पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस पहिला-दुसरा/भाग १
नमस्कार मंडळी,
श्रीमती सोनाली मुखर्जी ह्यांचा "फुकेत-थायलंड" धागा पाहुन मी २०१२ साली मित्रासोबत केलेली टुर आठवली. त्या सफरीचे काहि निवडक फोटो येत्या काहि भागात देतोय. आशा आहे पाकॄ सारखाच हा धागाहि गोड मानुन घ्याल.
फोटोंमधुन थायलंडचं सॄष्टिसौदर्य तुम्हि अनुभवाव हाच निखळ हेतु आहे त्यामूळे विस्तृत माहिती न देता फक्त फोटो देत आहे.
१. बँकॉक एअरपोर्टवर उतरल्यावर जागोजागी असलेले मनमोहक ऑर्किड आपलं लक्ष वेधुन घेतात
२. वेलकम टु थायलंड
३. बँकॉक एअरपोर्टवर २ तासाचा हॉल्ट घेउन लेगेच पुखेत कडे प्रयाण केले. पुखेतचं पहिलं दर्शन
४. हॉटेलच्या वाटेवर जाताना घेतलेल्या एका मंदिराचा फोटो
५. पॅटाँग बीच
६. उडान भरने के लीये तैयार (पॅरॅसेलींग)......
७. हॉटेलच्या (स्वच्छ) गल्ल्या
८. ईबीस हॉटेलच्या आवारातील देउळ
९. दुपारचा मेनु.......बीयर नी मात्र निराशा केली
१०. हे कच्च्या पपईचं सॅलेड अप्रतिम लागतं. जो पर्यंत बँकॉक मधे होतो तो पर्यंत अनेकदा मागावलं......छान जेवण झाल्यावर मस्त ताणुन दिली.
वाचन
12931
प्रतिक्रिया
34