निवृत्तीनाथ केशवसुमारास...

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
21 Jul 2008 - 9:24 pm

निवृत्तीनाथ केशवसुमारास...

विडंबने तव सर्व जुनी मी स्मरतो आहे
मनापासूनी आज तुला मी लिहितो आहे
हक्कच होता! तुजला टाळ्या खूप मिळाल्या
`कवी' तरीपण कशामुळे घुसमटतो आहे?
कसल्या प्रतिमा? कसले जाळे? मला कळेना
लिहावेस तू पुन्हा म्हणूनी धडपडतो आहे
कविता नंतर; आधी विडंबन वाचत होतो
आठवणींनी त्या सार्‍या गलबलतो आहे
`रवि न देखे' ते ही कवी हा पाहू शकतो
विडंबने करण्यास कशा घाबरतो आहे?
घे विश्रांती; थांबव `क्षण'भर या कोलांट्या
पण निवृत्तीचा मूड मला ना कळतो आहे
सुचेल तेव्हा लिहीत जावे, काव्य-विडंबन
हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे
म्हणून म्हणतो, बदला निर्णय; आणि म्हणा की-
`आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे'

कविताप्रतिसाद

प्रतिक्रिया

वरदा's picture

21 Jul 2008 - 9:30 pm | वरदा

अगदी हेच हेच म्हणायचं होतं.....

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु's picture

21 Jul 2008 - 9:49 pm | प्राजु

ओगले साहेबांनी... आम्हा सर्वांच्या मनातलए विचार केशवा पर्यंत पोचवले...
के सु करा विचार याचा आणि येऊद्या फर्मास विडंबन.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

21 Jul 2008 - 9:53 pm | चतुरंग

मस्तच! काय सुरेख भावनाविष्कार केलाय, मानलं बुवा!
एका कवीने दुसर्‍या कवीला केलेले आर्जव असावे तर असे!
(मिपावर काव्यप्रतिभा एवढी भरुन आहे हे बघून मन खरंच भरुन आलं!)

चतुरंग

सर्किट's picture

21 Jul 2008 - 11:42 pm | सर्किट (not verified)

ओगले साहेब,

आपली "आधारित" रचना (ह्यालाही विडंबन म्हणू नये) अतिशय आवडली.

- सर्किट

शितल's picture

22 Jul 2008 - 12:48 am | शितल

आमच्या भावना पोहचवल्या त्यानी केशवसुमारा पर्यत.

अनिल हटेला's picture

22 Jul 2008 - 7:40 am | अनिल हटेला

के सु !!

आमच्या सर्वाच्या भावना तुमच्या पर्यन्त पोचल्या असतील ,

तर एक झका स विडम्बन येउ द्यात !!!

म्हणून म्हणतो, बदला निर्णय; आणि म्हणा की-
`आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे'

आपल्या कवितेचा चाहता,
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चेतन's picture

22 Jul 2008 - 11:02 am | चेतन

हक्कच होता! तुजला टाळ्या खूप मिळाल्या
`कवी' तरीपण कशामुळे घुसमटतो आहे?

हा प्रश्न मलाही पडलायं

कसल्या प्रतिमा? कसले जाळे? मला कळेना
लिहावेस तू पुन्हा म्हणूनी धडपडतो आहे

हेच म्हणतो

कविता नंतर; आधी विडंबन वाचत होतो
मी ही हेच करतो

बाकी कविता मात्र मस्तच् आहे

चेतन

केशवसुमार's picture

23 Jul 2008 - 11:40 am | केशवसुमार

ओगलेशेठ,
सुंदर कविता...आवडली.. एकदम निरुत्तर केलेत..
(निवॄत्त)केशवसुमार