भाग १ बाबक खुर्रामुद्दिन --पारशी लोकांचे शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
27 Oct 2013 - 11:38 pm

मराठी जालावर शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पब्लिकचं लक्ष वेधून घेणं सोपं नाही. सातव्या आठव्या शतकात तत्कालीन ज्ञात जगातील फार मोठ्या भागावर इस्लामी राज्य पसरत होते. त्यांना कुणी यशस्वी आव्हान देणे हे ही दिव्यच मानले जाई. खरेतर असे कुनी आव्हान दिले होते, हे सुद्धा अल्पपरिचित असल्याचे दिसते.
तर अशा एका योद्ध्याचा हा संक्षिप्त परिचय. पारशी लोकांचं गेलेलं राज्य त्यानं काही काळापुरतं पुन्हा उभं केलं. मोठ्या साम्राज्याशी यशस्वी लढत दिली.
ह्या भागात आपण त्याच्या उदयापूर्वीचा काळ व परिस्थिती पाहू.
.
.
.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात युरोपचा बहुतांश सर्व नागरीकरण झालेला भाग रोमन सत्तेखाली एकवटला होता. इतकेच नाही,युरोप(स्पेन) , आफ्रिका आणि मध्यपूर्व (आजचे अरब जगत) हे सुद्धा ख्रिश्चन प्रभावाखाली होते; पर्शियन साम्राज्याचा भाग वगळता.(पर्शियन साम्राज्य म्हणजे पारशी लोकांचे साम्राज्य. टाटा, वाडिया, गोदरेज ही मंडळी आपणांस ठाउक आहेत, त्यांचे हे पूर्वज. किंवा अडीच हजार वर्षांपूर्वी अलेक्झांडर ने मुद्दाम ज्यांना हरवण्याची ईर्ष्या ठेवून प्रथम आशियावर आक्रमण केले; ते साम्राज्य. आजचे इराण्,इराक, आर्मेनिया, पाकिस्तान व अफगाणिस्तानाचे पश्चिम भाग( बलुच व बल्ख वगैरे) व USSR मधील दक्षिणेकडील अझरबैजान वगिरे देश, इतका विस्तृत भाग ह्या साम्राज्यात येतो.)
तर युरोप(स्पेन) , आफ्रिका आणि मध्यपूर्व (आजचे अरब जगत) भूमध्य सागराच्या अल्याडला युरोप, पल्याडला आफ्रिका व तिसर्‍या बाजूला मध्यपूर्व अशी रचना.
ह्यांची रचना भूमध्य सागराने जोडलेली आहे. खालच्या आकृतीत ती ढोबळमानाने दाखवायचा प्रयत्न केलाय.

- म्हणजे युरोपची भूमी, # म्हणजे समुद्र, * म्हणजे मध्यपूर्व तर . म्हणजे आफ्रिका असं मानलं तर साधारण रचना अशी काहिशी आहे:-
-------------------------------------
------###########**********###**************
###############*************************
..................................***********************
..................................####********************
..................................##################################
.....................##################################
................##################################

तर अशा युरोपच्या बहुतांश भाग हा रोमन सत्तेची मूळ भूमी(heart land) इटाली, ग्रीस्, स्पेन्, पोर्तुगाल्, जर्मनी, फ्रान्स्, ब्रिटन, रशियाचा काही भाग ही मूळ भूमी. त्याचे विस्तारित क्षेत्र हे प्रचंड मोठे. युरोपच्या खाली दक्षिणेला असणार्‍या जवळ जवळ उत्तर आफ्रिकेच्या बहुतांश सर्व भागावर सत्ता.(आजचे मोरोक्को, अल्जिरिया, लिबिया, इजिप्त हे सर्वच देश, नकाशातले डॉटच्या लायनीतले डावीकडून पहिले ह्या क्रमाने). शिवाय युरोपच्या पूर्वेला लागून असलेले तुर्कस्थान्,बाल्टिक राष्ट्रे, इथपासून ते थेट मध्यपूर्वेत्तेल आजचे सिरिया, जॉर्डन्,इस्राइल,इराकच्या पश्चिमेकडील काहि भाग इतका प्रचंड विस्तार असल्याने हे राज्य नव्हे तर साम्राज्य होते.
ह्यांच्या पूर्वेच्या सीमा तत्कालीन अजून एका बलाढ्य, मध्यपूर्वेतील वर्चस्वासाठी रोमनांचे स्पर्धक असणार्‍या सत्तेला पर्शियन(म्हणजेच इराणी, पारशी) भिडत होत्या. कुठल्याही दोन विस्तारवादी बलाढ्य सत्तांचे सीमा वाढण्याच्या प्रय्त्नात होतात तसेच ह्यांचेही सतत संघर्ष होत. चकमकी होत. पण दोन्ही बाजूंच्या काही स्ट्रेंथमुळे किंवा काही वीकनेसमुळे एका मर्यादेपलिकडे ह्या सीमा फार बदलत नसत. युरोपिअन थेट पर्शियाचा नायनाट करुन ऐन इराण मध्ये घुसु शकले नाहित आणी पर्शियन्स काही थेट सिरिया-तुर्कस्थान(टर्की)-बल्गेरिया-इटाली असा प्रवास करत थेट रोमन राज्य जिंकू शकले नाहित. फक्त वर्चस्वासाठी संघर्ष होइ. त्यातही एक status quo राहिल्यासारखा होइ.
आजचा पश्चिमेकडे आख्खा इराक्,इराण ही heart land तर पूर्वेकडे थेट आजचे मध्य आशियायी देश(उझबेकिस्तान,ताजिकिस्तान, अफगाणिस्तानचा काही भाग व काही काळ भारताचा सिंध व बलुचिस्तानातील पस्चिम भाघी ) इथपर्यंत हे वैभवशाली, बलाढ्य इराणी साम्राज्य पसरले होते. मागील हजारेक वर्षात ग्रीक राज्ये आली-गेली, इकडे भारतात काही शतके डौलाने मौर्य साम्राज्य उभे राहिले आणि विरले. पण इ स पू पाचशे ते इ स पाचशे अशी सतत हजारेक वर्षे एकच केंद्रसत्ता घेउन पर्शियन राज्य काही अपवाद(शक,कुशाण,हुणांची स्वारी वगैरे) वगळता अखंडित उभेच होते. आसपासच्या भागावर ह्यांचे नियंत्रण होते. नौकानयन इतर संस्कृतीतून शिकून सुसज्ज असे नौदल उभे केले होते. दूर दूर्वर व्यापार होत होता.स्थिर नागरी जीवन होते. कला,लेखन ,खाद्य ,पक्व अन्न संस्कृती ह्यांनी स्वतःची अशी बनवली होती. साहित्य बनत होतेच. स्वतः राजे अग्नीपूजक असले तरी एकेश्वरवाद्यांनाही(ज्यू, ख्रिश्चन) फारसा त्रास नव्हता. पूर्वेकडे "हिंद"कडे होणार्‍या व्यापरातून आणि इतर जनसमूहांच्या देवाणघेवाणीतून ज्ञानाचीही आदानप्रदान होत होती. ज्ञात जगातील एक प्रबळ खडे लष्कर, उत्त्मोत्तम घोडे व प्रचंड संख्या ह्यामुळे भूभागात दरारा ठेउन होते. ह्याच्या तोडिचे फारतर चीनी साम्राज्यच म्हणता यावे.

