अस्तित्वाच्या पल्याड..

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
7 Nov 2013 - 2:49 pm

अस्तित्वाच्या पल्याड कोठे संथ
नदीच्या पैलतिरावर,
जललहरींसह वाहत गेली दूर तिथे
स्वप्नांची घागर...

त्या तीरावर गोकुळनगरी
कान्हाची बेधुंद बासरी
पाहुन लोभस रूप तयाचे, मनही झाले
निळसर निळसर

सर्वार्थाने देह लाजला
पाहताच तो रोखुन मजला
नाजुक कटिकमलावर बसला रुतुन
तयाच्या नजरेचा शर

हळूच जवळी आला कान्हा
छेडित नाजुक अधरफुलाना
भान हरपले जेव्हा मजला स्पर्शुन
गेला तो मुरलीधर

हलवुन मजला गेला वारा
उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा
विरून गेले रूप सावळे
आणिक मागे उरली हुरहुर

©अदिती शरद जोशी

शृंगारकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Nov 2013 - 6:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुरेख रचना.. आवडली

अत्रुप्त आत्मा's picture

7 Nov 2013 - 6:55 pm | अत्रुप्त आत्मा

हलवुन मजला गेला वारा
उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा
विरून गेले रूप सावळे
आणिक मागे उरली हुरहुरहुरहुर>>> सुंदर!

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Nov 2013 - 10:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

आशय,तालबद्धता,वृत्त सगळ्या आघाड्यांवर सरस

आनंदमयी's picture

7 Nov 2013 - 11:52 pm | आनंदमयी

खूप खूप धन्यवाद.. :)

स्पंदना's picture

8 Nov 2013 - 6:05 am | स्पंदना

फार सुरेख लिहीता तुम्ही आनंदमयी!

कोमल's picture

8 Nov 2013 - 9:52 am | कोमल

क्या बात है..
मस्तच..

"सर्वार्थाने देह लाजला
पाहताच तो रोखुन मजला
नाजुक कटिकमलावर बसला रुतुन
तयाच्या नजरेचा शर"

खुप आवडली

आनंदमयी's picture

8 Nov 2013 - 5:21 pm | आनंदमयी

धन्यवाद :)

सुधीर's picture

8 Nov 2013 - 5:50 pm | सुधीर

कविता आवडली.

प्यारे१'s picture

8 Nov 2013 - 7:40 pm | प्यारे१

सुंदर कविता!

हलवुन मजला गेला वारा
उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा
विरून गेले रूप सावळे
आणिक मागे उरली हुरहुर

ऐवजी
आणिक सरले/नुरले माझे मीपण
असं केलं तर?

जेनी...'s picture

8 Nov 2013 - 11:50 pm | जेनी...

कविता आवडली
पण

२र्या आणि ४ थ्या कडव्या व्यतिरिक्त बाकिच्या कडव्यात तीसर्या लाइनीत शब्दांचा
अतिरेक जाणवतोय

बाकि तुमच्या सगळ्या कविता आवडीने वाचते . लिहित रहा

psajid's picture

13 Nov 2013 - 11:24 am | psajid

छान आणि चित्रमय कविता !