मृगगड - उंबरखिंड - भाग १

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
11 Mar 2014 - 7:31 am

’मृगगड??? हा कुठे आला? ऐकलं नाही कधी याबद्दल! मोठा आहे का? किती कठीण आहे? काय विशेष आहे त्या किल्ल्यावर?’ इत्यादी असंख्य प्रश्न उपस्थित झाले, जेंव्हा मृगगडाचं नाव सुचवलं गेल. तसा हा अपरिचितच किल्ला म्हणायला हवा. इंटरनेटवरही याची म्हणावी तेवढी मुबलक माहिती मिळत नाही. सुधागड, राजगड ही नावं शर्यतीत होती पण शेवटी एक दिवसाचाच ट्रेक करायचा ठरल्याने ती बाद झाली. मग कोहोज, टकमक गड, घनगड आणि हा मृगगड अशी काही नावं पुढे आली. मृगगड त्यातल्या त्यात जवळ, छोटा, फार कठीण नसलेला, (ही सगळी विशेषणं पुढे बदलली. कशी ते कळेलच) असा होता आणि नवीन होता त्यामुळे ‘होऊदे ट्रेक !’ असं म्हणून मंडळी ट्रेक ला तय्यार झाली.

a

मी, स्वानंद, आणि दिलीप, आम्ही गाडीने परेशला बरोब्बर ७:३० ला खोपोली ला गाठलं. ट्रेक च्या एक्साईटमेंट मुळे परेश स्टेशन वर न थांबता एसटी स्टॅंड पर्यंत पोहोचला होता. मग तिथे न्याहारी, चहा उरकून आम्ही पाली खोपोली मार्ग धरला आणि ९:३० ला भेलिव ला पोचलो. गावाच्या वेशीवर आमची गाडी लावली आणि चालत निघालो. गावात बॅंजोवर गाणी लागलेली होती. ‘कुणी वाटाड्या म्हणून येईल का?’ असं एका मामांना विचारलं असता, ‘आज गावात लग्न आहे त्यामुळे सगळे गावकरी ‘बिझी’ आहेत. आता कोन भेटनं कठीन हाये किल्यावर यायला’ असं उत्तर मिळालं. आधी गेलेल्या मित्राने सांगितलं होतं की गावक-याला बरोबर घ्या तुम्ही वाट किंचित गोंधळ करणारी आहे. पण आता इलाजच दिसत नव्हता. काठी टेकत मांडवाकडे जाता जाता मामा म्हणाले ‘पन पानी घेऊन जा बर का! वर न्हाई हाय.’ मामांचा हा सल्ला किती महत्वाचा होता हे नंतर कळलं. अर्थात हे आधी चार मित्रांनीही सांगितलं होतं, त्यामुळे कल्पना होती आणि पाणी घेतलंही होतं.

a
a

मृगगड तसा आकाराने छोटा किल्ला आहे. सवघाटावर लक्ष ठेवण्यासाठी याची उभारणी केली असावी असं वाचायला मिळतं. भेलिव गावातून बघितलं की लक्ष वेधून घेतो तो मोराडीचा सुळका. शिवलिंगासारखा हा अजस्त्र सुळका विलक्षण आहे. त्याच्याच ओळीत पण जवळ एक छोटेखानी डोंगर दिसतो तो मृगगड. तीन उंचवट्यांनी बनलेला हा डोंगर आहे. त्याच्या दुस-या आणि तिस-या उंचवट्यामधल्या घळीतून वर जायचा मार्ग आहे.

a

पहिले एक छोटासा चढ चढून गेल्यावर आम्ही एका पठारावर पोचलो. पुढे वाट दाट जंगलात गेली. आम्ही वाळलेली झुडपं आणि पाला तुडवत मृगगडाच्या समांतर चालत होतो. तासभर झाला. आता मृगगड मागे राहिला होता आणि त्याच्या पुढच्या डोंगराला समांतर आम्ही संभ्रमित अवस्थेत उभे होतो. मग ‘आपल्याला डावीकडे वळायला हवं’ असं मी म्हटलं. आणि आम्ही एक खडी चढण कशीबशी चढून त्या दुस-या डोंगराच्या कातळभिंतीला जाऊन भिडलो. इथून रस्ता नव्हता याची खात्री झाली.

qq
(वरील फोटोतील दृश्य हे केवळ स्टंट असून हा किल्ल्याच्या मार्गातला रॉकपॅच नव्हे. हा डेड एन्ड होता.)

