आयुष्य हे.....

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
23 Oct 2013 - 2:44 pm

आयुष्य हे......
संध्यासमयी सुमारे ४ वाजता आम्ही फेसबुक फेसबुक खेळण्यात मग्न असताना मोबाइल खणखणला , स्क्रीनवर घरचा नंबर. अरेच्या ! ह्यावेळी कोणी फोन केला असेल ? म्हणुन फोन पट्कन उचलला पलिकडुन
आई " ह्यालो सोनुडया तुला एक तास अगोदर रजा मिळेल का ग ऑफिसातुन ?
मी : का ग आई ? काय झाले ? काही गड्बड आहे का ?
आई : हो जरा काम आहे मह्त्वाचे घरी आल्यावर सांगते पण तु ये पटकन .
मी जरा चाचरतच विचारले आइ सगळे व्यवस्थित तर आहे ना ग ? काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला ?
आई : अग नाही ग सोना काही प्रॉब्लेम झालेला नाही सगळ ऑल इज वेल आहे पण तु नीघ लवकर ,आल्यावर बोलु माझा जीव असा टांगणीवर ठेवून मातोश्रीनी फोन ठेवला .
झाल…..
अमिताभने एक करोड रुपयासाठी विचारलेल्या प्रश्नाचे आपण दीलेले उत्तर चुक आहे की बरोबर हे सांगण्याआधी छोटुसा ब्रेक घेतल्यावर हॉट सीटवर बसलेला स्पर्धक जसा चेकाळत असेल ना तसेच काहीसे माझे झाले.
बॉसला सुट्टीबद्दल विचारले , सुट्टी मिळाली पर्स खांद्यावर टाकुन स्कार्फ बांधत होते तोच भाउराया गेट्मध्ये दिसले " अरेच्या ह्याला कस माहीत मला लवकर घरी निघायच ते ?"
मी : काय रे लवकर कसा काय तु ?
बंधु : आइचा फोन मला पण आलेला तुला घेउन यायला सांगितले बरोबर
मी : हो का . पण अस काय अर्जंट काम आहे म्हणे ?
बंधु : वो तो घर जाओगी तभी मालुम पडेगा समझी क्या?
मी : आयला काय भानगड आहे म्हनून गाडीवर बसले.
आमच्या बंधुची गाडी चालवणे म्हणजे एक वेगळा भाग तयार होइल १० मिनीटाच्या कालावधीत किमान ३-४ मिनी हार्ट अटयाक येउन गेले मला. पण पुर्ण रस्ताभर डोक भनभणुम गेलेल, घरी पोहचले आइने हसतमुखाने दरवाजा उघडला पाह्ते काय, हॉल मस्तपैकी आवरलेला, गालिचा अंथरलेला, मध्ये काचेचा टेबल त्यावर पॉट्मध्ये ताजी फुले सजवलेली ,दिवाणवर नवी बेड्शीट ,मस्तपैकी अगरबत्तीचा सुगंध दरवळ्तोय
मी : अरे व्वा !! आइ आज काय विशेष आहे का कुणी येनारे इतका छान हॉल सजवलायेस ते अस म्हणत दिवाणभर फत्कल मारली तर आई म्हणाली हो तुला बघायला पाहुणे येताहेत संध्याकाळी , आइने स्मित करत डोळे मिचकावले" क्काय्य्य्य्य ???????????? ? माझा टाहो दाही दिशात घुमला घरचे सगळे टाहोला हो देत माझ्याभोवती प्रकट झाले
पहाटे-पहाटे मौ मौ उबदार बिछाण्यात निद्रादेवीच्या आराधनेत मग्न असताना कुणीतरी आपल्या मुखकमलावर भडाभडा हंडाभर थंड पाणी ओतल्यावर आपल्या अंतर्मनाची जी अवस्था होते ती शब्दात मांडणे कठिण बूवा..
आई तुला सांगितल ना मला लग्न नाही करायच एकदा काय १०० दा सांगितल तरीही ?? तेच ?
आई : करायच नाही म्हणजे ?
मी : म्हणजे इतक्यात नाही करायचय अजुन लहाने मी ;) जरा सुखाने जगु देत की मला आता कुठे नोकरी लागलिये जरा एन्जॉय करु दे की लाइफ.
बंधु : म्हणे अजुन लहान आहे टींब टींब वर्षाची घोडी झालीस की आता ?
तुम्ही मला येड बनवुन बोलावलय इकडे आधी का नाही सांगीतल हे सगळ ?
बंधु : ऑ.. हॉ ..म्हणे आधी का नाही सांगीतल , नुसत मुलगा पाहुया म्हटल तरी इतक भोकाड पसरते जस कुणी फाशीवर देणारे तुला :p
मी : " आई ही शुद्ध फसवणुक आहे मला नाही पाह्यचा मुलगबिलगा ,मला नाही करायच लग्न - बिग्न मी अशीच सुखी आहे मस्तपैकी जगतेय तर का माझ्या सुखावर ऊठला आहात तुम्ही सगळे ? माझा स्वर चिडचिडा अन रड्वेला झालेला एव्हाना. जे जे मला समजावुन सांगत होते त्यांच्यावर वसकुन जाणे त्यांचे बोलणे मोडीत काढणे, बोलण्याला तीव्र विरोध करणे इतकच होत आता हातात माझ्या.
किमान अर्धा तास तरी वादविवाद स्पर्धा रंगली नंतर बाबांनी हस्तक्षेप केला " अग बघुन तर घे नाही आवड्ला तर जबरदस्ती थोडिच्च आहे , दुसरा बघुया अन आवडला तरी थांबुया की ४-६ महीने त्यात इतक हायपर होण्यासार्ख काये बेटा?
मी एकटी इतका वेळ किल्ला लढवत होते. सगळे एका बाजुला अन मी एका बाजुला
जास्तीची म्याजोरटी या उक्तिप्रमाणे शेवटी हो ना ..ही करत मी नांगी टाकली अन आयुष्यातल्या पहिल्या कांदेपोहे कार्यक्रमास सज्ज झाले.
"साडी-बीडी अजिबात घालणार नाही सांगुन ठेवते आधीच , आमचा माज ;)
घरचे हतबल .. तुला जे हव ते घाल पण शोभेल अस घाल.
एरव्ही कुठे बाहेर जाताना किंवा कार्यक्रमास जाताना माझा एक अतिप्रिय ड्रेस आहे तोच घालते .सगळे म्हणतात
