मिपावर आपण सारे मुख्यत" दोन गोष्टीसाठी येतो .व्यक्त होण्यासाठी व व्यक्त झालेल्याना प्रतिसाद देण्यासाठी. प्रिट मिडीयाचे मालक, संपादक निरनिराळ्या ईझम्सचे रंग फासून वावरत असतात. सुदैवाने मिपा सारखे माध्यम असा कोणताही एकच रंग घेऊन वावरत नाही. मिपा हे व्यक्तीगत आयुष्यातली कसे भिनत जाते याचे प्रत्यंतर आम्हा काहीना येणार होते.
१७ डिसेंबर २०१३ ची संध्याकाळ काही पुणेकरांसाठी एक अचानक जमलेला कट्टा या स्वरूपात अवतरली. अत्यंत अल्प काळात आपल्या दर्जेदार लेखनाने मिपाप्रिय ठरलेले श्री इस्पिक एक्का हे पुण्यात आले आहेत असे ब्याटम्यान याना कळले. एकमेकांच्या एरवी प्रत्यक्ष संपर्कात असलेल्या काही आयडी ना श्री ई. ए. याना भेटण्याची फार दिवसांची इच्छा होतीच. त्याला अत्यंत उदार मनाने 'इ ए' यानी प्रतिसाद द्यायचे ठरवले व बालगंधर्व रंगमंदिराच्या कॅफेट्रिया मधे प्रथम श्री वल्ली, चौरा , मालोजीराव , बॅटमॅन हे इस्पिक एक्काश्री ना भेटले. ते सर्वाना सुहास्यवदनाने भेटले व त्यानी आपल्या मुलाची ओळखही सर्वाना करून दिली.
गरम गरम चाय व कॉफी यांचे घोट घेत आम्ही काही सुरवातीचे प्रश्न श्री इस्पिक एक्का याना विचारू लागलो .आपल्या मिस्कील स्वभावाने व माहितीप्रचुर उत्तरानी त्यानीच खुद्द या मैफिलीत रंग भरावयास सुरूवात केली. गेली काही वर्षे ते
मध्यपूर्वेत एक मल्टी स्पेशालिटी मेडीकल युनिट मधे काम करताहेत. त्या निमित्ताने त्यानी द आफ्रिकेत काही देशाना भेट दिली आहे पण एरवी व्यक्ती म्हणून त्याना प्रवासाची जबर हौस आहे. त्यात काही वेळेस त्यानी सहकुटूंब ही प्रवास केलेले असून एकूण २४ देशाना आतापावेतो त्यानी भेटी दिल्यात असे समजले. मिपावर त्यांचा सध्या विएटनाम प्रवास गाजत आहे.साहजिकच दक्षिण पूर्व आशिया व हिंदू संस्कृति व राजवटी अशा विषयाकडे चर्चा वळली.तेवढ्यात बॅटमॅन आले . त्यानी व मालोजी रावानी मग एक्क्का यांचा ताबा घेतला. अंकोरवाट देवालयाची वास्तूशास्त्रीय माहिती चौ रा व वल्ली घेउ लागले तर ऐतिहासिक बाजू मालोजी, ब्याटोजी हे सरदार संभाळत राहिले. तेवढ्यात प्रशांत, अप्पा जोगळेकर, अत्रुप्त आत्मा, व फक्त ५० राव ही आले. मग गप्पाचा फड अधिक जमण्यासाठी परत एकदा चाय चा राउंड .
आता चर्चा " नॉर्वे ची सफर" हा विषय घेउन आली. आपण ऑरोरा पहाण्यासाठीच हिवाळा निवडला होता एरवी मध्यरात्रीच्या सूर्र्याचा चमत्कार पहायला उन्हाळ्यात जावे लागते हे त्यानी सांगितले. मग मध्यपूर्वेतील राज्यव्यवस्था खरे तर " राजे" व्यवस्था, अर्थव्यवस्था, बंधने, इमिग्रेशन, युरोपियन युनियन , शेगेन व्हिसा व युरो कंट्री या तील फरक
ई वर माहिती सगळ्याना मिळत गेली. दरम्यान श्री सागर म्हात्रे यानीही मोकळेपणाने मिपाकर असल्याप्रमाणेच जणू भाग घेण्यास सुरूवात केली. त्यांच्या प्रवासातील काही अप्रतिम फोटो पहावयास मिळाले. एव्हाना नउ वाजत आले होते. मग
सगळे म्हणाले चला जेवायला निघू. . एकमेकाशी गप्पा मारत संभाजी उद्यानाजवळील " मयूर" भोजन गृहात गेलो. ताटात
पांढराढोकळा, कचोरी,भाज्या,पापड , गुजराथी कढी,खिचडी( मुगडाळीची) गुलाबजामुन असे एकेक पदार्थ येऊन पडून लागले व
मुखांमधे नाहीसे होऊ लागले.
