पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस पहिला-दुसरा/भाग १

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in भटकंती
26 Nov 2013 - 7:12 pm

नमस्कार मंडळी,

श्रीमती सोनाली मुखर्जी ह्यांचा "फुकेत-थायलंड" धागा पाहुन मी २०१२ साली मित्रासोबत केलेली टुर आठवली. त्या सफरीचे काहि निवडक फोटो येत्या काहि भागात देतोय. आशा आहे पाकॄ सारखाच हा धागाहि गोड मानुन घ्याल.

फोटोंमधुन थायलंडचं सॄष्टिसौदर्य तुम्हि अनुभवाव हाच निखळ हेतु आहे त्यामूळे विस्तृत माहिती न देता फक्त फोटो देत आहे.

१. बँकॉक एअरपोर्टवर उतरल्यावर जागोजागी असलेले मनमोहक ऑर्किड आपलं लक्ष वेधुन घेतात

orchids

२. वेलकम टु थायलंड

welcome

३. बँकॉक एअरपोर्टवर २ तासाचा हॉल्ट घेउन लेगेच पुखेत कडे प्रयाण केले. पुखेतचं पहिलं दर्शन

Phuket

४. हॉटेलच्या वाटेवर जाताना घेतलेल्या एका मंदिराचा फोटो

Temple

५. पॅटाँग बीच

Patong beach

६. उडान भरने के लीये तैयार (पॅरॅसेलींग)......

Udan

७. हॉटेलच्या (स्वच्छ) गल्ल्या

gallya

८. ईबीस हॉटेलच्या आवारातील देउळ

Deol

९. दुपारचा मेनु.......बीयर नी मात्र निराशा केली

Menu 1

menu 2

१०. हे कच्च्या पपईचं सॅलेड अप्रतिम लागतं. जो पर्यंत बँकॉक मधे होतो तो पर्यंत अनेकदा मागावलं......छान जेवण झाल्यावर मस्त ताणुन दिली.

Papaya salad

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

26 Nov 2013 - 7:28 pm | अनिरुद्ध प

मस्तच आहेत्,सोनालीताईंच्या धाग्यातिल कसर भरुन काढलीत त्याबद्दल धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2013 - 7:33 pm | प्रभाकर पेठकर

अरे व्वा..! मस्तं छायाचित्रं.
आता मला बँकॉकच्या सहलीची छायाचित्र टाकली पाहिजेत.

बाकी, दिपक. कच्ची पपई फार 'गरम' हे लक्षात असू द्यावे.

दिपक.कुवेत's picture

26 Nov 2013 - 7:49 pm | दिपक.कुवेत

'गरम' पुरुषांना पण बाधतं?

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2013 - 8:28 pm | प्रभाकर पेठकर

उष्ण प्रकृतीच्या पुरुषांनाही लघ्वीस-शौचास आग होणे, तळपाय, डोळे ह्यांची जळजळ तसेच सर्वसामान्यपणे शरीराची उष्णता वाढून होणारे सर्व त्रास होऊ शकतात.

सुनील's picture

27 Nov 2013 - 9:03 am | सुनील

अशा वेळी बियरचा उतारा योग्य ठरावा! ;)

बार्ली बरी म्हणतात गर्मीला!! पण बियरने निराशा केली म्हणता, म्हणजे नक्की काय?

संजय क्षीरसागर's picture

26 Nov 2013 - 8:01 pm | संजय क्षीरसागर

ती पपईच्या सॅलडची पाककृती लिहा आणि पॅरासेलींगचे फोटो (असतील तर) टाका. मस्त पोस्ट आणि पुढच्या भागाची प्रतिक्षा.

दिपक.कुवेत's picture

27 Nov 2013 - 12:02 pm | दिपक.कुवेत

हि बघा पपईच्या सॅलेडची पाकॄ. पॅरासेलींगचे अजुन एक/दोन फोटो आहेत ते टाकतो.

संजय क्षीरसागर's picture

28 Nov 2013 - 8:58 am | संजय क्षीरसागर

सॅलेडबद्दल धन्यवाद!
*KISSING*

सोत्रि's picture

26 Nov 2013 - 8:58 pm | सोत्रि

बीयर नी मात्र निराशा केली

का तेही सांगा की...

- (भटक्या) सोकाजी

दिपक.कुवेत's picture

27 Nov 2013 - 11:59 am | दिपक.कुवेत

अहो बीयर म्हणजे नुसतं पाणी होतं त्यातल्या त्यात हेनीकन ब्रँड जsssssरा बरा वाटला. आपल्याकडे बीयर प्यायल्यावर निदान थोडा वेळ तरी जशी किक बसते तशी अजीबात बसली नाहि म्हणून मूड ऑफ झाला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2013 - 11:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त फोटो. थायलंड फिरायला मस्त जागा आहे.

अजून फोटो आणि थोडेबहूत लिखाण करा की जरा वेळ काढून. मजा येईल.

दिपक.कुवेत's picture

27 Nov 2013 - 12:13 pm | दिपक.कुवेत

फोटो टाकतो पण लिहिण्यात आपला हातखंडा नाहि हो! तरी प्रयत्न करतो.

अग्निकोल्हा's picture

26 Nov 2013 - 11:11 pm | अग्निकोल्हा

तिकडे जिकडे तिकडे चोहिकडे सर्व महत्वाच्या जबाबदार्या स्त्रिया हिरिहिरिने पार पाडतात? अगदी एखाद्या कुटुंबात अमुक ठिकाणचा पत्ता जरी पुरुषाला विचारला तरी पटकन घरातील स्त्री पुढे येउन मदत करते???