"छान दिसते अगदी त्यात" म्हणुन तो इतका वेळेस घातलाय की कुणालाही शंका यावी की बयेकडे एकच ड्रेस
आहे की काय "?
पण नाही… आज तोच तो अतिप्रिय ड्रेस वहिनीने प्रेस करुन ठेवलेला ,,मी अजिबात त्याकडे ढुंकुनही पाहिले नाही साधासाच घातला आइच्या कपाळावर आठया ,पण आवरत घेतल, मनात म्हणाली असेल कार्टी का.पो. ला तयार झाली हेही नसे थोड्के ;)
झाल वहिनीने छानपैकी तयार केल.आई हजार सुचना देत होती पण माझ चित्त थार्यावर असेल तर कानात जाइल काही .आवराअवर करत असताना फोन वाजला ,पाहुण्याचाच होता. अमुक अमुक चौकातुन कसे यायचे विचारत होते आईला.
आई म्हणाली, थांबा आहात तिथे, मी मुलाला पाठ्वतेय घ्यायला.झाल पुन्हा धावपळ लगबग सगळ्यांची
पाचेक मिनिटात पाहुणे आले.
मी स्वतः लाच समजावत होते इतक भिती वाटण्यासारख काय आहे त्यात ? नुसत चहा - पोहे घेउन तर जायचे आहे अन प्रश्नाची उत्तरे द्यायचीत बस्स श्या .... इतकी काय घाबरतेस बावळट मुली.
तशी मी स्वयंघोषीत वाघीण आहे पण पाहुणे पहायला येताहेत म्हट्ल्यावर माझी अवस्था पावसात भिजलेल्या थरथरणार्या मांजरीच्या पिलासारखी झाली होती.
घरात नुसता कांदेपोह्यांचा विषय जरी निघाला तरी मी अगदी चवताळुन जात असे का कोण जाणे,
इतक छान आयुष्य आहे. इतके छान आई - बाबा त्यांना सोडुन जाण्याचा विचारही कधीही मनाला शिवला नव्हता. नोकरी लागल्यानंतरचे पहिले वर्ष दिड वर्ष तर मी आकांड - तांड्व करुन कसेबसे ढकलेले काही दिवसानी आई - बाबांना विचारणा होउ लागली अमुक तमुक मुलगा आहे पाहुन घ्यायचा काय ?
पण माझ्या समोर विषय जरी निघाला तरी मी जो पवित्रा घेत असे की आइ बाबांना “लग्न नको पण कार्टीला आवरा “ असेच वाटत असे ;) कधी कधी आइ आडुन आडुन विचारे " तुला कुणी आवडला तर नाही ना ? तस असेल तर सांगुन टाक बै ,वाटल्यास आम्ही तो जो कुणी असेल त्यालाही भेटु "
पण हाय रे मेरी कीस्मत !!!! तशा कुणी हीरोने एण्ट्री मारलेली नव्हती अजुन लाइफमध्ये.
हम्म..... तर काय सांगत होते मी ,
पाहुण्यांच घरात आगमन झाल पुन्हा आइची अन वहीनीची लगबग चालु झाली पाणी दिल सगळ्यांना
,इकडे माझी चुळ्बुळ चालुच " खापराच तोंड असत तर फुटुन गेल असत एव्हाना " अशी आजी नेहमी चिड्वायची मला आज त्याच खापराच्या तोंडातुन चुकार शब्द बाहेर फुटत नव्हता .
शेवटी वो घडी आ ही गयी कोर्टात जसे ओरडतात ना अमुक तमुक हाजीर SSSSS हो SSSS
तस्सच ..
आइ आली ,एकीकडुन वहीनी आली “हे बघ हा ट्रे घे हातात, व्यवस्थीत चहा दे सगळ्यांना ,गड्बडुन जाउ नकोस, समोर खुर्ची ठेवली आहे तिच्यावर जाउन बस अन हो विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थीत उत्तर दे कळल आगाउपणा करायचा नाहीस “कळल ?
ह्याला तंबी म्हणावे की प्रेमळ सल्ला देव जाणे..
जसे हॉलच्या दाराशी पोहचले तसे मला हलाल होणार्या बकर्याचा फील यायला लागला पाउल पुढे सरकेचना
तस वहीनीने मागुन टोचण दिले आत गेले “खाली मुंडी पाताळ धुंडी” वर न बघता सग्ळ्यांना चहा दीला
बाबांनी ये इथे दिवाणवर बैस म्हणुन खुणावले पण आइने तर खुर्चीवर बस म्हणुन सांगितले होते
हॉल तुडुंब भरलेला, बघायला आलेले ६-७ जण, मध्यस्थ , अण आंमचे घरचे असे १०-१२ जण तरी असु हॉलमध्ये
डो़क्यावर इतका जोराचा पंखा चालु असतानाही मला घाम फुटलेला , सग़ळे जण माझ्याकडेच पाहतायेत या विचारने अजुनच दड्पण आलेले.
कुठे बसु नक्की हा विचार करत असताना आइने समोर येवुन खुर्चीवर बसवले.
इतकी घाबरतेय ग मुर्ख ? माणसेच आहेत ही खाणार नाहियेत तुला अस स्वतःला कितीदा समजावुन झाले होते तरीही मनाचा न मेंदुचा ताळ्मेळ बसेना आज .
मध्यस्थांनी ओळ्ख करुन दीली ही आई आहे मुलाची, तो भाउ आहे ,ती वहीनी आहे, कोपर्यातली आजी पलिकडचा थोरला भाउ अन हे समोर बसलेले बाबा आहेत मुलाचे ,अन तो मधोमध बसलेला मुलगा माझी काय त्याच्याकडे बघायची हींमत झाली नाही फक्त पाय तेव्हढे बघितले .
समोरुन प्रश्न मुलाच्या वडीलाचा
" नाव काय आहे बाळा तुझ "
मी " अ ब क "
पुर्ण नाव सांग ह्यावेळी आवाज वेगळा होता मी वर तर पाहिले मुलाचे थोरले बंधु
मी : अ ब क ड ई च छ ज झ
मुलाचे थोरले बंधु : जरा मोठयाने सांग सगळयांना ऐकु जाइल असे
मी : नंतर भेट मग सांगते तुला जाताना आमच्या पिलुलाच सोड्ते बघ तुझ्या अंगावर (पिलु आमचा भु- भु ) अर्थात हे सगळ मनातल्या मनात मनातल्या मनात .
