ग़ावातलं भुत

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
21 Nov 2013 - 11:01 am

‘भुत भुत.. भुत... भुत....’
आसा आवाज विहीरीजवळ जसा घुमला तसे ग़ावातले लोक जाग़े झाले.
पण घराबाहेर कोणी पडेना, का ? तर मध्यरात्री नुकतीच आमावस्या लाग़ली होती, कुत्री भुकत होती,रडत होती. जो तो घरात दडुन बसावा तसा बसलेला.
सकाळ झाली आणि जो तो घरात लिंबु दोरा बांधु लाग़ला, नारळ फोडु लाग़ला, सकाळी बायका विहीरीवर पाणी भरण्यास ग़र्दी केली होती,त्या विहीरीवर एकच विषय ‘भुताचा’, कोणि म्हणत काल रात्री भुत दिसलं,तर कोणि म्हणत भुताची पालखी निघाली रात्री,
आता बायकाच्या तोडंचा विषय पुर्ण ग़ावभर झाला,आता ज्या त्या घरात भुताच्या बाता. घरची पोरं पुरी भुताच्या नावानं घाबरु लाग़ले, काहीनी तर मुलाच्यावरुन लिंबु उतरुन टाकले, ग़ावात कोणाला ताप आला आसेल त्याला भुतानं झपाटलंय म्हणुन पायातली खेटरं उतरुन विहीरीजवळ टाकत होती.सकाळ पासुन विहीरीच्या पड्याला लिंबु,कुकुं,हाळद,बुट्या पडलेल्या होत्या, काहीनी तर कोँबडे मारुन उतरुन टाकले होते.
जेव्हा हे ग़ांवभर झालं,तेव्हा ग़ण्यानं कबुल केलं की,म्या भुताला पाहीलय,हे जेव्हा मोठ्या लोकांना माहीत झालं तेव्हा सभा घ्यायचं ठरवलं.
शेवटी चावडीवर सायकांळी या भुतावर ग़्रामसाभ घेण्यात आली,गावं सगळं जमा झालं होतं, सभा चालु होईपर्यत सगळ्यांच्या तोंडात भुताचाचं विषय होता,
सभेला ग़ावातील आनेक मान्यवर मंडळी होती, मग़ संरपचानी विषय काढला,
‘हे बघा आपल्या ग़ांवात भुत हाय हे पहील्या पासुन माहीती हाय,पण ते आता जागे झालंया,कुणाच्या आग़ांत शिरलं सांग़ता येत नाही,’
भुत जाग़ं झालया म्हटल्यावर गावकर्याच्यात बडबड चालु झाली,
सरपंच म्हणाले,’हे पहा काही घाबरु नका,इथं फक्त ग़ण्यानं भुत रातच्याला बघितलं हाय, ते भुत कसं हाय ते ग़ण्या खुद सांग़तो बघा,’
सरपंचानी ग़ण्याला पुढ करुन सांग़ायला सांग़ितलं,तसा ग़ण्या लाजत पुढ आला आणि ग़ावकर्याना सांग़ु लाग़ला,’परवा दिसी रातच्याला वाटीभर खरडा व भाकर खाली आणि पोट बिघडलं,मग़ रातच्याला पोटात कळा आल्या ,सडांसला जावं म्हणुन बाहेर पडलो, मला आमावस्या हाय माहीत नव्हतं, विहीरीकडं सडांसला चाललो ,संडासला बसावं म्हटंल आणि विहीरीत वाकुन बघतोय तर भुत विहीरीत पायरीवर उभं होतं, जसा बघितलो आणि ठो ठो भुत भुत आरडत तिथनं पाळालो,’
हे सांग़ताच ग़ावकर्याच्यात आता खुपच ग़ोधंळ चालु झाली,
सरपंच म्हणाले,’हे पहा आज रातच्याला आमावस्या सपंली की आपन समंद्यानी उद्याच्या उद्या ती विहीर मुजवुन टाकु,म्हणजे भुत कायमचं निघुन जाईल’,
सर्वानी सरपंचाना प्रतीसाद दिला, उद्या सकाळी दहा वाजता ग़ावकर्यानी जमायचे ठरले.
सर्व ग़वकरी आप आपल्या घरी ग़ेले,रात्रीला मात्र एक जर कुत्रं भुकलं तर ग़ावकरी भीऊ लाग़ले,सायकाळी सात नंतर कोणि सुद्धा बाहेर पडत नव्हंत.