आणि हीच ती वेळ हाच तो क्षण म्हणून बाबा परेश यांना आपल्या लीला दाखवण्याची हुक्की आली. मग त्या खड्या कातळाला सर करायला सरसावलेले ‘सर’ हां हां म्हणता सुमारे २० एक फूट वर पोचले. मागोमाग दिलीपलाही सुरसुरी आली. तोही त्याच्या खालोखाल जाऊन उभा. आणि मग फोटो. इथे हे दोघे झाडाचा आधार घेत खाली आले इतक्यात, ‘जाऊदे मी काय म्हणतो, आपण इथून निघू आपण तिकोना ला जाऊ’ इति स्वानंद. नाहीतर असं करूया का, ‘आपण तिकोना-तुंग करू आणि तिथून रायगड ला झोपायला जाऊ. आज फुल्ल मजा करूया यार’ इति स्वानंद. ‘ब......र’ पण आधी इथे आलोत तर इथून असंच परत जायचं नाही. हा करून मगच पुढचं काय ते असं ठरलं. आम्ही परत फिरलो. जाताना स्वानंद ने जो झ-यासारखा दिसणारा मार्ग सुचवला होता तिथून आम्ही किल्ल्याकडे वळलो. मग फोन अ फ्रेंड लाइफलाईन वापरली, एका ट्रेकर मित्राला फोन केला, थोडं त्याच्या मदतीने आणि थोडं आमच्या हिमतीने आम्ही त्या घळीत पोचलो जिथून गडाची वाट आहे.

a
q

आता ‘वाटेत एक छोटासा रॉकपॅच लागतो’ या नेटवर वाचलेल्या वाक्यातला तो छोटासा रॉकपॅच आला. सुमारे १०-१२ फुटाचा हा कातळ आपल्याला चढायचा आहे हे बघत आम्ही त्याकडे चालत होतो. आणि आमच्या गाड्या एकाएकी स्लो झाल्या. पहिल्यांदा परेश वर गेला. बडे आराम से. मग दिलीप. जरा कमी आराम से. मग मी. ठीकठाक आराम से. अरेच्चा ! स्वानंद खालीच राहिला. मग बाबा परेश पुन्हा खाली आले. ‘अरे चल कम ऑन, तुंग तिकोना करून रायगड ला झोपायला जायचंय ना’ असा बाबापुता करून अखेर आम्ही स्वानंद ला वर आणण्यात यशस्वी झालो. पण ते तेवढ्यापुरतंच झालं. कारण तो कातळातल्या पाय-या चढून गडावर यायला पूर्णपणे तयार.... नव्हता. मग आम्ही तिघेच त्या कातळपाय-या चढून अखेर गडावर पोचलो. गड बघून पुन्हा पाय-या उतरून आलो. सेन्स ऑफ अचीव्हमेंट ! मग एक फोटो तर पैजेच ना बॉस!

grrr
t

आता खरी कसोटी होती. पाणी भरपूर न्या च्या अनेक सूचना असूनही आमचं पाणी कमी पडलं होतं. आता अर्धी बाटली शिल्लक होती, पूर्ण उतरणं बाकी, चार जण, सूर्य फुल्ल फॉर्मात, एकूणच; डेन्जर. रॉकपॅच वर आलो. पहिले मी कातळाकडे तोंड ठेवून उतरायचे चार निष्फळ प्रयत्न केले. ते काही जमत नाही म्हटल्यावर मी परेशला पाचारण केलं. परेश कातळाकडे पाठ करून ट्रायसेप्सच्या बळावर लीलया तो रॉकपॅच उतरला. क्रमांक दोन, स्वानंद. परेश च्या निष्ठूर मोटिवेशन मुळे तोही उतरला. पुढे मी. मग दिलीप. परेश वगळता आम्ही तिघेही इथे सपशेल गांगरलेलो होतो. त्यामुळे परेशला इथे मनापासून थंब्स अप! त्याला लोहपुरुष उगाचच म्हणत नाहीत. :)

tt

मग पुढे तहान खरंच फार जास्त जाणवायला लागली. घशाला कोरड पडायला लागली. काटे तुडवत, झाडांना टेकत, रेटत रेटत आम्ही भेलिव गावात आलो. माझी अवस्था तर एखाद्या झोंबी सारखी झाली होती. रिकामी बाटली घेऊन हातपंपाकडे सरसावलो तेंव्हा तिथे उभ्या मावशी म्हणाल्या, ‘अरे अरे! हे पिनार होय पानी? हे धुन्याचं हाय. तिकडे बघ नल हाये, तिथलं प्या.’ तसाच नळावर गेलो पाणी भरलं आणि पहिले दोन घोट घशात गेल्यावर पाण्याचं महत्व पुन्हा एकदा असं पटलंय की विचारू नका. मग एक एक करत सगळेच फ्रेश झालो. मी एक भरलेली बाटली घेऊन एका घरच्या ओसरीवर बसलो. बूट काढले, डोकं भिंतीला टेकलं आणि सगळं शरीर शिथील सोडून डोळे मिटून बसलो. परेश, दिलीप, स्वानंद म्हणाले की आपण गाडीत जाऊ, पण मी म्हटलं की मी दहा पंधरा मिनिटं इथेच थांबणार आहे. तुम्ही व्हा पुढे हवं तर. आणि मी त्यांच्याकडे चावी दिली.

aa

[क्रमशः]

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

11 Mar 2014 - 8:00 am | खटपट्या

मस्त !!

