एम अँड दी बिग हूम

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
11 Feb 2014 - 9:44 am

em

ही आहे एक इंग्रजी कादंबरी.
लेखनाचा ढाचा कादंबरीचा आहे म्हणून कादंबरी म्हणायची. नाही तर हे लेखकाचं आत्मचरीत्र तर नव्हे अशी शंका यावी ईतकं प्रत्ययकारी लेखन आहे हे.
५० किंवा ६० च्या दशकात मुंबईच्या माहीम भागात वन बिएचके फ्लॅटमध्ये राहणार्‍या एका ख्रिश्चन चौकोनी कुटुंबाची ही गोष्ट.
कादंबरीच्या निनावी निवेदकाने सांगितलेली आपल्या मुळच्या गोव्याच्या कॅथॉलिक कुटुंबाची गोष्ट, ज्यामध्ये तो त्याची आई एम, त्याचे बाबा ज्यांना तो "बिग हूम" म्हणतो आणि त्याची मोठी बहिण सुझान यांच्याबद्दल सांगतो.
खरं तर ही निवेदकाच्या आईची, एमचीच गोष्ट आहे. ईतर पात्रे तिच्या अवतीभोवती फीरतात. नव्हे, त्यांना फीरावं लागतं.
सतत विडी ओढणार्‍या, चहा पिणार्‍या एमला निवेदकाच्या जन्मानंतर नैराश्य येते, ज्याला ती "कुणीतरी नळ सोडला" म्हणते. या नैराश्याचे रुपांतर हळूहळू द्विधृव व्यक्तीमत्व विकृतीमध्ये (बायपोलार पर्सनॅलिटी डिसऑर्डर) होते.
द्विधृव व्यक्तीमत्व विकृती ही मानसशात्रीय संज्ञा आहे. इंग्रजीत समजेल अशा शब्दांत सांगायचं तर मुड स्विंग्ज. या विकृतीने ग्रासलेला माणूस कधी खुप उत्साही, प्रफुल्लित असतो तर कधी तिव्र निराशेच्या गर्तेत जातो. बेबंद वागतो.
एमचंही असंच असतं. जेव्हा ती उत्साहीत असते तेव्हा ती तिच्या मुलांना जीवनविषयक तत्वज्ञान शिकवत असते, मानवी शरीरसंबंधांबद्दल मोकळ्या-ढाकळ्या शब्दांत बोलत असते. मात्र जेव्हा निराशा तिला घेरते तेव्हा ती इतकी टोकाला जाते की मनगटावरची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावे लागते.
एमचं हे असं असणं सार्‍या घराने स्विकारलेलं असतं. मात्र निवेदक जसा जसा मोठा होऊ लागतो तशी तशी "आपण आईपर्यंत पोहचू शकत नाही." ही जाणिव तिव्र होऊ लागते. तो अधिक अधिक आईला, तिच्या बदलणार्‍या अनाकलनीय वागण्याला समजून घेण्याचा प्रयत्न करु लागतो.
हा शोध चालू असतानाच निवेदकाच्या हाती आईची डायरी लागते, ज्यामध्ये तिच्या अगदी शाळेच्या दिवसांपंसूनच्या नोंदी असतात.
या नोंदींची आईशीच चर्चा करत तो आईचं व्यक्तिमत्व उलगडू लागतो.
या डायरीमधील नोंदींतून निवेदक इमेल्डा अर्थात त्याची आई एम आणि त्याचे बाबा ऑगस्टीन ज्यांना सुझान आणि त्याने त्यांच्या बरेच वेळा पुर्ण उत्तर न देता केवळ "हूम" म्हणण्याच्या सवयीमुळे "बिग हूम" असे नाव ठेवलेले असते त्या दोघांची प्रेम कहाणी सांगत जातो.
शाळा संपल्यानंतर कॉलेजचं शिक्षण परवडू शकत नसल्यामुळे आधी शिक्षिकेची नोकरी करुन नंतर एका इंजिनीयरींग गुड्स कंपनीत स्टेनोग्राफर म्हणून लागलेल्या ईमेल्डाची ऑगस्टीन नावाच्या एका तरुण मॅनेजरशी ओळख होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात होते. जवळपास बारा वर्षे प्रणयाराधन केल्यानंतर ते लग्न करतात.
अशी काहीशी ही प्रेमकहाणी.
त्यानंतर सुझानचा जन्म. सुझानच्या जन्मानंतरचा निवेदकाचा जन्म. आणि त्यानंतर "त्यांनी" हळूहळू ईमेल्डाला घाबरवणं.
एमची ही अवस्था मुलांनी आणि बिग हूमने स्विकारुन एमला समजून, सांभाळून घेणं, या सार्‍या प्रवासाची ओघवत्या भाषेत मांडणी म्हणजे "एम अँड दी बिग हूम".