सकाळ झाली चावडी जवळ सर्व ग़ावकरी जमा झाले, फावडे, बुट्या,कुदंळ घेऊन विहीरीकडे निघाले.
सुमारे दहाच्या सुमारास शहरातुन येणारी एस.टी. ग़वात थांबली, ग़ावातुन शहरात जाऊन कामधंदा करणारी ग़ावकरी एस.टी.तुन उतरु लाग़ली, त्यात ग़ावचे मास्तर मोरे,पाटील,माने,कांबळे सुद्धा होते,
चांवडीवर येताच त्यानी ग़ावात कोणिच दिसत नव्हते,म्हणुन मास्तरानी चावडीसमोर आसलेले रामप्रसाद या हाँटेलात ग़ेले, तेथे चौकशी केली आसता सग़ळा प्रकार कळुन आला. मग़ मोरे मास्तराना हा सर्व प्रकार कळाला व ते सरळ तेथुन विहीरीकडे निघाले ,त्याच्याबरोबर इतर मास्तर हि निघाले.
विहीरीजवळ जाताच त्यानी तो सग़ळा प्रकार थांबवीला, सर्व ग़ावकर्याना एकत्र झाडाखाली ग़ोळा केले,आणि म्हणाले,’हे पहा ग़ावात किंवा या विहीरीत भुत वैग़ेरे काही नाही, भुतावर कींवा भुताटकीवर विश्वास ठेवु नका, ही सर्व आधंश्रद्धा आहे,
आणि ग़ण्यानं जे काही तुम्हाला सांग़ितले आहे त्यावर विश्वास ठेऊ नका. कारण त्या रात्री त्या विहीरीत मीच आघोंळ करत होतो,'
सर्व ग़ावकरी एकमेकाकडे पाहुन कुजबुजु लाग़ली,
मास्तर म्हणाले,’म्हणजे झालं काय ते सांग़तो,त्या रात्रीच्या दुसर्या दिवशी शहरात मतदान आसल्याने आमची ड्युटी मतदान केद्रांवर होती, त्यामुळे सकाळी सात वाजता मला मतदान केंद्रावर पोहचायचे होते,म्हणुन मी त्या रात्री लवकर झोपलो आणि जाग़ आली तेव्हा मी घड्याळ पाहीले तर माझं घड्याळ बंद पडलेलं,त्यावेळी मला वाटलं मी भिंतीवरील घड्याळ का घेतले नाही?, पण मला वाटले पाहटेचे पाच वाजले आसतील म्हणुन मी विहीरीवर आघोंळीला ग़ेलो, आघोंळ करता करता वरुन भुत भुत आसा ओरडण्याचा आवाज आला,मी घाबरुन वर पाहीले तर कोणी नव्हते,वरती येऊन पाहतो तर कोणी तर पळताना दिसला,तसा मी आघोंळ करुन बाहेर पडलो, खोलीवर आलो,सकाळच्या सहाच्या ग़ाडीची वाट पाहु लाग़लो,पण सकाळ काही होईना आणि ग़ाडी काय येईना,तासभर झाला आसेल वाटलं तरी रात्रच होती म्हणुन सकाळ होई पर्यत जाग़ा राहीलो,आघोंळीनं झोप येईना,बसलो मग़ सकाळची वाट पाहत,तर आसा सग़ळा प्रकार होता, सकाळी ग़ाडीत बसलो आणि नंतर विचार केला की मी रात्री साधारण एक दोनच्या सुमारास विहीरीवर आघोंळ केली,’
ग़ावकरी ग़ालाला हात लावत एकमेकाकडे पाहत आश्चर्याने पाहात चर्चा करु लाग़ले,
पुढे मास्तर म्हणाले,’हे पहा भूत वैग़रे काही नसते हे घडलेल्या प्रकरणावर सर्वाना कळाले आसेल,तर मग़ विहीरीतील सर्व माती काढा आणि विहीर साफ करा,’
आसे म्हणताच सर्व ग़ावकरी भुताच्या विषयावर हासु लाग़ले, आणि विहीर साफ करायला वळाले.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

आनन्दिता's picture

28 Nov 2013 - 10:30 am | आनन्दिता

तुझ्या प्रतिसादातली लाईन पार दुसर्या पानावर चाललेय..

