चला व्हिएतनामला ०१ : पूर्वपीठिका आणि “हा नोई” त पदार्पण

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
17 Nov 2013 - 6:15 pm

====================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

दक्षिणपूर्व आशियाचे भारताशी फार प्राचीन काळापासून सामाजिक, धार्मिक आणि व्यापारी संबंद्ध राहिले आहेत. त्यामुळे तेथील देशांना भेट देण्याची इच्छा मला फार पूर्वीपासूनच होती. पण त्या देशांच्या यादीत अगोदर व्हिएतनामचे नाव नव्हते. व्हिएतनाम हा देश त्याच्या १९५४ ते १९७५ च्या दरम्यान झालेल्या अमेरिकेबरोबरील युद्धाने सर्व जगाच्या नजरेत आला आणि माझ्याही वाचनात आला होता. अमेरिकेसारख्या सर्वात मोठ्या जागतिक सामरिक सत्तेला केवळ टक्कर देणाराच नाही तर पराभूत अवस्थेत माघारी पाठवणारा एक विकसनशील पण अभिमानी देश अशी जगभर त्याची ख्याती आहे. पण तो आहे कम्युनिस्ट देश! त्या वेळेपर्यंत मी कोणत्याही कम्युनिस्ट देशाला भेट दिलेली नव्हती आणि त्यांच्याबद्दलच्या कल्पना काही प्रमाणात वाचन आणि बरेचसे इंग्रजी सिनेमावरूनच बेतलेल्या होत्या. अर्थातच तेथे जाणे माझ्या यादीत नव्हते. पण झाले असे. आमच्या संस्थेतील एका जर्मन सहकार्‍याची सहधर्मचारिणी थायलंडची नागरिक आहे. त्यानेही घर थाटायला जर्मनीऐवजी थायलंडला प्राथमिकता दिली आहे. एका सुट्टीत त्याने थायलंडच्या शेजारीच असलेल्या व्हिएतनामची सफर केली. परत आल्यावर त्याने तेथील निसर्गसौंदर्याची इतकी स्तुती केली की तो देश माझ्या सहलीच्या सूचीत अलगदपणे घुसला!

आता दक्षिणपूर्व आशियात जायचे ठरल्यावर व्हिएतनामला जाणे अटळ होते. तो देश आशियाच्या दक्षिणपूर्व टोकाला असल्याने प्रथम तेथेच सुरुवात करून इतर देश पाहत भारतात परतायचा बेत योग्य असे ठरले. अर्थात आम्हाला बघायचे असलेले देश भारतातील सहल कंपन्याच्या खिजगणतीत नसल्याने योग्य कंपनीची निवड करणे वाटले त्यापेक्षाही कर्मकठीण झाले. बहुतेक सगळ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या आम्ही कळवलेल्या देशांकडे दुर्लक्ष करून त्यांची प्रकाशित पत्रके पाठवली तर काहींनी सरळ पूर्ण दुर्लक्ष केले. शेवटी जरा बरा प्रतिसाद दिलेल्या दोन कंपन्यांपैकी एकीची निवड करून तिला आमचा ठरवलेला प्रवासाचा मार्ग आणि स्थळे देऊन सहलीचे आयोजन करायला सांगितले. भारतीय कंपन्यांना गिर्‍हाईकांच्या मताप्रमाणे सहल (कस्टमाईझ्ड ट्रीप) आयोजीत करण्याचा पुरेसा अनुभव नसल्याचे परत एकदा सिद्ध झाले. बरेचसे आयोजन आम्हीच करून परत त्यांच्या आवडीच्या विमान कंपनीची तिकिटे गळ्यात बांधली गेली... जी आमच्या जालावरच्या संशोधनातून सापडलेल्या पर्यायापेक्षा जास्त महाग होती आणि शिवाय मार्गही उलट सुलट आणि गैरसोयीचा वाटला ते वेगळेच. पण चर्चा करायला गेल्यावर "आम्ही तिकिटे खरेदी केली आहेत आणि ती नॉन-रिफंडेबल आहेत" असा धक्काही दिला गेला. शिवाय डॉलरच्या विनिमयाचा दर बदलला असे सांगून अजून पैशांची मागणी केली गेली. आमची सहल खाजगी (म्हणजे कंपनीचा माणूस आमच्या बरोबर असणार नाही असे) असूनसुद्धा दर ठिकाणच्या करारबद्ध स्थानिक सहल कंपन्यांचे पत्ते आणि फोन नंबर द्यायला टाळाटाळ केली गेली. "प्रॉब्लेम येणार नाही. आलाच तर मला भारतात फोन करा. माझा मोबाईल नंबर घेऊन जा." असले सल्ले मिळाल्यावर मात्र सहनशीलता संपून जरा चढ्या आवाजात बोलल्यावर मोठ्या मुश्किलीने "केवळ तुम्हाला ही फार गुप्त माहिती देत आहे" अश्या आविर्भावात ती माहिती मिळाली. एकंदरीत अनुभवावरून भारतीय कंपनीतर्फे परदेशातली खाजगी सहल परत कधीच आयोजित करायची नाही असे म्हणून कानाला खडा लावला तो आजपर्यंत तसाच आहे. असो.

तर प्रवासाचा मार्ग ठरला तो असा...

मी दम्मामहून मुंबईस येणार - येथे आमचे युवराज (या वेळेस नशिबाने त्याला कामातून फुरसत मिळाली आणि आमचा आनंद व्दिगुणित झाला !) आम्हाला येऊन मिळणार व तेथून क्वाला लंपूर मार्गे हा नोई ही व्हिएतनामची राजधानी गाठायची (दोन दिवस वस्ती) - हा लाँग सामुद्रधुनी (एक दिवस वस्ती) - हो ची मिन्ह शहर + माय थो + मेकाँगचे खोरे (तीन दिवस वस्ती) असे फिरत सातव्या दिवशी पहाटे व्हिएतनामची रजा घ्यायची.

माझा प्रवास दम्मामपासून नीट सुरू झाला आणि साडेतीन तासांत मुंबईला वेळेवर पोहोचलो. मुंबईत ठरल्याप्रमाणे बरोबर भेट झाली आणि पाच तासांच्या विमानप्रवासानंतर स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी साडेसातला क्वाला लंपूरला उतरलो. क्वाला लंपूर विमानतळ छान आहे. सगळ्या आधुनिक सोयीने सुसज्ज आहे...

विमानतळाचे दोन भाग धावपट्टीने विभागलेले आहेत आणि इकडून तिकडे वाहतूक करायला एक खास रेल्वे आहे तिच्यावरून दर पाच दहा मिनिटाला गाड्या धावत असतात. पुढचे हा नोईला नेणारे विमान सुटायला दोन अडीच तास होते त्यामुळे पोटोबा आटपून घेतला. सगळ्या मलेशियन पदार्थांची नावे जरा धोकादायक वाटल्याने बटाट्याचा लालभडक झणझणीत रस्सा आणि ब्रेड असा एकुलता एक शाकाहारी मेन्यू होता तो घेतला. चव पाहता त्यांत भाजलेल्या खाड्यांची (एक प्रकारचा वाळवलेला छोट्या आकाराचा मासा. कोंकणात त्याचे कालवण किंवा भाजून चटणी केली जाते. मस्त लागते. ) पूड टाकली असावी दाट संशय आला! पोट भरल्याने तरतरी आली आणि उरलेला वेळ जरा विमानतळाचा फेरफटका मारण्यात घालवला. मलेशियन भाषेतील पाट्या वाचण्यात वेळ मजेत गेला. मलेशियन भाषेची लिपी रोमन आणि सोबत इंग्रजी शब्द असल्याने अर्थ कळत होता त्यामुळे मजा वाटली...

पावणे दहाला क्वाला लंपूरहून निघून विमान स्थानिक वेळेप्रमाणे दुपारी बाराच्या सुमाराला "हा नोई" या व्हिएतनामच्या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या "नोई बाई" नावाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. व्हिएतनामचा व्हिसा आंतरजालावरून अगोदरच काढला होता. पण विमानतळावर परत एकदा अर्ज भरावयाला लावला. मात्र त्यानंतर मात्र फार काही त्रास न देता सुखरूप सगळे सोपस्कार आटपून बाहेर आलो. कम्युनिस्ट देशाची पहिलीच भेट असल्याने पासपोर्टवर शिक्का मारणारा खराखुरा कम्युनिस्ट अधिकारी कसा असतो ते मी निरखून पाहिले पण इंग्रजी सिनेमात दाखवतात तसे त्याने काही माझ्याकडे निरखून तर सोडाच पण फारसे पाहिलेली नाही. शिवाय काही भेदक प्रश्नही न विचारल्याने घोर निराशा झाली!

असो. आम्ही बाहेर आलो तर आमचा मार्गदर्शक आमच्या नावाची पाटी घेऊन उभा होता. आतापर्यंत माझा तीन विमानांचा, ८,००० किमी चा आणि विमानतळावरचा वेळ धरून चोवीस एक तासांचा प्रवास झाला होता. केव्हा एकदा हॉटेलवर पोहोचयतोय आणि गरम गरम शॉवर घेतो असे झाले होते. गाडीत बसल्या बसल्या मार्गदर्शकाने पहिला थांबा व्हिएतनाम वंशशास्त्र संग्रहालय (Museum of Ethnology) असा सांगितला. आमच्या कंपनीने दिलेल्या मार्गसूचीत तर प्रथम हॉटेल आणि मग हा नोईत फेरी असे लिहिले होते. पण मार्गदर्शक म्हणाला की ते चूक आहे. आता जर हॉटेलवर जाण्यात वेळ घालवला तर हा नोई दर्शनाला बराचशी काट मारावी लागेल. तेव्हा आमच्या सहल कंपनीने दिलेल्या पहिल्या धक्क्याबद्दल तिचा मनातल्या मनात उद्धार करत गरम शॉवरची ऊर्मी दाबून टाकून करत सफर सुरू केली.

=====================================================================

व्हिएतनाम

व्हिएतनाम म्हणजे दक्षिण चीन समुद्राला लागून असलेली आशियाच्या दक्षिणपूर्व भूभागाची एक चिंचोळी पट्टी. ३३१,२१० चौ किमी भूभाग असलेल्या या देशाच्या समुद्रकिनार्‍याची लांबी ३,४४४ किमी आहे. या देशाची लोकखंख्या नऊ कोटी आहे. सुरुवातीचा बराच काळ पारतंत्र्यात असलेला हा देश इ स ९३८ मध्ये बाक डाँग नदीवरील युद्धात (Battle of Bạch Đằng River) चीनचा निर्णायक पराभव करून स्वतंत्र झाला. नंतर त्यावर अनेक व्हिएतनामी सम्राटांनी आता या देशाच्या ताब्यात आहे त्यापेक्षा अधिक प्रदेश काबीज करून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. त्यानंतर युरोपियन सत्तांचा त्या भागांत शिरकाव होवून तो फ्रेंच वसाहतीत सामील झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या (इ स १९४० च्या) जवळपास काही काळ तेथे जपानी साम्राज्यही पसरले होते.

व्हिएतनामच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात १८५४ साली त्यांनी फ्रेंचांना उत्तर व्हिएतनाममधून बाहेर काढले आणि त्या देशाची उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम अशी फाळणी झाली. मात्र पुढेही हे युद्ध कमी अधिक प्रमाणात चालूच राहिले आणि प्रथम फ्रेंच व नंतर १९७५ मध्ये अमेरिकेला दक्षिणेतून काढता पाय घ्यायला लावून उत्तरेतल्या कम्युनिस्टांनी सर्व देश एकसंध केला.

