.......!

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
24 Feb 2014 - 3:53 am

कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा.
कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा,
माझ काळीज काढुन टांगल
तरी खुळं वाजवतय पावा.

कधी यायच भान म्हणते मी
कधी यायच भान म्हणते मी
पण सांग मला
त्यानंतर जीवंत असेन का रे मी?

कुठल्यातरी आशेवर
कुठल्यातरी आशेवर
पावल तरी उचलतात
दिसत नसली सुखं तरी
बळ वाढवुन जातात

नऊ महिन्याच वज्ज
नऊ महिन्याच वज्ज माय
शेजीच घर बघुन वाहते.
नऊ महिन्याच वज्ज माय शेजीच घर बघुन वाहते
काय ठाव तिला
काय ठाव तिला
त्या वज्ज्याचा नशिब
दगड करु पाहते.

कुठं हसु उमलत
कुठं हसु उमलत
साजरा मुखडा बघुन.
कुठं डोळं पाझरतात
काळजाच तुकडं होउन.

सगळ आतल्या आत
सगळ आतल्या आत
नुसत सोसायच
तमाशा होउ नये म्हणुन
आतल्या आत फाटायच

अस वाटत
अस वाट्त
द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं.
अस वाटत द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं
घ्यावा खुल्ला श्वास
सोडुन माणुस होण्याची लाज.

पण
पण पायाला लंगर
पण पायाला लंगर
समाजातल्या लांडग्यांचा
त्यांच फावल
त्यांच फावल
म्हणुन पदर सावरायचा डुईचा
म्हणुन पदर सावरायचा डुईचा.

__/\__
अपर्णा

समाज

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

24 Feb 2014 - 8:16 am | खटपट्या

सुन्दर

मुक्त विहारि's picture

24 Feb 2014 - 8:31 am | मुक्त विहारि

कुठेतरी आत पार काळजाला भिडलं

पैसा's picture

24 Feb 2014 - 9:02 am | पैसा

बहिणाबाईंची आठवण झाली. आणि अगदी एक्झॅक्ट संबंधित नाही, पण "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" याचीही.

प्रचेतस's picture

24 Feb 2014 - 9:05 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंय अगदी.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2014 - 11:34 am | अत्रुप्त आत्मा

+१

लीलाधर's picture

24 Feb 2014 - 9:39 am | लीलाधर

आवडेश बरं का छाण छाण

अजया's picture

24 Feb 2014 - 10:02 am | अजया

छान कविता. :(

यशोधरा's picture

24 Feb 2014 - 10:07 am | यशोधरा

सुरेख!

सस्नेह's picture

24 Feb 2014 - 10:11 am | सस्नेह

काळजात कळ आली.
'....' का ?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Feb 2014 - 10:36 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अपर्णातै ____/\____!!

अभ्या..'s picture

24 Feb 2014 - 10:52 am | अभ्या..

अप्पुतै भारी है.
एकदम भारी लिवलय. आवाडल. :)

मदनबाण's picture

24 Feb 2014 - 10:55 am | मदनबाण

____/\____

सुहास झेले's picture

24 Feb 2014 - 11:12 am | सुहास झेले

सुन्न !!

इरसाल's picture

24 Feb 2014 - 11:12 am | इरसाल

सुंदर.

जेपी's picture

24 Feb 2014 - 11:35 am | जेपी

.

यसवायजी's picture

24 Feb 2014 - 12:06 pm | यसवायजी

.....!
मस्त....!

..........
जाताजाता- बर्‍याच शब्दांवर . द्यायचे र्‍हायलेत. तेवढं बघा की जरा. वाचताना त्रास होतोय.

कशाचा तमाशा होइल ठावं नाही

अगदी खरं ..
मर्मस्पर्शी कविता!

झ्याक लिवलंयसा. आसंच लिवत र्‍हावा !! :)

आतिवास's picture

24 Feb 2014 - 7:09 pm | आतिवास

टोचणारी कविता :-(

धन्या's picture

24 Feb 2014 - 7:11 pm | धन्या

सुंदर कविता !!!

भाषेचा लहेजा विदर्भातील विशेषतः अमरावती भागातील वाटतो.

सुहास..'s picture

24 Feb 2014 - 7:17 pm | सुहास..

खरच ! टोचणारी ..

धर्मराजमुटके's picture

24 Feb 2014 - 7:27 pm | धर्मराजमुटके

कवितेचं शीर्षक भलतेच आवडले आहे.
मुक्तछंदातील ही कविता आणि तिचे शीर्षक यातुन कवयित्रीने वाचकांना आपल्या मनाप्रमाणे अर्थ काढण्याची मुभा दिलेली आहे.
कवितेचंं कडवं १, ४, ५, ७ आणी ८ हे ग्रामीण ढंगात आणि २ आणि ३ प्रमाण भाषेत हे कवितेतल्या नायिकेची द्विधा मनःस्थिती दर्शवितात.
त्याच त्याच शब्दांची वेगवेगळ्या ओळीमधे पुनराव्रुत्ती करुन कवयित्रीने कमीतकमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ॑ सांगीतला आहे.

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 2:56 am | स्पंदना

मी माझ्या धाग्यावर अजिबात प्रतिसाद देत नाही, तरीही आज विचारते "सुचतय एखाद शिर्षक?" समर्पक असं? कडव नं.२ तुम्हाला प्रमाण भाषेत वाटु शकत, कारण ते माझ मन आहे,पण बाकी सगळी तिच्याच भाषेत आहेत. पुनरावृत्ती ही घडत गेली. मनाचा गुंता दर्शवत गेली. ही रचलेली कविता नव्हे. अन हे कल्पिलेलं वास्तव नाही,
कविता घडते. जन्मते. तिला साधारण साफ सफाई ठिक आहे,पण अगदीच बांधत बसलात तर ती कलाकृती घडते, कविता नव्हे.
या कवितेला शिर्षक द्यायची माझी हिम्मत नाही. कुणाच्या फाटल्या भावनेला नाव द्यायचा माझा अधिकार नाही.
तरीही तुमचे धन्यवाद.

आनन्दिता's picture

24 Feb 2014 - 8:44 pm | आनन्दिता

असलं का लिहितेस गं.. :(

मधुरा देशपांडे's picture

24 Feb 2014 - 9:39 pm | मधुरा देशपांडे

सुंदर

किसन शिंदे's picture

25 Feb 2014 - 2:31 am | किसन शिंदे

लिहीलं कसंही असलं तरी विषय 'नेमका' मांडलाय, त्यामुळेच त्यातला अर्थ नेमका आतपर्यंत जावून पोचतो. :)

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 2:58 am | स्पंदना

धन्यवाद.

मिका कोठे आहात?

चाणक्य's picture

13 Apr 2014 - 2:03 pm | चाणक्य

शेवटचं कडवं अंगावर आलं अगदी. नेमकं मांडलयत तुम्ही अपर्णा

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Apr 2014 - 2:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

अस वाटत द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं
घ्यावा खुल्ला श्वास
सोडुन माणुस होण्याची लाज.

समाजात राहुन मोकळा श्वास घ्यायला कधी मिळतच नाही. समाजात वावरणे आणि २४ X ७ कॅमेर्‍या समोर रहाणे यात काहीच फरक नाही. काहिही केल / झाल तरी त्याची बातमी आणि मग त्या बातमीवर चर्चा.

खरं/ खोट, चुक/बरोबर, चांगल/वाईट, काळं/पांढर अशी प्रत्येक कृतीची विभागणी होते.

जीव नुसता गुदमरुन जातो.

चालायचाच समाजात रहायच तर समुहाचे नियम पाळावेच लागतात.

पण कधी तरी मोकळा श्वास घ्यावासा वाटतो खरा.

नगरीनिरंजन's picture

13 Apr 2014 - 2:41 pm | नगरीनिरंजन

फारच हृदयस्पर्शी आहे. ओळींच्या द्विरुक्तींमुळे तिचा आकांत आणि असहाय्यता दोन्हीही अधोरेखित होतात.
मस्तच!

प्रीत-मोहर's picture

13 Apr 2014 - 4:34 pm | प्रीत-मोहर

__/\__

त्रिवेणी's picture

13 Apr 2014 - 6:27 pm | त्रिवेणी

कवितेच नाव ओझं कस वाटेल?
कारण खरच बरेचदा आपण कसले ना कसले ओझ बाळगत असतो.

शुचि's picture

13 Apr 2014 - 8:46 pm | शुचि

_/\_ :(

drsunilahirrao's picture

15 Apr 2014 - 4:50 pm | drsunilahirrao

ग्रेट !

सखी's picture

15 Apr 2014 - 9:20 pm | सखी

सुरेख लिहील आहेस, वेदना आत जाऊन भिडते.

पुणे तिथे काय उणे's picture

16 Apr 2014 - 5:10 pm | पुणे तिथे काय उणे

खरच. कधि कधि अस वाटत नको तो समाज, नको ति मानस, नको तो सन्सार. बास आपण आपल एकट असाव.जगतना नसेल कोणी कदचित बरोबर पण मेल्यावर ही रडणारे फारसे नस्तिल ना.