प्यारे१'s picture

28 Nov 2013 - 10:40 am | प्यारे१

असं कसं शक्य आहे पण!
चला बरं एकतर इकडच्या अथवा तिकडच्या लायनीत या!

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2013 - 10:50 am | प्रभाकर पेठकर

४-५ प्रतिसादांची गरज आहे. पण प्रतिसाद जास्त मोठे देऊ नका.

मग केवढे असावेत प्रतिसाद??

रेल्वे स्थानकावरच्या तिकीट खिडकी समोरची लाइन वाटतीये हि .

उगाच उजवी कडे वाकडी होती जाते .
आणि थोड्या वेळाने पार आडवीच

इरसाल's picture

28 Nov 2013 - 1:15 pm | इरसाल

जोपर्यन्त एक एक अक्षर उभे रहात नाही तो परयन्त द्यायचा विचार करतोय

प्रसाद गोडबोले's picture

29 Nov 2013 - 4:51 pm | प्रसाद गोडबोले

आवरा....

उद्दाम's picture

7 Dec 2013 - 2:02 pm | उद्दाम

हायला, प्रतिसाद आता स्क्रीन फाडून उजव्या बाजुने बाहेर पडणार की काय?

बर्फाळलांडगा's picture

14 Jan 2014 - 12:33 am | बर्फाळलांडगा

.

प्रमोद देर्देकर's picture

29 Nov 2013 - 4:48 pm | प्रमोद देर्देकर

हे दुसर्या बाजुला म्हण्जे कुठ पर्यंत आणि कसे ते सांगाल काय?

न्हाईअ जुन सयपा कझा लाकीव्य नीकर. :D

जेनी...'s picture

26 Nov 2013 - 10:25 pm | जेनी...

जा तोकाघ रीआ ता :-/

आनन्दिता's picture

14 Jan 2014 - 1:57 am | आनन्दिता

काका किती लांबीचा प्रतिसाद देउ.?

धन्यवाद प्रतिसाद दिल्या बद्दल........... मला वाटले कथेतील ग़ण्यावर काँमेट भरपुर होतील....... छे पण नको तेथे पळताय

शिद's picture

21 Nov 2013 - 1:49 pm | शिद

गण्या जे करायला आला होता ते केले की नाही? का सकाळ पर्यंत बिचारा वाट पहात होता?;)

प्रभाकर पेठकर's picture

21 Nov 2013 - 2:01 pm | प्रभाकर पेठकर

'ते' केले नाही, 'झाले' असावे.

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2013 - 2:03 pm | प्रसाद गोडबोले

मी जर गण्या असतो , अन भुत असे विहीरीत खाली अंघोळ करत असते तर "नेम" धरुन भुतावरच 'ते' केले असते :D

देवांग's picture

21 Nov 2013 - 2:11 pm | देवांग

एकच नंबर *lol*

अत्रुप्त आत्मा's picture

21 Nov 2013 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

@ "नेम" धरुन भुतावरच 'ते' केले असते >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

कपिलमुनी's picture

21 Nov 2013 - 3:12 pm | कपिलमुनी

या ओळी मधे मला जीवन भौंच्या नवीन कथेची बीजे दिसत आहेत

बिजे कसली ही आसली तरी ती वाचणारी तुमच्या सारखीच आहेत

जेनी...'s picture

21 Nov 2013 - 8:51 pm | जेनी...

ओ गिर्जा काका तुमच्या ' ह्याला ' काहि हाड आहे कि नै :-/
असा प्रतिसाद देनार होती मी , पण म्हटलं नक्को :-/
उगिच कशाला ना ... :D

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2013 - 6:17 pm | टवाळ कार्टा

अश्लील अश्लील....असे ओरडले असते सगळे जर हाच प्रतिसाद कोणा पुरुषाने दिला असता तर ;)

नैतर काय च्यायला. हा अन्याव दूर झालाच पाहिजे!!!!