आजचे सौदी अरब्,ओमान्,येमेन्,यु ए ई हे भूभाग मुद्दाम फार कष्ट घेउन ह्यापैकी कुणी ताब्यात ठेवायचा प्रयत्न करित नसे.
ह्या भागाला उपजतच वाळवंटाचे अभेद्य कवच लाभले होते. ते तोडून त्यावर नियंत्रण ठेवत बसणे परवडणारे वाटले नव्हते. ह्या भागाचे फारसे नागरीकरणही झालेले नव्हते. फार मोठी शहरेही नव्हती. बहुतांश भटक्या अरबी टोळ्यांत ह्या भागातले लोक विखुरले होते.(सध्या काही प्रमाणात अफगाणांचे म्हणता येइल तसेच.)
रोमन साम्राज्य मजबूत होत चालले तसतशी स्पर्धा वाढत चालली. इसवीसनाची पहिली चारेक शतके अशीच गेली.
अंतर्गत कारणांनी, विलासी जीवनशैली वाढू लागल्याने मग मात्र मध्यवर्ती केंद्रिय रोमन सत्तेची पकड ढिली होउ लागली.
तशात वनवासी जर्मन टोळ्यांचे, बंडखोरांचे हल्ले व एकूणातच भ्रष्टाचाराने रिकामी होत चाललेली तिजोरी ह्याने ते आतून पोखरले जाउ लागले. भरिस भर म्हणजे इ स ४५० च्या आसपास आख्ख्या जगभरातच टिपेला पोचलेला "हूण" ह्या भयंकर क्रूर्,वेगवान, भटक्या टोळ्यांचा उच्छाद रोमन सत्तेस पार खिळखिळे करुन गेला. एकेकाळी पोलादी वाटणारी पकड हळूहळू रबरी शिक्का बनण्याची वाटचाल करु लागली.(इ स १७०७ नंतर मुघलांचे उत्तर भारतात झाले तसेच.)
वरती रोमन सत्तेचा जो भूभाग वर्णन केलाय , त्याचे शेवटी दोन भाग पडले एक पूर्वेकडचे राज्य व एक पश्चिमेकडचे.पूर्वेची राज्धानी होते तुर्कस्थानमधील इस्तंबूल(तेव्हाचे कॉन्स्टॅटिनोपल ) व पश्चिमेची रोम!
तुर्कस्थान आज मुस्लिम देश वाटतो. पण त्याकाळात त्यावर ग्रीको-रोमन सत्ता होती. फक्त सत्ताच नव्हे तर पूर्ण समाजजीवनावर ग्रीको-रोमन संस्कृतीचा पगडा होता!
युरोपमध्ये तेव्हा ख्रिश्च्नन यायचे होते. ख्रिश्चन पूर्व मूर्तीपूजक्,अग्नीपूजक अशा विविध पेगन संस्कृती तिथे नांदत.
ह्याच सुमारास पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्माचा उदय झाला होता. क्रुसावर शिक्षा झालेल्या येशूच्या नावाने सेंट पॉलने बर्याच कथा पसरवत लोकांना आकर्षित करायला सुरुवात केली. ह्या नवरचित धर्मास आधी इस्राइलच्या आसपासच्या ज्यूंचा व नंतर काही काळ रोमन सत्तेचा बराच विरोध झाला. पण सतत लोकप्रियतेची कमान चढतीच राहिली. इतकी की शेवटी वाढता प्रसार बघून, लोकप्रियता टिकवण्यासाठी सम्राट काँस्टॅटिनोपलने ख्रिश्चन धर्म स्वीकरला.
राजाश्रय मिळाल्याबरोबर ह्या धर्मप्रसारास अधिकच गती आली व बघता बघता ख्रिश्चन पूर्व सर्वच संस्कृती पुसल्या जाउ लागल्या. ख्रिस्ती धर्माचा प्रसार बहुतांश भागात १००% व्हायच्या मार्गावर लागला.(आज कुठेही अशा पेगन धर्मीया लोकांचे ठळक अस्तित्व नाही. पार पुसले गेले.)
तर झाले असे की जिथे जिथे रोमन सत्ता, तिथे तिथे ख्रिश्चन बहुसंख्या असे होउ लागले. इजिप्त्,तुर्कस्थान्,लिबिया,इस्राइल असे सर्व त्यात आले. रोमन सत्तेबाहेरिलही कित्येक भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार झालेला होता. खुद्द पर्शियातील काही भागात मिशनरी पोचले. दुर्लक्षित अरबी वाळवंटातही पोचून अनेक अरबी टोळ्या ख्रिश्चन बनल्या.
तर, सहाव्या शतकाच्या अखेरिस अशी काहिशी स्थिती होती.(इस ५५० ते ६००).
दोन राज्यात विभाजित झालेले, ख्रिश्चन बहुसंख्य होउ लागलेले गत्वैभवी रोम राज्य. त्यांच्याशी सातत्याने संघर्षरत इराणी/पर्शियन/पारशी साम्राज्य. आणि कुठल्याही व्यवस्थेतील नियमाप्रमाणे दोन बाजूंमध्ये सातत्याने होणार्‍या संघर्षात एक तिसरीच बाजू अजेय म्हणून उभी राहते तशीच नव्यानेच उदयाला येउ घातलेली ओसाड वाळवंटातील भटक्या, कफल्लक मानल्या जाणार्‍या अरबांची मुस्लिम सत्ता ................
मानवी इतिहासावर कायमचा प्रभाव टाकणार्‍या काही घटना आता होणार होत्या.
भूमध्य समुद्राच्या भूगोलाची थोडिशी माहिती खालील धाग्यावर मिळेलः-
.
.
.
.