मुलाची आजी : स्वयंपाक येतो का सगळा ?
मी : हो ..
मुलाची बहीण : लग्नांतर नोकरी करायला आवडेल ?
मी : हो..
मुलाचे बाबा : गाडी चालवता येते का ?
मी : कुठ़ली ? २ व्हीलर की ४ व्हीलर मला सगळ्या विदाउट गिअरच्या २ व्हीलर चालवता येतात
मुलाची आई : नॉनव्हेज बनवता येत ?
मी : हो ....
मुलाची वहीनी : काय काय करायला आवडत अजुन ?
मी : मला ना डांस करायला आवडतो उत्तर देता देता आईकडे बघितले तर तिच्या कपाळावर आठ्या
“ हीला काय सांगायला सांगितलेल अन कन्यारत्न काय सांगतेय “
मुलाची वहीनी : कुठला डांस ?
मी : सगळे स्टाईल बॉलिवुड्पासुन कंटपररी पर्यंत .
मुलाची वहीनी : डांस शिकतेय का तु ?
मी : हो शिकतेय
मुलाची वहीनी : वा वा मस्त !
शिक्षण काय झाले , इथपासुन तर छंदापर्यंत सगळ्यांनी सगळ विचारले पण मुलाने एकही प्रश्न विचारला नाही
तर त्याचे बाबा म्हणाले तुम्हाला दोघांना सेप्रेट बोलायच असेल तर बोलु शकता शेवटी तुमच्या दोघांच्या पसंतीवरच सगळ अवलंबुन आहे.
झाल ..हे काय कमी होत
भावाच्या खोलीत गेलो वरच्या मजल्यावर ,माझे घड्याळाकडे बघुन झाले, मग झुंबर बघितले मग भिंतीवरचे वॉलपेपर्स अन सर्व बारिकसारिक वस्तु बघुन झाल्या आता बघायला काही विशेष उरले नव्हते
रोजरोज दिवसातुन १०० वेळा पाहिलेल्या वस्तुंमध्ये मी काय शोधत होते राम जाने.
यार ... हा मनुक्ष पण काही बोलायला तयार नाही पिन्ड्रॉप सायलेंस दोन्ही बाजुनी
बाबा मुका तर नाही ना ? अशी पुसटशी शंका येउन गेली.
पाचेक मिनिटात समोरुन प्रश्न आला
" तुमच्या काय अपेक्षा आहेत जोडीदाराकडुन " ?
मी : तस विशेष काही नाही.
तुमच्या काय अपेक्षा
तो : तशा माझ्याही फार अपेक्षा नाहित I just want a indipendant girl .
I am a Management graduate with a post graduate in Business Administration and now working with a largest training and consulting company.
मी : Oh really
(नक्कि काय करतो हा बाबा ? मनातल्या मनात )
तो : Quite a practical person, fulfill all my responsibilities with full dedication and hardwork.
मी : good
तो :Taken all the challenges of life till now with great spirit which makes me quite matured to handle every situation with my intelligence, patience and practical attitude.
मी : लय भारी हे आपले …gre8
वा ..वा ...काय फर्डे विंग्रजी बोलतो हा टाळ्या....... ;)
पहिल्या वाक्याचा मराठीत अर्थ लावता लावता दुसर वाक्य कानावर धडकत होत.
( च्यायला कॉन्वेंट एज्युकेटेड आहे म्हणुन काय सगळ विंग्रीजीतच बोलणार का ?
अरे निदान समोरच्याचा तरी विचार कर ना त्याच्या डोक्यात शिरतेय का मागे भींतीला आदळतय ;) )
तो : What about you
मी : सुसंस्क्रुत , सुस्वभावी , सुशीक्षीत , निर्व्यसनी, बस्स .. (माझा क्लास घेतो काय ? घे आता ! मी स्वतःच माझी पाठ थोपटुन घेतली. )
खाली गपगुमान बसलेला मुलगा वर आल्यावर पोपटासारखा बोलु लागला बरोबर ३ मिनिटात त्याने त्याचा इतिहास , भुगोल ,गणीत, सगळे एका दमात सांगुन टाकले.
मला तर काय बोलु असे झाले तेव्हढयात खालुन बोलावल्याचा आवाज आला
सुटले बुवा हुश्श....
यथावकाश चहा पोहे झाले मी आतल्या खोलीत गेले .मंडळीच्या गप्पा रंगल्या खाणदाण - जाळेमुळे - नातेगोते सर्वाचे उत्खणन झाले शेवटी उशीर झालाय लांब जायचेय म्हणुन मंडळी उठली , तेव्हढ्यात वहीनी खोलीत आली : चला तुम्हाला बोलवलेय, निघालेत ते "आता परत कशाला जा की म्हणाव कडेकडेने ;)
मुलाची आई पुढे आली माझा हात पुढे घेउन त्यात पैसे ठॅवले .
मी : कशाला नको नको राहु द्या .
मु. आई : अग घे ग रीत आहे ही.
आईकडे पाहीले : आईने होकार दर्शविला
पण पैसे घेतल्यांनतर पाया पडायचे असते हे मी साफ विसरुन गेलेले, मुलाची आई आशिर्वाद द्यायला सज्ज झालेली बिचारी , पण मी मक्खासार्खी उभी , माझ्या आईला काही सुचेना कार्टीच्या काही लक्षात राहत नाही १० दा सांगितले तरीही "
आईने खुणेनच सांगितले नमस्कार कर बयो .
मग मी इथुनतिथुन हॉलंमध्ये जितके उपस्थीत होते त्यांना सर्वांना चरणस्पर्श केला मुलगा सोडून.
आम्ही कळवतो हे वाक्य अवजड्ता कानी पड्ले सगळे गेटपर्यंत सोड्वायला गेले टाटा बाय बाय गुड्नाईट :)
रात्री जेवताना आईने विचारले.
कसा वाटला मुलगा ?
मी: ठीके
आई : तिकडन होकार आला तर काय सांगायचे ?
मी : बघु ....