प्रमोद देर्देकर's picture

11 Mar 2014 - 9:44 am | प्रमोद देर्देकर

फोटो आणि वृत्तांत आवडले.
पु.भा.प्र.

एस's picture

11 Mar 2014 - 9:45 am | एस

पुणे जिल्ह्यातला हा एकच किल्ला करायचा राहिलाय. यंदाच्या पावसाळ्यात मोहिम फत्ते केली जाईल. आणि प्रतिमा अप्रतिम बरं का! :-)

मुक्त विहारि's picture

11 Mar 2014 - 9:48 am | मुक्त विहारि

झक्कास

पुभाप्र

अत्रुप्त आत्मा's picture

11 Mar 2014 - 10:53 am | अत्रुप्त आत्मा

तुफ्फान!

बाबा पाटील's picture

11 Mar 2014 - 12:58 pm | बाबा पाटील

१ नंबर...........!

केदार-मिसळपाव's picture

11 Mar 2014 - 1:34 pm | केदार-मिसळपाव

ज्जे बात....
एकुण वर्णन ओघवते आहे. वाचतांना मजा आली. पुभाप्र.

आनंदराव's picture

11 Mar 2014 - 1:48 pm | आनंदराव

हे तुम्ही असे जाता आणि मग आम्हाला जळजळ होते.

एक नंबर.. रॉक पॅचवरची चढाई तर लै भारी..

झकासराव's picture

11 Mar 2014 - 2:23 pm | झकासराव

हायला!!!!!!!!

हा मृगगड आहे होय.
पालीला, सुधागडला जाता हा वेगळ्या घुमटाकार डोंगर लक्ष वेधुन घेतोच की.

मस्त :)

सूड's picture

11 Mar 2014 - 2:28 pm | सूड

ह्म्म !!

वेल्लाभट's picture

11 Mar 2014 - 7:40 pm | वेल्लाभट

@ खटपट्या, प्रमोद देर्देकर, स्वॅप्स, मुवि साहेब, आत्मा, बाबा, केदार, आनंद, पिंगू, झकास आणि सूड

धन्यवाद्स !

बॅटमॅन's picture

11 Mar 2014 - 8:10 pm | बॅटमॅन

जबरी प्रकार आहे सगळा. तो रॉकपॅच पाहून विसापूरला जाताना वाट चुकून अर्धवट चढलेल्या रॉकपॅचची आठवण झाली आणि अंग अंमळ शहारले. फटूतला रॉकपॅच अवघड दिसतोय! सराव असल्याने जमलं की कसं? आय मीन लै औघड नै ना?

वेल्लाभट's picture

11 Mar 2014 - 8:19 pm | वेल्लाभट

ज्या फोटोत दोन व्यक्ती वर चढलेल्या दिसतायत तो रॉकपॅच नव्हे. तो डेड एन्ड होता आणि फोटोत दिसतायत ते केवळ स्टंट आहेत. जो रॉकपॅच खरोखर चढायचा होता तिथे आम्ही फोटो काढायच्या मनस्थितीत आणि परिस्थितीत नव्हतोच :P

संभ्रमाबद्दल क्षमस्व.

बॅटमॅन's picture

11 Mar 2014 - 8:26 pm | बॅटमॅन

ओह ओक्के :)

बर मग रॉकप्याच किती औघड होता? की तिथपर्यंत जातानाच थकला होता?

वेल्लाभट's picture

11 Mar 2014 - 9:25 pm | वेल्लाभट

होता ना राव. ब-यापैकी चॅलेंजिंग होता (आमच्यासाठी असेल). आणि त्यात ऊन. दगडाला टच केलं की चटका ! नाउ दॅट्स.... री...यली टफ आय टेल यू !

बॅटमॅन's picture

12 Mar 2014 - 2:33 pm | बॅटमॅन

भौत टफ था दिख रा तब तो!!

विवेकपटाईत's picture

11 Mar 2014 - 8:10 pm | विवेकपटाईत

मजा आली. वाचूनच सहलीचा आनंद घेतला.

यशोधरा's picture

11 Mar 2014 - 8:27 pm | यशोधरा

मस्त :)

त्रिवेणी's picture

11 Mar 2014 - 9:26 pm | त्रिवेणी

पहिल्या ४-५ फोटोतील झाडांची हिरवळ नंतरच्या फोटोंमध्ये नाही, सगळी वाळलेली झाड आहेत शेवट्च्या फोटोंमध्ये.

वेल्लाभट's picture

12 Mar 2014 - 2:25 pm | वेल्लाभट

@विवेक, यशोधरा,
थँक्स.
@त्रिवेणी: एकूणच सगळं रान वाळलेलं होतं. तुरळक हिरवळ होती पायथ्याशी फक्त.

पैसा's picture

21 Mar 2014 - 7:44 pm | पैसा

वर्णन आणि फोटो मस्तच आहेत! किल्ल्याचे फोटो पुढच्या भागात का?