जेवणामधे गप्पांचा बहर कमी झाला होता. जेवणानंतर पन्नास राव व आत्मासाहेब लगेचच निघाले . बाकी मंडळी बालगंधर्व च्या गेटवर पुन्हा एका मैफिलीसाठी जमली. मग आपले स्वीस मधले काही अनुभव श्री इस्पिक एक्का यानी
सांगितले.तेथील पर्यटन व्यवस्था किती सक्षम बनविली गेली आहे. त्याचा अनोखा प्रवास झाला. मग भारतीय लोकांची
मनोवृती, राजकारण असे करत ओमानच्या राजाच्या केशकर्तकाच्या " थाटमाटाचा " किस्सा ( स्पेशल विमान धाडण्याचा)
ऐकल्यावर व लालूप्रसादांचा कमिशनचा किस्सा ऐकल्यावर हसून हसून पुरेवाट झाली.
आपण एरवी दिवस उत्तम गेल्यास " यू मेड माय डे " म्हणतो. तसे ती स्मरणीय संध्याकाळ संपविताना आमची सर्वांचीच
भावना श्री इस्पिक एक्का यांचे प्रति अशीच होती.
बालगंधर्व क्याफेटेरियात एका प्रसन्न क्षणी चौकटराजा, अत्रुप्त आत्मा, बॅटमॅन आणि मालोजीराव
अजून एक क्षण पकडताना
५० फक्त, चौकटराजा, बॅटमॅन, अत्रुप्त आत्मा, मालोजीराव, सागर म्हात्रे, उत्सवमूर्ती इस्पीकचा एक्का आणि प्रशांत.
मयुर हॉटेलच्या बाहेर भोजनानंद लुटल्यावर त्रुप्त पोटाने बाहेर पडताना
प्रशांत, इस्पीकचा एक्का, ५० फक्त, चौकटराजा, सागर, बुवा, मालोजीराव, ब्याम्या, अप्पा जोगळेकर आणि वल्ली.
*सर्व फोटो इस्पीकचा एक्का यांजकडून.
प्रतिक्रिया
19 Dec 2013 - 3:25 pm | मुक्त विहारि
आता आमच्या मनांत पण ई.ए. साहेबांना भेटायची उत्सुकता निर्माण झाली आहे.
19 Dec 2013 - 4:45 pm | चौकटराजा
" इ ए या मुबईचिये नगरी " साठी शुभेच्छा !!
19 Dec 2013 - 3:27 pm | सूड
फोटो खंय आसत काकांनु??
19 Dec 2013 - 3:29 pm | शैलेन्द्र
मस्त वृत्तांत.
19 Dec 2013 - 3:29 pm | प्यारे१
ओ चौरा काका, अहो एवढी महानुभावांची मांदियाळी झाली. दर्शनाचा लाभ द्या की!
19 Dec 2013 - 3:35 pm | स्पा
हा शत्शब्द वृतांत होता काय?
19 Dec 2013 - 3:57 pm | प्रभाकर पेठकर
फार उच्च चर्चा झालेल्या दिसताहेत. असो. ह्या मौक्तिक वर्षावात न्हाहून निघणे आमच्या नशिबात नव्हते ह्याचे वैषम्य वाटते आहे. नशिबवानांचे मनापासून अभिनंदन.
19 Dec 2013 - 4:38 pm | अनिरुद्ध प
+१११ सहमत
19 Dec 2013 - 5:12 pm | चौकटराजा
मुख्य म्हणजे मस्कत चे महाराष्ट्र मंडळ, तेथील सांस्कृतिक कार्यक्रम , जवळचे कोकण ई विषय निघाले असता, श्री ई ए नी पेठकर काकांची आठवण काढली होती.
19 Dec 2013 - 6:13 pm | प्रभाकर पेठकर
>>>> श्री ई ए नी पेठकर काकांची आठवण काढली होती. <<<<
तरीच म्हंटलं, १७ तारखेच्या रविवारी संध्याकाळी 'पहिल्याच घोटाला' उचकी का लागावी?
असो. योग असेल तेंव्हा प्रत्यक्ष भेट होईलच.
19 Dec 2013 - 5:18 pm | प्रमोद देर्देकर
+११११११११११ सहमत
19 Dec 2013 - 3:58 pm | जेपी
फोटो ??????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
19 Dec 2013 - 4:10 pm | अभ्या..
मस्त कट्टा ओ काका.
आम्हाला पण एक्का साह्यबाना पाहायची लैच इच्छा हाय.
तुमची ग्रेट भेट झाली. मस्तच.
19 Dec 2013 - 4:31 pm | पैसा
इस्पीकचा एक्का यांच्या लिखाणातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होतेच आहे. तुम्हाला ते प्रत्यक्ष भेटले, तेव्हा कल्पना आलीच असेल. ५० फक्त यांची या निमित्त आठवण झाली. हल्ली त्यांना मिपा वर यायला कार्यबाहुल्यामुळे वेळ मिळत नसावा बहुतेक. फोटो मात्र पाहिजेतच.
19 Dec 2013 - 4:35 pm | प्यारे१
>>>५० फक्त यांची या निमित्त आठवण झाली.
हो हो! त्यांनी आपलं शारिरीक वजन खूप कमी करुन साहित्यिक नि सामाजिक (कोण रे तो आर्थिक म्हणतोय?) वजन खूप वाढवलंय असं ऐकिवात आहे. त्यामुळे फोटो हवाच.
होऊ दे बॅण्ड्विड्थ खर्च. मिपा आहे घरचं! (सौजन्यः बॅटमॅन)
20 Dec 2013 - 10:59 am | नित्य नुतन
खी खी खी
*LOL*
19 Dec 2013 - 4:42 pm | प्रचेतस
फोटो धाग्यातच अपडेटवलेत.
सविस्तर प्रतिसाद नंतर. लै मज्जा आली. :)
19 Dec 2013 - 5:05 pm | अभ्या..
फोटो स्ट्रेच करून स्वत:ला स्लिम दाखवायचा वल्ल्याचा क्षीण प्रयत्न. ;-)
मी असतो तर दिसलोच नसतो .
19 Dec 2013 - 5:14 pm | चौकटराजा
पारखी नजर है आपकी अभौ ! पण चौ रा नी केस काळे केले आहेत हे कसे सुटले नजरेतून !
19 Dec 2013 - 6:39 pm | अभ्या..
काळे केस फकस्त शेवटच्या फोटोत दिसतेत काका. बाकी फोटोत तर तुम्ही त्या लोकरी जामानिम्याताले रश्यन आम्बेसेडर वाटता. :-D
19 Dec 2013 - 6:40 pm | बॅटमॅन
मस्त मज्जा आली कट्ट्याला.
बाकी चौकटमीर राजोव्हस्की दिसताहेत खरेच.
19 Dec 2013 - 6:49 pm | चौकटराजा
मला के जी बी त घेतील काय हो ? ते सचिन आय डी मला फुकाट बी घटना समितीत घ्यायला तयार नाय !
19 Dec 2013 - 6:53 pm | बॅटमॅन
अहो आपल्या देशात ट्यालेंटला किम्मत नाय. केजीबीत निवांत घेतील तुम्हाला, तुमचा मिपावरचा रेझ्युमे पाठवू पुतिनला हाकानाका ;)
19 Dec 2013 - 6:54 pm | अभ्या..
ब्याट्या, चौराकाका बेशिक ह्याण्डसम हायेत पण मला सांग तुझे स्मश्रोवर्धन किम्काराणार्थ ? ते भंग बिंग काय नाय ना?
काय नसते बरका ते इशेष. ;-) मनाला अज्याबात लावून घ्याचे नाय. :-D
19 Dec 2013 - 7:01 pm | चौकटराजा
थे भंग बिंग चा ईषय अभ्या तू मोदकाकडे काढ ! आजकाल कुठं सन्यास घेउन लपलाय कुणास ठावा ?
19 Dec 2013 - 7:05 pm | बॅटमॅन
कुंतलवधसत्राची हिंसा रोज करणे नको वाटते. तस्मात पक्षपंधरवड्यात द्विवार श्मश्रूकर्तन करावे ऐसा अंगुष्ठनियम केला असे. तदुपरि
"मोठ्या अनिवार ऐशा कंडुअतिशमनार्थ श्मश्रु भादरावी |
तैसें नसतां ष्टैल-लेबलार्थ यथेच्छ वाढवावी ||"
याजवरोन येक सत्यकथा स्मरली.
येकें दिनि वंगदेशी, भेटती जने चारपाच |
गांधारदेशिचे सर्वे, पुरते अविंध जाण साच ||
करिता बहुता परिचे, संभाषण तयांसवे फार |
दारी शिकणे मजला, म्हणता ये उमाळा अपार ||
जातां कक्षी तयाच्या, आला तेथे येक लंकावासी |
त्याते मज दाखवुनी तो वदता झाला तयासी ||
येथिल वाल्गुदपंत, आपला हा अविंध भ्राता हो,
ऐकता हे झडकरी, म्यां फोडिलासे टाहो ||
ऐसे जाहले तेव्हा, श्मश्रूमहात्म्य की साचे |
केले अविंध अपैसे, येका सनातन्याचे ||
19 Dec 2013 - 7:11 pm | अभ्या..
रामलीला च म्हनायचि ही ;-)
सुन्दर.
वाढू दे वर्च. वाचु दे खर्च :-D
19 Dec 2013 - 7:16 pm | बॅटमॅन
अलीकडे मात्र सुप्रीम कोर्टाकडून प्रेषर वाढू लागल्याने खर्च अंमळ वाढेल अशी लक्षणे आहेत.
19 Dec 2013 - 7:50 pm | प्रचेतस
=))
महान आहेस.
19 Dec 2013 - 8:40 pm | सूड
>>"मोठ्या अनिवार ऐशा कंडुअतिशमनार्थ श्मश्रु भादरावी |
तैसें नसतां ष्टैल-लेबलार्थ यथेच्छ वाढवावी ||"
दंडवत रे बाबा!! बाकी सहमत आहे. अगदीच वेळ पडली तर ट्रिम करुन घेतो, ते गुळगुळीत दाढी वैगरे पटतही नाही आणि रुचतही नाही.
रच्याकने: आपल्या या दोन ओळी आमच्या सिग्नतुरेमध्ये लिहील्यास चालेल कांय?
20 Dec 2013 - 2:16 am | बॅटमॅन
या दोन ओळी लिहिल्यास चालणार नाही, पण पळेल मात्र ;)
बाकी अस्मादिक मात्र एक तर पूर्ण गुळगुळीत दाढी नैतर पूर्ण वाढलेली दाढी यांपैकी एकच असावे अशा मताचे आहेत.
20 Dec 2013 - 11:27 am | अद्द्या
मी पण कॉपी करणार हे वाघुळा .
23 Dec 2013 - 12:00 am | लॉरी टांगटूंगकर
वा वा!!! समविचारी लोक्स पाहुन आनंद झाला.


दोन चित्र डकवतो.
19 Dec 2013 - 10:14 pm | चित्रगुप्त
सत्यकथा एकदम भारी.
...."मोठ्या अनिवार ऐशा कंडुअतिशमनार्थ श्मश्रु भादरावी |
तैसें नसतां ष्टैल-लेबलार्थ यथेच्छ वाढवावी ||"
....वाढता वाढता वाढे वेढिले मुखमंडळा, खुंटापासोन ब्रह्मांडा एवढी होत जातसे.
20 Dec 2013 - 2:17 am | बॅटमॅन
तयासी तुळणा कोठे, मारुतीपुच्छ धाकुटे ;)
20 Dec 2013 - 2:19 am | अभ्या..
पैल्या फोटोत तर पामेरिअनपुच्छ वाटत आहे ब्वा. :)
20 Dec 2013 - 2:24 am | बॅटमॅन
अगदी अगदी!!!
दुसर्यात मात्र डेव्ही जोन्स वाटू र्हायलाय ;)
19 Dec 2013 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा
@"मोठ्या अनिवार ऐशा कंडुअतिशमनार्थ श्मश्रु भादरावी |
तैसें नसतां ष्टैल-लेबलार्थ यथेच्छ वाढवावी ||">>> =))
वृत्तराजा शब्दखाटीका मारू किती सलाम __/\__
पुढचे काही सुचत नाही,आंम्ही एकोळी गुलाम!
19 Dec 2013 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा
@फोटो धाग्यातच अपडेटवलेत.>>> वाहव्वा! ;)
पहिल्याच फोटूवरील वाक्यातअजुन एक सूक्ष्म(पण महत्वाचा ;) ) बदल करा...
@>>> बालगंधर्व क्याफेटेरियात एका प्रसन्न क्षणी चौकटराजा, अत्रुप्त आत्मा, बॅटमॅन आणि मालोजीराव
@<<< बालगंधर्व क्याफेटेरियात एका प्रसन्न क्षणी चौकटराजा,बॅटमॅन, अत्रुप्त आत्मा आणि मालोजीराव
19 Dec 2013 - 5:08 pm | स्पा
लोल =))
19 Dec 2013 - 5:13 pm | सुहास..
कट्ट्यावर का असेना पन्न्याश्याला बघुन आनंद झाला .
अवांतर : काय सुहास्य आहे चेहर्यावर ...
च्यायला नायतर आमचा कट्टा असायचा ...च्यामारी काय धिंगाणा स्साला गप्पांचा !! बार बंद होवुन रात्री दोन वाजले तरी कोणाला घरी जायची इच्छा नसायची .....पार गाल दुखायचे हसुन हसुन सकाळी........एकदा तर तिथेच रूम घेवुन झोपल होतं एक ......सगळे हलकट लेकाचे कुठे खपलेत काय माहीत सध्या ;) ...
पुनमचा कट्टेकरी
19 Dec 2013 - 6:35 pm | चित्रगुप्त
वाहवा. खूपच मजा आली असणार. कितितरी विषयांवर रंगल्या गप्पा.
असे काही वाचले की आपण किती दळभद्री प्रदेशात (दिल्ली जवळ) रहातो, हे पुन्हा पुन्हा जाणवते.
फोटो आणि त्यातील व्यक्तींचा परिचय, यामुळे प्रथमच 'दिसती कसे नरपुंगव हे आननी' हे समजले. धन्यवाद.
19 Dec 2013 - 7:06 pm | सुबोध खरे
हायला
हे म्हणजे आम्ही पूजा ठरवली आणि लोकाना निमंत्रण देतो तोवर आमचे गुरुजी ढापून यानी मध्येच सत्यनारायण करून घेतला असे झाले.
असो
जितके जास्त लोक भेटतील तितके उत्तम
बाकी- शनिवारी दुपारी दोन वाजता स्थळ- सहार विमानतळजवळ
19 Dec 2013 - 7:25 pm | किसन शिंदे
झक्कास कट्टा झालेला दिसतोय.
19 Dec 2013 - 9:55 pm | सस्नेह
आमाला बोलिवला असता तर आमीबी आलू असतू !
19 Dec 2013 - 10:50 pm | सोत्रि
हायला, साला १७ ला तर मी पुण्यातच होतो. पण "एक अचानक जमलेला कट्टा" असे चौरांनी लिहील्यामुळे आता आयोजकांना माफ करण्यात आले आहे.
असो, फोटो मस्त, वृत्तांत जरा कमी पडला.
- (कट्टेकरी) सोकाजी
19 Dec 2013 - 10:57 pm | बाबा पाटील
सुमडीत कट्टा कट्टा करता राव,कधीतरी आम जनतेला पण कळवत जा लेकाहो...
19 Dec 2013 - 11:09 pm | यसवायजी
:P अता मी बगा कशं कलतो, एकताच कलतो कत्ता. कुन्ना कुन्नाला बोलवनार नाही. :P
19 Dec 2013 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा
@कुन्ना कुन्नाला बोलवनार नाही. >>> =)) आणी स्वतःही येणार नाही!
19 Dec 2013 - 11:41 pm | यसवायजी
अआ, एक कट्टा भरवा की तुमच्या झाडावर.. मज्जाच-मज्जा. :))
19 Dec 2013 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा
@ एक कट्टा भरवा की तुमच्या झाडावर.. >>> =))
णक्कीच!