१९७८ मध्ये शेजारी कंबोडियाने व्हिएतनामच्या काही भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. व्हिएतनामने चिनी पाठिंबा असलेल्या कंबोडियाच्या ख्मेर रूज या जुलुमी राजवटीवर हल्ला करून तिचा पाडाव केला आणि कंबोडियाच्या पूर्वीच्या राजाला सत्तेवर आणले. असे वरवर दिसत असले तरी व्हिएतनामला सोविएत युनियनचा पाठिंबा होता आणि ख्मेर रुजला चीनचा; त्यामुळे हे युद्ध सोव्हिएत युनियन व चीन मधले छुपे युद्ध मानले जाते. व्हिएतनामवर दबाव टाकण्यासाठी चीनने व्हिएत-चीन सरहद्दीवर युद्ध छेडले आणि व्हिएतनामचा काही भागही व्यापला. मात्र चिवट व्हिएतनामने तेथे प्रतिकार तर केलाच पण कंबोडियावरची आपली पकडही कमी केली नाही. यासाठी त्यांना सोव्हिएत युनियनचा उघड पाठिंबा आणि सैन्य मदतही मिळाली. शेवटी चीनने आपले सैन्य व्हिएतनामच्या व्यापलेल्या भूमीतून मागे घेतले. मात्र व्हिएतनामी सैन्य कंबोडियात पूर्ण स्थिरस्थावर होईपर्यंत पुढची दोन वर्षे तेथेच तळ ठोकून होते.

असा हा गरीब पण स्वाभिमानी आणि लढवैय्या देश. १९८६ पर्यंत हा देश अत्यंत मागासलेला, अमेरिकेशी घेतलेल्या पंग्यामुळे जागतिक राजकारणात वाळीत पडलेला आणि कम्युनिस्ट राजसत्तेच्या लोहपकडीत बंद राहिला. मात्र १९८६ मध्ये तेथील राजवटीने उदार राजकीय आणि आर्थिक धोरण राबवायला सुरुवात केली. इ स २००० पर्यंत त्या देशाचे जगातल्या बर्‍याच देशांशी राजनैतिक संबंद्ध प्रस्थापित झालेले होते आणि २०११ पर्यंत आर्थिक प्रगतीत जगातल्या पहिल्या ११ देशांत त्याचे नाव नोंदवले गेले होते. २०१३ च्या अंदाजांप्रमाणे तेथिल दर माणशी वार्षिक उत्पन्न २,००० अमेरिकन डॉलर होईल आणि खरेदी क्षमतेच्या दराने (परचेजिंग पॉवर पॅरिटी) ते ४,००० डॉलर होईल.

(क्रमश: )

====================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

17 Nov 2013 - 6:36 pm | त्रिवेणी

वाचला, आवडला.
आताशा नवनवीन प्रतिक्रिया नाही सुचत मला.
पुभाप्र.

रुस्तम's picture

17 Nov 2013 - 7:05 pm | रुस्तम

वाटच बघत होतो. नवीन सफ़रीची…
पुभाप्र.

चाणक्य's picture

17 Nov 2013 - 7:56 pm | चाणक्य

तुमचं प्रवासवर्णन म्हणजे पर्वणीच

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2013 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा

+१

जेपी's picture

17 Nov 2013 - 8:15 pm | जेपी

पुर्ण प्रतिसाद लेखमालिकेचा शेवट झाल्यावर देईन .
तुर्तास ही पोच .

बॅग भरुन तुमच्या सोबत प्रवास करणारा - तथास्तु

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Nov 2013 - 8:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्रिवेनि, निलापी, चाणक्य आणि तथास्तु : आपल्या सर्वांचे सहलीत स्वागत आहे !

प्रचेतस's picture

17 Nov 2013 - 10:03 pm | प्रचेतस

नवी सफर, नवी मेजवानी.
पुभाप्र.

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2013 - 10:47 pm | संजय क्षीरसागर

तुमचा उत्साह अदम्य आहे.

मोदक's picture

17 Nov 2013 - 11:31 pm | मोदक

वाचतोय!!!!

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

सानिकास्वप्निल's picture

17 Nov 2013 - 11:56 pm | सानिकास्वप्निल

वाह वाह !!
आता मजा येणार प्रवासवर्णन वाचायला :)
पुभाप्र

पाषाणभेद's picture

17 Nov 2013 - 11:59 pm | पाषाणभेद

आलो आलो.

