कान्हा नॅशनल पार्क - वाघ....... (भाग ४)

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
31 Jan 2014 - 2:01 pm

कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)
कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २)
कान्हा नॅशनल पार्क - काय पहावे (भाग ३)

आज आम्ही खुप काही पाहिलं होतं..अनुभवलं होतं.. पहिल्यांदाच जंगलात फिरलो होतो.. एक अविस्मरणीय अनुभव घेतला होता.. पण.......
.... पण कान्हा मध्ये वाघ पहायची शक्यता मी आणि माझ्या नवर्‍यापुरती तरी संपली होती...

...हिरमुसुन परतलो.. कितीही नाही म्हणलं तरी मला वाघ पहायचा होताच हे मला स्पष्ट जाणवलं होतं..माझे डोळे जागोजागी काळे-पिवळे पट्टे शोधत होते..कान आजुबाजुच्या आवांजाचा वेध घेत होते..जीवच सगळा त्या वाघात गुंतुन गेला होता..कान्हाच हेच एक फार वाईट आहे..जिकडे तिकडे फक्त वाघाचीच चर्चा..वाघाचा गंध कान्हाच्या हवेत मिसळलाय..कान्हाच्या शांततेमध्ये त्याचा धाक आहे..लोकांच्या कुजबुजीमधुन त्याचं गुरुगुरणं ऐकु येतं...

...इतकी दगदग..शाररिक आणि मानसिक..सगळेच दमुन गेले होते..हॉटेलवर परत येऊन आधी जेवणावर तुटुन पडले आणि मग मेल्या सारखे झोपुन गेले..तो दिवस असाच आळसावलेला..गप्पा टप्पा करत घालवला..

दुसर्‍या दिवशी पहाटेच सगळे सफारीला निघुन गेले..आजची सफारी कान्हा ह्या प्रिमियम झोनची होती..त्यातही एक वाघीण तिथे कुरणांच्या आजुबाजुला फिरतेय असं कळालं होतं..पुन्हा सगळे आशाबद्ध वाघाच्या मागे जंगलात ओढले गेले..

मी आणि नवरा वाट पहात बसलो..जस जशी त्यांची परत यायची वेळ झाली तसं तसं मला अस्वस्थ वाटायला लागलं.. शेवटी अगदीच वेळ जाईना म्हणुन अंघोळीला गेले..आणि तितक्यात सगळे ओरडत ओरडत आले.."वाघ दिसला..वाघ दिसला"...माझ्या पोटात उगाचच खड्डा पडला..

"अरे वा..चला आम्हाला नाही, पण तुम्हाला तरी दिसला..बरं झालं".. मी ही बाथरुम मधुन ओरडले

मी असं बोलले खरं..पण आतुन मला खुप वाईट वाटत होत..मागचा एक महिना मी उठता बसता कान्हाचा विचार केला होता..कुठे तरी अशी भाबडी आशा होती की मी एवढं केलं सगळ्यांसाठी..धावपळ करुन..मला वाघ दिसणार..नव्हे दिसलाच पाहिजे. जणु काही मी माझ्या कष्टाची किंमत मागत होते..! खर तर मला एकच सफारी करायला मिळणार होती हे मलाही माहित होतं..त्यामुळे त्यात जर मला वाघ दिसला नाही तर मग दुसर्‍या सफारीत बाकीच्यांना वाघ दिसला काय किंवा नाही काय.. मला काय फरक पडत होता? पण तरीही.. मी बाथरुममध्ये बसुन होते.. आणि माझ्या डोळ्यातुन घळघळ पाणी वहात होतं...

माझं मलाही कळेना की मला कशाचं नक्की एवढं वाईट वाटतय..मला आजही ते काळालं नाहीये..पण मी खुप खुप रडले हे मात्र खरं..

