अंडा भुर्जी

मुक्तचिंतक's picture
मुक्तचिंतक in पाककृती
19 Jan 2014 - 10:31 pm

साहित्य

३ अंडे
२ बारीक चिरलेले कांदे
१ बारीक चिरलेला टोमाटो
३-४ ठेचलेल्या हिरव्या मिरच्या
२-३ चमचे कांदा लसून मसाला
१ छोटा चमचा तिखट
१ चमचा जिरे
हिंग व मीठ चवीनुसार

Sahitya

कृती

प्रथम एका नॉन स्टिक कढई मध्ये तेल तापवावे. तेल तापल्यावर त्यात जिरे व हिंग टाकावे
जीरे तडतडल्यानंतर चिरलेला कांदा टाकावा

कांदा

नंतर वाटलेल्या मिरच्यांचा खुडा, कांदा लसूण मसाला व तिखट टाकावे.
फेटलेली अंडी टाकावी.

अंडी

मसाला

Mir

गॅस मोठा करून मिश्रण घोटवावे. नंतर चिरलेला टोमाटो टाकून crusher ने एकजीव करून घ्यावे.
Crusher चा फायदा असा की भुर्जी मध्ये मोठे तुकडे राहत नाही आणी बारीक, एकजीव भुर्जी तयार होते.

Tomato

crush

कोथींबीर टाकून सजवावी व ब्रेड या पावाबरोबर खावी. सोबत कांदा आणी टोमतोचे मिश्रण सर्व करावे.

a

v

Thumps up बरोबर आस्वाद घ्यावा.

ब

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 10:52 pm | मुक्त विहारि

मस्तच...

मी फक्त २ गोष्टी बदलतो...

१. टोमॅटो आधी घालून मग अंडी टाकतो.

आणि

२. Thumps up बरोबर आस्वाद घ्यावा.

इथे कुठलाही द्र्व पदार्थ घ्यावा....

अशा सणसणीत भुर्जी बरोबर अल्कोहोलिक द्रव न्सेल तर त्या अंड्याला फोडण्यात काय अर्थ?
असे माझे मत आहे.

या पदार्थाबरोबर कांजी हा द्रव पदार्थ वापरल्यास तब्येतीलाही झकास आहे. ;)

कवितानागेश's picture

19 Jan 2014 - 11:12 pm | कवितानागेश

छान दिसतेय.
अवांतरः ते पलिकडे खोकं कसलं पडलंय?

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 11:38 pm | मुक्त विहारि

मला खोके दिसलेच नाही...

मी फक्त हे महाराज (आमच्याकडे आचार्‍याला महाराज आणि आचारीण बाईला महाराणी म्हणतात.) टोमॅटो कढईत कधी घालतात ते बघत होतो.

शेवटी स्त्रियांची जातच मोठी चतूर हो... असे फुल्ल्देशपांदे म्हणतात ते उगीच नाही...

अजया's picture

20 Jan 2014 - 8:39 am | अजया

मौला भारी चौकश्या ;)

आदूबाळ's picture

20 Jan 2014 - 12:38 pm | आदूबाळ

मला वाटत होतं - सातवा फटू बघून मौतै "किचन टॉवेल वेळच्यावेळी धुवा" असं सांगणार...

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2014 - 6:43 pm | टवाळ कार्टा

=))

'घर आवरायची गरज आहे' असा रिप्लाय पडेलसं वाटलं होतं. ;)
असो.

नेहा_ग's picture

20 Jan 2014 - 12:05 am | नेहा_ग

मस्त

मी अंडी खात नाही पण नवर्‍याने मला या प्रकाराची आवड निर्माण केली. मला वाट्टं त्यात तो कांदा लसूण मसाला घालत नसावा. हे काय मला धड जमत नाही म्हणून त्याने अंडाभुर्जी केली तरच मी खाते. फोटू चांगले आलेत पण नॉनस्टीक भांड्याला धातूचा मॅशर वापरताय तेंव्हा जपून.

>>>त्याने अंडाभुर्जी केली तरच मी खाते.

१. हे काही आम्ही वाचलं नाही.
२. हे ही करतात का?
३. तरीच्च हल्ली मिपावर नसतात.
४. काय हा कौटुंबिक अत्याचार.
५. किती बरं हे प्रेम.

सध्या घाईत आहे म्हणोन एवढंच. ;)
हलकं घ्या हो! उगा बुद्धीबळ खेळायला लावायचात नाहीतर. :(

अहो प्यारेभौ, म्हणूनच तर मध्यंतरी धागा आल्या आल्या त्याला दुसरं लग्न कर म्हणत होते. नव्या बायकोची मदत झाली असती ना!

प्यारे१'s picture

20 Jan 2014 - 6:25 pm | प्यारे१

'अनुभवी' पुरुष एवढे उतावळे वगैरे नसतात बरं!

असो. धागा हायजॅक व्हायचा नि अंड्यांची बुर्जी व्हायच्या ऐवजी...

