आरोग्यवर्धक पा. क्रु. क्रमांक ३ .... तंबीटाचे लाडू......

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
17 Feb 2014 - 5:22 pm

कालच मी सीकेपी खाद्य जत्रेला गेलो होतो.त्याचा व्रुत्तांत मिपावर टाकला.नेहमीप्रमाणे तो बायकोने वाचला.ती मुलतः कर्नाटकातली तर मी मराठी मातीतला.आपला नवरा कर्नाटकी प्रेमीच असावा, ह्यासाठी ती अधून-मधून तंबीटाचे लाडू,सुसला तर करत असतेच शिवाय चटणी पुडी,चित्रान्ना,बिशी बेळी भात हे पण होत असतेच.मी व्रुत्तांत लिहीत असतांनाच स्वैपाक घरातून किसणीचा आवाज ऐकला.भर दुपारी आपली बायको, काय किसत आहे? हे बघावे म्हणून गेलो तर, बायकोने गूळ चिरून ठेवलेला आणि खोबरे पण किसून तयार होते.

तिला विचारले, काय करतेस?

तर म्हणाली, तंबीटाचे लाडू.

मी म्हणालो, मग ठीक आहे.मला वाटले, तू काय कानोले वगैरे बनवतेस की काय?

ती म्हणाली, मी कशाला कानोले वगैरे बनवू? त्यापेक्षा तुम्हीच एखादी कानोले बनवणारी स्वैपाकीण शोधा.

(आमची बायको, मिपाचे कट्टा व्रुत्तांत वाचते, आणि त्यातील मौलिक माहिती, कधी कधी वदते.)

मी म्हणालो, ठीक आहे.मग तू ही रेसीपी टाक आपल्या मिपावर.

ती म्हणाली, हे असले धागे काढायचा शौक तुम्हाला.मी इतक्यात काही लिहीणार नाही मिपावर.

आता बायकोने नकार दिल्यामुळे ही तंबीटाच्या लाडवाची पा.क्रु. लिहायची जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागली.काय करणार?

तर ते असो....

आता प्रथम साहित्य.

२ वाट्या डाळं भाजून घ्या.

१ वाटी खोबर्‍याचा कीस, अरे हो, सुक्या खोबर्‍याचाच कीस.

३ चमचे तीळ

१ चमचा खसखस

५ चमचे तूप

गूळ चवी नुसार.

पाव चमचा वेलदोडा पूड

,

,

,

क्रुती:

प्रथम डाळ भाजून घ्या.ते मिक्सरमध्ये घाला.लगेच पुड करायला घेवू नका.आता मंद गॅस वर खोबरे भाजून ताटलीत काढा.मग तीळ भाजून घ्या.आणि तो पण ताटलीत काढून घ्या.गॅस बंद करा.आता त्याच कढईत ५ चमचे तूप घाला आणि किसलेला गूळ घाला.

आणि आता डाळ्याची पूड करा.तोपर्यंत कढईतला गूळ आणि तूप थोडे विरघळले असेल.

,

,

गूळ जर विरघळलेला नसेल, तर थोडा वेळ मंद गॅस वर ठेवून गूळ विरघळवून घ्या.पाक करू नका.

,

आता ह्या विरघलेल्या गूळात डाळ्याचे पीठ्,खोबर्‍याचा कीस्,तीळ, खसखस आणि वेलदोडा पूड टाका.

,

आणि उलथन्याने थोडे हलवून सारखे करून घ्या.

,

तापमान थोडे आटोक्यात आले, की, सरळ हाताने मळून घ्या आणि लाडू वळायला घ्या.लाडवाचा आकार थोडा मध्यभागी खोलगट ठेवा.

,

कर्नाटकांत हे लाडू नागपंचमीला करतात.

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

17 Feb 2014 - 5:29 pm | कवितानागेश

कॉलिंग गवि. :)

रेवतीआज्जी केव्हाची रेशिपी देईन देईन म्हणत होती. बरं झालं तुम्हीच दिलीत ती !! ;)

बा द वे, हे लाडू खोलगट का ठेवायचे म्हणे?

त्यावर तुपाची धार धरायची णी खायचे

इरसाल's picture

17 Feb 2014 - 5:48 pm | इरसाल

बाकी ही तुमची "सितारा" रेसेपी आहे.

जेपी's picture

17 Feb 2014 - 6:05 pm | जेपी

पाक्रु आवडली .
पणा डाळं मंजे डाळव/दाळव का ? नसल्यास कोणची डाळ .

अवांतर -हरभर्याचे फुटाणे केल्यावर त्यामध्ये जे असत त्याला दाळव मणतात .

गणपा's picture

17 Feb 2014 - 6:13 pm | गणपा

हेच का ते रेवाक्काचे सुप्रसिद्ध लाडू.
धंस हो मुवि.