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 12:22 am | मृत्युन्जय

मस्तच. वाचतोय. पुभाप्र.

आदूबाळ's picture

18 Nov 2013 - 12:35 am | आदूबाळ

मी बी आलो....

प्यारे१'s picture

18 Nov 2013 - 1:05 am | प्यारे१

एक्का साहेब, तिकीट काढलंय सहलीचं.
दाखवा एक एक ठिकाण मस्त. :)

रेवती's picture

18 Nov 2013 - 2:01 am | रेवती

चला, सुरुवात तर छान झाली. व्हिएतनामची सफर करावी असे फारसे कोणाच्या लक्षातही येत नसावे, त्यामुळे प्रवास करण्यास (म्हणजे वाचण्यास्)उत्सुक आहे.
पिंटू म्हणजे गेटस असे असल्यास मजेदार आहे.
ठिकाणांची नावे नोई बाई, हा नोई असल्याने बायकांचे राज्य असावे असा अंदाज! ;)
भारतीय कंपनीतर्फे परदेशातली खाजगी सहल परत कधीच आयोजित करायची नाही असे म्हणून कानाला खडा लावला
आधीच मला प्रवासाची आवड नाही, त्यातून भारतीय कंपनीतर्फे जरा सहलीस जावे का असा विचार मनात येत होता पण तुम्ही खोडून काढल्याने पुन्हा घरातच बसणार. मज्जा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

जालावर शोधले तर भरपूर कंपन्या आहेत आपल्या मनाप्रमाणे सहलीचे आयोजन करून देणार्‍या. थोडासा शोध आणि थोडासा हट्टीपणा करून आपल्या मनासारखी सहल आयोजीत करणे तितकेसे कठीण नाही. तेव्हा फिरण्याचा विचार आजिबात बदलू नका.

स्पंदना's picture

18 Nov 2013 - 5:40 am | स्पंदना

म्या हाय मागल्या शिटवर. तुम्ही चला म्होरं.

नानबा's picture

18 Nov 2013 - 7:42 am | नानबा

एक्कांचं प्रवासवर्णन आलं म्हणजे जगाच्या एका नव्या भागाची सुंदर माहिती सचित्र मिळण्याची खात्रीच... :)

पु.भा.प्र.

सुनील's picture

18 Nov 2013 - 8:37 am | सुनील

अनवट जागेचे प्रवासवर्णन वाचयला मजा येणार!

पुभाप्र

चला आता आणखी एका नवीन ठिकाणची फुकटात सहल मज्जा ………
पाहिजे तेवढे क्रमश करा आणि निवांत सविस्तर येवू द्यात सगळे भाग ……
आपण तर तुमच्या सहलीचे आणि प्रवास वर्णनाचे फ्यान आहोत बाबा ……

हाय आमच पण नशीब पाहिजे होत तुमच्या सारखे

सौंदाळा's picture

18 Nov 2013 - 12:16 pm | सौंदाळा

+१००

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 12:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्रुप्त आत्मा, वल्ली, संजय क्षीरसागर, मोदक, सानिकास्वप्निल, पाषाणभेद, मृत्युन्जय, आदूबाळ, प्यारे१, रेवती, aparna akshay, प्रथम फडणीस, सुनील आणि खबो जाप : आपणा सर्वांचे सहलीत स्वागत आहे.

हरवलेला's picture

18 Nov 2013 - 8:54 pm | हरवलेला

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 9:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यात विचारायचं काय? सहल आपली सगळ्यांचीच आहे. तुमच्या सहभागाने मजा अजून वाढेल. चला बॅग भरून !

स्पंदना's picture

19 Nov 2013 - 3:26 am | स्पंदना

नको! तुम्ही हरवता सारखे!! अन मग शोधाशोध करावी लागते. :))

हरवलेला's picture

19 Nov 2013 - 9:56 am | हरवलेला

१०० % मार्क्स

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Nov 2013 - 10:52 am | डॉ सुहास म्हात्रे

कायपण हरकत नाय ! काहीवेळा सहलितल्या अशा हरवण्यात आणि शोधाशोधीत पण काहीतरी अनपेक्षित आणि मजेशीर गोष्ट सापडते ;) स्विट्झर्लंडमध्ये मी स्वतः एकदा रस्ता हरवून भरकटलो होतो आणि चक्क व्हिएन्नामध्ये भरलेला आठवड्याचा बाजार सापडला होता ! :) (ही गोष्ट सत्य आहे, केवळ विनोद नाही.)