बराच वेळानी बाहेर आले..बाकीच्यांवर फणफण करुन घेतली. जणु काही मला वाघ दिसला नाही आणि त्यांना दिसला हा त्यांचा दोष होता..माझे सुजलेले डोळे पाहुन दादा कसल्या तरी इराद्याने हॉटेलच्या मॅनेजरकडे गेला..इकडे माझं हिडीस फिडीस करणं चालुच होतं..तेवढ्यात पाहिलं..ज्या नवर्‍याला वाघ दिसावा म्हणुन मी इतकी मरमर केली, तो आनंदात अबीर सोबत खेळत होता.. त्यानी माझ्याकडे एकदा "ही बै डोक्यावर पडलीये का?" असं कटाक्ष टाक्ला आणि पुन्हा बागडत निघुन गेला..तो आनंदात होता..आणि त्याच्या आनंदासाठी त्याला "वाघ" दिसण्याची गरज नव्हतीच..तो त्या वातावरणातच आनंदात होता.. मीच उगाच वाघ दिसण्याला एवढं महत्व देत होते..

लाज वाटली एकदम स्वतःची.. मला नाही दिसला आणि इतरांना दिसला म्हणुन इतका त्रागा केला मी??? डोक्यात आलेले सगळे फालतु, स्वार्थी, वेडसर विचार झटकले.. बहीणीला म्हणलं चला.. आता येउ द्या सविस्तर ष्टोरी..

तर झालं असं.. की सकाळी ६ - ६.३० च्या सुमारास आमचं भ्रमण मंडळ जंगलात घुसलं.. काल प्रमाणेच प्रसन्न वातावरण.. सगळे खुश.. आज गाईड म्हणुन एक तिथलीच गावातील रहिवासी तरुण मुलगी सोबत होती.. ती मात्र अगदीच शांत.. कालचा गाईड आम्हाला बरीच माहिती देत होता.. पण ही मात्र विचारुनही फारशी बोलत नव्हती.. "आज काय वाघ दिसत नाही" अशी समजुन करुन घेउन लोक सिन्सिअरली जंगल पाहु लागले.. गाडी मुक्की झोन मधुन कान्हा झोन मध्ये शिरली..मुख्य रस्त्यावर एका ठिकाणी हरणांचा कळप उभा होता..

Harin

त्यांचे फोटो काढु म्हणुन गाडी थांबवली.. तर ते अचानक पळत सुटले..

"बाघ..." ती तरूण मुलगी अत्यंत सावधपणे बोलली...

मगाशी बाकीच्यांना नुसती हरणं दिसली होती..पण ह्या गावकरी पोरीनी हरणांच्या चेहर्‍यावरची भीती बरोब्बर टिपली होती..

आता वातावरण बदलेलं सगळ्यांनाच जाणवलं.. माकडांचे चित्कार ऐकु येऊ लागले..पक्ष्यांचा किलबिलाट आता मंजुळ न वाटता भेदरलेला वाटत होता..

एवढ्यात वाघ दबक्या पावलानी येताना दिसला..आता मात्र सगळ्यांचेच श्वास रोखले गेले..

Vagh

अर्थातच तो त्या हरणांसाठी दबा धरुन बसला होता.. अचानक आमची गाडी आल्याने हरणं पळुन गेली.. पण हरणांच्या डोळ्याच्या तेवढ्या पुसटश्या झलकी मध्येही त्या पोरीला वाघाचं अस्तित्व जाणवलं होतं..

"ती बच्ची आहे वाघाची.." गाईड पुटपुटली..

इतका वेळ भान हरपुन वाघाला पहात असणार्‍या मंडळींना आपल्या कडे कॅमेरे आहेत ह्याची आठवण झाली..आणि सेटींग्स वगैरे चा विचार न करता जोरदार क्लिकक्लिकाट सुरू झाला..

अजुन दोन मिनिटानी जर गाडी तिथे आली असती तर कदाचित त्या वाघिणीनं एका तरी हरणाला पकडलं असतच..

Vagh 2

पण गाडीच्या असण्याने हरणं आधीच थोडे सावध होते..तिच्या पंजात सापडायच्या आधीच ते पळुन गेले..एक वाघाचं पिल्लु फिरत होतं तर सगळ्या जंगलानी श्वास रोखला होता..हरणं तर पळुन गेली..पण लोक्स मात्र तिथेच थिजुन हे सगळं पहात होते..

हरणांच्या दिशेनी जाऊन वाघीण बराच वेळ फिरत राहिली..पण शेवटी मागे फिरली..

vagh 3

इकडे तिकडे घोटाळुन अचानक रस्त्यात येऊन बसली..

vagh 5

आणि मध्येच डोळे रोखुन गाडीकडे पाहु लागली.. तेव्हा सगळ्यांची ट्युब पेटली.. भुकेली वाघीण.. सावज निसटलं.. कुणामुळे? समोर ६-८ घाबरलेली माणसं दिसतायत ना..त्यांच्यामुळे.. खावं का ह्यांनाच?!

vagh 6

तेवढ्यात पलीकडुनही एक गाडी आली.. त्यांनी मात्र जंगलाचे नियम धाब्यावर बसवुन गाडी वाघिणीच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा प्रय्त्न चालवला.. एकट्या माणसाला क्षणार्धात फाडुन त्याचा खेळ संपवु शकणार्‍या वाघिणीला बघायला माणसांनी खेळ सुरु केला.. वाघ जीपच्या धुडाला घाबरतो.. म्हणुनच कधी हल्ला करत नाही.. हे तर पिल्लु होतं.. ते ही भेदरलं.. मागे मागे सरकु लागलं..

असं म्हणतात की ह्या जंगलात फार फार पुर्वी जेव्हा खुप वाघ होते तेव्हा राजे रजवाड्यांनी हजारोंनी वाघ मारले आहेत.. जंगलात चारी बाजुंनी जोर जोरात आवाज करायचे.. रान उठवुन द्यायचं.. आणि भेदरलेल्या वाघाला मधोमध पकडुन मग हे वीर त्याची शिकार करायचे.. किती ते शौर्य..

एक असा शिकारी होता म्हणे की तो आपल्या पत्नीला झाडाला बांधुन ठेवायचा आणि स्वत: वर मचाण बांधुन बसायचा..
तिच्या वासानी जेव्हा वाघ यायचा तेव्हा तो एका बाणात त्याची शिकार करायचा. एकदा त्याचा निशाणा हुकला. आणि वाघानी बायको वर हल्ला केला.. तेव्हा शिकारी खाली उतरुन वाघाशी लढला आणि त्यानी वाघाला मारलं.. पण त्यात तो ही गेला.. पत्नीही गेली..

खेळ.. खेळ मांडुन ठेवलाय माणसानी सगळा..

इथेही ती वाघिण माणसांच्या खेळाला घाबरुन मागे फिरली.. आणि मग आली तशी निघुनही गेली..

vagh 7

..गोष्ट संपली.. माझे डोळे विस्फारलेले होते.. एवढ्या वेळात तिच्या डोळ्यातली जरब.. सावधपणा.. ते अगदी भेदरणं... काय काय पहायला मिळालं मंडळींना.. भाग्यवान.. पुढे सफारीत काय केलं..काय पाहिलं..हे प्रश्न अर्थातच गौण होते.. हे सगळं आपल्याला का नाही अनुभवता आलं ह्या बद्दल परत थोडा चडफडाट झाला..उद्याचं सफारीच तिकीट मिळणं दिवाळीमुळे अशक्य होतं.. चिडचिड झालीच.. पण आता काय उपयोग असं वाटत होतं तोच दादा आला..

"अजुनही एक चान्स आहे वाघ बघण्याचा...शक्यता कमी आहे.. पण तरीही.. दिसुही शकतो.."

माझ्या डोक्यात परत एकदा वाघाचं गुरुगुरणं बॅक्ग्राऊंड म्युझिक सारखं सुरु झालं..

"कुठे???" मी किंचाळले..

"इथुन भोरमदेव कडे जातानाच्या रस्त्यावर...आणि आपण तिथे जायचचं.. तुला वाघ दाखवायचाच.."

इतका वेळ सोडुन दिलेल्या आशा परत पल्लवीत झाल्या..शांत झालेली डोक्यातली चक्रं परत फिरु लागली.. आणि एकच सवाल परत घुमु लागला..

"दिसेल का?"......

तळटिप:- ह्या लेखातील सर्व फोटो माझी बहीण, दादा आणि वहिनी ह्यांनी काढलेले आहेत. माझ्या कडे असलेले फोटो मी इथे वापरले आहेत. जर अजुनही चांगले फोटो सापडले तर जरुर टाकेन.

प्रतिक्रिया

जेपी's picture

31 Jan 2014 - 2:04 pm | जेपी

हं आता वाचतो .

नेहमी प्रमाणे खुसखुशीत . आवडल .

विअर्ड विक्स's picture

31 Jan 2014 - 2:16 pm | विअर्ड विक्स

क्रमश: नाही.... टाकायचे राहिले ना ?????????

भोरमदेव बाकी आहे ...... :(

बाकी उत्तम लिखाण

पिलीयन रायडर's picture

31 Jan 2014 - 2:27 pm | पिलीयन रायडर

हं... मी ते नेहमी प्रमाणे विसरलेय.. अजुन १ भाग टाकेन मी.. भोरमदेव आणि रामटेक वर..!

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2014 - 2:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सांगण्याची शैली आवडली.

त्या वाघाच्या बच्च्याच्या डोळ्यांत "यांना खावं का?" याऐवजी "का उगाच माझं खाणं उधळवंत, काका-काकू?" असा प्रश्न दिसतोय :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2014 - 2:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सांगण्याची शैली आवडली.

त्या वाघाच्या बच्च्याच्या डोळ्यांत "यांना खावं का?" याऐवजी "का उगाच माझं खाणं उधळवंत, काका-काकू?" असा प्रश्न दिसतोय :)

सस्नेह's picture

2 Feb 2014 - 1:31 am | सस्नेह

एकदम खुसखुशीत शैली.

मस्तच !! पुढचा भागही वाचायला आवडेल. भटकंतीबद्दल तपशीलवार लिहीण्याची पद्धत आवडली.

प्यारे१'s picture

31 Jan 2014 - 2:55 pm | प्यारे१

भन्नाट लिहीलंय.

अवांतरः तू मॅड्ड आहेस. गॉड ब्लेस.

अनिरुद्ध प's picture

31 Jan 2014 - 3:12 pm | अनिरुद्ध प

लेख आवडला पु भा प्र

मधुरा देशपांडे's picture

31 Jan 2014 - 3:14 pm | मधुरा देशपांडे

शब्दाशब्दातून वाघ दिसावा याबद्दल तळमळ कळते आहे वाचताना. हाही भाग मस्त झालाय. माहितीपूर्ण आणि झक्कास वर्णन केलंय.

श्रीमत's picture

31 Jan 2014 - 3:49 pm | श्रीमत

सगळी कडे फक्त वाघच वर्णन..... मस्त मजा येते आहे......
असच एक मी काढलेला बिबट्या चा फोटो........आणि हो हा फोटो बिबट्या पिज्र्यात होता म्हणून मी कढायचि हिमत केली. पिजर्याच्या बाजूच्या तट्ट्याना आधी जोर जोरात मारले आणि बिबट्याला चिडवले मग NOKIA (2MP)च्या फोने ने हा फोटो काढला.
ताडोबा बफ्फेर झोन मध्ये ोमनाथ नावचे गाव आहे तिथे ह्याल वन विभागाने आणून ठेवले होते.
*शुद्यलेकन सुधारायचा प्रयत्न चालू आहे....... क्षमस्व...
बिबट्या

पिलीयन रायडर's picture

31 Jan 2014 - 3:54 pm | पिलीयन रायडर

एक तर फोटो दिसत नाहीये मला.. पण पिंजर्‍यात असलेल्या वाघाला डिवचुन मग त्याचा फोटो काढला हे मला तरी नाही आवडलं.. एका फोटो साठी बंदिस्त जनावराला का त्रास द्यायचा?

एका फोटो साठी बंदिस्त जनावराला का त्रास द्यायचा?

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2014 - 7:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

+ १० लाखाची गोष्ट !

शिद's picture

31 Jan 2014 - 4:41 pm | शिद

तुम्हाला असे चिडवुन आणि डिवचून फोटो काढले तर चालतील का? फुकटचा मुक्या प्राण्यांना त्रास.

कवितानागेश's picture

31 Jan 2014 - 3:51 pm | कवितानागेश

.वाचतेय. :)

भावना कल्लोळ's picture

31 Jan 2014 - 4:41 pm | भावना कल्लोळ

मस्त भटकंती केली आहेस कि.

मस्त प्रवास वर्णन... पु.भा.प्र.

या भागातली मला सर्वात आवडलेली गोष्टः

एखादी वस्तू आपल्याला प्रियजनांसाठी हवीच्च असते. त्यासाठी आपण प्रचंड गडबड/धावपळ/यातायात करतो. एका क्षणी आपल्या लक्षात येतं - आपल्या त्या प्रियजनाला ती वस्तू मिळाल्या-न-मिळाल्याने काहीच फरक पडत नाहीये. डोळे उघडणारा, मॅच्युअर करणारा क्षण असतो तो. पीपल आर बेस्ट लेफ्ट टू देअर ओन डिव्हायसेस.

मस्तच लिहिलंय. पुभाप्र.

अनन्न्या's picture

31 Jan 2014 - 5:57 pm | अनन्न्या

तुझी लेखनशैली चांगली आहे.

श्रीमत's picture

31 Jan 2014 - 7:08 pm | श्रीमत

बिबट्या

राही's picture

31 Jan 2014 - 7:09 pm | राही

शैली सुंदर आहे. अगदी उत्कंठावर्धक आणि थोडी गुदगुल्या करणारीही.
पुढचा भाग वाचण्यास उत्सुक.

सफर इंटरेस्टींग होत चाललीये.

उपास's picture

31 Jan 2014 - 8:07 pm | उपास

अगदी छान मनमोकळं लिहिलय, 'कान्हा' बरेच दिवस लिस्ट वर आहे.. बघूया कधी योग जुळवून आणू शकतो ते..डिट्टेलवार माहितीबद्दल आभार!

इन्दुसुता's picture

31 Jan 2014 - 10:46 pm | इन्दुसुता

अरेरे!! वाघाच्या बच्च्यावर अन्याय!
बच्ची शिकारीच्या आणि मानवांच्या बाबतीत जराशी अननुभवी असावी, सावज गेल्यावर भुकेलेला वाघही ( विशेषतः ) मानवांच्या उपस्थितीत उघड्यावर राहिला असता ह्याबद्दल साशंक आहे.

त्या वाघाच्या बच्च्याच्या डोळ्यांत "यांना खावं का?" याऐवजी "का उगाच माझं खाणं उधळवंत, काका-काकू?" असा प्रश्न दिसतोय

याच्याशी बाकी सहमत :)

फोटो उत्तमच. पण लेखनशैली फार आवडली.

असेच काही लिहिले तर वाचायला मजा येईल. ललित वैग्रे का लिहीत नै असा प्रश्न पडला. अनाहितामध्ये कदाचित लिहीत असाल तर ते ठौक नै. तस्मात इथे कधीमधी पुढे ललितही लिहावे अशी इणंती.

(अन हे सगळे काय करण्याऐवजी करावे म्हणतो आहे तेवेसांनल ;) )

मदनबाण's picture

1 Feb 2014 - 8:10 am | मदनबाण

वाह्ह...

जाता जाता :- वाघांवरुन अतुल धामणकर यांनी टिपलेले फोटो आठवले. :) त्यांचे ताडोबाचे फोटो पाहिले होते.
त्याचा दुवा :- http://atulintadoba.blogspot.in/2009/12/tiger-kills-male-sambar-in-tadob...

इशा१२३'s picture

1 Feb 2014 - 8:46 am | इशा१२३

जंगल सफारीत वाघ दिसणे नशिबावरच अवलंबून असते बहुदा.आम्हालाही जिम कोर्बेट्ला दोन तास फिरुनहि नाहिच दिसला वाघ.पण घनदाट जंगलातील वातावरण अनुभवायला मजा येते.

वेल्लाभट's picture

1 Feb 2014 - 9:28 am | वेल्लाभट

अ‍ॅट लास्ट.......... ! बेस्ट

खटपट्या's picture

1 Feb 2014 - 11:16 am | खटपट्या

दिसला बाबा वाघ एकदाचा !!!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2014 - 5:10 am | अत्रुप्त आत्मा

छानच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2014 - 9:22 am | कैलासवासी सोन्याबापु

गुगामल राष्ट्रीय उद्यान आमच्या जिल्ह्याच्या उत्तरेला आहे, अन मेळघाट्चे दक्षिण टोक म्हणजेच दक्षिणरक्षक किल्ले नरनाळा जिल्हा अकोला, विदर्भ. कॉलेजात असताना बुद्ध पौर्णिमे ला होणा-या व्याघ्र गणनेत आम्ही जात असु, एकदा दिवसा उजेडी वनखात्याने बांधलेल्या एका कृत्रिम पाणवठ्याजवळ आम्ही पग मार्क्स शोधत होतो, तेव्हा एक अति उत्साही दोस्त डोळ्यांस क्यामेरा लावुन लेन्स नेच पग शोधत फुडं पळाला, पाणवठ्याजवळ काही दिसते का म्हणुन जेव्हा आम्ही मानावर केल्या तेव्हा पाहीले की वाघोबा पाणवठ्यावर शांत बसलेत बाथटब बनवुन त्या टाकीचा आमचा मित्र "गर्भगळीत" का काय म्हणतात तसा झालेला अन वाघाची लोणी चिरणा-या गरम सुरी सारखी नजर मित्राकडेच , सुदैवाने वाघोबांचे पोट टम्म दिसत होते, तसे मग मित्र हळु हळु नजर झुकवत १५ पावले मागे आला अन नंतर आमचा समस्त ग्रूप डींगणीस पाय लावुन परत बेस ला आल्यावरच पळायचा थांबलेला!!!

मुक्त विहारि's picture

2 Feb 2014 - 10:13 pm | मुक्त विहारि

हा पण भाग आवडला...

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....

सुज्ञ माणुस's picture

3 Feb 2014 - 9:50 am | सुज्ञ माणुस

सही ! हा पण भाग मस्तच आहे. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Feb 2014 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. और भी आने दो. लेखनशैली छानच.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Feb 2014 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. और भी आने दो. लेखनशैली छानच.

-दिलीप बिरुटे

मोहन's picture

3 Feb 2014 - 12:44 pm | मोहन

आम्हीही १०-१२ वर्षापुर्वी कान्हाला गेलो होतो त्याची खूपच आठवण येते आहे.
वाघ तर आम्हालाही दिसला नव्हता. ( तो जिम कॉर्बेट ला पण दिसला नाही) तेव्हा लोक बांधवगडला हमखास दिसतो म्हणायचे.

पैसा's picture

5 Feb 2014 - 5:08 pm | पैसा

अप्रतिम लिहिलयस!

नेत्रेश's picture

15 Feb 2014 - 1:16 am | नेत्रेश

आता पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत....

पुढचा भाग लवकर येउद्या

प्यारे१'s picture

17 Feb 2014 - 7:10 pm | प्यारे१

पुढचा भाग लवकर येउद्या

पिलीयन रायडर's picture

19 Feb 2014 - 2:50 pm | पिलीयन रायडर

हापिसात काम आल्याने जरा उशीर होतोय खरा.. पण टाकतेच लवकर..!