सानिकास्वप्निल's picture

17 Feb 2014 - 6:20 pm | सानिकास्वप्निल

आली आली तंबीट लाडवांची पाकृ आली :)
पाकृ +१

प्यारे१'s picture

17 Feb 2014 - 6:35 pm | प्यारे१

आता बाळाचा कान फुटायचा....... नाही! ;)

सुहास झेले's picture

17 Feb 2014 - 6:38 pm | सुहास झेले

व्वा व्वा.. लगे रहो :)

दिपक.कुवेत's picture

17 Feb 2014 - 6:51 pm | दिपक.कुवेत

मुविंची गाडि अगदि "डोंबिवली फास्ट" प्रमाणे निघाली आहे......

स्वाती दिनेश's picture

17 Feb 2014 - 6:56 pm | स्वाती दिनेश

मस्त..
(तम्बीटाचे लाडू माझे फेव्हरेट..)
स्वाती

गवि's picture

17 Feb 2014 - 8:31 pm | गवि

वा वा वा वा..

आले का तंबिटलाडू..

दिलातच फुटला हा लाडू एकदम.

धन्यवाद रेव..अम.. मुवि.. ;)

सस्नेह's picture

17 Feb 2014 - 9:11 pm | सस्नेह

बहुधा यात गव्हाचे पीठ पण घालतात. पौष्टिक म्हणून..

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2014 - 9:50 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/content-and-happy-smiley-emoticon.gif

तम् लड्डू BEET ME =))

अजया's picture

17 Feb 2014 - 9:53 pm | अजया

मस्त पा. कृ.!

देवाऽऽऽ! किती दिवसांनी पावलास! ;) तंबिटाचे वेगळ्या पद्ध्तीचे लाडू छान दिसतायत.
इथे येऊन 'हुश्श्य!' असे म्हणणार होते पण आमच्याकडे तांदळाचे लाडू असतात व त्याबरोबर तिळाचा लाडू असतोच लहानसा! लाडूंचा आकार अगदी अस्स्साच करून त्या खळग्यात तिळाचा लाडू ठेवून तीळ, तंबीटाची जोडी प्रसादाची म्हणून वाटायची असते. अभीभी म्येरा काम बाकीच है अयसा दिखताय.

सानिकास्वप्निल's picture

17 Feb 2014 - 10:46 pm | सानिकास्वप्निल

अभी और टाईम मत लगावो... रेवती स्पे तंबिट लाडूची पाकृ लवकर आने दो.

उसकेलिये ठराविक तांदूळ और भारतीय मिक्सर होनेकु मंगताय ना! एकदा ट्राय मारेला था, जम्या नै!

मिक्सर होनेकु मंगताय ..
ट्राय मारेला था..
जम्या नै..

काय गं तुमची ही भाषा. सिनेमाचे परिणाम सगळे.

ते काही नाही. उद्या सरळ सार्वजनिक वाचनालयात जायचं आणि ह.ना. धांदरफळेनी लिहीलेलं पुस्तक घेऊन यायचं.

"सिनेमा - एक शाप."

मुक्त विहारि's picture

18 Feb 2014 - 12:01 pm | मुक्त विहारि

व्यक्ती तितक्या व्रुत्ती

आणि

व्यक्ती तितक्या पाक-क्रुती

साधी पुरणपोळी देखील विविध प्रकारे बनवली जाते आणि तितक्याच विविध प्रकारे खाल्ल्या जाते.मग त्या बचार्‍या लाडवांनी तरी काय घोडे मारले आहे?

आमच्या कडे डाळ्याचे पीठ वापरून लाडू केल्या जातात.तर तुमच्या कडे तांदूळाचे पीठ वापरुन.

त्यामुळे, तुमच्या लाडवांची पण क्रुती येवू द्यांत.

वाटल्यास तुम्ही क्रुती द्या. आम्ही करून बघतो.

ऋषिकेश's picture

18 Feb 2014 - 12:08 pm | ऋषिकेश

वा वा वा! आभार!

आजच करुन पाह्यले. फोटु डकवत आहे. फक्त ह्यात तूप जरा उजव्या हातानं घातलंय वळायला त्रास नको म्हणून.

मुक्त विहारि's picture

19 Feb 2014 - 1:36 pm | मुक्त विहारि

आणि मुख्यत: थकवा पळाला का?

तूप, गूळ आणि डाळं अधिक खसखस,खोबरे आणि तीळ असल्याने कष्टकरी जनतेसाठी हे लाडू बेस्ट.

उगाच ते आपले मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्यापेक्षा, हे असले पदार्थ खावेत.

त्रिवेणी's picture

19 Feb 2014 - 1:26 pm | त्रिवेणी

आता चटणी पुडीची रेसिपी फोटोसहित येवु द्या. मला खुप दिवसांपासून हवी आहे.

मुक्त विहारि's picture

19 Feb 2014 - 1:38 pm | मुक्त विहारि

मला पण ही चटणी शिकायची आहेच.

मुहुर्त मिळाला की टाकतो.

मुवि,

झकास पा.क्रु., शिल्लक असतिल तर उद्याच भेटु म्हणतोय. ???

पैसा's picture

23 Feb 2014 - 3:50 pm | पैसा

वेगळीच पाकृ! मला तंबिटाचे लाडू म्हणजे तांदुळाच्या पिठाचे माहिती होते.