तर सतत युद्धमान अशा दोन बाजू होत्या:-
भूमध्यसमुद्राच्या असपासच्या भागाच्या वस्र्चस्वासाठी प्रयत्नशील दोन बाजू होत्या. पश्चिमेकडून रोमन आणि पूर्वेकडून पर्शिअन्स्. रोमनांना अधून मधून होणार्‍या व्हायकिंग, गॉल्,गोथ, जर्मॅनिक टोळ्या,हूण ह्यासर्वानीच थोडेफार त्रस्त केले होते. इराण्यांणा, पर्शियनांना उत्तर पूर्वेकडे मध्य आशियातील भटक्या जमाती, वाळ्वंटातील टोळ्या(बदायुनी वगैरे) असा काहिसा उपद्रव होता. पूर्वेकडे काही लहान्,फुटिर इस्लामपूर्व मूर्तीपूजक (हिंदु/बौद्ध)राज्ये पूर्व सीमेवर कारवाया करीत.
बौद्ध ,ख्रिश्चन धर्म मध्यपूर्वेतील(आजच्या अरब जगतातील) काही ठिकाणी पोचले होते. आजच्या यु एस एस आर मधील उझबेक, ताजिक इत्यादी जमातीतील कित्येक जण बौद्ध होते. मध्यपूर्वेत उरलेले कित्येक जण अजूनही मूर्तीपूजक होते. त्याम्चे स्थानिक म्हणता यावेत असे धर्म होते. आज ऐकायला हिणकस वाटतील अशा कित्येक प्रथा ते श्रद्धपूर्वक पाळित. रोमन स्वतःला शासक म्हणवत असल्याने जोवर महसून मिळतोय, तोवर त्यांनी ह्यात काही फार ढवळाढवळ केली नाही. law and order राखायला लागेल, तेवढाच हस्त्क्षेप.
असे असले तरी मध्यपूर्वेत एकेश्वर वादाचा डिंडिम फार पूर्वीच फिरवला गेला होता.ज्ञात इतिहासात सर्वप्रथम अब्राहम ह्याने ही द्वाही फिरवली. आज मध्यपूर्वेत हरेकास हा माणूस आदराचे स्थान आहे, अगदि ज्यू, ख्रिश्चन्,मुस्लिम सगळेच आपण(च) ह्याचेच वंशज आहोत, वैचारिक वारसा चालवतो आहोत असे मानतात. अब्राहमानं देव एकच आहे, मूर्तीपूजा पाप आहे म्हणत मूर्ती फोडण्यास सुरुवात केली. पाठोपाठा त्याच्या वंशातील दाउद्,सुलेमान(डेविड्,सोलोमन) ह्या प्रेषित्/राजांनी एकेश्वरवादाचा हिरिरिने पुरस्कार केला. ह्याम्च्यातीलच मोझेसने पुढे इजिप्तच्या मूर्तीपूजक फेरोज् शी उभा लढा मांडून दैवी साक्षात्कार जनतेला घडवल्याचे मानले जाते. त्याही नंतर काही शतकांनी इसवी सनाच्या प्रथम शतकाच्या आसपास येशू ख्रिस्त नावाची परम प्रभावी व्यक्ती होउन गेली. ह्याचे प्रत्यक्ष सामाजिक जीवन म्हटले तर केवळ दीडेक वर्षच असेल, पण त्या काळात त्याच्यासमोर जो कुणी येइल, तो त्याने प्रभावित होइ. प्रभावित झालेला इतरांस जाउन जो माहिती सांगे, त्याने इतर प्रभावित होत. तर त्यापासून आपल्या मूळ शिकवणूकीस धोका वाटल्याने, ज्यू समाजातील वरिष्ठांनी त्याच्यावर खटला चालवायची मागणी करून रोमन सत्तेस त्याला क्रुसावर चढवायला लावले*.

ह्या येशूच्या जादुइ वाणीची माहिती सर्वप्रथम त्याचा (!थेट)शिष्य पॉल आणली.बाहेरच्या जगापुढे हिरिरिने आणली.
हळुहळु पुढच्या तीनेक शतकात ख्रिश्चन धम्राचा प्रसार वाढतच चालला. परस्पर प्रेम, एकदा ख्रिश्चन झाल्यवर मग विश्वबंधुभाव ह्या गोष्टींचा सामान्यांवर प्रभाव न पडता तरच नवल. पहिल्या प्रतिसादात राजकिय पार्श्वभूमी साम्गितली आहे, इथे दुसर्‍यात आणि तिसर्‍यात धार्मिक कारणे सांगावी म्हणतोय.
थोडीफार इस्लामची माहिती http://www.misalpav.com/node/19374 ह्या धाग्यावर दिसेल.

.
.
.
.
इस ६१० च्या आसपास प्रेषित मुहम्मद ह्यांनी कुर आन लिहिण्यास सुरुवात केली. ६२२च्या आसपास अनुयायांची संख्या प्रचंड वाढली. मानवी बंधुभावाचा संदेश व आक्रमकपणे, ठासून मत मांडाणे ही प्रमुख कारणे असावीत. लवकरच मुहम्मदांच्या नेतृत्वाखाली आख्ख्या अरबस्थानात एकछत्री मुस्लिम राज्य स्थापन झाले. बहुतांश सर्व टोळ्यांनी, अरबांनी, कुरैश टोळ्यांनी व अगदि स्थानिक ज्यूंनी सुद्धा नेतृत्व स्वीकारत राज्य स्थापनेस हातभार लावला. आजच्या सौदी अरब, येमेन, ओमान इतपतच हे मुस्लिम राज्य होते. इस६३२ मध्ये मुहम्मदाच्या मृत्युनंतर मात्र पुन्हा टोळ्या फुटुन बाहेर पडू लागल्या. सुमारे वर्षभर चाललेल्या मोहिमेत(रिद्दा मोहिम) अबु बक्र ह्यांच्या नेतृत्वाने ह्या विरोधस कायमचे शांत केले.
.....
आता मध्यपूर्वेत च्या पूर्वेस होते पर्शिया, पश्चिमेस रोमन. बहुतांश मध्यपूर्व अजूनही गैर मुस्लिमच होती.
इस ६३६ पर्यंत अरबस्थान, येमेन, ओमान हे लगतचे देश इथे सत्ता मजबूत केल्यावर त्याच वर्षी रशिदुन खिलाफतीने पारशी साम्राज्यावर हल्ला चढवला. लागोपाठच्या
दोन तीन लढायांत अनपेक्षित पण निर्णायक पराभव केला. एकेकाळचे हे महाबलाढ्य व समृद्ध साम्राज्य , काही शतके झळाळी व दरारा टिकवून असलेले हे राज्य एकाएकी काही वर्षातच खलास झाले कायमचे. अरबांचा तडाखा इतका जबरदस्त होता की पारशी राज्य दोन्-तीन वर्षातच खिळखिळे झाले. त्यांनी पूर्वीपासून संपर्क ठेवून असलेल्या
रोमन्/बाय्ज्झेंटाइन साम्राज्याची व चीन मधील तांग साम्राज्याचीही मदत घेण्याचा प्रयत्न चालवला. पण इस ६५१ ला त्यांना ऑक्सस नदीजवळील लढाईत अंतिम व प्राणांतिक टोला बसला. उरलीसुरली सत्ता संपली.

--मनोबा

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

28 Oct 2013 - 12:59 am | प्यारे१

अभ्यासपूर्ण लेख.

आपण म्हटल्याप्रमाणं इथं अल्जिरिया मध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोमन लोकांचं साम्राज्य होतं. आज देखील इथे त्यांच्या रोमन धाटणीतल्या इमारतींचे अवशेष 'तिपाझा' नि 'ग्वेल्मा' इथं पहायला मिळतात. आफ्रिका खंडातलं सगळ्यात जुनं चर्च अल्जिरिया मध्ये आहे असं ऐकिव माहितीतून समजलंय. (१००० वर्षांपूर्वीचं वगैरे ऐकलंय. ऑथेन्टिसिटी कितपत याबद्दल शंका आहे.) थोडं गुगललं तर http://ghardaiatourisme.com/site/en/nord/algerie-romaine/ हे मिळालं.

बाकी तलवारीच्या नि भाकरीच्या जोरावर धर्माचा प्रसार सगळ्याच संप्रदायांमध्ये आढळतोय. व्यापार निव्वळ! :(

अभ्यासपूर्ण लेख. वाचते आहे.
खालच्या आकृतीत ती ढोबळमानाने दाखवायचा प्रयत्न केलाय.- म्हणजे युरोपची भूमी, # म्हणजे समुद्र, * म्हणजे मध्यपूर्व तर . म्हणजे आफ्रिका असं मानलं तर साधारण रचना अशी काहिशी आहे:-

ही आकृती मला कळली नाही.

भूमध्य समुद्राच्या भूगोलाची थोडिशी माहिती खालील धाग्यावर मिळेलः-
इथं मला धागे दिसत नाहीत.

मन१'s picture

28 Oct 2013 - 7:29 am | मन१

थ्यांक्स प्यारे.
मंडळी,
ह्याच धाग्याचा पुढील अंक/भाग खालच्या दुव्यावर वाचता येइल :-
http://www.misalpav.com/node/25990
अवश्य वाचा , प्रतिक्रिया कळवा.
.
नोटः-
जवळपास निम्म्या जगात मुस्लिम धर्म असणारे सत्ताधारी मध्ययुगात कसे कसे पसरले ते माझ्या चश्म्यातून लिहितोय. (सध्याच्या भारतीय मुस्लिम नागरिकांबद्द्ल मला राग आहे असे कुणीही समजून घेउ नका प्लीझ. मी मध्य युगाबद्दल लिहितोय.)

चित्रगुप्त's picture

28 Oct 2013 - 8:43 am | चित्रगुप्त

वाचत आहे. सर्व नीट वाचल्यावर प्रतिसाद देण्याचा विचार आहे. विवेचनाबरोबरच शक्य तितकी जास्त चित्रे, नकाशे वगैरे अवश्य द्यावेत.
हाच का तो बाबक खुर्रामुद्दिन ? Babak Khorramdin
.

मुक्त विहारि's picture

28 Oct 2013 - 8:46 am | मुक्त विहारि

वाचत आहे.

प्रचेतस's picture

28 Oct 2013 - 9:06 am | प्रचेतस

छान लिहित आहेस रे मनोबा.

हा नकाशा पुरेसा बोलका ठरावा.
a

चित्रगुप्त's picture

28 Oct 2013 - 9:34 am | चित्रगुप्त

युरोप, रशिया, आफ्रिका इ. च्या संदर्भात पर्शियन साम्राज्य नेमके कुठे होते, याचा शोध घेता हे सापडले: (या साम्राज्याचा भारतीय इतिहासात वा पुराणात काय उल्लेख सापडतो? याचे संस्कृत नाव काय?)
.

मदनबाण's picture

28 Oct 2013 - 9:54 am | मदनबाण

वाचतोय !

पैसा's picture

28 Oct 2013 - 4:16 pm | पैसा

अगदी अनोळखी अशा इतिहासाची छान ओळख करून देतो आहेस.

मन१'s picture

29 Oct 2013 - 7:21 am | मन१

सर्व वाचकांचे,वाचनमात्रांचेही आभार.
वल्ली, चित्रगुप्त ह्यांना नकशाबद्दल विशेष थेंक्स.
वरील लेखात एक दुरुस्ती आहे. रशिया हा रोमन साम्राज्याचा भाग नव्हता.
दुरुस्ती सुचवल्या बद्दल बॅटमॅनचे आभार.
.