हरवलेला's picture

19 Nov 2013 - 11:50 am | हरवलेला

जो पर्यंत एखाद्या गोष्टीत हरवून जात नाही, तोपर्यंत तिची खरी मजा येत नाही.

बाकी, आठवड्याचा बाजार म्हटला की गावची आठवण येते.
व्हिएन्ना मध्ये आठवड्याचा बाजार म्हणजे आश्चर्यच !

यशोधरा's picture

18 Nov 2013 - 12:43 pm | यशोधरा

अरे वा! नवीन सफर सुरु का?
वाचते आहे.

मिहिर's picture

18 Nov 2013 - 12:58 pm | मिहिर

नवीन सहल वाचून छान वाटले. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.
अवांतर: त्या दक्षिणपूर्वपेक्षा साधे सुटसुटीत आग्नेय वापरले तर आवडेल. ईशान्य भारताला पूर्वोत्तर भारत वाचून तर मला पहिल्यांदा पूर्वीचा आणि नंतरचा भारत असे वाटले होते. =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 4:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्वसाधारण मराठी वाचकांत आग्नेय, नैऋत्य, इ दिशा पटकन ओळखण्याचा सर्व्हे घेतलात तर माझ्या अनुभवाप्रमाणे धक्कादायक निर्णय बाहेर येतील. शेजारी कोणी मराठी व्यक्ती असेल तर उरलेल्या दोन उपदिशा आणि सहा दिशांची नावे विचारून खात्री करून घ्या पाहू ;)

दिपक.कुवेत's picture

18 Nov 2013 - 1:01 pm | दिपक.कुवेत

एवढा मोठा लेख आणि फक्त दोन फोटो? ये ठिक नहि ठाकुर. तुमची प्रवासवर्णनं म्हणजे फोटोंची रेलचेल आणि डोळ्यांना मेजवानी. असो पुढल्या भागात तुम्हि ती कसर भरुन काढाल हि खात्री आहे.

छान ...आधी चे ही आत्ताच चाचले ....मस्त

सल्ला : ते प्रत्येक प्रतिसादाला स्वताच्या धाग्यावर उपप्रतिसाद टाळत जा, हे मिपा आहे पर्सनल ब्लॉग नाही , लेखनाला मिपा टच येत नाही त्यामुळे ब्लॉगर गेम वाटते :)

बाकी आपली मर्जी !

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 4:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद न देता अनेक प्रतिसादकांचे एकाच प्रतिसादात धन्यवाद मानतो आहे. अर्थात धन्यवाद निनावी ठेवण्यापेक्षा नावे लिहून देणे मला जास्त आवडते.

नंतर जर कोणी काही विशेष मुद्दा मांडला असला तरच त्यावर नंतर प्रतिसाद देत आहे.

यात कोणताही "गेम" नाही. पण ती माझी वाचकांचे आभार मानण्याची स्टाईल (शैली) समजायला हरकत नाही :)

तुमच्या प्रतिसादामध्ये आमचे एक जुने काका दिसले .

धन्यवात !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2013 - 10:49 am | डॉ सुहास म्हात्रे

आता व्हर्चुअल काका म्हटलंच आहे म्हणजे व्हर्चुअल कान घरायचा अधिकारही आपोआप दिला गेला आहे !

काका मोड ऑन
{
तर असं आहे...
बाकी आपली मर्जी ! हे एकदम बरोबर... समजूतदारपणाचे  . माणसानं असंच असावं. उगाचच सगळ्याना आपल्या साच्यात बसवायचा प्रयत्न करू नये... कारण ते योग्य नाही.