अन (बहुतांश)पुरुष फक्त दारु ढोस्तात? अन आराम फर्मावतात ?

स्पंदना's picture

27 Nov 2013 - 8:19 am | स्पंदना

नक्की कोठे आग लागलीय?

अग्निकोल्हा's picture

27 Nov 2013 - 10:14 pm | अग्निकोल्हा

का? बंब विकत घेतलाय का?

स्पंदना's picture

27 Nov 2013 - 8:20 am | स्पंदना

मस्त फोटो. सुरेख जेवण.
समुद्राचे फोटो फक्त एकच काढुन संपले?

नानबा's picture

27 Nov 2013 - 9:08 am | नानबा

यूं तो एकदम बढिया धागा डाल दिया आपने. फोटो भी मस्तच...
ते पॅरासेलिंगबद्दल तेवढं विस्तृत लिहा आणि अजून फोटू टाका की..

दिपक.कुवेत's picture

27 Nov 2013 - 12:11 pm | दिपक.कुवेत

फोटु बरेच आहेत टाकतो सवडिने. पॅरासेलिंगबद्दल काय सांगु महाराजा......अवर्णनीय असा अनुभव होता तो. तरी बरं फुकेत मधे तुमच्या पाठि त्यांचा माणुस असतो; पट्टाया मधे तुम्हाला एकटेच वरती पाठवतात. पण त्या माणसाची मात्र कमाल असते! आपल्याला एवढे लॉक्स/मजबूत बांधतात पण तो साधं लाईफ जॅकेटहि न घालता आपल्यासोबत वरती येतो. वरुन बघितल्यावर जो नजारा दिसतो......आह त्याला तोड नाहि. खाली निळशार पाणी, एका मुक्त पक्ष्यासारखे तुम्हि हवेत विहरताय......त्या आठवणी लाईफ टाईम लक्षात राहतील अशा आहेत.

बाकि सगळ्यांचेहि धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळे हुरुप वाढलाय. फोटो आणि वर्णन (लिहिता आलं तर) जरुर टंकतो.

त्रिवेणी's picture

27 Nov 2013 - 1:47 pm | त्रिवेणी

एकाच वेळी इतक्या जणांच्या सहली अटेंड करून जीव दमला बाई माझा.
बाकी फोटू मस्तच.

मी_आहे_ना's picture

27 Nov 2013 - 1:54 pm | मी_आहे_ना

पु.भा.प्र.

दिपक.कुवेत's picture

27 Nov 2013 - 1:56 pm | दिपक.कुवेत

वर म्हटल्याप्रमाणे हे घ्या अजुन फोटो.....पॅटाँग बीच, त्याचा परीसर आणि पॅरेसेलींग. आवडले तर जरुर सांगा.

१.
Beach 1

२.
2

३.
3

४.
4

५.
5

६.
6

७.
7

८.
8

९.
9

१०.
10

११.
11

१२.
12

१३.
13

१४.
14

१५.
15

१६.
16

१७. ह्या टु व्हिलर घेउन तुम्हि फुकेत मधे अगदि बिनधास्त कुठेहि फिरु शकता.
17

नानबा's picture

27 Nov 2013 - 2:17 pm | नानबा

आवडले तर जरुर सांगा.

ही घ्या पोचपावती. भारी फोटु. ३,१०,१७ विशेष आवडेश... :)

अक्षया's picture

27 Nov 2013 - 2:44 pm | अक्षया

जाण्याची इच्छा झाली फोटो पाहुन.. :)

प्यारे१'s picture

27 Nov 2013 - 8:26 pm | प्यारे१

+११११११

मस्त फोटो!

कोमल's picture

27 Nov 2013 - 2:51 pm | कोमल

ज्जे बात है ठाकूरजी..

बहोत खुब..

सभी तस्वीरे देख के, हमेंभी वहाँ जानेका मन कर रहा है..

अभी निकलती हूं धन्नो को लेके

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2013 - 3:00 pm | अत्रुप्त आत्मा

लै भारी... :)

वेल्लाभट's picture

27 Nov 2013 - 8:17 pm | वेल्लाभट

अरे क्या बात है
छान फोटो.... ते सगळे रस्ते सगळे बीच आठवले...

सुरेख सुरेख! मस्तच. पटाया छान आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2013 - 8:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

पैसा's picture

27 Nov 2013 - 10:07 pm | पैसा

सगळे फोटो अप्रतिम! मस्त धमाल केलेली दिसतेय!

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Nov 2013 - 10:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

मज्जा केलीत राव

प्रचेतस's picture

27 Nov 2013 - 10:16 pm | प्रचेतस

मस्त फोटो :)

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2013 - 2:10 am | प्रभाकर पेठकर

पटायाच्या आठवणी पुन्हा जागवल्यात. मस्त स्वच्छ किनारा. हेनिकॅन आणि फोस्टर्स माझ्या आवडत्या बिअर्स. खाण्याच्या बाबतीत थाई फुड कांही दिवस आवडते पण आपल्या भारतिय जेवणाची आठवण येऊन पाय आपसुक पंजाबी उपहारगृहाकडे वळतात. पण एकूणात निवांत रजा उपभोगायला हे ठिकाण अतिशय नयनरम्य आणि उत्साहवर्धक आहे.

रेवती's picture

28 Nov 2013 - 2:39 am | रेवती

भारीये हां. अगदी स्वच्छ!
पाकृ लिहायला जमतीये म्हणजे फोटूंचं वर्णनही जमेल.

स्पंदना's picture

28 Nov 2013 - 4:37 am | स्पंदना

अ‍ॅडवलेले फोटो एकदम तडका!!