आमची प्रेरणा आमच्या गुरुंची निवृत्ती
---------------------------------------------------------------------
छळले मी त्या सर्व मुलींना स्मरतो आहे
शेवटची मी आज भानगड करितो आहे
जाड चपला खूप मिळाल्या मज रसिकेच्या
आत तरीपण एक प्रेमी धुसफुसतो आहे
कसा अडकलो प्रतिभेच्या जाळ्यात कळेना
सुटण्यासाठी माशासम तड्फडतो आहे
चित्राने ही सावज केले होते मजला
आठवणींनी त्या पोरींच्या गलबलतो आहे
डोळ्यांन मध्ये प्रितीच्या ना पाहू शकतो
भावालाही बघण्यास तिच्या घाबरतो आहे
प्रेमाच्या मी या कोलांट्या खूप मारल्या
लफड्यांचा सोस आज मज कळतो आहे
करा मोकळा कॉलेजच्या दुनियेतुन आता
हेच सांगणे, हेच थांबणे म्हणतो आहे
हाक घालते मला खुले आभाळ मैत्रीचे
आज नवी भानगड पुन्हा मी करतो आहे.
प्रतिक्रिया
21 Jul 2008 - 2:08 pm | बाजीरावाची मस्तानी
हे..अमोल....आधीच ईथे भानगडी कमी आहेत का???.कुथ्ली नविन भानगड्...केलीस बाबा?
21 Jul 2008 - 2:11 pm | सहज
अमोल केसु स्टाईल मधे उत्तम विडंबन जमले आहे
21 Jul 2008 - 2:28 pm | अनिल हटेला
प्रेरणा,
रसिका,
प्रतीभा,
चित्रा ,
प्रिती,
प्रेमा,
अजुन काय ?
लिस्ट सम्पली का राव ?
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
21 Jul 2008 - 3:20 pm | केशवसुमार
केळकरशेठ,
झकास विडंबन..
(समाधानी)केशवसुमार
काही बदल..(जित्याची खोड)
छळले मी त्या सर्व मुलींना स्मरतो आहे
शेवटची मी आज भानगड करतो आहे
जोडे चपला खूप मिळाल्या मज लोकांच्या
आत तरीपण मजनू हा धुसफुसतो आहे
कसा अडकलो 'प्रतिभे'च्या जाळ्यात कळेना
सुटण्यासाठी माशासम तडफडतो आहे
'चित्रा'ने ही सावज केले होते मजला
आठवणींनी त्या पोरीच्या गलबलतो आहे
डोळ्यांन मध्ये 'प्रिती'च्या ना पाहू शकलो
बहिणीलाही आज तिच्या घाबरतो आहे
प्रेमाच्या मी या कोलांट्या खूप मारल्या
लफड्यांचा हा सोस आज मज कळतो आहे
जसे मोकळा लफड्यातूनी सगळ्या झालो
हेच सांगणे, हेच थांबणे म्हणतो आहे
साद घालते हि शेजारील 'यमी' कधीची
नवीन भानगड सुरु करावी म्हणतो आहे.
21 Jul 2008 - 11:39 pm | सर्किट (not verified)
अमोल साहेब,
गुरूजी निवृत्त झाले, तरी तुमची शिकवणी अशी चालू रहावी, ही शुभेच्छा.
- सर्किट
2 Aug 2008 - 1:40 pm | येडबाम्बू
कोणी म्हणेल,
चोरिचा मामला हळुहळु बोम्बला
पन,,
इथ
पोरीन्चा मामलाअन बेट्याहो मोठ्याने बोम्बला
21 Jul 2008 - 3:44 pm | अनिल हटेला
के सु !!!
लढ बापू !!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
21 Jul 2008 - 10:03 pm | प्राजु
केशवसुमारांचे शिष्य भरपूर तयात व्हायला लागले आहेत...
अमोल.. एकदम मस्त विडंबन अगदी केसु स्टाईल..
केशवसुमारांनी केलेल्या सुधारणा ही एकदम सह्हि आहेत...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Jul 2008 - 10:06 pm | चतुरंग
जबरा सुरुवात अमोल!
केसुंचा फिरलेला हात कशी जादू करतो तेही दिसले लगोलग!
चतुरंग
21 Jul 2008 - 11:35 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
21 Jul 2008 - 10:19 pm | वरदा
अमोल मस्त...केसुंच्या सुधारणा जबरा...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt