गणपत आणी कोंबड्या

मनोजकुमार's picture
मनोजकुमार in जनातलं, मनातलं
1 Mar 2014 - 3:12 am

गणपत आणी कोंबड्या
गणपत गावातील गरीब माणूस होता. त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असे. कधी कधी ह्या कोंबड्याना तो दाणे टाकीत असे.

कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या
कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ.

सगळ्या कोंबड्यानी दिलेल्या अंड्या मधून गणपत फक्त एक अंडा रोज उचलत असे. ह्या एका अंड्यावर त्याची रोज ची उपजीविका चाले

असे करता करता बरीच वर्षे निघून गेली. कालांतराने त्याचे लग्न झाले आणि नंतर मुले. त्याचा रोजचा जीवनक्रम मात्र तोच होता - कोंबड्याना दाणे टाकणे आणि रोज एक अंडा उचलणे. लग्नानंतर च्या जबाबदारीमुळे, त्याचे व त्याच्या कुटुंबाचे पोट एका अंड्यावर भरेना. अंड्याचा आकार वाढावा म्हणुन त्याने जास्त दाणे टाकून बघितले, पण आकार वाढला नाही

त्याच्या मनात मग एक विचार आला, इतक्या सगळया कोंबड्या रोज एक अंडा देत आहेत मग मी फक्त एकच अंड का उचलतो?

…. त्याच्या जवळ ह्याचे उत्तर नव्हते

बालकथालेख

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

1 Mar 2014 - 10:32 pm | सस्नेह

काही शंका.
१) कोंबड्यांनी अंडे, नाही, अंडा दिला नाही तर गणपतला राग का येत असे ? त्याचे व कोंबड्यांचे एक अंड्याचे अ‍ॅग्रीमेंट झाले होते का ?
२) रोज एक अंडा खाऊन एक माणूस काही वर्षे जिवंत राहू शकतो का ?
३) कोंबड्यांचा मालक काय करीत असे ?
असो.

मनोजकुमार's picture

1 Mar 2014 - 10:58 pm | मनोजकुमार

धन्यवाद स्नेहांकिता तायी

मनोजकुमार's picture

1 Mar 2014 - 10:58 pm | मनोजकुमार

धन्यवाद स्नेहांकिता तायी

पैसा's picture

1 Mar 2014 - 11:24 pm | पैसा

माफ करा, पण नेमकं काय सांगायचं आहे? कळलं नाही.

कपिलमुनी's picture

2 Mar 2014 - 12:01 am | कपिलमुनी

कै च्या कै..

उगाचच धुरळा

कोंबड्यानी गणपत बरोबर नक्की काय " एस एल ए " साईन केले होते?
अंडे न देणार्‍या कोंबड्यांसाठी एच आर कडे जाण्यासाठी गणपत कडे एस्केलेशन रूट का डीफाईन केला नव्हता?

आत्मशून्य's picture

2 Mar 2014 - 12:37 am | आत्मशून्य

अउर आनेदो.

मुक्त विहारि's picture

2 Mar 2014 - 12:52 am | मुक्त विहारि

आवडली..

छान कूट

मनोजकुमार's picture

2 Mar 2014 - 1:03 am | मनोजकुमार

धन्यवाद

आत्मशून्य's picture

2 Mar 2014 - 1:12 am | आत्मशून्य

अंड्याचा आकार वाढावा म्हणुन त्याने जास्त दाणे टाकून बघितले, पण आकार वाढला नाही

आगागा! आधुनीक विज्ञानाने आकार कमी करण्यावर मरे पर्यंत इलाज केला जातो अशा जाहिराती वाचल्या आहेत पण त्या आकाराने आहेत त्यापेक्षा फार वाढु शकत नाहीत असे विज्ञान म्हणते. व त्यात सिलिकॉन बॅग्ज वगैरे घालुन आकार क्रुत्रीमपणे वाढवायचे फॅड अजुन आलेले नाहीये ;)

विनायक प्रभू's picture

2 Mar 2014 - 7:17 am | विनायक प्रभू

क्लर्क का बरे आठवला?
असो.
पैला प्रतिसादा साठी आणखी एक लेखक

यसवायजी's picture

2 Mar 2014 - 11:11 am | यसवायजी

गोष्टीचे नावः- "कुडीयोंको डाले दाना"
त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असे
हे सगळं अलंकारीक आहे. प्रतीकात्मक, रुपक आहे. त्याची एकही कोंबडी नव्हती म्हणजे त्याला गावातल्या पोरी भाव देत नव्हत्या. पण 'जब ऐसे चिकने चेहरे' पाहिले के तो आनंदी होत असे.

कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ.
आता दाणे टाकतोय म्हणजे, कुछ खो रहा है तो कुछ पाना पडेगा ना. मग रोज एकच कोंबडी. जी देत नाही तिचा राग यायचा. साहजीकच आहे ना. आखीर मै मनोजकुमार भी तो इन्सान हय. हय की नाही??

हे असे बरेच वर्ष चालु होते. कालांतराने त्याचे लग्न झाले. मग खरा प्रॉब्लेम झाला. त्याची भुक वाढतच गेली.
-
इतक्या सगळया कोंबड्या रोज एक अंडा देत आहेत मग मी फक्त एकच अंड का उचलतो?
…. त्याच्या जवळ ह्याचे उत्तर नव्हते

- :)) @ अंड - नो कमेंट्स. :))

बॅटमॅन's picture

2 Mar 2014 - 12:07 pm | बॅटमॅन

=)) हैट्ट =))

यसवायजीलाही कूटप्रश्न सोडवायचा छंद लागलासा दिसते =)) लगे रहो =))

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2014 - 12:27 pm | अत्रुप्त आत्मा

........................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif
@मग मी फक्त एकच अंड का उचलतो?
…. त्याच्या जवळ ह्याचे उत्तर नव्हते >>> अगा..आयायायायाया!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

यसवायजी's picture

2 Mar 2014 - 6:06 pm | यसवायजी

*ROFL* अश्लील.. अश्लील.. *ROFL*
a

मुक्त विहारि's picture

2 Mar 2014 - 12:41 pm | मुक्त विहारि

मस्त झक्कास.....

मनोजकुमार's picture

2 Mar 2014 - 9:31 pm | मनोजकुमार

लेखनविषय::

बालकथा

जेपी's picture

2 Mar 2014 - 12:02 pm | जेपी

टाळ्या .
यसवायजी ला ही आजकाल कुट सोडवण्याचा छंद लागला .

आदूबाळ's picture

2 Mar 2014 - 12:07 pm | आदूबाळ

a
@SYG :))

नंदू's picture

2 Mar 2014 - 12:48 pm | नंदू

mohite jeevan हा तुमचाच ID आहे का हो?

मनोजकुमार's picture

2 Mar 2014 - 9:30 pm | मनोजकुमार

नाही

मनोजकुमार's picture

2 Mar 2014 - 8:30 pm | मनोजकुमार

धन्यवाद

मृगजळाचे बांधकाम's picture

2 Mar 2014 - 11:04 pm | मृगजळाचे बांधकाम

कोंबडी आणि अंड्याचे वास्तव च एवढे दुर्बोध आहे त्याला लेखक काय करणार

शिर्षकात नाम सार्धम्य आणि आमच्या आवडत्या कोंबड्यांचा उल्लेख आल्याने अधिरतेने धागा उघडला.
पण कोंबड्यां ऐवजी पोपट झाला.
असो मोठ्या 'अंडा'साठी गावकर्‍यांनी शहामॄग पाळावा (म्हणजे गणपतच्या उपजिविकेचा प्रश्न सुटेल) असा फुकाचा सल्ला देऊन कोंबड्या शोधायला प्रयाण करतो.

मनोजकुमार's picture

3 Mar 2014 - 6:29 pm | मनोजकुमार

:-)

आयशप्पथ सांगतो मला पहिल्यांदा कवितेची ओळ वाटलेली.

"गणपत आणी कोंबड्या
पकडुनी त्यांच्या तंगड्या
घालावया लंगड्या
लावीतसे || "

इ.इ.

मनोजकुमार's picture

3 Mar 2014 - 6:30 pm | मनोजकुमार

:)