जेनी...'s picture

25 Nov 2013 - 12:44 am | जेनी...

*yahoo*

बाकी मरूदे, हा स्मायली कसा आणला ते आधी सांग.

पैसा's picture

21 Nov 2013 - 2:03 pm | पैसा

मिरासदारांच्या श्टायलची गोष्ट. तो नुक्तावाला ग कसा लिहिता भाऊ?

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 2:21 pm | बॅटमॅन

ग़=gJ

अत्रुप्त आत्मा's picture

21 Nov 2013 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा

को....ण म्हणतं भूत नाही????? http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scared-ghost-smiley-emoticon.gif

स्पंदना's picture

21 Nov 2013 - 4:02 pm | स्पंदना

मुवि रुसले?

कपिलमुनी's picture

21 Nov 2013 - 4:36 pm | कपिलमुनी

मुविंना गण्याची काळजी लागून राह्यली ना भौ !

मुविंना आख्ख्या मिपाची काळजी आहे, तिथे गण्या काय चीज आहे ?

उदय के'सागर's picture

21 Nov 2013 - 4:39 pm | उदय के'सागर

जीवनराव तुम्ही कथा चांगल्या लिहीता पण तुम्ही 'कॉपी' का करता हो? आता पहा ना ही कथा म्हणजे अमोल पालेकरच्या "बातों बातों मे" ची अगदी हुबेहुब 'कॉपी' आहे..... तुमच्या कथेतला गण्या म्हणजे त्या सिनेमातला 'बलराज सहानी'

पु.ले.शू.

ही कथा कशाची काँपी नसुन ..... माग़े एकदा माझ्या मित्राला आसेच रात्रीचे घड्याळ बंद पडल्याने त्याला किती वाजले माहीत नव्हते, म्हणुन सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी तो विहरीवर आंघोळीला ग़ेला व त्याला दुसर्या दिवशी कळाले की त्या रात्री आमावस्या होती ....... हाच किस्सा त्याने आम्हाला साग़ितला ..... त्यावरुनच ही कथा मी लिहली आहे .

उदय के'सागर's picture

21 Nov 2013 - 6:38 pm | उदय के'सागर

ओ हो... मित्राबरोबर झालेला किस्सा आठवून तुम्ही एक कथाच लिहीली... हे म्हणजे अगदी त्या 'खट्याळ सासू नाठाळ सुन' सिनेमा मधल्या नितीश भारद्वाज सारखंच झालं ... असो!!!

जरा आजु बाजुचे निरक्षण करा म्हणजे कथा आपोआप आठवतात

प्यारे१'s picture

22 Nov 2013 - 3:45 pm | प्यारे१

>>>काँपी
कस्लं भारीच! कसंकाय सुचतं हो तुम्हाला?
तुमच्याकडं 'टिळा' पद्धत आहे का?
एक तर वर तरी नाही तर खाली तरी. 'ग़' ला टिळा खाली 'काँ' ला वर!

बॅटमॅन's picture

14 Jan 2014 - 2:00 am | बॅटमॅन

जीवनभौ टिळक =)) =)) =))

आनन्दिता's picture

14 Jan 2014 - 2:17 am | आनन्दिता

जीवनभौ टिळक असं ' ठळक' मधे लिहा ना!

जीव़ऩभौ टिऴक़ नु़क्तावाले

ठळक धन्यवाद!!

जेपी's picture

21 Nov 2013 - 5:03 pm | जेपी

गण्याला भुत दिसल ,
कारण ,

गण्याच' स्वच्छ मन'
नव्हत , त्यांने 'आमचा खंड्या' ची
'गुरुदशिणा ' चा ' अधिकार ' काढुन घेतला .

