रेमी संघटना यांनी संयुक्त विद्यमाने उभारलेलं आहे. याचा थोडक्यात इतिहास असा की करतलब खानाच्या ३०००० सैन्याचा महाराजांनी १००० मावळ्यांच्या मदतीने केलेला पराभव. महाराजांनी लढलेल्या २३ युद्धांपैकी हे एक महत्वाचं युद्ध. गनिमीकाव्याचं आदर्श उदाहरण.
a
a
a
हे स्मारक आहे ती जागा एका नदीच्या पात्राकाठी आहे. आम्ही तिथे पोचलो तेंव्हा तिथे इतर कुणीही नव्हतं. अतिशय शांत अशी ती वेळ होती. स्मारकाच्या इथे परेशने चार फुलं वाहिली. आम्ही तो काळ, ते युद्ध आमच्या तोकड्या कल्पनाशक्तीत रचायचा प्रयत्न करत तिथल्या दगडांवर विसावलो. काही काळ कुणीच कुणाशी काहीही न बोलता पडून राहिलो. मग जसा सूर्य क्षितिजाआड जायला निघाला, तसे आम्हीही गाडी परतीच्या रस्त्याला लावली; त्या वीरांच्या पराक्रमाच्या आठवणी सोबत घेऊन, आमच्या आणखी एका सुसाट ट्रेकच्या आठवणी सोबत घेऊन.
aa

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

11 Mar 2014 - 10:44 pm | खटपट्या

फोटो दिसत नाहीयेत

स्पंदना's picture

12 Mar 2014 - 5:29 am | स्पंदना

सुरेख फोर्टोज अन खुमासदार वर्णन.
अन काय हो? हात वल्ला करायचा न्हाय व्हय त्या मांडवात? का कितीला ताट पडेल त्यांना असा विचार आला मनात?
द्याय्चे आहेर म्हणुन काहीतरी अन व्हायच सहभागी. का हायजीन आडव आलं?

भन्नाटच आहे .सरसगडाच्या मागचा का ?

वेल्लाभट's picture

12 Mar 2014 - 6:59 am | वेल्लाभट

नाही नसावा. पाली लांब आहे इथून जरासं. पण सरसगड दिसतो वरून म्हणे.

प्रमोद देर्देकर's picture

12 Mar 2014 - 10:38 am | प्रमोद देर्देकर

खुप छान रे वेल्ला. दोन्ही भाग मस्त. तुझी सहीच सारे सांगुन जाते की तुला या गोष्टींचं वेडच आहे ते.
बरं तुला व्य.नि. केला आहे बघ.

balasaheb's picture

12 Mar 2014 - 10:48 am | balasaheb

सुन्दर

वेल्लाभट's picture

12 Mar 2014 - 2:24 pm | वेल्लाभट

@खटपट्या, अपर्णा, प्रमोद, कंजूस
धन्यवाद!!!
@अपर्णा: लग्न दुस-या दिवशी होतं, त्या दिवशी हलद होती. आनि असं नाय ओ. सगल्यांची इच्छा हवी ना! नाहीतर काय होतं मला जायला! आवडलं असतं उलट!

संपलं व्हय? गडाचं फोटो कुटं हाईत??

पहिल्या भागात आहेत की दोन चार. बाकी विशेष असे गडाचे नाहीयेत.

फोटो अप्रतिम आहेत ,लेख हि छान .....+)

प्रचेतस's picture

12 Mar 2014 - 2:58 pm | प्रचेतस

फोटो छान.
पण मुख्य उंबरखिंडीचे फोटो नसल्याने अंमळ निराशा झाली.

स्पा's picture

12 Mar 2014 - 3:26 pm | स्पा

ह्म्म

झकासराव's picture

13 Mar 2014 - 4:29 pm | झकासराव

मस्तच. :)
उंबरखिन्डच नेमकं लोकेशन सांगु शकाल का?
सुधागडला गेल्यावर प्लॅन होता जर वेळ मिळाला तर, पण सुधागडाने घामटाच काढला. आणि वेळ मिळालाच नव्हता तेव्हा.

वेल्लाभट's picture

13 Mar 2014 - 5:02 pm | वेल्लाभट

खोपोली पाली रोड ला लागा, खोपोली पासून २० एक किमी वर आहे उंबरखिंड. डाव्या बाजूलाच बोर्ड दिसतो. उंबरखिंड ४ किमी. तिथून आत गाडी जाते. रस्ता कच्चा आहे जरा. पण जाते.

आम्ही मुंबईवरून एक्सप्रेस वे ला लागतो, टोल नंतरचा लगेचचा एक्झिट घेतो आणि मग पालीकडे जातो व्हाया खोपोली पाली रोड

पहिल्या फोटोत जीव खल्लास ..

छान वर्णन आनि माहीती :)

वेल्लाभट's picture

15 Mar 2014 - 9:01 am | वेल्लाभट

धन्यवाद :)

चारु राऊत's picture

20 May 2014 - 5:37 am | चारु राऊत

आहेर तरि द्यायचा