घरात कुणी मानसिक विकृतीने ग्रस्त असेल तर सारे घर त्या व्यक्ती भोवती, त्या मानसिक व्याधीभोवती फिरु लागते. मात्र या गोष्टीचा बाऊ न करता परिस्थितीचा स्विकार करुन, त्या व्यक्तीला समजून, सांभाळून घेत, तिला पुरेसा आधार देत आपली आयुष्ये कशी जगावीत याचं सुंदर चित्रण या कादंबरीत आहे.

एम अँड दी बिग हूम
पृष्ठ संख्या: २३५
प्रकाशकः अलेफ बुक कंपनी
फ्लिपकार्टवरील सध्याची किंमत : रु २२१ + टपालखर्च रु. ४०
लेखकाचे संकेतस्थळः जेरी पिंटो डॉट कॉम
गुड रीड्स डॉट कॉम रीव्ह्यू

जीवनमानआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

11 Feb 2014 - 9:51 am | आत्मशून्य

पण हे फार वाचु नका...! वाचलेल्या विशयांच्या कल्पनेत जगायला होतं मग... अन मग आपले समज इतरांवर लादावेसे वाटु लागतात. अभ्यास म्हणून उत्तम आहे.

पुस्तकातिल पात्रे वास्तवात उतरली असा ध्रुड समज निर्माण होण्याचा धोका प्रचंड बळावतो...!

थोड्सं अवांतर पण विषयाला अनुसरुन एक मत विचारतो. आपला आभ्यास फार सुरेख आहे म्हणुनच. मानसशास्त्र प्रत्यक्ष मानवी मनाचे अस्तित्व मानत नाही हे आपणास माहित आहे काय ?

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2014 - 10:24 am | अत्रुप्त आत्मा

@मानसशास्त्र प्रत्यक्ष मानवी मनाचे अस्तित्व मानत नाही हे आपणास माहित आहे काय ?>>> बाप रे!!! हे माहित नव्हतं.खरच अस आहे काय? :)

पुर्वीच्या काळी सर्व गोश्टी या श्रध्देवर असत म्हणुन त्याच्या अभ्यासाला/लिखाणाला धर्म चिकटला होता मग ती समागम क्रिया असो की अर्थशास्त्र, व्यापार, युध्दे वा आरोग्यविषयक ज्ञान असो. सगळ्या ज्ञानशाखा विवेचनात धर्म घुसलेला दिसेल.

परंतु जेव्हां लोकांमधे (अर्थातच पश्चिम) विज्ञानवादी द्रुश्टीकोनाचा उदय झाला. पण विज्ञान म्हणजे काय तर एखादी गोश्टी पुन्हा पुन्हा त्याच पध्दतीने सिध्द करता येणे/होणे/ पुरावा असणे. तेंव्हा विचारवंताचे (वैज्ञानीक द्रुश्टीक बाळगणारे शास्त्रज्ञ) पहिले मत हे होते की जी गोश्ट सिध्द करता येते तिलाच विज्ञानाच्या द्रुश्टीकोनातुन अस्तित्व आहे म्हटले पाहिजे. म्हणून विज्ञान प्रत्येक गोश्टीच्या पुराव्याचा पाठपुरावा करते.

म्हणूनच जेंव्हा मानसशास्त्र विकसीत होउ लागले तेव्हां सर्वात पहिली अडचण हीच उभी राहिली की मनाचे अस्तित्व (मेंदु न्हवे) कुठे दिसत नाही. त्याकाळी अगदी पार जिवंत लोकांची डोकी फोडुन मन हुडकायचा प्रयत्न केला गेला. व शेवटी पुरावा उभा करता न आल्याने मन अस्तित्वात नाही हे मान्य केले गेले, कारण ते दाखवता येत नाही. थोडक्यात मनाचे अस्तित्व हा प्रत्येकाचा एक वैयक्तीक अनुभव उरतो म्हणून विज्ञान त्याला मान्यता देउ शकत नाही. ज्या लोकांनी या शास्त्राचा कथा कादंबर्‍या चित्रपट विकीपेडीया यापलीकडे जाउन अभ्यासक्रम म्हणून सखोल अभ्यास केलेला आहे त्यांना तर हे आधिच माहित आहे.