काही राहिल्यास तुम्ही भर घाला .

mohite jeevan's picture

21 Nov 2013 - 5:14 pm | mohite jeevan

तुमचीच भर जास्त झाली

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 4:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

असं कसं ? पुढच्या सगळ्या नको, पण दोनचार लेखांची नावे येउ द्या की :)

सांजसंध्या's picture

21 Nov 2013 - 5:26 pm | सांजसंध्या

छान. पुलेशु

खटासि खट's picture

22 Nov 2013 - 4:45 pm | खटासि खट

छान छान. संध्याबाई पुलेशु म्हटल्या. आता लिवाच.

mohite jeevan's picture

24 Nov 2013 - 5:50 pm | mohite jeevan

धन्यवाद

mohite jeevan's picture

26 Nov 2013 - 12:43 pm | mohite jeevan

धन्यवाद

mohite jeevan's picture

1 Dec 2013 - 6:03 am | mohite jeevan

धन्यवाद

एकदाच त्रिवार धन्यवाद लिवा की जिवनभौ!!!!

मुक्त विहारि's picture

21 Nov 2013 - 6:59 pm | मुक्त विहारि

हम वाच़ते ऱहे़ंग़े

प्रसाद१९७१'s picture

21 Nov 2013 - 7:06 pm | प्रसाद१९७१

हल्ली जी.मो. फक्त कथा टाकून स्वस्थ बसत नाहीत तर प्रतिक्रिया पण वाचतात आणि उलट उत्तरे पण देतात.

आनन्दिता's picture

28 Nov 2013 - 1:54 am | आनन्दिता

त्यांचं नाव जीमो नसुन मोजी आहे असं नमुद करते.. जय हिंद!!

बाळ सप्रे's picture

28 Nov 2013 - 10:56 am | बाळ सप्रे

उलट उत्तरे नाही हो देत ते :-)

अग्निकोल्हा's picture

21 Nov 2013 - 8:06 pm | अग्निकोल्हा

खरच छान लिहलय!

आणि मुख्य म्ग्न्जे प्यारेंच्या मिड लाइफ़ क्रिसिस प्रतिभेच्या प्रश्नावर्च्या लेखावर आपल्या कथा विशेष शिडकावा आहेत.

mohite jeevan's picture

22 Nov 2013 - 10:38 am | mohite jeevan

धन्यवाद.....

मस्त कथा , वाचुन भ्या वाटलं .

mohite jeevan's picture

21 Nov 2013 - 9:45 pm | mohite jeevan

धन्यवाद

भौ, काय हे? आम्ही एवढे प्रतीसाद देतो. आम्हाला कधी धन्यवाद नाही..आणी.. :P

सोत्रि's picture

21 Nov 2013 - 8:50 pm | सोत्रि

मस्तच!

जीवनभौचे नाव वाचून आधी अधाश्यासारखे प्रतिसद वाचून घेतले. मग़ हा ग़ण्या कोण असा प्रश्न पडला.
'गणा मास्तर'चा तर एक पण प्रतिसाद नव्हता मग नाइलाज म्हणून कथा वाचावी लागली. वाचता वाचता घाबरलो ना मी. पण शेवटी कथेत ग़णाबरोबर मास्तरही आले म्हणून बरें झाले नाही तर थंडीताप भरलाच होता.

-(जीवनभौंच्या कथांना नव्हे तर भुतांना घाबरणारा) सोकाजी

बाबा पाटील's picture

21 Nov 2013 - 8:57 pm | बाबा पाटील

भुतांना नव्हे पण....जीवनभौंच्या कथांना घाबरणारा.(वाड्यावरचा पाटलाचा मुंजा)

काय रे देवा! हसून पुरेवाट झाली........प्रतिसाद वाचून हो!

.... धन्यवाद त्या निमित्ताने तर तुमचे लक्ष प्रतिसादाकडे ग़ेले

पिलीयन रायडर's picture

22 Nov 2013 - 5:58 pm | पिलीयन रायडर

हा टॉन्ट आहे का संपादकांना????!!

ही ही ही. असू शकतो हे कालच ध्यानात आले आहे पण आता जाम निर्लज्ज झाले आहेत सगळे संपादक! ;)

चंद्रपालच्या बॅटींगसारख लिखाण असतं तुमचं जीवनभौ.. तो कसा शैली विचित्र असली तरी खोर्‍यानं धावा काढतो.. आणि सातत्यानं..
तसचं तुम्ही खोर्‍यानं प्रतिक्रीया ओढता आणि सातत्यानं.. !!

इरसाल's picture

22 Nov 2013 - 10:18 am | इरसाल

मास्तर मला पाठ वरच्या धोपटीत भिंतीवरचं घड्याळ किंवा काखेत भिंतीवरच घड्याळमारुन विलेक्शन डुटी ला जात असल्याचे तरळले.

चावटमेला's picture

22 Nov 2013 - 2:50 pm | चावटमेला

खरं सांगायचं तर निखळ आनंद देणारी गोष्ट म्हणजे जीवन भाऊंच्या कथा. आम्ही जीवनरावांचे फॅन उगीच नाही मुळी.

mohite jeevan's picture

1 Dec 2013 - 9:13 am | mohite jeevan

धन्यवाद

विवेक वाघमारे's picture

22 Nov 2013 - 8:08 pm | विवेक वाघमारे

मी पण एकदा भूत पहिले होते; पण मी लगेच दचकून जागा झालो.

यसवायजी's picture

22 Nov 2013 - 10:24 pm | यसवायजी

आडनाव वाघमारे.. आणी घाबरताय कसले राव ;)
(ह्.घ्या)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 11:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते वाघाना मारतात पण भूतांना घाबरतात, असं पण असू शकतं ;)

जेनी...'s picture

22 Nov 2013 - 11:13 pm | जेनी...

काय म्हणता इस्पु काका .... खरच???

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

बालिके, येवढी हुश्शार तू... त्यांचे नाव आणि प्रतिसाद काय म्हणतायत ???

कम्मॉन इस्पू काका , रागाव्लात काय माझ्यावर :-/

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

गुड्, बर्‍याच दिवसांनी बालिका मूळ फार्मात आली ! राग कसला, उलट लै आनंद झाला :)

यसवायजी's picture

22 Nov 2013 - 11:40 pm | यसवायजी

फार्मात का फॉर्मात? *dash1*

*bomb* (पळतो..)

जेनी...'s picture

22 Nov 2013 - 11:48 pm | जेनी...

ए सय्ज्या गप्तु काता :-/

यसवायजी's picture

22 Nov 2013 - 11:51 pm | यसवायजी

कम्मॉन पुजाक्का , रागावलीस काय माझ्यावर ??

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

बालिकेच्या भाषेत फार्मात! पण अजून त्या भाषेची नीट प्रच्तिचे झाली नाहीय ;)

त्र्य त्र्य बुत दोन्त च्र्य

=))

बॅटमॅन's picture

23 Nov 2013 - 12:51 am | बॅटमॅन

इ च्रिएद सीइन्ग थिस अन्द लौघिन्ग लिके अन्य्थिन्ग =))

जेनी...'s picture

23 Nov 2013 - 12:58 am | जेनी...

ओह्ह रेअल्ल्य ??
=))

बॅटमॅन's picture

23 Nov 2013 - 1:26 am | बॅटमॅन

येस रेअल्ल्य =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Nov 2013 - 2:56 am | डॉ सुहास म्हात्रे

व्ह्य च्र्य ? बिग बोय्स दोन्त च्र्य... म्हाय्त नाय्का ?

विवेक वाघमारे's picture

23 Nov 2013 - 4:21 am | विवेक वाघमारे

घाबरलो नाही हो, नळाला पाणी यायची वेळ झाली ते आठवले!!!

छान आम्हाला ही दाखवा की?

थॉर माणूस's picture

27 Nov 2013 - 11:27 am | थॉर माणूस

जीवनभौ डब्बल सेच्युरी मारणार वाटतं. :)

mohite jeevan's picture

27 Nov 2013 - 9:45 pm | mohite jeevan

छान

आज हसायला कायतरी हव म्हणुन .......

लॉरी's picture

13 Jan 2014 - 11:05 pm | लॉरी

लय ब्येस हाय हे..*yes3* *YES* शेवटाला जीवात जीव आला जीवनराव..!