पण हा पुढचा प्रतिसाद बरोबर विरुद्ध दिशेने जातोय...
तुमच्या प्रतिसादामध्ये आमचे एक जुने काका दिसले .
धन्यवात !!

...इतर कोणाला हेकेखोर म्हणण्याचा हक्क गमावणारा ;)
}
काका मोड ऑफ

असो. अवांतर चर्चा पुरे करुया. आता कसे वातावरण स्वच्छ झाल्यासारखे खुल्या मनाने सहलित सामील व्हा आणि सगळ्यांबरोबर मजा लुटा... आमच्या सहलीत मजा करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही अटी नाहीत.

कपिलमुनी's picture

18 Nov 2013 - 1:16 pm | कपिलमुनी

शिटं भरली .. गाडी सुटायाची येळ झाली ... चला चला ..आवरा आवरा !!

मी-सौरभ's picture

18 Nov 2013 - 4:48 pm | मी-सौरभ

म्या बी हाये टपावर...

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 4:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

यशोधरा, दिपक्.कुवेत, कपिलमुनी : धन्यवाद !

सिद्धेश महजन's picture

18 Nov 2013 - 8:28 pm | सिद्धेश महजन

आवडेल या देशाला भेट द्यायला. महत्वाच्या ठिकाणान्चि माहिति फोटो सकट आलि तर आवडल असत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी-सौरभ आणि सिद्धेश महजन: धन्यवाद !

@सिद्धेश महजन : आता कुठे पोचलोय विमानतळावर. सहा दिवस फिरायचं आहे तेव्हा एक एक करत अनेक महत्वाच्या गोष्टी पाहू या.

भाते's picture

18 Nov 2013 - 8:47 pm | भाते

एक्का काका,
मजा आहे तुमची आणि आमचीही.

नियमितपणे तुमच्या अप्रतिम सफरी वाचायची सवय लागलेली असल्यामुळे मी विचार करतच होतो, खुप दिवसांत एक्का काका कुठल्या सहलीवर कसे गेले नाहीत? तुमच्याबरोबर आम्हीसुध्दा सफर अनुभवायला तेवढेच आतुर आहोत.

सोत्रि's picture

18 Nov 2013 - 9:03 pm | सोत्रि

झक्कास!
व्हिएतनाम लिस्टमध्ये आहेच. जेवणाबद्दल म्हणजे एकंदरीत खाद्यसंस्कृतीवर जरा सविस्तर माहिती येऊ दे.

- (भटक्या) सोकाजी

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

खानपान तर येणारच ! फिरताना तो एक फार महत्वाचा मुद्दा असतोच ना !

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

खानपान तर येणारच ! फिरताना तो एक फार महत्वाचा मुद्दा असतोच ना !

मिसळ's picture

18 Nov 2013 - 9:39 pm | मिसळ

बॅग भरली आहे. तुम्ही मलेशियात खाल्ला तो पदार्थ बहुदा 'रोटी कनाय' हा असावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

भाते, सोत्रि आणि मिसळ : सहलित स्वागत आहे !

वाटाड्या...'s picture

19 Nov 2013 - 12:52 am | वाटाड्या...

तिथे काय काय खाल्लं, पीलं ते येईलच. पण तीथे गेल्यावर त्या लोकांनी कसं काय बलाढ्य अमेरीकेला हरवलं ते पण त्यांच्या शब्दात असेल तर सांगा...

- वाट्या..

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Nov 2013 - 10:55 am | डॉ सुहास म्हात्रे

त्या लोकांनी कसं काय बलाढ्य अमेरीकेला हरवलं ते पण त्यांच्या शब्दात असेल तर सांगा... ही तर एक फार कुतूहलाची गोष्ट व्हिएतनामबद्दलची... ओघाओघाने ते सगळे येईलच.

वाटाड्या...'s picture

20 Nov 2013 - 9:27 pm | वाटाड्या...

मी पण आहे सहलीत. माजा पैला लंबर...

निनाद's picture

19 Nov 2013 - 1:31 am | निनाद

वा! अनवट ठिकाण... पुढील भागाची उत्सुता आहे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Nov 2013 - 10:55 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद आणि स्वागत !