त्यावर ५-६ कांदेपोहे पार पड्ले .
काही छान अनुभव आले काही कटु , काही लोकांच्या भावी सुनेकडुन कीती भरमसाठ अपेक्षा असतात अन काही लोकांच्या कीती माफक , काही लोक कीती साधे अन काही लोक कीती बनवे.
कुणी मला रिजेक्ट केले तर मी कुणाला !
हो पण का. पो. इतकेही वाइट नसतात निदान माझा तरी भ्रम अन भिती नाहीशी झाली.
आता तर मी इतकी सराइतपणे वावरते , इतकी छान उत्तरे देते की कुणालाही वाटेल " मी मास्टर डिप्लोमा इन कांदेपोहे " केला आहे ;)
मी मध्येच सुट्टी घेतली की " काय आज पाहुणे येणार वाटत : शेजारच्या काकु .
" जास्त चाफत बसले की चिंगळ्या हाती लागतात " : दुरच्या नात्यातली खोचक आजी .
" काय आता लाडु कधी खिलवतेस ? ,का.पो. का.पो खेळत नको बसु जास्ती, बघ मला, मी तुझ्याच वयाची आहे अन एका मुलाची आई झालिये मी , का आज्जीबाई झाल्यावर लग्न करणारेस ? माझी एकेकाळची बाल मैत्रीण आमच्याच कॉलनीत राहणारी जेव्हा जेव्हा माहेरी येते तेव्हा तेव्हा माझी हजेरी घ्यायला येते का मला टोमणे मारायला ? तिलाच माहीत . माझे लग्न झालेय मी फार काहीतरी मोठे तीर मारलेत असा अविर्भाव असतो नेहमी चेहर्यावर
सध्या तरी मी काही कार्यक्रमास जाणे आवर्जुन टाळते. गेले की सगळ्या महिला मंड्ळाचे तेच तेच प्रश्न " लाडु कधी ? " पड्ला का कूणी पसंत ? ह्यावर्षी बार उड्वुन टा़कानाहीतर ज्यांच्या ज्यांच्या कन्येचे दोनाचे चार झाले आहेत त्यांचा त्यांचा आयांची आमच्या आईची क्लास घेण्याची संधी त्या काही सोडत नाहीत.
असो..
बोलु तीतके थोडेच
..“ तस लग्न ही थोड्या फार प्रमाणात तडजोड्च आहे कुणालाही सगळ्या अपेक्षांची पुर्ती होइल असा जोडिदार मिळण हे केवळ भाग्यच म्हणाव लागेल .पाचही बोट सारखी नाहीत तर माणसे कुठूण असणार ?निरनिराळे स्वभाव , सवयी , जगण्याची पद्ध्त सर्व निरनिराळे , बस कधी वेळ प्रसंगी आपण थोड झुकत माप घ्याव तर कधी समोर्च्यानेही आपल्याला समजावुन घ्याव अस आई बाबांच मत आताशा मलाही ते पटतय हळुहळु “
"जोवर तुला स्वतःला कुणी मनापासुन आवडणार नाही तोपर्यंत हो म्हणु नकोस अन आम्ही ही तुझ्यावर काही लादणार नाही . शेवटी आयुष्य तुझ आहे " मला हे निर्णय स्वातंत्र्य आई- बाबांनीच दिलेय
त्यामुळे
मला जोपर्यंत कुणी क्लिक होत नाही तोपर्यंत " अपुन किसकुच हा नही बोलेंगे लाइफ का सवाल हे भाई , क्या बोलते बॉस लोग :)

साहित्यिकविरंगुळा

प्रतिक्रिया

पिवडे क्रमशः टाकाया इसरलीस काय? ;)
असो, भारी लिव्हलीस. हाबिनंदण. :)

बापु देवकर's picture

23 Oct 2013 - 2:54 pm | बापु देवकर

नेहमी सारख्या कांदे पोह्याची वेगळी चव ...:-)

पैसा's picture

23 Oct 2013 - 2:59 pm | पैसा

नोकरीचा बायोडेटा फॉर्म सांगणारा मुलगा धन्य!
नर्मविनोदी, खुसखुशीत लिखाण! पिवशे, डरने का नै! तुला आवडेल असा कोणतरी एक दिवस येईल, तेव्हा तुला कळेलच आपसूक!

टवाळ कार्टा's picture

23 Oct 2013 - 4:14 pm | टवाळ कार्टा

चायला बर्याच पोरिंच्या अपेक्शासुध्धा कैच्यकै असतात...पहिल्याच भेटीत्/कांदेपोह्यांच्या कर्य कार्यक्रमात काय विचारले/बोलले पाहिजे ते कोणी सांगेल :P

पैसा's picture

24 Oct 2013 - 11:51 pm | पैसा

तुम्ही यासाठी धागा पण काढला होता! अजून जिथल्या तिथेच?

टवाळ कार्टा's picture

25 Oct 2013 - 11:45 am | टवाळ कार्टा

१. मला अहो वगैरे नका हो म्हणु ताई :)
२. माझी बरीच प्रगती झालेली आहे ;)

पण अशा कैच्यकै अपेक्शा असणार्या मुलीसुध्धा बघितल्या आहेत....काहीवेळेस अगदी इंजिनीअर मुलीसुध्धा "माझ्या आईबाबांनी जसे सांगितले आहे तसेच मी करते...तेच बरोबर" अशा मेंटालीटीने बोलतात (त्यात वाईट काहीच नाही) पण बर्याचदा असेच नजरेस आले की त्या मुलींना स्वताचे मत नव्हते...

पैसा's picture

25 Oct 2013 - 2:25 pm | पैसा

कार्ट्या, तुला मुक्ता बर्वे मिळाली का नाही? ;)

बॅटमॅन's picture

26 Oct 2013 - 11:00 pm | बॅटमॅन

बर्वीणकाकू यांनाच पाहिजे होत्या होय? तो एपिसोड अंमळ विसरलोच खरा, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद पैसाकाकू =)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

23 Oct 2013 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा

जिल्बुषा तू महान हैस! =))
@खापराच तोंड असत तर फुटुन गेल असत एव्हाना " अशी आजी नेहमी चिड्वायची मला आज त्याच खापराच्या तोंडातुन चुकार शब्द बाहेर फुटत नव्हता >>> =)) काय उपमा! =))

प्रचंड ह ह पु वा होत्ये अजुनंही! =))

बाकिची परतिक्रीया शांण्त झाल्याणंतर!

भावना कल्लोळ's picture

23 Oct 2013 - 3:42 pm | भावना कल्लोळ

पियुसे, क्लीक का जो तू बोलता है न वो एकदम सही ही भिडु, जब तक अंतर आत्मा से आवाज नही आती तब तक का. पो. करती रह और दिल कि डगर खुली रख… क्या मालूम तेरा राजकुमार कब उस डगर पे घोडे पे स्वार होके आ जाये, बाकी बोले तो एकदम ढासू लेख हुयेला है तेरा…

Dhananjay Borgaonkar's picture

23 Oct 2013 - 3:42 pm | Dhananjay Borgaonkar

मस्त झालाय लेख :D
पुढील कांदा पोह्यासाठी शुभेच्छा :)

क्या ट्विटी यह सब क्या चलरेला हय ? ;) सब्बीच बोलते मेरुकु नय करना,नय करना... लेकिन अंदरसे सबको मंगताच है की नय ? ;)
तो अभी एकदम सेटिंग-वेटिंग जमाके सुमडीमे कोंबडी पकडलेने का क्या ? ;) बोले तो एकदम सह्ही लडका देखके बँड बजा देने का ! ;) अब तुमको तो यक्सपीरीअस भी बोहोत होगयेला है...बोले तो लडका देखने का, तो अगली बार टेंशन वेंशन लेने का नय... परफेक्ट लडका लगा तो उधरीच बोल डालने का, क्या ? अभो वो सब तो तुमको मालुमिच हय... ;)

विजुभाऊ's picture

23 Oct 2013 - 3:52 pm | विजुभाऊ

मस्त. लिहीलय. एकदम फ्रेश स्टाईल मध्ये.
आयुश्य हे चुलीवरल्या कढईतेल कांदे..........पोहे
हे गाणे आठवले

सविता००१'s picture

23 Oct 2013 - 3:58 pm | सविता००१

पियु, मस्त लिहिल आहेस. या कार्यक्रमांमध्ये जस्सं घडतं, अगदी तस्संच लिहिलं आहेस. झक्कास.
पण आता मात्र छानसा राजपुत्र नक्की येइल तुझ्या आयुष्यात. :)

बॅटमॅन's picture

23 Oct 2013 - 4:10 pm | बॅटमॅन

क्या बात!! कांदेपोहे एकदम फर्मास हो!! योग्य जोडीदार मिळावा म्हणून शुभेच्छा.

(सध्या सुपात असलेला) बॅटमॅन.

अनन्न्या's picture

23 Oct 2013 - 4:10 pm | अनन्न्या

हहपुवा....

हासिनी's picture

23 Oct 2013 - 4:13 pm | हासिनी

वा! व्वा!!........सुरेखच लिहलं आहेस गं!
शुभेच्छा आहेतच आमच्या.
बर्‍याच दिवसांनी दिलखुलास लेखन वाचायला मिळालं!!!
:)

प्रचेतस's picture

23 Oct 2013 - 4:33 pm | प्रचेतस

खुसखुशित लेख गो पिवशे.
बर्‍याच दिवसांनी लिहिती झालीस.

Pearl's picture

23 Oct 2013 - 5:47 pm | Pearl

मस्त लेख. छान लिहिलं आहेस पियूषा.
आवडलं :)

दिपक.कुवेत's picture

23 Oct 2013 - 7:12 pm | दिपक.कुवेत

मजा आली वाचुन. ह्या निमित्ताने आस्मादिकांना स्वःताचे कांपो चे कार्यक्रम आठवले. पण हे अनुभव असतात एकदम खत्री!

सही बोल्ती है पियूशा!

मी : सुसंस्क्रुत , सुस्वभावी , सुशीक्षीत , निर्व्यसनी, बस्स ..

और क्या मंगताय?

स्पंदना's picture

24 Oct 2013 - 5:08 am | स्पंदना

तो पहिला गेला ते बरच झालं. स्वतःच अस एक वाक्य नव्हत त्याच्या बोलण्यात. इंग्लीश साला!
बर ! लिहायची स्टायल एकदम फंटुश का काय म्हणतात ती, अन एक सल्ला, पिवशे का.पो. ला मिपा स्टाइल बोलायच नाही. काय? अश्यान पसंत पडलेल स्थळपण पळुन जाईल. नाहीतर मग समभाषिक मिपाकर शोधा, म्हणजे काय बोलताय ते एकमेकाला कळेल काय?
लेखातले पंचेस अगदी मस्ताड. अन लेखन अगदी मनापासुनच.
आवडल हे वे सां न ल

लेखन आवडलं. तुला मनाजोगा साथीदार मिळो ही सदिच्छा!

यानिमित्तानं चुचुची आठवण आली.

ब्रिज's picture

24 Oct 2013 - 10:01 am | ब्रिज

खमंग कांदेपोहे !

मुक्त विहारि's picture

24 Oct 2013 - 10:13 am | मुक्त विहारि

आवडला....

मला माझा कंदे पोह्यांचा कार्यक्रम आठ्वला...

बाय द वे...तुम्हाला आठवत असतील आणि इथे टाकावेसे वाटतील असे "कांपोका" टाकाल का?

पुढच्या वेळी त्याच त्या कांदे पोहे ऐवजी डॉमिनो'ज पिझ्झा किंवा मॅक-डी चा बर्गर मागवून बघ ..
म्हणजे कदाचित काही वेगळे होईल . :P

विम्झ's picture

24 Oct 2013 - 11:17 am | विम्झ

"तशी मी स्वयंघोषीत वाघीण आहे पण पाहुणे पहायला येताहेत म्हट्ल्यावर माझी अवस्था पावसात भिजलेल्या थरथरणार्या मांजरीच्या पिलासारखी झाली होती." :) :)

सदासुखि's picture

24 Oct 2013 - 3:02 pm | सदासुखि

मस्त लेख. छान लिहिलं आहे.

प्यारे१'s picture

24 Oct 2013 - 3:12 pm | प्यारे१

अरे मस्त लिहीलंय.
सध्याचा करंट (पिवळे पितांबर स्टाईल) टॉपिक... पियुशा चं लग्न!

निशदे's picture

25 Oct 2013 - 2:10 am | निशदे

मस्तच झालाय की........ एकदम अ‍ॅप्रोच-ओरिएंटेड लेखन...... म्हणून जास्त आवडले.:)
एक फु.स.: असले इंग्रजी फाड-फाड फाडणार्‍या जनतेपासून जरा सांभाळून रहा.... 'मला पहा अन फुलं वाहा' अशी कॅटेगरी असते ही बर्‍याचदा.... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Oct 2013 - 10:03 am | अत्रुप्त आत्मा

.@'मला पहा अन फुलं वाहा'>>> :-D खपल्या गेलो आहे. :-D

उपास's picture

25 Oct 2013 - 8:24 am | उपास

पियुशा, शुभमंगलं भवन्तु! :)

सर्व प्रतिसादकर्त्यांचे अन दिलेल्या प्रेमळ शुभेच्छाबद्दल मनापासुन आभार :)

प्रभाकर पेठकर's picture

25 Oct 2013 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर

व्वा! अगदी कुरकुरीत लेख्/अनुभवकथन. स्वगतची वाक्ये मिपाच्या धोरणात बसवायला बरीच सेन्सॉर केलेली जाणवताहेत.

पुढील कांदापोहे कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा.

एकमेकांची मने एका कांदापोहे कार्यक्रमात काय पण अर्ध आयुष्य उलटलं तरी समजत नाहीत. शेवटी एकमेकांवर झालेले संस्कार वैवाहिक जीवनाला यशस्वी/अयशस्वी बनवितात. असो.

मिपावर असलेल्या स्वगृह, श्री गणेश लेखमाला, साहित्य, चर्चा, काव्य, पाककृती, कलादालन, भटकंती, नवे लेखन, मदत पान, आम्ही कोण? आदी सदरांच्या जोडीनेच, आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या, 'कांदे-पोहे' सदराला स्थान देऊन मिपा सदस्यांच्या/त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या/नातेवाईकांच्या 'लग्न जुळविणे' विषयक समस्या सोडविण्यास मदत करण्याचे सामाजिक कार्य मिपाने करावे असे सुचवितो.

विटेकर's picture

28 Oct 2013 - 12:00 pm | विटेकर

एकमेकांची मने एका कांदापोहे कार्यक्रमात काय पण अर्ध आयुष्य उलटलं तरी समजत नाहीत. शेवटी एकमेकांवर झालेले संस्कार वैवाहिक जीवनाला यशस्वी/अयशस्वी बनवितात.