रेवती's picture

20 Jan 2014 - 6:41 pm | रेवती

ही ही ही. ;)

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2014 - 6:43 pm | टवाळ कार्टा

;)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2014 - 1:20 am | अत्रुप्त आत्मा

बरेच दिवस पडलेला प्रश्न--- भुर्जी हा भाजीचा पर्यायी शब्द आहे काय? :)

कवितानागेश's picture

20 Jan 2014 - 10:18 am | कवितानागेश

भूरजून भूरजून करतात म्हणून 'भुर्जी' असेल. :)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2014 - 11:37 am | अत्रुप्त आत्मा

आंम्ही मंत्र गरजून गरजून गुर्जी होतो,तसेच काय? =))

अहो गुर्जी, तुमी भुर्जीच्या नादी कशाला लागता ? ...भाजीच बरी ! a

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2014 - 1:25 am | अत्रुप्त आत्मा

@तुमी भुर्जीच्या नादी कशाला लागता ? >>> आय्यो राम पाप! आमी भुर्जीच्या नाय हो,भुर्जी शब्दाच्या नादी लागलो कि वो!!!!!! ;)

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2014 - 6:44 pm | टवाळ कार्टा

शिंगल आनी हाश्टेल मधे ह्रार्ह्ह र्हानार्यांसाठी....हे पुर्णांन्न आहे :)

जेपी's picture

20 Jan 2014 - 10:54 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo:

दिपक.कुवेत's picture

20 Jan 2014 - 11:35 am | दिपक.कुवेत

मी त्यात बारीक चीरलेली हिरवी सीमला मिरची पण घालतो मस्त चव येते. अरेच्चा पण अजुन "ठेवणीतला प्रश्न" कोनीच कसा विचारला नाहि? एनी वे मीच विचारतो........हि पाकृ अंडे न घालता कशी करता येईल?

सानिकास्वप्निल's picture

20 Jan 2014 - 12:51 pm | सानिकास्वप्निल

कांदा-लसूण घातलेली भुर्जी आवडली :)

>> पाकृ अंडे न घालता कशी करता येईल?>>

दिपक अगदी तूझ्या आवडीचे पनीर घालून बनवता येईल की ;)

दिपक.कुवेत's picture

20 Jan 2014 - 1:17 pm | दिपक.कुवेत

बाकि खरं कसब (कसाब नाहि :D हे कि पनीर भुर्जी पण अंडा भुर्जी सारखी लागावी!

उदय के'सागर's picture

20 Jan 2014 - 12:05 pm | उदय के'सागर

अंड्याच्या सर्वच प्रकारांचा मी फॅन आहे :) छान पाककृती पण मी गाड्यावर मिळणार्‍या बुर्झी चा चाहता आहे(?.. होतो असे म्हणावे लागेल कारण वाढत्या वयानुसार वाढणार्‍या आजारांमुळे आजकाल असं बाहेरचं खात नाही :( ).
अंड्याचे पदार्थ बनवतांना ह्या दोन गोष्टींचा वापर करावा (करत नसल्यास) - तब्येत आणि चवीसाठी :)
१. अंड्याच्या कुठल्याही रेसीपीमधे थोडं आलं टाकलं की अंड पचायला मदत होते... काहींना अंड खाल्ल्याने पोटाचे विकार होतात - जसे जळ्जळ होणे, अपचन इ. पण आले टाकल्याने असा त्रास होत नाही (स्वानुभव)
२. अंड्याच्या भुर्जीमधे एव्हरेस्ट चा 'चिकन' मसाला टाकल्याने भुर्जी अधिक लज्जतदार बनते... हा मसाला भुर्जी अगदी तुम्ही गॅसवरून उतरवत असण्याच्या दोन मिनीट आधी तयार भुर्जीवर भुरभूरावा ... करून पहा नक्की आवडेल :)

छान आयडिया आहे. :) चव नक्कीच छान लागेल.

तुमचा अभिषेक's picture

21 Jan 2014 - 11:14 pm | तुमचा अभिषेक

२. अंड्याच्या भुर्जीमधे एव्हरेस्ट चा 'चिकन' मसाला टाकल्याने भुर्जी अधिक लज्जतदार बनते... हा मसाला भुर्जी अगदी तुम्ही गॅसवरून उतरवत असण्याच्या दोन मिनीट आधी तयार भुर्जीवर भुरभूरावा ...

ट्राय मारायला हरकत नाही. घरी सांगायला हवे. ;)

मीठ टाकल्याने लज्जतदार बनते का ?

प्यारे१'s picture

20 Jan 2014 - 12:35 pm | प्यारे१

>>>हिंग व मीठ चवीनुसार

घेतलंय खरं पण टाकलं नाही. ;)

दिपक.कुवेत's picture

20 Jan 2014 - 1:13 pm | दिपक.कुवेत

ते समजुन घ्यायचं असतं रे. आता प्रत्येक स्टेपची कृती द्यायची नसते!

प्यारे१'s picture

20 Jan 2014 - 1:27 pm | प्यारे१

ब्वार्र!