ह्म्म! मग मानसशास्त्रात अभ्यासले काय जाते ..? उत्सुकता असेल तर नक्किच सांगेन. तो पर्यंत आपणही थोडा तर्क लढवा :)

"उत्सुकता असेल तर नक्किच सांगेन."

जरूर सांगा,

कारण उत्सुकता आहे.

तर्क लढवत नाही, कारण बर्‍याच वेळा आपण चुकीचा तर्क निवडतो आणि अहंमन्यतेमुळे आपलाच तर्क कसा बरोबर आहे, ह्यावर अनावश्यक काथ्याकूट करत बसतो.

कोर्‍या पाटीवर अक्षरे छान उमटतात.

मुक्त विहारि's picture

11 Feb 2014 - 9:53 am | मुक्त विहारि

करून दिलीत...

धन्यवाद....

हे असे काही तरी जगावेगळे वाचायला मिळते, हीच मिपाची शान आहे.

खटपट्या's picture

11 Feb 2014 - 10:07 am | खटपट्या

मराठी अनुवाद मिळेल का कुठे ?

शक्यता कमी आहे. कुठे आढळल्यास नक्की सांगेन. वाचायची इच्छा असेल तर इंग्रजीतच वाचा. भाषा समजायला खुपच सोपी आणि ओघवती आहे.

लेखक मुंबईचा असल्याने हिंदी आणि मराठी शब्द अधून मधून कादंबरीत डोकावत राहतात.

बॅटमॅन's picture

11 Feb 2014 - 12:45 pm | बॅटमॅन

रोचक पुस्तक दिसतंय!! यावच्छक्य अवश्य वाचेन!

विजुभाऊ's picture

11 Feb 2014 - 10:28 pm | विजुभाऊ

अल्बर्ट कामू चे " द आउटसायडर" वाचा. http://en.wikipedia.org/wiki/The_Stranger_%28novel%29
सगळे समज गैरसमज जमिनीवर येतील

सगळे समज गैरसमज जमिनीवर येतील

कुणाचे आणि कसले गैरसमज?

स्वतःबद्दलचे समज अन गैरसमज.
आपण " स्व " ला केंद्रीत करुन जग बघत असतो. "द आउटसायडर" वाचल्या नंतर एकुणच स्वतःकडे आणि जगाकडे पहायचा दृष्टीकोन बराच बदलतो

धन्या's picture

12 Feb 2014 - 10:26 am | धन्या

फ्लिपकार्टवर आहे ही कादंबरी.
ते पाचशे रुपयांपेक्षा कमी खरेदीला टपालखर्च घेतात त्यामुळे सध्या खरेदी गाडीत ठेवून दिली आहे. :)

प्रचेतस's picture

11 Feb 2014 - 10:56 pm | प्रचेतस

छान परिचय रे धन्या.
ते आनंद जातेगावकरांच्या "व्यासांचा वारसा' ह्या पुस्तकावरही लिही रे.

मदनबाण's picture

12 Feb 2014 - 4:06 am | मदनबाण

पुस्तकाची ओळख आवडली...
उगाच रात्र आरंभ या चित्रपटाची आठवण "मनात" आली. ;)

स्पंदना's picture

12 Feb 2014 - 4:35 am | स्पंदना

सुरेख ओळख.
पुस्तक मिळाल तर नक्कीच वाचेन. (नाही मिळवुन वाचेन)

अर्धवटराव's picture

12 Feb 2014 - 6:10 am | अर्धवटराव

पुस्तक मिळवुन वाचावं लागेल.
मस्त झाला पुस्तक परिचय.

धन्या, उधार उसनवारीवर मिळेल का हे पुस्तक?

पैसा's picture

13 Feb 2014 - 10:03 pm | पैसा

वेगळ्या विषयावरील पुस्तकाची सुरेख ओळख.