टाळ्या .. स्वानुभावाने सांगतो , हे अगदी खरे आहे ! चांगला ( अनुरुप या अर्थाने ) जोडीदार मिळणे हे केवल भाग्य आहे ! या बाबतीत आमच्या मातोश्रींनी खूप चांगले संस्कार केले होते. लग्नापूर्वी आपल्या पाल्याची सर्वांगीण तयारी करु घेणे ही महत्वाची बाब आता अस्तंगत होत चालली आहे.... !
बाकी लेख आवडला . का.पो. चे माझे कार्यक्रम आठवले..

त्रिवेणी's picture

25 Oct 2013 - 10:33 pm | त्रिवेणी

पुढील वाटचालीसाठी शुभेच्या ग पियुषा.
पण लग्नाला मात्र नक्की बोलावं, विसरू नको.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2013 - 11:24 am | बिपिन कार्यकर्ते

मी फ़क्त एवढंच म्हणेन... "बच गया साला!!" ;) ;) ;)

नेत्रेश's picture

28 Oct 2013 - 12:11 pm | नेत्रेश

> "जास्त चाफत बसले की चिंगळ्या हाती लागतात " : दुरच्या नात्यातली खोचक आजी.
> " लाडु कधी ? " पड्ला का कूणी पसंत ? "

फेसबुकवर वाचलेला, "आता तुझा नंबर कधी" असे विचारणाऱ्या आज्यांना गप्प करण्यासाठी जबरी उपाय म्हणजे जर कधी की त्या कुणाच्या अंत्यष्ठीला भेटल्या तर त्यांना विचारायचे 'आता तुमचा नंबर कधी? '

अप्पा जोगळेकर's picture

28 Oct 2013 - 12:31 pm | अप्पा जोगळेकर

डिनरला येता का मॅडम ? बिल मी देतो.

पियुशा's picture

28 Oct 2013 - 1:03 pm | पियुशा

@ अप्पा
lolzzzzz :)

प्यारे१'s picture

28 Oct 2013 - 1:06 pm | प्यारे१

पिवडे,

नाव अप्पा असलं तरी माणूस २ वर्षापूर्वी तरी २५-२७ च्या आसपासचा होता ब्वा.
विचार करायला हरकत नाही.
डिनर ही तो करना है! ;)

नाव अप्पा असलं तरी माणूस २ वर्षापूर्वी तरी २५-२७ च्या आसपासचा होताब्वा.

एक होता अप्पा किंवा गेला अप्पा कुणीकडे असा धागा काढावा क्की क्कॉय???? अप्पाला सदेह स्वर्गात धाडलेत प्यारेकाका, कुठे फेडाल हे पुण्य =))

प्यारे१'s picture

28 Oct 2013 - 2:39 pm | प्यारे१

पिवडे टैम्प्लिज हा!

अरे बॅट्या, दोन वर्षापूर्वी २५-२७ चा 'होता' असंच येईल ना! सदेह भेटलेलो आम्ही देल्ही किचन ला. :)

अय्यो प्यारेजी, येक पे रेहना, येक तो २५ बोलो नै तो २७ बोलो.

(नुकतास पडोसन पाहिलेला, तस्मात इलाज नै.)

तिमा's picture

28 Oct 2013 - 3:07 pm | तिमा

लेखाचा आशय आवडला, पण हल्ली मराठीतल्या काही शब्दांचा वापर भलतीकडे होतो असे वाटते.
आपण दीलेले उत्तर चुक आहे की बरोबर हे सांगण्याआधी छोटुसा ब्रेक घेतल्यावर हॉट सीटवर बसलेला स्पर्धक जसा चेकाळत असेल ना तसेच काहीसे माझे झाले.
चेकाळणे हा शब्द टेन्शन मधे आलेल्या व्यक्तीला वापरत नाहीत. अतिआनंदाने उत्तेजित होऊन कोणी वागत असेल तर तो 'चेकाळला' असे म्हणायची पद्धत आहे. हे म्हणजे, मिपावर 'संकेताक्षर बोलवा' असे जे लिहिले असते (मागवा हा शब्द असूनही) तसे वाटले.
- तिरशिंगराव टीकाकारणे

बॅटमॅन's picture

28 Oct 2013 - 3:31 pm | बॅटमॅन

चेकाळणे हा शब्द चुकीच्या प्रकारे वापरल्या गेला आहे. ते संकेताक्षर बोलावणेही तसेच.

-बॅटिंगराव अनुमोदणे.

मराठी कथालेखक's picture

28 Oct 2013 - 6:09 pm | मराठी कथालेखक

"लग्न करणे" म्हणजे इतिकर्तव्य समजले जाते.. करणार काय ना.. पण तुम्ही सकारात्मक दृष्टीने सगळ्या गोष्टींकडे बघत आहात हे चांगलं.
असो.
शुभेच्छा...