निनाद's picture

19 Nov 2013 - 11:26 am | निनाद

स्वागत म्हणजे सहलीत स्वागत ना?
(कारण तसा मिपा बिल्ला नंबर लई जुनाय आम्चा!)
तसेही तुमचे सर्व लेखन मी वाचतो. मागच्या काही काळात प्रतिक्रिया देणे जमत नव्हते. खरे तर मिपावरच येणे जमत नव्हते. तुमच्या ऑश्ट्रेल्या ट्रिपच्या वेळी पण प्रतिसाद द्यायचे होते ते जमलेच नाही.. :(

प्रत्येक देश फिरण्याआधी त्याचा इतिहास आणि सद्य स्थिती तुम्ही ज्या पद्धतीने देता ते फार आवडते.

स्पंदना's picture

19 Nov 2013 - 12:49 pm | स्पंदना

लय बोलत्याशी निनाद तुमी.
येळ होतोया अश्यान. गुमान चढा गाडीत आन हाजीर म्हना.

प्यारे१'s picture

20 Nov 2013 - 2:38 am | प्यारे१

आयला ह्या लेडी कंडक्टरं आल्यापस्नं लई समद्याची घाई!
मागं (आवो म्हन्जी मागच्या शीटवर न्हवं. ततं येगळाच कारेक्रम आस्तोय) असं नसायचं.
कंडक्टर बाप्ये आस्ला की सुशेगात मस्त तंबाकूचा बुकना हानंस्तवर गप आरामात गाडं थांबून र्‍हायचं. जत्रंच्या फडात कोन येनार हाय तेज्यापस्नं समदं डिट्टेलवारी !
म्होरं डायवर बी म्हशी आनि म्हसवाली बगत गुमान असायचा. कारन फुडच्या गावात तेचं सासर. ततं बी ह्योच कारेक्रम. ह्यो कंडाक्टरला काय बोलनार न्हाय आनि त्यो ह्येला.

आताच्या ह्या बायास्नी काय म्हनाचं. जाऊन्दे पावनं काडा तंबाकू.

स्पंदना's picture

20 Nov 2013 - 3:00 am | स्पंदना

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2013 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे

ह्ये लै बेस जालं. कस्टंबर लोक बाप्या कंडटर्शी लै हुज्जत घालत्यात, बाईमानूस असलं की गप गुमाम पडून र्‍हात्यात. पन त्यो गल्ल्यातला आमचा वाटा पाट्वायला इसरू नगा बर्का :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2013 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वागत सहलितच. गैरसमज नसावा :)

अनिरुद्ध प's picture

20 Nov 2013 - 6:35 pm | अनिरुद्ध प

नव्या सफरिची सुरुवात तर झाली,पु भा प्र.

पैसा's picture

20 Nov 2013 - 10:20 pm | पैसा

व्हिएतनाम वगैरे देश आपल्याला फक्त नावाने माहित असतात. पण आता ही ई-सहल करायला जाम मजा वाटते आहे! आपल्याकडच्या यात्रा कंपन्या या प्रवाशाला "सफर" करायला लावण्यासाठीच निर्माण केल्या असाव्यात असं वाटतं अनेकदा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Nov 2013 - 12:46 am | डॉ सुहास म्हात्रे

अनिरुद्ध प आणि पैसा: धन्यवाद !

@पैसा:
आपल्याकडच्या यात्रा कंपन्या या प्रवाशाला "सफर" करायला लावण्यासाठीच निर्माण केल्या असाव्यात असं वाटतं अनेकदा. सहमत. "एकतर आमची सहल आम्ही म्हणू तशीच करा नाहितर आम्ही लावलेल्या शेंड्या गोड मानून घ्या" असंच त्यांचं (उघड किंवा छुपं) म्हणणं असतं असा माझा अनुभव आहे, दुर्दैवाने.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Dec 2013 - 9:31 am | llपुण्याचे पेशवेll

चीन, उत्तर ध्रुव या सफरींनतर या सफरी बद्दलची उत्सुकता वाढली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2013 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !