ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक - श्री. विनय आपटे यांचे मुंबईत दु:खद निधन*~*~*~*

मृगनयनी's picture
मृगनयनी in जनातलं, मनातलं
7 Dec 2013 - 8:57 pm

रंगभूमीवरील, नाट्य-सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार- दिग्दर्शक- "विनयजी आपटे" यांचे अन्धेरी येथील अंबानी हॉस्पिटल'मध्ये दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले... खरोखर या हरहुन्नरी अभिनेत्याचे असे 'जाणे' चटका लावून गेले.
*~*~*~*~*~*~* भावपूर्ण श्रद्धांजली...*~*~*~*~*~*~*

समाजचित्रपटबातमी

प्रतिक्रिया

इष्टुर फाकडा's picture

7 Dec 2013 - 9:02 pm | इष्टुर फाकडा

दीर्घ आजाराने ???
'छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे आपटे यांना काल, शनिवारी अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांचे निधन झाले. अशी बातमी आहे.
असो, गेलेल्याला शांती मिळो …

मृगनयनी's picture

7 Dec 2013 - 9:23 pm | मृगनयनी

@ इ. फाकडा - "विनय आपटे" यांना गेल्या पाच वर्षांपासून अस्थमाचा त्रास होता. मे- २०१० मध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत्यूच्या दाढेतून अक्षरक्षः खेचून आणले होते. त्यांना सक्तीची विश्रान्ती घेण्यास सांगितल्यावरही शूटिन्गच्या डेट्स आणि नाट्यपरिषदेच्या निवडणुका यामुळे त्यांना विश्रान्ती घेणे शक्य नव्हते..त्याचबरोबर त्यांना हृदयविकार आणि लो बी.पी.'चाही त्रास होता. त्याचबरोबर त्यांचे मद्यपानाचेही प्रमाण जास्त होते. गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराचा विकार बळावला होता. त्यांना काल हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्यावरही प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. आणि आज त्यांचे दु:खद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शान्ती देवो!

इष्टुर फाकडा's picture

8 Dec 2013 - 3:55 am | इष्टुर फाकडा

हे माहिती न्हवतं. त्यांचं नाव कायम लक्षात राहील हे नक्की आहे.

दर्यावर्दी's picture

7 Dec 2013 - 9:07 pm | दर्यावर्दी

भावपुर्ण श्रद्धांजली. विनयजी त्यांच्या कार्यातून नेहमीच आपल्यात राहतील.

सचिन कुलकर्णी's picture

7 Dec 2013 - 9:13 pm | सचिन कुलकर्णी

विनय आपटे माझे, माझ्या घरच्यांप्रमाणेच अनेक रसिकांचे 'फेवरेट' असणार यात शंका नाही. खरोखरच धक्कादायक बातमी. :(

थोर अभिनेते, दिग्दर्शक आणि महत्वाचे म्हणजे एक चांगला माणूस यांना विनम्र श्रद्धांजली.

सत्याचे प्रयोग's picture

7 Dec 2013 - 9:17 pm | सत्याचे प्रयोग

भावपूर्ण श्रद्धांजली.

विकास's picture

7 Dec 2013 - 9:32 pm | विकास

ही बातमी वाचून खूप वाईट वाटले...

सुमीत भातखंडे's picture

7 Dec 2013 - 9:43 pm | सुमीत भातखंडे

बातमी.
भावपूर्ण आदरांजली.

आनंद घारे's picture

7 Dec 2013 - 9:50 pm | आनंद घारे

विनयची आणि माझी ओळख झाली नव्हती, पण तो मुंबई दूरदर्शनवर काम करत असतांनापासून मला आवडत होता आणि त्याला जवळून पहायच्या काही संधी मला योगायोगाने मिळाल्या होत्या. यामुळे नेहमीच त्याच्याबद्दल एक आपुलकी वाटत आली होती. त्याच्या अशा अकाली निधनाची धक्कादायक बातमी वाचावी लागेल असे कधी वाटले नव्हते. त्याच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होवो अशी प्रार्थना.

लाल टोपी's picture

7 Dec 2013 - 10:24 pm | लाल टोपी

मराठीतील अतिशय गुणी अभिनेता गेला. उत्कृष्ठ शब्दफेक भूमिकेचा सखोल अभ्यास असणारा एक कलाकार. भावपूर्ण श्रध्दांजली.

अवतार's picture

7 Dec 2013 - 10:33 pm | अवतार

आणि रंगभूमीला इतक्या वर्षांनंतर जरा बरे दिवस येत असतांनाच आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, सतीश तारे, सुधीर भट आणि आता विनय आपटे ह्यांची एग्झीट व्हावी ह्याला काय म्हणावे?

मुक्त विहारि's picture

7 Dec 2013 - 10:35 pm | मुक्त विहारि

कालाय तस्मै नमः

संवाद-फेकी वर जबरदस्त प्रभुत्व असणारा अजून एक उत्तम कलाकार देवाकडे गेला.

बहूदा देवाला पण ह्यावेळी चांगल्या माणसांची निकड भासत असावी.

चिगो's picture

7 Dec 2013 - 10:39 pm | चिगो

एक ताकदवान, उत्तम कलाकार गेला.. श्रद्धांजली..

पैसा's picture

7 Dec 2013 - 10:40 pm | पैसा

दारू आणि हृदयविकार्/बी.पी. टेन्शनचे आजार. अजून किती कलाकार बळी पडणार आहेत?

सहमत पैसाताई. हेवी स्खेड्युल, पार्टीज, इन्टरनल पॉलिटिक्स, इमेज, लोकप्रियता, सुपार्‍या... इ. मागे पळताना यांच्यातल्या कलाकाराचे आयुष्य मात्र नाहक कमी होत चाल्लंय......

अवांतरः हे "सुपार्‍या" प्रकरण काय असतं? मी दोनतीन लोकांना हा शब्द वापरताना ऐकलंय. (आणि कुणीच दाऊदसारखं दिसत नव्हतं)

चौकटराजा's picture

9 Dec 2013 - 1:57 pm | चौकटराजा

सुपारी म्हणजे लांबगावी निरनिराळे समारंभ , दुकानांची उदघाटने, गरबा, ई ई ई साठी पैसे घेऊन निमंत्रण स्वीकारणे.

अर्धवटराव's picture

7 Dec 2013 - 11:00 pm | अर्धवटराव

माझा आवडता कलाकार गेला :(
विनम्र श्रद्धांजली.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Dec 2013 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा

अरे बाप रे...! :(

प्यारे१'s picture

8 Dec 2013 - 12:45 am | प्यारे१

सॅड!
अस्थमा अ‍ॅटॅक बद्दल मागे वाचलं होतं. त्यातून बरे नि बारीक होऊन छान काम करत होते.
असो.
भावपूर्ण श्रद्धांजलि नि मृतात्म्यास सद्गती लाभो हीच प्रार्थना.

बॅटमॅन's picture

8 Dec 2013 - 12:51 am | बॅटमॅन

ऐला......विनय आपटे इत्क्या लौकर जातील असं वाटलं न्हौतं :( ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2013 - 1:24 am | प्रभाकर पेठकर

विनय आपटे ह्यांच्याशी एकदाच भेट झाली होती. तेंव्हा ते दूरदर्शनवर निर्माते होते. मी तेंव्हा बालनाट्यात काम करत होतो.
तसेच त्यावर्षी आमच्या बालनाटकाला नाट्यदर्पण पुरस्कार मिळाला होता. ते बालनाट्य दूरदर्शनवर दाखविले जावे म्हणून त्या नाटकाचा निर्माता/दिग्दर्शक आणि माझा मित्र प्रयत्नशील होता. त्या संदर्भात आम्ही दोघेही विनय आपटे ह्यांना भेटलो होतो. पण दूरदर्शन ह्या माध्यमासाठी श्री. विनय आपटे ह्यांनी जे बदल नाटकात सुचविले होते ते माझ्या मित्रास रुचले नाहीत आणि आमचं दूरदर्शनवर झळकणं बारगळलं. असो. विनय आपटे ह्यांच्या बरोबरच्या त्या अल्पभेटीत त्यांच्या नाट्यविषयक ज्ञानाने मी भारावून गेलो होतो. आज पुन्हा एकवार त्या आठवणींना उजाळा मिळाला.
विनय आपटे ह्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो हीच प्रभूचरणी इच्छा.

उपास's picture

8 Dec 2013 - 3:55 am | उपास

भूमिकेतून इतकी जवळीक साधली ह्या माणसाने, अरे तुरे च करायचो आम्ही त्याला सगळे (इतक्या मोठ्या वयाचा असून सुद्धा..) वाईट्ट वाटलं! तो खर्जातला आवाज, आवाजातली जरब.. निळूभाऊंनंतर कुणाच्या आवाजातला दम आवडला असेल तर विनयच्या.. एकदम बिनधास्त तितकाच दिलदार पण तरीही रोख आणि ठोक माणूस! अस्सल मराठी रांगडा म्हणता येईल असा.. बोलण्यातला पॉज तर लाजवाब, कान खेचून घेईल ऐकणार्‍याचे अशी लकब आणि नजर समोरच्यावर वाघासारखी रोखलेली.. नावातच फक्त काय तो विनय! :)

अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' मधून विनय बद्दल बरंच काही कळतं..
विनय आपटे, खुपते तिथे गुप्ते
विनय आपटेला विनम्र श्रद्धांजली, खूप काही दिलसं तु आम्हाला!

शिद's picture

8 Dec 2013 - 4:07 am | शिद

भावपुर्ण श्रद्धांजली...

विकास's picture

8 Dec 2013 - 7:35 am | विकास

म.टा. वृत्त

जेष्ठ नाट्यदिग्दर्शक , निर्माते , अभिनेते आणि मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विनय आपटे (६२) यांचे शनिवारी रात्री अस्थमाच्या अॅटॅकने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, रविवारी ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आपटे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. आपटे यांच्या निधनाने मराठी-हिंदी सिनेसृष्टीसह रसिकांनाही मोठा हादरा बसला आहे.

रक्तदाबाचा त्रास बळावला

विनय आपटे यांना अडीच महिन्यांपूर्वी सिमला येथे सुरू असलेल्या शुटिंग दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तब्बल महिनाभर कोकिलाबेन हॉस्पिटलातील आयसीयूत ते उपचार घेत होते. श्वसनाचा त्रास बळावल्याने त्यांना पुन्हा गेल्या महिन्यात हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. १५ दिवसांपूर्वी त्यांना घरी सोडण्यात आले होते. घरीच विश्रांती घेत असताना शुक्रवारी दुपारी रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे ते लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. पण शनिवारी सकाळी ते कोमात गेले. त्यानंतर मल्टिपल ऑर्गन फेल्यूअर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

आपटे यांचा थोरला मुलगा अमेरिकेतील ' व्हॉइस ऑफ अमेरिका ' चॅनेलमध्ये पत्रकार आहे. वडिलांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे १५ दिवसांपूर्वी तो पत्नीसह मुंबईत आला होता. शुक्रवारी रात्रीच तो पुन्हा अमेरिकेला रवाना झाला होता.

दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार

दरम्यान , विनय आपटे यांचे पार्थिव आज , रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून अंधेरीच्या शास्त्रीनगर येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील , असे आपटे कुटुंबीयांच्या निकटवर्तींयांकडून सांगण्यात आले.

विकास थ्यांक यु. विनय आपटे ६ १ वर्षाचे होते. मी जेव्हा त्यांची निधनाची बातमी वाचली तेव्हा त्यांचा FB profile चेक केला होता त्या मध्ये त्यांच्या बरोबर एक लहान मुलगा दिसला मला वाटले कि तो त्यांचा मुलगा आहे. मला जर आश्चर्य वाटले कि ६ १ वर्षाच्या माणसाला इतका छोटा मुलगा असू शकतो ? परंतु तुम्ही दिलेली माहिती वाचून असे वाटते कि तो त्यांचा नातू असेल

सांजसंध्या's picture

8 Dec 2013 - 8:04 am | सांजसंध्या

भावपुर्ण श्रद्धांजली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Dec 2013 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार

बातमी वाचल्यावर वाईट वाटल.
एक चांगला कलाकार काळाच्या पडद्याआड गेला
त्यांना सद्गती मिळो ही इश्र्वर चरणी प्रार्थना

अनिरुद्ध प's picture

9 Dec 2013 - 5:15 pm | अनिरुद्ध प

श्रद्धांजली,ईश्वर म्रुतात्म्यास सद्गती देवो.

सन्जोप राव's picture

9 Dec 2013 - 5:32 pm | सन्जोप राव

वाईट बातमी.
विनय आपटेंचे एकूण कलंदर व्यक्तिमत्व पाहाता त्यांचे निधन 'अकाली' झाले असे म्हणवत नाही. अशा गुणी कलाकारांपैकी बर्‍याच लोकांना व्यसनांनी गाठलेले असते. एकून कलेची झिंग कमी पडते म्हणून म्हणा किंवा जीवनाचा प्रखर झोत सहन होत नाही म्हणून म्हणा, अशा लोकांना जिवंत राहाण्यासाठी अशी एखादी नशा गरजेची वाटत असते. निव्वळ कलाक्षेत्रातीलच नव्हे तर इतरही क्षेत्रातील गुणी माणसे आपले आयुष्य असे बेभानपणे उधळून देताना दिसतात. इतिहास हेच सांगतो, आणि त्यात फारसा बदल होण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही' हे आठवून उगी राहावे.
तरीही वाईट बातमी.
जाताजाता: 'त्यांच्या आत्म्याला ईश्वर चिरशांती देवो' हे वाक्य प्रतिकात्मक वगैरे असले तरी आता शक्यतो टाळावे असे वाटते. 'श्रद्धांजली', अगदीच गहिवरुन आले असेल तर 'भावपूर्ण श्रद्धांजली' हे पुरेसे आहे. कुणाच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करताना आत्मा आणि ईश्वर या काल्पनिक गोष्टींचा आधार आता टाळावा असे मला वाटते. एरवी दाभोलकरांच्या निधनाच्या बातमीतही 'आर.आय.पी.' वगैरे वाचले आहे.

मृगनयनी's picture

9 Dec 2013 - 7:15 pm | मृगनयनी


कुणाच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करताना आत्मा आणि ईश्वर या काल्पनिक गोष्टींचा आधार आता टाळावा असे मला वाटते. एरवी दाभोलकरांच्या निधनाच्या बातमीतही 'आर.आय.पी.' वगैरे वाचले आहे.


@ सन्जोप राव.... मुळात कोणत्याही सजीवाचा "मृत्यू" हा तेव्हाच होतो, जेव्हा त्याच्या शरीरातला "आत्मा" ते पर्टीक्युलर शरीर सोडून जातो. अर्थात कुणी मानो वा न मानो... हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
दाभोळकरांच्या बाबतीतही काय विचित्र योगायोग आहे.... त्यांची हत्या देखील त्या ओंकारेश्वरपूलावर झाली... ज्याच्या एक्झॅक्टली खालच्या बाजूला मृतांचे श्राद्ध घातले जाते.. व पिन्डाला कावळे शिवतात....!!!!!!
आणि त्याच दिवशी पहाटे सुप्रसिद्ध ज्योतिर्भास्कर व महान गणेशभक्त श्री जयंत साळगावकरांचे वृद्धापकाळाने निधन झाले. समाजासाठी कार्य करणार्‍या दोन व्यक्ती!... पण एकाची निर्घृण हत्या.. आणि एकाचा महामृत्यू! .
विश्वाचा अफाट पसारा चालवणार्‍या त्या शक्तीचे मानवांसाठी काही संकेत असतात .... ज्यांना कळतात .. ते भाग्यवान! या शक्तीलाच ईश्वर मानतात..... पण त्या शक्तीच्या निर्गुण रुपावर श्रद्धा ठेवणे सहसा शक्य नसल्यामुळे राम, कृष्ण, देवी अश्या सगुण रुपात भक्त आपल्या ईश्वराला बघतात....
__________________________________
बाकी काही लोक असंही म्हणतात, की अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुढे नेण्यासाठी आणि विधेयक पास करण्यासाठी शेवटी दाभोळकरांचा नरबळी द्यावाच लागला की!!! ..

सन्जोप राव's picture

10 Dec 2013 - 5:48 am | सन्जोप राव

मुळात कोणत्याही सजीवाचा "मृत्यू" हा तेव्हाच होतो, जेव्हा त्याच्या शरीरातला "आत्मा" ते पर्टीक्युलर शरीर सोडून जातो. अर्थात कुणी मानो वा न मानो... हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
हे धादांत खोटे विधान आहे. याला कोणताही पुरावा नाही. 'आत्मा' ही एक भ्रामक कल्पना आहे. त्याचे अस्तित्व कधीही सिद्ध झालेले नाही
विश्वाचा अफाट पसारा चालवणार्‍या त्या शक्तीचे मानवांसाठी काही संकेत असतात .... ज्यांना कळतात .. ते भाग्यवान! या शक्तीलाच ईश्वर मानतात..... पण त्या शक्तीच्या निर्गुण रुपावर श्रद्धा ठेवणे सहसा शक्य नसल्यामुळे राम, कृष्ण, देवी अश्या सगुण रुपात भक्त आपल्या ईश्वराला बघतात....
अशा भोंगळ विचारांनीच समाजाचे, परिणामी जगाचे अपरिमित नुकसान झाले आहे. विश्वाचा पसारा चालवणारी अमुक अशी एक व्यक्ती नाही. विश्वाचा पसारा काही नियमांनी चालतो हे मान्य. त्या नियमांना विज्ञान असे म्हणतात.
बाकी काही लोक असंही म्हणतात, की अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुढे नेण्यासाठी आणि विधेयक पास करण्यासाठी शेवटी दाभोळकरांचा नरबळी द्यावाच लागला की!!! ..
लोक काय म्हणतात यावर विधान करणे बालीशपणाचे आहे. अंधस्रद्धा निर्मूलनाची चळवळ दाभोलकर जिवंत असते तरी पुढे गेलीच असती. विधेयक अद्याप पास झालेले नाही. त्यावरील अध्यादेश निघणे यामागची कारणे राजकीय आहेत.

अनुप ढेरे's picture

10 Dec 2013 - 4:31 pm | अनुप ढेरे

विनय आपटे यांना श्रद्धांजली !

श्रद्धांजलीच्या धाग्यावर परत अंधश्रद्धेवर चर्चा! वाईट वाटलं.