19 Dec 2013 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा
अटोपशीर (कोण रे अटपला..म्हणतोय तो.........! ) पण झकास वृत्तांत... :)
20 Dec 2013 - 12:45 am | खटपट्या
बैटमैन चे दर्शन जाहले !!!
आनंद जाहला !!
20 Dec 2013 - 12:46 am | रेवती
हा अचानक कट्टा वाटत नाहीये, गुपचुप कट्टा असावा असा संशय आहे. ;)
चौरा म्हणजे काठी टेकणारे वृद्ध गृहस्थ असतील असे इतके दिवस समजत होते.
सगळे फोटू व वृत्तांत आवडला.
५० रावांना म्हणावं लेखमालिका पूर्ण करून पुन्हा मोठी सुट्टी घ्या.
20 Dec 2013 - 12:58 am | यसवायजी
@चौरा म्हणजे काठी टेकणारे वृद्ध गृहस्थ असतील असे इतके दिवस समजत होते. >>
:D
मी पण. (फक्त 'होते' ऐवजी 'होतो')
21 Dec 2013 - 9:42 pm | हाडक्या
मी पण.. मी पण..!!
20 Dec 2013 - 3:54 am | आदूबाळ
मिपाचे लाडके गारूडी ज्याक ड्यानियल सध्या पुण्यात आहेत असे खात्रीशीर सूत्रांकडून समजते. त्यानला भॅटून घ्या. परत गावायचे नाहीत लवकर.
20 Dec 2013 - 11:01 am | अभ्या..
आबासाहेब, खात्रीलायक सूत्र तर तुम्हीच आहात,
शनिवार रैवार बघुन कट्टा करा बघु आयोजित. तुम्हीच व्हा स्वागताध्यक्ष. :)
वाटल्यास आम्ही आभार्प्रदर्शन करु. ;)
20 Dec 2013 - 11:07 am | प्रचेतस
सोलापूर कट्टा कधी रे अभ्या?
20 Dec 2013 - 11:17 am | अभ्या..
सोलापूर कट्टा: संक्रांत. गड्डा यात्रा.
कालावधी : १४ जानेवारी आसपास.
बुकींग साठी संपर्क : वल्लीसाह्येब.
सौजन्य : चविष्ट सोलापूरी जेवण आणि जत्रेत गोंधळ केल्यास निस्तरण्याची हमी. :)
जास्तीचे आकर्षण : उस्मानाबाद ची धाराशिव लेणी, लांबतुरे संग्रहालय आदी आदी.
आयोजक : मीच की.
20 Dec 2013 - 11:31 am | प्रचेतस
हाहाहा. =))
जमल्यास कुडाळसंगम आणि पानगाव.
आणि मुख्य आकर्षण नळदुर्ग राहिलंच की रे.
21 Dec 2013 - 9:48 pm | हाडक्या
बाब्बो.. जळवतास की रे...!! :) . :)
20 Dec 2013 - 11:14 am | सुबोध खरे
जे डी साहेब पुण्यात आहेत? अहो आम्ही त्याना इकडे कधी येताय म्हणून फार आर्जव करतोय आणि ते पुण्यात पोहोचले सुद्धा. हे पुणेकर महणजे लोकांचा कात्रज करण्यात एकदम पटाईत.
जे डी साहब हाजिर हो(वजा साप) !!!
20 Dec 2013 - 11:19 am | अभ्या..
बैलांना पलिते लावून पळविण्यात पटाइत असे वाचावे. ;)
21 Dec 2013 - 9:06 pm | आदूबाळ
जेडी पुण्यात आहे - ¨ममाहेरपणाला¨ आलाय. सांगतो त्याला कॉन्टॅक्ट करायला.
अभ्या - सध्या पुण्यात नाही, त्यामुळे स्वागताध्यक्ष होऊ शकत नाही. आलो पुण्यात की करूच कट्टा. तू पण सोलापुराहून यायचंस - या अटीवर.
21 Dec 2013 - 9:42 pm | अत्रुप्त आत्मा
@तू पण सोलापुराहून यायचंस - या अटीवर.>>> जोरदार ++++++११११११११ ;)
22 Dec 2013 - 9:23 pm | मैत्र
झालेली आहे. फक्त वृत्तांत आणि इ.ए. यांना भेटण्याची संधी गेल्याने नाही तर
कधी नव्हे ते पुण्यात असून "आतल्या गोटात" नसल्यामुळे कट्टा हुकल्याची.